Post views: counter

Current Affairs Jan 2016 part - 4

  • संरक्षण २०१५:-

  • इंद्र २०१५:-
स्थळ :- बिकानेर (राजस्थान)
भारत आणी रशिया यांच्यातील इंद्र या सामरिक कसरतीची सातवी आवृती. या कसरती ऐकून १४ दिवस सुरु होत्या
  • मलबार :- २०१५
भारताच्या पूर्व किनारपट्टीवर अमेरिका, जपान आणी भारत यांच्या नौदलामध्ये या सयुक्त कसरतीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्येयुद्धनौका, विनाशिका आणी विमानवाहू नौंकाचा सहभाग होता
  •  मित्र शक्ती:-
स्थळ :- पुणे
भारत आणी श्रीलंका यांच्या लष्करामध्ये २९ सप्टेंबर ते ११ आक्टोंबर या कालावधीत सयुक्त कसरत पार पडली
  • सिम्बेकस :- २०१५:-
सिंगापुर आणी भारत यांच्या नौदलातील चारदिवशीय कसरती. हिंदी महासागर आणी दक्षिण चीनी समुद्र या दरम्यान २३ ते २६ मे दरम्यान पार पडल्या
  • इंद्रधनुष्य;-
स्थळ:- हनींगटन
भारत आणी युनायटेड किंग्डम यांच्यातील हवाई कसरती ३० जुलै रोजी पार पडल्या
  • गरुडशक्ती :-
११ ते २१ फेब्रुवारी दरम्यान भारत
आणी इंडोनेशिया यांच्यातील लष्करी कवायती मिझोराम येथे पार पडल्या
  • स्लीनेक्स २०१५;-
स्लीनेक्स म्हणजे श्रीलंका इंडिया नेव्हल एक्सरसाईज. १ नोव्हे रोजी भारत आणी श्रीलंका यांच्या नौदलातर्फे सयुक्तिकरीत्या या कवायतीचे आयोजन करण्यात आले होते. सागरी आणी किनारी सुरक्षेच्या क्षेत्रात या दोन्ही देशांनी केलेल्या प्रगतीची चाचनी यामध्ये करण्यात आली
  • सूर्यकिरण ८:-
भारत आणी नेपाळ यांच्या सरक्षण दलामधील संरक्षण सिध्तेची चाचणी करण्यासाठी २३फेब्रवारी ते३मार्च २०१५या दरम्यान सलिजहंडी येथे या युद्धसरवाचे आयोजन करण्यातआले होते
  • वरूण १४ :-
गोव्यात २ मे रोजी भारत आणी फ्रांस यांच्या नौदलातील वरूण या कसरतीची १४ वी आवृत्तीपार पडली.
  • आॅसिन्डेक्स:-
भारत आणी ऑस्ट्रेलिया यांच्यानौदलातील पहिल्या साप्ताहिक कसरती भारताच्या पूर्व किनारपट्टीवर पार पडल्या . भारतातर्फे आयएनएस शिवालीक तर ऑस्ट्रेलियातर्फे नौदलाच्या पी ३सी ओरायन सव्हलंस या हवाई तुकडीने सहभाग घेतला
  • एकुवेरीन २०१५:-
मालदीव आणी भारत या दोन देशाच्या सैन्यदलामध्ये १५ दिवसांच्या एकुवेरीन कसरती थिरुवनंतपुरम येथे पार पडल्या मालदीवचे ४५ मरीन कमांडो आणी भारतीय सैन्यदलाचे ४५ कमांडो यात सहभागी झाले होते
  • आक्रमण २:-
भारताच्या चेतक या हेलिकॉप्टरची पंजाब मधील भटींडा येथे तैनात करण्यात आलेली तुकडी आणी ऐकून ३००अन्य लष्करी वाहनाचा व सुमारे १०००० जवानांचा युद्ध सराव
  • साडमेक्स २०१५:-
द साऊथ एशियन अॅन्युक्ल डीझास्टर मॅनेजमेंट एक्सरसाइज २०१५या कसरती दिल्ली येथे पार पडल्या.भारतातील राष्ट्रीय आपत्कालीन प्रतिसाद दलातर्फे अशाप्रकारच्या कसरतीचे प्रथमच आयोजन करण्यात आले होते सार्क देशातील आपत्कालीन प्रतिसाद दलांचे प्रतिनिधीही यामध्ये सहभागी झाले होते
  •  Hand in Hand 2015:-
भारत आणी चीन या दोहोच्या लष्करातर्फे या कसरतीचे आयोजन करण्यात आले होतेया कसरतिची ही पाचवी आवृती चीनच्या युनान प्रातातील कनमिग मिलीटरी अकादमी येथे त्या पार पडल्या.


  • नवउद्योजकतेला मिळणार 'स्टार्ट अप'चा 'बूस्ट' :
माहिती-तंत्रज्ञान (आयटी) उद्योगामुळे पुण्यातील उद्यमशीलतेचा गजर जगभर होत असतानाच, आता केंद्र सरकारच्या 'स्टार्ट अप' योजनेमुळे शहरातील उद्यमशीलतेला आणखी झळाळी मिळणार आहे.
 विविध क्षेत्रांतील 'स्टार्ट अप'मधील नवउद्योजकांना या योजनेचा उपयोग होणार असल्याने, आगामी तीन वर्षांत पुण्यात उभारल्या जाणाऱ्या तब्बल दोन हजार 'स्टार्ट अप'ना खऱ्या अर्थाने 'बळ' मिळणार आहे.
 भरीव आर्थिक गुंतवणूक, बिझनेस इन्क्‍युबेटरची सुविधा, प्राप्तिकरात सूट आणि उद्योग उभारणीत प्रशासकीय हस्तक्षेप न करण्याच्या भूमिकेमुळे या क्षेत्रातील तरुण उद्योजकांना 'स्टार्ट अप'च्या वाढीवर पूर्ण लक्ष केंद्रित करता येईल.
  • 30 वर्षांपूर्वी गोठलेला प्राणी पुनरुज्जीवित :
जपानच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पोलर रिसर्चच्या वैज्ञानिकांना 30 वर्षांपूर्वी गोठलेला प्राणी पुनरुज्जीवित करण्यात यश आले आहे. अतिशय लहान जवळपास 1 मि.मी.पेक्षा कमी लांबीचा हा प्राणी अंटार्टिकावर शास्त्रज्ञांना मिळाला. क्रायोबॉयोलॉजी मासिकात प्रसिद्ध झालेल्या माहितीनुसार ‘वॉटर बियर’गटातील हा सूक्ष्म प्राणी 1983 मध्ये अंटार्टिकावरील मॉस झुडपावर आढळला होता. यापूर्वी असा प्राणी नऊ वर्षांनंतर पुनरुज्जीवित करण्यात यश आले होते, पण यावेळी 30 वर्षांपूर्वीचा प्राणी पुनरुज्जीवित करण्याचा प्रयोग शास्त्रज्ञांनी यशस्वी केला.

  • अंतराळात फुलले 'झिनिआ' :
पृथ्वीच्या बाह्य वातावरणात पहिल्यांदाच एक फूल फुलविण्यात नासाच्या अंतराळवीरांना यश आले आहे. 'झिनिआ' असे या फुलाचे नाव असून, अंतराळवीर स्कॉट केली यांनी 'होय, अंतराळात अन्य प्रकारेही जीवन फुलले आहे!' असे ट्विट करत या फुलाचा फोटोही शेअर केला आहे. नारिंगी रंगाचे हे फूल संयुक्त राष्ट्राच्या दक्षिण-पश्‍चिम भागातील आहे, या फुलाबरोबरच शास्त्रज्ञ अन्य वनस्पतींच्या लागवडीसाठीही प्रयत्न करत असून, अंतराळात कमळ फुलविण्याचा प्रयत्नही यशस्वी झाला आहे.    आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात मे 2014 मध्ये 'व्हेजी लॅब' सुरू करण्यात आली होती, यामध्येच झिनिआ आणि कमळ ही फुले फुलली आहेत.
  • इराणवरील निर्बंध उठविले :
इराणवर असलेले आंतरराष्ट्रीय निर्बंध उठविण्यात आले असून, त्यामुळे गेल्या काही काळापासून आंतरराष्ट्रीय व्यापारातील इराणचा विजनवास संपुष्टात आला आहे.गेल्या वर्षी 14 जुलैला पाश्‍चिमात्य देशांबरोबर झालेल्या कराराची अंमलबजावणी सुरू झाल्याने इराणवरील आर्थिक निर्बंध उठविण्यात आले आहेत. अमेरिका, रशिया, चीन, जर्मनी, फ्रान्स आणि ब्रिटन या सहा जागतिक शक्तींनी इराणबरोबर करार करत त्यांच्या अणु कार्यक्रमाला आळा घालण्याची अट घातली होती. या करारानुसार करायच्या उपाययोजना इराणने केल्या असल्याचा निर्वाळा आंतरराष्ट्रीय अणु ऊर्जा संस्थेने दिल्याने निर्बंध उठविण्याचा निर्णय घेण्यात आला. सहा देशांच्या प्रतिनिधी म्हणून वाटाघाटी करणाऱ्या युरोपीय महासंघाच्या धोरणविभाग प्रमुख फेडरिका मोघेर्नी यांनी इराणवरील सर्व आर्थिक निर्बंध उठविण्यात आल्याचे येथे जाहीर केले.
  • सानिया, मार्टिना संयुक्त नंबर वन :
भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा आणि स्वीत्झर्लंडची मार्टिना हिंगीस महिला गटातील दुहेरीच्या जागतिक मानांकनात संयुक्तरीत्या अव्वल क्रमांकावर विराजमान झाल्या आहेत. सध्या डब्ल्यूटीएच्या रँकिंगमध्ये सानिया आणि मार्टिना यांचे प्रत्येकी 11395 गुण आहेत. भारत आणि स्वीस जोडीने सलग 30 वा विजय मिळविताना (दि.15 या तारखेला) सिडनी इंटरनॅशनल टेनिस स्पर्धेचे विजेतेपद आपल्या नावे केले होते. या जोडीने एकत्र खेळताना आतापर्यंत एकूण 11 वेळा जेतेपदाला गवसणी घातली आहे. 18 तारखेपासून सुरू होणाऱ्या ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेपूर्वी संयुक्तरीत्य अव्वल क्रमांकावर झेप घेतल्यामुळे सानिया आणि मार्टिना यांचे मनोधैर्य आणखी उंचावण्यास मदत होणार आहे. टेनिस कारकीर्दीत स्वीत्झर्लंडची मार्टिना हिंगीस दुहेरी क्रमवारीत 35 आठवड्यांपर्यंत नंबर वन राहिलेली आहे, तर सानिया मिर्झा 41 आठवड्यांपासून दुहेरी क्रमवारीत अव्वल क्रमांकावर विराजमान आहे.
  • देशातील पहिले सेंद्रिय राज्य :
सिक्कीम हे देशातील पहिले सेंद्रिय राज्य बनल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.
सिक्कीमचे उदाहरण हे देशासाठीच नव्हे, तर जगातील सेंद्रिय शेतीसाठी पथदर्शक ठरणार असल्याचे प्रंतप्रधान म्हणाले.'निसर्गाचे रक्षण आणि संवर्धन करण्याची गरज असल्याचे उदाहरण सिक्कीमने जगाला घालून दिले आहे.प्रंतप्रधान म्हणतात की शेतकऱ्यांचा विकास साधण्यासाठी आणि कृषी विकासाला हातभार लावण्यासाठी सेंद्रिय शेतीकडे वळण्याची गरज आहे.
  • महाराष्ट्रातील बाल शौर्य पुरस्कार :
शौर्याचा अत्युच्च आदर्श निर्माण करणाऱ्या महाराष्ट्रातील चार मुलांसह 25 बालकांना 24 जानेवारी रोजी राजधानीत होणाऱ्या शानदार समारंभात राष्ट्रीय शौर्य पुरस्कारांनी गौरविण्यात येणार आहे.त्यापैकी प्रतिष्ठेचा भारत पुरस्कार आपल्या चार मित्रांना वाचवते वेळी प्राणांची आहुती देणाऱ्या गौरव कवडुजी सहस्रबुद्धे याला मरणोत्तर ‘भारत पुरस्कार’ घोषित झाला आहे.तीन मुलींनीदेखील या पुरस्कारांवर आपली मोहोर उमटवली आहे.
  • धूमकेतूवर बर्फाच्या स्वरूपात पाणी :
अवकाश संशोधनाच्या इतिहासात सर्वात जास्त अभ्यास झालेला धूमकेतू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 67 पी चुरयुमोव- गेरासिमेन्को या धूमकेतूवर बर्फाच्या स्वरूपातील पाणी असल्याचे दिसून आले असून या संशोधनात एका भारतीय वंशाच्या वैज्ञानिकाचाही समावेश आहे.युरोपीयन अवकाश संस्थेच्या रोसेटा यानाच्या मदतीने गोळा केलेल्या माहितीत बर्फाचे हे थर दिसले असून ते डम्बेल्सच्या आकाराच्या या धूमकेतूच्या खालच्या इमहोटेप या भागात दिसले आहेत.दृश्य प्रकाशात या धूमकेतूवरील बर्फाचे पांढरे पट्टे स्पष्ट दिसत आहेत.धूमकेतूवरील कडय़ासारखा भाग व ढिगाऱ्यात या बर्फाचा समावेश आहे.
 कॅलिफोर्निया येथील जेट प्रॉपल्शन लॅबोरेटरी या संस्थेने हे संशोधन केले असून त्यात भारतीय वंशाचे मूर्ती गुडीपथी यांचा समावेश आहे.
  • राज्यातील पहिले ‘रुग्ण समुपदेशन केंद्र’ :
रुग्णांना औषधांविषयी इत्थंभूत माहिती कळावी यासाठी राज्यातील पहिले ‘रुग्ण समुपदेशन केंद्र’ केईएम रुग्णालयात सुरू होणार असल्याची माहिती केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अविनाश सुपे यांनी दिली.
 एखादे औषध कसे व किती वेळा घ्यायचे, ते डॉक्टर एकदा सांगतो, काही वेळा रुग्णांच्या सर्वच शंकांचे निरसन होत नाही. हे औषध नेमके कशासाठी दिले आहे? या औषधात कोणते घटक आहेत? औषधाची किती रिअ‍ॅक्शन येऊ शकते? या औषधाचा फायदा कसा होणार? अशा प्रश्नांची उत्तरे देणे डॉक्टरांना शक्य नसते. त्यासाठीच ‘रुग्ण समुपदेशन केंद्र’ 20 जानेवारी रोजी सुरू करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य औषध व्यवसाय परिषद आणि केईएम रुग्णालय मिळून हे केंद्र सुरू करणार असल्याचे डॉ. सुपे यांनी सांगितले.
  • स्टॉक एक्सचेंजची सफर शक्य :
देशाच्या आर्थिक घडामोडींचे केंद्र असलेली बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजची इमारत पर्यटकांना खुली करण्याबाबत सामंजस्य करार करण्यास आज महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या संचालक मंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली, यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अध्यक्षस्थानी होते. पर्यटन विकास महामंडळाच्या अखत्यारितील डेक्कन ओडिसी व त्याचे बोधचिन्ह यांच्या नोंदणीसाठी शासनाच्या ट्रेडमार्क विभागाकडे नोंदणी करणे. घृष्णेश्वर-वेरूळ परिसरात पर्यटन विकास महामंडळाच्या पडिक जमिनीवर महादेव वनाची निर्मिती करण्याकरिता वनविभागास जागा उपलब्ध करून देणे. माथेरानमध्ये येणाऱ्या पर्यटकांसाठी शौचालय सुविधा विकसित करणे, घारापुरी बेटावरील गावकऱ्यांना महामंडळामार्फत पुरविण्यात येणाऱ्या विद्युत पुरवठ्यास मान्यता देण्यात आली.
  • जागतिक बॅंकेकडून ‘आधार’ प्रणाली उपयुक्त :
जागतिक बॅंकेतर्फे 15 जानेवारी 2016 रोजी डिजिटल लाभांशांसंदर्भातील अहवाल प्रकाशित करण्यात आला.
 या अहवालानुसार भारतातील आधार ही डिजिटल ओळख प्रणाली भारत सरकारसाठी उपयुक्त ठरली आहे.
 आधार कार्ड योजनेने भारत सरकारचे वर्षाला साडेसहाशे कोटी रुपये वाचविले असून, भ्रष्टाचार कमी करण्यासाठी ही प्रणाली उपयुक्त आहे. यासोबतच सर्व घटकांचा समावेश, उपयुक्तता व नावीन्यता या कसोट्यांवरही आधार प्रणाली उत्कृष्ट आहे, असे जागतिक बॅंकेकडून सांगण्यात आले. भारतातील अंदाजे शंभर कोटी लोक आधार प्रणालीद्वारे जोडले आहेत, या प्रणालीद्वारे गरीब वंचितांनाही डिजिटल ओळख मिळाली आहे, असे या अहवालात नमूद केले आहे.
 जागतिक बॅंक समूहाचे प्रमुख : जिम यॉंग कीम
 जागतिक बॅंकेचे मुख्य अर्थतज्ज्ञ : कौशिक बसू
  • भारत अमेरिकेचा सर्वांत मोठा शास्त्रज्ञ निर्यातदार :
नॅशनल सायन्स फाउंडेशनच्या अहवालानुसार इतर देशांमधून अमेरिकेमध्ये येणाऱ्या शास्त्रज्ञ आणि अभियंत्यांमध्ये भारतीय नागरिकांचे प्रमाण सर्वाधिक आहे. भारतातून अमेरिकेमध्ये नऊ लाख पन्नास हजार शास्त्रज्ञ आणि अभियंते स्थलांतरित झाले आहेत. इतर देशांमधून अमेरिकेमध्ये स्थलांतरित झालेल्या शास्त्रज्ञ आणि अभियंत्यांची संख्या 2003 मध्ये दोनकोटी सोळा लाख होती. ही संख्या 2013 मध्ये दोन कोटी नव्वद लाखांवर गेली आहे. यापैकी बहुतांश भारतीय आहेत, दहा वर्षांमध्ये वाढलेल्या संख्येपैकी तब्बल 85 टक्के फक्त भारतीयच आहेत. अमेरिकेतील एकूण शास्त्रज्ञ आणि अभियंत्यांपैकी 16 ते 18 टक्के स्थलांतरित आहेत, यापैकी 22 टक्के व्यक्तींना अमेरिकेचे नागरिकत्व मिळाले आहे. अमेरिकी शास्त्रज्ञ आणि अभियंत्यांच्या तुलनेत स्थलांतरित नागरिकांनी अधिक चांगले यश मिळविल्याचेही अहवालात नमूद केले आहे.
  • 'आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात' प्रयोग सुरू :
अंतराळात एक वनस्पती वाढवून तिचे फूल फुलविण्याचा एक अभिनव प्रयोग शास्त्रज्ञांनी नुकताच यशस्वी पार पाडला. पृथ्वीपासून 400 किलोमीटर उंचीवरून फेऱ्या मारणाऱ्या ‘आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात‘ हे प्रयोग सुरू आहेत. पृथ्वीभोवती फेऱ्या मारणाऱ्या उपग्रहांमध्ये ‘आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाचे‘ महत्त्व आगळेवेगळे आहे, हे स्थानक फुटबॉलच्या मैदानाच्या आकाराचे असून, त्याचे बांधकाम अंतराळातच सोळा राष्ट्रांनी मिळून पंधरा वर्षांत पूर्ण केले. या स्थानकासाठी 150 अब्ज डॉलर एवढा प्रचंड खर्च आला आहे. सध्या तेथे सहा अवकाशयात्री राहात आहेत. तसेच हे स्थानक पृथ्वीभोवती चारशे किलोमीटर उंचीवरून ताशी 28000 किलोमीटर वेगाने फिरत आहे, ते दिवसाला सोळा वेळा पृथ्वी प्रदक्षिणा घालत असून, त्याच्या प्रचंड वेगामुळे स्थानकामध्ये वजनरहित अवस्था निर्माण झाली आहे.
  • दिशादर्शक यंत्रणा विकसित करणाऱ्या देशांच्या रांगेत :
आयआरएनएसएस-1 ई हा पाचवा दिशादर्शक उपग्रह (दि.20) यशस्वीरीत्या कक्षेत स्थिरावताच भारताने अमेरिकेच्या जागतिक स्थितीदर्शक यंत्रणेच्या धर्तीवर (जीपीएस) स्वत:ची दिशादर्शक यंत्रणा विकसित करणाऱ्या देशांच्या रांगेत स्थान मिळविले आहे. पीएसएलव्ही सी 31 या ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपक यानाने सकाळी 9.31 वाजता स्थानिक सतीश धवन अंतराळ केंद्रातून नियोजनानुसार उड्डाण केले. अवघ्या 19 मिनिटे 20 सेकंदात सदर उपग्रह भूस्थिर कक्षेत सोडण्यात आला. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी यशस्वी प्रक्षेपणाबद्दल इस्रोच्या तुकडीचे अभिनंदन केले आहे. इस्रोच्या शास्त्रज्ञांनी देशासाठी अभिमानास्पद कामगिरी केली, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात.
  • जगातील सर्वात मोठी दरी :
दक्षिण ध्रुवावर अंटाक्र्टिका मोहिमेसाठी गेलेल्या वैज्ञानिकांना अमेरिकेतील ग्रेट कॅनयनपेक्षाही मोठी दरी (घळ) सापडली आहे, ती 1000 कि.मी. लांब, 1500 मीटर खोल व 26.5 किलोमीटर रूंद आहे. पृथ्वीवरील ही सर्वात मोठी दरी आहे, चिनी वैज्ञानिकांच्या 32 व्या अंटाक्र्टिका मोहिमेत ती सापडली आहे. चीनच्या शोध मोहिमेतील संशोधक गेल्या नोव्हेंबरमध्ये दक्षिण ध्रुवावर प्रिन्सेस एलिझाबेथ भागात गेले होते व त्यांनी तेथे बराच काळ वास्तव्य केले होते, तेव्हा त्यांना तेथे बर्फाची तळी व दरीतील काही प्रवाह सुरूवातीला दिसले.
 अंटाक्र्टिकाच्या बर्फाखाली त्यांना ओलसर जागा दिसली. अनेक सरोवरांच्या खाली उबदार बर्फ (वॉर्म आईस) सापडले, हे अशा प्रकारचे बर्फ असते जे पाण्यात असतानाच चटकन वितळते.
  • केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नवे वीज दर धोरणा :
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत नव ऊर्जा साधनांचे लक्ष्य ठेवून नव्या वीज दर धोरणाला मंजुरी देण्यात आली. सुलभ वितरण आणि गुंतवणूकदारांना प्रोत्साहन ही या वीज दर धोरणाची आणखी काही वैशिष्टय़े आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिलेले नवे वीज दर धोरण स्वच्छ ऊर्जा मोहिमेला पाठिंबा देणारे आहे. स्वच्छ भारत अभियानाला पूरक आणि गुंतवणुकीला प्राधान्य देणारे हे ऊर्जा दर धोरण आहे, गुंतवणूकदारांसाठी सुलभ असलेले हे धोरण अक्षय ऊर्जेला प्राधान्य देणारे आहे.
  • भारतातही लवकरच ‘अॅपल’ स्टोअर्स :
अमेरिका आणि चीनमध्ये ‘अॅपल’च्या विविध उत्पादनांच्या घटलेल्या मागणीच्या पार्श्वभूमीवर कंपनीने आता भारतात विस्तारीकरणाची योजना आखण्यास सुरुवात केली असून, त्याच दिशेने एक पाऊल टाकत कंपनीने भारतात किरकोळ विक्रीसाठी दुकाने सुरू करण्यासाठी केंद्र सरकारकडे परवानगी मागितली आहे.
 भारतातील स्मार्टफोनधारकांची वाढती संख्या लक्षात घेऊनच कंपनीने हे पाऊल उचलले आहे.‘अॅपल’ने केंद्र सरकारच्या औद्योगिक धोरण विभागाकडे अर्ज दाखल केला असून, या विभागाने कंपनीकडून सविस्तर माहिती मागवून घेतलीये. एक ब्रॅंड विक्री क्षेत्रातील थेट परदेशी गुंतवणुकीच्या मर्यादेत केंद्र सरकारने वाढ केल्यानंतरच ‘अॅपल’ने भारतीय बाजारात मोठ्या प्रमाणात उतरण्याचा निर्णय घेतल्याचे दिसते.
  • 'एज' हा आधुनिक सुविधांनी युक्त ब्राऊजर :
मायक्रोसॉफ्टने जुने असलेले इंटरनेट एक्‍स्प्लोरर-7, 8, 9 आणि 10 हे ब्राऊजर्स 12 जानेवारी 2016 या एकाच दिवशी बंद केले आणि इतिहासात नोंद झाली आहे. आता केवळ 'Internet Explorer 11' हा एकच ब्राऊजर सुरू असून अन्य ब्राऊजर्सचे अपडेटस्‌ बंद करण्यात आले आहेत. तसेच 'एज' हा आधुनिक सुविधांनी युक्त ब्राऊजर जारी करण्यात आला आहे, हे दोन्ही ब्राऊजर्स 'विंडोज-10' या ऑपरेटिंग सिस्टीमला सपोर्ट करतील.
 विशेष म्हणजे स्मार्टफोन ते कॉम्प्युटर, लॅपटॉपवर याचा सहज वापर करता येईल.
  • फलोत्पादनात भारत दुसरा :
स्वातंत्र्यानंतर अन्नधान्याचा तुटवडा असलेल्या भारताने हरितक्रांतीनंतर कृषी उत्पादनात स्वयंपूर्णत: मिळविताना आता फळांच्या उत्पादनात जगात दुसरा क्रमांक मिळविला आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील विक्रमी फळ उत्पादनामुळे भारताला हे यश मिळवणे शक्य झाले आहे. राज्यातील पुणे, औरंगाबाद, जळगाव व सांगली हे जिल्हे देशात फळ उत्पादनाच्या नकाशावर झळकले आहेत, केळी उत्पादनात जळगाव जिल्हा देशात अग्रेसर ठरला आहे. फळांच्या वाढत्या उत्पादनामुळे भारतीयांच्या आहारातही त्यांचे प्रमाण वाढत असल्याने लोकांचे आरोग्यमानही सुधारणार आहे. कृषी मंत्रालयाने जारी केलेल्या माहितीनुसार, 2015 मध्ये भारताने फळांच्या उत्पादनात चीननंतर दुसरा क्रमांक मिळविला आहे. विविध फळांच्या निर्यातीतही भारताने बाजी मारली असून, त्यात द्राक्ष अग्रस्थानी आहेत.
  • भारत बटालियन-3 चा मुख्यालय :
पश्चिम महाराष्ट्र व कोकणातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी भारत राखीव बटालियन-3 चे कोल्हापुरातील तळ (मुख्यालय) आता अहमदनगर जिल्ह्यातील मौजे मिरजगाव येथे स्थलांतरित केले जाणार आहे.
 गेल्या तीन वर्षांपासून प्रयत्न करुनही 100 एकरचा भूखंड न मिळाल्याने पोलीस महासंचालकांनी हा निर्णय घेतला आहे. नव्या मुख्यालयाच्या जागेला मंजुरी मिळण्याबाबतचा प्रस्ताव गृह विभागाकडे नुकताच पाठविण्यात आला आहे.


माहिती-विज्ञान-तंत्रज्ञान :
  • देशात सर्वात जास्त विक्री होणार टॅबलेट - आयबॉल
  • आधारकार्ड चे जनक - नंदन निलकेणी.
  • वोडाफोन ही कंपनी इंग्लंडमधील आहे.
  • गोस्वामी तुलसीदास लिखीत रामचरित्र मानस च्या डिजीटल आवृत्तीचे प्रकाशन केंद्र सरकारने 31 ऑगस्ट 2015 रोजी केले.
  • एनसीएमसी म्हणजे नॅशनल कॉमन मोबेलिटी कार्ड हे स्मार्ट कार्ड देश आणि विदेशात प्रवास करणार्‍या पर्यटकांना केंद्रीय नगरविकास मंत्रालयाकडून दिले जाणर आहे. या कार्डाची मदत वाहतूक सुविधा तसेच वस्तू खरेदी करणे इ. साठी होणार आहेत.
  • भारतीय ई-व्यापार क्षेत्रातील प्रसिद्ध कंपनी Snapdeal ने अमेरिकेतील सिलीकॉन व्हॅलीमध्ये असणारी रिड्यूस डाटा ही कंपनी ताब्यात घेतली आहे.
  • Snapdeal चे संस्थापक - रोहित बंसल.
  • सिलीकॉन व्हॅली हे शहर अमेरिकेतील सॅन फ्रांन्सिस्को शहराच्या जवळील पावलो अल्टो व सॅन होजे या उपनगरामध्ये आहे.
  • सिलीकॉन व्हॅली येथे जगातील प्रसिद्ध संगणक कंपन्यांची मुख्यालये आहेत. तसेच संगणक तंत्रज्ञान, सॉफ्टवेअर या उद्योगासाठी हे शहर प्रसिद्ध आहे.
  • जगातील सॉफ्टवेअर उद्योगाची राजधानी/आयटी तज्ञांची पंढरी म्हणून सिलिकॉन व्हॅली ओळखली जाते.
  • ओप्पो ही स्मार्टफोन कंपनी चीनची आहे.
  • फेब्रुवारी 2014 मध्ये व्हाट्स अॅप हे फेसबूकने विकत घेतले आहे.
  • फेसबुकच्या मुख्य कार्यकारी अधिकारी - सेरील शँडबर्ग
  • सप्टेंबर 2015 मध्ये जगातील सर्वात लोकप्रिय मोबाईल मॅसेजिंग अॅप व्हाट्स अॅप ची यूजर संख्या जगात सुमारे 90 कोटी होती. त्यापैकी भारतातील 7 कोटी लोक व्हाट्स अॅप वापरतात.
  • व्हाट्स अॅप चे सह संस्थापक - जॅन कॉम
  • एमकेसीएल/महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड या संस्थेची स्थापना 2001 साली करण्यात आली होती. ही खाजगी संस्था असून या संस्थेची मदत शाळा प्रवेश, कर्मचारी भरती इ. सेवा महाराष्ट्र शासनाने घेणे बंद केले आहे.

  • महत्वाच्या परिषदा-संमेलने :
1.चौथे विश्व मराठी साहित्य संमेलन -
पोर्ट ब्लेअर येथे अंदमान निकोबार बेटावर 5 व 6 सप्टें. 2015 रोजी संपन्न झाले.
या संमेलनाचे स्वागताध्यक्ष - खा. राहूल शेवाळे
संमेलनाचे उद्घाटक - शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे.
संमेलन अध्यक्ष - प्रा. शेषराव मोरे.
2. 5 वे स्वातंत्र्यवीर सावरकर विश्व साहित्य संमेलन -
5 सप्टें. 2015 रोजी मॉरिशस देशात संपन्न झाले.
या संमेलनाचे अध्यक्ष - श्याम जाजू
3. 10 ते 13 सप्टें. 2015 दरम्यान आंतरराष्ट्रीय हिंदी परिषद -
मध्यप्रदेशात भोपाळ येथे आयोजित केली होती.
या परिषदेची संकल्पना होती - हिंदी जगत : विस्तार एवम संभवनाई
या संमेलनाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले तर समारोप अभिनेते अमिताभ बच्चन यांनी केला.
पहिले विश्व हिंदी संमेलन 1975 साली नागपूर येथे भरले होते. तर 2007 चे 8 वे न्यूयॉर्क (अमेरिका), 2012 चे 9 वे जोहान्सबर्ग येथे आयोजीत केले होते.भोपाळ येथे आयोजीत केलेले नागपूर, दिल्ली यानंतर हे तिसरे भारतात आयोजीत केलेले विश्व हिंदी संमेलन होते.सन 2018 चे विश्व हिंदी संमेलन मॉरिशस देशात आयोजीत केले जाईल.
4. संयुक्त राष्ट्र संघाची चौथी जागतिक संसद अध्यक्षांची परिषद -
न्यूयॉर्क येथे सप्टेंबर 2015 मध्ये आयोजित करण्यात आली होती.
या परिषदेला लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन व राज्यसभेचे उपाध्यक्ष पी.जे.कुरियन हजर होते.
5. फोरम फॉर इंडिया -
पॅसिफीक आयर्लंड को-ऑपरेशन/भारत - प्रशांत सागरीय व्दिप देश सहकार्य मंच - ची दुसरी शिखर परिषद 21 व 22 ऑगस्ट 2015 मध्ये नवी दिल्ली व जयपूर येथे संपन्न झाली.
या संघटनेची संकल्पना नोव्हें. 2014 मध्ये मोदी यांनी भांडली होती.
या संघटनेची पहिली परिषद नोव्हेंबर 2014 मध्ये फिजी या देशात संपन्न झाली होती.
या संघटनेतील 14 सदस्य देश - भारत, फिजी, किरीबाती, कुक्स बेटे, मार्शल बेटे, टोंगा, तुआलू, वॅनवाटू
या संघटनेतील फिजी देशात सुमारे 38 टक्के लोकसंख्या भारतीय वंशीय आहे.
ही सर्व बेटे दक्षिण पॅसिफीक/प्रशांत महासागरात आग्नेय आशिया व ऑस्ट्रेलिया खंडादरम्यान आहेत.
6. जी-20 देशांच्या अर्थमंत्र्यांची व बँक गव्हर्नरांची परिषद -
4 व 5 सप्टें. 2015 रोजी तुर्कस्तानची राजधानी अंकारा येथे संपन्न झाली.
या परिषदेला भारताचे अर्थमंत्री अरुण जेटली व आरबीआय चे गव्हर्नर रघुराम राजन हजर होते.
7. सीओपी/कॉन्फरन्स ऑफ पार्टीज ची 21वी परिषद -
डिसेंबर 2015 मध्ये फ्रांस देशात पॅरीस येथे भरणार आहे.
8. जी-4 गटांची शिखर परिषद -
26 सप्टेंबर 2015 रोजी न्यूयॉर्क येथे संपन्न झाली.
या संघटनेचे/गटाचे चार सदस्य देश-भारत, जर्मनी, जपान, ब्राझील.
या शिखर परिषदेला जर्मनीच्या चॅन्सलर अँजेला मर्केल, ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्ष डिलीमा रौसेफ, जपानचे पंतप्रधान शिझो अॅबे व भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हजर होते.
संयुक्त राष्ट्र संघटनेच्या कायम सुरक्षा परिषदेचा विस्तार करून जी-4 गटातील चारही देशांना कायमसुरक्षा परिषदेचे सदस्यत्व मिळावे अशी मागणी आहे.
9. पहिली भगवद्गीता जागतिक परिषद इंग्लंड देशात सप्टेंबर 2015 मध्ये संपन्न झाली.
10. संयुक्त राष्ट्र संघाचे 30 नोव्हेंबर ते 31 डिसेंबर 2015 दरम्यान 21 वे जागतिक हवामानबदल विषयक परिषद/संमेलन - पॅरिस (फ्रान्स)
11. सन 2016 चे प्रवासी भारतीय संमेलन - नवी दिल्ली येथे आयोजित केले जाणार आहे.
12. सार्क संघटनेची दुसरी आंतरराष्ट्रीय युवा परिषद 30 सप्टेंबर 2015 रोजी चंदीगड येथे संपन्न झाली.
13. पिपरी चिंचवड येथे सन 2016 मध्ये आयोजित केल्या जाणार्‍या 89 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे बोधचिन्ह तयार करणार्‍या कलावंत - पद्मा इराणी व इरावती मालेगावकर.
14. 2016 च्या 96 व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन-
अध्यक्षपदी जेष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर यांची निवड करण्यात आली.
व्हाया वस्त्रहरण हे त्यांचे आत्मकथन, व ऐसपैस हे पुस्तक आहे.
त्यांनी मालवणी भाषेत लिहिलेली प्रसिद्ध नाटके - वेडी माणसे, दोघी, वर भेटू नका, वर परीक्षा, वस्त्रहरण, वात्रमेले, वन रूम किचन इ.
15. तिसरी भारत-आफ्रिका शिखर परिषद/भारत-आफ्रिका फोरम समिट-
2015-26 ते 30 ऑक्टोबर 2015 - नवी दिल्ली येथे इंदिरा गांधी स्टेडियममध्ये संपन्न झाली.
पहिली भारत - आफ्रिका शिखर परिषद 2008 साली संपन्न झाली. या परिषदेला 14 देशांचे प्रतिनिधी हजर होते.
दुसरी शिखर परिषद 2011 साली इथिओपियाची राजधानी आदिसआबाबा येथे झाली होती. या परिषदेला 15 देशांचे प्रतिनिधी हजर होते.
तिसरी भारत-आफ्रिका शिखर परिषद ही 2014 साली भरणार होती परंतु गेल्या वर्षी आफ्रिका खंडात इबोला रोगाच्या प्रसारामुळे ती रद्द करून यावर्षी घेण्यात आली.
तिसर्‍या परिषदेला भारत सरकारने प्रथमच आफ्रिका खंडातील सर्व 54 देशांना निमंत्रण दिले होते.
या परिषदेला आफ्रिका खंडातील सर्व 54 देशांचे प्रतिनिधी हजर होते यापैकी 25 राष्ट्राध्यक्ष/पंतप्रधान हजर होते. तसेच उर्वरित देशांचे उपराष्ट्राध्यक्ष व परराष्ट्रमंत्री हजर होते.
या परिषदेचे सह अध्यक्ष होते- झिबॉम्बेचे राष्ट्राध्यक्ष रॉबर्ट मुगाम्बे तर अध्यक्ष होते पंतप्रधान नरेंद्र मोदी.
या परिषदेचे उद्घाटन परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी केले तर समारोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.
ही परिषद यापूर्वी तीन वर्षाला आयोजित केली जात होती परंतु यापुढे ती प्रती पाच वर्षाला आयोजित करण्यास या तिसर्‍या परिषदेत मंजूरी देण्यात आली.
भारतात आयोजित केलेली ही सर्वात मोठी आंतरराष्ट्रीय महापरिषद होती.
16. सन 2015 चे अखिल भारतीय उर्दू नाट्य संमेलन सोलापूर येथे आयोजीत केले जाणार आहे.
17. सन 2016 चे 11 वे युरोपीय मराठी संमेलन - हॉलंड/नेदरलँड या देशात आयोजित केले जाणार आहे.
18. श्री संत नामदेव साहित्य संमेलन 2015-
हे पंढरपूर जि.सोलापूर येथे ऑक्टोबर 2015 मध्ये संपन्न झाले.
संमेलनाध्यक्ष - प्रा. डॉ. अशोक कामत.
19. महाराष्ट्र शासनाच्या वतीने आयोजित केले जाणारे पहिले सन 2016 चे युवा साहित्य संमेलन - औरंगाबाद येथे आयोजीत केले जाईल.
  • भारताच्या IRNSS- 1E उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण
इस्रोच्या (भारतीय अवकाश संशोधन संस्था) ‘आयआरएनएसएस-१’ या पाचव्या दिशादर्शक उपग्रहाचे श्रीहरीकोटा‬ येथून यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले.चेन्नईहून सुमारे १०० किमी दूर असलेल्या श्रीहरीकोटा येथून २० जानेवारीला या उपग्रहाने यशस्वी उड्डाण केले.४४.४ मीटर इतकी उंची असलेल्या या उपग्रहाचे वजन १४२५ ग्रॅम इतके आहे.भारताने आत्तापर्यंत चार दिशादर्शक उपग्रह (आयआरएनएसएस-१ए, १बी, १सी आणि १डी) अवकाशात सोडले आहेत.
१ जुलै २०१३ साली आयआरएनएसएस-१ए, तर एप्रिल २०१४ मध्ये आयआरएनएसएस-१बी प्रक्षेपित करण्यात आले..१६ ऑक्टोबर २०१४ साली आयआरएनएसएस- १सी आणि २८ मार्च २०१५ मध्ये आयआरएनएसएस-१डी चे यशस्वी प्रक्षेपण झाले.भारतान पीएसलव्ही -सी ३१ या प्रक्षेपकाव्दारे IRNSS- 1E या पाचव्या दिशादर्शन उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले.पुढच्या दोन महिन्यात आणखी दोन दिशादर्शक उपग्रह अवकाशात पाठवण्यात येणार असून,त्यानंतर भारताची स्वत:ची दिशादर्शक यंत्रणा कार्यान्वित होईल.
याआधी पाठवण्यात आलेल्या चार दिशादर्शक उपग्रहांनीआपले काम सुरु केले आहे.भारताची दिशादर्शक यंत्रणा पूर्णपणे कार्यान्वित झाल्यानंतर अमेरिका, रशिया आणि चीननंतर भारत जगातील असा ‪#‎चौथा‬ देश असेल ज्याच्याकडे स्वत:ची उपग्रह आधारीतदिशादर्शक यंत्रणा असेल.अमेरिकेच्या तोडीची जीपीएस यंत्रणा भारताकडे असेल.या दिशादर्शक यंत्रणेमुळे भारताच्या ज्या सीमा आहेत त्या अधिक सुरक्षित होणार असून, लष्कराला विशेषकरुन क्षेपणास्त्र लक्ष्यभेद करण्यासाठीमदत मिळणार आहे. ‪#‎पीएसएलव्ही‬ प्रक्षेपकाव्दारे केलेले हे ३३ वे यशस्वी प्रक्षेपण होते.
  • नेताजी बोसांनाही होते फॅसिझमचे आकर्षण :
देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतीपुरुष नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या व्यक्तिमत्त्चाविषयी आजही भारतीय जनमानसात मोठे आकर्षण दिसून येते. नेताजी स्वातंत्र्य लढ्याला केवळ आक्रमक रूप देऊन थांबले नाहीत; तर स्वातंत्र्यानंतर आपला देश कसा असावा, याचा ठोस आराखडाही त्यांनी तयार केला होता, त्यांच्या मनामध्ये फॅसिस्ट विचारसरणीचेही सुप्त आकर्षण होते. स्वातंत्र्यपूर्व काळातील भारतातील कम्युनिस्ट नेते रजनीपम दत्त यांनी 24 जानेवारी 1938 मध्ये लंडनच्या 'डेली वर्कर' या दैनिकासाठी नेताजींची मुलाखत घेतली होती. तसेच यामध्ये नेताजींनी समाजवाद आणि फॅसिस्ट विचारसरणीच्या आकर्षणाचा स्पष्टपणे उल्लेख केला होता, याचे नेमके प्रतिबिंब त्यांनी 1935 मध्ये लिहिलेल्या 'दि इंडियन स्ट्रगल' या आत्मचरित्रात्मक ग्रंथामध्ये उमटलेले दिसून येते.
  • ओडिशात डॉल्फिनची गणना :
ओडिशातील भीतरकणिका राष्ट्रीय उद्यानात डॉल्फिनची गणना येत्या 12 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे.
 सलग दुसऱ्या वर्षी ही गणना करण्यात येत आहे, असे राजनगर खारफुटी वन व वन्यजीव विभागाचे अधिकारी विमल प्रसन्न आचार्य यांनी सांगितले. ओडिशाच्या किनारपट्टीवरील धमरानदीपासून देवीनदीच्या मुखापर्यंतच्या भागात दिसणाऱ्या डॉल्फिनची मोजणी यात करण्यात येणार आहे. गेल्या वर्षी झालेल्या गणनेत या भागात इरावडी, बॉटलनोज, हम्पबॅक डॉल्फिन (सॉसा चायनिसीस), हम्पबॅक डॉल्फिन (सॉसा प्लम्बिया), पॅन ट्रॉपिकल स्पॉटेड डॉल्फिन व फिनलेस पॉर्पाइज अशा डॉल्फिनच्या सहा जाती आढळल्या होत्या. 'फिनलेस पॉर्पाइज' जातीचा एक डॉल्फिन हुकीतोला येथे तर अन्य जातींचे डॉल्फिन गहिरमाता अभयारण्यात आढळले. 'हम्पबॅक डॉल्फिन' सर्वाधिक संख्येने येथे आहेत, ओडिशा किनारपट्टीवर डॉल्फिनच्या सुमारे 12 जाती आढळतात.
  • 400 रेल्वे स्थानके वाय-फाय :
जलद आणि मोफत इंटरनेट सेवा मोबाइलवर उपलब्ध व्हावी यासाठी रेल टेल कॉर्पोरेशन आणि गुगलतर्फे मुंबई सेंट्रल स्थानकातील पहिल्या वाय-फाय सेवेचा शुभारंभ (दि.22 रोजी) रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी रेल्वेमंत्री आणि गुगलतर्फे 2018 पर्यंत 400 रेल्वे स्थानकांवर वाय-फाय सुविधा पुरविण्यात येईल, अशी घोषणा करण्यात आली. भारतातील व्यस्त रेल्वे स्थानकांवर वाय-फाय सुविधा गुगलमार्फत देण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला आहे. त्यानुसार मुंबई सेंट्रल स्थानकात ही सुविधा सुरू करण्यात आली, ही वाय-फाय सेवा मोफत आहे.
  • रॉजर फेडररचे ‘ग्रँड’ त्रिशतक :
जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर असलेल्या स्वीत्झर्लंडच्या रॉजर फेडरर याने ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये बल्गेरियाच्या ग्रिगोर दिमित्रोव्हला धूळ चारून आपला 300 वा ग्रँडस्लॅम सामना जिंकला.
 महिला गटात अव्वल टेनिसपटू अमेरिकेची सेरेना विल्यम्स, रशियाच्या मारिया शारापोव्हा यांनी विजयी धडाका कायम राखताना चौथी फेरी गाठली.
  • 'महामना एक्‍स्प्रेस'ला हिरवा झेंडा :
वाराणसी-नवी दिल्लीदरम्यान धावणाऱ्या 'महामना एक्‍स्प्रेस' या नव्या अतिजलद गाडीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवा झेंडा दाखविला. बनारस हिंदू विद्यापीठाचे संस्थापक पं. मदनमोहन मालवीय यांच्या स्मरणार्थ ही गाडी सुरू करण्यात आली आहे, अशा प्रकारच्या अत्याधुनिक गाड्या देशभरात लवकरच सुरू करण्याचे मोदींनी जाहीर केले. वाराणसीतील 'डीएलडब्ल्यू' मैदानावरून मोदींनी दूरनियंत्रकाद्वारे या गाडीला हिरवा झेंडा दाखविला, रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा, तसेच केंद्रीय मंत्री कलराज मिश्रा या वेळी उपस्थित होते. 'महामना एक्‍स्प्रेस' ही गाडी म्हणजे पं. मालवीय यांच्या कर्तृत्वाला वंदन असल्याचे मोदींनी नमूद केले. मुरादाबाद-नवी दिल्लीदरम्यान विद्युत इंजिनाच्या साह्याने धावणारी ही पहिलीच गाडी आहे.
  • प्रजासत्ताक दिनी राजपथावरून 27 विमानांची मानवंदना :
प्रजासत्ताक दिनानिमित्त नवी दिल्लीतील राजपथावर होणाऱ्या संचलनामध्ये यंदा भारतीय हवाई दलाची 27 विमाने सहभागी होणार आहेत. या विमानांकडून होणाऱ्या प्रात्यक्षिकांची सुरुवात चार एमआय-17 व्ही 5 हेलिकॉप्टर्सने होणार आहे, हे हेलिकॉप्टर्स इंग्रजीतील ‘वाय’ अक्षराच्या आकाराने संचलन मार्गावरून जातील.
 दुसऱ्या टप्प्यामध्ये तीन एमआय 35 हेलिकॉप्टर्स संचलनामध्ये सहभागी होतील. ही हेलिकॉप्टर्स ‘Vic’ आकाराने राजपथावरून जाणार आहेत. त्यानंतर तीन सी-130 जे सुपर हर्क्युलस विमाने राजपथावरून जातील. लढाऊ विमानांच्या प्रात्यक्षिकामध्ये पाच जॅग्वार, पाच मिग-29 आणि तीन सुखोई 30 एमकेआय यांचा समावेश असेल. विमानांच्या साह्याने दिल्या जाणाऱ्या मानवंदनेचा शेवट हे नेहमीप्रमाणे सुखोई 30 एमकेआय जातीच्या लढाऊ विमानांच्या प्रात्यक्षिकांनी होणार आहे.
  • भारताचा विकास दर 7.3 टक्के :
भारत यावर्षी 7.3 टक्के विकास दर राखून जगातील मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये सगळ्यात वेगाने विकास दर प्राप्त करणारी अर्थव्यवस्था असेल. संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक अर्थव्यवस्थेच्या अहवालात 2016 मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास दर 7.3 टक्के असेल. दक्षिण आशियाच्या सकल देशी उत्पादनात (जीडीपी) 70 टक्क्यांपेक्षा जास्त वाटा असलेल्या भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास दर 2017 मध्ये 7.5 टक्के असेल. संयुक्त राष्ट्रांनी प्रसिद्धीस दिलेल्या ‘जागतिक आर्थिक स्थिती आणि शक्यता 2016 या अहवालात भारताचीअर्थव्यवस्था जगात सगळ्यात वेगाने वाढणारी असल्याचे म्हटले आहे.
  • राहुल ठक्कर यांना ऑस्कर पुरस्कार :
सुरुवातीला कोर्ट तर त्यानंतर अंतिम फेरीत पोहोचून ऑस्करच्या स्पर्धेतून हेमलकसा बाहेर पडल्याने चित्रपटसृष्टीत कलाकार आणि सर्वच प्रेक्षकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे. मूळचे भारतीय वंशाचे असलेले आणि हॉलिवूडमध्ये काम करणारे राहुल ठक्कर यांना या वर्षीचा ऑस्कर पुरस्कार जाहीर झाला आहे. भारतीय कुटुंबावरील शॉर्टफिल्म ऑस्करसाठी नॉमिनेटेड राहुल आणि त्यांचा सहकारी रिचर्स चॅग यांनी ‘अ‍ॅडव्हान्स प्लेबॅक फीचर्स’ या प्रकारात गेल्या दशकभरात भरीव कार्य केले आहे.एनएसईचा बनारस हिंदु विश्वविद्यालयाशी करारआर्थिक क्षेत्रासाठी दोन नवे अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी राष्ट्रीय शेअर बाजाराने (एनएसई) पुढाकार घेतला आहे.यासाठी एनएसईने बनारस हिंदु विश्वविद्यालयाशी करार केला आहे. या करारांतर्गत बी.कॉम हा पदवी अभ्यासक्रम पूर्ण करताना वित्त बाजार व्यवस्थापन यामध्ये ही पदवी घेता येईल.त्याचप्रमाणे एमबीए करताना ते वित्त व्यवस्थापन या विषयात करता येईल.१९१५मध्ये विशेष कायद्यांतर्गत स्थापन झालेले बनारस हिंदु विश्वविद्यालय चालू आर्थिक वर्षापासूनच वरील दोन्ही अभ्यासक्रम राबवणार आहे.व्यावसायिकदृष्ट्या कुशल व्यवस्थापक व उद्योजक तयार करणे, त्याद्वारे येत्या काही वर्षांत उद्योगजगताकडून येणारी या प्रकारच्या मनुष्यबळाची मागणी पूर्ण करणे हा यामागचा उद्देश आहे.
या अभ्यासक्रमांमुळे कौशल्य उणीव भरून काढणे शक्य होईल.
      
  • क्रिस गेलचे वेगवान अर्धशतक
विंडीजचा स्फोटक फलंदाज क्रिस गेलने टी-२० क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान अर्धशतक ठोकण्याच्या युवराज सिंगच्या विश्वविक्रमाची बरोबरी साधली आहे.त्याने युवीसारखेच १२ चेंडूंमध्ये अर्धशतक पूर्ण केले.
टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील विक्रम अद्यापही युवराजच्या नावे आहे. टी-२० क्रिकेटमध्ये हा विक्रम आता युवराज सिंग आणि क्रिस गेलच्या नावे संयुक्तपणे आहे.गेलने लीगमध्ये मेलबर्न रेनेगेड्सकडून अॅडिलेड स्ट्राइकविरुद्ध हा विक्रम केला .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा