Post views: counter

Current Affairs June 2015


 • जीवन गौरव पुरस्कार २०१५ : अखिल भारतीय मराठी नाट्य साहित्य संमेलन मंदिर येथे झालेल्या ‘रंगभूमी दिन’ कार्यक्रमात १५ जून २०१५ रोजी मुंबई येथे अभिनेत्री सुलभा देशपांडे व अभिनेते जयंत सावरकर यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.सावरकर यांना विक्रम गोखले व उदय सामंत यांच्या हस्ते गौरविण्यात आले.तर सुलभा देशपांडे यांना अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षा फैय्याज ,जेष्ठ अभिनेत्री रीमा लागू,नाट्य परिषदेच्या कोषाध्यक्षा लता नार्वेकर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.
 • माहिती तंत्रज्ञान सहाय्यभूत सेवा धोरण -२०१५ ला राज्यमंत्रीमंडळाची मंजुरी या धोरणानुसार या क्षेत्रात राज्यात १० लाख पर्यंत रोजगार निर्माण करण्याचे उद्दिष्ट आहे.तसेच दरवर्षी एक लाख कोटींची निर्यात अपेक्षित आहे. राज्य शासनाने यापूर्वी १९९८ मध्ये पहिले माहिती तंत्रज्ञान धोरण जाहीर केले होते.त्यानंतर रोजगार निर्मिती ,कार्यक्षमतेत वाढ व जीवन मान सुधारण्यासाठी माहिती व तंत्रज्ञान सहाय्यभूत सेवा धोरण २००३ व माहिती तंत्रज्ञान सहाय्यभूत सेवा धोरण २००९ जाहीर करण्यात आले. या धोरणाची वाढीव मुदत ३० जून २०१५ रोजी संपुष्टात येत आहे.म्हणून नवे धोरण जाहीर करण्यात आले.
 • अंतरराष्ट्रीय योग दिन २१ जून :  दुबईमध्ये २१ जून रोजी साजरा केल्या जाणार्या अंतरराष्ट्रीय योग दिवसानिमित्त भारतीय वाणिज्य दूतावासाच्या वतीने प्रमुख अतिथी म्हणून ऑलिम्पिक पदक विजेती व पाच वेळा विश्वचेम्पियन भारतीय महिला बॉक्सर एम.सी.मेरी कोम ही राहणार आहे.
 • २०२२ पर्यंत देशात १०० गीगावोट विजेची सौर उर्जेतून निर्मिती :  केंद्र सरकारने २०२२ पर्यंत देशात सौर उर्जेच्या माध्यमातून १०० गिगावोट उर्जेची निर्मिती करण्याचे महात्वाकांक्षी लक्ष ठेवले आहे. त्यासाठी तब्बल सहा लाख कोटी रुपयांची महाप्रचंड गुंतवणूक लागणार आहे. हे लक्ष खरोखरच साध्य झाल्यास स्वच्छ उर्जा निर्मितीच्या क्षेत्रात भारत जगात आघाडीवर राहील. पण सध्या भारत केवळ तीन गिगावोट सौर उर्जा निर्माण करतो.म्हणून ठरविलेले लक्ष मोठे आहे. सध्या जगात सर्वात जास्त सौर उर्जा निर्मिती करणारा देश जर्मनी आहे.त्याची स्थापित सौर उर्जा निर्मिती क्षमता केवळ ४० गिगा वोट पेक्षा थोडी कमीच आहे.. नुकताच चीनने जर्मनीला सौर उर्जा निर्मिती क्षेत्रात मागे टाकून ४० गिगा वोट पेक्षा थोडी अधिक सौर उर्जा निर्माण केली आहे., भारताने ठरविलेले लक्ष साध्य करण्याकरिता सौर उर्जा निर्मिती करिता तब्बल  पाच लाख एकर जमीन ,सौर पेनल्स साठी पी.व्ही.सी मोड्यूल ,मोठ्या जागतिक कंपनीचा  सहभाग सौर उर्जा निर्मितीसाठीचा गरजेचा आहे.
 •  स्टेफी ग्राफ केरळ पर्यटन व आयुर्वेदाची अँबॅसेडर

                               महान टेनिसपटू स्टेफी ग्राफची केरळ पर्यटन व आयुर्वेदाची ब्रँड अँबॅसेडर म्हणून निवड करण्यात आली आहे.मुख्यमंत्री ओमेन चंडी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केरळच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. स्टेफी ग्राफ बरोबर करार करण्यासाठी केरळच्या पर्यटन मंत्रालयाने आवश्यक मंजुरी दिली आहे.आता स्टेफी ग्राफ विदेशात केरळच्या आयुर्वेद उपचारांचा प्रसार आणि प्रचार करताना दिसणार आहे.निर्सगाचे भरभरुन देणे लाभलेल्या केरळमध्ये आयुर्वेदीक औषधे मोठया प्रमाणावर आहेत. येथील आयुर्वेदीक उपचारांचा परिणाम लगेच दिसून येत असल्याने, देश-विदेशातून मोठया संख्येने नागरीक येथे आयुर्वेदिक उपचारांसाठी येत असतात. स्टेफी ग्राफच्या नावावर २२ ग्रॅण्डस्लॅम जेतेपदे आहेत. ४६ वर्षीय स्टेफीने १९९९ मध्ये टेनिसमधून निवृत्ती घेतल्यानंतर ऑक्टोंबर २००१ मध्ये तिने माजी अव्वल टेनिसपटू आंद्रे आगासीबरोबर विवाह केला.
 • महाराष्ट्र सरकार-------------या ठिकाणी पहिले पुस्तकाचे गाव निर्माण करणार आहे:- मालगुंड (रत्नागिरी)
 • विविध राज्यामध्ये असणाऱ्या ६ राजकीय पक्षांचे विलीनीकरण करून------------हा पक्ष स्थापन करण्यात आला:- समाजवादी जनता  , पक्षस्थापना:- १५ एप्रिल २०१५ ,निवडणूक चिन्ह:-सायकल
 • जगातील सर्वात मोठा सदस्य संख्या असणारा राजकीय पक्ष कोणता :- भारतीय जनता पक्ष (यापुर्वी चीनमधील कम्युनिस्ट पार्टी आँफ चायना हा जगातील सर्वात मोठा पक्ष होता)
 • भारतीय डाक / पोस्ट विभागातर्फे १३५ वर्षापासून दिली जाणारी मनी आँडर ही सेवा--------पासुन बंद करण्यात आली:- १ एप्रिल २०१५ (१८६४ साली मनी आँडर सेवा सुरु करण्यात आली.या सेवेचा ३१ मार्च २०१५ हा शेवटचा दिवस होता)
 • संपूर्ण देशभरात अत्यावश्यक सेंवासाठी ------------हा क्रमांक देण्याचा प्रसताव Telecom Regulatory Authority of India ने दिला:- ११२
 • उन्नत भारत अभियानाअंतर्गत देशातील पहिले आदर्श ग्राम/गाव ठरले:- खेंतीया (पश्चिम बंगाल) (हे गाव खरगपूर आयआयटीच्या तज्ञांनी आधुनीक शेतीसाठी दत्तक घेतले आहे)
 • --------- ही भारतातील पहिली भीकारयांनी भीकारयाठी चालवीली जाणारी बँक आहे :- मंगला बँक ( ही बँक बिहारमध्ये गया येथे स्थापन करण्यात आली) 
 • अमेरिकेत नँसडँक शेअर बाजारात सूचीबद्ध होणारी भारतातील डीटीएच कपनी होय:- व्हिडीओकाँन डी२एच
 • संयुक्त राष्ट्र संघाच्या जागतीक महिला विषयक अहवालानुसार सर्वात जास्त महिला संसदपटूचे प्रमाण असणारा देश:- रवांडा