Post views: counter

लॉर्ड चेम्सफोर्ड (१९१६ – १९२१)


लॉर्ड चेम्सफोर्ड (१९१६ – १९२१) 

 
 
लॉर्ड चेम्सफोर्डच्या काळातील महत्वपूर्ण घटना –  
 
  1.  १९१६ मध्ये दोन ठिकाणी होमरूल लीगची स्थापना करण्यात आली. जून १९१६ मध्ये लोकमान्य टिळकांनी महाराष्ट्रात केली तर सप्टेंबर १९१६ मध्ये श्रीमती अॅनी बेझंट यांनी मद्रास प्रांतात होमरूल लीगची स्थापना केली.
  2. १९१६ मध्ये कॉंग्रेसचे ऐतिहासिक अधिवेश लखनौ येथे पार पडले. जहालाना कॉंग्रेसमध्ये प्रवेश मिळावा म्हणून अॅनी बेझंटनी महत्वाची भूमिका निभावली.
  3. १९१६ मध्ये कॉंग्रेस व मुस्लीम लीगमध्ये “लखनौ करार” झाला. या करारांतर्गत दोघांनीही एकमेकांना मदत करण्याचे आश्वासन दिले. हा करार करण्यामध्ये टिळकांची महत्वाची भूमिका होती.
  4. १९१६ मध्ये गांधीजीनी गुजरातमध्ये साबरमती आश्रमाची स्थापना केली.
  5. १९१७ साली बिहारमध्ये गांधीजीनी चंपारण्य सत्याग्रह घडवून आणला.
  6. १९१८ मध्ये अहेमदाबाद येथे गिरणी कामगारांचा संप आणि खेडा येथे शेतक-यांचा सत्याग्रह यशस्वी झाला.