Post views: counter

केंद्रीय‬ अर्थसंकल्पातील ठळक वैशिष्ट्ये

केंद्रीय‬ अर्थसंकल्पातील ठळक वैशिष्ट्ये


  1. अरुणाचल प्रदेशमध्ये आणखी एक फिल्म इन्स्टिट्यूट
  2. छोट्या उद्योजकांसाठी मुद्रा बॅंकेची स्थापना
  3. करसंकलन अपेक्षेपेक्षा जास्त झाल्यास मनरेगासाठी सर्वाधिक निधीची तरतूद 
  4. पंतप्रधान कृषी सिंचन योजनेसाठी तीन हजार कोटी रुपयांची तरतूद
  5. अशोकचक्राचे चिन्ह असलेले सोन्याचे नाणे आणणार
  6. निर्भया निधीसाठी आणखी एक हजार कोटींची गुंतवणूक
  7. काळ्या पैशांवर रोख लावण्यासाठी रोख पैशांच्या व्यवहारांवर मर्यादा आणणार
  8. पुढच्यावर्षी सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी
  9. पंतप्रधान जनधन योजनेसाठी टपाल कार्यालयांचा वापर
  10. श्रीमंत लोकांचे गॅस अनुदान कमी करणार
  11. पंतप्रधान सुरक्षा विमा योजना सुरू करणार
  12. पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेमधून दोन लाखांचा अपघात विमा मिळणार, त्यासाठी प्रिमिअम वार्षिक १२ रुपये
  13. पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना, वार्षिक प्रिमिअम ३३० रुपये, मृत्यूनंतर विमाधारकाच्या कुटुंबियांना दोन लाख रुपये मिळणार
  14. मागासवर्गीयांसाठीच्या सध्याच्या योजना सुरू राहणार
  15. उत्पादन क्षेत्र म्हणून भारताला विकसित करण्याचे उद्दिष्ट
  16. करसंकलनातील ६२ टक्के वाटा राज्यांना मिळणार, केंद्राकडे ३८ टक्के वाटा राहणार
  17. २०२२ हे देशाच्या स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष
  18. अनुदानासाठी जनधन, आधार कार्ड आणि मोबाईल (जॅम) यांचा वापर करणार
  19. २०२२ पर्यंत देशातील प्रत्येकाला घर
  20. जलसंधारणासाठी पाच हजार ३०० कोटी रुपयांची तरतूद 
  21. ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांसाठी २५ हजार कोटी रुपयांची तरतूद
  22. मनरेगासाठी ३४ हजार कोटी रुपयांची तरतूद
  23. भारतीय अर्थव्यवस्था वेगाने विकसित होण्याचा अंदाज
  24. देशाच्या आर्थिक विकासात राज्यांचा समतोल वाटा
  25. घाऊक महागाई वाढ निर्देशांक नकारात्मक
  26. वेगाने विकसित होणारी जगातील अर्थव्यवस्था
  27. सूक्ष्म अर्थव्यवस्थेमध्ये आता स्थिरता
  28. लोकांना विश्वासार्ह सरकार हवे आहे आणि आम्ही ते देतो आहोत
  29. जनधन योजना अल्पावधीत यशस्वी
  30. कोळसा खाणीच्या लिलावांतून मिळणाऱया रॉयल्टीमुळे राज्यांना फायदा
  31. सहा कोटी टॉयलेट बांधण्याचे उद्दिष्ट
  32. जीएसटी एक एप्रिल २०१६ पासून अंमलात येणार
  33. महागाईमध्ये घट वित्तीय धोरण
  34. शहरात दोन कोटी आणि ग्रामीण भागात चार कोटी घरे बांधणार

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा