Post views: counter

महाराष्ट्रातील खनिज संपत्ती : मँगनिज

महाराष्ट्र खनिज साधनसंपत्ती:

महाराष्ट्र हे खनिज साधनसंपत्तीसाठी फारसे प्रसिद्ध राज्य नाही, राज्याच्या एकूण क्षेत्रफळापकी फक्त १२.३३ टक्के क्षेत्रात खनिज संपत्ती आढळते. महाराष्ट्राची खनिज संपत्तीही प्रामुख्याने बेसॉल्ट खडकाच्या बाह्य़ क्षेत्रात स्फटिकयुक्त व रूपांतरित खडकात पाहायला मिळते. महाराष्ट्रात दगडी कोळसा मँगनिज, लोह खनिज, बॉक्साइट, इ. खनिजे आढळतात.

महाराष्ट्रातील खनिज संपत्तीचे मुख्य क्षेत्र पूर्व विदर्भ असून यात चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, नागपूर, यवतमाळ इ. जिल्हे येतात. याशिवाय सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, इ. ठिकाणीदेखील खनिजे आढळतात.

मँगनिज:
भारतातील एकूण मँगनिज साठय़ापकी ४० टक्के साठा एकटय़ा महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्रात मँगनिजचे प्रमुख साठे भंडारा, नागपूर व सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात आढळतात.

  • भंडारा -  या जिल्ह्य़ात आढळणारे मँगनिजचे साठे हे गोंडाइट मालेच्या खडकाशी निगडित असून ते प्रामुख्याने तुमसर तालुक्यात आढळतात.
  • नागपुर - या जिल्ह्य़ात मँगनिज हे सावनेर तालुक्यात खापा या गावापासुन पूर्वेस रामटेक तालुक्यातून भंडारा जिल्ह्य़ातील भंडारा तालुक्यापर्यंत आढळतात. हा पट्टा पुढे मध्य प्रदेशात जातो. नागपूर जिल्ह्य़ात कांदी, मनसळ, रामडोंगरी, कोदेगाव, खापा या भागांत मँगनिजचे साठे आढळतात.
  • सिंधुदुर्ग - या जिल्हय़ात सावंतवाडी व वेंगुर्ला या ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात मँगनिजचे साठे आढळतात. याशिवाय कणकवली तालुक्यातही मँगनिजचे साठे आढळतात.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा