Post views: counter

चांदोली राष्ट्रीय उद्यान

चांदोली राष्ट्रीय उद्यान 


महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील हे राष्ट्रीय उद्यान आहे. २००४ मध्ये याला राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा मिळाला. चांदोली धरणाच्या तलावात नावेतूनही जंगल फिरता येते.दुर्गवाडीच्या उतरून पायी भटकता येते.दुर्गवाडीच्या डोंगरावरून चांदोली जलाशयाचा परिसर दिसतो.

• स्थान-सांगली जिल्ह्यात ३२ शिराळा तालुक्यात वारणा नदीवर\ चांदोली धरण आहे.त्याच्या पाणलोट क्षेत्रात चांदोली अभयारण्य आहे

• स्थापना- 

या अभयारण्याची स्थापना १९८५ साली झाली.



• विस्तार३०० चौ.कि.मी. क्षेत्र असलेले चांदोली हे राष्ट्रीय उद्यान सांगली आणि कोल्हापूर जिल्हयामध्ये येते.वारणा नदीचा उगम येथेच होतो. १७ व्या शतकातील प्रचितगड, भैरवगड हे किल्ले ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वाचे आहेत. चांदोली अभयारण्यास मार्च २००७ मध्ये राष्ट्रीय उद्यान म्हणून अधिकृत घोषित करण्यात आले आहे.

• अभयारण्याविषयी माहिती-चांदोली राष्ट्रीय उद्यानात ३ वाघांसह २५ बिबट्यांचे ठसे नुकत्याच झालेल्या प्राणिगणनेत आढळून आले आहेत. राज्याचे मानबिंदू असणारे शेकरू व हरियाल पक्षी यांचे अस्तित्वही या पाहणीत आढळून आले आहे.

चांदोली राष्ट्रीय उद्यान सांगली , सातारा, कोल्हापूर व रत्नागिरी या चार जिल्ह्यांच्या सरहद्दीवरील ३१७.६७ चौरस किलोमीटरमध्ये पसरलेले राज्यातले सर्वांत मोठे अभयारण्य आहे. त्यामुळे या अभयारण्याचा विकास होण्याच्या दृष्टीने त्याला राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा देण्यात आला आहे. सदाहरित हिरवे गर्द जंगल म्हणून हे राष्ट्रीय उद्यान पर्यटकांना आकर्षित करत आहे. या राष्ट्रीय उद्यानाची प्राणिगणना २०१० साली, मे महिन्यात दोन टप्प्यांत करण्यात आली. संपूर्ण अभयारण्याची १२ खंडांत विभागणी केली आहे. प्राणिगणनेसाठी प्रत्येक खंडात एक गट याप्रमाणे प्राण्यांचे पाणस्थळ व पायवाटांवरील पायांचे ठसे, झाडांवरील ओरखडे, विष्ठा यांची तपासणी केली जाते, तर दुसऱ्या टप्प्यात पौर्णिमेच्या रात्री पाणवठ्याच्या ठिकाणी येणाऱ्या प्राण्यांची गणना केली जाते. त्यानुसार सर्वांचे अहवाल एकत्रित करून राष्ट्रीय उद्यान प्रशासन तात्पुरती प्राण्यांची आकडेवारी निश्चित करते. वाघ, बिबटे यांचे ठसे नागपूर येथील मुख्य कार्यालयात जमा केले जातात.

त्यांची तज्ज्ञांकडून तपासणी केल्यानंतरच आकडेवारी निश्चित केली जाते. ठशांवरूनच कोणता प्राणी (वाघ की बिबट्या) नर, मादी, पिल्लू, त्यांचे वय यांची निश्चिती केली जाते. वन्य प्राण्यांच्या गणनेत, चांदोली राष्ट्रीय उद्यानात तीन वाघांसह २५ बिबट्यांचा वावर असल्याचे ठशांवरून निदर्शनास आले आहे, तर ३५० ते ४०० च्या दरम्यान गवे, २५० ते ३०० च्या दरम्यान सांबरे, १०० अस्वले, यांच्यासह महाराष्ट्राचा मानबिंदू शेखरू व हरियाल पक्षी आढळून आले आहेत, तर भेकर, रानडुक्कर सर्वत्र आढळतात. सरपटणारे विविध प्राणी, पक्षी, मोठ्या प्रमाणावर आहेत. अजगराचे प्रमाणही सर्वत्र आढळून येत आहे. प्राण्यांच्या गणनेसाठी इस्लामपूरचे सहायक वनसंरक्षक एम. एम. पंडितराव, वनक्षेत्रपाल संजय कांबळे यांच्यासह वनरक्षक व स्वयंसेवी संस्था व पर्यावरणप्रेमींनी सहकार्य करून प्रत्यक्ष प्राणिगणनेत भाग घेतला होता.


• विविध प्राण्यांचा वावर-
प्राणी - संख्या

वाघ-३

बिबट्या-२५

गवा -३५० ते ४००

सांबर -२५० ते ३००

अस्वल- १००

• पर्जन्यमान-या अभयारण्याच्या क्षेत्रात वार्षिक सरासरी दोन ते अडीच हजार मिलीमीटर पाऊस पडतो.

• किल्ला-कर्नाळा अभयारण्यात जसा कर्नाळा आहे तसा येथेही प्रचितगड हा चांदोली अभयारण्यातला ऐतिहासिक किल्ला आहे.

• विस्तार-याच वनक्षेत्र सुमारे तीनशे नऊ चौरस किलोमीटर आहे. त्यामध्ये सांगली , सातारा,कोल्हापूर, आणि रत्नागिरी जिल्ह्यातल्या वनक्षेत्राचा समावेश होतो.

• वनसंपत्ती-चांदोलीच जंगल निम सदाहरित जंगल आहे.येथे ऐन,बेहडा, जांभूळ ,हिरडा,पांगारा. फणस.माड,उंबर, आवळा ,आंबा ,आपटा ,असे वृक्ष आणि अडुळसा,कढीलिंब,शिकेकाई,तमालपत्र,अशा वनऔषधी आहेत

• प्राणीसंपत्ती-अभयाराण्यमध्ये बरेच वन्य जीव वस्तीला आहेत.

प्राणी- पट्टेवाले आणि बिबट्या , वाघ ,गवे ,अस्वल, रानडुक्कर, सांबर , वानर,सायाळ,भेकर,ससे,रानकु्री,शेकरु, खवले मांजर, तृण, हरिण इत्यादी वन्य प्राणी आढळतात.

पक्षी- महाधनेश,राखीधनेश, रानकोंबड्या, कवडे, गरुड , ससाणे, खंड्या,घारी, बंड्या, सातभाई, सुतार , भारद्वाज, घुबड, चंडोल,पिंगळा, रातवा, कोकिळ, सुभग, स्वर्गीय नर्तक, पावश्या, चातक व धरणातील जलाशयावर बगळे,पाणकावळे, पाणकोंबड्या व इतर पाणपक्षी आढळतात . मैना ,सातभाई,होले,भारद्वाज, मोर असे पक्षी आहेत.

सरपटणारे जीव- सरडा/सरडे,नाग अजगर असे सरपटणारे प्राणी आहेत.इतर कीटक किडेही भरपूर आहेत.

विशेष फुलपाखरे- या अभयारण्याचे वैशिष्ट्य असे आहे कि या अभयारण्यात फुलपाखरांच्या असंख्य प्रजाती बघायला मिळतात.यात जगात इतरत्र नामशेष झालेल्या काही फुलपाखरांच्या जातींचा समावेश आहे.
अस्वल- अभयारण्यात सिद्धेश्वर नावाचे एक ठिकाण आहे.त्या ठिकाणी खडकाळ घळी आहेत.तिथे अस्वल दिसतात.


• अभयारण्यात जाण्याचा काळ-जानेवारी ते मे हा काळ चांदोली अभयारण्य फिरण्याकरता योग्य आहे.

• विशेष काळजी-
माहितीगार माणूस किवा वनरक्षक बरोबर घेतल्याशिवाय या अभयारण्यात फिरण्याचं धाडस सामान्य प्रवाश्याने करू नये.कारण इथले जंगले दाट आहे त्यामुळे रस्ता चुकण्याची भीती असते.पायी फिरण्यापेक्षा वाहनातून फिरणे सोपे आहे.पण पायी फिरण्यातला आनंद काही वेगळाच असतो.भटकंती मध्ये जे अनुभव अशा ठिकाणी घेवू शकतो ते वाहनातून फिरताना येऊ शकत नाहीत.पण या रानवाटा अरण्यातून जातात.जवळपास माणसांची वस्ती नसते.म्हणून बरोबर पाणी आणि खाद्य न्यावे लागते.

• विश्रामगृह-
चांदोली आणि वारणा येथे पाटबंधारे खात्याची विश्रांतिगृह
आहेत.त्यात राहण्या-खाण्याची सोय आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा