Post views: counter

न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे

न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे

न्यायमूर्ती रानडे


महादेव गोविंद रानडे :
 • जन्म - 18 जानेवारी 1842, निफाड (नाशिक).
 • मृत्यू - 16 जानेवारी 1901 .
रानडे यांना हिन्दी अर्थशास्त्राचे जनक म्हणून संबोधले जात .तसेच त्यांना पदवीधरांचे मुकुटमणी असेही म्हटले जात असे .रानडे हे अक्कलकोटी राज्याचे कारभारी होते. 1886 - भारत सरकार अर्थसमितीचे सदस्य वित्तीय
समितीवर नियुक्त होणारे पहिले भारतीय. रानडे हे गोपाल कृष्ण गोखले यांचे गुरु होते . त्यांना महाराष्ट्राच्या प्रबोधनाचे जनक म्हटले जात . समाजसुधारकांसाठी सर्वांगीण प्रतिमान मांडणारे प्रज्ञावंत. रानडे हे आर्थिक राष्ट्रवादी होते .त्यांना मराठी पत्रकारीतेचे जनक असेही म्हटले जात असे.


संस्थात्मिक योगदान :

 1. 1865 - विधवा विवाहोत्तेजक मंडळी (विष्णु पंडित) सहाय्य.
 2. 1867 - मुंबई येथे प्रार्थना समाज स्थापनेत सहभाग.
 3. 1870 - सार्वजनिक सभा स्थापनेत सहभाग.
  उद्दीष्ट - थंड गोला घेवून पडलेल्या समाजात विचार,
  संघटना व कृतीची सांगड घालण्यासाठी व्यासपीठ
  उभे केले.
 4. वकृत्वोत्तेजक सभा - पुणे.
 5. नगर वचन मंदिर - पुणे.
 6. 1875 वसंत व्याख्यान - माला (पुणे).
 7. 1882 - हुजूरपागा शाळा (पुणे).
 8. 31 ऑक्टोबर 1896 डेक्कन सभा.
 9. 1896 - हिंदू विडोज होम. 
 10. इन्फेक्शन डेसिजेस हॉस्पिटल स्थापन केले .
 11. मराठी ग्रंथोत्तेजक मंडळी, नाशिक.
 12. पुना मार्कटाईल बँक, रशीम गिरणी, लवाद कोर्ट, पुणे
 13. रंगशाला यांच्या स्थापनेत सहभाग.
 14. 1889 - Industrial As Sociation Of Western India स्थापन.
रानडे यांनी केलेले लेखन :
 1. इंदु प्रकाश (मासिक).
 2. एकेश्र्वरनिष्ठांची कैफियत.
 3. 1874 - जबाबदार राज्यपद्धतीची मागणी करणारा
  अर्ज.
 4. 1888 - ऐजेस ऑन इंडियन इकॉनॉमिक्स .
 5. मराठी सत्तेचा उदय.
 6. मराठी पत्रकारितेचा पाया घातला.
 7. निबंध - प्रजावृद्धीचे दुष्परिणाम, 
 8. मराठा सत्याग्रहातील नाणी व चलन.
 9. ' तरुण शिकलेल्या लोकांची कर्तव्य ' हा निबंध ज्ञानप्रसारक नियतकालिकात गाजला.
वैशिष्ट्ये :
 1. ग. व. जोशी यांच्या सामाजिक व आर्थिक विचारांचा प्रभाव.
 2. भारतात प्रागतिक सनदशीर राजकारणाचा पाया घातला.
 3. 1873 - 11 वर्ष वयाच्या मुलीसोबत पुनर्विवाह.
 4. पंचहौद मिशन प्रकरणी प्रायश्र्चित घेतले.
 5. संमतीवय विधेयकास पाठिंबा.
 6. इंडियन नॅशनल कॉग्रेसला पाठिंबा.
 7. दारिद्र्यनिर्मूलनासाठी औद्योगीकरणाचा उपाय सुचवले.
 8. ' महाष्ट्राला पेशवाईनंतर आलेली प्रेतकळा उडवून सचेतन करण्याची काळजी आमरण वाहिनी.' टिळकांचे मत.

थोडक्यात जीवनपट:
 1. महादेव गोविंद रानडे यांचा जन्म १८ जानेवारी १८४२ मध्ये नाशिक तालुक्यातील निफाड येथे झाला.
 2. त्यांचे शालेय जीवन सुरुवातीला कोल्हापूर आणि नंतर मुंबई येथे झाले.
 3. रानडे यांनी १८६४ मध्ये मुंबईच्या “एल्फीन्स्टन” कॉलेज मधून एम.ए. पूर्ण केले.
 4. रानडे यांच्या वडिलाचे नाव गोविंदराव तर आईचे नाव गोपिकाबाई होते.
 5. १८६५ मध्ये त्यांनी कायद्याची पदवी संपादन केली
 6. १८६५ नंतरच्या काळात त्यांनी अक्कलकोट राज्याचे कारभारी म्हणून काम पहिले
 7. १८६८ मध्ये त्यांची एल्फीन्स्टन कॉलेज मध्ये इंग्रजी व इतिहास या विषयाचे प्राध्यापक म्हणून नियुक्ती झाली.
 8. नोव्हेंबर १८७१ मध्ये त्यांची पुणे येथील न्यायपालिकेत सबऑडमिनेट न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली.
 9. जानेवारी १८७८ मध्ये न्या. रानडे यांची नाशिक येथे ‘सदर अमीन’ म्हणून नेमणूक करण्यात आली.
 10. मे १८७९ मध्ये पुण्यातील विश्रामबाग वाडा व बुधवार वादा येथे आगी लावण्यात आल्या. न्या. रानडे यांचा या कटाशी संबध असावा अशी सरकारला शंका आली व परिणामतः सरकारने न्या. रानडे यांची बदली धुळे येथे केली.
 11. इस. १८८० मध्ये न्या. रानडे यांची पुन्हा पुणे ला बदली करण्यात आली.
 12. इस. १८९३ मध्ये त्यांची मुंबई हायकोर्टात ‘हायकोर्ट जज’ म्हणून नियुक्ती करण्यात आली. १९०१ पर्यंत त्यांनी हायकोर्ट जज म्हणून काम पहिले.
 13. १५ जून १८६९ मध्ये वेणूबाई परांजपे यांचा पांडुरंग करमरकरासोबत विधवा विवाह घडवून आणण्यात पंडित लोकहितवादी यांना न्यायमूर्ती रानडे यांनी मदत केली.
 14. गणेश वासुदेव जोशींच्या समाज विषयक व अर्थविषयक विचारांचा रानडेवर प्रभाव होता.
 15. डिसेंबर १८७३ मध्ये रानडे यांची पहिली पत्नी वारल्यानंतर पुण्यातील सेवासदन या संस्थेच्या संस्थापिका रमाबाई रानडे (यमुना चिपळूणकर) यांच्याशी पुनर्विवाह केला. रानडे यांचा पहिला विवाह वाई येथील सखुबाई दांडेकर यांच्याशी झाला होता.
 16. रानडे हे मुंबई विद्यापीठाचे पहिले पदवीधर होते. त्यामुळे ‘पदवीधरांचे मुकुटमणी’ हा किताब रानडे यांना दिला.
 17. न्यायमूर्ती रानडे यांनी १८५८ च्या राणी जाहीरनाम्याला ‘हिंदी प्रजेचा mमॅग्राचार्टा’ असे म्हटले होते.
 18. १८७९ च्या आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांना पाठिबा दिल्याचा आणि पुण्यात लागलेल्या आगीच्या संशयावरून न्यायमूर्ती रानडे यांची धुळे ला बदली करण्यात आली.
 19. इस. १८६५ मध्ये विष्णुशास्त्री पंडित व इतर सहका-याच्या सहायाने “विधवा विवाहोत्तेजक” मंडळाची स्थापना मुंबई येथे करण्यात आली.
 20. इस. १८६७ मध्ये मुंबईत स्थापन झालेल्या प्रार्थना समाजाचे न्या. रानडे हे मुख्य आधारस्तंभ होते.
 21. प्रार्थना समाजाची तत्वे, उपासना पद्धती आणि विधी यांच्यासाठी त्यांनी “एकेश्वरनिष्ठांची कैफियत” या नावाचा ग्रंथ लिहिला. (महात्मा फुले यांनी “अस्पृश्यांची कैफियत” हा ग्रंथ लिहिला होता)
 22. न्या. रानडे यांनी १८८२ मध्ये पुण्यात मुलीसाठी “हुजूरपागा” नावाची शाळा काढली.
 23. न्या. रानडे यांना अर्थशास्त्राचे जनक मानतात कारण Essay’s On Indian Economics (१८९९) या ग्रंथातून भारतीय अर्थव्यवस्थेस लागू पडणारे अर्थशास्त्र कसे असावे आणि इंग्लंडमधील सनातनवादी अर्थशास्त्र या समाजास कसे निरुपयोगी आहे यांचे प्रतिपादन तत्यांनी केले.
 24. १८८५ मध्ये मुंबई कायदेमंडळाचे सदस्य म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली.
 25. न्या. रानडे यांनी नाशिक येथे “मराठी ग्रंथोत्तेजक मंडळाची” स्थापना केली.
 26. इस. १८८६ मध्ये त्यांची भारत सरकारच्या अर्थसमितीचे सदस्य म्हणून निवड करण्यात आली होती. वित्तीय समितीवर नियुक्त होणारे ते पहिले भारतीय होते.
 27. वाढती लोकसंख्या हे भारताच्या दारिद्र्याचे कारण आहे, असे मत न्या. रानडे यांनी सर्वप्रथम मांडले.
 28. गँट डफ या इतिहासकाराने मराठ्यांचा इतिहास लिहिताना केलेल्या चुका निदर्शनास आणण्यासाठी “मराठी सत्तेचा उदय/निष्कर्ष” (Rise Of Maratha Power) हा ग्रंथ लिहिला. गँट डफने सर्वप्रथम मराठ्याचा इतिहास क्रमवार लिहून काढला होता. रानडे यांचा ग्रंथ १९०० मध्ये लिहिण्यात आला होता.
 29. भारतात प्रागतिक सनदशीर राजकारणाचा पाया न्या. रानडे यांनी घातला.
 30. नॅशनल कॉंग्रेसच्या स्थापनेपूर्वी न्या. रानडे यांच्या विचारांनी अॅलन ह्यूम प्रभावित झाले होते.
 31. न्या. रानडे यांनी इंडियन नॅशनल कॉंग्रेसला ‘नॅशनल कॉंग्रेस’ असे नाव सुचविले.
 32. कॉंग्रेसच्या अधिवेशनांना हजर राहण्यास बंदी घातल्यामुळे न्या. रानडे हे त्यातील होणा-या सामाजिक परिषदेच्या अधिवेशनास आवर्जून हज