Post views: counter

Current Affairs july 2015 Part-5

 • 'मलाला युसुफझाईने लेबनॉनमधील सीरियाच्या निर्वासित मुलींसाठी केली शाळा सुरू : 
नोबेल पुरस्कार मिळवणारी जगातील सर्वांत लहान वयाची व्यक्ती ठरलेल्या मलाला युसुफझाई हिने आपला अठरावा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा केला.हा वाढदिवस तिने लेबनॉनमधील सीरियाच्या निर्वासितांबरोबर साजरा करत तेथील मुलींसाठी शाळा सुरू केली आहे.द मलाला फंड या स्वयंसेवी संस्थेतर्फे ही शाळा सीरियाच्या सीमेनजीक असलेल्या लेबनॉनमधील निर्वासितांच्या छावणीत सुरू झाली आहे. या शाळेचा सर्व खर्च मलालानेच सुरू केलेल्या द मलाला फंड उचलणार आहे.तसेच या शाळेमध्ये 14 ते 18 या वयोगटातील दोनशे मुलींना प्रवेश दिला जाणार आहे.

 • क्रायोजेनिक इंजिनच्या शक्तिशाली आवृत्तीची यशस्वी चाचणी :
भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) 20 जुलै रोजी भारतीय अंतराळवीरांना अवकाशात उड्डाण करण्यासाठी आवश्यक असलेल्या क्रायोजेनिक इंजिनच्या शक्तिशाली आवृत्तीची यशस्वी चाचणी घेतली.
 या नव्या इंजिनमुळे जागतिक व्यावसायिक स्पर्धेत उतरलेल्या इस्रोला आठ टन वजनाचे सॅटेलाइट अवकाशात सोडणे शक्य होणार आहे.

 तामिळनाडूतील महेंद्रगिरी येथील इस्रो केंद्रात इंजिनाची जमिनीवरच चाचणी घेण्यात आली.
 या इंजिनची क्षमता सध्याच्या क्रोयोजेनिक इंजिनांपेक्षा 25 टक्के अधिक असुन जीओ-सिंक्रोनस एसएलव्ही मार्क-3 या रॉकेटसाठी होणार वापर या शक्तिशाली क्रोयोजेनिक इंजिनचा वापर होणार आहे.
 2016 साली होणाऱ्या जीएसएलव्ही मार्क-3च्या उड्डाणासाठी इस्रोचे मनोबल वाढवण्यासाठी ही चाचणी महत्त्वपूर्ण होती.
 शक्तिशाली क्रायोजेनिक इंजिनचा प्रत्यक्षात वापर सुरू होण्यास किमान सात वर्षांचा कालावधी लागणार असून भारतीय अंतराळवीरांची अवकाशातील सफर घडवण्यासाठी याच इंजिनाची होणार मदत आहे.

 • सानिया मिर्झाला या वर्षीचा 'राजीव गांधी खेलरत्न' पुरस्कार :

जागतिक क्रमवारीतील दुहेरीची नंबर वन खेळाडू, विम्बल्डन महिला दुहेरी चॅम्पियन टेनिसस्टार सानिया मिर्झा ही यंदा देशातील सर्वोच्च क्रीडा पुरस्कार 'राजीव गांधी खेलरत्न' पुरस्काराने सन्मानित होऊ शकते. केंद्रीय क्रीडा मंत्रालयाची सानियाच्या नावाची खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस करण्याची योजना आहे.  खेलरत्न पुरस्कार दर वर्षी 29 ऑगस्ट रोजी हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिनी राष्ट्रपती अर्जुन, द्रोणाचार्य आणि ध्यानचंद पुरस्कारांसोबत प्रदान करतात.  गतवर्षी एकाही खेळाडूला खेलरत्न पुरस्कार देण्यात आला नव्हता.
 तसेच माहितीनुसार, 9 खेळाडूंनी खेलरत्न पुरस्कारासाठी अर्ज केला आहे.
 त्यांत दीपिका पल्लीकल (स्क्वॅश), सीमा अंतिल (डिस्कस थ्रो), विकास गौडा (डिस्कस थ्रो), सरदारसिंग (हॉकी), टिंटू लुका (अ‍ॅथलेटिक्स), अभिषेक वर्मा (धनुर्विद्या), गिरीशा एच. एन. (पॅरालिम्पियन हायजंपर), पी. व्ही. सिंधू (बॅडमिंटन) आणि जीव मिल्खासिंग (गोल्फ) यांचा समावेश आहे.
 सानियाला 2004 मध्ये अर्जुन पुरस्कार आणि 2006 मध्ये पद्मश्री पुरस्कार मिळाला होता. 
 • सेवा हमी कायदा विधेयक मंजूर :
भ्रष्टाचारमुक्त प्रशासन आणि जनतेला सेवा मिळण्याचा हक्क देण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम (सेवा हमी कायदा) हे विधेयक मांडल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. तसेच यासंदर्भात 110 सेवा अधिसूचित केल्याचेही त्यांनी जाहीर केले. तर विधानसभेत हे विधेयक मंजूर झाले आहे. या कायद्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांवर निर्धारित वेळेत काम पूर्ण करण्याची
जबाबदारी येणार असून, ते काम न झाल्यास संबंधित कर्मचाऱ्यांना कारवाईला सामोरे जावे लागेल. अधिसूचित केलेल्या सेवा ठरविलेल्या कालमर्यादेत उपलब्ध होणार असल्याने, प्रशासनामध्ये उत्तरदायित्व, जबाबदारी व पारदर्शकता येईल. या कायद्यामुळे जनतेला सेवा मिळवून देण्याचा अधिकार प्राप्त होणार आहे. तसेच लोकांना त्यांच्या कामाची माहिती ई-सिस्टिमद्वारे मिळेल.

 • आंतरराष्ट्रीय निरीक्षणास मान्यता :
पाश्‍चात्त्य देश आणि इराणदरम्यानचा आण्विक करार मसुदा मंजूर करण्यात आला आहे. या करारामुळे इराणवरील निर्बंध उठविले जाणार असून, त्यांच्या अणू कार्यक्रमालाही लगाम घालण्यात आला आहे. तसेच अमेरिका, रशिया, जर्मनी, ब्रिटन, फ्रान्स, चीन आणि इराण यांच्यात हा मसुदा मान्य झाला असून, संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा समितीत त्याला मान्यता देण्यात येईल. 

 • अखेर ऐतिहासिक आण्विक करार
इराणच्या वादग्रस्त अणुकार्यक्रमावर, संयुक्त राष्ट्राची सुरक्षा समिती व जागतिक महासत्ता यांच्यातील प्रदीर्घ राजकीय चर्चेनंतर आज (मंगळवारी) ऐतिहासिक आण्विक करार झाल्याची घोषणा करण्यात आली असून इराणला अणुबॉम्ब तयार करता येणार नाही अशी प्रमुख तरतूद करण्यात आली आहे. त्या मोबदल्यात इराणला आर्थिक निर्बंधापासून दिलासा मिळू शकेल. तसेच जागतिक बाजारपेठेत पेट्रोल आणखी स्वस्त होण्याची शक्यता असल्याने भारताला दिलासा मिळणार आहे. इराणचे परराष्ट्रमंत्री मोहंमद जवाद झरीफ व युरोपियन युनियनच्या धोरण प्रमुख फेडरिका मोघेरिनी यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत हा करार झाल्याची घोषणा केली. या करारान्वये इराणला आण्विक निर्बंधांच्या बदल्यात आर्थिक निर्बंधातून सूट देण्याचे मान्य करण्यात आले आहे. आम्हाला मेहनतीचे फळ मिळाले असून आम्ही हा ऐतिहासिक करार करण्यात यशस्वी झालो आहोत, इराणच्या राजनैतिक अधिकाऱ्याने सांगितले.

 • प्लुटोचा आकार अंदाजापेक्षा मोठा असल्याचे स्पष्ट :

प्लुटो हा ग्रह अंदाजापेक्षा आकाराने खूप मोठा असल्याचे यानाने केलेल्या निरीक्षणातून स्पष्ट होत आहे. नासाच्या न्यू होरायझन्स या अवकाशयानाने अनेक वर्षे प्रवास करून प्लुटोला गाठले. प्लुटोचा व्यास 2370 किलोमीटर असल्याचे नवीन संशोधनात स्पष्ट झाले आहे. नव्या माहितीनुसार प्लुटोचा आकार मोठा असून घनता व वस्तुमान मात्र कमी आहे. त्याच्या अंतर्भागात असलेला बर्फाचा संचय काही प्रमाणात जास्त आहे. त्याचे ट्रोपोस्फिअर हे जास्त खोल आहे.
प्लुटोचा सर्वांत मोठा चंद्र असलेल्या चारोनचा व्यासही १२०८ किमी असल्याचे छायाचित्रातून स्पष्ट झाले आहे. निक्स आणि हायड्रा हे इतर दोन चंद्र अनुक्रमे ३५ आणि ४५ किमी व्यासाचे आहेत. हे चंद्र उजळ दिसत असल्याने त्यांच्यावर बर्फ असण्याची शक्यताही व्यक्त होत आहे. कर्बेरॉस आणि स्टिक्स हे उर्वरित चंद्र फारच लहान असल्यानेत्यांचे आकारमान समजले.
लाँग रेंज रेकनसान्स इमेजर (लोरी) या अवकाशयानावर लावलेल्या कॅमेऱ्याने प्लुटोची जी छायाचित्रे टिपली आहेत त्यावरून ही बाब सामोरी आली आहे.  1930 मध्ये या ग्रहाचा शोध लागला होता. तसेच नव्या माहितीनुसार प्लुटोचा आकार मोठा असून घनता मात्र कमी आहे व त्याच्या अंतर्भागात असलेला बर्फाचा संचय काही प्रमाणात जास्त असून त्याचे ट्रोपोस्फिअर हे जास्त खोल आहे.


 • सर्वाधिक पोलादनिर्मिती करणाऱ्या देशांमध्ये भारत तिसर्‍या स्थानी :
सर्वाधिक पोलादनिर्मिती करणाऱ्या देशांच्या स्पर्धेत भारताने अमेरिकेला मागे टाकून तिसरे स्थान पटकावले असून, आगामी दहा वर्षांमध्ये 30 कोटी टन पोलादनिर्मितीचे उद्दिष्ट निर्धारित करण्यात आले आहे. त्यासाठी मंत्रालयाने 2025 पर्यंतचा रोडमॅपही आखला आहे. जानेवारीच्या सुरुवातीला पोलादनिर्मितीमध्ये देश चौथ्या स्थानावर होता. त्यापुढे अव्वल स्थानावरील चीन, जपान आणि अमेरिका यांचाच क्रमांक होता. मात्र, जानेवारी ते जून 2015  या कालावधीत भारताने अमेरिकेला मागे टाकून तिसरे स्थान मिळवले आहे. देशात पोलादाचा दरडोई वापर बराच कमी आहे. जगभरात पोलादाचा दरडोई वापर 216 किलो आहे, तर देशात हाच वापर 60 किलो इतका आहे.

 •  "नेट न्युट्रॅलिटी‘बाबत दूरसंचार समितीचा अहवाल सादर :
"नेट न्युट्रॅलिटी‘बाबत दूरसंचार मंत्रालयाने स्थापन केलेल्या समितीने अलिकडेच आपला अहवाल सादर केला आहे.  मात्र, हा अंतिम अहवाल नसून सरकारने त्याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही, असे माहिती तंत्रज्ञान मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी स्पष्ट केले आहे.  ‘समितीच्या अहवालावर आधारित, दूरसंचार नियामक प्राधिकरणाकडे प्राप्त झालेल्या प्रतिक्रिया, सूचना आणि शिफारशी विचारात घेऊनच "नेट न्युट्रॅलिटी‘बाबत सरकार चहूबाजूंनी विचार करून देशहिताचा निर्णय घेण्यात येईल‘ असेही प्रसाद यांनी यावेळी स्पष्ट केले. ‘नेट न्युट्रॅलिटी‘ सर्वंकष अभ्यास करण्यासाठी सरकारने ए.के.भार्गव यांच्या अध्यक्षतेखाली एख समिती स्थापन केली होती. सरकारने 16 जुलै रोजी हा अहवाल प्रसिद्ध केला आहे, त्यामध्ये प्रमुाख्याने इंटरनेटद्वारे करण्यात येणारे कॉल्स नियंत्रित करण्याबाबत शिफारस करण्यात आली आहे.
 • कुपोषित बालकांचे प्रमाण मध्य प्रदेशात सर्वाधिक : 
 कुपोषित बालकांचे प्रमाण मध्य प्रदेशात सर्वाधिक असून, हे प्रमाण 74.1 टक्के असल्याचे सरकारच्या एक सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे.  यात वय वर्षे पाचपर्यंत रक्तक्षय आणि कुपोषित असलेल्या बालकांचा समावेश आहे.  राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण-3 (एनएफएचएस-3) नावाच्या या सर्वेक्षणात वय वर्षे पाचपर्यंतच्या बालकांचा समावेश आहे. मध्य प्रदेशापाठोपाठ झारखंड (56.5 टक्के) आणि बिहार (55.9 टक्के) अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकांवर असल्याचे या उत्तरात नमूद करण्यात आले आहे. 

 • जन्मठेप झालेल्या कैद्यांसंदर्भात सुप्रीम कोर्टाची संमती : 
 एक वर्षानंतर सर्वोच्च न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा झालेल्या कैद्यांची सुटका करण्याच्या राज्य सरकारच्या अधिकाराला परवानगी दिली आहे.  मुख्य न्यायाधीश एच. एल. दत्तू यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने जुलै 2014च्या आदेशात दुरुस्ती केली.  सर्वोच्च न्यायालयाने माजी पंतप्रधान राजीव गांधी हत्याकांडातील दोषींची सुटका करण्याच्या तमिळनाडू सरकारच्या निर्णयाविरुद्ध केंद्र सरकारने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना ही परवानगी दिली.  या प्रकरणात तमिळनाडू सरकारची दोषींची शिक्षा माफ करण्याची इच्छा असताना केंद्र सरकारने या प्रकरणाचा तपास सीबीआयने केल्यामुळे याबाबतचा अधिकार केवळ केंद्र सरकारकडे असल्याचे म्हटले आहे.  जन्मठेपेच्या कैद्याला 14 वर्षानंतर की 21 वर्षांनी सुटका करायची, याचा अधिकार राज्य सरकारकडे असेल. 
या कैद्यांना नाही माफी :
 1. सीबीआयसारख्या केंद्रीय पथकांमार्फत तपास 
 2.  "टाडा‘सारख्या केंद्रीय कायद्यांतर्गत शिक्षा 
 3.  बलात्कारासारख्या लैंगिक छळ प्रकरणातील दोषी 
 4.  शिक्षेत सवलत न देण्याचा न्यायालयाचा आदेश 
 5.  मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावलेले दोषी

 • देशातील प्रमुख 35 नद्या प्रदूषित :
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने (सीपीसीबी) देशातील 40 नद्यांच्या प्रदूषणाची पाहणी केली असता, केवळ दक्षिण भारतातील चार, तसेच आसाममधील एकच नदी स्वच्छतेच्या प्रमाणांवर यशस्वी ठरल्या आहेत.
 उर्वरित 35 नद्या पूर्णपणे प्रदूषणाच्या विळख्यात आहेत.
 यामध्ये सतलजपासून साबरमती, कृष्णा, तापी, तुंगभद्रा आणि दमणगंगापर्यंतच्या नद्यांचा समावेश आहे.
 सीपीसीबीने  2005 पासून 2013 पर्यंतच्या आकड्यांवर आधारित हा निष्कर्ष काढला आहे. या काळात 40 नद्यांच्या 83 ठिकाणांवर पाहणी करण्यात आली.
 यामध्ये चार गोष्टींच्या प्रमाणांवर लक्ष केंद्रित केले होते. 
1. बायोकेमिकल ऑक्सिजन डिमांड (बीओडी), 
2. डिजॉल्व ऑक्सिजन (डिओ), 
3. टोटल कोलिफार्म (टीसी) आणि 
4. टोटल डिजॉल्व्हड्‌ सॉलिड (टीडीएस).
 प्रामुख्याने बीओडीनुसार पाण्यात ऑक्सिजनचा वापर करणारे घटक दर्शवितात, तर डीओमध्ये एकूण ऑक्सिजनचे प्रमाण स्पष्ट होते. टीसीमध्ये एकूण जीवाणूंची उपस्थिती आणि टीडीएसमध्ये पाण्यात असलेल्या ठोस घटकांची नोंद होते.
प्रदूषित नद्या : गंगा, सतलज, मार्कंडा, घग्घर, यमुना, चंबळ, ढेला, किच्छा, कोसी, बहेला, पिलाखर, सरसा, रावी, माही, रामगंगा, बेतवा, सोन, स्वान, वर्धा, भीमा, साबरमती, मंजीरा, तापी, नर्मदा, वाणगंगा, दमणगंगा, इंद्रावती, महानदी, चुरनी, दामोदर, सुवर्णरेखा, कृष्णा, तुंगभद्रा.
स्वच्छ नद्या : गोदावरी, कावेरी, पेन्नार, उत्तर पिनकानी, धनसारी.
थोडक्यात महत्वाचे 
 1. लैंगिक शोषणाचा आरोप असलेले आर. के. पचौरी यांना टेरी (TERI) च्या प्रमुख पदावरून हटवून त्याच्या जागी अजय माथूर यांची निवड केली. 
 2. ए.एस.दुलत यांनी लिहिलेल्या 'काश्मीर द वाजपयी इयर्स' या पुस्तकाचे प्रकाशन उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांच्या हस्ते करण्यात आले.
 3. बीसीसीआयने पुढील वर्षी भारतात होणाऱ्या टी-२० वर्ल्डकपसाठी सुरक्षा आणि भ्रष्टाचारविरोधी समितीचे (एमएसयू) मुख्य सल्लागार म्हणून नीरज कुमार यांची नियुक्ती केली आहे.
 4. प्रो-कबड्डी लीगच्या २र्या सत्रात राकेश कुमार (पटना):-१२.८०लाख हा  खेळाडू सर्वात महाग ठरला. 
 5.  सध्या चर्चेत असलेले बहुजन हिताय' या पुस्तकाचे लेखक पुरुषोत्तम खेडेकर हे आहे. 
 6.  "आर्थिक समावेश" चा अभ्यास करण्यासाठी रिझर्व्ह बँकेने दीपक मोहंती यांच्या अध्यक्षतेखाली कोणती समिती स्थापन केली. 
 7. "खंजीर 2015" हा संयुक्त अभ्यास भारत आणी कझाकीस्थान या देशात आयोजित करण्यात आलेला आहे. 
 8. भारत व पाकिस्तान या दोन देशांना शांघाय सहकार्य संघटनेत (SCO) पूर्ण सदस्यत्व देण्यात आले आहे .