Post views: counter

‎अहमदनगर जिल्हा

अहमदनगर जिल्हा‬

                               महाराष्ट्रातील सर्वांत मोठा जिल्हा .आजच्या परिस्थितीतअहमदनगर जिल्हा हा सर्वांत पुढारलेला आहे.शिर्डी येथील साईबाबा मंदिर याच जिल्ह्यात राहाता तालुकातआहे.जिल्ह्यात सर्वाधिक साखर कारखानेआहेत. प्रवरानगर येथेआशिया खंडातील पहिला सहकारी साखरकारखाना स्थापन झाला होता. 'राळेगणसिद्धी' या खेड्याने जलव्यवस्थापनाचा एक आदर्श निर्माण केला, तर ' हिवरे बाजार' हेआदर्श खेडे म्हणून नावारूपासआले.
Ahmadnagar

  • ‎जिल्ह्याचे_क्षेत्रफळ‬१७,४१२चौ.किमी. 
  • लोकसंख्या इ.स.२०११च्या जनगननुसार४५,४३,०८०इतकी आहे.
                             राज्याच्या मध्यभागी असलेल्याअहमदनगर जिल्ह्याच्या उत्तरेस नाशिक जिल्हा वऔरंगाबाद जिल्हे; पूर्वेस बीड जिल्हा ;पूर्व व आग्नेय दिशांस उस्मानाबाद जिल्हा; दक्षिणेस सोलापूर जिल्हा, तरनैर्ऋत्येस व पश्चिमेस पुणे जिल्हा व ठाणेजिल्हा हे जिल्हे वसलेलेआहेत.
                             क्षेत्रफळाच्या दृष्टीने राज्यात सर्वांत मोठा असणाऱ्या या जिल्ह्यानेराज्याचे५.५४% भौगोलिक क्षेत्र व्यापलेले आहे.जिल्ह्याच्या पश्चिमेकडील प्रामुख्यानेअकोले तालुका व संगमनेर तालुक्यात सह्याद्रीच्या डोंगररांगा पसरलेल्या आहेत.महाराष्ट्रातील सर्वांत उंच शिखर कळसूबाई याच डोंगररांगांमध्येअकोले तालुक्यात (नगर, नाशिक जिल्ह्यांच्या सीमेवर) आहे.शिखराची समुद्रसपाटीपासून उंची १६४६ मीटर आहे.जिल्ह्याच्या पश्चिमेकडील प्रमुख डोंगररांग हरिश्चंद्राची रांग या नावानेओळखली जाते.जिल्ह्याचा काही मध्य भाग व उत्तरभाग हा बाळेश्वराचे पठारया नावाने संबोधला जातो. तसेच जिल्ह्याचा दक्षिणभाग हा घोड नदी, भीमा व सीनाया नद्यांचे खोरे म्हणूनओळखला जातो.
                          अहमदनगर जिल्हा ओळखला जातो तो सहकारी साखर कारखान्यांचा मूल स्रोत म्हणून! डॉ.विठ्ठलराव विखे-पाटील यांनी जिल्ह्यात प्रवरानगर (लोणी)येथे राज्यातील पहिली सहकारी पतपेढी (लोणी-बुद्रुकसहकारी पतपेढी) सुरूकेली (१९२३),तसेच राज्यातील पहिला साखर कारखाना स्थापन केला (जून,१९५०),आणि सहकारया तत्त्वाची मुहूर्तमेढ राज्यात रोवली गेली. सुप्रसिद्धअर्थतज्ज्ञ श्री. धनंजयराव गाडगीळया कारखान्याचे पहिले अध्यक्ष होते.या पहिल्या यशस्वी प्रयोगानंतर सहकारी साखर कारखान्यांची एक साखळीच राज्यात निर्माण झाली. एक सहकारी साखर कारखाना आणि त्या भोवतीच्या परिसराचा शैक्षणिक,औद्योगिक व सोयी सुविधांचा विकासअशी परंपरा महाराष्ट्रात निर्माणझाली.‪
  • जिल्ह्यातील_पर्यटनस्थळे‬
                         अमृतेश्वर मंदिर, रतनवाडी चांदबिबीचा महाल चिंकारा व माळढोकअभयारण्य जगदंबा मंदिर, मोहता  जगदंबामाता मदिंर, टाहाकरीश्री ढोकेश्वर मंदिर भगवानगड भंडारदरा धरण भुईकोट किल्ला,अहमदनगर रेणुकामाता मंदिर, केडगाव शनी-शिंगणापूर साईबाबा मंदिर, शिर्डी सिद्धटेक हरिश्चंद्रगड
  • ‪‎ऐतीहासीक‬
                          इ.स. १९४२ च्या चलेजाव आंदोलनाच्या काळात पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल,मौलाना आझाद, डॉ. पी.सी. घोषइत्यादी राष्ट्रीय नेते नगरमधील भुईकोट किल्ल्यात बंदिवासात होते.डिस्कव्हरीऑफ इंडिया हा प्रसिद्ध ग्रंथ पंडित जवाहरलाल नेहरू यांनी याच किल्ल्यात लिहिला.या ग्रंथाची काही हस्तलिखिते आजही येथे पाहण्यास मिळतात. याच किल्ल्यात डॉ.पी.सी.घोष यांनी हिस्ट्री ऑफ एन्शंट इंडियन सिव्हिलायझेशन हा ग्रंथ शब्दबद्ध केला. तसेच डॉ. बाबासाहेबआंबेडकर यांनी थॉट्स ऑफ पाकिस्तान वमौलाना आझाद यांनी गुबार - ए -खातिरहे ग्रंथ याच शहरात लिहिले.
  • विशेष‬
                        मराठी भाषेतील सार्वकालिक सर्वोत्कृष्ट ग्रंथ म्हणजे ग्रंथराज ज्ञानेश्वरी. ज्या ज्ञानेश्वरीची एकतरी ओवी अनुभवावी असे म्हटले जाते,तो ग्रंथ अहमदनगर जिल्ह्यातील श्रीक्षेत्र नेवासे येथे संत ज्ञानेश्वरांनी लिहिला. या आध्यात्मिक वैशिष्ट्यांसह आज अहमदनगर जिल्हा महाराष्ट्रात सर्वांत जास्तक्षेत्रफळ असलेला जिल्हा, सर्वाधिक सिंचन क्षेत्र असलेला, आणि सर्वाधिक सहकारी साखर कारखानेअसलेला राज्यातील जिल्हा अशी वैशिष्ट्ये दिमाखानेमिरवतआहे.‪
  • दळणवळण
‬                      जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातून नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्ग(क्र.५०) जातो. तसेच कल्याण-विशाखापट्टणम हा राष्ट्रीय महामार्ग२२२ पारनेर, नगर,पाथर्डीया तालुक्यांतून जातो. पुणे-औरंगाबाद हा जिल्ह्यातून जाणारा महत्त्वाचा राज्यमार्गअसूनअहमदनगरला मराठवाड्याचे प्रवेशद्वार म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्रात सर्वप्रथम (१९४८ मध्ये)महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची (एस.टी.)बस धावली ती अहमदनगर-पुणे या मार्गावर. अहमदनगर हे दौंड-मनमाड रेल्वेमार्गावरील स्थानक आहे. १९७कि.मी. चा रेल्वे (ब्रॉडगेज) मार्गजिल्ह्यात असून अहमदनगर-बीड-परळीआणि पुणतांबे-शिर्डी रेल्वे मार्गाचे काम आगामी काळात पूर्ण होण्याची शक्यता आहे. संगमनेरहून रंधा धबधब्याकडे जाताना लागणारा विठा घाट व संगमनेरहून पुण्याकडे जाताना लागणारा चंदनापुरी घाट - हे नगर जिल्ह्यातील महत्त्वाचे घाट आहेत.‪
  • शेती‬
                      ज्वारी हे नगर जिल्ह्यातील प्रमुख पीकअसून ते दोन्ही हंगामांत घेतले जाते. ऊस हेदेखील महत्त्वाचे पीक असून जिल्ह्यातील साखर कारखान्यांची संख्या जास्त आहे.अलीकडच्या काळात, जिल्ह्यात द्राक्ष,मोसंबी, डाळिंब या फळांचे तसेच सूर्यफुलाचेक्षेत्र व उत्पादन वाढते आहे.जिल्ह्यातील शेवंतीची फुलेही महाराष्ट्रात प्रसिद्धआहेत.राज्याबाहेरही शेवंतीला मागणीअसते.जिल्ह्यात श्रीरामपूर येथे मोसंबी संशोधन केंद्र आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा