Post views: counter

Current Affairs June 2015


 • → मर्सिडीज कप टेनिस स्पर्धा

या स्पर्धेत पुरुष एकेरीत स्पेनच्या रफेल नदाल याने विजेतेपद पटकाविले.याने सर्बियाच्या विक्टर त्रोयस्की वर मत केली.नदालने हि स्पर्धा तिसर्यांदा जिंकली आहे.यापूर्वी २००५ व २००७ मध्ये हि त्याने हि स्पर्धा जिंकली होती.
भारताच्या रोहन बोपन्ना याने रोमानियाच्या प्लोरीन मार्गीयाच्या साथीत मर्सिडीज कप टेनिस स्पर्धेतील पुरुष दुहेरीचे विजेतेपद पटकाविले,यांनी अलेक्झांडर पेय व बृना सोआरेस यांच्यावर मात केली.

बोपान्नाचे हे पुरुष दुहेरीचे एकूण चौदावे तर फ्लोरींच्या साथीत मिळविलेले हे दुसरे विजेतेपद ठरले.
 • → अंतरराष्ट्रीय ख्राईस्ट चर्च स्क्वोश स्पर्धा

भारताचा स्क्वोश पटू हरीन्द्र पाल संधूला  अंतरराष्ट्रीय ख्राईस्ट चर्च स्क्वोश स्पर्धा मध्ये उपविजेतेपद मिळाले.अंतिम सामन्यात इंग्लंडच्या देक्लन जेम्स ने संधुवर मत केली.
 • → दुरांतो च्या धर्तीवर ‘सुविधा ‘गाड्या

रेल्वे मंत्रालयाने सध्याच्या दुरांतो रेल्वे गाड्यांच्या धर्तीवरच अतिजलद अशा ‘सुविधा’रेल्वेगाड्या सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.या गाड्यांचे स्वरूप पूर्णपणे व्यापारी व सवलत रहित असेल.
म्हणजेच जेष्ठ नागरिक किंवा भाड्यात सवलतीसाठी पात्र असलेल्यांना सवलतीचा लाभ मिळणार नाही.
सुविधा चे तीन प्रकार आहे----
१.पूर्ण वातानुकुलीत आणि थांब्यासहित किंवा विनाथांबा
२.मिश्रसेवा आणि विनाथांबा
३.मिश्र सेवा थांब्यासाहित

 •   नवे रस्ते वाहतूक आणि सुरक्षा विधेयक
                       केंद्र सरकारच्या नव्या रस्ते वाहतूक आणि सुरक्षा विधेयकात दारुड्या वाहन चालकांना चाप लावण्यासाठी परिवहन मंत्रालयाने जबरदस्त दंड आणि कठोर शिक्षेच्या प्रस्तावाचा समावेश आहे.
सध्या दारू पिऊन गाडी चालवताना आढळल्यास २ हजार रुपये दंड आणि सहा महिन्यांच्या शिक्षेची तरतूद आहे. नव्या विधेयकानुसार १० हजार रुपये दंड आणि सहा महिने ते एका वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा होणार आहे. तसेच एका वर्षासाठी गाडीही जप्त केली जाणार आहे.
परिवहन खात्यानं हा प्रस्ताव कायदा मंत्रालय आणि त्यानंतर आता राज्य सरकारांकडे पाठवला आहे.
नव्या विधेयकातील तरतुदी
                      एकापेक्षा अधिक लायसन्स बाळगणाऱ्यांना तसेच एकापेक्षा जास्त लायसन्ससाठी अर्ज करणाऱ्यांना शिक्षा.विम्याशिवाय गाडी चालवणाऱ्या चालकांना २ हजार रुपये ते एक लाखांपर्यंत दंड.
वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांसह वाहनांची सदोष निर्मिती अथवा चुकीचे डिझाइन असल्याचे समोर आल्यास ऑटो कंपन्यांनाही दंडात्मक शिक्षेची तरतूद.
                       वाहनांची चुकीची डिझाइन असल्याचे आढळल्यास ५ लाखांपर्यंत दंड आणि संबंधित गाडी परत घेण्यास नकार दिल्यास तीन महिन्यांची शिक्षा अथवा गाडीच्या किमती इतकीच दंडाची तरतूद.
एखाद्या मुलाच्या अपघाती मृत्यूला जबाबदार असलेल्या चालकाकडून जबरदस्त दंडवसुली.
वारंवार वाहतूक नियम मोडणाऱ्यांचे लायसन्स कायमचेच रद्द होणार.
 • → डीक कोस्टलो

ट्विटर चे सी.ई.ओ असलेले डीक कोस्टलो यांना पदावरून पायउतार व्हावे लागले.
सन २०१३ मध्ये आणलेल्या ‘पब्लिक ऑफर’ला अपेक्षेनुसार प्रतिसाद  न मिळाल्याबद्दल आणि कंपनी अजूनही नफ्यात जात नस्ल्यासाठी डीक यांना कारणीभूत ठरविण्यात आले.
सध्या यांच्या जागी ट्विटरचे सहसंस्थापक जेक डोर्से यांची हंगामी नियुक्ती करण्यात आली.
 • → एन श्रीनिवासन

आय.सी.सी चे अध्यक्ष एन.श्रीनिवासन यांची १२ जून २०१५ रोजी तामिळनाडू क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षपदी फेरनियुक्ती करण्यात आली.

 • → नेपाळच्या पुनर्बांधणीसाठी जागतिक बॅंकेने ५० कोटी डॉलरचा निधी
भूकंपामुळे उद्ध्वस्त झालेल्या नेपाळच्या पुनर्बांधणीसाठी जागतिक बॅंकेने ५० कोटी डॉलरचा निधी उभारला असून, यातील वीस कोटी डॉलर हे घरांच्या उभारणीवर खर्च केले जाणार असून, अन्य दहा कोटी डॉलर थेट नेपाळ सरकारला रोख स्वरूपात दिले जाणार आहेत. आणखी दहा ते वीस कोटी डॉलरचा निधी अन्य प्रकल्पांकडून पुनर्बांधणीच्या कार्याकडे वळविला जाणार आहे.भूकंपामुळे नेपाळचे ६.६ अब्ज डॉलरचे नुकसान झाले असून, ते भरून काढण्यासाठी आणखी पाच वर्षांचा अवधी लागेल.जागतिक बॅंक आणि आशियायी विकास बॅंकेने नेपाळला मोठ्या प्रमाणावर आर्थिक रसद उपलब्ध करून दिली आहे.
 • → ऑपरेशन म्यानमार

४ जून २०१५ रोजी मणिपुरमध्ये नागा बंडखोरांच्या हल्ल्यात १८ जवान शहीद झाले.हा हल्ला नेशनल सोशालीस्ट कौन्सिल ऑफ नागलंड –एन.एस.सी.एन च्या खापलांग गटाने केला होता.
या हल्ल्यामुळे दिल्लीतील सौथ आणि नॉर्थ ब्लॉकला जबरदस्त धक्का बसला आहे.कारण नागलंड,मणिपूर,अरुणाचल प्रदेश मध्ये ‘ऑपरेशन हिफाजत’सुरु होते. नेशनल सोशालीस्ट कौन्सिल ऑफ नागलंड –एन.एस.सी.एन ने युद्धबंदी धुडकावून लावली होती.त्याच्याशी अन्य बंडखोर गटांना झुंजविण्याची योजना केंद्रीय गृहमंत्रालयाने आखली होती.पण त्यापूर्वीच या गटाने जाहीर आव्हान देऊन भीषण हल्ला केला
 • → ग्रेफिनचा वापर बल्बमध्ये

ग्रेफिनचा वापर करून जगातील सर्वात कमी जाडीचा बल्ब तयार करण्यात शास्त्रज्ञांना यश मिळाले आहे.
ग्रेफिन हे अत्यंत पातळ पापुद्रा होऊ शकणारे कार्बनचे रूप आहे.ग्रेफिनचा तयार करण्यात आले आहे.
या बल्बमध्ये नवीन प्रकारचा ब्रॉड बेंड प्रकाश उत्सर्जक वापरण्यात आला आहे.त्यामुळे अणुएवढ्या जाडीच्या लवचिक पदार्थातून प्रकाश मिळविता आला आहे.
त्याचा संदेश वाहनात मोठा उपयोग होणार आहे.
 • → आशियाई केडेट कुस्ती स्पर्धेत भारत उपविजेता

आशियाई केडेट कुस्ती स्पर्धा नवी दिल्ली येथे भरविण्यात आल्या होत्या.या स्पर्धेत फ्री स्टाईल विभागात इराण विजेता ठरला .तर भारताला उपविजेता पदावर समाधान मानावे लागले.
मुलींमध्ये देखील भारतीय संघ उपविजेता राहिला तर विजेतेपद जपान ने मिळविले.
मुलींमध्ये दिव्या करण हिने ७० किलो वजनी गटात मंगोलियाच्या ब्याम्बोडोजत्सेत्सेग्ब्यायार हिचा पराभव करून सुवर्णपदक मिळविले
 • → ब्रिटन भारत दरम्यान बंदर भागीदारीसाठी करार

ब्रिटनची पिल पोर्टस आणि भारताच्या ‘जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट’ सोबत करार झाला आहे.यानुसार दोन्ही बंदरांतर्गत भागीदारी व्यवहार होणार आहेत.या दोन्ही बंदरामध्ये बंदर व्यवस्थापन तसेच बंदर वाहतूक व व्यापारासाठी सहकार्य करण्याचे निश्चित करण्यात आले आहे.या करारावर पिल पोर्टस चे मुख्याधिकारी मार्क व्हीटवर्थ आणि जे.एन.पी.टी चे अध्यक्ष निरज बंसल यांनी स्वाक्षरी केली.
२०१४ मध्ये ब्रिटनमार्फत भारतात एकूण थेट विदेशी गुंतवणुकीपैकी १० टक्के हिस्सा आहे.
 •   पुलित्झर पुरस्कार विजेते आंतरराष्ट्रीय ख्यातीचे इतिहास संशोधक ------------ यांनी विमानाचा शोध लावणाऱ्या राइट बंधूंची कथा "दि राइट ब्रदर्स‘ या पुस्तकात मांडली :------डेव्हिड मॅककुलॉघ
 • स्वित्र्झलडमध्ये काळा पैसा असलेल्या देशांच्या यादीत भारताचे स्थान कितवे आहे :-६१ (पाकिस्तान ७३ व्या स्थानावर आहे)
 • राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार 'ब्लू मॉरमॉन' फुलपाखरु आता -------- म्हणून ओळखले जाणार अाहे, :-'राज्य फुलपाखरु'
 • १० ते १२ संप्टेबर २०१५ रोजी होणारे १० वे जागतीक विश्व हिंदी संमेलन---------या ठिकाणी होणार आहे:- भोपाळ
  ९ वे (२०१२):- जोहान्सबर्ग (द. आफ्रिका)
  ८ वे (२००७) :- न्युयार्क (अमेरिका)
 • भारताचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी में २०१५ मध्ये कोणत्या देशाच्या "विजय दिवस आयोजनात " भाग घेतला होता :- रशिया
 • सौर उर्जा वर चालणारे देशात्तील पहिले स्टेडीयम कोणते :- चिन्नास्वामी स्टेडीयम 
 • सन २०१५ चे ५ वे ई- मराठी साहित्य समेंलन -----------येथे संपन्न झाले:-पुणे
  समेंलनाचे अध्यक्ष:- डॉ. अनिल अवचट
  उदघाटक:- विवेक सावंत
   
 • भगवत गीता ग्रंधाचा अभ्यासक्रमात समावेश करणारे राज्य:- हरियाना 
 • कोलकाता येथील विश्वभारती विद्यापीठाच्या कुलपती पदी ---------यांची नियुक्ती करण्यात आली:- पंतप्रधान नरेंद्र मोदी (याअगोदर डॉ मनमोहन सिंग होते) 
 • देशातील पहिले रेल्वे संशोधन केद्र महाराष्ट्रात मुंबई विद्यापीठतर्फे-----------येथे उभारण्यात येणार आहे :-रत्नागिरी 
 • यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक यांच्यामार्फतचालविण्यात येणारे वेब रेडीओ केद्र:- यशवाणी