Post views: counter

Current Affairs Oct 2015 Part - 1



  • "मायक्रोसॉफ्ट"चे जनक बिल गेट्‌स यांनी सलग 22 व्या वर्षी पहिले स्थान :

अमेरिकेतील 400 सर्वांत श्रीमंत व्यक्तींच्या यादीमध्ये "मायक्रोसॉफ्ट"चे जनक बिल गेट्‌स यांनी सलग 22 व्या वर्षी पहिले स्थान पटकाविले आहे. "बर्कशायर हॅथवे"चे अध्यक्ष वॉरन बफे यादीत दुसऱ्या क्रमांकावर असून, "ओरॅकल"चे लॅरी एलिसन तिसऱ्या क्रमांकावर आहेत. "फोर्ब्स" मासिकाने ही यादी प्रसिद्ध केली आहे. बिल गेट्‌स यांची एकूण संपत्ती 76 अब्ज डॉलर असून, गेल्या वर्षीपेक्षा त्यांच्या संपत्तीत पाच अब्ज डॉलरची घट झाली आहे. बफे यांची संपत्ती 62 अब्ज डॉलर असून, त्यात गेल्या वर्षीपेक्षा पाच अब्ज डॉलरची घट झाली आहे. एलिसन यांची संपत्ती 47.5 अब्ज डॉलर असून, गेल्या वर्षीपेक्षा त्यात 2.5 अब्ज डॉलरची घट झाली आहे. चौथ्या क्रमांकावर "ऍमेझॉन"चे जेफ बझ असून, त्यांची संपत्ती 16.5 अब्ज डॉलर आहे. 40.3 अब्ज डॉलर संपत्तीसह "फेसबुक"चे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकेरबर्ग सातव्या स्थानावर आहेत. पहिल्या दहा श्रीमंतांमध्ये ते प्रथमच आले असून, "गुगल"चे लॅरी पेज 33.3 अब्ज डॉलर संपत्तीसह दहाव्या क्रमांकावर आहेत. अमेरिकेन अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील रिपब्लिकन पक्षाचे संभाव्य उमेदवार डोनाल्ड ट्रम्प 4.5 अब्ज डॉलरच्या संपत्तीसह 121 व्या स्थानावर आहेत. या यादीमध्ये भारतीय वंशाच्या चार व्यक्तींचा समावेश आहे. त्यामध्ये 194 क्रमांकावर जॉन कपूर (संपत्ती 3.3 अब्ज डॉलर), 234 व्या क्रमांकावर रोमेश टी. वाधवानी, 268 व्या क्रमांकावर भरत देसाई, तर 358 व्या क्रमांकावर कवित्रक राम श्रीराम यांचा समावेश आहे. या यादीतील 400 श्रीमंतांची एकूण संपत्ती 2340 अब्ज डॉलर आहे. ही संपत्ती 2014 मध्ये 2290 अब्ज डॉलर होती.


  • ट्विटर आपल्या युजर्ससाठी अक्षरांची मर्यादा वाढविण्याच्या विचारात :

लोकप्रिय सोशल नेटवर्किंग साईट ट्विटर आपल्या युजर्ससाठी 140 अक्षरांची असलेली मर्यादा वाढविण्याच्या विचारात असून त्याबाबत कंपनीतील वरिष्ठांमध्ये चर्चा सुरू असल्याची माहिती एका इंग्रजी वृत्तपत्राने दिली आहे. केवळ 140 शब्दांमध्ये सध्या ट्‌विटरद्वारे संदेश देण्याची सुविधा आहे. 140 शब्दांमध्ये एखाद्या संकेतस्थळाची लिंक, युजर हॅण्डल वगैरे साऱ्यांचा समावेश आहे. यावर काम करताना 140 अक्षरांच्या मर्यादेतून लिंक आणि युजर हॅण्डल वगळण्याच्या विचार करण्यात येत आहे. या वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत ट्विटरच्या युजरमध्ये वाढ होण्याचे प्रमाण आतापर्यंतचे सर्वांत कमी प्रमाण असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे युजर्सच्या सुविधेसाठी कंपनी आपल्या धोरणांमध्ये बदल करण्याचा निर्णय घेण्याच्या विचारात आहे. फेसबुकसारख्या इतर सोशल नेटवर्किंग साईटसच्या तुलनेत 140 शब्दांची मर्यादा ही मोठी दरी असल्याचे काही युजर्स तसेच डिझाईनर्सने म्हटले आहे. या पार्श्‍वभूमीवर 150 अक्षरांच्या मर्यादेबाबत पुनर्विचार करण्यात येत आहे. आपली 140 शब्दांची मर्यादा हटविण्यासाठी ट्‌विटर नवे काहीतरी निर्माण करण्याची
शक्‍यताही व्यक्त करण्यात आली आहे.

  • दाभोळ येथील वीजप्रकल्प एक नोव्हेंबरपासून सुरू होणार :

अनेक वर्षांपासून बंद पडलेला दाभोळ येथील वीजप्रकल्प एक नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. या प्रकल्पामधून 500 मेगावॉट वीज उत्पादन होईल. याशिवाय रत्नागिरी गॅस अँड पॉवर प्रा. लि. कंपनीची दोन वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये विभागणी केली जाणार आहे. केंद्रीय ऊर्जामंत्री पीयूष गोयल यांनी आज झालेल्या महत्त्वाच्या पत्रकार परिषदेमध्ये ही घोषणा केली. हा प्रकल्प गेल्या वर्षी जानेवारीमध्ये गॅसपुरवठ्याअभावी बंद पडला होता. या निर्णयानुसार या रत्नागिरी गॅस अँड पॉवर प्रा. लि. कंपनीची दोन कंपन्यांमध्ये विभागणी केली जाणार आहे. यातील एका कंपनीकडे गॅसवर आधारित वीजनिर्मितीची जबाबदारी असेल, तर दुसऱ्या कंपनीकडे लिक्विफाईड नॅचरल गॅस रिगॅसिफिकेशन टर्मिनलची जबाबदारी असेल. गेल (गॅस ऍथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड) तर्फे नैसर्गिक वायूचा पुरवठा केला जाईल, तर एनटीपीसी (नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन) तर्फे वीजनिर्मितीची कामगिरी पार पाडली जाईल. भारतीय रेल्वेचीही या प्रकल्पामध्ये महत्त्वाची हिस्सेदारी राहणार आहे.

  • अमृत या अभियानाची राज्यामध्ये अंमलबजावणी करण्याचा निर्णय :

केंद्र शासनातर्फे राबविण्यात येणाऱ्या अटल मिशन फॉर रिज्युव्हनेशन अँड अर्बन ट्रान्सफॉर्मेशन (अमृत) या महत्त्वाकांक्षी अभियानाची राज्यामध्ये अंमलबजावणी करण्याचा निर्णय झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. या अभियानात राज्यातील 43 शहरांचा समावेश करण्यात आला आहे. शहरातील प्रत्येक घरासाठी प्रचलित निकषानुसार पाणीपुरवठा, सार्वजनिक स्वच्छतेसाठी मलनि:स्सारण, मलव्यवस्थापन व पर्जन्यजल वाहिनीची व्यवस्था करण्यासह शहरांतील मोकळ्या जागा, हरित क्षेत्रे, परिवहन व्यवस्था यांमध्ये सुधारणा करून प्रदूषण कमी करणे तसेच इतर सुविधांची निर्मिती या उद्दिष्टांच्या पूतर्तेसाठी हे अभियान राबविण्यात येत आहे. केंद्राने 500 शहरांचा समावेश अमृतमध्ये केला असून, राज्यातील 43 शहरांचा समावेश आहे. 2015-16 ते 2019-20 या कालावधीसाठी हे अभियान राबविण्यात येणार आहे. केंद्र शासनाकडून या आर्थिक वर्षासाठी एक हजार तीन कोटींचा निधी उपलब्ध होणार आहे.

  • ग्रीन एनर्जी कॉरीडॉर कार्यक्रमांतर्गत 27 योजनांची अंमलबजावणी :

केंद्र सरकारच्या ग्रीन एनर्जी कॉरीडॉर कार्यक्रमांतर्गत महापारेषण या सरकारी कंपनीने आखलेल्या 27 योजनांची अंमलबजावणी केली जाणार असून त्याकरिता आवश्यक 367 कोटी रुपयांच्या खर्चास राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. या योजनेतून 2570 मेगावॅट अतिरिक्त ऊर्जानिर्मिती होणार आहे. राज्यात पाच वर्षांत 14 हजार 400 मे.वॅ. अपारंपारिक ऊर्जानिर्मिती करण्याचे सरकारने ठरवले आहे. त्यामध्ये 7500 मे.वॅ. सोलार एनर्जी, 1500 मे.वॅ. विंड एनर्जी असणार आहे. त्याच कार्यक्रमांतर्गत नवीन वीज पारेषण वाहिन्या उभारून अतिरिक्त 2570 मे.वॅ. वीज पुरवठा केला जाणार आहे. त्याकरिता आंतरराज्यीय व राज्यांतर्गत पारेषण प्रणालीचे बळकटीकरण होणार आहे. ग्रीन एनर्जी कॉरीडॉर कार्यक्रमाकरिता येणाऱ्या एकूण खर्चाच्या 20 टक्के (73.4 कोटी) रक्कम महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीच्या अंतर्गत निधीतून उभारण्यात येणार आहे. नॅशनल क्लीन एनर्जी फंडाकडून 40 टक्के (146.8 कोटी) रक्कम मिळणार आहे तर उर्वरित 40 टक्के (146.8 कोटी) रक्कम जर्मन डेव्हलपमेंट बँकेकडून कर्जरुपाने उपलब्ध करून दिली जाणार आहे.

  • संयुक्तरा ष्ट्राच्या आवारात इतर ध्वजांसह पॅलेस्टाईनचाही झेंडा फडकणार :

पॅलेस्टाईनची गेली अनेक वर्षे रखडलेली मागणी आता मान्य झाली असून संयुक्त राष्ट्राच्या आवारात इतर ध्वजांसह पॅलेस्टाईनचाही झेंडा फडकणार आहे.
 सप्टेंबर महिन्यातच पॅलेस्टाईन आणि व्हॅटिकनचा ध्वज फडकवण्याचा निर्णय घेण्यात आला.
 पॅलेस्टाईनचा ध्वज फडकवण्यासाठी घेण्यात आलेला निर्णय 119 देशांनी बहुमताने पारित केला, तर 45 सदस्यांनी या प्रक्रियेत सहभाग घेतला नाही.
 इस्रायलने पॅलेस्टाईनचा ध्वज फडकविण्यास अर्थातच कडाडून विरोध केला होता.
 इस्रायल, अमेरिकेसह इतर सहा देशांनी या प्रस्तावाच्या विरोधात मतदान केले होते.
 2012 साली पॅलेस्टाईनचा दर्जा वाढवून त्यास व्हॅटिकन सिटीप्रमाणे नॉन मेंबर ऑब्झर्व्हरचा दर्जा दिला होता.
 त्यानंतरही ध्वज फडकविण्याची मागणी मान्य करण्यात आली आहे.


  • परकीय गुंतवणुकीच्या बाबतीत जगभरात भारताचा पहिला नंबर :

परकीय गुंतवणुकदारांचा कल आता भारताकडे वळला असून 2015 मधील पहिल्या सहा महिन्यांमध्ये भारतात तब्बल 31 अब्ज डॉलर्सची थेट परकीय गुंतवणूक (एफडीआय) झाली आहे. विशेष बाब म्हणजे परकीय गुंतवणुकीच्या बाबतीत जगभरात भारताचा पहिला नंबर आला असून अमेरिका, चीन यासारख्या देशांनाही भारताने मागे टाकले आहे. विदेशातील एका इंग्रजी प्रसारमाध्यमाने 2015 मध्ये जगभरातील देशांमध्ये झालेल्या परकीय गुंतवणुकीचा अभ्यास करत अहवाल तयार केला आहे. या अहवालात जगभरात सर्वाधिक परकीय गुंतवणूक भारतात झाल्याचे म्हटले आहे. 2015 मधील पहिल्या सहा महिन्यात भारतात 31 अब्ज डॉलर्स, चीनमध्ये 28 तर अमेरिकेत 27 अब्ज डॉलर्सची थेट परकीय गुंतवणूक झाल्याचे यामध्ये म्हटले आहे.

  • सार्वजनिक ठिकाणी स्तनपानासाठी विशेष कक्ष :

सार्वजनिक ठिकाणी मुलांना स्तनपानासाठी केंद्र सरकार लवकरच 'राष्ट्रीय स्तनपान धोरण' जाहीर करणार असून, या धोरणात या सर्व गोष्टींचा विचार करण्यात आला आहे. पुढील वर्षी हे धोरण लागू होण्याची शक्यता आहे. सार्वजनिक ठिकाणी विशेष स्तनपान कक्ष तयार करण्यात येणार आहे. महिला व बालविकास मंत्रालयाने या धोरणाचा मसुदा तयार करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत, असे या बैठकीत सांगण्यात आले. या मोहिमेत आंगणवाडी व आशा कर्मचाऱ्यांनी सामील करून घेतले जाणार आहे. गर्भवती महिलांचे समुपदेशन करण्यासाठी या महिलांना प्रशिक्षित करण्यात येणार आहे. सरकारी रुग्णालयांमध्ये गर्भवती महिलांचे समुपदेशन करण्यासाठी डॉक्टर किंवा नर्सच्या रूपाने विशेष कर्मचाऱ्याची नियुक्ती केली जाणार आहे, असे या बैठकीत सांगण्यात आले.

  • चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धा :  रोनाल्डोचा विक्रम

कारकीर्दीतील पाचशेव्या गोलची नोंदरिअल माद्रिदचा सहज विजयकारकीर्दीतील पाचशेव्या गोलची नोंद करताना ख्रिस्तियानो रोनाल्डोने रिअल माद्रिद संघाला चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेत माल्मोवर सहज विजय मिळवून दिला. रिअल माद्रिदने हा सामना २-० असा जिंकला. सर्वाधिक गोल करणाऱ्यांच्या पंक्तीतील रौल याच्या विक्रमाची रोनाल्डोने बरोबरी केली.गेल्या तीन सामन्यांत रोनाल्डोला गोल करण्यात अपयश आले होते. माल्मोविरुद्धच्या लढतीत मध्यंतराला काही मिनिटे असताना पाचशेवा गोल झळकावत रोनाल्डोने ‘गोलदुष्काळ’ संपवला. दुसऱ्या सत्रात आणखी एक गोल करत रोनाल्डोने रिअलच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.या दोन गोलांसह रोनाल्डोच्या कारकीर्दीतील एकूण गोलांची संख्या ३२३ झाली आहे. स्पेन आणि रिअल माद्रिदचे प्रतिनिधित्व करणाऱ्या महान रौल गोन्झालेझ ब्लॅन्को यांच्या विक्रमाची रोनाल्डोने बरोबरी केली.

  • आशियाई एअरगन अजिंक्यपद स्पर्धा: हीना सिधूचा सुवर्णवेध!🔵

 मीटर एअरपीटीआयश्वेता सिंगला रौप्यपदक; महाराष्ट्राच्या श्रेया गावंडेला कांस्यभारताच्या हीना सिधूने येथे सुरू असलेल्या आशियाई एअरगन अजिंक्यपद स्पध्रेत महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदकाला गवसणी घातली. याच गटात श्वेता सिंगने रौप्यपदक जिंकून भारताच्या पदकात भर घातली. कोरियाच्या सिओन ए किमला कांस्यवर समाधान मानावे लागले. महिला १० मीटर एअर पिस्तूल कनिष्ठ गटात महाराष्ट्राच्या श्रेया गावंडेने कांस्यपदकाची कमाई केली.पात्रता फेरीत ३८७ गुणांसह अव्वल स्थानावर असलेल्या माजी विश्वविजेत्या हीनानेअंतिम फेरीत १९७.८ गुणांची कमाई केली, तर श्वेता आणि किम यांना अनुक्रमे १९७.०व १७५.८ गुण मिळवण्यात यश आले. या दोन भारतीय खेळाडूंमध्ये युवा नेमबाज यशस्विनी सिंग देश्वालनेही अंतिम फेरीत प्रवेश करून आपली छाप सोडली, परंतु तिला १५५.३ गुणांसह चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. भारताच्या खात्यात एकूण १७ पदके जमा झाली आहेत. त्यात सहा सुवर्ण, पाच रौप्य व सहा कांस्यपदकांचासमावेश आहे .

  • चेतन भगतला मागे टाकत सुदीप नगरकर ठरला बेस्ट सेलर


 - इंग्रजी साहित्य क्षेत्रातील मराठमोळा लेखक सुदीप नगरकरने पुन्हा एकदाबेस्ट सेलरच्या यादीत अव्वल क्रमांक पटकावला आहे. दोन आठवड्यांपूर्वी प्रकाशित झालेल्या  'यू आर ट्रेडिंग इन माय लाईफ' या सुदीपच्या कादंबरीचे ५० हजारहून अधिक प्रतिविकल्या गेल्या असून बेस्ट सेलरच्या स्पर्धेत सुदीपने चेतन भगतलाही मागे टाकले आहे. ठाणेकर असलेल्या सुदीप नगरकरने महाविद्यालयात स्वतःच्या प्रेमाच्या संघर्षावर लेखन करुन इंग्रजी साहित्य क्षेत्रात पाऊल टाकले होते. सुदीपच्या या कादंबरीला वाचकांनीही भरभरुन प्रतिसाद दिला व इंग्रजी लेखन विश्वात ठाणेकर सुदीपने स्वत:ची ओळख निर्माण केली. दोन आठवड्यांपूर्वी सुदीपची'यू आर ट्रेंडिग इन माय लाईफ' ही कादंबरी प्रकाशित झाली होती. चार मित्रांवर आधारित या कादंबरीला वाचकांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. विशेष म्हणजे याच कालावधीत चेतन भगतची मेकिंग इंडिया ऑसम हे पुस्तक प्रकाशित झाले होते. बेस्ट सेलरच्या स्पर्धेत सुदीपने चेतनला मागे टाकून अव्वल स्थान पटकावले आहे. सर्वाधिक खपाच्या टॉप १० कादंबरींमध्ये मध्ये सुदीपची  कांदबरी पहिल्या तर चेतनचे पुस्तक दुस-या स्थानावर आहे.

  • ज्येष्ठ नागरिकांसाठी पुढील वर्षी राष्ट्रीय धोरण

 देशभरातील ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठी पुढील वर्षी नवे सर्वंकष राष्ट्रीय धोरण आणण्याची घोषणा केंद्रीय सामाजिक न्याय आणि सशक्तीकरणमंत्री थावरचंद गहलोत यांनी गुरुवारी ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त येथे आयोजित कार्यक्रमात केली.ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याण योजनांना गती देण्याची गरज आहे. लवकरच नवे राष्ट्रीय धोरण अवलंबले जाईल. समाजाने वृद्धांकडे लक्ष देण्याची आवश्यकता लक्षात घेता नवे धोरण त्या दिशेने ठोस पाऊल टाकणारे ठरेल. समाजातील बदलत्या सामाजिक-आर्थिक परिस्थितीमुळे नव्या राष्ट्रीय धोरणाची गरज प्रतिपादित करताना त्यांनी वृद्धांना अधिक सुविधा पुरविण्याचे आश्वासन दिले.सरकारने याआधीच स्वयंसेवी संस्था आणि अन्य घटकांकडून सूचना आणि शिफारशी मागितल्या आहेत. कोणतेही धोरण निश्चित करताना जनतेचा सहभाग हवा. अधिकाधिक ज्येष्ठ नागरिकांपर्यंत लाभ पोहोचविता यावा यासाठी आम्ही या धोरणातही जनतेच्या सहभागावर भर देणार आहोत. १९९९ मध्ये अवलंबण्यात आलेल्या राष्ट्रीय धोरणाची जागा नव्या सर्वसमावेशकधोरणाने घेतलेली असेल, असे त्यांनी स्पष्ट केले.

  • मोबाईल फोन्समध्ये पॅनिक बटणाची सुविधा आणण्याचा सरकारचा विचार :

महिला सुरक्षेसाठी मोबाईल फोन्समध्ये पॅनिक बटणाची सुविधा आणण्याचा सरकारचा विचार आहे. यासाठी सर्व मोबाईल कंपन्यांना विचारणा करण्यात आली असल्याची माहिती महिला आणि बालकल्याण मंत्री मनेका गांधी यांनी आज दिली. यामध्ये विशेष नेकलेस, ब्रेसलेट्‌स आणि अंगठ्या आदींसह अनेक कल्पक आणि नावीन्यपूर्ण कल्पनांचा समावेश होता. सध्या असलेल्या एसओएस मेसेज सिस्टिमद्वारे या माध्यमातून मुलगी असुरक्षित असताना संदेश पोचवून तिची मदत करता येऊ शकते हे आपल्याला ठाऊक आहेच. नेकलेस किंवा अन्य गोष्टी नेहमीच जवळ बाळगणे सोईस्कर नसल्याने अखेर "स्मार्ट" फोनचा वापर करण्याचा निर्णय घेण्यात आला. फोनमध्ये देण्यात येणारे हे पॅनिक बटण दाबताच सिस्टिममध्ये फीड असलेल्या काही मोजक्‍या लोकांना तत्काळ त्या मुलीच्या ठिकाणाविषयीची माहिती मिळेल आणि तिला मदत करणे शक्‍य होईल. याबाबत सर्व मोबाईल कंपन्यांशी चर्चा सुरू असून, लवकरच फोनमध्ये हे बटण दिसेल, असेही त्यांनी या वेळी सांगितले.

  • भारत आणि चीनदरम्यान सीमा अधिकारांची बैठक :

भारत आणि चीनदरम्यान सीमा अधिकारांची बैठक तवाम्ग जिल्ह्यातील बुमला येथे आयोजित करण्यात आली आहे. चीनच्या राष्ट्रीय दिवसानिमित्त आयोजित या बैठकीला दोन्ही देशांची शिष्टमंडळे उपस्थित राहणार असून, या वेळी विविध मुद्यांवर चर्चा होणार आहे.

  • मंगळावर अगदी वाहते पाणी :

मंगळ या पृथ्वीच्या शेजाऱ्याकडे मायंदाळ पाणी असल्याचे सुखद वृत्त 'नासा' या अमेरिकी अवकाश संशोधन संस्थेने नुकतेच दिले. मंगळावर बर्फाच्या टोप्या घातलेली उत्तुंग शिखरे आहेत, पण तिथे पाणी असल्याचा ठाम दावा आजवर कधी झाला नव्हता. पण किमान चार भक्‍कम वैश्‍विक पुरावे हाती ठेवून नासाच्या संशोधकांनी निर्वाळा दिला आहे की मंगळावर पाणी आहे, अगदी वाहते पाणी आहे.
 तिथल्या लाल पृष्ठभागावर ज्या ठळक निळ्या रेघोट्या दिसताहेत, त्या प्रत्यक्षात नद्या आहेत.
 मंगळावरच्या जलसाठ्यांचे हे गुपित फोडले 'क्‍युरिऑसिटी रोव्हर' या 'नासा'ने 2011 च्या नोव्हेंबरात पाठवलेल्या अंतराळयानाने. खरे तर हे यान म्हणजे संपूर्णपणे स्वयंचलित आणि सुसज्ज असे वाहनच आहे. सध्या ते तिथल्या पृष्ठभूमीवर हिंडून दगड, मातीचे नमुने गोळा करते आहे. जमेल तितके त्यांचे विश्‍लेषण करून त्याचा तपशीलही पाठवते आहे. रोव्हरने आजवर मंगळभूमीची हजारो छायाचित्रे पाठवली आहेत. 1967 मध्ये संयुक्‍त राष्ट्रांनी एक बाह्य अंतराळविषयक करार केला आहे. 'आऊटर स्पेस ट्रिटी' या नावाने तो ओळखला जातो. या करारानुसार भविष्यात अशी शक्‍यता उद्‌भवलीच, तर पृथ्वीवरील जीवजंतूंची वैश्‍विक निर्यात संपूर्णपणे टाळण्यासाठी सर्व संबंधित राष्ट्रे वचनबद्ध असतील. हा करार जवळपास साठ वर्षांपूर्वीचा असला तरी आम्ही त्यास बांधील आहोत, असे 'नासा'च्या मंगळ संशोधन प्रकल्पाच्या प्रमुखांनी स्पष्ट केले आहे.

  • फुटबॉल जागतिक क्रमवारीमध्ये अर्जेंटिना अग्रस्थानी :

फुटबॉल क्षेत्रामधील शिखर संस्था असलेल्या फिफाने प्रसिद्ध केलेल्या जागतिक क्रमवारीमध्ये अर्जेंटिना अग्रस्थानी असल्याचे स्पष्ट झाले आहे. जर्मनीने बेल्जियमला मागे टाकत या क्रमवारीमध्ये द्वितीय स्थान मिळविले आहे. जर्मनीचे एकूण 1,401 गुण आहेत. यामुळे आता अर्जेंटिना व जर्मनीमध्ये अवघ्या 18 गुणांचा फरक आहे. या क्रमवारीमध्ये पोर्तुगाल (क्रमांक चार), स्पेन (क्रमांक सहा), कोलंबिया (क्रमांक आठ) या देशांचाही समावेश असून ब्राझील सातव्या स्थानावर फेकला गेला आहे. या क्रमवारीमध्ये इराण (क्रमांक 39) हा आशियामधील सर्वोच्च क्रमांक मिळविणारा देश ठरला आहे. भारतीय फुटबॉल संघाची 'फिफा' क्रमवारी 12 स्थानाने घसरली असून या क्रमवारीत भारत 167 व्या स्थानावर आला आहे.

  • लखनौतील कुटुंबाकडे 300 वर्षांपूर्वी उर्दूत लिहिलेले महाभारत :

जुन्या लखनौतील करबाला कॉलनीतील मंजुल या कुटुंबाकडे गेल्या पाच पिढ्यांपासून चालत आलेला हा अमूल्य ठेवा म्हणजे सुमारे 300 वर्षांपूर्वी उर्दूत लिहिलेले महाभारत सापडले आहे. पणजोबा मवाली हुसेन नसीरबादी यांनी रायबरेली या जन्मगावी आपल्या वाचनालयात हा ग्रंथ जतन करून ठेवला होता. विशेष म्हणजे उर्दूत लिहिलेल्या या महाभारतातील प्रत्येक प्रकरणात अरबी आणि पर्शियन भाषेत प्रस्तावना दिली आहे. हा ग्रंथ म्हणजे केवळ शब्दश: अनुवाद नसून ते सोप्या गोष्टीरूपात लिहिलेले आहे. प्रत्येक प्रकरणात अरेबिक अवतरणांमध्ये माहिती दिली आहे,

  • शॉरॉन हा गुंतागुंतीचा व स्फोटक भूगर्भीय इतिहास असलेला उपग्रह असल्याचे सूचित :

नासाच्या न्यू होरायझन्स या अवकाशयानाने प्लुटोच्या शॉरॉन या उपग्रहाची वेगळी व अतिशय जास्त विवर्तनक्षमता असलेली छायाचित्रे पाठवली आहेत. या छायाचित्रांवरून तरी शॉरॉन हा गुंतागुंतीचा व स्फोटक भूगर्भीय इतिहास असलेला उपग्रह असल्याचे सूचित होत आहे. या छायाचित्रात निळा, लाल व अवरक्त असे रंग असून ती या अवकाशयानावरील राल्फ, मल्टीस्पेक्ट्रल व्हिज्युअल इमेजिंग कॅमेऱ्याने टिपली आहेत. रंगांमुळे या उपग्रहाच्या पृष्ठभागावरील बदल अधोरेखित झाले आहेत. शॉरॉनच्या रंगीत छायाचित्रात प्लुटोच्या छायाचित्रांइतकी रंगांची विविधता नाही. उत्तर ध्रुव लाल रंगात दिसत असून त्याचे नामकरण मोर्डर मॅक्युला असे करण्यात आले आहे असे नासाने म्हटले आहे. शॉरॉन हा 1214 किलोमीटर व्यासाचा असून त्याच्या प्रतिमेचे विवर्तन 2.9 किलोमीटर इतके आहे म्हणजे इतक्या लहान भागातील तपशील त्यात दिसू शकतात. शॉरॉनचा व्यास हा प्लुटोच्या निम्मा असून तो ग्रहाच्या तुलनेत उपग्रहाचा आकार मोठा अशा प्रकारचा सौरमालेतील पहिलाच उपग्रह आहे. शॉरॉनच्या वरच्या भागात तुटलेल्या घळया दिसतात व व्हल्कन प्लॅनमची पठारे तळाकडच्या भागात दिसतात. शॉरॉनचा 1214 किलोमीटरचा भाग काही ठिकाणी 0.8 किलोमीटर विवर्तनाने दिसत आहे. दुसऱ्या एका छायाचित्रात श्ॉरॉनच्या विषुववृत्ताच्या उत्तरेकडे काही तडे गेलेले दिसतात व त्यात काही घळयांचा समावेश आहे. यातील मोठी घळी 1600 कि.मी रूंदीची असून शॉरॉनचा बराच भाग तिने व्यापला आहे.

  • 4 जी' च्या जाहिरातीमधून ग्राहकांची दिशाभूल :

ग्राहकांची दिशाभूल करणारी जाहिरात टेलिव्हीजनवर दाखविल्याप्रकरणी एअरटेल या टेलिकॉम सर्व्हिस देणाऱया कंपनीला अॅडव्हर्टाइझिंग स्टॅण्टर्ड काऊन्सिल ऑफ इंडियाने(एएससीआय) धक्का दिला आहे. एअरटेलने '4 जी' च्या जाहिरातीमधून ग्राहकांची दिशाभूल केल्याचा ठपका ठेवणारी नोटीस 'एएससीआय'ने कंपनीला बजावली आहे. तसेच ही जाहिरात येत्या 7 ऑक्टोबरपर्यंत मागे घेण्याचेही आदेश देण्यात आले आहेत. एअरटेलची '4 जी' सेवा दाखल झाल्याची माहिती देणाऱया जाहिरामधील प्रमुख मॉडेल असलेली मुलगी तिच्या मोबाईल इंटरनेट स्पीडपेक्षा अधिक जलदगतीने चित्रपट डाउनलोड करून दाखवले तर एअरटेल तुम्हाला मोबाइलचे बिल आयुष्यभर फुकटात देईल, असे इतरांना आव्हान करताना दिसते. शिवाय, जर इतर मोबाईल इंटरनेट सेवा पुरवणाऱयांचा इंटरनेट वेग एअरटेल '4 जी' हून अधिक वेगवान असेल, तर एअरटेल कंपनी आयुष्यभर मोबाइल बिल फ्री देईल. मात्र, ही जाहिरात प्रसारित करताना कोणतेही अस्वीकृती (डिस्क्लेमर) दिलेले नाही. त्यामुळे जाहिरात वादात अडकली आहे. दरम्‍यान, आम्‍ही केलेल्‍या दाव्‍यावर आम्‍ही ठाम असून, हे 'एएससीआय'ला पटवून दिले जाईल, असे एअरटेलने सांगितले आहे.

  • सानिया – मार्टिनाची विजयी घोडदौड सुरूच; मोसमातील सातवे विजेतेपद

सानिया आणि मार्टिना जोडीच्या यंदाच्या मोसमातील विजेतेपदांची संख्या सातवर पोहचली आहेराऊटर्स,सानिया मिर्झा आणि मार्टिना हिंगिस या जोडीने यंदाच्या मोसमातील विजयी घोडदौड सुरू ठेवली असून शनिवारी त्यांनी वुहान खुल्या टेनिस स्पर्धेच्या विजेतेपदावर कब्जा केला.सानिया मिर्झा आणि मार्टिना हिंगिस या जोडीने यंदाच्या मोसमातील विजयी घोडदौड सुरू ठेवली असून शनिवारी त्यांनी वुहान खुल्या टेनिस स्पर्धेच्या विजेतेपदावर कब्जा केला. त्यांनी अंतिम फेरीत रोमानियाच्या केमेलिया बेगू आणि मोनिका निकुलेस्कू यांच्यावर ६-२, ६-३ अशी सरळ सेटमध्ये मात केली. या विजयाबरोबरच सानिया आणि मार्टिना जोडीच्या यंदाच्या मोसमातील विजेतेपदांची संख्या सातवर पोहचली आहे. टेनिसमध्ये महिला दुहेरीच्या क्रमवारीत अव्वल स्थानावर असणाऱ्या सानिया-मार्टिनाने या स्पर्धेत एकही सेट गमावलेला नाही. यापूर्वी त्यांनी विम्बल्डन आणि अमेरिकन ओपन या ग्रँडस्लॅम स्पर्धांमध्ये विज


  • पुरस्कार:-


‘गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार:-


  1. राज्य सरकारतर्फे दरवर्षी देण्यात येणारा ‘गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार’ यावर्षी ज्येष्ठ संगीतकार प्रभाकर जोग यांना जाहीर झाला
  2. पाच लाख रुपये रोख, मानचिन्ह आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
  3. सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखालील समितीतील संगीतकार अजय व अतुल यांनी प्रभाकर जोग यांच्या नावाची शिफारस केली.
  4. संगीतकार, संगीत संयोजक आणि व्हायोलिन वादक म्हणून तब्बल सहा दशकांहून जास्त वष्रे कार्यरत असलेल्या प्रभाकर जोग यांचे मराठी आणि िहदी चित्रपट संगीताबरोबरच भावसंगीतातही मोलाचे योगदान आहे.
  5. वयाच्या बाराव्या वर्षी त्यांनी पुण्यात वाडय़ांमधून सव्वा रूपया आणि नारळाच्या बिदागीवर व्हायोलिन वादनाच्या कार्यक्रमांना सुरूवात केली. पुढे त्यांनी संगीतकार सुधीर फडके यांचे सहाय्यक म्हणून काम केले. ‘गीतरामायणा’तील गाण्यांना प्रभाकर जोग यांच्या व्हायोलिनचे सूर लाभले आहेत. बाबुजींबरोबर गीतरामायणाच्या पाचशे कार्यक्रमांना त्यांनी साथ दिली. ‘लपविलास तू हिरवा चाफा’ या गीतापासून जोग हे स्वतंत्र गीतकार म्हणून महाराष्ट्राला परिचित झाले. ‘जावई माझा भला’ हा त्यांचा पहिला मराठी चित्रपट आहे. त्यांनी एकूण २२ चित्रपटांना संगीत दिले.
  6. या अगोदर हा पुरस्कार खालील व्यक्ती ना हापुरस्कार देण्यात आला

२०१४:- कृष्णा कल्ले (जेष्ट गायिका)
२०१३:- अशोक पत्की
२०१२:- आनंदजी शहा
२०११:- यशवंत देव


  • चिकुनगुन्या, इबोला निदानासाठी सोपी चाचणी विकसित

चिकुनगुन्या व हेपॅटिटिस ‘सी’ विषाणू यांचे निदान डीएनए तंत्राने करणारी चाचणीशोधून काढण्यात आली काही मिनिटात निदानइबोलासारख्या रोगातील विषाणू तसेच चिकुनगुन्या व हेपॅटिटिस ‘सी’ विषाणू यांचे निदान डीएनए तंत्राने करणारी चाचणी शोधून काढण्यात आली आहे. विशेष म्हणजे चाचणीचा संच वापरण्यास सोपा व कुठेही नेता येण्यासारखा आहे. सान फ्रान्सिस्कोमधील कॅलिफोर्निया विद्यापीठातील संशोधकांनी ही चाचणीची पद्धत शोधली असून जिथे विषाणू-जिवाणू संसर्गाचे निदान करणाऱ्या प्रयोगशाळाही नाहीत तेथे ही चाचणी वरदान ठरणार आहे.इबोला झालेल्या दोन आफ्रिकी रुग्णांच्या रक्तातील नमुने घेऊन त्याच्या विषाणूच्या जनुकीय खुणा शोधून काढण्यात आल्या, त्यामुळे तशा खुणा दिसल्यास त्या व्यक्तीला इबोला झाल्याचे निदान पटकन करता येते. रक्ताचे नमुने घेतल्यानंतर त्यांची डीएनए क्रमवारी लावण्यात केवळ दहा मिनिटे लागतात. याचाच अर्थ जनुकीय पद्धतीने यात रोगांचे निदान होणार आहे. आतापर्यंत अशा जनुकीय रोगनिदान चाचण्या उपलब्ध नाहीत असे नाही, पण त्या विशिष्ट रोगजंतूंबाबतच उपयोगी आहेत. आता संशोधकांनी नवीन तंत्र शोधले असून त्यात संभाव्य रोगजंतूंचे जनुकीय नमुनेही आधीपासून माहिती असावे लागत नाहीत. त्यामुळे रक्तात कुठल्या रोगाचे जंतू आहेत याची जराशी माहिती नसतानाही या चाचणीत ते सांगता येते.या पद्धतीला मेटॅजिनॉमिक विश्लेषण असे म्हटले जाते. यात दृश्यीकरण आज्ञावली तयार केली असून लॅपटॉपवर आपण डीएनए क्रमवारीचा अर्थ लावू शकतो, त्याला नॅनोपोअर सिक्वेन्सिंग म्हणतात. हीच पद्धत चिकुनगुन्याचा विषाणू शोधण्यासाठी प्युटरेरिको येथे वापरण्यात आली. केवळ ताप व सांधेदुखी असलेल्या रुग्णांच्या रक्ताचे नमुने घेऊन रोगनिदान करता आले. हेपॅटिटिस सी या विषाणूचे निदानही या पद्धतीने करता येते. ४० मिनिटांत डीएनए क्रमवारी लावून लगेच निष्कर्ष काढता येतो.’
👉रोगनिदान यंत्राचे नाव : डीएनएनॅनोपोअर सिक्वेन्सर’  
👉आकार तळहातावर बसेल एवढा’
👉काही मिनिटात निदान

  • भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) अध्यक्षपदी पुन्हा मनोहर !

 नागपूर येथील ज्येष्ठ वकील शशांक मनोहर यांची रविवारी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. मनोहर यांच्या निवडीमुळे श्रीमंत क्रीडा संघटना असलेल्या बीसीसीआयमध्ये नव्या युगाची सुरुवात झाली आहे.नामांकन अर्ज सादर करण्याची मुदत शनिवारी संपल्यानंतर मनोहर यांचा एकमेव अर्ज होता. त्याच वेळी त्यांची निवड निश्चित झाली. रविवारी झालेल्या बीसीसीआयच्या सर्वसाधारण सभेत त्यावर शिक्कामोर्तब झाले. जगमोहन दालमिया यांच्या निधनानंतर बीसीसीआयच्या अध्यक्षपदासाठी पोटनिवडणूक घेणे आवश्यक होते. मनोहर यांच्या नावाचा प्रस्ताव दालमिया यांचे चिरंजीव अभिषेक यांनी ठेवला, हे विशेष. अभिषेक यांनी दालमिया यांचा कौटुंबिक क्लब एनसीसीचे प्रतिनिधित्व केले.या वेळी अध्यक्षपदासाठी प्रस्ताव ठेवण्याचा अधिकार पूर्व विभागाला होता. तेथील केवळ एका सूचकाची गरज असताना सर्व सहा संलग्न संघटनांनी सर्वसंमतीने मनोहर यांच्या उमेदवारीचे समर्थन केले. त्यामुळे बीसीसीआयच्या राजकारणात श्रीनिवासन यांची पकड सैल झाल्याची प्रचिती आली. श्रीनिवासन बैठकीमध्ये सहभागी झाले नाहीत. तामिळनाडू क्रिकेट संघटनेचे प्रतिनिधित्व पी.एस. रमन यांनी केले.

  • पॅरिसमध्ये डिसेंबरमध्ये हवामान बदल परिषद  :

पॅरिसमध्ये डिसेंबरमध्ये हवामान बदल परिषद होत असून त्यात नवा हवामान करार होण्याची शक्‍यता आहे. भारतातील हरितवायूंची उत्सर्जन तीव्रता 2030 पर्यंत 33 ते 35 टक्के कमी करण्याचे उद्दिष्ट आहे. अमेरिका आणि चीन या जगातील दोन मोठ्या प्रदूषकांच्या पंक्तीत भारताला बसविण्यात आले आहे. याचवेळी भारताने मोठ्या कंपन्यांना स्वच्छ आणि हरित तंत्रज्ञानासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून देण्यास सांगितले आहे. मोदी आणि ओबामा यांच्या तिसऱ्या भेटीत अनेक व्यापक विषयांवर चर्चा झाली. तसेच संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा समितीचे कायम सदस्यत्व मिळावे यासाठी जी-4 देशांच्या (जपान, भारत, जर्मनी, ब्राझील) बैठकीने योग्य वेळ साधली. निरीक्षकांच्या मते सुरक्षा समितीत सुधारणा नोव्हेंबरपासून सुरू होणे अपेक्षित आहे. सुरक्षा समितीत मतभेद होण्याआधी त्या सुधारणा करण्याची अमेरिकेची भूमिका असणार आहे. जर्मनी आणि जपान यांनी भारताला नकाराधिकाराशिवाय कायम सदस्यत्व दिले जाण्यास तयारी दर्शविली आहे. तसेच अमेरिकी संरक्षण सामग्री आणि शस्त्रास्त्रांवरील भर वाढविण्याचा निर्णय भारताने घेतला आहे. भारताला 22 'एएच-64 ई' अपाचे आणि 15 'सीएच-47 एफ' चिनूक हेलिकॉप्टर अमेरिकेकडून 2018 पर्यंत मिळणार आहेत. सध्याच्या एमआय- 35 आणि एम- 26] या रशियन हेलिकॉप्टरची जागा ते घेतील.

  • केंद्र सरकारचा भूसंपादन कायदा संमत :

केंद्र सरकारचा भूसंपादन कायदा संमत झाला असता तर नवीन कायद्यानुसार जमिनींचे व्यवहार करता आले असते. मात्र, नवा भूसंपादन कायदाच न आल्याने सर्वच राज्यांना मूळ कायद्याच्या आधारेच जमिनींचे व्यवहार करावे लागणार आहेत. संपूर्ण देशाचा विचार केला तर केवळ महाराष्ट्रातच शेतकऱ्यांच्या जमिनी खरेदी करताना त्याला बाजारभावाप्रमाणे पाचपट मोबदला देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

भूसंपादन :

शेतकऱ्यांना जमिनीचा संपूर्ण मोबदला एकरकमी देणे किंवा 50 टक्‍के मोबदला देऊन उर्वरित 50 टक्‍क्‍यांची रक्‍कम काही वर्षांच्या हप्त्याने देणे
 मोबदला ठरविण्यासाठी गठित केलेल्या समितीत जलसंपदा किंवा सार्वजनिक बांधकाम विभागांचे अधीक्षक अभियंता महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत.
 काही जिल्ह्यात अधीक्षक अभियंता दर्जाचे पद नसेल तर शेजारच्या जिल्ह्यातील अधिकारी जमिनीचे मूल्यांकन करणार
 जमिनीची कागदपत्रे तपासण्यासाठी सरकारी वकिलाची समितीत नियुक्ती.
 वैधानिक विकास मंडळाचे वकीलही काम पूर्ण करू शकतात

  • एफआयआर ऑनलाईन दाखल करण्याची सुविधा :

गुन्ह्याबाबतचा प्राथमिक माहिती अहवाल (एफआयआर) ऑनलाईन दाखल करण्याची सुविधा ओडिशामध्ये सुरु करण्यात आली असून मुख्यमंत्री नवीन पटनायईक यांनी शनिवारी या सेवेचे उद्‌घाटन केले आहे. केंद्र पुरस्कृत क्राइम ऍण्ड क्राईम ट्रॅकिंग नेटवर्क ऍण्ड सिस्टीम्स्‌ (सीसीटीएनएस) प्रकल्पांतर्गत "ई-एफआयआर"ची सुविधेचा प्रारंभ करण्यात आला आहे. या सुविधेमुळे राज्यातील तंत्रशिक्षितांना ऑनलाईन एफआयआर दाखल करता येणे शक्‍य होणार आहे. त्यासाठी राज्यातील 531 पोलिस स्थानकांचे संगणकीकरण करण्यात आले आहे.
 "www.citizenportal-op.gov.in" या संकेतस्थळावरून लोकांना तक्रारी दाखल करणे, एफआयआरची प्रतीची मागणी करणे, भाडेकरूची तपासणी करणे, परवान्यासाठी अर्ज, आंदोलन-अर्जासाठी परवाना, चारित्र्य प्रमाणपत्रासाठी अर्ज, कर्मचाऱ्यांची पडताळणी, हरवलेल्या व्यक्तींची तसेच वस्तूंची तक्रार दाखल करता येणार आहे.

  • राज्यातील सहा साहित्यिकांनी साहित्य पुरस्कार परत करण्याचा निर्णय :

विचारवंत व साहित्यिक डॉ. एम. एम. कलबुर्गी यांच्या मारेकऱ्यांना महिन्यानंतरही पकडण्यात अपयश आल्याच्या निषेधार्थ राज्यातील सहा साहित्यिकांनी "बीएमटीसी अरळु साहित्य पुरस्कार" परत करण्याचा निर्णय घेतला. वीरण्णा मडिवाळर (बेळगाव), टी. सतीश जवरेगौडा (मंड्या), संगमेश मेणसीनकाई (धारवाड), हणमंत हालिगेरी (बागलकोट), श्रीदेवी आलूर (बळ्ळारी) आणि चिदानंद साली (रायचूर) अशी त्या साहित्यिकांची नावे आहेत. डॉ. कलबुर्गी यांची 30 ऑगस्टला धारवाडमधील त्यांच्या राहत्या घरात हत्या झाली. गुन्हे अन्वेषण विभागाकडून त्यांच्या हत्येचा तपास सुरू आहे. कन्नड साहित्य परिषदेचे अध्यक्ष पुंडलिक हालंबी यांनी पुरस्कार परत करण्यात येत असल्याबद्दल जाहीर केले.

  • मॅजिक क्यूब नावाचा महासंगणक तयार :

पृथ्वीचे भवितव्य काय असेल तसेच हवामान व जैविक प्रणालींमध्ये काय बदल होतील या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी चीनने एक योजना आखली असून त्यात मॅजिक क्यूब नावाचा एक दोन मजली महासंगणक तयार करण्यात आला आहे. त्याचा खर्च 1.4 कोटी डॉलर्स इतका आहे. चीनच्या वैज्ञानिकांनी असे म्हटले आहे की, पृथ्वीवरील नैसर्गिक प्रणालीत होणारे बदल शोधले जाऊ शकतात किंवा त्याची नोंद करता येईल. अगदी ढगांच्या निर्मितीतील बदलांपासून सर्व बाबतीत आगामी काळात होणाऱ्या बदलांचे भाकित करता येतील. चायनीज अ‍ॅकॅडमी ऑफ सायन्सेसच्या या योजनेत अनेक संस्था सहभागी होत असून एक खास महासंगणक त्यासाठी तयार करण्यात आला आहे. अर्थ सिस्टीम न्युमरिकल सिम्युलेटर अँड सॉफ्टवेअरचे प्राथमिक रूप असलेल्या या महासंगणकाला सीएएस अर्थ सिस्टीम मॉडेल 1.0 असे नाव देण्यात आले आहे. त्याचे नाव ब्लू मॅजिक क्यूब असून तो उत्तर बीजिंगमध्ये झोंगुआनकुन सॉफ्टवेअर पार्कमध्ये ठेवण्यात आला आहे. त्यात 9 कोटी युआन म्हणजे 1.4 कोटी डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. त्याची क्षमता 1 पेंटाफ्लॉप असून तो चीनमधील दहा शक्तिमान महासंगणकांपैकी एक असणार आहे. त्याची साठवण क्षमता 5 पीबी आहे. आगामी प्रगत मॅजिक क्युबच्या एक दशांश आकाराचा हा महासंगणक आहे. सध्या त्याच्या मदतीने हवा प्रदूषण व हवामान अंदाज कमी काळाकरिता दिले जातील.

  • इंग्लंड राजदूतपदी अजय शर्मा यांची नियुक्ती :

इंग्लंड सरकारने कतारमधील राजदूतपदी भारतीय वंशाचे राजदूत अजय शर्मा यांची नियुक्ती केली आहे. शर्मा हे इराणमध्ये परराष्ट्र आणि राष्ट्रकुल विभागाचे प्रमुखपदी आहेत. नोव्हेंबरमध्ये ते कतारमधील जबाबदारी स्वीकारतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. निकोलस हॉप्टन यांची दुसऱ्या पदावर नियुक्ती करण्यात आल्याने शर्मा यांच्यावर ही जबाबदारी सोपविली आहे.

  • 👉🏼जर्मनीच्या चॅन्सेलर अँगेला मर्केल भारतात :

जर्मनीच्या चॅन्सेलर अँगेला मर्केल भारतात आल्या असून त्यांच्यासमवेच अनेक वरिष्ठ मंत्री व अधिकारी असणार आहेत. व्यापार व सुरक्षा या मुद्दय़ांवर चर्चा करण्यासाठी येत असून दोन्ही देशांच्या मंत्रिमंडळाची संयुक्त बैठक होत आहे. मर्केल व पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सोमवारी संयुक्तपणे आंतर सरकारी सल्लामसलत बैठकीचे नेतृत्व करतील. त्या बंगळुरू येथील रॉबर्ट बॉश्च कंपनीला भेट देणार असून त्यावेळी मोदी त्यांच्यासमवेत असणार आहेत. भारत व जर्मनीच्या उद्योजकांची एकत्र बैठक बंगळुरू येथे होणार आहे.

  • 🎯व्याघ्रदूत अमिताभ बच्चन यांच्या हस्ते सन्मान :

वन्यजीवांचे संरक्षण, वनगुन्ह्यांचा तपास आदी कार्याचा गौरव म्हणून वनविभागातील अधिकारी, कर्मचारी आणि संस्था प्रतिनिधींना व्याघ्रदूत अमिताभ बच्चन यांच्या हस्ते सन्मानित केले जाणार आहे. येत्या मंगळवारी बोरीवली (मुंबई) येथे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात हा कार्यक्रम घेतला जाणार आहे. विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी वनविभागाने पुरस्कार जाहीर केले आहेत. शहापूर इको विकास समिती व राखीव व्याघ्र प्रकल्प अमरावतीचे अध्यक्ष व्यंकट मुडे व सचिव प्रतिभा तुरक आणि बफर डिव्हिजन चंद्रपूरचे अध्यक्ष रमेश गेडाम आणि सचिव डी.एम. कुळमेथे यांना पुरस्कृत केले जाणार आहे. 'वन्यजीव व्यवस्थापन-2015' या विषयात वनपरिक्षेत्र अधिकारी अभिजित माने यांचा सन्मान केला जाणार आहे.

  • 'चेरॉन' या सर्वात मोठ्या चंद्राची छायाचित्रे :

नासाच्या न्यू होरायझन यानाने प्लुटोच्या 'चेरॉन' या सर्वात मोठ्या चंद्राची आजवरची सर्वात सुस्पष्ट छायाचित्रे टिपली आहेत. त्यामुळे प्लुटोच्या अनेक भूगर्भीय रहस्यांचा उलगडा होण्यास मदत होणार असल्याचा आणि प्लुटोच्या गहन आणि भीषण इतिहासावर प्रकाश पडणार असल्याचा दावा 'नासा'तर्फे करण्यात आला आहे. प्लुटो या सूर्यमालेतील ग्रहाबद्दल फारशी माहिती नाही. प्लुटोचा 'चेरॉन' हा सर्वात मोठा चंद्र प्लुटोच्या व्यासाच्या निम्म्या आकाराचा येतो. 'चेरॉन' हा चंद्र केवळ पर्वतीय आणि ओबडधोबड असल्याचा समज होता पण तो पर्वतीय, उंच शिखरे, सपाट भूप्रदेश आणि भूपृष्ठावर वेगवेगळे रंग असणारा असल्याचे नव्या चित्रावरून दिसून येते. 'न्यू होरायझन' यानाने 14 जुलै रोजी प्लुटोभोवती फेरी मारली आणि त्यावेळी टिपलेली छायाचित्रे 21सप्टेंबर रोजी पाठविली. त्यात या चंद्राच्या मध्यवर्ती भागात मोठ्या प्रमाणावर ओबडधोबड, पर्वतीय भाग दिसतो.

  • जागतिक बॅंक अहवाल:-

अति दारिद्र्यातील नागरिकांची संख्या प्रथमच 2015 मध्ये जागतिक लोकसंख्येच्या 10% पेक्षा कमी झाली आहे, असे जागतिक बॅंकेने आपल्या अहवालात स्पष्ट केले

जागतिक बँकेने गरिबी मोजण्याची सुधारित व्याख्या तयार केली आहे. जागतिक बँकेने यापूर्वी दिवसाला 1.25 डॉलरच्या (75 रुपये) खाली उदरनिर्वाह करणार्‍या लोकांचा समावेश ‘अति दारिद्र्याखालील व्यक्ती‘ असा केला होता. आता त्यात बदल करण्यात आला आहे. आता 1.90 डॉलरच्या खाली दारिद्र्यरेषा निश्चित करण्यात आली

जागतिक बँकेने निर्धरित केलेल्या नवीन दारिद्र्यरेषेनुसार, 2015 मध्ये 70.2 कोटी लोक म्हणजे जागतिक लोकसंख्येच्या 9.6% लोकसंख्या ‘अति दारिद्र्यात‘ म्हणजे त्यांचा समावेश दारिद्र्यरेषेखाली होतो.

2012 मध्ये 90.2 कोटी लोक (12.8%) दारिद्र्यरेषेखाली जीवन जगत होते.

गेल्या महिन्यात झालेल्या युनायटेड नेशन्सच्या बैठकीत 193 देशांनी 2030 गरिबी समाप्त करण्याचे लक्ष्य ठेवले आहे.


  • भारतीय लेखा आणि लेखापरीक्षण सेवेतल्या 1983 च्या तुकडीतल्या मिनाक्षी मिश्रा यांनी महाराष्ट्राच्या मुख्य महालेखापाल (लेखापरीक्षण) म्हणून पदभार स्वीकारला. यापूर्वी या पदावर माला सिन्हा होत्या.त्यांनी महालेखापाल दिल्ली, व्यावसायिक लेखाच्या मुख्य संचालक आणि पदसिध्द सदस्य, लेखापरीक्षण मंडळ, मुख्य लेखापरीक्षण संचालक (संरक्षण) आणि मुख्य लेखापरीक्षण संचालक (रेल्वे) इ. संयुक्त राष्ट्रांच्या सायप्रसमधल्या शांतीसेनेसाठी लेखापरीक्षण पथकाचे नेतृत्व केले आहे.तसेच जागतिक आरोग्य संघटनेच्या इजिप्त आणि येमेनमधल्या लेखापरीक्षण पथकाचे नेतृत्व त्यांनी केले आहे. आताच्या नियुक्तीपूर्वी त्यांनी मुंबईच्या मुख्य महालेखापाल म्हणून काम पाहिले आहे.



  •  भारत‬-जर्मनी दरम्यानचे अठरा करार:--



  1. भारतात एक परकी भाषा म्हणून जर्मनला आणि जर्मनीत आधुनिक भारतीय भाषांना चालना देणे
  2. विकास सहकार्यासंबंधीच्या वाटाघाटींच्या संक्षिप्त नोंदी ठेवणे
  3. भारत-जर्मनी दरम्यान सौर ऊर्जा भागीदारी-
  4. कौशल्य विकास आणि व्यावसायिक शिक्षण तसेच प्रशिक्षण सहकार्य
  5. संरक्षण सहकार्य- नागरी उड्डाण सुरक्षा-
  6. आपत्ती व्यवस्थापन- कृषी अभ्यासात सहकार्य
  7. नोबेल विजेत्यांच्या लिंडाऊ परिषदेसाठी नैसर्गिक विज्ञानातील भारतीय युवा शास्त्रज्ञांच्या सहभागाला पाठिंबा देणे
  8. भारत-जर्मनी विज्ञान आणि तंत्रज्ञान केंद्राच्या कालावधीत वाढ करणे
  9. उच्च शिक्षणात भारत-जर्मनी भागीदारी
  10. वनस्पती संरक्षण उत्पादने
  11. रेल्वेच्या क्षेत्रात विकासासाठी सहकार्य
  12. भारतात जर्मन कंपन्यांसाठी जलदगती प्रणाली उभारणे
  13. भारतीय कंपन्यांमधील अधिकारी आणि कनिष्ठ अधिकाऱ्यांच्या प्रगत प्रशिक्षणाच्या क्षेत्रात सहकार्य
  14. केंद्रीय जोखीम मूल्यांकन संस्था तसेच भारतीय अन्न सुरक्षा आणि दर्जा प्राधिकरणादरम्यान अन्न सुरक्षेत सहकार्य
  15. भारतीय अन्न सुरक्षा आणि दर्जा प्राधिकरण तसेच केंद्रीयग्राहक संरक्षण आणि अन्न सुरक्षा कार्यालयादरम्यान अन्न सुरक्षेत सहकार्य

  • जर्मनी व भारत यांच्यात समझोता करारांवर स्वाक्षऱ्या  :
जर्मन कंपन्यांच्या उद्योगांना ताबडतोब मान्यता व 1 अब्ज युरोचा सौरऊर्जा निधी यासह एकूण 18 करारांवर जर्मनी व भारत यांच्यात समझोता करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी व जर्मनीच्या चॅन्सेलर अँगेला मर्केल यांच्यात चर्चा झाल्यानंतर हे करार करण्यात आले. भारत-जर्मनी यांच्यात आंतर सरकारी सल्लामसलतीच्या तिसऱ्या शिखर बैठकीत मोदी व मर्केल यांनी संरक्षण, सुरक्षा, गुप्तचर, रेल्वे, व्यापार, गुंतवणूक, स्वच्छ ऊर्जा या विषयांवर चर्चा केली. जर्मनीत आधुनिक भारतीय भाषांना उत्तेजन, भारतात परदेशी भाषा शिक्षणात जर्मन भाषेला मोठे स्थान देणे याबाबतही करार झाले. तसेच संरक्षण उत्पादन तंत्रज्ञान, गुप्तचर माहिती व दहशतवाद, मूलतत्त्ववादाचा मुकाबला या मुद्दय़ांवर दोन्ही देश सहकार्य करणार आहेत.


  • भारतीय तरुणाने मोडला चिनी युवकाचा गेल्या दहा वर्षांचा विक्रम :

गणितातील 'पाय'च्या किमतीतील दशांशानंतरच्या 70 हजार स्थानांवरील आकडे तोंडपाठ करणाऱ्या 21 वर्षे वयाच्या एका भारतीय तरुणाने चिनी युवकाचा गेल्या दहा वर्षांचा विक्रम मोडून गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये स्थान मिळवले आहे. राजस्थानच्या सवाई माधोपूर जिल्ह्य़ातील मोहोचा खेडय़ात राहणारा राजीव मीणा याने गेल्या मार्च महिन्यात 'पाय'च्या किमतीच्या दशांशानंतरचे 70 हजार आकडे 9 तास 27 मिनिटांत म्हणून दाखवत हा रेकॉर्ड स्थापित केला होता. यासाठी त्याला गिनीज बुकचे स्मरणशक्तीसाठीचे प्रमाणपत्र 1 ऑक्टोबरला देण्यात आले. पायची लक्षात ठेवलेली दशांशानंतरची सर्वाधिक स्थाने 70 हजार असून, भारतातील वेल्लोरच्या व्हीआयटी विद्यापीठात शिकणाऱ्या राजीव मीणा याने हे 21 मार्च 2015 रोजी हे साध्य केले आहे. हे आकडे म्हणण्यासाठी लागलेले सुमारे 10 तास तो डोळ्यांवर पट्टी बांधून होता.

  • स्मार्ट सिटी"च्या आराखड्यातील लोकसहभागाचा दुसरा टप्पा सुरू :

मनामनांतील स्मार्ट शहराची संकल्पना साकारण्यासाठी तयार करण्यात येत असलेल्या "स्मार्ट सिटी"च्या आराखड्यातील लोकसहभागाचा दुसरा टप्पा आजपासून( ५ ऑक्ट ) सुरू होत आहे. वाहतूक, पाणी, घनकचरा, पर्यावरण, सुरक्षितता आदी विषयांवर ऑनलाइन पद्धतीने पुणेकरांचा कौल घेऊन शहर "नंबर वन" करण्यासाठी महापालिका पावले टाकणार आहे. सुमारे सव्वातीन लाखांहून अधिक कुटुंबांनी त्यात "स्मार्ट सिटी"ची कल्पना कशी असावी, हे स्पष्ट करणारे फॉर्म भरून महापालिकेला दिले. या सर्वेक्षणातून वाहतूक आणि दळणवळण, पाणी व मलनिस्सारण, घनकचरा व्यवस्थापन, पर्यावरण, सुरक्षितता, ऊर्जा व वीजपुरवठा हे विभाग स्मार्ट सिटीसाठी अत्यावश्‍यक असल्याचे पुणेकरांनी म्हटले आहे. राष्ट्रीय सेवा योजनेतील युवक, बचत गटांच्या समूह संघटिका, सिंबायोसिससह अन्य महाविद्यालयांतील विद्यार्थी आणि महापालिका कर्मचारी आदी सुमारे 800 जण या सर्वेक्षणात सहभागी होणार आहेत. त्याशिवाय नागरिकांना ते राहत असलेल्या भागात नजीकच्या महा-ई-सेवा केंद्रातील संगणकांवर, महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयांतही www.punesmartcity.in या संकेतस्थळावर मत व्यक्त करता येणार आहे. ऑनलाइन सर्वेक्षणाची मोहीम 12 ऑक्‍टोबरपर्यंत सुरू राहणार आहे.

  • किसान ऍप" हा नवा प्रकल्प चाचणी तत्त्वावर सुरू :

दुष्काळ व गारपिटीच्या अस्मानी संकटाने भरडलेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या कृषी विम्याची रक्कम लवकरात लवकर व पारदर्शीपणे मिळावी, यासाठी केंद्र सरकारने नुकसानाचे शास्त्रशुद्ध मूल्यमापन करणारा "किसान ऍप" हा नवा प्रकल्प चाचणी तत्त्वावर सुरू केला. याच्या पहिल्या चार लाभार्थी जिल्ह्यांत यवतमाळचा समावेश आहे, असे केंद्रीय कृषी राज्यमंत्री संजीवकुमार बालियान यांनी आज सांगितले. हे नवे ऍप अँड्रॉइड प्रणालीने कार्यरत राहील. या नव्या ऍपमुळे नैसर्गिक संकटात नुकसान सोसावे लागलेल्या व अनेकदा मरण कवटाळणाऱ्या शेतकऱ्याला विमा रकमेची भरपाई त्वरित; म्हणजे शक्‍यतो त्याच हंगामात मिळू शकेल. हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो), नॅशनल क्रॉप फोरकास्ट सेंटर, भारतीय हवामानशास्त्र विभाग, केंद्र व राज्यांची कृषी मंत्रालये व कृषी विभाग, रिमोट सेन्सिंग सेंटर्स, कृषी व अन्नसुरक्षा विभाग (सीसीएएफएस) या विभागांच्या मार्फत संयुक्तरीत्या राबविण्यात येईल. हे किसान ऍप शेतकरीही आपल्या मोबाईलवर डाउनलोड करू शकतील. सरकारने चार लाभार्थी जिल्हे आज जाहीर केले असले तरी पहिल्या टप्प्यात सरकारने आठ जिल्हे निवडले असून, घोषणा न झालेल्यांत यवतमाळसह राज्यातील नगर व सोलापूर जिल्ह्यांचाही समावेश करण्यात आल्याचे समजते.

  • मुख्यमंत्री फडणवीस हॉनररी डॉक्टरेट या पदवीने सन्मान करणार :

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जपानमधील ओसाका सिटी विद्यापीठ हॉनररी डॉक्टरेट या पदवीने सन्मान करणार आहे. हा या विद्यापीठाचा सर्वोच्च सन्मान असून या पुरस्काराने गौरवण्यात येणारे फडणवीस हे पहिले भारतीय आहेत. ओसामा सिटी विद्यापीठाला 120 वर्षांची परंपरा असून आत्तापर्यंत या विद्यापीठाने जगातील अवघ्या 10 व्यक्तिंना हॉनररी डॉक्टरेट पदवीने गौरवलेले आहे. महाराष्ट्रात सामाजिक व आर्थिक विकासासाठी सुधारणांची प्रक्रिया सुरू करण्याचे काम फडणवीसांनी सुरू केल्यामुळे त्यांना गौरवण्यात येत असल्याचे विद्यापीठाने म्हटले आहे. विद्यापीठाने हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी तसेच विद्यापीठामध्ये आपले विचार मांडण्यासाठी आणि विद्यार्थी व जपानी नागरिकांशी संवाद साधण्यासाठी आमंत्रित केले आहे.

  • भोजन योजना

केंद्र सरकारने ‘राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा, २०१३’ नुसार मध्यान्ह भोजन योजनेबाबत काही नवीन नियम बनवले आहेत.

मध्यान्ह भोजन योजना : नवीन नियम :--

  1. ६-१४ वयोगटातील सर्व मुलांना (इ.१ली ते इ.८वी) शिजवलेले पौष्टिक जेवण दिले पाहिजे.
  2. मध्यान्ह भोजनाची स्वयंपाकगृहे स्वच्छ असावीत.
  3. सलग ३ दिवस किंवा महिन्यातून ५ दिवस जर मध्यान्ह भोजन मुलांना दिले गेले नाही, संबंधितांवर कारवाई केली जाईल.
  4. मध्यान्ह भोजन योजनेचा निधी संपल्यास शाळा इतर निधी याकामी वापरू शकते.
  5. काही कारणास्तव मध्यान्ह भोजन मुलांना मिळाले नाही, तर या मुलाना ‘अन्न सुरक्षा भत्ता’ देईल.
  6. भोजनाची गुणवत्ता महिन्याच्या महिन्याला यादृच्छिक (randomly) मान्यताप्राप्त प्रयोगशाळेत तपासली जाईल.


  •  कॅम्पबेल, ओमुरा, तू यांना वैद्यकशास्त्राचे नोबेल:-
मानवी शरीरामध्ये असलेल्या परजीवी कृमींवर उपचार शोधून काढणारे आर्यलडचे विल्यम कॅम्पबेल, जपानचे सातोशी ओमुरा  आणि  चीनच्या श्रीमती योउयू तू यांना वैद्यकशास्त्राचे नोबेल यंदाच्या वर्षी (२०१५) जाहीर करण्यात आले आहे.

साडेनऊ लाख अमेरिकी डॉलर आणि सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

ओमुरा आणि कॅम्पबेल यांनी परजीवींमार्फत होणारे संक्रमण रोखण्यासाठी उपचारपद्धती विकसित केली, तर युयु तू यांनी मलेरियावरील नव्या उपचारांवर संशोधन केले आहे.

युयु तू:


  • मलेरियासाठी तयार करण्यात आलेल्या आर्टेमिसाईनिन आणि हायड्रोआर्टेमिसाईनिन या औषधांची निर्मिती युयु तू यांनी केली आहे. या औषधांमुळे दक्षिण आशिया, आफ्रिका आणि दक्षिण अमेरिकेतील लोकांच्या आरोग्यात प्रचंड सुधारणा झाली. विसाव्या शतकातील महत्त्वाच्या संशोधनांमध्ये तू यांच्या संशोधनाचा समावेश केला जातो. यासाठीच त्यांना नोबेलने सन्मानित करण्यात येत आहे. तू यांना त्यांनी केलेल्या कामाबद्दल 2011मध्ये लॅस्कर पुरस्कारही देण्यात आला होता. विशेष म्हणजे चीनमधील पारंपरिक औषधी वनस्पतींच्या आधाराने त्यांनी संशोधन केले.
  • चिनी संशोधक असलेल्या  यांनी बीजिंग वैद्यकीय विद्यापीठातून 1955मध्ये पदवी मिळविली. त्या 1965पासून 1978पर्यंत चायना ऍकॅडमी ऑफ ट्रॅडिशनल चायनीज मेडिसिनमध्ये सहायक प्राध्यापक होत्या. त्यानंतर 2000पासून त्या त्याच संस्थेत मुख्य प्राध्यापक आहेत.


ओमुरा:-


  • ओमुरा हे बायोकेमिस्ट आहेत. त्यांनी व कॅम्पबेल यांनी परजीवींपासून होणारे संक्रमण रोखण्यासाठी औषधांमध्ये सूक्ष्मजीवांचा (मायक्रोऑरग्यानिजम) वापर करण्याची पद्धती विकसित केली. "रिव्हर ब्लाइंडनेस‘ (नदी पात्रात वाढणाऱ्या काळ्या माशा चावल्याने येऊ शकणारे अंधत्व) आणि "लिंफॅटिक फिलारिऍसिस‘ या दोन रोगांवरील औषधे तयार करण्यासाठीची पद्धती त्यांनी विकसित केली.
  • टोकियो विद्यापीठातून फार्मास्युटिकल सायन्समध्ये पीएचडी मिळविणारे सतोशी ओमुरा यांनी 1965 ते 1971 या कालावधीत किटासातो इन्स्टिट्यूटमध्ये काम केले, तसेच किटासातो विद्यापीठात 1975 ते 2007पर्यंत प्राध्यापकपदी काम केले. सध्या ते तेथेच मानद प्राध्यापक आहेत


 कॅम्पबेल:-


  • कॅम्पबेल यांचा जन्म 1930मध्ये झाला. त्यांनी ट्रिनिटी कॉलेजमधून "बीए‘ची पदवी मिळविली. विस्कॉन्सिन्स विद्यापीठातून त्यांनी 1957मध्ये "पीएचडी‘ पूर्ण केली. त्यानंतर त्यांनी 1957 ते 1990 या कालावधीत मर्क इन्स्टिट्यूट फॉर थेरॅप्युटिक रिसर्चमध्ये काम केले. सध्या ते अमेरिकेतील ड्रू विद्यापीठात "रिसर्च फेलो एमिरेट्‌स‘ आहेत.



  • थोडक्यात महत्वाचे:-


  1. महात्मा गांधी हे प्रेरणास्थान असल्याचा उल्लेख करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गांधी जयंतीच्या पार्श्वभूमीवर पर्यावरण संरक्षण आणि ऊर्जा संवर्धनाचा नारा दिला.
  2. भारताच्या हीना सिद्धूने आठव्या आशियाई एअरगन स्पर्धेत दहा मीटर पिस्तूल स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले तर श्‍वेता सिंगने रौप्यपदक जिंकले.
  3. रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या कर्णधारपदी यष्टिरक्षक-फलंदाज रोहित मोटवानी याची फेरनिवड
  4. भारताच्या युकी भांब्रीला तैवान एटीपी चॅलेंजर स्पर्धेत उपविजेतेपद मिळाले. चुरशीच्या अंतिम सामन्यात त्याला दक्षिण कोरियाच्या हायेऑन चुंगने 7-5, 6-4 असे हरविल
  5. भारताचा "गोल्डन फिंगर' अभिनव बिंद्रा याने सर्वोत्तम कामगिरी करत आशियाई एअर गन अजिंक्‍यपद स्पर्धेत दहा मीटर एअर रायफल प्रकारात सुवर्णपदकाची कमाई केली
  6. भारताने 16व्या आशियाई रोईंग स्पर्धेत पाच रौप्य आणि दोन ब्रॉंझ अशी एकूण सात पदके मिळविली.
  7.  विविध वयोगटांच्या स्पर्धामध्ये वय चोरी केल्याप्रकरणी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) दिल्ली जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या (डीडीसीए) २२ खेळाडूंवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला
  8. शॉटगन, रायफल व पिस्तूल या खेळांची जागतिक नेमबाजी स्पर्धेचे यजमानपद २०१७ मध्ये मिळणार आहे. तसेच २०१८च्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धाही आयोजित करण्याचा प्रस्ताव भारतातर्फे सादर
  9. शारदा समूहामार्फत करण्यात आलेल्या फसवणुकीनंतर गुंतवणूकदारांची रक्कम अदा करता येण्यासाठी सेबीने संबंधित मालमत्तांवर सोमवारी टाच आणली.
  10. भारत आणि चीनदरम्यान सीमा अधिकारांची बैठक तवाम्ग जिल्ह्यातील बुमला येथे आयोजित करण्यात आली
  11. केंद्र सरकारने सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देत विनाअनुदानित सिलिंडरच्या दरात 44.50 रुपयांनी कपात केली
  12. अनेक वर्षांपासून बंद पडलेला दाभोळ येथील वीजप्रकल्प एक नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. या प्रकल्पामधून 500 मेगावॉट वीज उत्पादन होईल.
  13. गोंदिया जिल्ह्यातील नवेगावबांध परिसरात भारतातील हेमीडॅक्‍टीलस कुळातील पालीच्या नवीन प्रजातीचा शोध लागला आहे. सध्या भारतात २६ जातीच्या पालींची नोंद असून हेमचंद्रई या जातीच्या पालीच्या शोधाने ही संख्या आता २७ वर पोहोचली
  14. नव्याने शासन सेवेत रुजू झालेल्या महिला कर्मचाऱ्यांना प्रसूती रजा देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतला.
  15. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रगण्य "मायक्रोसॉफ्ट इंडिया'ने भारतात स्थानिक केंद्रांमार्फत व्यावसायिक ऍझ्युअर क्‍लाऊड सेवा सुरू केली
  16. संचालक मंडळाच्या भ्रष्टाचाराच्या आरोपावरून गाजलेल्या महानंद डेअरीचे संचालक मंडळ अखेर बरखास्त करण्यात आले असून, या ठिकाणी आता प्रशासकाची नियुक्‍ती झाल्याचे आदेश राज्य सरकारने काढले.
  17. विश्वभारती विद्यापीठाचे कुलपती सुशांत दत्तगुप्ता यांनी दिला राजीनामा, आर्थिक गैरव्यवहाराचा ठपका आल्यामुळे दिला राजीनामा
  18. ICC रँकिंगमध्ये भारतीय महिला क्रिकेट संघ चौथ्या स्थानावर
  19. टाइम राउटरच्या रेटिंगनुसार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ देशात तिस-या स्थानावर, शिकवण्याच्या बाबतीत विद्यापीठ जगात १९१ व्या स्थानावर
  20. काळा पैसा जाहीर करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या एक खिडकी योजनेच्या माध्यमातून सरकारी तिजोरीत ३,७७० कोटी जमा झाले
  21. भारतातील विशिष्ट प्रजातीच्या बंगाली वाघांची संख्या घटत चालली असून त्यांचे संरक्षण व शोध यासाठी भारताला अत्याधुनिक तंत्रज्ञान पुरवण्याची तयारी अमेरिकेने दर्शवली
  22. Sircilla आणि Siddipet हे दोन मतदारसंघ भारतातील 100 टक्के खुले मलविसर्जन मुक्त मतदारसंघ म्हणून 2 ऑक्टोर रोजी घोषित करण्यात आले.हे दोन मतदारसंघां कोणत्या राज्यात आहे :- तेलंगणा
  23. कोणत्या राज्याने दुष्काळावर मात करण्यासाटी 'दुष्काळ कर' लावला आहे:- महाराष्ट्र
  24. ऑक्टोबर 2015 मध्ये, कोणत्या देशाचा राष्ट्र ध्वज सर्व प्रथम संयुक्त राष्ट्र संघात फडकवीण्यात आला:- पॅलेस्टाईन
  25. अलीकडेच मरण पावले ब्रायन Friel हे एक महान नाटककार कोणत्या देशाचे होते:- आयर्लंड
  26. (ब्रायन Friel हे एक आयरिश नाटककार, लेखक आणि दिग्दर्शक होते.त्यांच्या सहा दशकाच्या कारकिर्दीत त्यानी तीस लोकनाट्ये लिहिलेली आहे)
  27. शांघाय चा सर्वोच्य समजला जाणारा "मॅग्नोलिया गोल्ड " हा पुरस्कार प्राप्त करणारा पहिला भारतीय कोण?:- रंगराजन वेलमोरर.
  28. अमेरिकेचा प्रसिद्ध जलतरणपटू मायकेल फेल्प्स याने भारतातील कोणत्या शहरात पहिले swim clinic सुरु केले :- बंगळुरू
  29. अलीकडेच कोणत्या राज्यातील प्राणिसंग्रहालयात हरीण पार्क्स मध्ये वन्य प्राणी दत्तक योजना सुरू केली आहे :- हरियाना
  30. २०१८ मध्ये जी:-२० राष्ट्राची शिखर परीषद भारतातील कोणत्या शहरात होणार आहे :- नवी दिल्ली

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा