Post views: counter

गंगा नदी

गंगा नदी 
गंगा ही उत्तर भारतातील नदी जगातील सर्वात मोठ्या नद्यांपैकी एक आहे. गंगेचा उगम हिमालयात भागीरथीच्या रूपात गंगोत्री हिमनदीत उत्तराखंडमध्ये होतो. नंतर ती देवप्रयाग जवळ अलकनंदा नदीला मिळते. यानंतर गंगा उत्तर भारताच्या विशाल पठारावरून वाहत बंगालच्या उपसागराला बऱ्याच शाखांमध्ये विभाजित होऊन मिळते. यामध्ये एक शाखा हुगळी नदी आहे जी कोलकाता जवळून वाहते, दुसरी शाखा पद्मा नदी बांगलादेशात प्रवेश करते. गंगा नदीची पूर्ण लांबी जवळजवळ २५०७ किलोमीटर आहे.अठराव्या शतकाच्या अखेरपर्यंत गंगा नदी बंगालच्या उपसागरास मिळत होती तर ब्रह्मपुत्रा नदी काही कि.मी. पूर्वेस स्वतंत्रपणे मिळायची. साधारण अठराव्या शतकाच्या अखेरीस ब्रह्मपुत्राने पूर्वेस वळण घेतले व आता दोन्ही नद्यांचा अरिचा येथे संगम होतो. या बदलास इ.स. १८९७चा भूकंप काही अंशी कारणीभूत होता.

गंगा नदीच्या त्रिभुज प्रदेशाला सुंदरवन असे म्हणतात. येथे बऱ्याच वनस्पती आणि बंगाली वाघ आढळतात. यमुना ही गंगेची उपनदी स्वत:च एक स्वतंत्र आणि मोठी नदी आहे. ती गंगेला प्रयाग /अलाहाबाद येथे येऊन मिळते.

डॉल्फिनच्या दोन जाती गंगेमध्ये सापडतात. त्यांना गंगा डॉल्फिन आणि इरावदी डॉल्फिन या नावाने ओळखले जाते. याशिवाय गंगेमध्ये असलेले शार्कसुद्धा प्रसिद्ध आहेत.