Post views: counter

Current Affairs April 2015 Part - 3

चालू‬ घडामोडी एप्रिल २०१५ 
Current Affairs April 2015

  • नेपाळमध्ये पंचायत राज व्यवस्था सुरू झाल्यानंतरचे पहिले पंतप्रधान व १९६३ ते २००४ या दरम्यान पाचवेळा पंतप्रधान झालेल्या कोणत्या माजी पंतप्रधानांचे नुकतेच निधन झाले आहे?
== सूर्य बहादूर थापा
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा "ड्रीम प्रोजेक्‍ट‘ असणाऱ्या स्मार्ट शहरांच्या उभारणीला आता हिरवा कंदील मिळाला असून, देशातील पहिली स्मार्ट सिटी कोठे तयार करण्यात येणार आहे?
== साबरमती नदीच्या तीरावर-गुजरात
  1. -देशातील स्मार्ट शहरांच्या उभारणीसाठी सरकारने 60 अब्ज रुपयांची अर्थसंकल्पी तरतूद केली आहे.
  2. -या स्मार्टसिटीला "गुजरात इंटरनॅशनल फायनान्स टेक-सिटी‘ (गिफ्ट) असे नाव देण्यात आले असून, हे शहर मोठे आर्थिक केंद्रही असेल.
  3. -"आय. एल. अँड एफ. एस.‘ इंजिनिअरिंग अँड कन्स्ट्रक्‍शनच्या सहकार्याने या शहराची उभारणी केली जात आहे.
  • नेट न्युट्रॅलिटीची संकल्पना:-सर्व वेबसाईट्स सारख्याच वापरता आल्या पाहिजेत. सर्व वेबसाईट्सचा डाऊनलो़डिंग स्पीड सारखाच असला पाहिजे. तसेच शुल्कही सारखेच असले पाहिजे, अशी नेट न्युट्रॅलिटीची संकल्पना आहे. थोडक्यात सांगयाचे तर इंटरनेट सेवा पुरविणा-या सर्व कंपन्यांच्या सेवेचा दर्जा सारखा असावा. तसेच सेवेची किंमतही सारखी असावी.
  • नेट न्युट्रॅलिटीला सेवा प्रदाता कंपन्यांकडून विरोध का?
  1. -पूर्वी टेलिकॉम कंपन्यांना मेसेजिंग आणि कॉलिंग या दोन्हीच्या माध्यमातून नफा मिळत होता. मात्र, आता मोबाईलवर इंटरनेट उपलब्ध झाल्यामुळे मेसेजिंग, कॉलिंग यांच्यामार्फत मिळणारा नफा कमी झाला.
  2. -याउलट गुगलसारख्या कंपन्या चांगलाच नफा कमवत आहेत.
  3. -त्यावर उपाय म्हणून टेलिकॉम कंपन्यांनी इंटरनेट वापरावर बंधन आणण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.
  4. -या कंपन्यांना त्यांना वाटतील त्या गोष्टींना त्यांना हवे ते दर लावायची परवानगी हवी आहे.
  • "नेट न्युट्रॅलिटी‘ नियमन कायदा करणारा जगातला पहिला देश कोणता?
== चिली-२०१० मध्ये
  • मालेगाव बॉंबस्फोट प्रकरणातील आरोपींच्या जामीन याचिकांवर सुनावणी करताना कोणत्या कायद्याचा विचार केला जाऊ नये,असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे?
== महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायदा(मोक्का)
  1. - याला अपवाद फक्‍त राकेश धावडे या आरोपीचा असेल
  2. -मालेगावमध्ये २९ सप्टेंबर २००८ रोजी झालेल्या भीषण बॉंबस्फोटामध्ये सात लोक ठार झाले होते.
  3. -यामध्ये साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, कर्नल पुरोहित आणि स्वामी दयानंद पांडे यांच्यावर ठपका ठेवण्यात आला होता.दयानंद पांडे हा या स्फोटाचा मुख्य सूत्रधार होता,
  4. - न्या. एफ.एम.आय. कलिफुल्ला आणि न्या. शिवकीर्ती सिंग
  •  नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याशी संबंधित कागदपत्रे सार्वजनिक करावीत की नाही, यावर निर्णय घेण्यासाठी केंद्र सरकारने कोणाच्या अध्यक्षतेखाली एका उच्चाधिकार समितीची स्थापना केली आहे?
== कॅबिनेट सचिव अजित सेठ
  1. -समितीत पंतप्रधान कार्यालय, गृह मंत्रालय, परराष्ट्र मंत्रालय, रॉ आणि गुप्तचर विभागातील (आयबी) अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
  2. -बोस यांच्याशी संबंधित सुमारे 90 फायलींपैकी 27 फायली परराष्ट्र मंत्रालयाशी, तर उर्वरित पंतप्रधान कार्यालयाशी निगडित आहेत. गृह मंत्रालयाशी निगडित कोणतीही फाईल नाही.
  • पिपल्स डेमोक्रेटिक पक्ष आणि भारतीय जनता पक्षाचे संयुक्त सरकार जम्मू-काश्मिरमध्ये स्थापन झाल्यानंतर फुटीरतावादी नेता मसरत आलमला कोणत्या तुरुंगातून मुक्त करण्यात आले होते?
== बारामुल्ला
  • अमेरिकेमधील जॉर्जिया राज्यामधील एका हिंदु मंदिराच्या पुजाऱ्यास आर्थिक गैरव्यवहार व फसवणूक केल्याप्रकरणी २७ वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनाविण्यात आली आहे. या पुजाऱ्याचे नाव काय आहे?
== अन्नामलाई अन्नामलाई उर्फ स्वामीजी श्री सेल्वम सिद्धार
  • भारतात मोबाईल क्षेत्रात आघाडीवर असलेली नोकिया कंपनी लवकरच कोणती फ्रेंच दूरसंचार कंपनीची खरेदी करणार आहे?
== अल्काटेल-ल्यूसेंट
  • अमेरिकेमध्ये येमेनमध्ये केलेल्या हवाई हल्ल्यामध्ये अल कायदा या जागतिक दहशतवादी संघटनेचा कोणता एक वरिष्ट नेता ठार झाल्याचे वृत्त सूत्रांनी दिले आहे?
== इब्राहिम अल-रुबैश
  • राज्य सरकार संचलित कलकत्ता राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने बसचा प्रवास सुरक्षित होण्यासाठी किती बसेसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत?
== ६३२
-जवाहलाल नेहरू राष्ट्रीय शहर पुनर्विकास मोहिमेच्या विस्तारित प्रकल्पाअंतर्गत
  • आदिवासी विकास योजना:-
  1. - तीन हजार ग्रामपंचायतींना मिळणार प्रत्येकी दहा लाखांचा निधी
  2. - गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, अमरावती, यवतमाळ, धुळे, नंदूरबार, नाशिक, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांतील काही भागांतील ग्रामपंचायतींचा लाभार्थींमध्ये समावेश
  3. - विकासासाठी निधी खर्च करण्याची ग्रामपंचायतीला स्वायत्ता
  4. - एक मे रोजी अभिनव योजनेचे लोकार्पण
  5. - योजनेच्या अंमलबाजवणीसाठी "यशदा‘कडून ग्रामसभांना प्रशिक्षण
  6. -आदिवासी विभागासाठी यंदा पाच हजार १४० कोटी रुपयांची तरतूद केली असून, या योजनेसाठी २५० कोटी रुपये राखीव ठेवण्यात आले आहेत.
  7. -ही योजना राबविणारे महाराष्ट्र हे देशात पहिले राज्य असून, एक कोटी पाच लाख लोकसंख्या असलेल्या आदिवासी समाजाच्या ६० लाख जनतेला याचा फायदा होणार आहे.
  • गीर अभयारण्यातील बेकायदा हॉटेलवर गुजरात उच्च न्यायालयाने कारवाईचा हातोडा उगारला असून, यामुळे जंगल परिसरातील ताज समूहाचे कोणते प्रसिद्ध हॉटेल बंद होणार आहे?
== गेट-वे गीर फॉरेस्ट
  • अमेरिकेच्या "टाइम‘ या नियतकालिकाने ऑनलाइन मतचाचणी घेतल्यानंतर जगभरातील १०० प्रभावी व्यक्तींच्या यादीत स्थान मिळविणारे भारतीय कोण?
== पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल
-"टाइम‘च्या या यादीत रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी पहिले स्थान मिळविले आहे.
  • जागतिक बँकेचा अहवाल:-
  1. -‘रेमिटन्स‘च्या (पैसे पाठविणारे) बाबतीत भारत देश सर्वाधिक आघाडीवर आहे.
  2. -इतर देशात काम करणाऱ्या स्थलांतरित/अनिवासी भारतीयांकडून २०१४ मध्ये भारतात ७०अब्ज डॉलर्सचा निधी पाठविण्यात आला आहे.
  3. -विकसनशील देशांमधील ‘रेमिटन्स‘ची संख्या २०१५ मध्ये ४४० अब्ज डॉलर्सवर पोहोचण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.गेल्या वर्षीच्या मानाने ०.९ टक्क्यांची वाढ अपेक्षित आहे.
  4. -भारताशिवाय चीन, फिलिपिन्स, मेक्सिको आणि नायजेरिया या देशांच्या स्थलांतरित नागरिकांकडून सर्वाधिक पैसा आपल्या देशात परत पाठवला जातो.
  5. -अमेरिका, सौदी अरेबिया, जर्मनी, रशिया आणि संयुक्त अरब अमिराती (युएई) या देशांमध्ये स्थलांतरीतांची संख्या सर्वाधिक आहे.
  • जागतिक बँकेचा सहामाही अहवाल:-
  1. -भारताचा २०१७ पर्यंत राष्ट्रीय उत्पन्नाच्या (जीडीपी) वाढीचा दर ८% होणार असल्याची शक्यता.
  2. -आर्थिक वर्ष २०१५-१६ मध्ये भारतातील राष्ट्रीय उत्पन्नाच्या वाढीचा दर ७.५% राहण्याची शक्यता आहे.
  3. -परंतू २०१६ ते २०१८ काळात देशातील गुंतवणूकीत १२% वाढ होईल.
  4. -त्यामुळे २०१७-१८ पर्यंत भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नाचा दर ८ टक्क्यांवर पोहोचण्याची शक्यता आहे
  • शेतकरी शून्य आत्महत्या अभियान:-
  1. - आत्महत्याप्रवण गावातील प्रत्येक घरापर्यंत पोचणे
  2. - कर्ज, आजार, मालकीची जमीन, सिंचन, लग्नयोग्य मुलांची माहिती घेणे
  3. - शेतीच्या जोडव्यवसायासाठी प्रोत्साहन देणे
  4. - प्रत्येक कुटुंबाचे समुपदेशन
  5. - आर्थिक मदत देणाऱ्या पर्यायी योजना तयार करणे
  6. - कर्जफेडीसाठी उत्पन्नाचे स्रोत उपलब्ध करून देणे
  7. -"कन्व्हर्जन्स ऑफ ऍग्रिकल्चर इंटरव्हेन्शन इन ऍग्रिकल्चर‘ असे या अभियानाचे नाव
  8. -आत्महत्याग्रस्त प्रत्येक गावासाठी ५०लाख रुपयांची, तर गावांचे गट तयार करून त्यासाठी १० कोटींची मदत निश्‍चित करण्यात येणार आहे.
  9. -एक हजार कोटी खर्च करून तयार होणाऱ्या या योजनेत डिस्ट्रेसची पातळी तीव्र वाटल्यास अधिक आर्थिक सोय करण्यात येणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा