Post views: counter

भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे आधारस्तंभ (१८२०-१९४७)


                                  आपण आज उपभोगत असलेले स्वातंत्र्य आपल्या पर्यंत पोहचवण्यासाठी अनेक ज्ञात अज्ञात व्यक्तींनी अनेक कष्ट उपसले आहेत. काहींनी वैभवाचा त्याग करून सामान्य जीवन पत्करून देशसेवा केली तर काहींनी तर आपले जीवनच देशाला समर्पित केले. अशा अनेक महान व्यक्तींविषयी आपण आज जाणून घेऊ आणि या स्वतंत्र भारतात आपल्याला मोकळा श्वास घेऊ देण्यासाठी त्यांनी केलेल्या त्यागाची आठवण जगवूया... 
Indian Leaders
  1.  राजाराम मोहन रॉय – एखाद्या देशाला फक्त राजकियच नाही तर सामाजिक, आर्थिक व मानसिक स्वातंत्र्यही आवश्यक असते व त्याच सामाजिक स्वातंत्र्याचे भारतीय उद्गाते होते राजाराम मोहन रॉय. ब्राम्हो समाजाची स्थापना करून पारंपारिक अनिष्ट रूढींना जोरदार विरोध, सतीबंदीची मागनी करणारी चळवळ, शिक्षणाचे महत्व प्रतिपादीत करणे इ. प्रमुख कार्ये करूण त्यानी समाजसुधारकांच्या महान परंपरेचा भारतात श्रीगणेशा केला.
  1. महात्मा फुले – भारतीय स्त्री शिक्षणाचे उद्गाते, दलित व इतर मागासलेल्या जातींच्या शिक्षणाची सुरूवात करणारी पहिली व्यक्ती, विधवा ब्राम्हण स्त्रीया व त्यांच्या अनैतिक संबंधातुन झालेल्या मुलांना समाजाविरूद्ध जाऊन आश्रय देणारे महात्मा, दलितांसाठी आपला पाण्याचा हौद खुला करून समाजाने वाळीत टाकले तरी चालेल पण मानवधर्म सोडणार नाही असे ठाम मत व्यक्त करणारा पहिला महामानव, सत्याची कास धरणारा सत्यशोधक समाजाची स्थापना करणारा पहिला महात्मा.
  2. स्वामी दयानंद सरस्वती – समाजातील अनिष्ट रूढींचा ठाम विरोध, आर्य समाजाची स्थापना, सामान्यातील सामान्य व्यक्तीशीही संवाद साधन्याची हतोटी, वेदांकडे चला ही प्रसिद्ध घोषणा देणारे महापुरूष.
  3. सर सय्यद अहमद खान – पहिले मुस्लिम समाज सुधारक, मुस्लिम समाजात शिक्षणाचा प्रसार करणारे शिक्षणमहर्षी, मुस्लिमांत राजकिय जागृती घडवणारी पहिली व्यक्ती, मोहमेडन अँग्लो ओरिएंटल कॉलेज ज्याला नंतर अलिगड मुस्लिम विद्यापिठ म्हंटले गेले त्याची स्थापना, एकेश्वरवादाचा पुरस्कार करून मुस्लिम धर्मातील अनिष्ट रूढींना विरोध केला.
  4. तात्या टोपे – पेशवा दुसरा नानासाहेव याचे सेनापती, कानपुरच्या उठावाचे यशस्वी नेतृत्व, 1857 च्या उठावाचे प्रमुख सेनानी, झाशीच्या वेढ्यावर हल्ला मात्र पराभूत, ग्वाल्हेरचा किल्ला बंडखोरांसाठी मिळवण्यात प्रमुख भूमिका, 1857 च्या उठावातील ब्रिटीशांच्या हाती लागलेले सर्वात शेवटचे सेनानी.
  5. राणी लक्ष्मीबाई  – झाशी संस्थानच्या शेवटच्या अधिपती, झाशीत झालेल्या ब्रिटीश विरोधी उठावाचे यशस्वी नेतृत्व, मी माझी झाशी देणार नाही हे प्रसिद्ध वाक्य, झाशीच्या पराभवानंतर ग्वाल्हेरच्या किल्ल्यात पेशव्यांच्या सैन्याबरोबर सहकार्य, एका रणरागिनी प्रमाणे समरभूमीवर मृत्यू.
  6. ऍलन ऑक्टेविअन ह्यूम – निवृत्त ब्रिटीश अधिकारी, भारतात सनदशीर मार्गाने राजकिय व सामाजिक अधिकार इंग्रज सरकारकडून मिळवण्यासाठी एका संस्थेची स्‍थापना करण्याचे भारतीयांना आवाहन, त्यातुन राष्ट्रीय सभा वा कॉंगेस या संस्थेची मुंबई येथे स्थापना.
  7. सुरेंद्रनाथ बॅनर्जी – भारतीय राष्ट्रीय कॉंगेसचे एक संस्थापक. बंगाली समाजसुधारक व पत्रकार, 1895 सालच्या पुणे कॉंग्रेसचे अध्यक्ष.
  8. महादेव गोविंद रानडे – थोर समाजसुधारक, विधवा विवाहाचे पुरस्कर्ते, अर्थशास्त्रज्ञ व इतिहासकार, न्यायमुर्ती या पदावर मुंबई उच्च न्यायालयात काम, राष्ट्रीय सभेचे एक संस्थापक.
  9. दादाभाई नौरोजी – भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे भीष्म पितामह असा सार्थ गौरव, ब्रिटीश संसदेचे पहिले भारतीय सांसद, राष्ट्रीय सभेचे एक संस्थापक, 1906 च्या कलकत्ता राष्ट्रीय सभेचे अध्यक्ष, स्वराज्याच्या ध्येयाचे पहिले उद्गाते.
  10. फिरोज शाह मेहता – मुंबईचे सिंह असा सार्थ गौरव, राष्ट्रीय सभेचे सुरूवातीपासूनचे नेते, सनदशीर मार्गाचे पुरस्कर्ते, गोपाल कृष्ण गोखल्यांचे मार्गदर्शक, टिळकांचे राजकिय विरोधक, मुंबईची प्रमाणवेळ बदलण्याच्या सरकारच्या प्रयत्नांना ठाम विरोध करणारे प्रमुख नेते.
  11. गोपाळ कृष्ण गोखले – भारत सेवक समाज या समाजसेवी संस्थेचे संस्थापक, भारतीय राष्ट्रीय सभेचे अध्यक्ष, महान मुत्सद्दी, एक उत्तम संसदपटू, महात्मा गांधींचे राजकिय गुरू.
  12. वासुदेव बळवंत फडके  व ऊमाजी नाईक – सशस्त्र क्रांतीचे पुरस्कर्ते व इंग्रजांविरूद्ध रामोशांच्या बंडाचे नेतृत्व.
  13. पं. मदन मोहन मालविय – सनदशीर मार्गाचे शेवटचे पुरस्कर्ते, गोखल्यांचे सहकारी व टिळकांचे विरोधक. काशीच्या हिंदु विद्यापिठाचे संस्थापक.
  14. धोंडो केशव कर्वे – अनाथ बालिकाश्रमाची स्‍थापना, विधवा विवाहाचे खंदे समर्थक, स्वतः एका विधवेशी विवाह करून आदर्श प्रस्थापित केला, महिला महाविद्यालयाची मुंवईत स्थापना.
  15. विठ्ठल रामजी शिंदे – डिप्रेस्ड क्लासेस मिशन या संस्थेची स्‍थापना, दलित व्यक्तींच्या उद्धाराची खरी तळमळ असणारी व्यक्ती असा बाबासाहेब आंबेडकरांकडून गौरव.
  16. गोपाळ गणेश आगरकर – सामाजिक स्वातंत्र्य हे राजकिय स्वातंत्र्याहुन महत्वाचे आहे असे प्रतिपादन, टिळकांशी या मुद्द्यावरून मतभेद व स्वतःचे सुधारक हे वर्तमानपत्र सुरू केले, सामाजिक अनिष्ट रूढींवर त्यांनी केलेल्या प्रहारांमुळे आजही पुरोगामी महाराष्ट्राचे आदर्श.
  17. लोकमान्य टिळक – भारतीय स्वातंत्र्यलढ्याला खर्‍या अर्थाने जनतेचा लढा बनवणारे महान नेतृत्व, इंग्रजांकडून भारतीय असंतोषाचे जनक असा खरा सन्मानच टिळकांना मिळाला असे लोक मानतात. मंडाले येथे कठोर अशी 6 वर्षांची काळ्यापाण्याची शिक्षा भोगली पण माफी मागितली नाही. स्वदेशी, स्वशिक्षण, बहिष्कार, स्वराज्य ही चतुसुत्री प्रतिपादीत केली, भारतीय स्वराज्य संघ अर्थात इंडियन होमरूल लीगची स्थापना, हिंदू-मुस्लिम एकतेसाठी अव्यवहार्य असा लखनौ करार मुस्लिम लीग बरोबर केला. महात्मा गांधींच्या अनेक चळवळींवर टिळकांचा अमिट असा ठसा दिसुन येतो.
  18. लाला लाजपत राय – पंजाब केसरी असा सार्थ गौरव्‍, लोकमान्य टिळकांचे उत्तर भारतातील विश्वासु सहकारी, स्वराज्याचे खंदे पुरस्कर्ते, भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे अध्यक्ष. अमेरिकेत भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा प्रचार. सायमन कमिशनचा निशस्त्र विरोध करत असताना लाठी हल्ल्यात मृत्यू.
  19. बिपीन चंद्र पाल – बंगालचे प्रसिद्ध नेते, स्वदेशी चळवळ यशस्वी करण्यात प्रमुख सहभाग, लोकमान्यांचे बंगाल व पूर्व भारतातील खंदे सहकारी, अरविंद घोष व चित्तरंजन दास यांचे राजकिय गुरू.
  20. भिकाजी कामा – लंडनमधे भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा प्रसार. स्टुटगार्ड येथील जागतिक सभेत पहिल्यांदाच भारतीय ध्वज फडकावला. क्रांतीकारकांविषयी सहानुभूती मात्र हिंसात्मक कार्यात सहभाग नाही.
  21.  सुभाषचंद्र बोस – नेताजी या सार्थ पदवीने जनतेकडून सन्मान. चित्तरंजन दास यांचे राजकिय शिष्य. कडव्या ब्रिटीश विरोधी मतांमुळे इंग्रजांच्या रोषाचे कायम बळी. मंडालेमधे काळ्यापाण्याची शिक्षा भोगणारे लोकमान्यांनतरचे दुसरे महत्वाचे राजकिय नेते. भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे सलग दोन वर्षे अध्यक्ष. गांधीजींशी झालेल्या मतभेदांनतर कॉंग्रेसचा राजीनामा व फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाची स्थापना. नजरकैदेतुन पलायन करून अफगानिस्थान मार्गे जर्मनीत पोहचले. तेथे हिटलरच्या मदतीने सैन्याची उभारणी करण्याचा प्रयत्न. नंतर रासबिहारी बोसांच्या विनंतीवरून जपानमधे जाऊन जपानच्या कैदेतील भारतीय सैनिकांच्या भारतीय राष्ट्रीय सैन्याचे प्रमुखपण स्विकारले. भारतातील अंदमान-निकोबार, कोहिमा या भागांना स्वतंत्र करून त्यांनी इंग्रजांना हादरवले. मात्र जपानच्या पराभवानंतर रशियात जाताना त्यांचे विमान कोसळून त्यांचा मृत्यू झाला.
  22. श्यामजी कृष्ण वर्मा – इंग्लंडमधील भारतीय समाजसुधारक, लंडनमधे भारतीय विद्यार्थ्यांना रहाण्यासाठी इंडिया हाऊस या वस्तीगृहाची स्थापना. छ. शिवाजी महाराजांसारख्या थोर भारतीय व्यक्तींच्या नावे भारतीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची सुरूवात. क्रांतीकारकांना आश्रय मात्र सशस्त्र क्रांतीत थेट सहभाग नाही.
  23. स्वातंत्र्यवीर सावरकर – बंधु बाबारावांबरोबर मित्रमेळा या संघटनेची नाशिकला स्थापना. पुढे पुण्यात अभिनव भारत या नावाने विस्तार. लंडनमधे वकीलीचे शिक्षण घेता घेता क्रांतीकारकांना मदत, पिस्तुले, बॉंब बनवण्याची पद्धती इ, लंडनहुन भारतात पाठवले. जॅक्सन हत्याकांडात नाव आल्यावर अंदमानला 25 वर्षाच्या प्रत्येकी दोन जन्मठेपेंची शिक्षा. 10 वर्षांनंतर ब्रिटीश सरकारची मा॑फी मागुन सुटका व रत्नागिरी येथे नजरकैद.
  24. मदनलाल धिंग्रा – सशस्त्र क्रांतीकारक चळवळीचा कार्यकर्ता. कर्झन वायली या अधिकार्‍याची हत्या.
  25. रामप्रसाद बिस्मिल – भारतीय सशस्त्र क्रांतीकारक, हिंदुस्थान रीपब्लिकन आर्मी या संघटनेचा संस्थापक, काकोरी रेल्वे लुटीचे सुत्रधार.
  26. चंद्रशेखर आझाद – रामप्रसाद बिस्मिल यांचे शिष्य व सहकारी. काकोरी कट, सॉंडर्स हत्या, संसदेतील बॉंब हल्ला यांचे सुत्रधार. भगतसिंग यांचे गुरू व मार्गदर्शक, अलाहाबाद येथे ब्रिटीशांविरूद्ध लढताना मृत्यू.
  27. अरविंद घोष – सशस्त्र क्रांती व ब्रिटीशांचा बहिष्कार या दुहेरी तत्वाचे पुरस्कर्ते. टिळकांचे खंदे अनुयायी व सुरत कॉंगेस फुटीचे समर्थक साक्षीदार. पॉंडीचेरी येथे राजकिय सन्यास व योग व इश्वरी ध्यानधारणा केंद्राची स्थापना.
  28. मोतीलाल नेहरू – गांधीजींच्या आंदोलनाने प्रभावित होऊन परदेशी रहाणीमानाचा त्याग. स्वराज्य पार्टीची स्थापना करून निवडणूक लढवली. राष्ट्रीय कॉंगेसचे अध्यक्ष.
  29. चित्तरंजन दास – लोकमान्य टिळकांचे पाठीराखे, बंगालचे सर्वात लोकप्रिय नेते, अरविंद घोष व बिपिनचंद्र पाल यांचे अनुयायी, भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे अध्यक्ष. सुभाषचंद्र बोस यांचे राजकिय गुरू.
  30. रासबिहारी बोस – गदर पार्टीचे संस्थापक, अमेरिकेत भारतीय स्वातंत्र्यलढ्यासंदर्भात जनजागृती केली. जापानमधे जाऊन भारतीय राष्ट्रीय सेनेची स्थापना व तिचे नेतृत्व करण्यासाठी सुभाष बाबूंना निमंत्रण दिले.
  31. महात्मा गांधी – भारतीय गणराज्याचे राष्ट्रपिता, बापू या नावाने लोकप्रिय. लोकमान्य टिळकांच्या अस्तानंतर भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा एकहाती कारभार, सत्याग्रह नावाचे अभिनव निशस्त्र प्रतिकाराचे हत्यार यशस्वीपणे वापरले. परदेशी सामानाचा बहिष्कार, असहकार चळवळ. सविनय कायदेभंग, चले जाव या यशस्वी चळवळींचे नेतृत्व. शांतता व सत्य यांना निशस्त्र प्रतिकाराची जोड देऊन भारतीय स्वातंत्र्य मिळवले.
  32. विठ्ठलभाई पटेल – लोकमान्य टिळकांचे गुजरातमधील सहकारी, वल्लभभाई पटेल यांचे मोठे भाऊ.
  33. महंमद अली जिन्नाह – सुरूवातीच्या काळात दादाभाई नौरोजी यांचे समर्थक व सचिव, लोकमान्यांच्या होमरूल लीगचे सचिव, हिंदु-मुस्लिम एकतेचे पुरस्कर्ते व लखनौ कराराचे एक प्रमुख निर्माते. काही मतभेदांमुळे त्यांनी नंतर मुस्लिम अतिरेकी विचारसरणी अवलंबली व ते पाकिस्तान या मुस्लिम राष्ट्राचे जनक बनले.
  34. ऍनी बेझंट – आयरीश समाजसुधारक महिला, थिऑसॉफिकल सोसायटी ऑफ इंडिया या संघटनेच्या अध्यक्ष, भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष, होमरूल लीगची मद्रासमधे स्थापना.
  35. वल्लभभाई पटेल – सरदार या सार्थ पदवीने सर्वांना परिचित. बार्डोलीचा सत्याग्रह गांधीजींच्या अनुपस्थीत यशस्वी केल्याने प्रसिद्ध पावले. त्यानंतर गांधीजींच्या प्रत्येक आंदोलनात सहभाग व जेल. भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे अध्यक्ष. चले जावच्या चळवळीदरम्यान अहमदनगरच्या किल्ल्यात कैदेत. स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधान व गृहमंत्री, काश्मिर सहीत संपुर्ण भारताच्या एकीकरणात महत्वाचे योगदान व पोलादी पुरूष ही पदवी लोकांकडून प्रदान.
  36. मौलाना आझाद – मुस्लिम समाजसुधारक व राजकिय नेते. महात्मा गांधींचे एकनिष्ठ अनुयायी. भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे अध्यक्ष व स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षणमंत्री.
  37. जवाहरलाल नेहरू – महात्मा गांधींचे राजकिय मानसपुत्र, गांधीजींच्या प्रत्येक आंदोलनात सक्रीय सहभाग व जेल. वैयक्तीक सत्याग्रहासाठी गांधीजींनी निवडलेले दुसरे सत्याग्रही. चले जाव आंदोलनादरम्यान अहमदनगरच्या किल्ल्यात कैद व भारताचा शोध या पुस्तकाचे लेखन. स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान.
  38. राजर्षी शाहू छत्रपती – कोल्हापूर संस्थानचे अधिपती. पददलित व बहूजन समाजात शिक्षणास प्राधान्य. महार वतने रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय, क्रांतीकारक व राजकिय नेत्यांना गुप्त मदत. प्राथमिक शिक्षण सक्तीचे केले. राधानगरी धरण व अभयारण्य निर्माण करून पर्यावरण संरक्षण व विकास यांचा ताळमेळ साधला.
  39. राजर्षी सयाजीराव गायकवाड – बडोदा संस्थानचे अधिपती, ग्रामिण भागात शिक्षण, रेल्वे आदी सुविधा निर्माण करून विकास करण्यावर प्राधान्य. अनेक राजकिय मंडळींना गुप्त मदत. बाबासाहेब आंबेडकरांसारख्या होतकरू दलित विद्यार्थ्यांना परदेशात शिकण्यासाठी शिष्यवृत्ती व नंतर संस्थानात नोकरी देऊन उदरनिर्वाहाचे साधन प्रदान केले.
  40. भवानराव पंतप्रतिनिधी – औंध संस्थानचे अधिपती. शिक्षण प्रसार व सामाजिक सलोखा कायम राखण्यासाठी प्रयत्न. गांधीजींच्या मार्गाचा पुरस्कार केला व स्वतःच्या संस्थानात लोकनियुक्त प्रशासकिय मंडळ स्थापन केले. त्याबद्दल गांधीजींची शाबासकी मिळाली.
  41. भगतसिंग – पंजाबमधील सशस्त्र क्रांतीकारक. हिंदुस्थान रीपब्लिकन आर्मीचे हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन आर्मी असे नामकरण करून सामाजिक एकता व समभावाचे समर्थन केले. सॉंडर्स या जुलमी इंग्रज अधिकार्‍याची हत्या केली. संसदेत पारित होणार्‍या अन्यायी कायद्याचा विरोध करण्यासाठी संसदेत आवाज व धुर करणारा बॉंब टाकला.
  42. राजगुरू – महाराष्ट्रातील पुण्याजवळील चाकण येथील रहीवासी. भगतसिंग यांच्यासोबत सॉंडर्स याच्या हत्येत सहभाग. लाहोर कट या नावाने प्रसिद्ध असणार्‍या खटल्यात फाशीची शिक्षा.
  43. सरोजिनी नायडू -  भारताच्या नाइंटिंगेल असा सार्थ बहुमान, कवीमनाच्या राजकिय कार्यकर्त्या. भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्षा. गांधीजींच्या अनुयायी व परदेशी वस्तूच्या बहिष्कार आंदोलनात सहभाग.
  44. विनोबा भावे – महात्मा गांधींचे अध्यात्मिक वारस. गांधीजींच्या वर्धा येथील आश्रमाची जबाबदारी. वैयक्तीक सत्याग्रह चळवळीसाठी गांधीजींनी निवडलेले पहिले सत्याग्रही.
  45. अरूणा असफ अली – चले जाव चळवळीदरम्यान राजकिय क्षितीजावर उदय, भूमीगत स्वातंत्र्य चळवळीच्या प्रमुख नेत्या. गांधीजींच्या अनुयायी.
  46. क्रांतीसिंह नाना पाटिल – सातारा येथील स्वातंत्र्यसैनिक. चले जाव आंदोलना दरम्यान सातारा येथे जनतेच्या प्रतिसरकार चळवळीचे प्रमुख.
  47. खान अब्दुल गफार खान – सरहद गांधी या सार्थ नावाने परिचित. खुदा ई खिदमतगार या सत्याग्रही संघटनेचे संस्थापक, अनेक सत्याग्रहात सहभाग व जेल.
  48. चक्रवर्ती राजगोपालाचारी – दक्षिण भारतातील एका संस्थानचे अधिपती. गांधीजींचे अनुयायी. अनेक सत्याग्रहांत तसेच चले जाव चळवळीत सक्रीय सहभाग. पाकिस्तानची निर्मिती अटळ झाल्यावर द्विराष्ट्र प्रस्तावास प्रथम मान्यता देणारे कॉंग्रेस नेते. जिन्नाना पंतप्रधानपद देऊन शेवटचा एकतेचा प्रयत्न केल्याने नेहरूंशी मतभेद.
  49. श्रीपाद अमृत डांगे – भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक. क्रांतीकारी व सनदशीर मार्ग या दुहेरी मार्गाचे पुरस्कर्ते. सोशियालिस्ट या मार्क्सवादी विचारांचा प्रसार करणार्‍या साप्ताहिकाचे संस्थापक. मीरत कटाचे सुत्रधार व आरोपी. या आरोपात त्यांना 12 वर्षाची सजा झाली. टिळकांच्या सांगण्यावरून रशियाचा दौरा केला.
  50. डॉ. बाबासाहेब आंबेडकर - फक्त राजकीयच नाही तर मानसिक स्वातंत्र्य हि जरुरी असते हे पटवून देणारे महामानव. भारतीय मानसिकतेत विशेषता दलित समाजाच्या भावनिक, वैचारिक व सामाजिक बदल घडवणारे समाजसुधारक, महाडच्या चवदार तळ्याचा सत्याग्रह, नाशिकचा काळाराम मंदिर सत्याग्रह या आंदोलनांद्वारे मागासलेल्या दलित समाजात राजकीय व भावनिक अधिकारांची जाणीव निर्माण केली, दुसर्या गोलमेज परिषदेनंतर अहंकार व मोठेपणा बाजूला ठेऊन राष्ट्रीय हितासाठी गांधीजींबरोबर पुणे करार केला, ते एक असामान्य अर्थतज्ञ असून त्यांचा प्रॉब्लेम ऑफ रुपी हा ग्रंथ आजही महत्वाचा आहे, पाकिस्तान निर्मितीनंतर उद्भवू शकणार्या राजकीय त्रांगड्यावर भाष्य केले. त्यांनी राजकीय स्वातंत्र्यापेक्षा लोकांचे सामाजिक स्वातंत्र्य महत्वाचे मानले, व्हाईसरॉयच्या मंत्रिमंडळात मजूरमंत्री, व भारतीय राज्यघटनेच्या आराखडा समितेचे अध्यक्ष व शिल्पकार, स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा