Post views: counter

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर

  • होळकर घराणे:

होळकर घराणे हे मूळचे सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील होळ या गावचे. घराण्याचे मूळपुरूष मल्हारराव होळकर यांनी छत्रपतींनी माळवा प्रांताची सुभेदारी दिली.त्यांनी इंदौर संस्थानाची स्थापना केली.याच घराण्यातील पुण्यश्लोक महाराणी अहिल्यादेवी होळकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नंतर स्वतःचे राज्य स्वबळावर मिळवून राज्यभिषेक करून घेणारा एकमेव राजा "महाराजा यशवंतराजे होळकर" तसेच भारतामध्ये रेल्वे चालू करण्यासाठी ब्रिटीशांना कर्ज देणारे तुकोजीराजे होळकर हे याच घराण्यातले.'   दिल्लीतील 'रायसीना' हा भुभाग होळकरांच्या अधिपत्यात होता.याच रायसीना ग्राममध्ये 'होळकर उद्यान' होते.आज याच 'रायसीना होळकर इस्टेट मध्ये' आपले राष्ट्रपती भवन,संसदभवन,केंद्रीय सचिवालस आदि भव्य वास्तु दिमाखाने उभ्या आहेत. प्रजासत्ताक दिनादिवशी राष्ट्रपती भवनावरती 'होळकरांचा राजेशाही झेंडा' डौलाने फडकत आहे.तसेच राष्ट्रपतींच्या आगमव प्रसंगी प्रथम येणारे घोडदळ डौलाने होळकरांचा राजेशाही झेंडा मिरवत आणते. 

  •  जन्म:अहिल्याबाई यांचा जन्म नगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील सीना नदी काठच्या "चौंडी" या गावात ३१-मे-१७२५ रोजी जन्म झाला.     
  • विवाह: श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर यांनी आपला मुलगा खंडेराव यांचा विवाह अहिल्येशी करण्याची मागणी केली.अहिल्या व खंडेराव यांचा लग्न सोहळा पुण्यातील शनिवारवाडा परिसरात "सातारकर छत्रपती शाहू महाराज{थोरले}" यांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला.
  •  सती प्रथेला विरोध: श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या आग्रहावरून सती जाण्यापेक्षा जनहीत महत्त्वाचे मानले.अहिल्याबाई म्हणत"सती जाणे कोणत्या शास्त्रात नाही आणि सती गेल्याने कोणताही मोक्ष किंवा पुण्य मिळत नाही" अशा परंपरेची पद्धत बंद केली पाहीजे.सती प्रथा बंद करण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले.
  • दत्तक वारसा मंजूर: अहिल्याबाईंनी आपल्या होळकर शाहीत दत्तक वारसा मंजूर करून लोकांच्या संसारात सुखाची लाट निर्माण केली. 
  • अस्पृश्यता निवारण: अहिल्याबाईंनी आपल्या राज्यातील लोकांना जाती किंवा धर्माच्या नावाखाली अस्पृश्यता पाळण्यावर बंदी घातली आणि सर्वांना समान शिकवण दिली. महात्मा फुले यांनी आपल्या शाळेचे नाव"अहिल्या आश्रम"ठेवले तर राजर्षी शाहू महाराजांनी अस्पृश्यसाठीच्या दवाखान्याला "अहिल्या स्मरणार्थ दवाखाना" असे नाव दिले.अशी ही थोर समाजसुधारक राणी होती.   
  • निसर्ग प्रेम: अहिल्याबाईंनी जंगलतोडी वर बंदी आणली.प्रत्येक घरातील माणसाच्या नावावर पाच झाडे असे गणित देऊन झाडे लावून घेतली.जे झाडे लावत नाहीत त्यांच्याकडून दंड वसूल करण्याचा आदेश  काढला.  
  • आंतरजातीय विवाह:आपल्या स्वतःच्या मुलीचा आंतरजातीय विवाह करून स्वतःच्या घरापासून सुधारणेची सुरूवात केली.                            
  • हुंडा पद्धीवर बंदी:अहिल्याबाईंनी त्याकाळी हुंडा विरोधी कायदा करून हुंडा देणाऱ्या,घेणाऱ्या व मध्यस्ती करणाऱ्यावर दंड ठोठावला. 
  • राजकारण व प्रशासन:परराज्याशी सलोख्याचे संबध रहावे म्हणून त्यांनी पंधरा राज्यात आपले वकील नेमले होते.इतर राज्यातील नऊ वकील होळकर राज्याच्या दरबारात होते. मातोश्री अहिल्याबाईंनी निर्माण केलेल्या प्रशासन व्यवस्थेत प्रजेची उन्नती व विकास, सामाजीक शांतता,सुव्यवस्था,समता व ममत्व,न्याय,स्वातंञ्य या मुलभूत मानवी मुल्यांचा प्रत्यक्ष आस्वाद त्या काळात जनता घेत होती,हे आजच्या प्रशासनाला फार मोठे आव्हान होते.