Post views: counter

जागतिक संघटना


आंतरराष्ट्रीय संस्था
1. जागतिक अन्न व कृषी संघटना (IFO) :
जागतिक अन्न कार्यक्रम राबविण्याच्या उद्देशाने ही संस्था स्थापन करण्यात आली.
या संघटनेची स्थापना सन 1945 मध्ये करण्यात आली आणि या संस्थेचे कार्यालय : रोम (ग्रीक) येथे आहे.
2. जागतिक अणुशक्ती अभिकरण (IAA) :
जागतिक अणू कार्यक्रमावर नियंत्रण ठेवणे आणि शांततापूर्ण कार्यक्रमाकरिता अणुशक्ती कार्यक्रम राबविणे. या उद्देशाने संस्थेची सन 1957 मध्ये स्थापना करण्यात आली.
या संस्थेचे कार्यालय : व्हिएन्ना (ऑस्ट्रिया)येथे आहे.
3. आंतरराष्ट्रीय विकास संघटना :
जागतिक विकासाचा कार्यक्रम राबविण्याच्या उद्देशाने ही सन 1960 मध्ये ही संस्था स्थापन करण्यात आली.
या संस्थेचे कार्यालय : वॉशिंग्टन (अमेरिका)येथे आहे.
4. आंतरराष्ट्रीय कामगार संघटना (ILO) :
जागतिक कामगाराचे प्रश्न सोडविण्याच्या उद्देशाने सन 1919 मध्ये ही संघटना स्थापन करण्यात आली आहे.
या संघटनेचे कार्यालय : जिनिव्हा (स्वत्झर्लंड)येथे आहे.
5. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) :
आंतरराष्ट्रीय व्यापारातील समतोल विकासाला हातभार लावण्याच्या उद्देशाने सन 1945 मध्ये या संघटनेची स्थापना करण्यात आली. ही संघटना आंतरराष्ट्रीय नाणेनिधी सभासद राष्ट्रांकडून मिळणार्‍या वर्गणीतून आपले भांडवल उभे करते आणि सभासद राष्ट्रांना अडचणीच्या वेळी अल्प मुदतीचे कर्ज देऊन आंतरराष्ट्रीय व्यापारातील समतोल साधण्यास मदत करते.
या संस्थेचे कार्यालय :वॉशिंग्टन (अमेरिका)येथे आहे.
6.संयुक्त राष्ट्र शैक्षणिक, शास्त्रीय अनई सांस्कृतिक संघटना (UNESCO) :
जागतिक शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यक्रम राबविण्याच्या उद्देशाने सन 1946 मध्ये या संघटनेची स्थापना करण्यात आली आहे.
या संघटनेचे कार्यालय : पॅरिस (फ्रान्स) येथे आहे.
7. जागतिक आरोग्य संघटना (WHO) :
जागतिक स्तरावर सार्वजनिक आरोग्य विषयक कार्यक्रम राबविण्याच्या उद्देशाने सन 1948 मध्ये जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना करण्यात आली.
या संघटनेचे कार्यालय : जिनिव्हा (स्वित्झर्लंड)येथे आहे.
8. संयुक्त राष्ट्र आंतरराष्ट्रीय बालकासाठीचा अनुशासन निधी (UNICEF) :
बालकांच्या सर्वागिण विकासाकरिता जागतिक स्तरावर कार्यक्रम राबविण्याच्या उद्देशाने सन 1946 मध्ये ही संघटना स्थापन करण्यात आली.
या संघटनेचे कार्यालय : न्यूयॉर्क (अमेरिका)येथे आहे.
9. संयुक्त राष्ट्र औधोगिक विकास संघटना (UNIDO) :
विकसनशील राष्ट्रांना औधोगिककरणास मदत करणे व संयुक्त राष्ट्र संघटनेच्या औधोगिक प्रोत्साहन कार्यक्रमाचे सुसूत्रीकरण करण्याच्या उद्देशाने सन 1967 मध्ये या संघटनेची स्थापना करण्यात आली.
या संघटनेचे कार्यालय : व्हिएन्ना (ऑस्ट्रिया)आहे.
10. संयुक्त राष्ट्र लोकसंख्या निधी (UNFPA) :
जागतिक लोकसंख्या नियंत्रणाबाबत कार्यक्रम राबविण्याच्या उद्देशाने ही संघटना सन 1967 स्थापन करण्यात आली.
 या संघटनेचे कार्यालय : न्यूयॉर्क (अमेरिका)येथे आहे.
11.जागतिक व्यापर संघटना (WTO) :
जागतिक व्यापारात सुसूत्रीकरण आणण्याच्या उद्देशाने सन 1995 मध्ये ही संघटना स्थापन करण्यात आली.
या संघटनेचे कार्यालय : जिनिव्हा (स्वित्झर्लंड)येथे आहे.
12.जागतिक बँक (WORLD BANK) :
सन 1944 साली ब्रिटनवूड परिषदेतील निर्णयानुसार ही बँक सन 1945 मध्ये स्थापन करण्यात आली.जागतिक बँकेच्या सभासद राष्ट्रांना पुनर्रचना व विकासाच्या कार्यासाठी दीर्घ मुदतीचे कर्ज देणे हा या बँक स्थापनेमागील महत्वाचा उद्देश आहे.
या बँकेचे मुख्यालय : वॉशिंग्टन (अमेरिका)येथे आहे.  
13. इंटरपोल (INTERPOL) :
आंतरराष्ट्रीय गुन्हेगारांविरुद्धच्या कामात विविध राष्ट्रांतील पोलीस दलात परस्परांना सहकार्य व समन्वय साधण्याच्या उद्देशाने ही संघटना स्थापन करण्यात आली आहे.
स्थापना : सन 1923
मुख्यालय : लेपान्स (लियोना)
14.रेडक्रॉस (REDCROSS) :
युद्ध भूकंप, वादळ आणि आपत्कालीन स्थितीमध्ये शांतता व प्रस्तापित करणे आणि आपदग्रस्तांना मदत पोहचविण्याच्या उद्देशाने हेन्री ज्यूनाट यांनी ही संघटना स्थापन केली आहे.
स्थापना : 1983
मुख्यालय : जिनिव्हा.
भारतात या संस्थेचे अध्यक्ष भारताचे तात्कालिन राष्ट्रपती असतात.
15. जागतिक मानवी हक्क संस्था (अॅम्नेस्टी इंटरनॅशनल) :
ब्रिटिश वकील बिटर बेरेन्स यांनी पुढाकार घेवून मूलभूत मानवी हक्क अबाधित राहण्यासाठी झगडणारी आंतरराष्ट्रीय संघटना स्थापन केली. या संघटनेचे 160 हून अधिक देश सभासद आहेत. मानवी हक्क प्रस्थापित करण्याकरीता ही संस्था कार्य करते.
  स्थापना : 18 मे 1961
  मुख्यालय : लंडन

1 टिप्पणी:

  1. RPSC is known as Rajasthan Public Service Commission. RPSC has recently issued a latest recruitment notification to fill up vacancies for Motor Vehicle Sub Inspector posts. Are you looking for the best Online Classes for RTO Inspector? to know more contact - Zone Tech +91-9462447676

    उत्तर द्याहटवा