Post views: counter

Current Affairs March Part - 3


  • भारतातील सौरऊर्जा वापरण्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत असले तरी यामध्ये बिहारचं नाव कुठेच नाही. आज ऊर्जा मंत्राल्याने जाहीर केलेल्या भारतातील २६ राज्याच्या यादीत बिहारचे नाव नाही. बिहार मध्ये सौरऊर्जा वीज उत्पन्न होत नाही. आज ऊर्जा मंत्राल्याने सौर ऊर्जा उत्पन्न करणाऱ्या जाहीर केलेल्या २६ राज्यामध्ये राज्यस्थान सर्वात अग्रेसर असून २०१५ मध्ये १२६४ मेगावॅट सौरउर्जा निर्माण केली आहे. तर गुजरात १०२४, मध्यप्रदेश ६७९, तमिळनाडू ४१९ यांचा क्रमांक लागतो. मागील वर्षी भारतात सौरउर्जेवर एकूण ५,१३० मेगावॅट विजेची निर्मीती करण्यात आली आहे. ती गेल्या वर्षाच्या तुलनेत १३८५ मेगावॅट ने वाढली आहे. भारत सरकार वर्ष २०२१-२२ पर्यंत राष्ट्रीय उर्जा मिशन मार्फत १०० गीगावॅट सौरऊर्जा निर्माण करणार आहे. त्यामधील ६० गीगावॅट जमानीवर तर ४० गीगावॅट घराच्या छतावर उत्पन्न करणार आहे.  सरकारचे चालू वर्षी २०१६ मध्ये २००० मेगावॅट तर पुढील वर्षी १२००० मेगावॅट सौरऊर्जा निर्मीती करण्याचे लक्ष आहे. ऊर्जा मंत्रालय ३१ मार्च पर्यंत १८०० मेगावॅट निर्मितीचा निवीदा काढणार आहे.
  • सेवा क्षेत्रात एफडीआय वाढ :
सरकारने व्यापार सुगमता वाढविल्याने आणि विदेशी गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी अनेक पावले उचलण्यात आल्याने सेवा क्षेत्रातील प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक (एफडीआय) एप्रिल ते डिसेंबर या अवधीत 85.5 टक्क्यांनी वाढून 4.25 अब्ज डॉलर झाली.
 औद्योगिक धोरण आणि प्रोत्साहन विभागाने (डीआयपीपी)च्या आकड्यांनुसार एप्रिल-डिसेंबर 2014 या कालावधीत एफडीआय 2.29 अब्ज डॉलरचा मिळाला होता.
 सेवा क्षेत्रात बँकिंग, विमा, आऊटसोर्सिंग, कुरिअर, माहिती-तंत्रज्ञान यांचा समावेश आहे.
 देशाच्या जीडीपीत सेवा क्षेत्राचे योगदान 60 टक्क्यांपेक्षा जास्त आहे.

 देशात येणाऱ्या एकूण विदेशी गुंतवणुकीत या क्षेत्रातील एफडीआयचा वाटा 17 टक्के राहिला.
 एफपीआयमधील गुंतवणूक रिझर्व्ह बँकेद्वारे व्याजदर कपात केली जाण्याच्या शक्यतेने आणि जागतिक बाजारातील सकारात्मक वातावरणाने शेअर बाजारात गेल्या चार सत्रांत 4,100 कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेची गुंतवणूक झाली.
  • भारताचे सहाव्यांदा आशिया चषकावर विजय :
शिखर धवनच्या आक्रमक 60 धावा त्याला विराट कोहलीने 41 धांवाची दिलेली संयमी साथ आणि धोनीने केलेल्या 20 धावांच्या बळावर भारताने बांगलादेशला 8 गड्यांनी हरवत सहाव्यांदा आशिया चषकावर आपले विजय मिळविले.
 शेर-ए-बांग्ला स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात बांगलादेशने ठेवलेल्या 121 धावांचा पाठलाग करताना भारताने अक्रमक सुरवात केली होती पहिल्या 7 षटकात 1 बाद 55 धावा केल्या होत्या.
 भारताने बांगलादेशवर 8 गडी आणि 7 चेंडू राखून विजय मिळवला.
 टी 20 मधील भारताचा हा सलग 7 वा विजय आहे, धोनीने आज 7 विजय मिळवत आपल्याच विक्रमाची बरोबरी केली.
  • नवी मुंबई विमानतळासाठी निविदा मंजुर :
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारणीसाठी आलेल्या चारपैकी तीन निविदांना प्रकल्प निरीक्षण आणि अंमलबजावणी समितीने मंजुरी दिली आहे.
 जीएमआर एअरपोर्ट प्रा. लि., एमआयए इन्फ्रास्ट्रक्‍चर प्रा. लि. आणि मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट प्रा. लि. यांचा यात समावेश आहे.
 व्हॉलूप्टास डेव्हलपर्स प्रा. लि. (हिरानंदानी समूह) आणि झुरिच एअरपोर्ट इंटरनॅशनल यांच्या चौथ्या निविदेच्या प्रस्तावास केंद्रीय गृहमंत्रालयाने सुरक्षा मंजुरी नाकारल्याने ही निविदा बाद झाली.
 जीएमआर कंपनीला दिल्ली आणि हैदराबाद विमानतळाच्या विकासाचा अनुभव आहे; तर विन्सी कंपनीला जगातील 25 विमानतळ उभारणीचा अनुभव आहे.
 एनएमआयए कंपनी सध्या छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम पाहत आहे.
 दुसऱ्या फेरीत निवड झालेल्या तिन्ही निविदाधारकांना आता आर्थिक निविदा अर्ज देण्यात येईल.
 तसेच त्यामध्ये निवड झालेल्या कंपनीला विमानतळ उभारणीचे काम देण्यात येणार आहे.
  • राज्य महिला आयोगात प्रकरणे प्रलंबित :
गेल्या काही वर्षांत राज्य महिला आयोगातील प्रलंबित प्रकरणांची संख्या वाढली असून, सद्य:स्थितीत पाच हजारांहून अधिक प्रकरणे प्रलंबित आहेत.
 तसेच त्यांच्या निपटाऱ्याचे मोठे आव्हान असून, त्यासाठी महिला आयोगाने प्रकरणांची वर्गवारी केली आहे.
 प्रकरणे निकाली काढण्यासाठी विभागाबरोबरच जिल्हास्तरावरसुद्धा सुनावणी करण्यात येणार आहे, अशी माहिती नागपूर दौऱ्यावर आलेल्या राज्य महिला आयोगाच्या नवनियुक्त अध्यक्षा विजया रहाटकर यांनी येथे दिली.
 गंभीर स्वरूपाचे तसेच अनेक वर्षांपासून काहीही कार्यवाही न झालेली दीड हजाराहून अधिक प्रकरणे आहेत.
 तसेच ते निकाली काढण्यासाठी विभाग व जिल्हानिहाय वर्गवारी केली आहे.
  • तिबेटला जोडणारा दुसरा लोहमार्ग :
तिबेटवर आपला हक्क सांगणाऱ्या चीनने आता तिबेट आणि चीनला जोडणारा दुसरा लोहमार्ग निर्माण करण्याची घोषणा केली आहे, या माध्यमातून तिबेटवरील आपली पकड अधिक मजबूत करण्याचा चीनचा विचार आहे.
 तसेच, नव्या लोहमार्गाद्वारे तिबेटला लागून असलेल्या भारताच्या सीमेजवळ अधिक वेगाने सैन्य पोचविण्याचा पर्यायही चीनला उपलब्ध होणार आहे.
 चीनमधील किंघाई शहर आणि तिबेटला जोडणारा लोहमार्ग 2006 पासून कार्यरत  आहे.
 चीनच्या अर्थव्यवस्था आणि सामाजिक विकासाबाबतच्या तेराव्या पंचवार्षिक योजनेच्या (2016 ते 2020) मसुद्यात तिबेटला जोडणारा दुसरा लोहमार्ग निर्माण करण्याबाबतची घोषणा करण्यात आली आहे.
 चीनने 2006 मध्ये किंघाई शहराला तिबेटशी जोडणारा पहिला लोहमार्ग सुरू केला होता.
 एकूण एक हजार 956 किलोमीटर लांबीचा हा लोहमार्ग जगातील सर्वाधिक उंचीवरील लोहमार्ग असून, पठारी भागातील सर्वांत मोठा लोहमार्ग आहे.
 पुढे या लोहमार्गाचा विस्तार करून तिबेटमधील अनेक ठिकाणे त्याला जोडण्यात आली.
 भारत-तिबेट सीमेच्या अगदी जवळ हा लोहमार्ग पोचला आहे, त्याचबरोबर चीनने हिमालयीन भागात पाच विमानतळ उभे केले आहेत.
  • ईमेलचे जनक रे टॉमिल्सन यांचे निधन :
ईमेलचा शोध लावणारे अमेरिकेतील प्रोग्रामर रे टॉमिल्सन यांचं निधन झाले, ते 74 वर्षांचे होते.
 रे टॉमिल्सन यांनी 1971 मध्ये बोस्टनमधील एका रिसर्च कंपनीत काम करत असताना पहिला ईमेल पाठवला होता.
 तसेच त्यानंतर ख-या अर्थाने ईमेलद्वारे संभाषणाला सुरुवात झाली.
 रे टॉमिल्सन यांनी ही कामगिरी केली तेव्हा इंटरनेटची सुरुवादेखील झाली नव्हती, मात्र भारतात ही क्रांती घडायला पुढची 20 वर्षं जावी लागली होती.
 1960 सालीच टॉमिल्सन यांनी SNDMSG या प्रोग्रामद्वारे एकाच कॉम्प्युटरमध्ये एकीकडून दुसरीकडे पत्र पाठवण्याचं तंत्र विकसित केलं होते.
 तसेच यात मेल कम्पोज करून, त्यावर पत्ता लिहून ते दुसऱ्या युजरला पाठवण्याची व्यवस्था होती.
 टॉमिल्सन यांनी @ या साईनचा वापर केला होता जो आजपर्यंत वापरला जातो.
 2012 मध्ये इंटरनेट सोसायटीने इंटरनेच हॉल ऑफ फेममध्ये टॉमिल्सन यांचा समावेश केला होता.
  • सेमी-हायस्पीड रेल्वेमार्ग महाराष्ट्रातून जाणार :
मुंबई-अहमदाबाद मार्गावरील प्रस्तावित पहिली बुलेट ट्रेन हे भलतेच खर्चिक प्रकरण असल्याचे केंद्र सरकारच्या लक्षात येऊ लागले आहे.
 त्यामुळे आहे त्याच रेल्वेरुळांची-मार्गांची क्षमता वाढवून त्यावरून प्रतितास किमान 160 किलोमीटर या वेगाने 'गतिमान' या वेगवान गाड्या चालविण्याच्या प्रकल्पाला सरकारने गती दिली आहे.
 तसेच यातही अशा सहापैकी तब्बल चार सेमी-हायस्पीड रेल्वेगाड्या महाराष्ट्रातून धावतील असे नियोजन रेल्वे मंत्रालयाने केले आहे.
 सध्या अंतिम टप्प्यात असलेल्या दिल्ली-आग्रा या सेमी हायस्पीड ट्रेनची अखेरची चाचणी पुढील काही महिन्यांत होईल व ती गाडी धावू लागेल.
 तसेच यामुळे दिल्ली-आग्रा हे अंतर केवळ 105 मिनिटांत गाठले जाईल.
 सहा मार्गांवरच्या हाय स्पीड रेल्वेच्या प्रकल्पास गती मिळाली आहे, या प्रस्तावित सहा मार्गांमध्ये राज्यांतील मुंबई-गोवा, मुंबई-अहमदाबाद, नागपूर-विलासपूर व चेन्नई-नागपूर यांचा समावेश आहे.
 मुंबई-अहमदाबाद मार्गावरील सुरक्षेबाबतचा 'फिजिबलिटी अहवाल' रेल्वे मंडळाला मिळालाही आहे, याशिवाय म्हैसूर-चेन्नई व दिल्ली-चंडीगड हे दोन मार्गही सरकारने हाय स्पीड गाड्यांसाठी प्रस्तावित केले आहेत.
 रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी याबाबत सूतोवाच केले होते; पण त्याचा तपशील अद्याप जाहीर झालेला नाही.
  • ऋषभदेव मूर्तीची गिनीज बुकात नोंद :
सिंहस्थासह विविध पौराणिक संदर्भांमुळे जागतिक ख्याती मिळालेल्या नाशिकच्या लौकिकात आणखी एका वैभवाची भर पडली.
 मांगीतुंगी येथील जैन तीर्थस्थळाच्या ऋषभदेवांच्या 108 फुटांच्या मूर्तीची गिनीज  बुकात नोंद झाली.
 तसेच या वेळी झालेल्या समारंभात भाविकांनी मूर्तीला वैश्‍विक स्तरावर मान्यता मिळाल्याने आनंदोत्सव साजरा केला.
 पहिल्यांदाच जैन मूर्तीची जागतिक स्तरावर नोंद झाली आहे.
 मांगीतुंगी देवस्थानच्या आर्यिका शिरोमणी ज्ञानमती माताजी, प्रज्ञाशिरोमणी चंदनामतीजी आणि पीठाधीश रवींद्रकीर्ती स्वामी यांना (ता. 6) गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचे अधिकारी स्वप्नील डांगरीकर यांनी त्याचे प्रमाणपत्र प्रदान केले.
 मांगीतुंगी येथील पहाडावर अखंड पाषाणातील 113 फूट उंचीच्या अखंड शिळेत 108 फुटांच्या भगवान ऋषभदेव यांच्या मूर्तीची नोंद झाल्याने ती जैन धर्मीयांची पहिली मूर्ती ठरली आहे.
 जगाला अहिंसेचा संदेश देणाऱ्या जैन तत्त्वज्ञानामुळे या मूर्तीचे 'स्टॅच्यू ऑफ अहिंसा' असे नामकरण करण्यात आले.
 गेली 18 वर्षे त्याची  सुरू होत,. 2011 मध्ये प्रत्यक्ष मूर्ती उभारण्याच्या कामास प्रारंभ झाला होता.
  • आंतरराष्ट्रीय महिला दिन :
राज्य पोलीस दलात महिलांचे प्रमाण जेमतेम 8 टक्क्यांपर्यंत असलेतरी मंगळवारचा (दि.8) दिवस त्यांच्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
 राज्यातील सर्व पोलीस ठाण्यांत अंमलदारांची धुरा त्यांच्याकडे असणार असून, हद्दीत घडणारे सर्व गुन्हे आणि ‘डायरी’वरील महत्त्वाची नोंद त्यांच्या स्वाक्षरीनिशी होणार आहे.
 8 मार्चला जगभरात साजऱ्या होणाऱ्या महिला दिनाचे औचित्य साधून खात्यातील महिलांसाठी प्रोत्साहनपर हा अनोखा उपक्रम राबविला जाणार आहे.
 राज्यातील सर्व पोलीस आयुक्तालये आणि अधीक्षक कार्यालयांच्या कार्यक्षेत्रात 1,076 पोलीस ठाणी आहेत.
 8 मार्चला महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांची ‘ठाणे अंमलदार’पदी नेमणूक करावी, असे आदेश पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी राज्यातील आयुक्त व जिल्हा पोलीसप्रमुखांना दिलेले आहेत.
 एकाचवेळी या सर्व ठिकाणच्या अंमलदार महिला असण्याची पोलीस दलाच्या इतिहासातील ही पहिलीच घटना असणार आहे.
  • जगात भारताचे स्थान 26 व्या क्रमांकावर :
विविध क्षेत्रात महिला उच्चपदे भूषवीत असताना भारतीय कंपन्यांत मात्र उच्चपदावरील महिलांची संख्या आजही कमी आहे.
 कंपन्यांच्या संचालक मंडळात महिलांचे प्रमाण पाहिले, तर 7.0 टक्क्यांसह भारत 26 व्या क्रमांकावर आहे, तर नॉर्वे 40 टक्के प्रमाणासह पहिल्या स्थानी आहे.
 माय हायरिंग क्लब डॉट कॉम आणि जॉब पोर्टल डॉट को डाट इनच्या ‘संचालक मंडळात महिला’ सर्वेक्षणानुसार भारतीय कंपन्यांतील संचालक मंडळात महिला सदस्यांची संख्या विकसित देशांच्या तुलनेत कमी आहे.
 भारतीय कंपन्यांच्या संचालक मंडळात महिला सदस्यांची संख्या अत्यंत कमी आहे.
 विकसित देशांच्या एकूण सरासरीच्या तुलनेत कमी आहे, असे राजेश कुमार यांनी सांगितले.
 तसेच या सर्वेक्षणात जगभरातील एकूण 38,313 नोंदणीकृत कंपन्याचा सहभाग घेतला, तर भारतातील 1,459 नोंदणीकृत कंपन्याचा सहभाग घेतला.
  • सरकारी बँकांची संख्या घटणार :
वाढत्या तोट्यामुळे अडचणीत आलेल्या सरकारी बँकांबाबत केंद्र सरकार लवकरच मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे.
 केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी याबाबतचे संकेत दिले असून, त्यांची स्थिती सुधारण्यासाठी दोन डझनपेक्षा जास्त असलेल्या सरकारी बँकांपैकी काहींचे विलीनीकरण केले जाण्याची शक्यता आहे.
 बँकांच्या या विलीनीकरणाच्या प्रस्तावाचे विविध बँकर्सनीही स्वागत केले आहे.
 तसेच त्याबरोबर अशा विलीनीकरणाची रणनीती निश्चित करण्यासाठी तज्ज्ञांची एक समिती गठीत करण्याचीही सूचना केली आहे.
 देशातील बँकिंग उद्योगातील एकूण संपत्तीपैकी दोन तृतीयांशपेक्षा जास्त हिस्सा सरकारी बँकांच्या ताब्यात आहे; पण याच बँकांकडे जवळपास 85 टक्के बुडीत कर्जही आहे, ही रक्कम जवळपास आठ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.
 सरकारी बँकांच्या थकीत कर्जाच्या समस्येबाबत सरकार अनेक पावले उचलत आहे, यासाठी कर्ज वसुली न्यायाधिकरण आणि वित्तीय संपत्तीचे प्रतिभूमीकरण, कायदे मजबूत करण्याबाबत विचार केला जात आहे.
  • '18 कॅव्हलरी' रेजिमेंटला राष्ट्रपतींकडून सन्मान :
स्थापना झाल्यापासून सुमारे 174 पेक्षा अधिक वर्षांपासून राष्ट्राच्या सेवेत मोठे योगदान दिल्याबद्दल राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्यातर्फे दिला जाणारा 'स्टॅंडर्ड' (मानाचा ध्वज) (दि.7) लष्करप्रमुख जनरल दलबिरसिंह सुहाग यांच्या हस्ते '18 कॅव्हलरी' रेजिमेंटला प्रदान करण्यात आला.
 '18 कॅव्हलरी' रेजिमेंटची 31 जानेवारी 1842 रोजी स्थापना करण्यात आली होती.
 भारतीय लष्कराच्या स्थापनेपासून सर्वाधिक मोहिमांमध्ये सहभागी होत मोठी कामगिरी बजावलेल्या '18 कॅव्हलरी' रेजिमेंटला राष्ट्रपतींकडून दिला जाणारा मानाचा 'स्टॅंडर्ड' देण्यात आला आहे.
 तसेच हा 'स्टॅंडर्ड' राष्ट्रपतींच्या वतीने लष्करप्रमुखांनी '18 कॅव्हलरी' रेजिमेंटला प्रदान केला.
 विशेष म्हणजे विद्यमान लष्करप्रमुख सुहाग हे '18 कॅव्हलरी' रेजिमेंटचे मानद कर्नल असून, त्यांचे वडील रिसालदार मेजर रामपाल सिंग (निवृत्त) यांनीही 1965 आणि 1971च्या भारत-पाकिस्तान युद्धामध्ये भाग घेतला होता.
  • दीक्षाभूमीस 'अ' वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा :
जगभरातील बौद्धधर्मीयांसाठी महत्त्वपूर्ण असणाऱ्या नागपूर येथील दीक्षाभूमीस 'अ' वर्ग पर्यटनस्थळ म्हणून दर्जा देण्याचा ऐतिहासिक निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे.
 नागपूर येथील दीक्षाभूमी ऐतिहासिक महत्त्वाची असून, या ठिकाणी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 14 ऑक्‍टोबर 1956 रोजी लक्षावधी अनुयायांसह बौद्ध धर्माची दीक्षा घेतली.
 तसेच त्यानंतर गेली 60 वर्षे हे स्थळ केवळ देशातीलच नव्हे; तर जगभरातील बौद्धधर्मीयांसाठी पवित्र मानले जाते, या ठिकाणी उभारण्यात आलेला भव्य स्तूप पर्यटकांचे विशेष आकर्षण ठरला आहे.
 देशातील बोधगया या शहराव्यतिरिक्त केवळ दीक्षाभूमीवरच बोधिवृक्ष आहे.
 वर्षभरात जवळपास 11 लाख एवढ्या मोठ्या संख्येने राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पर्यटक, भाविक आणि अभ्यासक या ठिकाणी भेट देत असतात.
 तसेच यापूर्वी दीक्षाभूमीस 'क' वर्ग पर्यटनस्थळ म्हणून दर्जा देण्यात आला होता.
 मात्र गेल्या वर्षी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंती वर्षानिमित्ताने दीक्षाभूमीच्या विकासाची घोषणाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती.
 पर्यटन विभागाने दीक्षाभूमीला 'अ' वर्ग पर्यटनस्थळ म्हणून मान्यता देण्याचा प्रस्ताव सादर केला, त्यास मुख्यमंत्र्यांनी तातडीने मान्यता दिली.
  • महिला लढाऊ वैमानिकांची पहिली तुकडी :
तीन सैनिकांचा समावेश असलेली महिला लढाऊ वैमानिकांची पहिली तुकडी येत्या 18 जून रोजी भारतीय वायुदलात सामील करण्यात येईल.
एअर चीफ मार्शल अरूप राहा यांनी (दि.8) ही माहिती दिली.
 तीन महिला प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांनी या लढाऊ भूमिकेत सामील होण्याची इच्छा व्यक्त केली आहे, असे राहा यांनी सांगितले.
‘आम्ही 1991 मध्ये महिलांना वैमानिकाच्या रूपात सामील केले होते, परंतु ते फक्त हेलिकॉप्टर्स आणि परिवहन (विमान) यापुरतेच मर्यादित होते
तसेच आता महिलांना लढाऊ वैमानिकाच्या रूपात सामील करण्याच्या भारतीय वायुदलाच्या (आयएएफ) प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.
 नवी दिल्ली येथे आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आयोजित ‘वुमेन इन आर्म्ड मेडिकल कॉर्प्स’वर आयोजित संमेलनात राहा बोलत होते.
 तसेच यावेळी संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर उपस्थित होते, संरक्षण मंत्रालयाने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये महिलांना लढाऊ वैमानिकाच्या रूपात भारतीय वायुदलात सामील करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली.
तेलंगणा सोबत सिंचन करार :
महाराष्ट्र आणि तेलंगण राज्यातील आंतरराज्य सिंचन प्रकल्पाबाबतचे सर्व निर्णय परस्पर सामंजस्याने घेण्यासाठी तसेच निर्णय प्रक्रिया गतिमान करण्यासाठी आंतरराज्य नियंत्रण मंडळ स्थापन करण्यात आले.
तसेच यासंदर्भात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत उभय राज्यांमध्ये सामंजस्य करार करण्यात आला.
दोन्ही राज्यांच्या सीमावर्ती भागातील नद्यांच्या पाणीवाटपासंदर्भात (दि.8) सह्याद्री अतिथीगृहात उभय राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक झाली.  तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव म्हणाले, आजचा दिवस दोन्ही राज्यांसाठी ऐतिहासिक आहे.
राज्यात पाणी मोठ्या प्रमाणात उपलब्ध असून, नदीतील समुद्रात जाणारे पाणी दोन्ही राज्यांना वापरता येईल.
लेंडी, प्राणहिता, चवेल्ला, निम्न पैनगंगा नदीवरील राजापेट, चानखा-कोटी, पिपरड-परसोडा येथील बॅरेज तसेच भविष्यात हाती घ्यावयाच्या अन्य सिंचन प्रकल्पांसाठी हे आंतरराज्य नियंत्रण मंडळ स्थापन करण्यात आले. निम्न पैनगंगा प्रकल्पामुळे महाराष्ट्रातील 1 लाख 40 हजार 818 हेक्टर व लेंडी प्रकल्पामुळे महाराष्ट्रातील 26,924 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येईल.
  • डॉ. ऑर्थोचे अ‍ॅम्बेसेडर जावेद अख्तर :
वैद्यकीय क्षेत्रातील नामांकित अशा दिवासा हर्बल केअर कंपनीच्या डॉ. ऑर्थो या प्रसिद्ध ब्रँडचे ब्रँड अम्बेसेडर म्हणून विख्यात लेखक व गीतकार जावेद अख्तर यांना नेमण्यात आले आहे.
कंपनीचे सहसंस्थापक संजीव जुनेजा यांनी नुकतीच याची घोषणा केली.
 संजीव जुनेजा यांनी सांगितले की, कंपनीच्या ब्रँड अ‍ॅम्बेसेडरपदासाठी आम्ही एका सर्जनशील कलावंताचा शोध घेत होतो.
तसेच या संदर्भात आम्ही त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी देखील आम्हाला होकार दिला आहे.
  • एसबीआय प्रत्येक जिल्ह्यात महिला शाखा सुरू करणार :
महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासोबत महिलांनी बँकिंग सेवेचा जास्तीत जास्त वापर करावा म्हणून स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) प्रत्येक जिल्ह्यात बँकेची महिला शाखा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.
 
एसबीआयने विभागवार आधीच 14 शाखा सुरु केल्या आहेत.
 महिलांना कामकाज करणे सोयीचे होईल, अशा पद्धतीने या सर्व बँकात व्यवस्था असेल.
 महिलांसाठी कामकाजासाठीच्या दृष्टीने सुरक्षित आणि योग्य वातावरण निर्माण करण्याबाबत आम्ही दक्ष आहोत, असे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या चेअरमन अरुंधती भट्टाचार्य यांनी सांगितले.
  • महिला बीट मार्शल्सला ‘दामिनी’ ही नवी ओळख :
शहरात शाळा-महाविद्यालये तसेच गर्दीच्या ठिकाणी मुली-महिलांच्या मदतीसाठी धावून जाणाऱ्या महिला बीट मार्शल्सला जागतिक महिला दिनी ‘दामिनी’ ही नवी ओळख मिळाली आहे.
तसेच या ‘दामिनीं’ आता शहरात लष्करी गणवेषात फिरून गुन्हेगारांवर वचक बसविणार आहेत.
 शहरात जुलै 2015 पासून महिला बीट मार्शल्सची नियुक्ती करण्यात आली आहे.
33 बीट मार्शल असून त्यांना फिरण्यासाठी 17 दुचाकी वाहने मागील सहा महिन्यांत या मार्शल्सकडून अनेक प्रकरणे समोर आणून 55 पेक्षा अधिक गुन्हे दाखल केले आहेत.
प्रत्येक पोलिस ठाण्यामध्ये या मार्शल्सची नियुक्ती करण्यात आली आहे.
सकाळी 8 ते दुपारी 1 आणि दुपारी 4 ते रात्री 9 अशा दोन शिफ्टमध्ये या मार्शल काम करतात.
 (दि.8) जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून या महिला बीट मार्शल्सला मंगळवारपासून ‘दामिनी’ ही नवी ओळख मिळाली आहे.
‘दामिनी बीट मार्शल्स’ म्हणून त्यांना यापुढे ओळखले जाईल. तसेच शहरात फिरत असताना त्यांचे वेगळेपण जाणवावे म्हणून त्यांना लष्करी गणवेश देण्यात आला आहे.
जागतिक महिला दिनानिमित्त पोलिस आयुक्तालयामध्ये पाठक यांच्या हस्ते महिला बीट मार्शल्सचा विशेष सत्कार करण्यात आला.
  • रायसोनी नटसम्राट’ एकपात्री स्पर्धा :
सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळख असलेल्या पुणे आणि परिसरातील शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी लोकमत युवा नेक्स्ट घेऊन आली आहे ‘रायसोनी नटसम्राट’ एकपात्री स्पर्धा.
 रायसोनी ग्रुपच्या सहकार्याने ही स्पर्धा येत्या 16 तारखेला होणार आहे,प्रत्येक मुला-मुलींत चांगले कलागुण असतात.
 तसेच करिअरला कलागुणांची जोड मिळाल्यास यश हे निश्चित असते, त्यामुळे मुलांना स्वत:मधील कलागुण ओळखून त्या आधारे करिअरची निवड केल्यास आवडीच्या क्षेत्रात भविष्यात यश मिळविणे शक्य होते.
 युवा नेक्स्टच्या माध्यमातून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी वर्षभर विविध उपक्रम राबविले जातात.
 विद्यार्थ्यांचे मनोरंजन हाच केवळ उद्देश नसून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणे, त्यांना प्रोत्साहन देणे आणि आवडीच्या क्षेत्रात पुढे जाण्यासाठी मार्गदर्शन करणे हासुद्धा आयोजनामागील उद्देश असतो.
 ‘लोकमत’च्या या विविध उपक्रमांतर्गतच शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी ‘रायसोनी नटसम्राट’ या एकपात्री स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
 सहभागी विद्यार्थ्यांनी स्पर्धेसाठी तीन मिनिटे देण्यात येणार असून, विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीच्या नाटकातील एक प्रवेश या वेळी सादर करायचा आहे.
 उत्कृष्ट सादरीकरण करणाऱ्या विद्यार्थ्यांना ‘रायसोनी नटसम्राट’ या उपाधीने गौरविण्यात येणार आहे, स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना अनेकविध पारितोषिक देण्यात येणार आहेत.
  • बीएमडब्लूला 100 वर्ष पूर्ण :
बीएमडब्लू आणि मर्सिडीज बेन्झ या वाहन उद्योगक्षेत्रातील जगातील दोन आघाडीच्या जर्मन कंपन्यांनी स्पर्धा करतानाही ही नैतिकता जपली आहे.
 मिर्सिडीजची व्यावसायिक स्पर्धक असलेल्या बीएमडब्लूने दोन दिवसांपूर्वी 7 मार्चला 100 वर्ष पूर्ण केली.
 तसेच त्यानिमित्ताने मिर्सिडीजने बीएमडब्लूला सोशल मिडीयावरुन शुभेच्छा दिल्या आहेत.
 मर्सिडीजने सोशल मिडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला असून, शंभर वर्षाच्या स्पर्धेबद्दल बीएमडब्लूचे आभार मानले आहेत.
 मिर्सिडीजने आपले संग्रहालय पाहण्यासाठी बीएमडब्लूच्या कर्मचा-यांना निमंत्रणही दिले आहे.
 बीएमडब्लू आणि मर्सिडीज हे भारतातील गाडयांचे लोकप्रिय ब्राण्डस आहेत.
 तसेच या दोन्ही कंपन्या आलिशान गाडयांच्या निर्मितीसाठी ओळखल्या जातात.
  • पर्यटनस्थळी आता पोलीस दल सज्ज :
2017 हे ‘व्हिजिट महाराष्ट्र’ वर्ष म्हणून राज्य शासनाने घोषित केले असून, पर्यटन क्षेत्राला चालना देणाऱ्या नव्या पर्यटन धोरणास राज्य मंत्रिमंडळाने (दि.8) मान्यता दिली.
 महत्त्वाच्या पर्यटन स्थळांना भेटी देण्यासाठी हवाई, रस्ते आणि रेल्वे प्रवास आणि हॉटेल निवासाचे एकत्रित असे स्मार्ट तिकीट देण्यात येणार आहे, तर पर्यटन स्थळी सुरक्षेसाठी विशेष पोलीस दलाची स्थापना करण्यात येणार आहे.
 विदर्भ, कोकण आणि कोल्हापूर भागातील खाद्यपदार्थ, तसेच मुंबईच्या खाऊ गल्ल्यांमध्ये मिळणाऱ्या पदार्थांचे मार्केटिंग केले जाणार असून, त्यासाठी विविध महोत्सव आणि कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
 पर्यटन पोलीस हे सुरक्षेशिवाय पर्यटकांना परिसरातील कायदा, रूढी, संस्कृती व आकर्षण याबद्दलची माहिती देतील.
 स्थानिक रहिवाशांनी पर्यटनस्नेही कसे राहावे, यासाठी प्रशिक्षणही देतील.
 राज्यातील निवडक किल्ल्यांवर विद्युत रोषणाई व सांस्कृतिक कार्यक्रम केले जातील.
 किल्ल्यांजवळ किंवा लहान किल्ल्यांना जोडणाऱ्या मार्गावर बलून सफारी सुरू करण्यात येतील.
 तसेच दुर्ग परिक्रमेसह सीप्लेन सेवा देण्यात येणार आहे.
  • सनदी अधिकाऱ्यांना प्रशासकीय सेवा पुरस्कार :
स्वच्छ भारत मिशन आणि प्रधानमंत्री जनधन योजना आदींची उत्कृष्ठ अंमलबजावनी करणाऱ्या केंद्र आणि राज्य सरकारमधील सनदी अधिकाऱ्यांना पंतप्रधान उत्कृष्ठ प्रशासकीय सेवा पुरस्कारांनी सन्मानीत करण्यात येणार आहे.
 दरवर्षी 21 एप्रिल रोजी सार्वजनिक सेवा दिवस म्हणून साजरा केला जातो.
 तसेच या दिवशी प्रशासनात उत्कृष्ठ काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना पुरस्कारांनी सन्मानित केले जाते.
 या वर्षीपासून जनधन किंवा स्वच्छ भारत सारख्या योजनांची प्रभावी अंमलबजावनी करणाऱ्या सनदी अधिकाऱ्यांचाही पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे.
  • उष्णतारोधक आवरणाची यशस्वी चाचणी :
मंगळावर जाण्यासाठी आवश्यक असलेल्या व फुगवता येणाऱ्या डोनटच्या आकाराच्या उष्णतारोधक आवरणाची चाचणी नासाने यशस्वीरीत्या घेतली आहे.
 उष्णतारोधक आवरणाचे नवे तंत्रज्ञान अमेरिकेच्या नासा या संस्थेच्या वैज्ञानिकांनी विकसित केले आहे.
 तसेच या आवरणामुळे अवकाशयान मंगळावर गेल्यानंतरही तेथील उष्ण वातावरणात हळूहळू खाली येत यशस्वीरीत्या उतरू शकणार आहे.
 नासा अशा आवरणाचा उपयोग दुसऱ्या ग्रहावर उतरण्यासाठी करणार असून ते आवरण अग्निबाणात बसू शकेल असे आटोपशीर करावे लागणार आहे.
 नासाच्या लँगले रीसर्च सेंटरच्या अभियंत्यांनी 9 फूट व्यासाचे हे डोनटच्या आकाराचे उष्णतारोधी आवरण चाचणीसाठी सिद्ध केले व अवकाश मोहिमेत नेमकी परिस्थिती काय असेल याचा अदमास घेऊन चाचणी यशस्वी केली.
 तसेच या आवरणाला ‘टोरस’ असे म्हटले जाते.
 हायपरसॉनिक इनफ्लेटेबल एरोडायनॅमिक डिअ‍ॅक्सिलरेटर म्हणजे एचआयएडी हे आवरण पॅराशूटसारखे काम करते.
 मंगळाच्या वातावरणातील बलांचा वापर त्यात अवकाशयानाची गती कमी करण्यासाठी केला जातो.
 अवकाशयानाची गती कमी झाल्याने त्याचे तेथील वातावरणात खाली येताना रक्षण होते, चाचणीच्यावेळी निर्वात पंपाचा वापर करण्यात आला.
 या चाचणीत इनफ्लेटेबल टोरससाठी वापरलेल्या साहित्याची पॅकिंगच्या दृष्टीने चाचणी झाली.
 पृथ्वीबाहेर जाऊन परत येणे व मंगळावर जाणे या प्रकारच्या मोहिमांसाठी त्याचा उपयोग होणार असल्याचे जॉन्सन यांनी सांगितले.
  • आर्ट ऑफ लिव्हिंग’ला दंड :
आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक व अध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांना यमुना नदीकिनारी (दि.4) तीन दिवसांचा आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक महोत्सव आयोजित करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
 परंतु राष्ट्रीय हरित लवादाने या प्रकरणी आर्ट ऑफ लिव्हिंगला पर्यावरण भरपाईपोटी 5 कोटी रुपये दंड केला आहे.
 तसेच हा महोत्सव आयोजित करताना कुठलेही पर्यावरण परवाने घेतले नाहीत, असे सांगून लवादाने आधी या महोत्सवास हरकत घेतली होती.
 हरित लवादाने या प्रकरणी दिल्ली विकास प्राधिकरणालाही 5 लाख व दिल्ली प्रदूषण नियंत्रण समितीला 1 लाख रुपये दंड ठोठावला.
 तसेच अशी परवानगी यापुढे देऊ नये, अशी तंबीही लवादाने या दोन्ही संस्थांना दिली आहे.
 राष्ट्रीय हरित लवादाचे अध्यक्ष स्वतंत्रकुमार यांच्या नेतृत्वाखालील पीठाने हा निर्णय केला.
  • म्यानमार अध्यक्षपदासाठी वाहनचालकाचे नाव :
लोकशाहीवादी नेत्या आँग सान स्यू की यांनी आज म्यानमारच्या अध्यक्षपदासाठी आपले सहकारी तिन क्‍याव यांचे नाव उमेदवार म्हणून जाहीर केले.
 क्‍याव हे स्यू की यांचे पूर्वीचे वाहनचालक होते.
 नुकत्याच झालेल्या ऐतिहसिक निवडणुकीत स्यू की यांच्या नॅशनल लीग फॉर डेमोक्रसी या पक्षाला प्रचंड बहुमत मिळाले होते.
 लष्करी राजवटीने केलेल्या राज्यघटनेतील तरतुदीमुळे स्यू की यांना अध्यक्षपद ग्रहण करता येणार नाही.
 क्‍याव यांच्यासारखा विश्‍वासार्ह सहकाऱ्याचे नाव अध्यक्षपदासाठी पुढे करून देशावर स्वत:चे नियंत्रण ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.या निर्णयाबद्दल स्यू की यांच्या पक्षातील अनेक नेते अंधारात होते. आमच्या पक्षाला मते देऊन देशाचे भविष्य घडविण्याची आशा असलेल्या नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठीच हे पाऊल उचलल्याचे स्यू की यांनी स्पष्ट केले.
  • जर्मनीच्या हातात 'इसिस'ची गोपनीय कागदपत्रे :
जर्मनीच्या गुप्तहेरांच्या हाती 'इसिस‘संबंधी महत्त्वाची गोपनीय कागदपत्रे लागली असून यामुळे या दहशतवादी संघटनेबाबत अधिक माहिती उजेडात आली आहे. या गोपनीय कागदपत्रांमध्ये 'इसिस‘च्या जगभरातील 22 हजास सदस्यांची सविस्तर माहिती आहे.
 या कागदपत्रांमध्ये जगभरातील 'इसिस‘ समर्थकांची माहिती असल्याने अनेक देशांमधील सुरक्षा संस्था त्याची छाननी करण्याची शक्‍यता आहे.
 या माहितीची एकूण 1,736 पाने असून त्यावर 'इसिस‘च्या काळ्या झेंड्याचा शिक्का आहे.
 'इसिस‘मध्ये सहभागी होण्यासाठी युवकांना 23 प्रश्‍नांना उत्तरे देणे आवश्‍यक असल्याचे दिसून आले आहे.

  • शेतकरी महिलांसाठी ‘सफल’ची योजना :
कृषी क्षेत्रात वित्तपुरवठा करण्यात अग्रेसर असलेल्या सस्टेनेबल अ‍ॅग्रो (सफल) कंपनीने शेतकरी महिलांसाठी एका अनोख्या योजनेची घोषणा केली आहे.
 याअंतर्गत महाराष्ट्रातील विदर्भ विभागातील शेतकरी महिलांना 5 हजार रुपयांपपर्यंत व्याजमुक्त विशेष वित्तपुरवठा केला जाणार आहे.
 कोणत्याही तारणाशिवाय हा वित्तपुरवठा होणार असून, पाच हजार ते 50 हजार, असे तीन टप्पे निश्चित केले असून, यामध्ये सरळव्याज पद्धतीने व्याजाची आकारणी होईल.
 पाच ते पंधरा हजारांसाठी 5 टक्के व्याज, 15 ते 25 हजारांसाठी 6 टक्के व्याज, तर 25 ते 50 हजारांसाठी 7 टक्के व्याज आकारणी होईल.
 शेतकरी महिलांचा शाश्वत विकास करणे आणि त्यांच्या स्वप्नांना वित्तीय बळ देणे या उद्दिष्टाने आम्ही ही योजना राबवीत असल्याची प्रतिक्रिया सफलचे व्यवस्थापकीय संचालक अरविंद सोनमाळे यांनी दिली.
  • सहावा दिशादर्शक उपग्रह अंतराळात :
पीएसएलव्ही सी 32 या प्रक्षेपकाद्वारे गुरुवारी आयआरएनएसएस-1 एफ या सहाव्या दिशादर्शक उपग्रहाचे येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरून यशस्वीरीत्या प्रक्षेपण झाले.
 संध्याकाळी 4.01 वाजता प्रक्षेपक अवकाशात झेपावल्यानंतर हा उपग्रह भूस्थिर कक्षेत सोडला गेला.
 भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) सात दिशादर्शक उपग्रहांच्याप्रक्षेपणाची योजना आखली असून आयआरएनएसएस-1 एफ हा या मालिकेतील सहावा उपग्रह आहे.त्यामुळे भारताला अमेरिकेच्या जीपीएस (ग्लोबल पोझिशनिंग सिस्टिम) या स्थितीदर्शक यंत्रणेच्या तोडीची सेवा देणे शक्य होणार आहे.
 गुरुवारी झालेले सदर उपग्रहाचे प्रक्षेपण नियोजितरीत्या तंतोतंत (कॉपीबुक स्टाईल) पार पडले. यापूर्वी जुलै 2013 मध्ये या मालिकेतील पहिल्या उपग्रहाचे प्रक्षेपण झाले होते.
 क्षेत्रीय दिशादर्शक यंत्रणा पूर्ण करण्यासाठी केवळ एका उपग्रहाचे प्रक्षेपण व्हायचे आहे, हे काम पुढील महिन्यात होण्याची आशा आहे, असे इस्रोचे अध्यक्ष ए.एस. किरण कुमार यांनी मिशन कंट्रोल सेंटरमध्ये जल्लोष साजरा करताना म्हटले.
  • रिअल इस्टेट विधेयक राज्यसभेत मंजूर :
देशातील खासगी गृहबांधणी क्षेत्रात पारदर्शकता आणणारे आणि ग्राहकांचे हित जोपासणारे ‘रिअल इस्टेट (नियमन आणि विकास) विधेयक 2015’ गुरुवारी राज्यसभेत आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आले.
 केंद्रीय नगरविकास मंत्री एम. वैंकय्या नायडू यांनी राज्यसभेत मांडलेल्या या विधेयकाला काँग्रेसने पाठिंबा दिल्यामुळे ते सहजपणे मंजूर झाले.
 नायडू म्हणाले, घर घेण्यासाठी आलेल्या ग्राहकांचे हित जोपासण्यासाठी आणि या क्षेत्रांतील व्यवहारांत पारदर्शकता आणण्यासाठी या विधेयकात अनेक तरतुदी करण्यात आल्या आहेत. हे विधेयक मंजूर होणे ही काळाची गरज आहे.
 या विधेयकाला प्रामुख्याने अण्णा द्रमुकने विरोध केला होता. मात्र, त्यांनीही या विधेयकाला पाठिंबा द्यावा, अशी मागणी नायडू यांनी केली.
 देशात वेगाने विस्तारत असलेल्या गृहबांधणी क्षेत्राचे नियमन करण्याच्या दृष्टिने या विधेयकाला विशेष महत्त्व आहे.
 आवश्यक परवानग्यांसाठी एक खिडकी योजना राबविण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
  • PSLV C32
सहाव्या दिशादर्शक उपग्रहाचे प्रक्षेपण
आयआरएनएसएस- १ एफ मालिकेतील सहाव्या दिशादर्शक उपग्रहाचे गुरुवारी श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अवकाश तळावरुन यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले.
  • IRNSS-1Cचेन्नई-
आयआरएनएसएस- १ एफ मालिकेतील सहाव्या दिशादर्शक उपग्रहाचे गुरुवारी दुपारी चार वाजता श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अवकाश तळावरुन यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले.
भारताच्या पीएसएलव्ही-सी ३२ प्रक्षेपकाव्दारे हे प्रक्षेपण करण्यात आले.
आयआरएनएसएस मालिकेव्दारे भारत अमेरिकेच्या धर्तीवर स्वत:ची जीपीएस यंत्रणा विकसित करत आहे.
आयआरएनएसएस यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी चार उपग्रह पुरेसे आहेत. भारताचा हा सहावा दिशादर्शक उपग्रह आहे.
उर्वरित दोन उपग्रहांमुळे आयआरएनएसएसचे काम अधिक अचूक आणि प्रभावी होणार असल्याचे इस्त्रोच्या अधिका-यांनी सांगितले.
पीएसएलव्ही – सी ३२ या प्रक्षेपकाचे हे ३४ वे उड्डाण आहे.
आयआरएनएसएसमधील सातही उपग्रह अंतराळात पोचल्यानंतर भारताची जीपीएस सेवा ही संयुक्त राष्ट्रांच्या बरोबरीची होणार आहे.
  • • गेल्या दोन महिन्यांमध्ये 65 पाकिस्तानी नागरिकांना भारताचे नागरिकत्व देण्यात आले आहे. यामध्ये गायक अदनान सामी याचा समावेश आहे . समाजात एखाद्या कुटुंबाला वाळीत टाकणे अथवा जातपंचायतीच्या जाचक निवाड्याने समाजातून बहिष्कृत करण्याच्या घटनांना आता कायमचा चाप लागणार आहे. राज्य मंत्रिमंडळाने आज अशा प्रकारच्या अमानवी प्रकाराला कायद्याने पायबंद घालणारे विधेयक विधिमंडळात मांडण्यास हिरवा कंदील दाखविला
  • केंद्रीय अभ्यासक्रमाच्या महाराष्ट्रातील शाळांमध्ये पहिली ते सातवी इयत्तेपर्यंत मराठी भाषा शिकविणे बंधनकारक करण्यात येणार आहे. तसेच शिवाजी महाराजांचा इतिहास या शाळांमध्ये शिकविण्यात येणार असून, त्यासाठी विधिमंडळ सदस्याचा ठराव या अधिवेशनात करण्यात येईल व तो केंद्राकडे पाठविण्यात येईल, असे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी स्पष्ट केले
  •  ‘इंडिया‘ ऐवजी "भारत‘ हाच शब्द वापरण्यात यावा यासाठी दाखल करण्यात आलेली जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. ज्यांना भारत म्हणायचे आहे त्यांनी भारत म्हणावे, तर ज्यांना इंडिया म्हणायचे आहे त्यांनी इंडिया म्हणावे, असेही न्यायाधीशांनी सांगितले. मागील वर्षी एप्रिलमध्ये सत्र न्यायालयाने या याचिकेसंदर्भात केंद्रासह सर्व राज्य सरकारांकडून अभिप्राय मागवला होता.
  •  बिहारमधील शिक्षकांची क्षमतावृद्धी करण्यासाठी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्त्वाखालील सरकारने माध्यमिक शाळेतील शिक्षकांना इंग्रजी बोलण्याचे प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे
  •  राजस्थान सरकार शालेय अभ्यासक्रमातून पायथागोरस, न्यूटन आणि थॉमस एडिसनसह अन्य कोणत्याही पाश्चिचमात्य विद्वानाचे नाव हटविणार नसल्याचे केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी राज्यसभेत स्पष्ट केले.
  • राष्ट्रपतींनी संसदेच्या संयुक्त बैठकीला उद्देशून केलेल्या अभिभाषणावरील आभारदर्शक ठराव राज्यसभेत जसाचा तसा मंजूर करवून घेण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला पुन्हा सपशेल अपयश आले. राजस्थान व हरियानातील भाजप सरकारांनी निवडणुकीला उभे राहण्यासाठी सक्तीच्या केलेल्या शैक्षणिक पात्रतेला कडाडून विरोध करणाऱ्या कॉंग्रेसची दुरुस्ती मंजूर झाल्याने ती जोडून राष्ट्रपतींच्या प्रती आभारदर्शक ठराव मंजूर करावा लागला. याच मुद्द्यावर अभिभाषणाला विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी सुचविलेली दुरुस्ती 94 विरुद्ध 61 अशा मतांनी मंजूर झाल्याने सरकारचा तांत्रिक; पण नामुष्कीजनक पराभव झाला.
  • अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी आज तीन राज्यांतील प्रायमरीजमध्ये विजय संपादन केला, तर डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार बर्नी सॅंडर्स यांनी मिसिसिपीमध्ये विजय मिळवत हिलरी क्लिं्टन यांना धक्का दिला.
  • • विविध बॅंकांकडून उचललेले 9 हजार कोटी रुपयांचे कर्ज बुडविल्याचा आरोप असलेले विजय मल्ल्या यांनी देश सोडल्याची माहिती सरकारने सर्वोच्च न्यायालयात दिली.
  • • भारतात पुरुषांपेक्षा स्त्रियांकडून इंटरनेटचा अधिक वापर होत असल्याची माहिती "गुगल‘ने दिली आहे. भारतातील स्त्रिया विशेषत: माता, सौंदर्यापासून फॅशनपर्यंत आणि आरोग्यपासून फिटनेसपर्यंतच्या माहितीचा शोध घेण्यासाठी इंटरनेटचा अधिक वापर करतात. भारतातील प्रत्येक तीन मातांपैकी एक माता इंटरनेटचा वापर करते, तर चारपैकी केवळ एकच पिता इंटरनेटचा वापर करतो. भारतातील स्त्रियांचे जीवनमान बदलण्यात इंटरनेट महत्त्वाची भूमिका बजावत आहे. पुरुषांपेक्षा महिलांनी इंटरनेटवर अधिक वेळ खर्च करणे ही खूप मोठी गोष्ट असल्याचे मत व्यक्त करतानाच, हे प्रमाण भविष्यात वाढण्याची शक्यलताही "गुगल‘ने व्यक्त केली आहे.
  •  गेल्या चार वर्षांपासून राज्याला सतत दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. चालू खरीप हंगामाध्ये जवळपास 15 हजार 750 गावे दुष्काळामुळे बाधित झाली आहेत. केंद्र सरकारने दुष्काळ निवारणासाठी तीन हजार 49 कोटी रुपयांचे साह्य दिले आहे. तसेच आतापर्यंत 2 हजार 536 कोटी रुपये दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना अर्थसाह्य वितरित केले असल्याचे सांगताना यापुढेही राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील, अशी ग्वाही राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी दिली
  • बिहारमध्ये अवैध दारूनिर्मितीला आळा घालण्यासाठी बेकायदा दारू विक्री करणाऱ्यांना मृत्युदंडाची शिक्षा करण्याचा विचार बिहार सरकार करत आहे. अवैध दारूनिर्मिती व विक्रीवर 1 एप्रिलपासून बंदी आणण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून, त्याबाबतचे विधेयक विधिमंडळाच्या आगामी अधिवेशनात मांडण्यात येणार आहे. दारू पिणाऱ्यांना त्यापासून परावृत्त करण्यासाठी सामाजिक संस्था, तसेच सुमारे 4 लाख स्वयंसेवक घरोघरी जाऊन प्रयत्न करणार आहेत. राज्यातील सुमारे 72 हजार शाळांमधील विद्यार्थ्यांना हमीपत्राचे वाटप करण्यात आले असून, त्यावर मद्यप्राशन करणार नाही, अशी लेखी हमी त्यांच्या पालकांकडून घेतली जाणार आहे.
  • शेअर बाजारातील गुंतवणूकदारांच्या संपत्तीत गेल्या वर्षभरात तब्बल 14 लाख कोटी रुपयांची घट झाली आहे. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेंसेक्स उच्चांकी पातळीपासून 18 टक्क्यांनी खाली आला
  • देशातील सर्वांत मोठी खासगी बॅंक असलेल्या आयसीआयसीआयने महिला कर्मचाऱ्यांना घरुन काम करता येण्याच्या उद्देशार्थ विशेष तंत्रज्ञानाची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली
  • * जगभरातील बौद्धधर्मीयांसाठी महत्त्वपूर्ण असणाऱ्या नागपूर येथील दीक्षाभूमीस "अ‘ वर्ग पर्यटनस्थळ म्हणून दर्जा देण्याचा ऐतिहासिक निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला
  •  
  •  • दहाहून अधिक बँकांनी कोटय़वधींचे कर्जबुडवे म्हणून जाहीर केलेले विजय मल्ल्या हे आता भारत सोडून जाणार असून ते ब्रिटनमध्ये स्थायिक होणार आहेत. अध्यक्षपदाचा हट्ट राखणाऱ्या मल्ल्या यांनी अखेर दिआज्जिओचे वर्चस्व असलेल्या यूनायटेड स्पिरिट्सवरून (यूएसएल) पायउतार होण्याचा निर्णय घेतला आहे. या बदल्यात मल्ल्या यांना ७.५ कोटी डॉलर (५१५ कोटी रुपये) मिळणार
  • • देशातील दुसऱ्या क्रमांकाची माहिती तंत्रज्ञान कंपनी असलेल्या इन्फोसिसचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल सिक्का यांना दोन वर्षांची मुदतवाढ मिळाली आहे.
    सिक्का हे आता या पदावर पुढील पाच वर्षे म्हणजे २०२१ पर्यंत कार्यरत राहतील
  • • केंद्र सरकारने संसदेला सादर केलेल्या 2016 च्या वार्षिक आर्थिक पाहणी अहवालात आगामी वर्षात 7-7.5 ते 8 टक्के विकासदराचे संकेत देतानाच वर्तमान आर्थिक वर्षातील विकासदर 7-7.75 टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
  • • युनायटेड स्पिरिट्‌स या कंपनीच्या अध्यक्षपदाचा विजय मल्ल्या यांनी राजीनामा दिला आहे. त्यांच्या कुटुंबीयांनी स्थापन केलेली आणि विजय मल्ल्या यांनी वाढवलेली ही कंपनी सध्या दियागो या कंपनीकडून नियंत्रित केली जाते.
  • • अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराज यांचे आंतरराष्ट्रीय स्मारक उभारण्यासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून "इजिस' या कंपनीची नेमणूक करण्यात आली
  • • कोणत्याही आंदोलनादरम्यान सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणाऱ्या व्यक्ती वा राजकीय पक्षांविरोधात कडक कारवाई करण्याची आवश्यआकता असल्याचे मत सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केले.
  • •आयुष्यभर कलेचा प्रसार करत असल्याबद्दल एका भारतीय वंशाच्या कलाकाराला फ्रान्स सरकारने नाइटहूड हा किताब देऊन त्याचा सन्मान केला आहे. दक्षिण आफ्रिकेत राहणाऱ्या इस्माईल महंमद यांचा फ्रेंच राजदूताने "नाइट ऑफ द ऑर्डर ऑफ आर्टस अँड लिटरेचर‘ हा किताब दिला. फ्रान्स सरकारकडून 1957 पासून हा किताब दिला जात आहे. कला आणि साहित्याद्वारे फ्रान्सच्या संस्कृतीचा प्रसार करणाऱ्या कलाकारांना हा किताब दिला जातो.
  • • सामाजिक जबाबदारी तसेच व्यावसायिक विचार करून टाटा मोटर्सने मागील महिन्यात जाहीर केलेल्या आगामी 'झिका' नावाच्या चारचाकी वाहनाचे नाव बदलून 'टियागो' असे केले
  • • जगामध्ये सौर ऊर्जेवर चालणारी पहिली संसद म्हणून येथील ठरली आहे, असा दावा पाकिस्तानने केला
  • • जागतिक हवामानबदल व पर्यावरण संवर्धनाच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या ग्रीनपीस या स्वयंसेवी संस्थेने 2015 भारतामधील वायु प्रदुषणाची पातळी ही चीनपेक्षा जास्त असल्याचे म्हटले
  • • दिल्ली-आग्रा मार्गावरुन धावणाऱ्या गतिमान एक्सवप्रेस रेल्वेगाडीमध्ये प्रवाशांचे गुलाबाचे फुल देऊन स्वागत करण्यासाठी रेल्वे सुंदरींची (ट्रेन होस्टेस) नेमणूक करण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाकडून घेण्यात आला
  • • रिपब्लिकन पक्षाचे उत्सुक उमेदवार जेब बुश यांनी अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून माघार घेतली आहे. दक्षिण कॅरोलिनामध्ये स्वीकाराव्या लागलेल्या मोठ्या पराभवामुळे त्यांनी माघार घेतली

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा