Post views: counter

Current Affairs Jan 2015 Part- 1

चालू‬ घडामोडी:जानेवारी २०१५

  • ऑस्ट्रेलियन ओपन ग्रॅँडस्लॅम २०१५ विजेते:-
  1. पुरुष एकेरीः नोव्हाक जोकोविच 
  2. महिला एकेरीः सेरेना विल्यम्स  
  3. पुरुष दुहेरीः बोलेली-फॉग्निनी 
  4. महिला दुहेरीः सँड्स-सॅफारोव्हा 
  5. मिश्र दुहेरीः पेस-हिंगिस
  • १९९७, ९८, ९९ अशी सलग तीनवेळा ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये महिला एकेरीचे जेतेपद पटकाविणारी खेळाडू कोण?
== मार्टिना हिंगीस
  • भारताचा सदाबहार टेनिसपटू लिअँडर पेसने ऑस्ट्रेलियन ओपन ग्रॅँडस्लॅम २०१५ जिंकत कारकिर्दीतील कितवे ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावले?
== पंधरावे ग्रँडस्लॅम जेतेपद

  • नोव्हाक जोकोविचने ऑस्ट्रेलियन ओपन ग्रॅँडस्लॅम स्पर्धा पाचव्यांदा जिंकत कारकिर्दीतील कितवे ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावले?
== आठवे ग्रँडस्लॅम जेतेपद
  • ऑस्ट्रेलियन ओपन ग्रॅँडस्लॅम स्पर्धा सर्वाधिक वेळा जिंकण्याचा बहुमान कोणत्या खेळाडूच्या नावावर आहे?
== रॉय इमर्सन-ऑस्ट्रेलिया
  • ३५व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा-केरळ
  1. प्रमुख पाहुणे:-केंद्रीय नगरविकास मंत्री वेंकय्या नायडू
  2. सदिच्छा दूत:-सचिन तेंडूलकर 
  3. क्रीडाज्योत प्रज्वलन:- सचिन तेंडूलकर,पी.टी.उषा व अंजू बॉबी जॉर्ज
  4. सूत्रसंचालन:- अमिताभ बच्चन
  5. मल्याळम अभिनेता मोहन लाल विशेष नृत्य व गायन 
  6. मोटो/स्लोगन:-गेट सेट प्ले 
  7. बोधचिन्ह:-Ammu (The Great Hornbill, the State Bird of Kerala)
  • २७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा केरळ मध्ये कधी आयोजित करण्यात आल्या होत्या?
== १९८७
  • ३५व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत पहिलं सुवर्णपदक जिंकणारी खेळाडू कोण?
== संगीता चानू खुमुकचाम
  • कर्नाटकमधील जमखंडी येथे आयोजित भारतीय कुस्ती संघटनेची मान्यता असलेल्या 'हिंद केसरी' किताबावर नाव कोरत ऐतिहासिक विजय कोणी मिळवला?
== सुनील साळुंखे(सोलापूरजवळच्या सांगोला तालुक्यातील बामणी गावातील)
  • ऑस्ट्रेलियन ओपन ग्रॅँडस्लॅम स्पर्धेचे मिश्र दुहेरीचे विजेतेपद पटकाविणार्या लिअँडर पेसचे हे मिश्र दुहेरीतील कितवे जेतेपद आहे?
== सातवे (मार्टिना हिंगीसचे ११वे ग्रॅण्ड स्लॅम)
  • सेरेना विलियम्सने ऑस्ट्रेलियन ओपन ग्रॅँडस्लॅम स्पर्धेचे सहाव्यांदा विजेतेपद पटकावीत एकूण किती ग्रँड स्लॅम जेतेपदावर नाव कोरले आहे?
== १९
  • खुल्या स्पर्धाच्या युगात(ऑस्ट्रेलियन ओपन) विजेतेपद मिळवणारी सर्वात प्रौढ खेळाडू कोण ठरली आहे?
== सेरेना विलियम्स(वय ३३ वर्षे)
  • विश्वचषकासाठीच्या संघातून वगळण्यात आल्यानंतर वेस्ट इंडिजचा कोणत्या अष्टपैलू क्रिकेटपटूने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे?
== ड्वेन ब्राव्हो
  • ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये सर्वात मोठय़ा वयाची जोडी कोणती होती?
लिअँडर पेस(४१)- मार्टिना हिंगीस(३४)
  • टेनिस मध्ये सर्वाधिक जेतेपद मिळवणा-या महिला टेनिसपटूंमध्ये तिस-या स्थानी झेप घेणारी खेळाडू कोण?
== सेरेना विल्यम्स(१९ जेतेपद)
>मार्गारेट कोर्ट (२४ जेतेपदे)
>स्टेफी ग्राफ (२२ जेतेपदे)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा