Post views: counter

Current Affairs Feb 2016 Part 1

 

 
  • सशस्त्र सीमा दलाच्या प्रमुख अधिकारी अर्चना रामसुंदरम :
सशस्त्र सीमा दलाच्या प्रमुख म्हणून आयपीएस अधिकारी अर्चना रामसुंदरम यांची नियुक्ती करण्यात आली असून त्या निम-लष्करी दलाच्या प्रमुख होणाऱ्या त्या पहिल्या महिला पोलिस अधिकारी आहेत. 1980 च्या तामिळनाडूच्या तुकडीतील आयपीएस अधिकारी असलेल्या अर्चना रामसुंदरम यांच्या या नियुक्तीने नवा इतिहास घडला आहे. भारत-नेपाळ आणि भारत-भूतान सीमेचे रक्षण करणाऱ्या सशस्त्र सीमा दलाच्या (एसएसबी) महासंचालक म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या आधी त्या राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या (नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरो) संचालक होत्या. तसेच त्यांच्या या नियुक्तीला (सीबीआय अतिरिक्त संचालक) सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. सुरक्षा अस्थापनात फेरबदल करताना केंद्र सरकारने के. दुर्गाप्रसाद यांची केंद्रीय राखीव पोलिस दलाचे महासंचालक म्हणून नियुक्ती केली आहे.
  • भारतीय तटरक्षक दलाच्या स्थापनेला 39 वर्षे पूर्ण :
भारतीय तटरक्षक दलाने (दि.1) देशाच्या आपत्ती निवारण सेवेमधील आपले महत्त्वपूर्ण अस्तित्व आणि आव्हानात्मक वाटचालीचे 40 वे वर्ष साजरे केले. या दलाच्या स्थापनेला 39 वर्षे पूर्ण झाली आणि आता त्यांनी 40व्या वर्षांत पदार्पण केले,आपल्या सागरी सीमांवरील त्यांची कठोर सेवा अनुकरणीय आहे. किनाऱ्यांचे रक्षण करण्यापासून समुद्रात अनेकांचे जीव वाचवणे आणि युद्धनौकांचे प्रदूषण रोखण्यासारख्या सेवेबद्दल आम्हाला  आमच्या तटरक्षक दलाच्या जवानांचा
अभिमान वाटतो, असे प्रंतप्रधान म्हणतात. भारतीय तटरक्षक दलाची स्थापना 1 फेब्रुवारी 1977 रोजी करण्यात आली होती. 1978 मधील तटरक्षक दल कायद्यामुळे हे दल केंद्रीय संरक्षण मंत्रालयांतर्गत पूर्णपणे स्वतंत्र लष्करी दल म्हणून कार्यरत झाले. कोणत्याही बिकट परिस्थितीचा सामना करण्याच्या दृष्टीने एक प्रभावी उपाययोजना निश्‍चित करण्यासाठी टेहळणी, गोपनीय माहिती मिळविणे आणि संबंधित विविध घटकांदरम्यान माहितीची देवाणघेवाण करण्यावर भर देताना तटरक्षक सुरक्षा मोहिमेत बदल करण्यात आला असल्याची माहिती तटरक्षक दलाने स्थापना दिनानिमित्त एका निवेदनाद्वारे दिली.
  • महाराष्ट्र केसरी समाधान घोडके यांनी पुन्हा बाजी मारली :
2012 मध्ये मीरा रोड येथे झालेल्या कुस्तीतील विजयी मल्ल महाराष्ट्र केसरी समाधान घोडके याने (दि.31) येथील अभिनव विद्यामंदिर पटांगणात पार पडलेल्या कुस्त्यांच्या आखाड्यात पुन्हा बाजी मारली.
 आपल्या लौकिकानुसार खेळ करताना समाधानने सहज वर्चस्व राखले.
 तसेच प्रथमच महिलांसाठी खेळण्यात आलेल्या कुस्तीमध्ये भार्इंदरच्याच कोमल देसाईने विजेतेपदावर कब्जा केला. संजीवनी फाउंडेशन व मीरा-भार्इंदर कुस्तीगीर संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मैदानी कुस्ती स्पर्धेतील पहिल्या क्रमांकाची कुस्ती कोल्हापूरचा महाराष्ट्र केसरी समाधान घोडके व विटाच्या बेनापूर गावातील महाराष्ट्र चॅम्पियन अप्पा बुटे यांच्यात खेळविण्यात आली.
  • सानिया-हिंगीस प्रथम स्थानी :
ऑस्ट्रेलियन ओपनच्या महिला दुहेरीच्या विजेतेपदासह सलग तिसरे ग्रँडस्लॅमचे अजिंक्यपद पटकावणारी भारताची सानिया मिर्झा आणि स्वीत्झर्लंडची मार्टिना हिंगीस या जोडीने (दि1) जाहीर झालेल्या ताज्या रँकिंगमध्ये एकसमान 12925 गुणांसह संयुक्तरूपाने ‘नंबर वन’वर स्थान मिळवला. सानिया आणि हिंगीसने आपले अव्वल स्थान कायम ठेवले, या दोन्ही खेळाडू आणि तिसऱ्या स्थानावरील कॅसी डेलाकुआ यांच्यात मोठ्या अंतराचा फरक आहे. महिला एकेरीत अमेरिकेची सेरेना विलियम्स 9245 गुणांसह अव्वल स्थानी कायम आहे, तर नवीन चॅम्पियन जर्मनीची एंजेलिक केर्बरने 5700 गुणांसह महिला रँकिंगमध्ये दुसरे स्थान प्राप्त केले आहे. भारताचा दुहेरी तज्ज्ञ रोहन बोपण्णाने आपल्या दुहेरीच्या रँकिंगमध्ये एका स्थानाने प्रगती केली आहे आणि आता तो आठव्या स्थानी पोहोचला आहे.
  • ‘गुगल’कडून ‘5 जी’ इंटरनेटची चाचपणी :
इंटरनेट स्पीडची ‘4 जी’ सुविधा दाखल झाली असतानाच आता ‘गुगल’कडून न्यू मेक्सिको येथे ‘5 जी’ इंटरनेटसाठीची चाचपणी घेण्यात आल्याचे वृत्त ‘द गार्डियन’ वृत्तसंस्थेने दिले आहे. सध्याच्या ‘4 जी’ सेवेपेक्षा अनेकपट जलद इंटरनेट सेवा पुरविण्यासाठी सौरउर्जेवर चालणाऱया ड्रोनच्या साहाय्याने ‘5 जी’ इंटरनेटसाठीची न्यू मेक्सिको येथे चाचणी घेण्यात आली आहे. ‘गुगल’ची ही ‘5 जी’ इंटरनेट सेवा ‘हाय फ्रिक्वेन्सी मिलिमीटर वेव्ह’ तंत्रज्ञानावर आधारलेली असून, प्रत्येक सेकंदाला जीबीचा डाटा स्पीड उपलब्ध होईल इतकी तगडी सेवा नेटिझन्सला मिळू शकेल.
 दरम्यान, उंचावरील ड्रोनकडून मिलीमीटर व्हेव तंत्रज्ञान वापरणे हे आव्हान असले तरी त्यावर तोडगा काढण्यासाठीचे प्रयत्न गुगलकडून सुरू आहेत.   ‘गुगल’ने या ‘5 जी’ इंटरनेट प्रकल्पाला ‘स्कायबेंडर’ असे नाव दिले आहे. ड्रोन्सद्वारे इंटरनेटची सुविधा उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न करणारी गुगल ही पहिली कंपनी नाही, याआधी फेसबुकनेही अॅक्विला प्रकल्पाअंतर्गत सौरऊर्जेवर चालणाऱया ड्रोनच्या सहाय्याने इंटरनेट सेवेची चाचपणी केली होती.
  • राज्य नावीन्यता परिषदेच्या नोंदणीला मंत्रिमंडळाची मान्यता :
राज्य शासनाने स्थापन केलेल्या राज्य नावीन्यता परिषदेला संस्था नोंदणी अधिनियमानुसार स्वतंत्र शासकीय संस्था म्हणून नोंदणी करण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. तसेच या परिषदेचे सहअध्यक्ष म्हणून ज्येष्ठ शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर यांची निवड करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या स्टार्ट अप योजनेला चालना देण्यासाठी राज्य नावीन्यता परिषदेच्या नोंदणीला मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. राज्य नावीन्यता परिषदेच्या पदसिद्ध अध्यक्षपदी राज्याचे मुख्य सचिव असतील. स्टार्ट अपला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने रिझर्व्ह बॅंक सहाय्य करणार आहे. तसेच या योजनेअंतर्गत नवउद्योजकांना पुरेशा प्रमाणात भांडवल उपलब्ध व्हावे, यासाठी बॅंकेकडून कृती आराखडा तयार केला जाणार आहे, अशी माहिती बॅंकेचे गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांनी (दि.2) दिली.

 व्याप्ती
  1.  नव्या संकल्पनांचा आराखडा तयार करणे
  2.  नव्या संकल्पनांचा शोध घेण्यासाठी विद्यार्थी, तरुणांना मार्गदर्शन करणे
  3.  पूरक वातावरणाची निर्मिती करणे
  4.  जोखीम भांडवलाच्या उभारणीसाठी मदत करणे
  5.  सर्व जिल्ह्यांत जिल्हा नावीन्यता परिषदेची स्थापना करणार


  • उत्तर प्रदेश सरकारने नवे पर्यटन धोरण :
पर्यटनाला आणखी चालना देण्याच्या दृष्टीने उत्तर प्रदेश सरकारने नवे पर्यटन धोरण तयार केले असून, नव्या हॉटेलच्या बांधणीला दहा कोटी रुपयांपर्यंतचे अंशदान हे त्याचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे.
 राज्य विधानसभेची निवडणूक एक वर्षावर आलेली असताना मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या सरकारने हे नवे धोरण जाहीर केले आहे. राज्याच्या नोकरशाहीत अनेक जबाबदाऱ्या पार पाडणारे पर्यटन विभागाचे मुख्य सचिव नवनीत सहगल यांनी हे धोरण जाहीर केले. या नव्या पर्यटन धोरणामुळे उत्तर प्रदेशातील पर्यटनच केवळ वाढणार नाही, तर सरकारलाही फायदा होईल, अशा पद्धतीने त्याची आखणी करण्यात आली आहे.
  • ऑलिम्पियन संजीव राजपूतनला रिओ ऑलिम्पिक स्पर्धेसाठी कोटा प्राप्त :
दोन वेळचा ऑलिम्पियन संजीव राजपूतने आशियाई ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत पुरुष गटात 50 मीटर रायफल थ्री पोझिशनमध्ये चौथे स्थान पटकाविले. तसेच याबरोबरच त्याने आगामी रिओ ऑलिम्पिक स्पर्धेसाठी कोटा प्राप्त केला. भारतासाठी हा 12 वा असा विक्रमी कोटा ठरला, राजपूतच्या या कामगिरीनंतर क्रीडासंग्रामात आता भारताचे आतापर्यंतचे सर्वाधिक नेमबाज सहभागी होणार आहेत. चार वर्षांपूर्वी लंडन येथे भारताने 11 नेमबाजांची टीम पाठविली होती. डॉ. कर्णी सिंह शूटिंग रेंज येथे आठ खेळाडूंच्या फायनलमध्ये 249.5 गुण मिळवत राजपूतने देशासाठी कोट प्राप्त केला, त्याने 1163 या स्कोअरसह चौथा क्रमांक मिळवत फायनलसाठी पात्रता मिळवली होती.
  • व्हॉटस्अ‍ॅपचे जागतिक स्तरावर एक अब्ज युजर्स :
मोबाईल मॅसेजिंग व्हॉटस्अ‍ॅपने गेल्या पाच महिन्यांत 10 कोटी वापरकर्ते (युझर्स) जोडून घेऊन जागतिक स्तरावर एक अब्ज युजर्सचा टप्पा ओलांडला आहे. व्हॉटस्अ‍ॅपने ब्लॉगपोस्टवर म्हटले आहे की, आजच्या तारखेत एक अब्ज लोक व्हॉटस्अ‍ॅपचा वापर करीत आहेत. पृथ्वीवरील प्रत्येक सात व्यक्तींतील एक जण आपल्या प्रियजनांच्या संपर्कात राहण्यासाठी दरमहा व्हॉटस्अ‍ॅपचा वापर करीत आहे. फेब्रुवारी 2015 मध्ये व्हॉटस्अ‍ॅपचा फेसबुकद्वारे 19 अब्ज डॉलरमध्ये ताबा घेण्यात आला आहे. फेसबुकवरील एका पोस्टमध्ये सह संस्थापक जॉन कोऊम यांनी म्हटले आहे की, या प्लॅटफॉर्मवर प्रत्येक दिवशी 42 अब्ज संदेश, 1.6 अब्ज फोटो आणि 25 कोटी व्हिडिओज पाठविले जातात.
  • भारताच्या फुटबॉल संघाची घोषणा :
गुवाहाटी येथे होणाऱ्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी (सॅग) केवळ चार दिवस बाकी असताना अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने (एआयएफएफ) 28 खेळाडूंच्या संभावित भारतीय संघाची घोषणा केली.
 विशेष म्हणजे, 31 जानेवारीपासून गुवाहाटी येथे सुरू झालेल्या सराव शिबिरामध्ये यापैकी 21 खेळाडू याआधीच सहभागी झाले आहेत. ‘अ’ गटात समावेश असलेल्या भारतापुढे गटात श्रीलंका व मालदीव यांचे आव्हान असेल.
 भारताचा सलामीचा सामना 6 फेब्रुवारीला श्रीलंकेविरुद्ध होईल.
  • रिझर्व्ह बॅंकेकडून रेपो दर स्थिर :
अपेक्षेप्रमाणे रिझर्व्ह बॅंकेने (दि.2) पतधोरण आढाव्यात रेपो दराला कोणताही हात न लावता तो कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. सध्या 6.7 टक्के रेपो दर पुढील पतधोरण आढाव्यापर्यंत कायम ठेवण्यात आला आहे.
 तसेच त्याचबरोबर रोख राखीवता प्रमाणामध्येही (सीआरआर) बॅंकेने कोणताही बदल केलेला नसून, तो 4 टक्क्यांवर कायम ठेवण्यात आला आहे. रिझर्व्ह बॅंकेचा चालू आर्थिक वर्षातील सहावा द्विमासिक पतधोरण आढावा (दि.2) गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांनी जाहीर केला. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाचे सध्याचे दर आणि सर्वसामान्य मान्सूनची शक्यता गृहीत धरून चलनवाढीचा दर 5 टक्क्यांचा आसपास राहण्याचा अंदाज रिझर्व्ह बॅंकेने वर्तविला आहे. चालू आर्थिक वर्षातील विकास दर 7.4 टक्क्यांपर्यंत राहण्याचा अंदाच बॅंकेने वर्तविला आहे.
  • महाराष्ट्रातील पाच विद्यार्थ्यांना आंबेडकर पुरस्कार :
दहावी व बारावीच्या गुणवत्ता यादीत प्रथम येणाऱ्या महाराष्ट्रातील पाच विद्यार्थ्यांना दिल्लीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय गुणवत्ता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच 60 हजार रुपये रोख आणि पुस्तके असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. देशातील विविध राज्यांतून गुणवत्ता यादीत प्रथम येणाऱ्या अनुसूचित जाती व जमातीच्या विद्यार्थ्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्रातून दहावीच्या गुणवत्ता यादीत मराठी माध्यमातून प्रथम आलेला श्रीपतराव भोसले हायस्कूल उस्मानाबादचा विद्यार्थी राहुल बनसोडे आणि इंग्रजी माध्यमातून प्रथम आलेला होलीसिटी हायस्कूल नांदेडचा विद्यार्थी सार्थक अक्कुलवार यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच बारावीच्या गुणवत्ता यादीत कला शाखेतून प्रथम येणारा लातूरच्या दयानंद कला महाविद्यालयाचा विद्यार्थी राहुल डोंगरे, विज्ञान शाखेतून प्रथम आलेल्या नागपूर येथील डॉ. आंबेडकर महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी प्रांजली खांडेकर आणि ऋतुजा बडगे यांनाही पुरस्कार प्रदान करण्यात आला.
 सामाजिक न्याय मंत्रालयातर्फे इंडिया हॅबीटॅट सेंटरमध्ये निबंध स्पर्धा आणि गुणवत्ता पुरस्कारांचे वितरण केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गेहलोत यांच्या हस्ते करण्यात आले.
  • 'एसपीव्ही'ला स्थापन करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाकडून मंजुरी :
रेल्वेचे राज्यांमधील रखडलेले पायाभूत प्रकल्प वेगाने पूर्ण करण्यासाठी राज्यांशी भागीदारी असलेली विशेष संयुक्त कंपनी (स्पेशल पर्पज व्हेईकल) स्थापन करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.
 पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय झाला, यामुळे राज्य सरकारे आपापल्या भागातील महत्त्वाचे रेल्वे प्रकल्प मार्गी लावण्यासाठी रेल्वेशी संयुक्त कंपनीचा करार करता येईल.
 मंत्रिमंडळ बैठकीनंतर ऊर्जामंत्री पीयूष गोयल यांनी पत्रकार परिषदेत निर्णयांची माहिती दिली.
 पायाभूत प्रकल्प पूर्ण करण्यासाठी राज्यांबरोबरच बॅंका, सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या, खाण कंपन्या; तसेच राज्यांसमवेत संयुक्त कंपन्या स्थापन करण्यासाठी रेल्वेला परवानगी देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला.
 संबंधित राज्यांशी रेल्वे मंत्रालयाच्या करारातून संयुक्त कंपनी स्थापन होईल.
 तसेच या कंपनीसाठी प्रत्येक राज्याला रेल्वेतर्फे प्रत्येकी 50 कोटी रुपयांचे अर्थसाह्य दिले जाईल; तर राज्यांचा सहभाग तेवढाच (50 कोटी रुपये) असेल.
  • ऐतिहासिक पाटणा उच्च न्यायालयाची शंभराव्या वर्षांत पदार्पण :
युरोपियन वास्तूरचनेचा सुंदर अविष्कार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ऐतिहासिक पाटणा उच्च न्यायालयाच्या वास्तूने (दि.4) शंभराव्या वर्षांत पदार्पण केले. पल्लेडियन डिझाइनवर आधारित 'निओ क्‍लासिकल' शैलीमध्ये या इमारतीची उभारणी करण्यात आली आहे. तसेच या इमारतीच्या उभारणीचे काम 1 डिसेंबर 1913 मध्ये पूर्ण झाले होते, त्यानंतर 3 फेब्रुवारी 1916 रोजी तत्कालीन व्हाइसराय लॉर्ड चार्ल्स हार्डिंग्ज यांच्या हस्ते तिचे उद्‌घाटन झाले होते. या इमारतीच्या उभारणीचे काम सुरू असतानाच पहिल्या जागतिक महायुद्धाचा भडका उडाला होता, त्यामुळे इंग्रज सरकारला नव्या राजधानीच्या उभारणीवरील खर्चामध्येही लक्षणीय कपात करावी लागली होती.
 तसेच यामुळे सचिवालयाच्या इमारती आणि अन्य कार्यालयांच्या उभारणीसही ब्रेक लागला होता.
 पण बिहार आणि ओडिशा प्रांतांचे तत्कालीन राज्यपाल सर एडवर्ड गैत यांनी पुढाकार घेऊन या इमारतीच्या उभारणीचे बांधकाम पूर्ण केले होते.
  • ज्येष्ठ सारंगीवादक पं. राम नारायण यांना पं. भीमसेन जोशी पुरस्कार :
स्व. पंडीत भीमसेन जोशी यांच्या नावे शास्त्रीय संगीतासाठी दिला जाणारा सन 2015-16 चा पुरस्कार ज्येष्ठ सारंगीवादक पंडीत राम नारायण यांना जाहीर झाला आहे.
 प्रतिवर्षी राज्य शासनातर्फे शास्त्रीय गायन व वादन या क्षेत्रात प्रदीर्घ काळ उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कलाकारास भारतरत्न पंडीत भीमसेन जोशी यांच्या नावे शास्त्रीय संगीत क्षेत्रातील जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. तसेच या पुरस्काराचे स्वरूप रुपये 5 लाख रोख, मानपत्र, सन्मानचिन्ह असे आहे.
 यापूर्वी हा पुरस्कार गानसरस्वती किशोरी आमोणकर, पंडीत जसराज आणि श्रीमती प्रभा अत्रे यांना प्रदान करण्यात आला आहे.
  • आंतरराष्ट्रीय नौदल ताफा संचलनासाठी 53 देशांच्या 90 युद्धनौका :
भारतीय नौदलातर्फे आयोजित दुसऱ्या आंतरराष्ट्रीय नौदल ताफा संचलनासाठी 53 देशांच्या 90 युद्धनौका येथील नौदल बंदरात दाखल झाल्या आहेत. भारतीय नौदलाच्या आयएनएस सुमित्रा, आयएनएस सुमेधा, आयएनएस शरयू, आयएनएस सुनयना या चार गस्तीनौकांचा ताफा राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्यासाठी सज्ज ठेवण्यात आला आहे. संचलनासाठीची रंगीत तालीम (दि.3) विशाखापट्टणम बंदरापासून आतमध्ये खोल समुद्रात पार पडली, एकूण 90 युद्धनौका, सहा रांगांमध्ये उभ्या करण्यात आल्या होत्या.
 प्रत्यक्ष 6 फेब्रुवारी रोजी राष्ट्रपतींना मानवंदना देण्यासाठी या युद्धनौका याच रचनेमध्ये उभ्या असतील.
 सध्या येथे येऊन दाखल झालेल्या नौदलांमध्ये अमेरिका, ब्रिटन, रशिया, चीन, ओमान, श्रीलंका, बांगलादेश, ब्राझील, मालदिव, मॉरिशस व ऑस्ट्रेलिया आदींचा समावेश आहे.
 अमेरिकेचे नौदल 10 हजार टन वजनाच्या मिसाईल गायडेड क्रूझर युद्धनौकेसह दाखल झाले आहे.
 भारतीय नौदलातील दोन्ही विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रमादित्य व आयएनएस विराट या निमित्ताने प्रथमच एकत्र पाहायला मिळतील.
  • लोकसभेचे माजी अध्यक्ष डॉ. जाखड यांचे निधन :
लोकसभेचे माजी अध्यक्ष आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. बलराम जाखड यांचे (दि.3) येथे निधन झाले, ते 92 वर्षांचे होते. डॉ. जाखड हे 1980 ते 1989 या कालावधीत लोकसभेचे अध्यक्ष होते. माजी पंतप्रधान नरसिंह राव यांच्या मंत्रिमंडळात डॉ. जाखड यांनी कृषिमंत्रिपदही भूषविले होते. जून 2004 ते मे 2009 या कालावधीत ते मध्य प्रदेशचे राज्यपाल होते.
यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार जाहीर :
राज्य सरकारतर्फे उत्कृष्ट मराठी वाङ्‌मयनिर्मितीसाठी दिले जाणारे स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार-2014 जाहीर करण्यात आले आहेत. एक लाख व 50 हजार रुपये अशा दोन विभागांत हे पुरस्कार आहेत. उत्कृष्ट साहित्यनिर्मितीला प्रोत्साहन मिळावे यासाठी दर वर्षी उत्कृष्ट वाङ्‌मय पुरस्कार दिले जातात.
 ‘सकाळ’चे विजय नाईक, गजेंद्र बडे यांचा यात समावेश आहे. काव्य विभागातील प्रथम प्रकाशनाचा एक लाख रुपयांचा कवी केशवसुत पुरस्कार मनोहर जाधव यांच्या ‘तीव्र एकांतातल्या जीर्ण काळोखात’ या संग्रहाला तसेच याच विभागातील 50 हजारांचा बहिणाबाई चौधरी पुरस्कार विनायक येवले यांच्या ‘ठसे बदललेल्या मुक्कामावरून’ या संग्रहाला मिळाला. नाटक-एकांकिका विभागातील राम गणेश गडकरी पुरस्कार प्रा. मधू पाटील यांच्या ‘कामस्पर्शिता- पाच एकांकिका’ला जाहीर झाला. कादंबरी विभागात एक लाख रुपयांचा हरी नारायण आपटे पुरस्कार राजन खान ‘रजे हो ऊर्फ मुद्दाम भरकटलेली कथा’ला आणि प्रथम प्रकाशन विभागातील 50 हजारांचा श्री. ना. पेंडसे पुरस्कार व्यंकट पाटील यांच्या ‘घात’ या कादंबरीला मिळाला. 

जगातील सर्वात हिंसक शहर :
मेक्सिको सिटिजन कौन्सिल फॉर पब्लिक सिक्युरिटीने प्रसिध्द केलेया अहवालानुसार व्हेनेझुएलामधील कराकस शहर जगातील सर्वात हिंसक शहर ठरले आहे. तसेच प्रत्येक वर्षी तेथे एक लाख लोकांमध्ये 120 लोकांची हत्या होत असते. व्हॉयलन्स ऑब्झर्व्हेटरीच्या अंदाजानुसार, 2015 मध्ये कराकस शहरात 27 हजारापेक्षा जास्त खुन झाले आहेत. मागील चार वर्षांपासून हॉन्डूरसचा सेन पेड्रो सुला शहर यादीत वरच्या क्रमांकावर होते, मात्र यंदा कराकसने आता हे स्थान मिळवले आहे.
  • महत्वाच्या आंतरराष्ट्रीय संघटना :
  1. युनोचा मुलांसाठीच्या निधी उपक्रमाचा सदिच्छादूत बनला - नोव्हाक झोकोव्हीच.
  2.  दरवर्षी संयुक्त राष्ट्र संघाची/युनोची वार्षिक आम सभा सप्टेंबर महिन्यात न्यूयॉर्क (अमेरिका) येथे युनोच्या मुख्यालयात आयोजित केली जाते.
  3.  सप्टें. 2015 मध्ये संपन्न झालेल्या 70 व्या संयुक्त राष्ट्र संघाच्या आमसभेचे अध्यक्ष होते - मॉगेन्स लिक्वेटॉफ्ट
     एनएसजी ग्रुप/न्यूक्लियर सप्लायर ग्रुप या संघटनेत सदस्य देशांची संख्या 45 आहे.
  4.  सप्टेंबर 2015 मध्ये पॅलेस्टाईन देशाचा ध्वज संयुक्त राष्ट्र संघाच्या मुख्यालयात न्यूयॉर्क येथे फडकविण्यास मान्यता देण्यात आली.
  5.  पॅलेस्टाईनला संयुक्त राष्ट्राचा निरीक्षक देश म्हणून 2012 साली मान्यता दिली होती.
  6.  भारताने पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता दिली आहे.
  7.  संयुक्त राष्ट्र संघाच्या अणु चाचणीत बंदी करार संघटनेचे/सीटीबीटी/कॉम्परेहेन्सीव्ह टेस्ट बॅन ट्रिटी संघटना अध्यक्ष - लॅसिनो झेरबो.
  8.  या संघटनेचे सदस्य देश - 196
     196 सदस्य देशांपैकी 183 देशांनी सीटीबीटी करारावर सह्या केल्या आहेत. सीटीबीटी करारावर सह्या न करणारे देश - भारत, पाकिस्तान, उत्तर कोरिया, अमेरिका, चीन, इस्त्राईल, ईराण, इजिप्त
  9.  संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा परिषदेतील कायम/स्थानी 5 सदस्य देश - अमेरिका, रशिया, ब्रिटन, चीन व फ्रान्स. कायम सुरक्षा परिषदेत सदस्य होण्यासाठी जी फोर देशांचा गट प्रयत्न करत आहे. या जी फोर गटात ब्राझील, जर्मनी, जपान, व भारत या चार देशांचा प्रयत्न आहे.
  10.  सुरक्षा परिषदेत अस्थायी/तात्पुरते 10 सदस्य देश असतात. या देशात आफ्रिका खंडातील 3 आणि आशिया, पश्चिम युरोप, द. अमेरिका या खंडातून 2 सदस्य देश, पूर्व युरोपीय देशातून 1 सामील असतात.
  • यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार जाहीर :
राज्य सरकारतर्फे उत्कृष्ट मराठी वाङ्‌मयनिर्मितीसाठी दिले जाणारे स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार-2014 जाहीर करण्यात आले आहेत.
 एक लाख व 50 हजार रुपये अशा दोन विभागांत हे पुरस्कार आहेत.
 उत्कृष्ट साहित्यनिर्मितीला प्रोत्साहन मिळावे यासाठी दर वर्षी उत्कृष्ट वाङ्‌मय पुरस्कार दिले जातात.
 ‘सकाळ’चे विजय नाईक, गजेंद्र बडे यांचा यात समावेश आहे.
 काव्य विभागातील प्रथम प्रकाशनाचा एक लाख रुपयांचा कवी केशवसुत पुरस्कार मनोहर जाधव यांच्या ‘तीव्र एकांतातल्या जीर्ण काळोखात’ या संग्रहाला.
 तसेच याच विभागातील 50 हजारांचा बहिणाबाई चौधरी पुरस्कार विनायक येवले यांच्या ‘ठसे बदललेल्या मुक्कामावरून’ या संग्रहाला मिळाला.
 नाटक-एकांकिका विभागातील राम गणेश गडकरी पुरस्कार प्रा. मधू पाटील यांच्या ‘कामस्पर्शिता- पाच एकांकिका’ला जाहीर झाला.
 कादंबरी विभागात एक लाख रुपयांचा हरी नारायण आपटे पुरस्कार राजन खान ‘रजे हो ऊर्फ मुद्दाम भरकटलेली कथा’ला आणि प्रथम प्रकाशन विभागातील 50 हजारांचा श्री. ना. पेंडसे पुरस्कार व्यंकट पाटील यांच्या ‘घात’ या कादंबरीला मिळाला.

  • ‘एमसीएक्स’ला अॅसोचॅमचा पुरस्कार :
भारतातील क्रमांक एकचा वस्तू वायदा बाजार मल्टी कमॉडिटी एक्स्चेंज ऑफ इंडिया लि. (एमसीएक्स)ने अॅसोचॅमने नवी दिल्ली येथे आयोजित केलेल्या 14 व्या कमॉडिटी फ्युचर्स मार्केट समीट आणि प्रावीण्य पुरस्कार सोहळ्यात मानाचा पुरस्कार पटकावला.
 भारताच्या वस्तू वायदा बाजारामध्ये विविध किंमत आणि जोखीम व्यवस्थापनाचे मजबूत आणि कार्यक्षम व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल एमसीएक्सला या सोहळ्यात सन्मानित करण्यात आले.
 केंद्रीय कृषीमंत्री राधा मोहन सिंग यांच्या हस्ते एमसीएक्सचे सह व्यवस्थापकीय संचालक पी. के. सिंघल यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
  • माणसाचे मन जाणून घेणारी आज्ञावली विकसित :
माणसाचे मन कधी कुणाला कळत नाही, एखाद्याने आपल्या मनातली गोष्ट सांगितली तर आपण त्याला मनकवडा म्हणतो खरे, पण तो केवळ योगायोग असतो.
 एखाद्या व्यक्तीच्या मेंदूतून आलेले संदेश गोळा करून त्यांचे विश्लेषण करून लोकांचे विचार जाणून घेण्याचा प्रयोग वैज्ञानिकांनी यशस्वी केला असून त्यात एका भारतीय वैज्ञानिकाचा समावेश आहे.
 तसेच या प्रयोगात माणसाच्या मनातील विचार ओळखण्यात 96 टक्के यश आले आहे. माणसाचे मन म्हणजे त्याचे विचार सांगणारी आज्ञावली तयार करण्यात आली आहे.
 वॉशिंग्टन विद्यापीठातील मेंदूवैज्ञानिक राजेश राव यांनी सांगितले की, मानवी मेंदूला वस्तूंचे आकलन कसे होते व दुसरे म्हणजे एखादी व्यक्ती वास्तवात काय विचार करीत आहे हे संगणकाद्वारे कसे सांगता येईल हे आमचे दोन उद्देश होते.
 वैद्यकीयदृष्टया तुम्ही आमचे निष्कर्ष हे सकारात्मक कारणासाठी वापरू शकता.
 तसेच जे लोक विकलांग आहेत त्यांना मेंदूचे संदेश अवयवांपर्यंत न पोहोचल्याने हालचाली करता येत नाहीत. ही अडचण आमच्या संशोधनातून दूर होऊ शकते.
  • जगातील पहिली लस झिका व्हायरसवर :
भारत बायोटेक इंटरनॅशनलने झिका व्हायरसवर जगातील पहिली लस निर्माण केली आहे.
 भारत बायोटेकचे प्रमुख डॉ. कृष्णा एल्ला यांनी सांगितले की, ‘आम्ही अशा प्रकारची लस निर्माण करणारी पहिली कंपनी आहोत.'
 झिका लसीसाठी 9 महिन्यांपूर्वीच आपण पेटंट अर्ज दाखल केला आहे.
 कंपनीने आपल्या लसीचा प्रयोग मनुष्य आणि प्राण्यांवर करण्याची परवानगी भारत सरकारकडे मागितली आहे.
  • रशियासोबतचा हेलिकॉप्टर्स खरेदीचा करार :
रशियाच्या रोस्टेक स्टेट कार्पोरेशनच्या रोसोबोरॉन एक्सपोर्ट या कंपनीशी आधी केलेल्या करारानुसार कझान हेलिकॉप्टर प्रकल्पातून एमआय 17 व्ही 5 या हेलिकॉप्टर्सचा शेवटचा टप्पा भारताला देण्यात आला.
 एकूण 151 हेलिकॉप्टर्स भारताने विकत घेतली आहेत.
 रशियन हेलिकॉप्टर्सचा भारत हा महत्त्वाचा ग्राहक आहे.
 रशियाकडून भारताने 400 हेलिकॉप्टर्स घेतली आहेत.
 आता भारतीय हवाई दल आणखी 48 हेलिकॉप्टर्स घेणार असून त्यांचा वापर वाळवंटी व पर्वतीय प्रदेशात केला जाणार आहे.
  •  भारतीय महिलांची 'गिनेस' नोंद
 
➡ जगभरातील भारतीय महिलांनी 11 हजार 148 चौरस मीटरचे मोठे ब्लॅंकेट बनवून रविवारी (ता. 31) विश्‍वविक्रम केला.
➡ गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये याची नोंद झाली आहे, चेन्नई येथे ही घोषणा करण्यात आली.
➡ जगातील सर्वांत मोठी लोकरीची शाल विणण्याचा विक्रम या महिलांनी मोडला आहे.
➡ ठाणे, मुंबई, नवी मुंबई, कल्याण, नाशिक, नागपूर, गुरगाव, हैदराबादसह सिंगापूर, ओमान, मस्कत, बहारीन, यूएस, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमधील भारतीय महिला या उपक्रमात सहभागी झाल्या होत्या, ऑगस्ट 2015 पासून हे ब्लॅंकेट विणण्याचे काम सुरू होते.
➡ यापूर्वी दक्षिण आफ्रिकेतील महिलांनी तीन हजार 377 चौरस मीटरची शाल विणून गिनेस बुकमध्ये नोंद केली होती, हा विक्रम मोडत भारतीय महिलांनी 11 हजार 148 चौरस मीटरचे मोठे ब्लॅंकेट विणून विश्‍वविक्रम केला आहे.
  • नोव्हाक जोकोवीचला टेनिस स्पर्धेत सहाव्यांदा जेतेपदाचा मान
➡ जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेला सर्बियाच्या नोव्हाक जोकोवीचने वर्चस्व कायम राखताना क्रमवारीत दुसऱ्या स्थानी असलेल्या ब्रिटनच्या अ‍ॅण्डी मरेचा (दि.31) अंतिम लढतीत 6-1, 7-5, 7-6 ने पराभव केला.
➡ ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेत विक्रमी सहाव्यांदा जेतेपदाचा मान मिळवला.
  • पीक विमा योजनेचा लाभ
➡ गेल्या काही वर्षांत शेतकऱ्यांच्या हिताच्या चर्चा खूप झाल्या, कृती मात्र कमी झाली, या पाश्र्वभूमीवर अलीकडेच केंद्र सरकारने पंतप्रधान पीक विमा योजना अंमलात आणली आहे.
➡ या योजनेचा अधिकाधिक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, येत्या दोन वर्षांत देशातील किमान निम्म्या शेतकऱ्यांनी तरी या योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे, आकाशवाणीवरील ‘मन की बात’ या कार्यक्रमात मोदी यांनी हे आवाहन केले.
➡ शेतकऱ्यांसाठी पीक विमा योजना अलीकडेच सुरू करण्यात आली आहे.
➡ तसेच या योजनेबाबत पंतप्रधान म्हणाले की, ‘नैसर्गिक संकटात सर्वाधिक नुकसान होते ते शेतकऱ्यांचे. त्यांची वर्षभराची मेहनत वाया जाते.
➡ अशा परिस्थितीत त्यांना आश्वस्त करण्यासाठी, त्यांना सुरक्षेची हमी देण्यासाठी म्हणून पीक विमा योजना सुरू करण्यात आली आहे.
➡ अधिकाधिक शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा अशी माझी इच्छा आहे.
➡ त्यामुळे या योजनेची अधिकाधिक प्रसिद्धी करण्याची गरज असून त्यासाठी मला शेतकऱ्यांच्या मदतीची गरज आहे.
➡ या विमा योजनेचा प्रीमियमही खरीप पिकासाठी दोन टक्के तर रब्बी पिकासाठी दीड टक्का एवढा अत्यल्प आहे.
➡ पिकाची काढणी होऊन 15 दिवसांनी जरी नुकसान झाल्यास ही योजना शेतकऱ्यांसाठी लागू राहणार आहे’.
  • एका मिस कॉलवर ऐकता येणार ‘मन की बात’
➡ देशातील जनतेशी संवाद साधण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रेडिओवर सुरु केलेला’मन की बात’ हा कार्यक्रम आता मोबाईलवरही ऐकता येणार आहे.
➡ 8190881908 या क्रमांकावर मिस कॉल देऊन मोबाईलवर कधीही मन की बात ऐकता येईल.
➡ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी (दि.31) देशातील नागरिकांशी नवीन वर्षातील पहिली मन की बात केली.
➡ सध्या ही सेवा फक्त हिंदी भाषेपुरतीच मर्यादित असणार आहे. पण लवकरच सर्वांना त्यांच्या  मातृभाषांतही ही मन की बात एकता येणार आहे.
➡ भारताचे स्वातंत्र्य आणि सभ्यता ही खादीत आहे, असे सरदार पटेल यांनी म्हटले होते.
➡ देशातील तरूणाईला फॅशनच्या युगात खादी आकर्षित करत आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात या कार्यक्रमात म्हटले.
➡ पंतप्रधान म्हणाले, भारताचे स्वातंत्र्य आणि सभ्यता हे खादीत आहे, असे सरदार पटेल यांनी म्हटले होते.
➡ देशातील तरूणाईला फॅशनच्या युगात खादी आकर्षित करत आहे. तसेच, यावेळी त्यांनी देशवासियांना खादीचे कपडे वापरण्याचा सल्ला दिला.
  •  राजस्थानमध्ये 'जलस्वराज'चा नारा
➡ देशातील एकूण जलस्रोतांपैकी अवघे 1.6 टक्के जलस्रोत वाट्याला आलेल्या राजस्थानने आता दुर्मिळ होत असलेल्या नैसर्गिक स्रोतांचे पुनर्भरण करण्यासाठी लोक चळवळ सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
➡ 'मुख्यमंत्री जल स्वावलंबन अभियान' (एमजेएसए) असे या चळवळीचे नामकरण करण्यात आले असून, मुख्यमंत्री वसुंधराराजे यांच्या हस्ते नुकतेच त्याचे उद्‌घाटन झाले.
➡ जमिनीची उत्पादकता वाढवून राज्यातील प्रत्येक खेड्याला पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण करण्याचे उद्दिष्ट या मोहिमेच्या माध्यमातून समोर ठेवण्यात आले आहे
➡ विविध टप्प्यांमध्ये राज्यातील तीन हजारांपेक्षा अधिक गावे या चळवळीत सामावून घेतली जाणार आहेत.
➡ विद्यमान मुख्यमंत्र्यांच्या झलवार मतदारसंघातून या मोहिमेचा प्रारंभ झाला आहे, या मोहिमेसाठी खासगी व्यक्ती- संस्था, बिगर सरकारी संस्था, कॉर्पोरेट कंपन्यांसह सामाजिक, धार्मिक आणि विविध जातींच्या संस्थांची मदत घेतली जाणार आहे.
➡ महाराष्ट्राचा घेतला आदर्श महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या 'जलस्वराज अभियाना'च्या धर्तीवर राजस्थानात ही मोहीम सुरू करण्यात आली आहे.
➡ महाराष्ट्रातील दुष्काळाचा सामना करणाऱ्या आठ जिल्ह्यांत 'जलस्वराज अभियान' राबविण्यात येणार आहे.
➡ 'एमजेएसए'साठी राजस्थान सरकार 30 जूनपर्यंत तीन हजार 568 कोटी रुपयांचा निधी उभा करणार आहे.


* चर्चित वर्ष:-२०१७ (महाराष्ट्र शासन):-  "व्हिजिट महाराष्ट्र'
* चर्चित पुस्तक:-लाईफ मंत्रा’ :- सुब्रता रॉय


निवड:-परमेश्वरन अय्यर :
• स्वच्छ भारत अभियानाची जबाबदारी
• परमेश्वरन यांची नियुक्ती दोन वर्षांसाठी असेल• १९८१ साली आयएएस झालेल्या परमेश्वरन यांनी २००९ मध्ये स्वेच्छानिवृत्ती घेतली होती.
• त्यानंतर ते जागतिक बँकेत सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाच्या प्रमुखपदी रूजू झाले.
• उत्तर प्रदेशमध्ये परमेश्वरन यांनी जल सुराग अभियान राबवले होते. त्यांना पाणी, सांडपाणी व्यवस्थापनातील सुमारे वीस वर्षांचा अनुभव आहे. ‘
• स्वच्छ भारत’ अभियान सुरू झाल्यानंतर झाडून केंद्रीय मंत्री, भाजपशासीत राज्यांचे मुख्यमंत्री, भाजपचे मोठे नेते हातात झाडू घेवून रस्ता स्वच्छ करताना दिसत होते.

* आयोग:-न्या. मंजुनाथ आयोग :-
• आपल्याला मागासवर्गीय प्रवर्गातून शिक्षण व नोकऱ्यांमध्ये आरक्षण देण्याच्या मागणीसाठी आंदोलन करत असलेल्या कापु समाजाला राजकीय आरक्षणाची शिफारस करण्याच्या उद्देशाने एक मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करण्याची घोषणा आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केली.
• कापुंच्या मागणीवर विचार करण्यासाठी यापूर्वीच स्थापन करण्यात आलेला न्या. मंजुनाथ आयोग कापुंना नोकऱ्या तसेच शैक्षणिक संस्थांमध्ये आरक्षण देण्याबाबतच्या शिफारशी असलेला अहवाल सरकारला सादर करेल;
• मात्र सहा सदस्यांची मंत्रिमंडळ उपसमिती मागासवर्गीयांनाअसलेल्या आरक्षणाच्या धर्तीवर कापुंना देण्याच्या राजकीय आरक्षणाचे प्रमाण निश्चित करेल,

* चर्चित खेळाडू:-शार्दूल:-
• अहमदगरचा बुद्धिबळपटू शार्दूल अण्णासाहेब गागरेने ग्रँडमास्टर किताबावर आपले नाव कोरले.
• तो देशातील ४२ वा तर महाराष्ट्रातील ६ वा ग्रँडमास्टर ठरला आहे.
• शार्दूलने वयाच्या सातव्या वर्षी, सर्वात लहान वयात, सन २००३ मध्ये राष्ट्रीय विजेतेपद पटकावले होते,
• शार्दूलने २००८ मध्ये आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले होते. वयाच्या १४ व्या वर्षी त्याने जागतिक स्पर्धेत पाचवे स्थान मिळवले होते.
• जागतिक युवा चेस ऑलिंपियाडमध्ये सन २०१२, २०१३ व २०१४ असे सलग तीनवर्षे त्याने भारताच्या संघाचे नेतृत्व केले.
• या तीनही वर्षांत अनुक्रमे संघाने कांस्य, रौप्य व सुवर्ण अशी पदके पटकावण्याची कामगिरी केली. जानेवारी २०१३ मध्ये त्याने इंटरनॅशनल मास्टर किताब मिळवला. डिसेंबर २०१३ मध्ये स्पेनच्या स्पर्धेत त्याने ग्रँडमास्टरचा पहिला, बार्सिलोनात दुसरा व कतारच्या स्पर्धेत त्याने तिसरा निकष पूर्ण केला होता.

अहवाल:-
*इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ जर्नालिस्ट(आयएफजे):-
• इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ जर्नालिस्टने (आयएफजे) प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार पत्रकारांसाठी इराक हा सर्वांत धोकादायक देश असून पाकिस्तान चौथ्या क्रमांकाचा धोकादायक देश असून भारत सातव्या क्रमांकाचा देश आहे
• गेल्या 25 वर्षांत पत्रकारांसह माध्यम क्षेत्रात काम करणाऱ्या 2 हजार 297 व्यक्तींची हत्या करण्यात आली आहे. मागील वर्षभरात 112 माध्यम क्षेत्रांतील व्यक्तींची हत्या करण्यात आली आहे. तर 2006 या एकाच वर्षात सर्वाधिक 155 जणांची हत्या करण्यात आली आहे. पत्रकारांसाठी धोकादायक असलेले "टॉप 10‘ देश(कंसात गेल्या 25 वर्षांत हत्या करण्यात आलेल्या पत्रकारांची संख्या)
1. इराक (309)
2. फिलिपाईन्स (146)
3. मेक्सिईको (120)
4. पाकिस्तान (115)
5. रशिया (109)
6. अल्जेरिया (106)
7. भारत (95)
8. सोमालिया (75)
9. सिरीया (67)
10. ब्राझील (62)


* चर्चित वास्तू::-
*पाटणा उच्च न्यायालय:
• युरोपियन वास्तूरचनेचा सुंदर अविष्कार म्हणून ओळखल्या जाणाऱ्याऐतिहासिक पाटणा उच्च न्यायालयाच्या वास्तूने शंभराव्या वर्षांत पदार्पण केले.
• पल्लेडियन डिझाइनवर आधारित "निओ क्लाओसिकल‘ शैलीमध्ये या इमारतीची उभारणी करण्यात आली आहे.
•या इमारतीच्या उभारणीचे काम 1 डिसेंबर 1913 मध्ये पूर्ण झाले होते, त्यानंतर 3 फेब्रुवारी 1916 रोजी तत्कालीन व्हाइसराय लॉर्ड चार्ल्स हार्डिंग्ज यांच्या हस्ते तिचे उद्‌घाटन झाले होते.
* हार्डिंग्ज यांची भूमिकालॉर्ड हार्डिंग्ज यांच्यामुळेच बंगालपासून बिहार आणि ओडिशा हे प्रांत विभक्त झाले होते. पुढे पाटण्याला या दोन्ही प्रांतांच्या राजधानीचा दर्जा देण्यात आला होता. किंग जॉर्ज पाचवे यांच्या 1911 मध्ये भरलेल्या दरबारात याची घोषणा करण्यात आली होती. या इमारतीचा संपूर्ण आराखडा मुख्य अभियंते जे. एफ. मुन्नींग्ज यांनी आखला होता. त्यांना ए. एम. मिलवूड यांनी मदत केली.
* असे उघडले न्यायालयकोलकात्याच्या "मार्टीन अँड कंपनी‘ने या इमारतीची उभारणी केली असून, एका खास समारंभामध्ये या इमारतीची चावी तत्कालीन व्हाइसरॉयकडे सोपविण्यात आली होती. याच वेळी प्रतिकात्मकरीत्या या इमारतीची दारे उघडण्यात आली. त्यानंतर ब्रिटनचे राजे जॉर्ज पाचवे यांनी 9 फेब्रुवारी 1916 रोजी यासंबंधीचे पेटंट पत्र जारी केले होते. त्याच वर्षी 1 मार्च रोजी न्यायालयाचे कामकाज सुरू झाले होते.
भविष्यातील नेतृत्व घडविण्यासाठी सकाळ माध्यम समूहाचा पुढाकार :
भविष्यातील नेतृत्व घडविण्यासाठी ‘सकाळ माध्यम समूहा’च्या पुढाकाराने स्थापन झालेल्या ‘यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क’च्या (यिन) तीन दिवसांच्या विद्यार्थी मंत्रिपरिषद प्रशिक्षण कार्यशाळेबाबत राज्यभरातल्या युवकांमध्ये मोठी उत्सुकता असून, युवकांचे प्रश्‍न आणि आशा-आकांक्षांचा सांगोपांग विचार करणाऱ्या राज्यातल्या या पहिल्या उपक्रमासाठी ‘यिन’चे प्रतिनिधी मुंबईत पोचायला सुरवात झाली आहे.
  शुक्रवारपासून (ता. 5) सुरू होणाऱ्या या प्रशिक्षण कार्यक्रमात राज्यातल्या सर्व 36 जिल्ह्यांतून येणाऱ्या ‘यिन’च्या अध्यक्षांना राजकारण, समाजकारण, अर्थकारण, मनोरंजन तसेच व्यवसाय क्षेत्राशी निगडित अनेक तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभणार आहे.
  ‘यिन’च्या जिल्हा प्रतिनिधींच्या निवडणुका राज्यभरात नुकत्याच मोठ्या जल्लोषात झाल्या.
  तसेच या निवडणुकांतून तरुणांनी निवडलेल्या त्यांच्या ‘नेत्यां’ना नेतृत्वगुण आत्मसात करता यावेत, युवकांशी निगडित असलेल्या विषयांचा शिस्तबद्ध अभ्यास करून नावीन्यपूर्ण कल्पनांचा वापर करून उपाय सुचवता यावेत यासाठी त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी ही कार्यशाळा होत आहे.
  मंत्रालयाजवळील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये होणाऱ्या या कार्यशाळेच्या पहिल्या दिवशी स्ट्रॅटेजिक फोरसाइट ग्रुपचे अध्यक्ष संदीप वासलेकर निवडून आलेल्या ‘यिन’च्या सर्व जिल्हा अध्यक्षांना सदस्यत्वाची शपथ देतील.
 .
  • केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी दीनदयाळ उपाध्याय ग्रामज्योती योजना  :
ग्रामीण भागात विद्युत वितरण प्रणालीचे विस्तारीकरण व बळकटीकरणासाठी पायाभूत सुविधा उभारण्याकरिता असलेली केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी दीनदयाळ उपाध्याय ग्रामज्योती योजना राज्यातही राबविली जात आहे.
या योजनेंतर्गत महावितरणकडून अकोला परिमंडळातील तीन जिल्ह्यांमध्ये ग्रामीण भाग भारनियमनमुक्त करण्यासाठी 30 नवीन वीज उपकेंद्रांची उभारणी करण्यात येणार आहे.
तसेच या योजनेंतर्गत अकोला, बुलडाणा व वाशिम या तीन जिल्ह्यांमध्ये एकूण 315.57 कोटी रुपयांची कामे प्रस्तावित आहेत.
  सध्या ग्रामीण भागात वाढती ग्राहकसंख्या व आधुनिक जीवनशैलीमुळे विजेचा वापर वाढला आहे.
  ग्रामीण भागातील विजेच्या वाढत्या मागणीची पूर्तता करण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाने केंद्र सरकार पुरस्कृत दीनदयाळ उपाध्याय ग्रामज्योती योजना राज्यात राबविण्याला मान्यता दिली आहे.
  देशातील सर्व राज्यांत ही योजना राबविण्यात येत आहे, राज्यात महावितरणकडून या योजनेची अंमलबजावणी होणार आहे.
  या योजनेमध्ये 2248 कोटी रुपयांची कामे प्रस्तावित आहेत, या योजनेंतर्गत राज्यातील विविध परिमंडळांमध्ये फीडरचे विलगीकरण, उच्चदाब व लघुदाब वाहिन्या तसेच वीज उपकेंद्रांची निर्मिती व रोहित्रांचे सक्षमीकरण अशी कामे करण्यात येणार आहेत.
  • महाराष्ट्र एनसीसीने 25 पैकी 17 वेळा पंतप्रधानांचे मानाचे निशाण पटकावले :
महाराष्ट्र एनसीसीने आतापर्यंत 25 पैकी 17 वेळा पंतप्रधानांचे मानाचे निशाण पटकावले असून, देशातील सर्वोत्तम एनसीसी संचालनालय म्हणून महाराष्ट्राचा लौकिक वाढवला.
  नुकत्याच नवी दिल्ली येथे झालेल्या प्रजासत्ताक दिन शिबिर व परेडमध्ये सहभागी होऊन विविध स्पर्धांमध्ये उत्तम कामगिरी केल्याबद्दल राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी महाराष्ट्र एनसीसीच्या संपूर्ण चमूला राजभवनावर बोलावून त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली.
  यंदा महाराष्ट्रातील 77 मुले व 37 मुली यांच्या चमूने प्रजासत्ताक दिन शिबिरामध्ये भाग घेतला होता.
इतिहासातील सर्वांत मोठा व्यापारी करार :
या कराराचे 12 देश सदस्य असून, त्यांनी या कराराद्वारे जवळपास सगळ्या प्रकारचे आयात कर काढून टाकले आहेत.
  जगाच्या अर्थव्यवस्थेमध्ये सुमारे 40 टक्के वाटा असलेल्या या 12 देशांत परस्परांमध्ये व्यापार आणि गुंतवणूक करण्यात असलेले अडथळे दूर करण्याच्या उद्देशाने हा करार करण्यात आला आहे.
  तसेच येथे झालेल्या समारंभामध्ये न्यूझीलंडचे पंतप्रधान जॉन की आणि अमेरिकेचे व्यापार प्रतिनिधी माईक फ्रोमन यांनी या करारावर स्वाक्षरी केली.
  ट्रान्स- पॅसिफिक भागीदारीमध्ये समाविष्ट असलेल्या न्यूझीलंडसाठीच नव्हे, तर इतरही 11 देशांसाठी हा करार महत्त्वाचा आहे.
  या 12 देशांतील 98 टक्के जकात संपून जाईल, असे ऑस्ट्रेलियाचे व्यापारमंत्री अ‍ॅण्ड्रू रॉब म्हणाले.
  हा करार कायद्याने बंधनकारक होण्यासाठी सदस्य देशांना आपापल्या लोकप्रतिनिधीगृहांची मान्यता त्याला मिळवावी लागेल.
  • स्वच्छ भारत अभियानाच्या प्रमुखपदी निवृत्त अधिकारी :
सत्तास्थापनेनंतर पहिल्या स्वातंत्र्यदिन सोहळ्यात घोषणा करून सुरू केलेल्या ‘स्वच्छ भारत’ अभियान यशस्वी करून दाखवण्यासाठी एका निवृत्त आएयएस अधिकाऱ्याला पुन्हा सचिवपदी नेमण्याची निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदीयांनी घेतला आहे.
  स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या परमेश्वरन अय्यर यांना पेयजल व सांडपणी व्यवस्थापन विभागात सचिवपदी नेमण्यात आले आहे.
  चांगल्या अधिकाऱ्यांची कमतरता व ‘स्वच्छ भारत’ आभियानाचे झालेले सरकारीकरण असे दोन अर्थ नोकरशाहीच्या वर्तुळातून परमेश्वरन यांच्या नियुक्तीनंतर लावण्यात येत आहेत.
  परमेश्वरन अय्यर यांच्यावर स्वच्छ भारत अभियानाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
  तसेच परमेश्वरन यांची नियुक्ती दोन वर्षांसाठी असेल, 1981 साली आयएएस झालेल्या परमेश्वरन यांनी 2009 मध्ये स्वेच्छानिवृत्ती घेतली होती.
  त्यानंतर ते जागतिक बँकेत सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाच्या प्रमुखपदी रूजू झाले.
  उत्तर प्रदेशमध्ये परमेश्वरन यांनी जल सुराग अभियान राबवले होते.
  • अर्थसंकल्पी अधिवेशन 23 फेब्रुवारीपासून :
गृहमंत्री राजनाथसिंह यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाच्या संसदीय कामकाजविषयक समितीच्या बैठकीत अर्थसंकल्पी अधिवेशनाच्या वेळापत्रकावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

असे असेल वेळापत्रक

पहिला टप्पा 23 फेब्रुवारी ते 16 मार्च

दुसरा टप्पा 25 एप्रिल ते 13 मे

राष्ट्रपतींचे अभिभाषण 23 फेब्रुवारी

रेल्वे अर्थसंकल्प 25 फेब्रुवारी

आर्थिक पाहणी अहवाल 26 फेब्रुवारी

केंद्रीय अर्थसंकल्प 29 फेब्रुवारी

अधिवेशनाचे एकूण दिवस 81
दिनविशेष :
मौखिक आरोग्य दिवस

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा