Post views: counter

Current Affairs June 2017 Part- 3 ( चालू घडामोडी )

🔹समाजवादी नेते प्रा. गोपाळ दुखंडे यांचं निधन

ज्येष्ठ समाजवादी नेते प्रा. गोपाळ दुखंडे यांचं 13 जून रोजी सावंतवाडी इथं निधन झालं. ते ७४ वर्षांचे होते. दुखंडे यांच्या निधनामुळं महाराष्ट्राच्या परिवर्तनवादी चळवळीतील एक झंझावात शांत झाल्याची भावना व्यक्त होत आहे.

समाजवादी वर्तुळात 'सर' म्हणून परिचित असलेल्या दुखंडे यांच्यावर डॉ. राममनोहर लोहिया यांच्या विचारांचा पगडा होता. त्या विचारसरणीशी प्रामाणिक राहून दुखंडे यांनी कोकणासह महाराष्ट्रात वंचितांच्या हक्कांसाठी अनेक लढे दिले. नाईट स्कूलच्या विद्यार्थ्यांचा मोर्चा असो, विना अनुदानित शिक्षकांचा लढा असो, कोकणातल्या बेरोजगार तरुणांची जनाधिकार परिषद असो, कोकणातला राजकीय दहशतवाद मोडून काढण्यासाठी १९९५ साली मालवण विधानसभा मतदार संघात दिलेली लढाई असो. अतिशय नीडरपणे त्यांनी लोकलढ्यांचे नेतृत्व केले.

Current Affairs June 2017 Part- 2 ( चालू घडामोडी )

🔹१७ जुलैला राष्ट्रपतीपदाची निवडणूक; निवडणूक आयोगाची घोषणा

राष्ट्रपतीपदाची निवडणूक १७ जुलै या दिवशी होणार असल्याचे केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे. या निवडणुकीसाठी १४ जूनला आयोगातर्फे अध्यादेश जारी केला जाणार आहे. २८ जून या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख असून या अर्जांची २९ जून या दिवशी छाननी केली जाणार आहे. त्याच प्रमाणे अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख १ जुलै असणार आहे. तर मतमोजणी २० जुलै या दिवशी होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयुक्त नसीम झैदी यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

विद्यमान राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा कार्यकाल पुढील महिन्यात २४ जुलै या दिवशी संपुष्टात येत आहे. राष्ट्रपती पदासाठी निवडणूक घेणे आवश्यक झाले तर १७ जुलैला मतदान घेतले जाईल असे झैदी यांनी स्पष्ट केले. सकाळी १० ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत मतदान घेतले जाणार आहे. कोणताही राजकीय पक्ष आपल्या संसद सदस्यांसाठी किंवा आमदारांसाठी व्हीप जारी करू शकत नाही असे आयोगाने स्पष्ट केले आहे.

Current Affairs June 2017 Part- 1 ( चालू घडामोडी )


🔹मन की बात’ पुस्तकाचे प्रकाशन

मन की बात: ए सोशल रिव्होल्युशन ऑन
रेडिओ’ आणि ' मार्चिंग वीथ ए बिलियन्स – अॅनलायझिंग नरेंद्र मोदींज गवर्नमेंट अत मिडटर्म' या दोन पुस्तकांचे प्रकाशन झाले आहे. ‘मन की बात’ हे पुस्तक राजेश जैन यांनी तर पत्रकार उदय माहूरकर यांनी ‘मार्चिंग वीथ ए बिलियन्स’ लिहिलेले आहे.

🔹कोटा हे जगातील सातव्या क्रमांकाचे
दाट घनतेची लोकवस्ती असलेले शहर आहे: WEF

जागतिक आर्थिक मंच (WEF) च्या अहवालानुसार, कोटा (राजस्थान) हे जगातील सातव्या क्रमांकाचे दाट घनतेची लोकवस्ती असलेले शहर आहे. येथे 12000 लोक/चौ. कि.मी. इतकी घनता आहे. या सूचित शीर्ष पाच शहरांमध्ये ढाका (44500 लोक/चौ. कि.मी.), मुंबई, मेडेलिन, मनिला, कॅसाब्लांका यांचा समावेश आहे.

🔹FDI साठी गंतव्य म्हणून भारताची प्रथम निवड झाली आहे : fDi अहवाल 2017

फायनान्शियल टाइम्स पासूनच्या fDi मार्केट्स सेवेवर आधारित सीमाक्षेत्रासंबंधित गुंतवणुकीचे वर्ष 2016 साठी वार्षिक मूल्यांकन केले आहे. त्यांनी याबाबत fDi अहवाल 2017 नुकताच प्रसिद्ध केला आहे.

हा अहवाल हरित क्षेत्रात भांडवली गुंतवणूक 6% ने वाढली आहे तर थेट विदेशी गुंतवणूक (FDI) प्रकल्पांमध्ये 3% ने घट झाली आहे.

▪️अहवालातील ठळक मुद्दे

हरित क्षेत्रात FDI साठी भारत हे जगातील सर्वोच्च आवडीचे गंतव्य म्हणून उदयास

Current Affairs May 2017 Part- 5( चालू घडामोडी )

🔰 Current Affairs Marathi 🔰:

🔹सहा स्थळांना दर्जा वारशाचा

महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाने राज्यातील सहा ठिकाणांना जैवविविधता वारसा स्थळांचा दर्जा दिला आहे. विदर्भातील गोंदिया जिल्ह्यातील दंडारी दलदल कुही आणि गडचिरोली जिल्ह्यातील वडाधाम जीवाश्म पार्क या दोन ठिकाणांचा यामध्ये समावेश आहे.

राज्य जैवविविधता मंडळाची बैठक बुधवारी मंत्रालयात पार पडली. वन विभागाचे सचिव विकास खारगे, मंडळाचे अध्यक्ष विलास बर्डेकर, सचिव डॉ. विनय सिन्हा यांच्यासह मंडळाचे सदस्य या बैठकीला उपस्थित होते. नव्याने नियुक्त करण्यात आलेल्या सदस्यांचीही पहिली बैठक होती.

जैवविविधता वारशाचा दर्जा देण्यासाठी मंडळाकडे एकूण नऊ प्रस्ताव आले होते. त्यापैकी सहा प्रस्तावांना मंडळाने मंजुरी दिली आहे. विदर्भातील दोन ठिकाणांव्यतिरिक्त रत्नागिरी जिल्ह्यातील वेळास व आंजर्ले, जळगावमधील लांडोरखोरी जंगल आणि पुण्यातील गणेशखिंड उद्यानांचाही समावेश या ठिकाणांना जैवविविधता वारसा म्हणून घोषित करण्यास मंडळाने मंजुरी दिली असल्याची माहिती आहे.

या सहा ठिकाणच्या जैवविविधतेचे संवर्धन व्हावे व लोकांना येथील समृद्ध जैवविविधतेची माहिती व्हावी, या उद्देशाने हा दर्जा देण्यात आला आहे. या ठिकाणांबद्दल माहितीपत्रके प्रसिद्ध करणे, तेथील कामांसाठी निधीची तरतूद करणे तसेच या ठिकाणांची प्रसिद्धी करणे याबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली.

Current Affairs May 2017 Part- 4 ( चालू घडामोडी )


🔹हसन रूहानी पुन्हा ईराणच्या राष्ट्रपतीपदी

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत घवघवीत यश मिळाल्याने हसन रूहानी यांची पुन्हा एकदा राष्ट्रपतीपदी निवड करण्यात आली आहे, अशी माहिती स्टेट टेलिव्हिजनने दिली. हसन रूहानी यांनी २०१३ मध्ये निवडणूक जिंकून पहिल्यांदा राष्ट्रपतीपदाची धुरा सांभाळली होती. ४ वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर ते पुन्हा निवडून आले आहेत.

ईराणचे इतर देशांशी संबंध दृढ करण्यासाठी हसन रूहानी यांनी प्रयत्न केले आहेत. रूहानी यांच्या कार्यकाळातच अमेरिका आणि ईराण यांच्यादरम्यानचा परमाणू करार करण्यात आला. दोन्ही देशांतील संबंध मैत्रीपूर्ण करण्यासाठी हा करार खूप महत्वपूर्ण मानला जातो.

मतमोजणीच्या सुरूवातीलाच रूहानी हे २८ लाख माताधिक्याने पुढे होते. अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत ४ कोटी लोकांनी मतदानाचा अधिकार बजावला. हसन रूहानी पुन्हा एकदा राष्ट्रपतीपदी विराजमान झाल्याने ईराणची अर्थव्यवस्था सुधारण्यास मदत होईल. तसेच जगासोबतचे ईराणचे संबंध सुधारण्यास मदत होईल असे बोलले जात आहे.

🔹शास्त्रज्ञ श्रीनिवास कुलकर्णींचा जागतिक सन्मान

खगोलशास्त्र विषयातील अमूल्य योगदानाबद्दल भारतीय शास्त्रज्ञ श्रीनिवास कुलकर्णी यांना प्रतिष्ठेचा डॅन डेव्हिड पुरस्कार जाहीर झाला आहे.

श्रीनिवास कुलकर्णी हे कॅलिफॉर्निया इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये अॅस्ट्रोफिजिक्स अँड प्लॅनेटरी सायन्स या विषयाचे प्राध्यापक आहेत. पालोमर ट्रान्झिएन्ट फॅक्टरीची स्थापना आणि संचालनाच्या कामासाठी श्रीनिवास कुलकर्णी ओळखले जातात. आकाशात होणाऱ्या क्षणिक घटनांची माहिती विस्ताराने मिळावी, या उद्देशानं त्यांनी केलेलं सर्वेक्षण जगभरात वाखाणलं गेलंय.