Post views: counter

Current Affairs April 2016 Part - 2


  • क्रिकेट स्टेडियमला डॅरेन सॅमीचे नाव :
वेस्ट इंडीजला टी-20 वर्ल्डकप जिंकून देणारा कर्णधार डॅरेन सॅमी याचे नाव सेंट ल्युसिया येथील एका क्रिकेट स्टेडियमला दिले जाणार आहे. ब्युसेजोर क्रिकेट मैदान आता ‘डॅरेन सॅमी नॅशनल क्रिकेट ग्राऊंड’ नावाने ओळखले जाईल. एका भागाला सेंट ल्युसियाचाच अन्य एक खेळाडू जॉन्सन चार्ल्स याचेही नाव असेल. जॉन्सन चार्ल्सदेखील टी-20 वर्ल्डकप जिंकणाऱ्या संघाचा सदस्य आहे. वेस्ट इंडीज क्रिकेट मंडळानुसार, सेंट ल्युसियाचे पंतप्रधान कॅनी डी अँथोनी यांनी याबाबतची घोषणा केली. वेस्ट इंडीजने 2012 मध्ये जेव्हा टी-20 वर्ल्डकप जिंकला होता, तेव्हाही सॅमी हाच कर्णधार होता.
  • स्मार्ट फोनवर विना इंटरनेट पहा दूरदर्शन सेवा :
सध्याच्या टेक्नोसॅव्ही युगाच मोबाईल युझर्सची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. तसेच ही बाब लक्षात घेऊन 'दूरदर्शन' चॅनेलने एक पाऊल पुढे टाकत नवी सुविधा आणली असून त्याद्वारे आता मोबाईलवरही 'दूरदर्शन' चॅनेल पाहता येणार आहे.  देशांतील 16 शहरांमध्ये दूरदर्शनतर्फे ही सुविधा विनाइंटरनेट उपलब्ध करून देण्यात आली आहे. 25 फेब्रुवारीपासून दिल्ली, मुंबई, औरंगाबाद, कोलकाता, चेन्नी, गुवाहाटी, पाटणा, रांची, लखनऊ, जालंधर, रायपूर, इंदौर, भोपाळ, बंगळुरू आणि अहमदाबाद या शहरांमध्ये दूरदर्शनची डिजीटल टेलिव्हिजन सेवा सुरू झाली असून आता ग्राहकांना मोबाईलवरही दूरदर्शनचे कार्यक्रम पाहता येणार आहेत.
  • चीनकडून 'विज्ञान उपग्रहा'चे प्रक्षेपण :
गुरुत्वाकर्षण (मायक्रोग्रॅव्हिटी) आणि अवकाशामधील विविध घटकांचा अभ्यास करण्याच्या उद्देशार्थ चीनने (दि.6) एका उपग्रहाचे (SJ-10) प्रक्षेपण केले. चीनमधील गोबीच्या वाळवंटातील जिउकान उपग्रहण उड्डाण केंद्रामधून या उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात आले. तसेच हा उपग्रह विशिष्ट काळानंतर पुन्हा पृथ्वीवर परतणार असून या काळात अवकाशात मिळविलेल्या माहितीचे
पृथ:करण करणे वैज्ञानिकांना शक्‍य होणार आहे. अवकाशात असताना या उपग्रहाच्या माध्यमामधून अवकाशातील विविध घटकांची माहिती मिळविण्यासाठी एकूण 19 वैज्ञानिक प्रयोग केले जाणार आहेत. तसेच या प्रयोगांमध्ये अवकाशात मानवी प्रजननाच्या शक्‍यतेविषयीची माहिती मिळविण्यासंदर्भातील प्रयोगाचाही समावेश आहे, याचबरोबर, या वैज्ञानिक मोहिमेमध्ये अवकाशामधील किरणोत्साराचाही अभ्यास केला जाणार आहे. चीनच्या महत्त्वाकांक्षी वैज्ञानिक उपग्रह कार्यक्रमाच्या माध्यमामधून अवकाशात प्रक्षेपित केला जाणारा हा दुसरा उपग्रह आहे.
  • भारताला संरक्षण क्षेत्रात अमेरिकेकडून सहकार्य :
संरक्षण क्षेत्रामध्ये भारताबरोबर अतिशय जवळचे आणि मजबूत संबंध निर्माण करण्याची अमेरिकेची इच्छा असल्याची प्रतिक्रिया अमेरिकेचे संरक्षणमंत्री ऍश्‍टन कार्टर यांनी (दि.6) दिली. कार्टर हे लवकरच भारताचा दौरा करणार असून, या दौऱ्यावेळी भारत-अमेरिका यांच्यातील द्विपक्षीय संबंधांना चालना देण्यासाठी मोठी घोषणा करण्यात येणार असल्याचेही अमेरिकेकडून स्पष्ट करण्यात आले. भारताबरोबर अतिशय जवळचे संबंध निर्माण करण्याचा अमेरिकेचा मानस आहे, संरक्षण क्षेत्रही त्याला अपवाद नाही. तसेच द्विपक्षीय संबंधांना चालना देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. आधुनिक तंत्रज्ञान भारताला देण्यात येईल. तसेच, संरक्षण क्षेत्राला लागणाऱ्या साहित्याची निर्मिती भारतातच संयुक्तपणे करण्याच्या प्रस्तावावरही चर्चा होणार आहे. वॉशिंग्टनमधील सेंटर फॉर स्ट्रॅटेजिक अँड इंटरनॅशनल स्टडीज (सीएसआयएस) मध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमावेळी कार्टर यांनी ही माहिती दिली.
  • बिहारमध्ये दारूबंदी लागू :
बिहारमध्ये नितीशकुमार यांच्या सरकारने राज्यात संपूर्ण दारूबंदी जाहीर केली आहे. देशी बनावटीच्या परदेशी दारूसह सर्व प्रकारची दारू आता राज्यात विकता येणार नाही. मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर दारूबंदीची घोषणा केली. बिहारमध्ये आता बार, रेस्टॉरंटस व अन्य कुठेही दारू मिळणार नाही. तसेच त्यांच्या सरकारने 1 एप्रिलला ग्रामीण भागात देशी व इतर दारूवर बंदी घातली होती, पण गावे व शहरात परदेशी दारूच्या विक्रीला परवानगी कायम ठेवली होती. परंतु लोकांनी विशेष करून महिलांनी दारूबंदीला चार दिवसात पाटणा व इतर शहरात प्रचंड मोठा प्रतिसाद दिल्याने दारूवर पूर्ण बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला.आता 1991 चा नियम लागू केला असून केवळ नीरा पिण्यास परवानगी असून ताडीला बंदी घालण्यात आली आहे. नीरा व ताडी पामच्या झाडापासून काढली जाते.

  • वन रँक-वन पेन्शनची अंमलबजावणी :
केंद्र शासनाच्या वन रँक-वन पेन्शन या योजनेवर लष्कराकडून युद्धपातळीवर काम सुरू झाले आहे. लष्करातील 27 लाखांपैकी एकूण 26 लाख निवृत्तिवेतन धारकांना ‘वन रँक-वन पेन्शन’प्रमाणे पेन्शन देण्यास सुरुवात झाली आहे. उर्वरित एक लाख निवृत्तिवेतन धारकांच्या पेन्शनमध्ये काही त्रुटी असून, पुढील दोन महिन्यांत त्या पूर्णपणे दूर करण्यात येतील, अशी माहिती लष्कराच्या निवृत्तिवेतन विभागाचे प्रधान नियंत्रक डॉ. जी. डी. पुंगळे यांनी दिली. पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या पेन्शन अदालतीसाठी डॉ. पुंगळे उपस्थित होते. 'मागील 6 महिन्यांपासून अलाहाबाद येथे लष्कराचे 50 लेखनिक ‘वन रँक-वन पेन्शन’संदर्भात काम करीत आहेत. शासनाने योजना जाहीर केल्यानंतर आत्तापर्यंत एकूण निवृत्तिवेतनाच्या 90 टक्क्यांहून अधिक लाभार्थ्यांना ‘वन रँक-वन पेन्शन’प्रमाणे पेन्शन जमा होण्यास सुरुवात झाली आहे.
  • अणुसुरक्षा शिखर परिषदच्या उपाययोजना जाहीर :
अमेरिकेत झालेल्या अणुसुरक्षा शिखर बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत अणुसुरक्षेसाठी वचनबद्ध असल्याचे सांगताना काही उपाययोजना जाहीर केल्या. तसेच पन्नास देशांचे प्रतिनिधी या शिखर बैठकीस उपस्थित होते. अण्वस्त्रांची तस्करी रोखणे, आण्विक दहशतवाद टाळण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करणे यासारख्या उपाययोजनांचा त्यात समावेश आहे. अल कायदा व आयसिसच्या दहशतवाद्यांना अण्वस्त्रे मिळाली तर ती ते वापरतील अशी भीती अमेरिकी अध्यक्ष बराक ओबामा यांनी या बैठकीत व्यक्त केली.
  • आशियातील शक्तिशाली महिलांमध्ये नीता अंबानीची निवड :
रिलायन्स इंडस्ट्रीजच्या संचालक नीता अंबानी यांची यावर्षीच्या फोर्ब्जच्या आशियातील शक्तिशाली महिलांमध्ये निवड झाली आहे. तसेच या मासिकाच्या मुखपृष्ठावर नीता अंबानी यांचे छायाचित्र आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अध्यक्षा अरुंधती भट्टाचार्य यांच्यासह आठ भारतीय महिलांनीही फोर्ब्जच्या आशियातील शक्तिशाली 50 महिला व्यावसायिकांच्या यादीत (आशिया फिफ्टी पॉवर बिझनेस वुमेन 2016) स्थान मिळविले आहे. लिंगभेद व असमान संधी असतानाही व्यावसायिक जगामध्ये आपले स्थान मिळविणाऱ्या महिलांची नोंद फोर्ब्ज घेत असते. फोर्ब्जने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या यादीमध्ये नीता अंबानी, अरूंधती भट्टाचार्य यांच्याबरोबरच डाटा अ‍ॅनालिटिक्स सर्व्हिसेसच्या अंबिगा धीरज, वेलस्पन इंडियाच्या दीपाली गोयंका, ल्युपिनच्या वीनिता गुप्ता यांचा समावेश आहे. याशिवाय भारतामधील आयसीआयसीआय बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक चंदा कोचर, व्हीएलसीसीच्या उपाध्यक्ष वंदना लुथरा व बायोकॉनच्या अध्यक्षा किरण मझुमदार-शॉ यांनीही या यादीत स्थान पटकावले आहे.
  • प्राप्तिकर खात्याची ऑनलाइन गणकयंत्र सुविधा :
2016-17 या वर्षांसाठी आपला प्राप्तीकर किती आहे हे मोजण्यासाठी प्राप्तिकर खात्याने ऑनलाइन गणकयंत्राची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. टॅक्स कॅलक्युलेटर हा ऑनलाइन प्रोग्रॅम असून तो प्राप्तिकर खात्याच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तसेच त्याच्या मदतीने विवरणपत्र भरताना नेमका प्राप्तिकर किती हे समजणार आहे, करदायित्व समजण्यासाठी ही सोय केली आहे. मूलभूत माहिती व आकडे भरल्यानंतर तुम्हाला कराची रक्कम कळू शकेल. व्यक्तिगत पगारदार, एकत्र कुटुंब व इतर उत्पन्न स्रोत असलेल्या करदात्यांसाठी आयटीआर 1 अर्ज भरायचा आहे तर विभक्त हिंदू कुटुंब व व्यक्तींसाठी आयटीआर 4 हा अर्ज भरायचा आहे. या वर्षी केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने अधिसूचना जारी केली असून त्यानुसार 30 मार्चला नवीन अर्ज अधिसूचित केले आहेत व ते 31 जुलैपर्यंत सादर करता येणार आहेत.
  •  ई फायलिंग व्हॉल्ट :-
 करदात्यांना आपले ई-फायलिंग अकाउंट सुरक्षित राखता यावे यासाठी प्राप्तीकर खात्याने ई फायलिंग व्हॉल्ट ही नवी सुविधा जारी केली आहे. ई-फायलिंग अकाउंटवर लॉग ऑन केल्यानंतर करदात्याने ई फायलिंग व्हॉल्ट-हायर सिक्युरिटी सिलेक्ट केल्यास त्यापुढची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर या सुविधेचा लाभ घेता येईल.
 ही सुविधा घेतल्यानंतर करदात्याने यापूर्वी जरी युजर आयडी आणि पासवर्ड कोणाला दिला असला तरीही इतर कोणालाही लॉगींग करण्यापासून करदाता रोखू शकतो. केवळ युजर आयडी आणि पासवर्ड पेक्षा ही सुविधा सर्वोच्च सुरक्षा आहे.'आयआयटी' च्या शैक्षनिक शुल्कात वाढ :भारतीय तंत्रज्ञान संस्थांमध्ये (आयआयटी) शिकणे आता आणखी महाग झाले आहे. पदवीपूर्व अभ्यासक्रमाच्या प्रवेश शुल्कामध्ये तब्बल 122 टक्‍क्‍यांची वाढ करण्यात आली असून, हे शुल्क 90 हजारांवरून 2 लाख रुपये करण्यात आले आहे.
 पुढील शैक्षणिक सत्रापासून ही वाढ लागू करण्यात येईल, अनुसूचित जाती, जमाती, अपंग आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या गटांमधील विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण घेता येईल. तसेच ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न हे 5 लाखांपेक्षा कमी असेल अशांचेही दोनतृतीयांश एवढे शुल्क माफ करण्यात आले आहे. कोणत्याच श्रेणीमध्ये न येणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी बिनव्याजी कर्जाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. उच्चस्तरीय समितीच्या शिफारशीनंतर मनुष्यबळ विकास मंत्रालयाने शुल्कामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला असून, यासंबंधीची अधिसूचनाही लवकरच जारी करण्यात येईल.
 दरम्यान, सध्या 'आयआयटी'मध्ये शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांना या शुल्कवाढीचा कोणताही फटका बसणार नसून, केवळ नव्याने प्रवेश घेणाऱ्यांसाठी ही वाढ लागू असेल.
  • इंतानोन, मोमोता अजिंक्य
: चौथ्या मानांकित थायलंडच्या रत्चानोक इंतानोनने आॅलिम्पिक चॅम्पियन चीनच्या ली जुईरुईचा २१-१७, २१-१८ ने पराभव करीत रविवारी इंडिया ओपन सुपर सिरीज स्पर्धेत महिला एकेरीत जेतेपदाचा मान मिळवला. सिरीफोर्ट स्पोटर्््स कॉम्प्लेक्समध्ये खेळल्या गेलेल्या या लढतीत इंतानोनने तिसऱ्या मानांकित चीनच्या खेळाडूचा ४२ मिनिटांमध्ये पराभव केला. पुरुषांच्या एकेरीत जपानच्या केंटो मोमोताने डेन्मार्कच्या विक्टर अक्सेलसनचा २१-१५, २१-१८ असा सरळ दोन सरळ सेटमध्ये पराभव करून विजेतेपदावर आपली मोहोर उमटविली. जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानावर असलेल्या इंतानोनने दुसऱ्या क्रमांकावरील जुईरुईविरुद्ध कारकिर्दीत ११ व्यांदा खेळताना चौथा विजय मिळवला. भारतीय स्टार सायना नेहवालला उपांत्य फेरीत पराभूत करणाऱ्या जुईरुईला जेतेपदाचा दावेदार मानले जात होते, पण थायलंडच्या खेळाडूने अंतिम लढतीत शानदार कामगिरी करताना चीनच्या खेळाडूला चुका करण्यास बाध्य केले. पहिल्या गेममध्ये इंतानोनने १५-१५ अशा बरोबरीनंतर सलग तीन गुण वसूल करीत १८-१५ अशी आघाडी घेतली व २१-१७ ने गेम जिंकला. दुसऱ्या गेममध्ये इंतानोनने ७-१ अशी दमदार आघाडी घेतल्यानंतर मागे वळून बघितले नाही. इंतानोनने दुसरी गेम २१-१८ ने गेम जिंकत विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.


* चर्चित पुस्तक:-
द किस ऑफ़ लाइफ –इमरान हाशमी
* निवड:-
केंद्रीय प्रशासनिक न्यायाधिकरण (कैट) चे अध्यक्ष :- प्रमोद कोहली (न्यायमूर्ति (सेवानिवृत्त)
न्यायमूर्ति प्रमोद कोहली यांच्या विषयी
* प्रमोद कोहली यांचा जन्म जम्मू आणी कश्मीर मध्ये राजौरी या शहर 1951 मध्ये झाला होता
* डिसेम्बर 1990 मध्ये ते जम्मू-कश्मीर चे महाधिवक्ता बनेले
* त्यानी न्यायाधीश म्हणून जम्मू-कश्मीर, झारखंड आणी पंजाब, हरियाणा येथे’ काम केले
------------------------------------------------------
आयोग:-
* मधुकर गुप्ता:-
* पाकिस्तानसोबत असलेली सीमारेषा अधिक सुरक्षित करण्यासाठी केंद्र सरकारने नेमलेली उच्चस्तरीय समिती
* ही समिती केंद्र सरकारला सीमेवरील सुरक्षेसाठीच्या उपाययोजना सांगणार आहे
* सीमेवरील गस्तीतील त्रुटी आणि धोकादायक ठिकाणे यांच्याबाबत ही समिती अभ्यास करणार असून, या त्रुटी काढून टाकण्यासाठी किंवा अंशत: कमी करण्यासाठी उपाय सुचविणार आहे. येत्या तीन महिन्यांत समिती त्यांचा अहवाल सादर करणार आहे
------------------------------------------------------------
* अभियान:-
* मिशन भगीरथ:-
* हे अभियान तेलगना राज्याकडून राबवले जात आहे
* उद्देश:- तेलगना राज्यातील दुर्गम भागात पिण्याच्या पाण्याची उपलब्धता करून देणे हा आहे
* ऑपरेशन धुंग:-
* हे अभियान राष्ट्रीय सुरक्षा गार्ड ने राबवले होते
* पंजाब राज्यातील पठाणकोट लष्कराच्या हवाई तळांवर जानेवारी २०१६ मध्ये दहशतवाध्यानी केलेल्या हल्याच्या पत्रीकार म्हणून भारतीय लष्कराने ऑपरेशन धुंग राबवले
-----------------------------------------------------------
* चर्चित स्थळे:-
मांगी- तुंगी:-
* सटाणा तालुक्यातील मांगी-तुंगी येथे वृषभदेव देवाची जगातील सर्वात उंच १०८ फुटी उंचीची मूर्ती कोरण्यात आली आतापर्यंत कर्नाटक येथील के श्रवनबेळगोळ ५७ फुट ऊंचीची भगवान बाहुबली यांची मूर्ती जगातील सर्वात उंच समजली जात होती
* भगवान वृषभदेव जे जैन धर्माचे पहिले तीर्थंकर आहेत
---------------------------------------------------------------
निवड:-
बी. एस. येडियुराप्पा:-
* कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री, भाजपचे ज्येष्ठ नेते व राष्ट्रीय उपाध्यक्ष बी. एस. येडियुराप्पा यांची कर्नाटक प्रदेश भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षपदी चौथ्यांदा नियुक्ती केली
* तत्कालीन लोकायुक्त संतोष हेगडे यांनी भ्रष्टाचाराबाबत येडिंच्या विरोधात अहवाल दिल्याने त्यांना मुख्यमंत्रिपद सोडावे लागले होते.
* 2011 च्या ऑक्टोबरमध्ये येडियुराप्पा 21 दिवस कारागृहात होते.
* त्यांनी पक्षाशी फारकत घेऊन कर्नाटक जनता पक्ष (केजेपी) स्थापन केला होता.
* 2014 ला झालेल्या लोकसभा निवडणुकीत ते स्वगृही परतले.
* ते शिमोग्याचे खासदारही आहेत. भ्रष्टाचारासंबंधी लोकायुक्तांनी दाखल केलेली 15 आरोपपत्रे उच्च न्यायालयाने रद्दबातल ठरवल्याने येडियुराप्पांचा अध्यक्षपदाचा मार्ग मोकळा झाला होता. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेपास नकार दिला होता.
---------------------------------------------------------------
ब्रिक्स मैत्री शहरे परिषद:-
* ब्रिक्स देशांमधील प्रमुख शहरांमध्ये माहिती-तंत्रज्ञान, शहरीकरण, तेथील समस्या या माहितीचे आदानप्रदान होण्याच्यादृष्टीने भारतात मुंबई मध्ये प्रथमच ब्रिक्स मैत्री शहरे या संकल्पनेवर आधारित तीन दिवसीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
* 14 ते 16 एप्रिल दरम्यान ही परिषद होईल.
* सहभागी शहरे - साओ पावलो (ब्राझील), सेंट पीटर्सबर्ग (रशिया), बीजिंग आणि शांघाय (चीन), केपटाऊन आणि जोहान्सबर्ग (दक्षिण आफ्रिका)
* उद्घाटक:- केंद्रीय शहर विकास मंत्री वेंकय्या नायडू
* चर्चा :-पायाभूत सेवा सुविधांचा विकास, घनकचरा व्यवस्थापन, परवडणारी घरे, शहरातील वाहतूक व्यवस्था, शहरीकरण आणि समस्या
* प्रमुख उद्देश - जगभरात गेल्या दोन दशकांत वेगाने शहरीकरण झाले आहे. त्याचप्रमाणे या शहरांमधील समस्याही वाढल्या आहेत. ब्रिक्स शहरांमध्ये सहकार्याची भावना वृद्धीगंत करण्यास ही परिषद महत्त्वाची ठरेल. केवळ राष्ट्रीय पातळीवर मर्यादित न राहता स्थानिक पातळीवरही माहितीचे आदान प्रदान करणे
  • 2016 ची मिस इंडिया प्रियदर्शिनी चॅटर्जी :
जगाच्या सौंदर्यात भर टाकणा-या एफबीबी फेमिना मिस इंडिया 2016 चा किताब प्रियदर्शिनी चॅटर्जीनं पटकावला आहे. 9 एप्रिलला यश राज स्टुडिओमध्ये या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते. तसेच त्यावेळी प्रियदर्शिनी चॅटर्जीला मिस इंडिया 2016 घोषित करण्यात आलं आहे. मिस इंडिया हा किताब पटकावलेल्या प्रियदर्शिनी चॅटर्जी मिस वर्ल्ड 2016 ला भारताचं प्रतिनिधित्व करणार आहे. पंखुरी गिडवानी हिला रनर या कॅटगरीत एफबीबी फेमिना मिस इंडिया 2016 चे दुसरे पारितोषिक मिळाले आहे. तर सुश्रूती क्रिष्णा हिला रनर अप कॅटेगरीत पहिला पारितोषिक मिळाले आहे. मात्र प्रियदर्शिनी चॅटर्जी यावेळी मिस इंडिया 2016 ची विजेती ठरली आहे.
  • ‘जदयू’च्या अध्यक्षपदी नितीश कुमार :
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची (दि.10) जदयूच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.   जदयुच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत एकमताने त्यांची निवड करण्यात आली. पक्षाध्यक्ष म्हणून निवड झाल्याने नितीश यांच्यावर आणखी एक महत्त्वाची जबाबदारी आली आहे. शरद यादव यांना तिसऱ्यांदा अध्यक्ष करण्यासाठी पक्षाच्या घटनेत बदल करण्यात आला होता. परंतु त्यांनी चौथ्यांदा पक्षाध्यक्ष होण्याला नकार दिला. शरद यादव यांनी सलग 10 वर्षे पक्षाध्यक्षपद भूषविले होते. कार्यकाळातील मुदत संपल्यानंतर यादव यांनी पक्षाचा कार्यभार नितीश कुमारांकडे सोपवण्याची इच्छा व्यक्त केली होती.
  • भारताचे आशियाई खो-खो स्पर्धेत विजेतेपद :
भारताने संपूर्ण स्पर्धेवर आपले वर्चस्व राखताना नुकत्याच झालेल्या आशियाई खो-खो स्पर्धेत मुलांच्या व मुलींच्या गटाचे विजेतेपद पटकावले. विशेष म्हणजे, दोन्ही गटांचे विजेतेपद उंचावताना भारताने बांगलादेशला पराभूत केले. तसेच या आधी झालेल्या दक्षिण आशियाई स्पर्धेतही अंतिम सामना भारत- बांगलादेश असाच रंगला होता. इंदौर येथे झालेल्या या स्पर्धेच्या महिलांचा अंतिम सामना एकतर्फी झाला. भारताने अपेक्षित बाजी मारताना, बांगलादेशचा 14-9, 12-7 असा पराभव केला. नाणेफेक जिंकून बांगलादेशने प्रथम संरक्षण स्वीकारले. सारिका काळेने उत्कृष्ट अष्टपैलू खेळ केला तर ऐश्वर्या सावंतने चांगले संरक्षण करून तिला उपयुक्त साथ दिली. पुरुषांच्या गटात आक्रमण व भक्कम बचाव या जोरावर भारताने बांगलादेशचा 27-16 असा 11 गुणांनी पराभव केला. मध्यंतरालाच 15-7 अशी आघाडी घेऊन भारतीयांनी आपले विजेतेपद निश्चित केले होते.
  • संयुक्त राष्ट्रसंघात साजरी होणार डॉ. आंबेडकर जयंती :
संयुक्त राष्ट्र संघटनेत प्रथमच भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी होणार आहे. तसेच त्यात असमानता दूर करतानाच शाश्वत विकासाच्या उद्दिष्टांवर भर दिला जाईल.
 संयुक्त राष्ट्रातील भारताचा स्थायी दूतावास व कल्पना सरोज फाउंडेशन, फाउंडेशन फॉर ह्य़ूमन होरायझन यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. आंबेडकर यांची 125 वी जयंती 13 एप्रिलला म्हणजे एक दिवस आधी साजरी केली जाईल. संयुक्त राष्ट्रातील भारताचे स्थायी प्रतिनिधी सय्यद अकबरउद्दीन यांनी सांगितले की, डॉ. आंबेडकर यांची जयंती प्रथमच संयुक्त राष्ट्रात साजरी होत आहे. डॉ. आंबेडकर हे लाखो भारतीय लोकांचे समानता व सामाजिक न्यायासाठीचे प्रेरणास्थान आहेत. डॉ. आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी झाला तर मृत्यू 1956 मध्ये झाला त्यांना 1990 मध्ये मरणोत्तर भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान देण्यात आला आहे.
  • स्पेस एक्स कंपनीच्या ड्रॅगन कुपीचे उड्डाण :
नासासाठी स्पेस एक्स या कंपनीने अवकाश स्थानकात सामान नेण्याचे काम सुरू केले असून, हे यान सोडण्यासाठी वापरलेले अग्निबाण नष्ट न होता ते परत महासागरातील जहाजावर आणण्यात यश आले आहे.
 तसेच आता अग्निबाणांचा फेरवापर करणे शक्य होणार आहे. मानवरहित फाल्कन अग्निबाणाने आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकासाठी सामान व एक छोटी खोलीच अवकाशात नेली आहे. ड्रॅगन हे कुपी स्वरूपाचे अवकाशयान अवकाश स्थानकाच्या दिशेने मार्गस्थ झाल्यानंतर पहिल्या टप्प्यातील बुस्टर अग्निबाण परत आले आहे. कॅलिफोर्नियात हॉथोर्न येथे या कंपनीचा काचेचे अवकाश नियंत्रण कक्ष आहे. स्पेस एक्स अवकाशयानाने या वर्षांत प्रथमच सामानाची खेप अवकाशयानाकडे नेली आहे. आता ड्रॅगन या कुपीच्या माध्यमातून 7 हजार पौंड वजनाचे सामान अवकाश स्थानकाकडे नेले आहे.  मंगळ व चंद्र यांच्यावर पाठवण्यासाठीही अशा तयार खोल्या कंपनी तयार करीत आहे. 260 मैल अंतरावर अवकाश वाहतूक जास्त असते. नासाच्या ऑर्बायटल एटीके या व्यावसायिक वाहनाने मार्चमध्ये उड्डाण केले होते. ड्रॅगन कुपीत वीस उंदीर असून त्यात कोबी व लेटय़ूस या वनस्पती आहेत. द बिगेलो एक्सपांडेबल अ‍ॅक्टिव्हिटी मॉडय़ुल म्हणजे बीम ही नासाच्या 21व्या शतकातील ट्रान्सहबची आवृत्ती असून, 1990मध्ये त्याचा आराखडा तयार असूनही जमले नव्हते. हॉटेल व्यावसायिक रॉबर्ट बिगेलो यांनी ट्रान्सहबचे हक्क विकत घेतले असून, त्यांनी बीम ही खोली अवकाशात नेण्यासाठी नासाचा मंच वापरू देण्यासाठी प्रयत्न केले व त्यात त्यांना यशही आले.
  • केडीएमसीच्या घनकचरा प्रकल्पाला मंजुरी :
केडीएमसीने स्वच्छ भारत अभियानातंर्गत 114 कोटीचा घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प अहवाल तयार केला आहे. तसेच या अहवालाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली असून तो अहवाल अंतिम मंजूरीसाठी केंद्राकडे पाठविला आहे. केंद्र सरकारच्या मान्यतेनंतर शहरातील घनकचऱ्याचा प्रश्न मार्गी लागण्याची चिन्हे असल्याने त्यांच्या निर्णयाकडे लक्ष लागले आहे. केंद्राने नुकत्याच जाहीर केलेल्या स्वच्छ शहरांच्या यादीत कल्याण डोंबिवलीचा उल्लेख अस्वच्छ शहर म्हणून झाला होता. तसेच हा अस्वच्छ शहराचा डाग पुसून काढण्यासाठी केडीएमसीने युध्दपातळीवर प्रयत्न सुरू केले आणि 114 कोटींचा घनकचरा प्रकल्प अहवाल राज्य सरकारला सादर केला. मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या उच्चाधिकार समितीपुढे केडीएमसी आयुक्त इ. रवींद्रन यांच्या वतीने सादर करण्यात आला होता.
  • भारत आणि मालदीवमध्ये सहा करार :
मालदीवचे अध्यक्ष अब्दुल्ला यामीन अब्दुल गयूम यांनी (दि.11) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेत विविध विषयांवर चर्चा केली. भारत आणि मालदीव यांच्यामध्ये सहा करारही या वेळी करण्यात आले. गयूम हे दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत. संरक्षण सहकार्यासह करांची पुनरुक्ती टाळणे, करांबाबत माहिती देणे, अवकाश सहकार्य, ऐतिहासिक वास्तूंचे जतन आणि पर्यटन अशा क्षेत्रांमध्ये हे करार करण्यात आले. तसेच यानंतर झालेल्या दोन्ही नेत्यांनी संयुक्त निवेदन प्रसिद्ध करत भारत आणि मालदीवमध्ये सुरक्षा आणि संरक्षण सहकार्याची आत्यंतिक आवश्‍यकता असल्याचे स्पष्ट केले. पंतप्रधान मोदी आणि गयूम यांच्यात विविध विषयांवर द्विपक्षीय चर्चा झाली. तसेच त्यांनी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचीही भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली.
 करारातील ठळक मुद्दे :-
  1.  संरक्षण मंत्रालयाच्या पातळीवरून सहकार्य वाढविणार
  2.  भारतातर्फे मालदीवमध्ये पोलिस अकादमी आणि संरक्षण मंत्रालयासाठी इमारत बांधली जाणार
  3.  आरोग्य आणि पर्यटन सेवा वाढविण्यासाठी प्रयत्न
  4.  आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे एकाच वस्तूवर दोन वेळा बसणारा कर टाळणार
  5.  मालदीवमधील प्राचीन मशिदी आणि इतर ऐतिहासिक वास्तूंचे भारतीय पुरातत्त्व खात्यातर्फे जतन
  6.  दक्षिण आशियाई उपग्रहासाठी एकमेकांना सहकार्य
  • आर अश्विन ग्लोबलचा ब्रँड अँबॅसेडर :
आरोग्य क्षेत्रातील अत्पादनांमध्ये आघाडीवर असणाऱ्या मन्ना फुड्सने 'ग्लोबल ब्रँड अँबॅसेडर' म्हणून अश्विनची निवड केली आहे. गोलंदाजीत सातत्यपूर्ण उत्कृष्ट कामगिरी केल्याने आर. अश्विनने जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान पटकाविले आहे. अश्विन हा मुन्ना फूड्स ब्रँडचा पहिलावहिला बँड अँबॅसेडर असल्याचे कंपनीने सांगितले. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील कंपन्या आपल्या ब्रँडिंगसाठी लोकप्रिय सेलिब्रिटींना करारबद्ध करण्यासाठी नेहमी उत्सुक असतात. मुन्ना फूड्सने पुदुचेरीसह दक्षिण भारतात सक्षमपणे आपले पाय रोवले आहेत. मागील वर्षी त्यांनी ओडिशा, पश्चिम बंगाल आणि बिहारमध्येही विस्तार केला.
 तसेच, संयुक्त अरब अमिराती, कतार, ओमान, सौदी अरेबियासह संपूर्ण मध्य-पूर्वेत ‘मन्ना‘ची उत्पादने निर्यात केली जातात. सिंगापूर, मलेशिया, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकेत जिथे भारतीय लोकसंख्या जास्त आहे अशा देशांमध्ये ‘मन्ना‘चा चांगला व्यवसाय आहे. मूळचा चेन्नईचा असलेला आर. अश्विन सर्वांत वेगाने बळी घेणारा भारतीय गोलंदाज आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये तमिळनाडूकडून खेळतो, तर आयपीएल स्पर्धेत तो 'रायझिंग पुणे सुपरजायंट्स'मधून खेळत आहे.
  • विश्वनाथन आनंदला ‘हदयनाथ जीवन गौरव’ पुरस्कार :
हदयेश आर्टस या संस्थेतर्फे दिला जाणारा यंदाचा हदयनाथ जीवन गौरव पुरस्कार आंतरराष्ट्रीय बुध्दीबळ ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंदला दिला जाणार आहे. राज्यपालचे विद्यासागर राव यांच्या हस्ते विश्वनाथन आनंदला दिनांक 12 एप्रिल 2016 रोजी सांयकाळी 7 वाजता दिनानाथ मंगेशकर नाटयगृह, विलेपार्ले (प), मुंबई येथे हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. कार्यक्रमाला शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे, पं हदयनाथ मंगेशकर, रघुनंदन गोखले, आमिर खान, हदयेश आर्टसचे अध्यक्ष  अविनाश प्रभावळकर व इतर निमंत्रित उपस्थित राहतील. भारतरत्न लता मंगेशकर, आशा भोसले, अमिताभ बच्चन व ए आर रेहमान यांना यापूर्वी या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

  • वाघांच्या जागतिक आकडेवारीत वाढ :
जगभरात करण्यात आलेल्या व्याघ्रगणनेत शतकामध्ये पहिल्यांदाच वाघांची संख्या वाढली आहे.
 रशियापासून ते व्हिएतनामच्या जंगलामध्ये ही व्याघ्रगणना करण्यात आली असून वाघांची संख्या 3890 वर पोहोचली आहे. संवर्धन गट आणि प्रत्येक देशाच्या सरकारने व्याघ्रगणनेत सहभाग घेतला होता आणि त्याच आधारे ही आकडेवारी समोर आल्याची माहिती वन्यजीन संवर्धन गटाने दिली आहे. 2010 मध्ये करण्यात आलेल्या व्याघ्रगणनेत वाघांची संख्या 3200 होती. महत्वाची गोष्ट म्हणजे वाघांची संख्या वाढण्यामध्ये भारताचं खूप मोठं योगदान असून अर्ध्यापेक्षा जास्त वाघ भारतामध्येच आहे. भारतामधील जंगलांमध्ये एकूण 2226 वाघ आहेत. 19 व्या शतका जगभरातील जंगलात एकूण एक लाख वाघ होते. दिल्लीमध्ये 13 देशातील प्रतिनिधींची (दि.12) बैठक होणार आहे त्याअगोदरच ही जागतिक आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे.
  • दुबईत होणार सर्वात उंच इमारतीची निर्मिती :
सुप्रसिद्ध बुर्ज खलिफा इमारतीपेक्षा उंच इमारतीची निर्मिती करण्याची तयारी दुबईमध्ये सुरू आहे. बुर्ज खलिफा इमारत जगातील सध्याची सर्वात उंच इमारत आहे. मात्र, दुबई क्रिक हार्बर परिसरातील एका नवीन टॉवरचा सहा वर्ग किलोमीटरचा मास्टर डेव्हलपमेंट प्लॅन हा 828 मीटर उंच असलेल्या बुर्ज खलिफा इमारतीपेक्षा काहीसा उंच असल्याची माहिती विकासक एम्मारने दिली आहे. इमारतीच्या उंचीबाबत इतक्यात काही सांगणार नसल्याचे एम्मार प्रॉपर्टीजचे संचालक मोहम्मद अलाबर म्हणाले.
 इमारतीच्या उद्घाटनावेळी तिच्या उंचीबाबतची माहिती जाहीर करण्यात येईल.
  •  सामग्री नियमन (content regulation) साठीमाहिती व प्रसारण मंत्रालय एक मंडळ तयार केले
माहिती व प्रसारण  मंत्रालय ने सरकारी जाहिरातीच्या सामग्री नियमन साठी 3 सदस्य समिती स्थापन केली आहे.ही समिती सरकारी जाहिरात मधील सामग्री नियमन संबंधित प्रश्न सोडविण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार स्थापन करण्यात आली आहे.समिती चे नेतृत्व माजी मुख्य निवडणूक आयुक्त बी. बी. टंडन यांच्या करतील.संदर्भ अटींनुसार, समिती सर्वोच्च न्यायालयाने निर्दिष्ट केलेल्या मार्गदर्शक तत्वांच्या अंमलबजावणीचे उल्लंघनाचे सामान्य जनतेकडून आलेल्या तक्रारी सोडविणार आहे.तसेच समिती सुप्रीम कोर्टाच्या मार्गदर्शकांचे उल्लंघन आणि विचलनाचे दखल घेणार आणि मंत्रालय आणि विभाग ला सुधारणा घडवून आणणार्‍या क्रियांची शिफारस करेल.
  • भारताने अनुकूल अटी वर तेहरान/इराण मध्येUSD 20 अब्ज ची गुंतवणूक देऊ केली
भारत ने इराण ला USD 20 अब्ज ची गुंतवणूक देऊ केली आहे. भारत ने सवलतीच्या हक्काच्या तरतुदीप्रमाणे अनुकूल अटी वर ऊर्जा उद्योगात गुंतवणूक देऊ केली आहे.भारतीय कंपन्यांची चाबहार SEZ मध्ये समावेशासह केमिकल आणि खते प्लांट स्थापन करण्यामध्ये रूची आहे. भारताने दीर्घ मुदतीसाठी गॅस च्या किंमतीमध्ये अनुकूल वागणूकीसाठी आणि स्पर्धात्मक किंमतीमध्ये परिपूर्ण गॅस पुरवठा करण्यासाठी विनंती केलेली आहे.भारत दोन्ही बाजूने बँकिंग चॅनेल उघडे झाल्यानंतर देयके प्रदान करण्यासाठी वचनबद्ध आहे.दोन्ही राष्ट्रांनी आणखी Farzad-B वायू क्षेत्रा संबंधित विकास चर्चा केलेली आहे व लवकरात लवकर पूर्ण विश्वासाने एक करार केला जाणार आहे.अमेरिका आणि इतर पाश्चात्य राष्ट्रांनी जानेवारी मध्ये इराण विरुद्ध कार्य केल्यापासून धर्मेंद्र प्रधान यांच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदा भारतीय केंद्रीय मंत्रीने भेट दिली होती.
  • प्रीमियर फुटसॉल चे ब्रॅंड अँबेसिडर म्हणून विराट कोहली चे नाव देण्यात आले.
प्रीमियर फुटसॉल (फूटबॉल संबंधी) ने क्रिकेटपटू विराट कोहली ची ब्रॅंड अँबेसिडर म्हणून निवड केल्याचे जाहीर केले आहे.यासोबतच प्रीमियर फुटसॉल चे अध्यक्ष म्हणून सॉकर लिजेंड (फूटबॉल पटू) लुईस फिगो यांचे नाव जाहीर केले.
  • आंध्र प्रदेश मध्ये ग्रीनको साठी 105 MW विंड फार्म सुझलॉन स्थापन करणार
सुझलॉन ग्रुप ने आंध्र प्रदेश मध्ये कार्यान्वित होणारे ग्रीनको ग्रुप पासून 105 MW विंड फार्म ची पहिली ऑर्डर मिळवली आहे.पवन ऊर्जा कंपनी सुझलॉन ने 1 गिगावॉट (1000 मेगावॅट) च्या एकूण कार्यकारी क्षमतेसह स्वतंत्र वीज उत्पादक (independent power producer -IPP) ग्रीनको ग्रुप साठी हायब्रिड टॉवर सह S97 120 m 2100 kW विंड टर्बाईन जनकयंत्र (Generator) च्या स्थापनेने 105 मेगावॅट ची ऑर्डर मिळाल्याचे जाहीर केले.आंध्र प्रदेश मध्ये स्थित प्रकल्प जानेवारी 2017 पर्यंत कार्यान्वित होईल.
  • भारताने सुलतान अझलन शाह चषक मध्येकॅनडा ला पराभूत केले
भारत ने 3-1 ने अलीकडेच इपोह, मलेशिया येथे झालेल्या सुलतान अझलन शाह कप हॉकी टूर्नामेंट मध्ये कॅनडा चा पराभव केला आहे.सहा गुणांसह, भारत आता राऊंड-रॉबिन लीग क्रमामध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे.सूचीच्या अग्रस्थानी सलग तीन विजयांनंतर नऊ गुणांसह विश्वविजेता ऑस्ट्रेलिया आहे.गतविजेत्या न्यूझीलंड चार सामन्यापासून आठ गुणांसह दुसर्‍या स्थानावर आहे.इतर सामने मध्ये, ऑस्ट्रेलिया ने पाकिस्तान चा 4-0 ने, तर न्यूझीलंड ने जपान चा 4-1 पराभव केला होता.मंगळवारी खेळण्यात येणार्‍या पारंपरिक प्रतिस्पर्धी भारतासोबत, आता पाकिस्तानकडे तीन सामन्यात तीन गुण जमा आहेत.
  • डॅनी विल्लेट, US मास्टर्स गोल्फ 2016जिंकणारा पहिला ब्रिटोण
डॅनी विल्लेट हा US मास्टर्स गोल्फ 2016 जिंकणारा पहिला ब्रिटोण (ब्रिटन देशातील रहिवासी) झाला आहे.त्याने अगस्टा येथे संवेदनशील अंतिम दिवशी जॉर्डन स्पीएथ च्या शरणागतीचा फायदा घेतला.विल्लेट हा 28 वर्षांचा आहे आणि त्याने 67 अंतर्गत पाच प्रमाणे तीन शॉट्स द्वारे त्याचे पहिले सर्वोच्च विजेतेपद मिळविले आहे.गतविजेत्या स्पीएथ हा पाच शॉट्स ने पुढे होता, जेव्हा तो 10 व्या ला पोहोचला त्यानंतर त्याने तीन होल्स मध्ये सहा शॉट्स टाकले.अमेरिकन ने एकावर 73 सह ली वेस्टवूड सह टाय होऊन दुसऱ्या स्थानासह खेळ संपविला.
  • ली चोंग वेई ने 11 वे मलेशियन ओपन विजेतेपदजिंकले
मलेशिया च्या ली चोंग वेई ने क्वाला लंपुर, मलेशिया मध्ये त्याचे 11 वे मलेशियन ओपन विजेतेपद जिंकले आहे.ली ने अंतिम सामन्यात 21-13, 21-8 ने चीनच्या चेन लॉंग चा पराभव केला आहे.ली चे वय 33 वर्षे आहे आणि तो जगातील अव्वल खेळाडू विरुद्ध जिंकण्याचा सपाटा लावला आहे.हा मलेशियाचा सर्वात लोकप्रिय खेळाडू आहे आणि तो तीन जागतिक विजेतेपद अंतिम फेरीत आणि दोन ऑलिम्पिक निर्णायक (deciders/निर्णय घेणारा) सामन्या पर्यंत पोहोचत असूनही, खेळातील अव्वल बक्षिसे - जग आणि ऑलिम्पिक टाइटल्स - चा पाठलाग करण्यास वारंवार अपुरा पडला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा