Post views: counter

तापी नदी

तापी नदी  • अन्य नावे -ताप्ती
  • उगम- मुलताईजवळ ७४९ मी.
  • मुख - अरबी समुद्र
  • लांबी- ७२४ कि.मी. कि.मी.
  • देश- मध्य प्रदेश , महाराष्ट्र , गुजरात
  • उपनद्या- पूर्णा, गिरणा नदी , वाघूर
  • पाणलोट क्षेत्र- ६५,१४५ किमी²


•धरण -
उकाई धरण, काकरापार धरण, हतनूर धरण तापी नदी ही भारताच्या पश्चिम भागातून वाहणारी नदी आहे. ही 'पश्चिमवाहिनी' नदी भारताच्या मध्य प्रदेश , महाराष्ट्र व गुजरात या राज्यांमधून वाहते. तापीच्या खोऱ्यात मध्यप्रदेशातील बेतुल जिल्हा , महाराष्ट्रातील विदर्भाचा पुर्व भाग, खानदेश , व गुजराथेतील सुरत जिल्हा समाविष्ट आहे.


•उगम- 

तापी नदी मध्यप्रदेशातील बैतुल जिल्ह्यात मुलताईजवळ उगम पावते. या ठिकाणाचे संस्कृतातील मूळ नाव मूळतापी" आहे.

•मुख-
७२४ कि.मी. लांबीचा प्रवास केल्यानंतर तापी सुरत शहराजवळ खंबाटच्या आखातात अरबी समुद्राला जाऊन मिळते.

•उपनद्या-
पूर्णा नदी
शिवा नदी
गोमाई नदी
अरुणावती नदी
वाकी नदी
मोसम नदी
बुराई नदी
अनेर नदी
गिरणा नदी
पांझरा नदी
वाघूर नदी
कान नदी
गिमा नदी
तितुर नदी
वाघुर नदी
नळगंगा नदी
निपाणी नदी
विश्वगंगा नदी
मास नदी
उतवळी नदी
विश्वामैत्री नदी
निर्गुण नदी
गांधारी नदी
आस नदी
वाण नदी
मोरणा नदी
शाहनूर नदी
भावखुरी नदी
काटेपूर्ण नदी
उमा नदी
पेंढी नदी
चंद्रभागा नदी
भुलेश्वरी नदी
आरणा नदी
गाडगा नदी
सिपना नदी
कापरा नदी
खंडू नदी
तिगरी नदी
सुरखी नदी
बुरशी नदी
गंजल नदी
आंभोरा नदी
नेसू नदी

•इतर-
पौराणिक दाखल्यांनुसार तापीला सूर्यकन्या मानले जाते. या नदीच्या नावावरून १९१५ साली थायलंड येथील एका मोठ्या नदीचे 'तापी' असे नामकरण केले गेले.