Post views: counter

Current Affairs March 2015 Part- 3

चालू घडामोडी:-मार्च २०१५
 
Current Affairs
  • राज्यातील महानगरपालिका आणि नगरपालिकांमध्ये २०११  मध्ये सुरू केलेली बहुसदस्यीय प्रभाग पद्धती रद्द करून पूर्वीप्रमाणेच "एक प्रभाग-एक नगरसेवक‘ ही पद्धत सुरू करणारे विधेयक विधानसभेत कधी  मंजूर करण्यात आले?
    == १९ मार्च २०१५
  • फॉर्म्युला वनमधील माजी विश्वविजेता असलेल्या कोणत्या खेळाडूचा  मुलगा याच्या मोटारीला अपघात झाल्यामुळे  जखमी झाला आहे?
    == मायकल शूमाकर- मुलगा मिक शुमाकर
  • दक्षिण मुंबईतील समुद्र किनाऱ्यावर परिसराचे अर्थात चौपाटीचे कोणते नवीन नामकरण करण्यात येणार असल्याची घोषणा भारतीय जनता पक्षप्रणित राज्य सरकारने केली आहे?
    == स्वराज्य भूमी
  • बहुचर्चित स्थानिक संस्था कर (एलबीटी) कधीपासून रद्द होणार आहे?
    == ०१ ऑगस्ट २०१५
  • ट्युनिशियाची राजधानी असणाऱ्या कोणत्या शहरातील बार्डो संग्रहालयावर  दहशतवाद्यांनी हल्ल्या केला होता?
    == ट्युनिस
  • महाराष्ट्र अर्थसंकल्प २०१५-१६ तरतूद:-
    जलसंपदा (७६१९ कोटी),रस्ते आणि पूल (४३०९ कोटी),पर्यटन (४०५ कोटी),
    स्थानिक स्वराज्य संस्था आणि पंचायत राज संस्था (२३२७ कोटी),कृषी (४७०० कोटी),ग्रामविकास (१६०५ कोटी), पाटबंधारे (७६१९ कोटी), वाहतूक (६८७६ कोटी), उद्योग (४०३ कोटी), ऊर्जा (३७२६ कोटी), सामाजिक क्षेत्र (२३४८ कोटी), सार्वजनिक सेवा (४११० कोटी), सर्वसाधारण आर्थिक सेवा (४११० कोटी), विज्ञान, तंत्रज्ञान व पर्यावरण (६७ कोटी)
  • महाराष्ट्र अर्थसंकल्प २०१५-१६ विविध योजना:-
    1. श्‍यामाप्रसाद मुखर्जी जन वन विकास योजना
    2. पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा अर्थसाहय योजना
    3. मोतीरामजी लहाने कृषी समृद्धी योजना
    4. उत्तमराव पाटील वन उद्यानांची निर्मिती योजना
    5. प्रमोद महाजन कौशल्य विकास योजना
  • श्‍यामाप्रसाद मुखर्जी जन वन विकास योजना
    जनसंघाचे संस्थापक श्‍यामाप्रसाद मुखर्जी यांच्या नावाने ‘श्‍यामाप्रसाद मुखर्जी जन वन विकास’ योजनेची घोषणा करण्यात येणार आहे. या योजनेतंर्गत लोकसहभागातून वन वृक्षाच्छादन वाढविणे, वृक्षसंपत्तीचे व्यवस्थापन करणे; तसेच राज्याच्या ग्रामविकास, आदिवासी विकास व जलसंधारण विभागांच्या योजना एकात्मिक पद्धतीने राबविली जाणार आहे.
  • पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा अर्थसाहय योजना
    जनसंघाचे माजी अध्यक्ष आणि नेते पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या नावाने घरकुल जागा अर्थसाहय योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेतंर्गत राज्यातील दारिद्य्र रेषेखालील कुटुंबाला निवारा देण्यासाठी जमीन उपलब्ध करून दिली जाणार आहे. राज्यामध्ये सद्यस्थितीत दारिद्य्र रेषेखालील स्वत:ची जागा नसलेले २ लाखांपेक्षा अधिक पात्र लाभार्थी आहेत; परंतु स्वत:ची जागा नसल्यामुळे त्यांना घरकूल योजनेचा लाभ घेता येत नाही. अशा लाभार्थ्यांसाठी ५० हजार रुपयांपर्यंत स्वत:ची जागा खरेदी करण्याकरिता आर्थिक साह्य देण्यासाठी ही योजना तयार करण्यात आली आहे. या योजनेसाठी २०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
  • मोतीरामजी लहाने कृषी समृद्धी योजना
    जनसंघाचे धुळ्यातील कार्यकर्ते असलेले मोतीरामजी लहाने यांच्या नावाने ‘कृषी समृद्धी योजना’ सुरू करण्यात येत आहे. शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या होणाऱ्या यवतमाळ जिल्ह्यासाठी ही योजना असेल. कृषी यांत्रिकीकरण आणि कृषी क्षेत्रातील अन्य योजनांचे एकत्रीकरण या माध्यमातून शेतीची उत्पादतकता वाढविण्यावर भर देण्यात येणारा आहे. त्यासाठी ५० कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.
  • उत्तमराव पाटील वन उद्यानांची निर्मिती योजना
    उत्तमराव पाटील, जनसंघ नेते आणि भाजपचे १९८० ते ८५ महाराष्ट्राचे पहिले अध्यक्ष उत्तमराव पाटील वन उद्यानांची निर्मिती.सामाजिक वनीकरणामार्फत प्रत्येक जिल्ह्यात उत्तमराव पाटील वन उद्यानांची निर्मिती केली जाणार आहे. अशा उद्यानात वनीकरण; तसेच सर्व प्रकारच्या स्थानिक प्रजातींच्या वनस्पतींची लागवड करण्या येणार आहे. त्यामध्ये निसर्ग परिचय केंद्र, वन व पर्यावरण शिक्षण केंद्र यांचाही समावेश असणार आहे. त्यासाठी २० कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
  • प्रमोद महाजन कौशल्य विकास योजना
    राज्यात कौशल्य विकास व स्वयंरोजगार साह्याच्या काही योजना आहेत. त्यांना एका छताखाली आणून ‘प्रमोद महाजन कौशल्य विकास योजना’ सुरू करण्यात येणार आहे. या योजनेतंर्गत तरुणांना ते करत असलेल्या किंवा त्यांचा कल असलेल्या रोजगारासाठी प्रशिक्षण; तसेच स्वयंरोजगारासाठी दरवर्षी पाच लाख युवकांना औद्योगिक प्रशिक्षण संस्था व खासगी संस्थेत प्रशिक्षण देऊन ७५ टक्‍के आश्‍वासित नोकरी मिळेल, असे नियोजन केले जाणार आहे.
  • महिला बचत गटांना जिल्हास्तरावर कायमस्वरूपी ‘पुण्यश्‍लोक अहिल्याबाई होळकर बाजारपेठ’ निर्माण करण्याची घोषणा राज्याच्या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. यासाठी किती कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.
    == २०० कोटी
    माझी कन्या भाग्यश्री’ या योजनेसाठी २०० कोटी
  • संचालक मंडळाच्या निवडीदरम्यान केंद्रीय मनुष्यबळ संसाधन मंत्रालयाशी मतभेद निर्माण झाल्याने कोणी नुकताच मुंबईतील इंडियन इन्स्टिट्युट ऑफ टेक्‍नॉलॉजीच्या (आयआयटी) नियामक मंडळाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे?
    == अणुशास्त्रज्ञ अनिल काकोडकर
  • भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी (आएएस) कोणत्या अधिकार्याचा  अलिकडेच संशयास्पद मृत्यु झाला आहे?
    == डी.के. रवी
  • राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा, २०१३ अन्वये शिक्षापत्रिकेमध्ये कुटुंबातील सर्वात ज्येष्ठ महिलेचे नाव कुटुंबप्रमुख म्हणून नोंदविण्याची तरतूद करण्यात आली आहे.तसेच केवळ ज्या कुटुंबामध्ये एकही महिला सदस्य नाही,अशाच कुटुंबातील ज्येष्ठ पुरुष सदस्याला कुटुंबप्रमुख म्हणून नाव नोंदविण्याची मुभा देण्यात आली आहे.परंतु यास विरोध दर्शवित विरोध दर्शविला असून महिलेला कुटुंब प्रमुख करण्याचा निर्णय भारतीय संस्कृतीसह इस्लाममधील कायद्याच्या विरूद्ध असल्याचे म्हटले आहे?
    == बरेलीतील दर्गा अल हजरत
  • इस्राईलमध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या कोणत्या पक्षाने स्पष्ट बहुमत विरोधी झिओनिस्ट युनियन आघाडीचा पराभव केला आहे?
    == लिकुड पक्ष
  • विश्वकरंडक स्पर्धांमध्ये हॅट्ट्रीक घेणारा दक्षिण आफ्रिकेचा पहिलाच  खेळाडू कोण?
    == जेपी ड्युमिनी
    विकेट्स:-एंजेलो मॅथ्यूज-नुआन कुलसेखरा-थिरिंदू कौशल
  • रेल्वे विषयक घडामोडी:-
    1. एक एप्रिलपासून रेल्वे प्लॅटफॉर्म तिकीट पाच ऐवजी दहा रुपयांना
    2. एक एप्रिलपासून प्रवासी 60 दिवसांऐवजी 120 दिवस आधी रेल्वेचे आरक्षण करू शकणार
  • सॅनिटेशन चॅरिटी वॉटरएड‘ आणि जागतिक आरोग्य संघटनेचा अहवाल:-
    विषय:-विकसनशील देशांतील स्वच्छता
    1. केवळ अस्वच्छतेमुळे या देशांमध्ये दरवर्षी पाच लाख नवजात अर्भकांचा मृत्यू.
    2. एक तृतीयांश रुग्णालयांमध्ये एकतर पुरेसे कर्मचारी नाहीत.
    3. बहुतांश रुग्णांना हात धुण्यासाठी साबणही मिळत नाही.
    4. तब्बल ४० टक्‍के रुग्णालयांना पाण्याचा वेगळा स्रोतच उपलब्ध नाही.
    5. डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कॉंगो, हैती, मलावी, टांझानिया आणि दक्षिण सुदान या देशांमध्ये आरोग्य सुविधांची अवस्था दयनीय
    6. बार्बरा फ्रॉस्ट, "वॉटरएड‘च्या कार्यकारी प्रमुख.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा