Post views: counter

Current Affairs June 2015




  • संगीत नाटक अकादमीचे पुरस्कार जाहीर : ज्येष्ठ हार्मोनियम वादक आणि संगीतकार तुळशीदास बोरकर यांना प्रतिष्ठित संगीत नाटक अकादमीची फेलोशिप जाहीर झाली आहे. याशिवाय गायिका अश्विनी भिडे-देशपांडे, औरंगाबादचे पं. नाथ नेरळकर, संगीत रंगभूमीवरील गायक व अभिनेते रामदास कामत आणि सुप्रसिद्ध बासरीवादक रोणु मुजुमदार यांच्यासह ३६ जणांची अकादमीच्या पुरस्कारांसाठी निवड झाली आहे. बोरकर यांच्यासह संगीततज्ज्ञ एस.आर. जानकीरामन, चित्रपट निर्माते एम.एस. सत्यु आणि शास्त्रीय गायक विजय किचलु यांचीही २०१४च्या फेलोशिपसाठी निवड करण्यात आली असून, त्यांना ३ लाख रुपये रोख देऊन गौरविण्यात येईल. संगीत अकादमीतर्फे संगीत, नृत्य आणि नाट्य क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल फेलोशिप आणि पुरस्कार दिले जातात. कार्यकारी समितीने बुधवारी हा निर्णय घेतला. (लोकमत न्यूज नेटवर्क) अकादमीचे विविध क्षेत्रांसाठी जाहीर केलेले पुरस्कार संगीत : अश्विनी भिडे-देशपांडे (गायिका), उस्ताद इक्बाल अहमद खान, नाथ नेरळकर, पंडित नयन घोष, रोणु मुजुमदार (बासरीवादन), सुकन्या रामगोपाल, द्वारम दुर्गा, प्रसाद राव. नृत्यकला : अदयार जनार्दनन् (भरतनाट्यम), उमा डोग्रा (कथ्थक), अमुसनादेवी, वेदान्तम् राधेश्याम (कुचीपुडी), सुधाकर साहु (ओडिसी), अनिता शर्मा, जग्रु महतो, नवतेजसिंग जोहर नाटक : रामदास कामत, अमोद भट, असगर वजाहत, चिदंबरराव जांबे, देवशंकर हलदार, मंजुनाथ भागवत होस्टोटा, अमरदास माणिकपुरी
  • कुनमिंग ते कोलकता रेल्वेमार्गाचा चीनचा प्रस्ताव हायस्पीड रॅल्वे : रेशीम मार्गाचे पुनरुज्जीवन करणार कुनमिंग : चीनमधील कुनमिंग शहर ते भारतातील कोलकता शहरापर्यंत हाय स्पीड रेल्वेसेवा सुरू करण्याचा चीनचा प्रस्ताव असून, चीनच्या प्राचीन रेशमी मार्गाचे पुनरुज्जीवन करण्याच्या प्रयत्नातील हा एक टप्पा आहे. म्यानमार व बांगलादेशातून चीनचा हा सिल्क रूट जात आहे. चीनने अलीकडेच ग्रेटर मेकाँग उपविभाग तयार करण्याची कल्पना मांडली होती. त्यात बांगलादेश, चीन, भारत व म्यानमार असा बहुद्देशीय कॉरीडॉर प्रकल्प तयार करण्याचा प्रस्ताव आहे. यात पुढाकार अर्थातच चीनचा असेल.
  • MCA च्या अध्यक्षपदी शरद पवार : तब्बल १७२ मतं मिळवत शरद पवार  एमसीएच्या अध्यक्षपदी निवडून आले आहेत. तर उपाध्यक्षपदी आशिष शेलार यांची निवड झाली आहे. क्रिकेट फर्स्ट या गटाचा या निवडणूकीत धुव्वा उडवत महाडदळकर गट व पवार गटाने बाजी मारली आहे. महाडदळकर गटातील फक्त रवी सावंत वगळता सर्व उमेदवार विजयी झाले आहेत. ३२९ सदस्यांपैकी ३२१ सदस्यांनी मतदान केले असून महाडदळकर गटासमोर शिवसेनेने पाठिंबा जाहीर केलेल्या डॉ. विजय पाटील यांच्या क्रिकेट फर्स्ट गटाचे आव्हान होते.
  •  जपानचा प्रतिष्ठित 'फुकुओका' पुरस्कार रामचंद्र गुहा यांना जाहीर :

    प्रसिद्ध इतिहासकार रामचंद्र गुहा यांना जपानचा प्रतिष्ठित 'फुकुओका' पुरस्कार जाहीर झाला आहे.
     तसेच थांट मिंट यू आणि मिन्ह हान्ह यांनाही या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
     मिन्ह हान्ह यांना कला आणि संस्कृत तर थांट मिंट यू यांना शैक्षणिक क्षेत्रात महत्वाची कामगिरी केल्याबद्दल पुरस्कार जाहीर झाले आहेत.आशियामध्ये कला, शिक्षण आणि संस्कृती या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्‍यांना 'फुकुओका' पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.या पुरस्काराचा वितरण सोहळा 17 सप्टेंबर रोजी फुकुओका आंतरराष्ट्रीय कॉग्रेस सेंटरमध्ये पार पडणार आहे. यापूर्वी रवी शंकर, पद्य सुब्रह्मज्ञम, रोमिळा थापर, आमजली अमीर खान, आशिष नंदी, पार्थ चाटर्जी, वंदना शिवा, नलिनी मलणी या भारतीयांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.
  •  राजर्षी शाहू मेमोरिअल ट र्स्टतर्फे दिला जाणारा यंदाचा शाहू पुरस्कार कोणाला जाहीर झाला.:- ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य 
  • संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने ---------- रोजी २१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा करण्याचे ठरवले आहे.:- ११ डिसेंबर २०१४
  • जगात विजेवर चालणाऱ्या पहिल्या विमानची निर्मिती कोणत्या देशाने केली ;- चीन
  • कोणत्या संघाने २० वर्षांखालील विश्वचषक फुटबॉल स्पध्रेचे विजेतेपद पटकावले.:- सर्बिया
  • अमेरिकेतील दहा डॉलरच्या नोटेवरील अलेक्झांडर हॅमिल्टन यांची जागा आता -------- घेणार आहे:- महिला
  • कोणत्या शहरात २०१७ ची मास्टर्स जागतीक बँडमिंटन स्पर्धा आयोजीत करण्याचा मान मिळाला :-कोची 
  • सामन्यातदरयान मैदानावर गैरवर्तन करणारा ब्राझीलचा कोणत्या फुटबॉलपटूस शिस्तपालन समितीने कडक कारवाई करत ‘कोपा अमेरिका‘ स्पर्धेतील उर्वरित सामन्यांसाठी बंदी घातली. :-नेमार

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा