Post views: counter

ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे काय ? Global Warming


                          ग्लोबल वॉर्मिंग किंवा जागतिक तामपानवाढीचे दृश्य परिणाम आता दिसू लागले आहेत. त्या परिणामांमागे नेमकं आहे तरी काय याचा सांगोपांग आढावा. सोबत , पर्यावरणविषयक कामाबद्दल नोबेल पारितोषिक मिळविणारे अल गोर यांच्या कार्याचा आढावा...
                         गेली काही वर्ष दर उन्हाळ्यात तापमानाचे आकडे वृत्तपत्रे छापतात. दूरचित्रवाणीवर सुमारे ३५ सेकंद एखादा तज्ज्ञ त्याबद्दल काहीतरी मत व्यक्त करतो. त्याला मध्येच तोडून जाहिराती सुरू होतात आणि मग दूरचित्रवाणी निवेदक जागतिक तापमानवाढीचा हा परिणाम असल्याचं सांगतो. मुंबईत किंवा राजस्थानात धुंवाधार पाऊस पडतो , लगेच त्याचा संबंध जागतिक
तापमानवाढीशी जोडला जातो. न्यू अॅलिर्अन्स सागरी वावटळीने आलेल्या प्रलयात बुडतं. अमरनाथला शिवलिंग तयार होत नाही , हिमालयातील बर्फ वितळून ३०-४० वर्षांपूवीर् हरवलेल्या गिर्यारोहकांचे मृतदेह सापडतात. त्याचा संबंधही जागतिक तापमान वाढीशी जोडला जातो. पूवीर् भारतात काहीही घडलं की , त्यात परकीय शक्तींचा हात आहे असं जाहीर केलं जायचं. तसंच आजकाल जगातल्या कुठल्याही नैसगिर्क आपत्तीचा संबंध जागतिक तापमानवाढीशी जोडला जातो.
                       

जागतिक तापमानवाढ किंवा ' ग्लोबल वॉर्मिंग ' म्हणजे नक्की काय आहे ?

                         दरवर्षी उन्हाळ्यात तापमान वाढतं आणि हिवाळ्यात ते कमी होतं. या प्रकाराला ग्लोबल वॉर्मिंग किंवा ग्लोबल कूलिंग का म्हणत नाहीत ? याचं उत्तर देताना पृथ्वीचा आस २३.५ अंश कललेला असल्यामुळं ऋतू कसे होतात , हे शालेय ज्ञान सर्व वाचकांना आहे , हे आपण गृहीत धरूया. या प्रकारे दरवषीर्च उन्हाळा आणि हिवाळा हे ऋतू होतात. (आपल्याकडे आणि बऱ्याच पूर्व आशियाई देशांत पावसाचा वेगळा ऋतू असतो. प्रत्यक्षात तो उन्हाळ्याचा आणि पानगळीच्या ऋतूचा भाग असतो.) आपल्याकडे जेव्हा उन्हाळा असतो , तेव्हा दक्षिण गोलार्धात हिवाळा असतो आणि आपल्याकडे हिवाळा असतो , तेव्हा दक्षिण गोलार्धात उन्हाळा असतो.
                        जेव्हा पृथ्वीचं सरासरी तापमान वाढतंय असं म्हटलं जातं , तेव्हा भूपृष्ठावरील वातावरणीय तापमानाबद्दल आपण बोलत असतो. सामान्यपणे पृथ्वीवरील उन्हाळी सरासरी तापमानाचा आकडा पूवीर्च्या वषीर्च्या सरासरी तापमानापेक्षा जास्त असतो आणि हिवाळ्यातील सरासरी तापमानामध्ये वाढ होऊन तोही आकडा वाढलेला असतो. म्हणजे स्वेटर कमी दिवस वापरावे लागलेले असतात , तेव्हाच पृथ्वीचं त्या वषीर्चं सरासरी तापमान पूवीर्पेक्षा जास्त होतं असं म्हटलं जातं.
                        काही वर्षांपूवीर् जेव्हा प्रथम पृथ्वीचं सरासरी तापमान वाढतंय असं म्हटलं गेलं , तेव्हा तिकडे कुणी फारसं लक्ष दिलं नव्हतं. ओझोनथर विसविशीत झालाय किंवा ओझोनथराला छिद पडलंय असं म्हटलं गेलं , तेव्हाही तिकडे कुणी लक्ष दिलं नव्हतं. गेली काही वर्षं डिसेंबर-जानेवारीतल्या बातम्या बघितल्या , तर सरतं वर्ष गेेल्या शंभर वर्षांतील सर्वाधिक उष्ण तापमानाचं वर्ष , अशा स्वरूपाच्या बातम्या आपल्याला वाचायला मिळतात. कुठल्यातरी शास्त्रज्ञांच्या गटाचं किंवा एखाद्या प्रयोगशाळेचं हे मत असतं.
खरं तर जागतिक तापमानवाढीचे दुष्परिणाम तुम्हा-आम्हाला सर्वाधिक भोगोवे लागणार आहेत. तेव्हा आपण ठरवलं तर आपणच सरकारचं डोकं ठिकाणावर आणू शकू ; पण त्यासाठी आपल्याला आधी जागतिक तापमानवाढीची कारणं समजून घ्यायला हवीतच ; पण माणूसच याला कसा जबाबदार आहे , तेही समजून घ्यावं लागेल. मगच आपण ही तापमानवाढ रोखण्याचे प्रयत्न करू शकू.
                         आपल्यापैकी बरेचजण कुठल्याना कुठल्या उद्यानात गेले असतील. बहुतेक मोठ्या वनस्पती-उद्यानांमध्ये आणि शेतकी महाविद्यालयांत , तसंच विद्यापीठांच्या वनस्पतीशास्त्र विभागांमध्ये आपल्याला हरितगृह किंवा काचेचं घर बघायला मिळतं. याचं छप्पर हिरव्या काचांचं असतं. या घरात अनेक अनोख्या वनस्पती जोमानं वाढत असतात. त्या काचगृहात सूर्यकिरण सहजपणे प्रवेश करू शकतात. त्यामुळं या काचगृहातील हवा तापते ; पण या तापलेल्या हवेतील उष्णता मात्र या काचेतून बाहेर जाऊ शकत नाही. याचा फायदा घेऊन अगदी थंड प्रदेशातसुद्धा विषुववृत्तीय दुमिर्ळ वनस्पती वाढवणं सहज शक्य होतं.
                        या काचगृह किंवा हरितगृहाचा आणि जागतिक तापमानवाढीचा संबंध काय , असं आपल्याला वाटेल. आपण कार्बनी इंधन जाळतो. पेट्रोल , डिझेल या इंधन तेलांच्या वापरातून कार्बन मोनॉक्साईड आणि कार्बन डायऑक्साईड वायू बाहेर पडतात. ते गरम असतात आणि हवेपेक्षा हलके असतात. त्यामुळे ते वातावरणात उंचावर जात राहतात. याचबरोबर पाण्याची वाफ , मिथेन , नायट्रस ऑक्साईड आणि सीएफसी (क्लोरोफ्लुरोकार्बन्स) वातावरणात मानवी उद्योगांचा (म्हणजे केवळ इंडस्ट्री नव्हे तर इतरही व्यवहार) परिणाम म्हणून मिसळत राहतात. यातले सीएफसी नैसगिर्करीत्या आढळत नाहीत. ते शंभर टक्के मानवनिमिर्त असतात. याचं वातावरणातलं एकूण प्रमाण अत्यल्प असतं. ते सगळे मिळून वातावरणाच्या इतर घटकांपुढं नगण्य ठरतात. त्यांची गोळाबेरीज एक टक्क्याच्या काही शतांश भाग एवढीसुद्धा नसते. पण ज्याप्रमाणे विषाचा एक थेंबदेखील प्राणघातक ठरू शकतो , त्याचप्रमाणे एकूण वातावरणाच्या एक टक्क्याच्या शतांश भागाहून कमी असलेले हे वायू पृथ्वीच्या वातावरणाचा नूर बदलून टाकतात. याचं कारण , हे वायू उष्णता शोषून ती साठवून ठेवू शकतात. दिवसा सूर्यप्रकाश पृथ्वीवर पडतो. त्यामुळे पृथ्वी तापते. प्रकाशकिरण या हरितगृहवायंूतून आरपार जाऊ शकतात. शास्त्रीय भाषेत हरितगृहवायू प्रकाशासाठी पारदर्शक ठरतात , असं म्हटलं जातं. या प्रकाशाचा परिणाम पृथ्वी तापण्यात होतो. म्हणजे प्रकाशऊजेर्चं रूपांतर उष्णतेत होतं. रात्री पृथ्वीचा हा भाग थंड व्हायला सुरुवात होते. म्हणजे ही उष्णता जमिनीतून बाहेर पडून अवकाशात परतायचा प्रयत्न करते. त्यावेळी वातावरणातील हे वायूंचे रेणू ही उष्णता साठवतात. ही उष्णता त्या रेणूंना ओलांडून अवकाश पोकळीत जाऊ शकत नाही. यामुळे अवकाशाचं सरासरी तापमान वाढतं. हे तापमान त्यांच्या आसपासच्या रेणूंनाही दिलं जातं. जेवढ्या प्रमाणात या हरितगृहवायूंचे प्रमाण वातावरणात वाढते , तेवढ्या प्रमाणामध्ये वातावरणाचे सरासरी तापमान वाढत जाते. १९व्या शतकातील औद्योगिक क्रांतीनंतर हळूहळू या वायूंचे वातावरणातील प्रमाण वाढू लागले. २०व्या शतकाच्या अखेरच्या काळात हे प्रमाण वाढणं अधिक वेगवान बनलं.
 
                           औद्योगिक क्रांती घडल्यावर फार प्राचीन काळी गाडल्या गेलेल्या जंगलांचा मानवानं इंधन म्हणून मोठ्या प्रमाणावर वापर सुरू केला. कुठलाही कार्बनी पदार्थ जाळला की त्यातून कार्बनडाय ऑक्साईडची निमिर्ती होतेच. त्याप्रमाणे लाकूड आणि दगडी कोळसा जाळल्यानंतर वातावरणात कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण वाढू लागले. दगडी कोळसा जाळला जात असताना कार्बन डायऑक्साईड वायूच वातावरणामध्ये मिसळत होता असे नाही. काही कोळशामध्ये गंधक आणि त्याची संयुगेही आढळतात. त्यांच्या ज्वलनाने सल्फर डायऑक्साईडही हवेत मिसळू लागला. हे काहीच नाही अशी परिस्थिती विसाव्या शतकात उद्भवली. याचं कारण विसाव्या शतकात कोळसा तर जाळला जातच होता ; पण त्यात खनिज तेल आणि इंधन वायूंच्या ज्वलनामुळे निर्माण होणाऱ्या कार्बन डायऑक्साईडची भर पडली. जंगलं गाडली गेली , तेव्हा काही सूक्ष्म प्राणीही गाडले गेले. जेव्हा भूविवर्तनी क्रिया घडतात ; म्हणजे सागरतळ वर उचलला जातो , त्याचे पर्वत बनतात किंवा हे पर्वत परत जमिनीत जातात. अशा अनेक घटना पृथ्वीवर सतत घडत असतात ; म्हणून आपली पृथ्वी ही एक चल प्रणाली (डायनॅमिक सिस्टीम) मानली जाते. या घटना का व कशा घडतात , हे सांगायला गेलो तर पोथ्यांमध्ये लिहितात त्याप्रमाणे ' ग्रंथ विस्तारेल ;' पण या घटना घडताना प्रचंड दाब निर्माण होतो , उष्णता निर्माण होते आणि खडकांना वळ्या पडतात किंवा खडक तुटतात. त्यात हे कार्बनी जीव पिळले जाऊन त्यांचं तेल निघतं. तेच नैसगिर्क खनिज तेल. हे संप्लवनशील म्हणजे झटकन वाफ होणारं असतं. जेव्हा हे जमिनीखाली अडकतं तेव्हा ते खडकातील खनिज कणांमध्ये साठतं. सर्वसाधारणपणे हे गाळांपासून बनलेल्या म्हणजे अवसादी खडकात आढळतं. यातून निघालेले वायू जर निसटायला वाव नसेल तर त्यांच्यावरच साठतात. हे पाण्यापेक्षा हलके असल्यामुळं भूजलाच्या वरती असतात. हे तेल आणि वायू आपण इतक्या मोठ्या प्रमाणावर वापरू लागलो की , वातावरणात कोळसा जाळून जमा होणाऱ्या कार्बन डायऑक्साईडमध्ये भरपूर भर पडून हरितगृह परिणाम वाढू लागला.
                          क्लोरोफ्लुरोकार्बन्स (सीएफसी) या कुटुंबातील वायूंचा हरितगृह परिणाम करणारे वायू म्हणून आधी उल्लेख आलेला आहे. हे वायू मानवनिमिर्त असून ते १९४०च्या सुमारास वापरात आले. हे कृत्रिम वायू आपल्या फ्रीजमध्ये , एरोसोल कॅनमधे आणि इलेक्ट्रॉनिक उद्योगात प्रामुख्यानं शीतीकरणासाठी वापरले जातात. सध्याच्या हरितगृह परिणामाच्या निमिर्तीत २५ टक्के वाटा या वायूंचा आहे. आता सीएफसी वापरावर बंदी आहे ; पण त्यांनी करायचं ते नुकसान करून झालं आहेच. हे वायू पृथ्वीजवळ असताना फारसं नुकसान करीत नाहीत. ते वातावरणाच्या वरच्या थरात जातात , तेव्हा त्यांच्या विघटनातले घटक ओझोन या ऑक्सिजनच्या ( O3 ) या रूपाचं ऑक्सिजनच्या सामान्य रूपात ( O2 ) रूपांतर करतात. हा जो ओझोन वायूचा थर आहे , तो सूर्याकडून येणाऱ्या अल्ट्राव्हायोलेट प्रारणांपासून आपले रक्षण करतो. ही प्रारणे वातावरण तापवतातच ; पण त्यांच्यामुळे त्वचेच्या कर्करोगासह इतरही व्याधींना आपल्याला सामोरे जावे लागते. तिसरा हरितगृह वायू म्हणजे मिथेन. पाणथळजागी कुजणाऱ्या वनस्पती , कुजणारे इतर कार्बनी पदार्थ यातून मिथेन बाहेर पडून हवेत मिसळतो. टुंड्रा प्रदेशात जी कायमस्वरूपी गोठलेली जमीन (पर्मा फ्रॉस्ट) आहे , त्यात पृथ्वीवरचा १४ टक्के मिथेन गाडलेल्या वनस्पतींच्या अवशेष स्वरूपात आहे. पृथ्वीचं तापमान वाढतंय तसतशी गोठणभूमी वितळू लागली असून त्या जमिनीमधून मोठ्या प्रमाणावर सुटणारा मिथेन वातावरणात मिसळू लागला आहे. सागरतळी जे कार्बनी पदार्थ साठलेले आहेत त्यांचा साठा पृथ्वीवरील दगडी कोळशांच्या सर्व साठ्यांपेक्षा काही पटीनं मोठा आहे. बरेचदा सागरी उबदार पाण्याचा प्रवाह सागरात खोलवरून जातो तेव्हा किंवा सागरतळाची भूभौतिक कारणांनी हालचाल होते तेव्हा या मिथेनचे (आणि इतर कार्बनी वायूंचे) मोठमोठे बुडबुडे एकदम सागरातून अचानकपणे वर येतात. या बृहतबुदबुदांनी (प्लूम्स) काहीवेळा सागरी अपघात घडतात. असे मिथेनचे बुडबुडे ओखोत्स्क सागरात रशियन शास्त्रज्ञांनी आणि कॅरिबियन सागरात अमेरिकन शास्त्रज्ञांनी नांेदले आहेत. हे बुडबुडे काहीवेळा एखाद्या शहराच्या लांबी-रुंदीचेदेखील असू शकतात. सागरपृष्ठावर येईपर्यंत ते मोठे होत होत फुटतात. त्यामुळं सागरात अचानक खळबळ माजते.
                       नायट्रस ऑक्साइड या हरितगृहवायूबद्दल शास्त्रज्ञांना विशेष माहिती नाही. नैसगिर्करित्या हा वायू कसा तयार होतो , हे एक कोडंच आहे. चमकणाऱ्या विजांमुळं तो निर्माण होतो , हे एक कारण अंदाजे माहीत आहे. तसंच नायलॉननिमिर्तीत वातावरणातील एकूण नायट्रस ऑक्साइडच्या दहा टक्के नायट्रस ऑक्साइड तयार होतो , असं दिसतं. यापलीकडं हा वायू कुठे निर्माण होतो , तो वातावरणात कसा मिसळतो , याबद्दल फारसं माहीत नाही ; पण त्याचं वातावरणातलं प्रमाण वाढतंय हे नक्की.
                       हरितगृहवायूंपैकी महत्त्वाच्या वायूंचा घेतलेला हा थोडक्यात आढावा आहे. हे वायू वातावरणात वाढल्यामुळं जागतिक तापमानवाढीचा वेग वाढला आहे , हे बहुतेक सर्व शास्त्रज्ञांनी मान्य केलंय. बारकाईनं हे वाक्य वाचलं तर असं लक्षात येईल की जागतिक तापमानवाढ होत होतीच ; फक्त आपण तिचा वेग वाढवला आहे. पृथ्वीचं सरासरी तापमान वाढणं , एका विशिष्ट मर्यादेपर्यंत ते वाढलं की ते झपाट्यानं कमी होणं , त्यानंतर हिमयुगाची निमिर्ती होणं हे एक चक्र गेली कित्येक कोटी वर्षं चालू असावं. गेली काही लाख वर्षं ते नक्कीच चालू आहे , असं आपण म्हणू शकतो. याचं कारण गेल्या काही लाख वर्षांतील वातावरणातील बदलांचे पुरावे आपल्यासाठी निसर्गानेच जपून ठेवले आहेत.
                      यामुळेच गेल्या शंभर वर्षांत यापूवीर् कधीही झालेली नाही एवढ्या झपाट्यानं तापमानवाढ झाली असल्याचं निदर्शनास आलं आहे. विषुववृत्तीय भागातील जी थोडी पर्वत शिखरे हिमाच्छादित आहेत , त्यातील किलिमांजारो हे पर्वत शिखर प्रसिद्ध आहे. या पर्वत शिखरावरील हिमाच्छादन १९०६च्या तुलनेत २५ टक्केच उरले आहे. आल्पस् आणि हिमालयातील हिमनद्या मागे हटत चालल्या आहेत ; आणि हिमरेषा म्हणजे ज्या ऊंचीपर्यंत कायम हिमाच्छादन असते किंवा आजच्या भाषेत जिथे २४ङ्ग७ हिमाच्छादन असतं ती रेषा वर वर सरकत चालली आहे. याचं एक उदाहरण म्हणजे एव्हरेस्टवर जाताना लागणारी खुंबू हिमनदी १९५३ ते २००३ या ५० वर्षांत पाच कि. मी. मागं सरकली. १९७०च्या मध्यापासून नेपाळमधील सरासरी तापमान १० से.ने वाढले ; तर सैबेरियातील कायमस्वरूपी हिमाच्छादित प्रदेशात गेल्या ३० वर्षांत म्हणजे १९७५-७६पासून १.५ से. तापमानवाढ नोंदवण्यात आली असून इथलं हिमाच्छादन दरवषीर् २० सें.मी.चा थर टाकून देतंय. अशी जागतिक तापमानवाढीची अनेक उदाहरणं आहेत.
                      सागरी तुफानं , ज्यांना इंग्रजीत टायफून म्हणतात , त्यांच्या संहारक शक्तीत वाढ होईल. इ.स. १९७४-७५पासूनच तुफानांच्या विध्वंसक शक्तीमध्ये हळूहळू वाढ होऊ लागल्याची चिन्हं शास्त्रज्ञांच्या नजरेत पडू लागली. पूवीर् एक-दोन दिवस टिकून हळूहळू विरून जाणारी तुफानं आता हळूहळू आठवडाभर टिकू लागली असून , त्यांची भ्रमणकक्षाही वाढली आहे. हे का घडतं ? जागतिक तापमानवाढीला सागरही अपवाद नाहीत. एकतर मोठ्या प्रमाणात भूभागांवरचे हिमाच्छादन वितळल्यानंतर ते पाणी अखेरीस सागरातच पोहोचते. त्यामुळं सागराची पातळी वाढते. दुसरं म्हणजे वाढतं तापमान हे पाणी शोषून घेतं. सागरापेक्षा जमीन लवकर थंड होते. पाणी थंड व्हायला अधिक वेळ लागतो. पाणी तापलं की त्याची वाफ होते. पाणी अधिक तापलं तर त्याची अधिक वाफ होते. सध्या ५० वर्षांपूवीर्पेक्षा वातावरणात १.५ ते २ टक्के वाफ अधिक प्रमाणात आढळते. यामुळे तुफानांमध्ये अधिक पाणी असते आणि ते बाहेर टाकण्यासाठी त्यांना नेहमीपेक्षा जास्त वेळ लागतो. हे सगळं हरितगृह परिणामामुळं घडतं. १९८५नंतरच्या काळात कोकण , गुजराथ आणि भारताचा पूर्व किनारा ; तसेच बांगलादेशाला झोडपणाऱ्या सागरी तुफानांच्या बातम्या आठवल्या तर सागरी तुफानांच्या विध्वंसक शक्तीची आपल्याला कल्पना येऊ शकते. वातावरणातील वाढती वाफ संधी येताच पावसाच्या रूपानं कमीत कमी काळात जमिनीवर येते , हाही अनुभव नवा नाही.
                          सागरपृष्ठावरची तापमानवाढ या सागरी तुफानांना जबाबदार असतेच ; पण बरेचदा सागरांतर्गत तापमानवाढही या तुफानांची तीव्रता आणि संहारक शक्ती वाढत असते. रिटा आणि कॅटरिना या संहारक तुफानांनंतर जो अभ्यास झाला , त्यात मेक्सिकोच्या आखातातील खोलवर असलेल्या उबदार पाण्याच्या साठ्याचाही परिणाम या दोन तुफानांची तीव्रता वाढविण्यात झाला , असं उघडकीस आलं. या तुफानांचं दुसरं एक वैशिष्ट्य म्हणजे पावसाबरोबर सागरात शिरलेला कार्बन डायऑक्साईड वायू या तुफानांमुळं परत वातावरणात जातो. याचं कारण ही तुफानं सागर घुसळून काढतात , त्यावेळी हा कार्बन डायऑक्साईड पाण्याच्या झालेल्या फेसाबरोबर पृष्ठभागावर येतो आणि परत आकाशगामी बनतो. १९८५ सालच्या फेलिक्स या सागरी तुफानाच्या वेळी त्या भागावरच्या आकाशात कार्बन डायऑक्साईडची पातळी १०० पटींनी वाढल्याचं दिसून आलं होतं. तेव्हापासून ठेवलेल्या नोंदी सागरी तुफानांची ही बाजू स्पष्ट करण्यास पुरेशा आहेत. तरीही सागरी तुफानांच्या तीव्रतेचा संबंध वाढत्या जागतिक तापमानाशी लावायला शास्त्रज्ञांचा एक गट तयार नाही ; कारण १९७०च्या पूवीर्ची या तुफानांची मोजमापं उपग्रहांनी यानंतर घेतलेल्या मोजमापांइतकी अचूक नाहीत , असं शास्त्रज्ञांच्या या गटाचं म्हणणं आहे.
                           जागतिक तापमानवाढीमुळं सागरी पाण्याची पातळी वाढल्यावर कोणते अनर्थ घडतील याबद्दल बरंच लिहून झालेलं आहे. मालदीव हा देश जवळ जवळ पूर्णपणे पाण्यात जाईल. कराची ते कोलकातापर्यंत फार मोठी भूमी सागराखाली जाईल. बांगलादेशाचे हाल कुत्रंंदेखील खाणार नाही. हे विस्थापित बांगलादेशी भारतात घुसतील. हे भारतीय उपखंडापुरतंच मर्यादित नाही. जगातील बहुतेक सर्व आथिर्क महत्त्वाची शहरं ही सागरकिनारी आहेत. त्यांच्यावरही सागर घाला घालणार यात शंका नाही. कोकणात सखल भागात जी ' सेझ ' नावाची गडबड चाललीय , त्यातलाही बराच भाग तापमान असंच वाढत राहिलं तर ५०-६० वर्षांमध्येच पाण्याखाली जाईल किंवा त्याला सागरी तुफानांचे तांडवनृत्य अनुभवावे लागेल.


                          ग्रीनलंडचा फार मोठा भाग प्रचंड जाडीच्या हिमाच्छादनाखाली आहे. आईसलंडचंही तेच. या दोन्ही देशांवरचा (ग्रीनलंड हा डेन्मार्कचा भाग आहे) हा बर्फाचा थर अगदी ५० टक्क्यांनी जरी वितळून गेला , तरी तिथली भूमी उचलली जाईल. तिथं भूकंपाचे धक्के बसू लागतील. ही दोन्ही बेटं अटलांटिकमधल्या निदरीशी म्हणजे सागरतळी असलेल्या भूकवचाला गेलेल्या तड्यांशी संबंधित आहेत. तिथे या हालचालींमुळे शिलारस ज्वालामुखींच्या वाटेने जमिनीवर येईल किंवा सागरतळ वर येईल. त्यामुळं वातावरणात पुन्हा कार्बन डायऑक्साईड आणि इतर हरितगृहवायूंची भर पडेल.
                           आपण शाळेत भूगोल शिकताना सागरी प्रवाहांची माहिती शिकतो. यातल्या गल्फ स्ट्रीममुळं युरोपातली बंदरं बाराही महिने खुली राहू शकतात , हे आपण वाचलेलं असतं. हा उष्ण पाण्याचा प्रवाह विषुववृत्तावर सुरू होतो. उत्तरधृवीय प्रदेशाच्या टोकापर्यंत जातो. ग्रीनलंडच्या तिथं तो पूवेर्कडं वळतो. आयर्लंड , इंग्लंड करून तो युरोपच्या पश्चिम किनाऱ्यावरून परत विषुववृत्तावर येतो. हेही आपण शिकलेलो आहोत. अमेरिकेच्या पूर्वकिनाऱ्यानं हा प्रवाह उत्तरेकडं जातो , तेव्हा तो उष्ण पाण्याचा असल्यामुळं तो सागरपृष्ठाच्या जवळ असतो. जाता जाता तो अमेरिकेच्या आणि कॅनडाच्या पूर्व किनाऱ्यावरील सागराला बर्फविरहित ठेवायचं काम करतो. हेच काम पुढं तो आयर्लंड , इंग्लंड आणि युरोपच्या पश्चिम किनाऱ्यासाठी करतो. असेच प्रवाह पॅसिफिकमध्येही आहेत. हिंदी महासागरातही आहेत. यातला ' एल निनो ' आपल्याला ऐकून माहीत असतो.
                           आता आपण तापमानवाढीचा परिणाम काय करेल हे बघूया. ग्रीनलंड आणि धृवीय प्रदेशातील बर्फ वितळला की ते पाणी अटलांटिक सागरात मिसळेल. त्यामुळं गल्फ स्ट्रीम थंडावेल. थंड पाणी सागरतळाकडं जातं. त्याप्रमाणं तो गल्फ प्रवाहही थंड पडून सागरतळी जाईल आणि तसाच पुढं युरोपकडं जाऊन दक्षिणेकडे वळेल. यामुळे युरोप गोठेल. दुसरं म्हणजे इतकं गोड पाणी सागरात मिसळल्यामुळं सागराचा खारटपणा कमी होईल. त्यामुळं गल्फ स्ट्रीम फार खोल बुडणार नाही ; कारण त्याची घनता कमी झालेली असेल. याचा परिणाम हा उष्णतावाहक प्रवाह मंद होऊन हळूहळू थांबण्यात होईल. जे गल्फ स्ट्रीमचं , तेच एल निनोचं. त्याच्यात दक्षिण धृवीय गार पाणी मिसळेल. ज्यावषीर् एल निनो जोरात असतो , तेव्हा भारतात अवर्षण असतं. यामुळं भारतात काही भागात पर्जन्यमान वाढेल. एल निनो थंडावल्यामुळं पडणारा पाऊस इतरत्र पडेल. राजस्थान में सुखा , बिहार में बाढ , ही नेहमीची बातमी ' बिहारमध्ये अवर्षण राजस्थानात पूर ' अशी उलटी होण्याची शक्यता वाढते.
                             नियोजनाच्या बाबतीत आपली एकंदरीत ओरड बघता , यामुळं माजणारा हाहा:कार कसा असेल याची कल्पनाच केलेली बरी. जेव्हा जेव्हा जगात जिथे जिथे सतत अतिवृष्टी किंवा सतत अवर्षणाची परिस्थिती असते , तेव्हा तेव्हा फार मोठ्या प्रमाणावर स्थलांतर होतं , हेही इथं लक्षात ठेवायला हवं.
जेव्हा जागतिक तापमान वाढते तेव्हा काही ठिकाणी दुष्काळ पडतो , तर काही ठिकाणी अतिवृष्टी व्हायला सुरुवात होते. जिथे दुष्काळ पडतो तिथे कुपोषणजन्य आजार वाढतात , त्याप्रमाणे गुन्हेगारीतही वाढ होते. याउलट जिथे अतिवृष्टी होते तिथे पाण्यातून पसरणारे रोग म्हणजे कॉलरा , नारू असे रोग , तसंच डासांमुळे पसरणारे विविध रोग वाढतात. ज्या ठिकाणी पूवीर् शुष्क भाग होता , तिथे जेव्हा अशी अतिवृष्टी होऊ लागते तेव्हा तिथल्या व्यक्ती अशा रोगांना झपाट्यानं बळी पडतात ; याचं कारण या भागात यापूवीर् पाण्याबरोबर किंवा पाण्यातून पसरणाऱ्या रोगांचं प्रमाण कमी असल्यामुळं तिथल्या व्यक्तींच्या शरीरात या रोगांबाबतची नैसगिर्क रोगप्रतिकारशक्ती कमी प्रमाणात असते.


                            जागतिक तापमानवाढ रोखायची तर वातावरणातील कार्बन डायऑक्साईड वायू कमी करण्यासाठी उपाय करावे लागतील. यातला एक उपाय म्हणजे झाडं वाढवणे. सध्याचे कार्बन डायऑक्साईडचे वातावरणातील प्रमाण थोपवायचे तर त्याची निमिर्ती कमी करायला हवीच ; पण जंगलांखालची भूमी सध्याच्या तीन ते पाच पट वाढवायला हवी. दुसरे म्हणजे कार्बन डायऑक्साईड निर्माण होताच तो पकडून सागरात सोडायची सोय करायला हवी किंवा याचे दुसऱ्या एखाद्या अविघटनशील संयुगात रूपांतर करावे लागेल. या योजना अजून कागदावरसुद्धा नाहीत. त्यामुळं त्या कधी अंमलात येणार आणि कधी कार्बन डायऑक्साईड नष्ट करणार हा प्रश्न आहे. सागरात मोठ्या प्रमाणावर लोहसंयुगे ओतली तर वानस प्लवकांची (प्लँस्टॉन वनस्पती) वाढ होऊन त्यामुळे कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण कमी व्हायला मदत होईल असं काही शास्त्रज्ञ म्हणतात. पण हा मुद्याही अजून कागदोपत्रीचाच आहे.
                          गेल्या काही वर्षांत अमेरिका आणि ऑस्ट्रेलियात वणव्यांनी फारच उग्र स्वरूप धारण केलं होतंच. पण तिथल्या गहू पिकविणाऱ्या पट्ट्यात दुष्काळ पडला होता. ऑस्ट्रेलिया तर या दोन्ही गोष्टींनी फार पोळला आहे. जागतिक तापमानवाढ - तिचे पुरावे , तिच्या विरुद्ध पक्षाचं म्हणणं , या तापमानवाढीवर बरंच काही लिहिलं गेलं आहे. त्यातला निवडक भाग अगदी थोडक्यात इथं दिला आहे . 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा