Post views: counter

अरवली पर्वतरांग

अरवली पर्वतरांग 




अरवल्ली पर्वतरांग ही पश्चिम भारतातील एक पर्वतरांग आहे. ही रांग मुख्यत्वे उत्तर गुजरात, राजस्थानच्या पूर्व भागात व मध्य प्रदेशाच्या पश्चिम भागात पसरली आहे. 

• भूविज्ञान-जगातील सर्वात प्राचीन पर्वतांमध्ये अरावलीचा समावेश होतो त्यामुळे भूवैज्ञानिक दृष्ट्या पर्वत महत्त्वाचा आहे. अंदाजे ६० कोटी वर्षांपूर्वी या पर्वताची जडणघडण झाली. राजस्थान आणि गुजरातच्या सीमेवरील माउंट अबू (उंची १७२० मी) हे या पर्वतरांगेतील सर्वोच्च ठिकाण आहे व ते थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखले जाते.


• पर्यावरण-हा पर्वत राजस्थान कडे वाहणारे मोसमी वारे अडवतो, त्यामुळे अरावली पर्वताच्या पूर्व भागात बऱ्यापैकी पाउस पडतो मात्र अरावलीच्या पर्ज्यन्यछायेतील पश्चिम राजस्थानात कमी पावसामुळे वाळवंट तयार झाले आहे. अरवल्ली पर्वतात अनेक जंगले आहेत, ही बहुतेक जंगले शुष्क प्रकारातील असून वन्य जीव वैविध्य व वन्यजीवांची संख्या लाक्षणीय आहे. रणथंभोर , सारिस्का ही काही प्रसिद्ध जंगले अरावली पर्वतात आहेत. राजस्थानातील काही प्रसिद्ध शहरे (उदा. उदयपूर , चित्तोडगढ , जयपूर , सवाई माधोपुर ) अरावली पर्वताच्या सानिध्यात येतात.


• अर्वाचीन साहित्यातील उल्लेख-महाभारतातील मत्स्य देश हा अरावली पर्वतरागांमध्ये असल्याचे मानले जाते.