Post views: counter

Way to Success in MPSC Exam ?
सफलता मिळत नसते, मिळवावी लागते ....

मित्रांनो,
मला बरेच जण (नेहमीच कुणी ना कुणी) विचारतात कि “मी हे हे
शिक्षण करत आहे किंवा कम्प्लीट केल आहे मग
मी एमपीएससी किंवा युपीएससी परीक्षेत सफल होईल का?”.

आता मलाच हा प्रश्न पडतो कि मला त्यांच्याबद्दल काहीच
माहित नाही आणि मी कस काय सांगू कि ते सफल होतील
कि नाही?

…पण एक मात्र मी खात्रीने सांगू शकतो कि सफलता मिळत
नसते तर ती मिळवावी लागते.
प्रत्येकाला सफल व्हाव अस वाटत असते आणि त्यात चूक
काहीच नाही.
एमपीएससीची कोणतीही परीक्षा असो किंवा युपीएससीची असो,
त्यासाठी अभ्यास करायचा असतो हे तर सर्वांनाच माहित
असते आणि प्रत्येक जन अभ्यास करतात हे तर आहेच.


ज्यांना सफल व्हायचे असते ते दिवस-रात्र मेहनत करतात पण
ते फक्त मोजकिच पुस्तके वाचून सफल व्हायचे स्वप्न बघत
राहतात मात्र ज्यांना घवघवीत सफलता मिळवायची असते
त्यांना पुस्तके वाचण्याची भूक लागते मग ते कुठूनही मिळवायचे
आणि वाचून आपली अभ्यासाची भूक मिटवायची असते परंतु
त्यांची ती भूक मिटतच नाही.
थोडेफार पुस्तके वाचून अभ्यास होत नाही असे नाही परंतु
हवा तितका होत नाही. जितकी डेप्थ हवी तितकी मिळत नाही.
जितकी जास्त पुस्तके वाचली तितके जास्त ज्ञान उपलब्ध होते
आणि त्याचा वापर परीक्षेसाठी होतो. कोणत्याही मुद्द्यावर
सखोल ज्ञान प्राप्त होते आणि त्या मुद्द्याच्या दोन्ही बाजू
कळतात. मग त्यावर कोणताही प्रश्न आला तर तुम्ही तो सोडवू
शकता मग ती पूर्व परीक्षा असो व मुख्य परीक्षा असो.
थोडेफार पुस्तके वाचून तुम्हाला अस वाटत असेल
कि ह्या परीक्षेसाठी जितकी तयारी करायची होती ती मी केली
आहे पण कदाचित ते धोकादायक असू शकते. ह्याने
तुम्हाला सफलता मिळवता येणार नाही.
मग सफलता मिळवण्यासाठी अजून काय करावे?

सर्वात आधी “मला सफलता कोणत्याही परिस्थितीत
मिळवायची आहे” असा संकल्प करावा.
“त्यासाठी मी काहीही इमानदारीने करीन आणि कितीही अभ्यास
करीन” असा दृढ निश्चय करावा. हीच
सफलतेची पहिली पायरी आहे. जिथे संकल्प व दृढ निश्चय आहे
तेथे पाणी काढता येतेच.
जास्तीत जास्त पुस्तकांचा अभ्यास
करावा आणि आपल्या ज्ञानात नेहमी भर पाडावी आणि पडतच
राहिली पाहिजे अशी काळजी घ्यावी.
जेव्हा जेव्हा असा वाटेल कि माझा अभ्यास
व्हावा तितका झाला नाही तर अजून जास्त अभ्यास कसा होईल
ते पाहून तो पूर्ण करावाच.
ते करण्यासाठी स्वत:ला शिस्त लावावी म्हणजे
तुमचा आत्मविश्वास डगमगणार नाही आणि मार्गात
कितीही अडथळे आलेत तर तुम्ही ते पार कराल.

नेहमी सकारात्मक विचार करावा आणि मनात नकारात्मक
विचारांना थारा देवू नये. कितीही प्रयत्न केलेत
आणि नकारात्मक विचार जात नसतील तर थोडासा ब्रेक
घ्यावा आणि एक छान हास्य चित्रपट
पहावा किंवा आपल्या आवडीचे एक सुंदर गाणे ऐकत
असताना सोबत सोबत ते गाणे मोठ-मोठ्याने म्हणावे. मन एकदम
प्रसन्न होईल आणि आत्मविश्वास पुन्हा निर्माण होईल.
जेव्हा तुम्ही अगदी आनंदी असाल तेव्हा परत
अभ्यासाला सुरुवात करा. तुमचे प्रयत्न तूम्ही करत रहा.
सफलता सहजासहजी व आपोआप (automatic) मिळणार
नाही परंतु तुम्ही केलेल्या प्रयत्नातूनच नक्कीच मिळवू शकाल.
जेव्हा तुम्हाला परीक्षेत असफलता मिळाली तेव्हा निराश होवू
नका, त्या असफलतेपासून तुम्ही काही शिकलेत असा अर्थ घ्या.
उगीच निराश न बसता पुढील मार्गक्रमण करा.
एकेवेळी तुम्हाला अस वाटेल कि हे सर्व निरर्थक आहे
आणि त्यामुळे तुम्ही फार नाराज व्हाल
तेव्हा तुमच्या अपेक्षेमागे काहीतरी कारण असेल ते शोधून काढा.
जेव्हा ते कारण तुमच्या लक्षात येईल तेव्हा तुम्हाला बर वाटेल
आणि त्यातून तुम्ही मार्ग काढू शकाल. मार्ग आहेत पण ते
शोधावे लागतात.

तुमच्या जीवनात तुम्हाला काय व्हायचे आहे त्याकडे लक्ष
केंद्रित करा आणि त्याकडे मार्गक्रमण करत रहावे. हे
आर्टिकल तुम्ही वाचत आहात ह्याचा अर्थ हाच
कि तुम्हाला एमपीएससी किंवा युपीएससी परीक्षेत सफल
व्हायच आहे, बरोबर न?
तर आता पुढे मी जे काही सांगेल ते तुम्हीं कराच तरच
तुम्ही सफलता मिळवू शकाल:
सर्वात आधी जी परीक्षा द्यायची आहे
त्याचा अभ्यासक्रम बघा.
त्यानुसार जास्तीत जास्त पुस्तके
खरेदी करा अथवा लायब्ररीतून मिळवा. त्या संपूर्ण
पुस्तकांसाठी तुम्ही आमचे ई-प्रोस्पेक्ट्स बघू शकता.
आता समजा तुम्हाला राज्यसेवा परीक्षा द्यायची असेल तर
पूर्व, मुख्य परीक्षा व मुलाखत साठी ७० ते ८०
पुस्तकांची गरज पडेल. सोबतच ५ मासिके लागतील, इंटरनेट
वरील माहिती लागेल, दररोज २ वर्तमानपत्रे लागतील.
ह्या सर्वांचा अभ्यास करायला एक वर्ष लागेल तर सर्वात
आधी मुख्य परीक्षेची तयारी करावी मगच पूर्व
परीक्षेची तयारी करावी. पूर्व परीक्षा झाल्यावर मुख्य
परीक्षेचा सखोल अभ्यास करायला वेळ मिळणार नाही.

अभ्यास करत असताना स्वताचे नोट्स काढायला विसरू
नका. ह्याला शोर्ट कट नाही किंवा दुसरा पर्याय नाहीच.
जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा नियमितपणे रिविजन
करायला विसरू नका. माझ्या एका पी.जी.पी. student
(विणा शिंदे, पुणे) च सुद्धा हेच म्हणणे आहे
कि “कधी कधी असे घडते कि फार दिवसानंतर रिविजन
केल्यास काही वाचत असतांना अस वाटते कि मी हे वाचलच
नाही”. त्यामुळे नियमितपणे रिविजन करणे योग्य ठरते.
सराव परीक्षा म्हणजे प्रश्न पत्रिका सोडवून पाहणे हे
सफलतेच एक मुख्य कारण आहे. तुम्ही स्वत:ला तपासून
बघा, तुमचा अभ्यास कितपत झाला आहे हे नेहमी पडताळून
बघा. जास्तीत जास्त प्रश्न सोडवून
बघा आणि तुमचा झालेला अभ्यास Mock Test
च्या स्वरुपात तपासून बघा. ह्यासाठी तुम्ही प्रश्न संच
सोडवा परंतु तो प्रश्नसंच विकत घेण्याआधी त्याची व
त्यातील प्रश्नांची क्वालिटी बघा तरच तो विकत घ्या.
सोडवून बघू शकता त्याने तुम्हाला अंदाज येईल कि परीक्षेत
कोणत्या स्वरूपाचे प्रश्न येऊ शकतात.
जास्तीत जास्त प्रश्नांचे उत्तर द्यायला तुम्ही चुकले
असाल तर मात्र ही गंभीर बाब आहे कारण
तुमची झालेली तयारी व्हायची तितकी झालेली नाही हे
नक्की.
अशा वेळेस परत त्या विषयांची तयारी करावी आणि मग
परत Mock Test च्या स्वरुपात स्वत:ची तयारी तपासून
बघा.
अशा प्रकारे सफलता तुम्ही स्वत: मिळवू शकाल.