Post views: counter

Current Affairs April 2015 Part - 4

चालू घडामोडी एप्रिल २०१५ 
Current Affairs

 जागतिक बँकेच्या आकडेवारीनुसार:-
  1. -२०११ ते २०१४ या कालावधीत देशामध्ये बँक खात्यांची वाढ ३५ टक्क्यांवरून ५३ टक्क्यांवर झेपावली.
  2. -देशातील व्यवहारशून्य खात्यांच्या संख्येत होणा-या वाढीचा वेगही प्रचंड असून हा दर ४३ टक्के एवढा आहे.
  3. -२०११ ते २०१४ या कालावधीत १७.५ कोटी नवी खाती सुरू झाली.
  4. -जनधन योजनेंतर्गत सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये ९७ टक्क्यांपेक्षा जास्त खाती सुरू करण्यात आली. यातील ७२ टक्के खाती ही ‘झीरो बॅलन्स’ दाखवत आहेत.
सेबीची आकडेवारी:-
  1. -देशातील ४४ फंड हाऊसेसमधील गुंतवणूकदारांच्या खात्यांची आकडेवारी सेबीने जाहीर केली आहे.
  2. -यात गेल्या आर्थिक वर्षामध्ये इक्विटी खात्यांची ३.१७ कोटींवर गेली आहे. आधीच्या वर्षाअखेरीस ही संख्या २.९२ कोटी एवढी होती.
  3. -२०१४-१५ या आर्थिक वर्षामध्ये गुंतवणूकदारांच्या २५ लाख खात्यांची भर पडली.
  • केपीएमजी या संस्थेने जागतिक बांधकाम अहवाल नुकताच जाहीर केला आहे.त्यानुसार २०१४-१५ या आर्थिक वर्षामध्ये देशभरातील जवळपास किती  टक्के बांधकाम कंपन्यांवर एका किंवा त्यापेक्षा जास्त सुमार प्रकल्पांचा भार असल्याचे केपीएमजीने आपल्या अहवालात म्हटले आहे?
== ८०%

  • एअरटेलने नुकताच कोणता मोफत इंटरनेट प्लॅन लॉन्च केला आहे. जावरुनच वाद निर्माण झाला आहे?
== एअरटेल झीरो
  • नेट न्यूट्रलिटीवरुन वाद सुरु असतानाच कोणत्या ऑनलाईन रिटेल वेबसाईट आणि एअरटेलमधील करार अखेर रद्द करण्यात आला आहे?
== फ्लिपकार्ट
  •  ‘द टिन ड्रम’, ‘कॅट अ‍ॅँड माऊस’, ‘डॉग इयर्स’ इत्यादी कादंबर्यांचे लेखक कोण होते?
==  नोबेल पारितोषिक विजेते व विख्यात जर्मन लेखक गुंथर ग्रास
  • राष्ट्रकुल सुवर्णपदक जिंकणारी भारताची वेटलिफ्टर गीता राणी 'ब' चाचणीतही दोषी आढळली आहे. त्यामुळे तिच्यावर कमीत कमी किती  वर्षांची बंदी घालण्यात येण्याची शक्यता आहे?
== आठ वर्षे
  1. -गीता राणीने २००६च्या राष्ट्रकुलमध्ये सुवर्णपदक आणि २००४च्या एशियन चॅम्पियनशिपमध्ये तीन रौप्यपदकांची कमाई केली होती.
  2. -यावर्षी केरळ राष्ट्रीय स्पर्धेदरम्यान डोपिंगची तपासणी करण्यासाठी तिची 'अ' चाचणी घेण्यात आली. यात तिने बंदी घातलेल्या पदार्थाचे सेवन करण्यात आल्याचे स्पष्ट झाले.
  3. - 'नॅशनल अँटी डोपिंग एजन्सी'च्या (नाडा)च्या नवीन नियमानुसार डोपिंगमध्ये ती पहिल्यांदाच दोषी आढळली असेल, तर तिच्यावर जास्तीत जास्त चार वर्षांची बंदी घालण्यात येईल. पण, 'ऑल इंडिया पोलिस मीट' स्पर्धेदरम्यानही ३३ वर्षीय गीताचे सॅम्पल घेण्यात आले होते. त्यातही ती दोषी आढळली होती.
  • दुबई ओपन बुद्धिबळ स्पर्धेमध्ये कोणता खेळाडू प्रतिस्पर्ध्याच्या चाली स्मार्टफोनवर पाहात असताना आढळल्याने त्याच्याविरुद्ध निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे?
== जॉर्जियाचा ग्रँडमास्टर गायोझ निगालिड्झ
-दुबई ओपनच्या सहाव्या फेरीमध्ये गायोझची लढत अर्मेनियाच्या पेट्रोसियानशी होती.
-त्याच्यावर १५ वर्षांची बंदी घालण्यात आली आहे.
  • 'गांधी मला भेटला होता' या वादग्रस्त कवितेचे लेखक कोण आहेत?
    == वसंत गुर्जर
 'अग्नी-३' क्षेपणास्त्र
  1. -१७ मीटर लांबी, दोन मीटर व्यास आणि ५० टनांचा प्रक्षेपण भार असलेले हे क्षेपणास्त्र दीड टन वजनाचे अण्वस्त्र वाहून नेऊ शकते.
  2. -लष्करात याआधीच समाविष्ट करण्यात आलेले हे क्षेपणास्त्र हायब्रीड नॅव्हिगेशन, गायडन्स व कंट्रोल सिस्टिम्सने सज्ज आहे.
  3. -तीन हजार किलोमीटरपेक्षा अधिक अंतरावर मारा करू शकणाऱ्या आणि अण्वस्त्रसक्षम अशा 'अग्नी-३' या आंतरखंडीय क्षेपणास्त्राची भारताने ओडिसा किनाऱ्यानजीकच्या व्हीलर बेटांवरून प्रक्षेपक चाचणी केली.
  •  भारताला युरेनियम पुरवठा करणारा तिसरा देश कोणता ठरला आहे?
== कॅनडा (रशिया व कझाकस्ताननंतर)
  1. -कॅनडाची कॅमेको कॉर्पोरेशन ही कंपनी ३ हजार मेट्रिक टन युरेनियन पुरवणार आहे.
  2. -पाच वर्षांत हा पुरवठा केला जाणार असून युरेनियमची किंमत २५४ दशलक्ष डॉलर आहे.
  • 'स्किनिंग द ओनियन' हे आत्मचरित्र कोणत्या लेखकाचे आहे?
    == गुंटर ग्रास
  • ‘इस्लामिक स्टेट पाकिस्तान‘ या दहशतवादी संघटनेचा म्होरक्‍या असलेला कोणता दशहतवाद्याचा बॉम्ब स्फोटात मृत्यू झाला आहे, अशी माहिती प्रसारमाध्यमांनी दिली आहे?
    == हाफिज मुहाम्मद सईद
  • कॅनडाचे पंतप्रधान स्टीफन हार्पर यांनी भेटीदरम्यान नरेंद्र मोदी यांना खजुराहो मंदिरातील किती वर्षे पुरातन शिल्प भेट दिले. "पॅरट लेडी‘ म्हणून हे शिल्प ओळखले जाते?
    == ९०० वर्षे जुने
  • हरियानातील कोणत्या खेड्यामध्ये उत्खनन करताना पुरातत्त्व शास्त्रज्ञांना पाच हजार वर्षांपूर्वीचे चार मानवी सांगाडे सापडले आहेत?
    == राखी गडी
  • संरक्षण सहकार्य वाढविण्यासाठी रशिया प्रथमच कोणत्या देशासोबत  युद्धसराव करणार आहे?
==पाकिस्तान
-पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा असिफ यांची आणि रशियाचे संरक्षणमंत्री सर्जी शोईगू
  • भारताच्या कोणत्या विनाशिकेचे जलावतरण २० एप्रिलला मुंबई येथील माझगाव डॉकला होणार असून नौदलाच्या १५-बी या प्रकल्पाअंतर्गत तयार होणारी ही पहिलीच रडारवर दिसू न शकणारी विनाशिका आहे?
== आयएनएस विशाखापट्टणम
आयएनएस विशाखापट्टणम‘ची वैशिष्ट्ये
१६३ मीटर : लांबी
१७.४ मीटर : उंची
४ : गॅस टर्बाईन्स
३० नॉट्‌स : वेग

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा