Post views: counter

जोतीराव गोविंदराव फुले

जोतीराव गोविंदराव फुले
महात्मा फुले

जन्म: एप्रिल ११, इ.स. १८२७ कटगुण, सातारा, महाराष्ट्र.
मृत्यू: नोव्हेंबर २८, इ.स. १८९० पुणे, महाराष्ट्र.
प्रभाव: थॉमस पेन.
वडील: गोविंदराव फुले.
आई: चिमणाबाई गोविंदराव फुले.
पत्नी: सावित्रीबाई फुले.
  • बालपण आणि शिक्षण :
  1. जोतीबा फुले यांचे मूळ गाव - कटगुण (सातारा) होते.गोऱ्हे हे त्यांचे मूळ आडनाव.
  2. महात्मा फुल्यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील कटगुण या गावी ११ एप्रिल १८२७ साली झाला.
    वडिलांचा फुले विक्रीचा व्यवसाय त्यामुळे फुले म्हणून ते ओळखण्यात येऊ लागले. व तेच नाव पुढे रूढ झाले.
  3. १८४२ ला माध्यमिक शिक्षणासाठी पुण्याच्या स्कॉटिश मिशन हायस्कूलमध्ये त्यांनी प्रवेश घेतला.
    बुद्धी अतिशय तल्लख त्यामुळे पाच-सहा वर्षातच त्यांनी अभ्यासक्रम पूर्ण केला.
  • सामाजिक कार्य :
  1. → सप्टेंबर २३, इ.स. १८७३ रोजी महात्मा फुले यांनी
    सत्यशोधक समाजाची स्थापना केली. पुरोहितांकडून
    होणाऱ्या अन्यायापासून, अत्याचारापासून व
    गुलामगिरीतून तथाकथित शूद्रातिशूद्र समाजाची
    मुक्तता करणे व त्यांना हक्काची जाणीव करून देणे हे
    सत्यशोधक समाजाचे ध्येय होते.
  2. 'सर्वसाक्षी जगत्पती ।
    त्याला नकोच मध्यस्ती ॥'
    ......हे समाजाचे घोष वाक्य होते.
  3. १८४८ साली पुण्यामध्ये बुधवार पेठेतील भिडे यांच्या
    वाड्यात पहिली मुलींची शाळा काढून तेथील
    शिक्षिकेची जबाबदारी सावित्रीबाईंवर
    सोपविली. महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाची ही
    मुहूर्तमेढ ठरली. तसेच अस्पृश्य मुलांसाठी पुण्याच्या
    वेताळपेठेत १८५२ मध्ये त्यांनी शाळा स्थापन केली.
    त्यांच्या या कार्याला सनातन्यांकडून सतत विरोध
    होत असे. पण जोतीराव आपल्या भूमिकेवर ठाम असत.
  4. ‘नीती हाच मानवी जीवनाचा आधार आहे’ हा
    विचार मांडणारे जोतीराव एक तत्वचितक व्यत्तिमत्त्व
    म्हणूनही आपल्यासमोर येतात.
  • साहित्य आणि लेखन :
◑ तृतीय रत्न (नाटक - इ.स. १८५५)
◑ राजे छत्रपती शिवाजी राजे भोसले यांचा पोवाडा (पोवाडा - इ.स. १८६९)
◑ ब्राह्मणांचे कसब (लेखसंग्रह - इ.स. १८६९)
◑ गुलामगिरी (लेखसंग्रह - इ.स. १८७३)
◑ शेतकऱ्यांचा असूड (लेखसंग्रह - इ.स. १८८३)
◑ सत्सार (नियतकालिक - इ.स. १८८५)
◑ इशारा (लेखसंग्रह - इ.स. १८८५)
◑ सार्वजनिक सत्यधर्म (लेखसंग्रह - इ.स. १८८९)

  • शिक्षणाचे महत्त्व पटवून देणार्या त्यांच्या कवितेच्या खालील ओळी प्रसिद्ध आहेत:
“विद्येविना मती गेली। 
मतिविना नीती गेली।
नीतिविना गती गेली। 
गतिविना वित्त गेले।
वित्ताविना शूद्र खचले।
इतके अनर्थ एका अविद्येने केले।।"


  • थोडक्यात जीवनपट 
  1.  इ.स. १८२७ - जन्म कटगुण, सातारा जिल्हा
  2. इ.स. १८४० - सावित्रीबाईंशी विवाह.
  3. इ.स. १८४७ - थॉमस पेन यांच्या 'राईट ऑफ मॅन' या ग्रंथाचा अभ्यास.
  4. इ.स. १८४८ - भारतातील मुलींची पहिली शाळा सुरू केली. बहुजन समाजाच्या शिक्षणासाठी काम सुरू केले.
  5. सप्टेंबर ७, इ.स. १८५१ - भिडे वाड्यात व रास्ता पेठेत मुलींच्या शाळेची सुरुवात.
  6. इ.स. १८५२ - पूना लायब्ररीची स्थापना.
  7. मार्च १५, इ.स. १८५२ - वेताळपेठेत अस्पृश्यांसाठी पहिली शाळा सुरू केली.
  8. इ.स. १८५४ - स्कॉटिश मिशनच्या शाळेत अर्धवेळ शिक्षकाची नोकरी
  9. इ.स. १८५५ - रात्रशाळेची सुरुवात केली.
  10. इ.स. १८६० - विधवाविवाहास साहाय्य केले.
  11. इ.स. १८६३ - बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली .
  12. इ.स. १८६५ - विधवांच्या केशवपनाविरुद्ध न्हाव्यांचा संप घडवून आणला.
  13. इ.स. १८६४ - गोखले बागेत विधवाविवाह घडवून आणला.
  14. इ.स. १८६८ - दुष्काळ काळात राहत्या घरातील हौद अस्पृश्यांसाठी खुला केला.
  15. इ.स. १८७३ - सत्यशोधक समाजची स्थापना केली.
  16. इ.स. १८७६ ते १८८२ - पुणे नगर पालिकेचे सदस्य होते.
  17. इ.स. १८८० - दारूची दुकाने सुरू करण्यास विरोध केला.
  18. इ.स. १८८० - नारायण मेघाजी लोखंडे यांना 'मिलहॅण्ड असोसिएशन' या देशातील पहिल्या कामगार संघटनेच्या स्थापनेत साहाय्य केले.
  19. इ.स. १८८२ - 'विल्यम हंटर शिक्षण आयोगा' समोर निवेदन दिले. यात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत देण्याची मागणी केली.
  20. इ.स. १८८७ - सत्यशोधक समाजातर्फे नवीन मंगलाष्टकांची व नवीन पूजाविधीची रचना करून पुरोहिताशिवाय विवाह घडवून आणण्यास सुरुवात केली.
  21. इ.स. १८८८ - मुंबईतील कोळीवाडा येथे जनतेने रावबहादुर वडेकर यांच्या हस्ते सत्कार करून 'महात्मा' ही पदवी प्रदान केली.
  22. २८ नोव्हेंबर, इ.स. १८९० - पुणे येथे निधन झाले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा