Post views: counter

महाराष्ट्र पठाराची निर्मिती




महाराष्ट्र पाठाराची निर्मिती ज्वालामुखीच्या उद्रेकातून झाली.70 दशलक्ष वर्षापूर्वी - भ्रंशमुलक उद्रेक झाला व लाव्हारसाचे संचयन झाले. अशा प्रकारच्या अनेक उद्रेकापासून महाराष्ट्र पठार तयार झाले. या पठारावर अग्निजन्य खडक आढळतात.भुपृष्टावर किंवा कमी खोलीवर आढळणारे 'असिताश्म व कृष्णप्रस्तर' हे दोन प्रकारचे खडक आढळतात.महाराष्ट्र पठारावर उत्तरेकडून दक्षिणेकडे पुढील खोरी आढळतात.
  • तापी-पूर्णा खोरे 
  • गोदावरी खोरे 
  • प्रणहिता खोरे 
  • भीमा खोरे
  • कृष्णा खोरे 
 आर्कियन खडक :

हा अतिप्राचीन खडक पूर्व विदर्भा, चंद्रपुर, भंडारा, गडचिरोली, नांदेड जिल्ह्याचा पूर्वभाग आणि सिंधुदुर्गातील काही तालुक्यांमध्ये आढळतो.
ग्रँनाईट, नीस व शिस्ट प्रकारच्या खडकांपासून बनलेल्या या भुस्तरात लोह खनिजांचे विपुल साठे आहेत.
 धारवाड खडक : या श्रेणीच्या खडकांमध्ये ग्रँन्जुलाईट्स
, डोलोमाईट, अभ्रक, सिलीमनाईट, हॉर्नब्लेंड, शीष्ट, संगमरवर यांसारखी मौल्यवान खनिजे आढळतात.
पूर्व नागपुर, भंडारा, गोंदिया, सिंधुदुर्ग व कोल्हापूर जिल्ह्यातही धारवाड श्रेणीचे खडक आढळतात.
पुणे, नागपुर, भंडारा, गोंदिया, सिंधुदुर्ग व कोल्हापूर जिल्ह्यातही हा खडक आढळतो.
 कडप्पा श्रेणींचा खडक : महाराष्ट्रातील दक्षिण व पूर्व भागात हा खडक आढळतो.
कोल्हापूर जिल्ह्यात या श्रेणीतील खडकात क्वार्टझाईट्स, शेल व चुनखडीचे खडक आहेत.
 विंध्ययन खडक : विंध्ययन श्रेणीतील खडक चंद्रपुर जिल्ह्यातच आढळतात.
हा खडक सुबक बांधकामासाठी उपयुक्त असून दर्जेदार व टिकाऊ असतो.
 गोंडवना खडक : अप्पर पॉलिओझाईक नंतरच्या कालखंडात व्दीपखंडावर अनेक बदल होऊ न दख्खनच्या पठारावर स्थानिक पातळीवर हालचाली निर्माण झाल्या.
खोर्‍यांच्या आकाराचा खोलगट भाग निर्माण होऊन तेथे नद्यांनी आणलेल्या गाळाचे संचयन झाले.
कालांतराने त्यात प्राणी, वनस्पतीचे अवशेष व जंगले गाडली गेली व त्याचे दगडी कोळशात रूपांतर झाले.
त्याला 'गोंडवना खडक' असे म्हणतात.
चंद्रपुर, यवतमाळ, गडचिरोली व अमरावती जिल्ह्यात अप्पर गोंडवना खडक आढळतात.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा