Post views: counter

Current Affairs Sept 2016 Part 5


#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹आश्विनच्या 37 कसोटींमध्येच 200 विकेट्स

कानपूर : अफलातून सूर गवसलेला ऑफस्पिनर रविचंद्रन आश्विनने न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या क्रिकेट कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी आज ( रविवार ) वकार युनूस आणि डेनिस लिली या महान गोलंदाजांचा विक्रम मोडला . सर्वांत कमी कसोटी सामन्यांमध्ये 200 बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत आश्विनने वकार आणि लिली यांना मागे टाकले. या यादीत आश्विन आता दुसऱ्या क्रमांकावर आहे .

न्यूझीलंडविरुद्धचा सामना सुरू होण्यापूर्वी आश्विनचे कसोटीमध्ये 193 बळी होते . या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी आश्विनला एकही विकेट मिळाली नाही . पण तिसऱ्या दिवशी आश्विनने चार फलंदाजांना बाद केले. त्यानंतर आज न्यूझीलंडच्या दुसऱ्या डावातही आश्विनने आतापर्यंत तीन बळी मिळविले आहेत. न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनला बाद करत आश्विनने कसोटीतील 200 बळींचा टप्पा गाठला . ही आश्विनची 37 वी कसोटी आहे . वकार युनूस आणि डेनिस लिली या दोघांनीही 38 कसोटींमध्ये 200 बळी मिळविण्याची कामगिरी केली होती . सर्वांत कमी कसोटींमध्ये 200 बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत ऑस्ट्रेलियाचा माजी लेगस्पिनर क्लॅरी ग्रिमेट अव्वल स्थानी आहेत . त्यांनी 36 कसोटींमध्ये ही कामगिरी केली होती .

आर . आश्विनची कामगिरी :
कसोटी : 37 सामन्यांत 200* बळी
वन - डे : 102 सामन्यांत 142 बळी
ट्वेंटी - 20 : 45 सामन्यांत 52 बळी

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹व्याघ्र संरक्षणासाठी भारताचे महत्त्वपूर्ण पाऊल

नेक कॉलर , ड्रोननिर्मिती आता भारतात होणार

नवी दिल्ली - छुपी शिकार, अवयवांची तस्करी यांमुळे लुप्त होत चाललेल्या वाघांच्या संरक्षणासाठी भारत सरकारकडून ठोस पावले उचलली जात आहेत. त्यांच्या
संरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या उपकरणांची निर्मिती आता भारतातच करण्याची योजना सरकारने आखली आहे .

केंद्रीय पर्यावरणमंत्री अनिल दवे यांनी ट्विट करून याबाबतची माहिती दिली . वाघांवर नजर ठेवण्यासाठी आवश्यक असलेली नेक कॉलर , ड्रोनसारख्या आदी उपकरणांच्या निर्मितीचे काम ' मेक इन इंडिया ' कार्यक्रमांतर्गत हाती घेतले जाईल , असे दवे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे . आगामी दोन वर्षांत या उपकरणांची निर्मिती भारतात होण्याची प्रक्रिया सुरू होईल , असे त्यांनी सांगितले .

राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या ( एनटीसीए) नुकत्याच झालेल्या बैठकीत याविषयी चर्चा झाली. हा प्रस्ताव पुढे मांडण्यात आला असून , संरक्षण मंत्रालयाकडून द्रोणनियंत्रणासंदर्भात परवानगी मिळण्याचे बाकी असल्याची माहिती पर्यावरण मंत्रालयाकडून देण्यात आली .

योजनेचा पहिला टप्पा
एनटीसीएने भारतीय वन्यजीव संस्थेशी ( डब्ल्यूआयआय) एक सामंजस्य करार केला असून , त्याअंतर्गत पहिल्या टप्प्यात पन्ना , जिम कॉर्बेट , काझीरंगा , सुंदरबन आणि सत्यमंगलम या अभयारण्यांत या उपकरणांचा वापर केला जाणार आहे .

चोरटी शिकार थांबणार . . .
वाघांवर नजर ठेवण्यासाठी नेक कॉलर , ड्रोनसारखी उपकरणे अत्यंत फायदेशीर ठरतात . हे वारंवार दिसून आले असून , यामुळे वाघाच्या प्रत्येक हालचालीची माहिती मिळण्यास मदत होणार आहे . सोबतच जंगलातील मानवी हस्तक्षेपास प्रतिबंध करणेही यामुळे शक्य होणार असून , परिणामी शिकारीला आळा घालण्यात यश मिळेल.

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹सानिया-बार्बराला जेतेपद

भारताची आघाडीची टेनिसपटू सानिया मिर्झा आणि तिची चेक प्रजासत्ताकची जोडीदार बार्बरा स्ट्रायकोवा यांनी पॅन-पॅसिफिक ओपन टेनिस स्पर्धेच्या दुहेरीचे जेतेपद पटकावले. शनिवारी पार पडलेल्या अंतिम सामन्यात सानिया-बार्बरा जोडीने चीनच्या चेन लिअँग आणि झाओझुआन यँग या जोडीचा अवघ्या ५१ मिनिटांमध्ये ६-१, ६-१ असा सहज पराभव केला.

सानिया-बार्बरा यांना अंतिम फेरीत विजयासाठी फारसे प्रयास पडले नाहीत. या सामन्यात त्यांनी प्रतिस्पर्ध्यांना एकही ब्रेक पॉइंट जिंकण्याची संधी मिळू दिली नाही. पहिला सेट ६-१ असा जिंकून सानिया-बार्बरा जोडीने सामन्यात आघाडी घेतली व दुसरा सेटही याच स्कोअरसह जिंकून विजयावर शिक्कामोर्तब केले.

मागील महिन्यात सानिया आणि स्वित्झर्लंडची मार्टिना हिंगीस यांनी महिला दुहेरीमध्ये एकत्र न खेळण्याचा निर्णय घेतल्यानंतर सानियाने बार्बरासोबत खेळण्याचा निर्णय घेतला. सानिया-बार्बरा जोडीचे हे एकत्र दुसरे विजेतेपद आहे. सानियाने कारकिर्दीमध्ये मिळवलेले हे दुहेरीचे चाळीसावे विजेतेपद आहे. तिने तिसऱ्यांदा पॅन-पॅसिफिक स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम केला. यापूर्वी, झिम्बाब्वेच्या कारा ब्लॅकच्या साथीत तिने दोनवेळा या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले होते. तसेच, सानियाचे हे मोसमातील आठवे विजेतेपद ठरले. सानियाने या मोसमात स्वित्झर्लंडच्या मार्टिना हिंगीसच्या साथीत ब्रिस्बेन इंटरनॅशनल, सिडनी इंटरनॅशनल, ऑस्ट्रेलियन ओपन, सेंट पीटर्सबर्ग करंडक आणि एटालियन ओपन स्पर्धा जिंकली, तर रोमानियाच्या मोनिका निक्यूलेस्कूच्या साथीत कनेक्टिकट ओपन स्पर्धा जिंकली होती.

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹पाक-रशिया संयुक्त कवायती पेशावरमध्ये

पाकिस्तानबरोबरच्या संयुक्त लष्करी कवायती करण्यासाठी रशियन सैन्याची तुकडी पाकिस्तानात दाखल झाली असली तरी या कवायती पाकव्याप्त काश्मीरमध्ये करणार नाही, असे रशियाने स्पष्ट केले आहे. उरी येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर रशियाने पाकसोबतच्या कवायती रद्द केल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. रशियाने उरी हल्ल्याचा कडक शब्दांत निषेधही केला होता. पण आधी ठरलेल्या संयुक्त कवायती रद्द झाल्या नाहीत. मात्र त्या पेशावरमध्ये होणार असल्याचे रशियातर्फे सांगण्यात आले.
या कवायती पाकिस्तान व्याप्त काश्मीर किंवा अन्य संवेदनशील ठिकाणी होणार नाहीत, असे भारतातील रशियन दूतावासाने स्पष्ट केले आहे. पेशावरपासून ३४ मैल अंतरावरील चेराट येथे कवायती होणार आहेत. पाक व रशियामध्ये प्रथमच संयुक्त लष्करी कवायती होत असून, या सरावाला फ्रेन्डशिप २०१६ असे नाव देण्यात आले आहे.

रशियाच्या ‘तास’ या वृत्तसंस्थेने पाकव्याप्त काश्मीरमधील गिलिगट, बाल्टीस्तान या भागात संयुक्त लष्करी कवायती होणार असल्याचे वृत्त दिल्याने उलटसुलट चर्चांना उत आला होता. पाकव्याप्त काश्मीरमध्ये त्या झाल्या असत्या, तर भारतानेही त्याबद्दल रशियाकडे नाराजी व्यक्त केली असती. मात्र रशियन दूतावासाने भूमिका स्पष्ट केल्यानंतर ‘तास’नेही आॅनलाइन वृत्तामध्ये बदल केला आहे.

गिलिगट, बाल्टीस्तान हा भाग पाकिस्तानने अनिधकृतरित्या बळकावला आहे, अशी भारताची सुरुवातीपासूनच भूमिका आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनाच्या आपल्या भाषणात पाकव्याप्त काश्मीरमधील जनतेवर होणारे अन्याय आणि अत्याचार यांचा मुद्दा उपस्थित केला होता. तो भाग पाकिस्तानचा नाही, असेच भारताचे म्हणणे आहे.

फ्रेन्डशिप २०१६ अंतर्गत रशियन आणि पाकिस्तानी सैन्यामध्ये दोन आठवडे युद्ध सराव चालणार आहे.

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹अमेरिकेतील हल्ल्याप्रकरणी सौदी अरेबियावर खटल्याची परवानगी देणारे विधेयक ओबामांनी फेटाळले

अमेरिकेतील ९/११ च्या दहशतवादी हल्ल्यात मारल्या गेलेल्या लोकांना सौदी अरेबियावर खटला भरण्यास परवानगी देण्याची तरतूद असलेले विधेयक अध्यक्ष बराक ओबामा यांनी फेटाळले आहे. सौदी अरेबियावर खटले भरण्याची परवानगी दिली तर त्याचे वाईट परिणाम अमेरिकेच्या हितसंबंधांवर होतील, असे कारण हे विधेयक नाकारताना देण्यात आले आहे.
जस्टिस अगेन्स्ट स्पॉन्सर्स ऑफ टेररिझम अॅक्ट बिल रिपब्लीकनांचे बहुमत असलेल्या काँग्रेसमध्ये दोन्ही सभागृहात मंजूर झाले होते, पण त्या विधेयकास मान्यता दिले तर दीर्घकालीन आंतरराष्ट्रीय तत्त्वांचे उल्लंघन होऊ शकते व अमेरिकेचे परदेशातील हितसंबंध धोक्यात येऊ शकतात, असे ओबामा यांनी काल सांगितले.

अमेरिकी परराष्ट्र सार्वभौम संरक्षण कायद्यातील तत्त्वांचे या विधेयकामुळे उल्लंघन होऊ शकते व सर्वच देशांना न्यायिक प्रक्रियेपासून असलेले संरक्षण धोक्यात येऊ शकते किंवा काढले जाऊ शकते. काही खासगी पक्षकारांनी केलेल्या आरोपांमुळे हे घडणे योग्य ठरणार नाही अमेरिकेत जो दहशतवादी हल्ला झाला होता त्यात सौदी अरेबियातील दहशतवादी गटांचा हात होता असे सांगण्यात येते. अपूर्ण माहितीच्या आधारे दीर्घकालीन परिणाम घडवणारे निर्णय घेण्यासारखा हा प्रकार विधेयक मंजूर केल्यास होईल.
एखादी परकीय शक्ती दहशतवादी हल्ल्यांमागे असल्याबाबतच्या आरोपाआधारे असे विधेयक मंजूर करणे शहाणपणाचे नाही. अमेरिकी अध्यक्षांनी सांगितले की, संबंधित विधेयक हे प्रदीर्घ काळ चालत असलेल्या आंतरराष्ट्रीय तत्त्वांना हरताळ फासणारे आहे, त्यात सार्वभौमत्वाचे संरक्षण धोक्यात येईल. ते नियम जगभर लागू केले तर अमेरिकेचे आंतरराष्ट्रीय हितसंबंध धोक्यात येतील.

विधेयक मान्य केल्यास अमेरिकेच्या मित्र देशांवरचे किरकोळ आरोपही ग्राह्य़ धरले जाऊ शकतात. व्हाइट हाउसचे प्रवक्ते जोश अर्नेस्ट यांनी सांगितले की, ओबामा यांना या विधेयकाच्या दीर्घकालीन परिणामांची चिंता होती, कारण त्यामुळे अमेरिकेचे हितच धोक्यात आले असते. ओबामा यांनीच ओसामा बिन लादेनला ठार मारण्याच्या मोहिमेचे आदेश दिले होते. ग्राउंड झिरो या हल्ल्याच्या ठिकाणी काम केलेल्या कर्मचाऱ्यांना आरोग्य विमा दिला होता. अमेरिकेतील काही रिपब्लिकनांचा विरोध असताना त्यांनी हे निर्णय घेतले होते.

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹महात्मा फुले यांना भारतरत्नची राष्ट्रीय आयोगाची शिफारस

थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिराव फुले यांना ‘भारतर’ने सन्मानित करण्याची अधिकृत शिफारस निवृत्त न्यायाधीश के. ईश्व्रय्या यांच्या अध्यक्षतेखालील राष्ट्रीय इतर मागासवर्गीय आयोगाने केल्याचे समजते. अशीच शिफारस यापूर्वी महाराष्ट्र सरकारनेही केलेली आहे. महात्मा फुले यांच्याबरोबरच बी.पी. मंडल यांनाही भारतर देण्याची शिफारस आयोगाची आहे. इतर मागासवर्गीयांना २७ टक्के आरक्षण देण्याची शिफारस करणारया मंडल आयोगाचे बी.पी. मंडल हे अध्यक्ष होते. अशी शिफारस आयोगाच्या अखत्यारित येत नसल्याने ती केंद्र सरकारवर बंधनकारक नाही; पण त्यामुळे या जुन्या मागणीला बळ मिळणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने यापूर्वीच म. फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतर देण्याची शिफारस केली आहे. याशिवाय काँग्रेसचे हिंगोलीचे खासदार राजीव सातव यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे मागणी केली होती.

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹" केन - बेतवा ' प्रकल्प पन्ना अभयारण्याच्या मुळावर

नवी दिल्ली - मध्य प्रदेशमध्ये होऊ घातलेला " केन - बेतवा नदीजोड प्रकल्प ' येथील पन्ना अभयारण्याच्या मुळावर उठण्याचे संकेत आहेत. हा प्रकल्प उभा राहिला , तर अभयारण्यातील किमान 90 चौरस किलोमीटरचे क्षेत्र व किमान सात लाख झाडे पाण्याखाली जातील , अशी माहिती एका सरकारी अहवालाद्वारे उघड झाली आहे .

केंद्र सरकारच्या नदीजोड प्रकल्प योजनांपैकी केन - बेतवा हा प्रकल्प सर्वांत मोठा मानला जात असून , पन्ना या अभयारण्याचा बराचसा भूभाग त्याखाली येणार आहे . ही बाब येथील वनसंपदेबरोबर वन्यप्राण्यांच्या जीवनमानावर दुरोगामी परिणाम करणारी ठरेल , अशी भीती व्यक्त होत आहे . प्रकल्प क्षेत्रात 7 लाख 20 हजार मोठी झाडे आहेत. कालांतराने ही संख्या 12 लाखांच्या घरात जाईल . प्रकल्पाच्या पाण्यामुळे ही वनसंपदा धोक्यात येणार आहे , अशी माहिती पर्यावरण मंत्रालयाला दिलेल्या एका अहवालात नमूद आहे .

पन्ना अभयारण्य वाघांसाठी आरक्षित करण्यात आले असून , अभयारण्याच्या कोअरझोनमध्ये येणाऱ्या एका धरणावर हा प्रकल्प उभा राहणार आहे . प्रकल्पांतर्गत येणारे पूर्ण क्षेत्र वाघांच्या आवासासाठी परिचित आहे . व्याघ्र संवर्धनाच्या दृष्टीने आपल्याला प्रकल्प व पर्यायी बाजूंचा विचार करावा लागेल , असा अहवाल यासाठी नियुक्त केलेल्या नॅशनल बोर्ड ऑफ वाइल्डलाइफ या स्थायी समितीने दिला आहे .

वादग्रस्त व अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या प्रकल्पामुळे मोठे नुकसान सोसावे लागण्याची शक्यता असून , त्यावर मार्ग काढून ही हानी टाळावी, अशी मागणी होत आहे . वन्यजीवप्रेमी या प्रकल्पाविरोधात राष्ट्रीय हरित लवाद व न्यायालयाकडे दाद मागण्याच्या तयारीत आहेत.

प्रकल्पामुळे हे शक्य
9 हजार कोटी रुपये खर्चाचा हा प्रकल्प पूर्ण झाला , तर 13 लाख 42 हजार लोकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे . या प्रकल्पामुळे मध्य व उत्तर प्रदेशच्या सहा जिल्ह्यांतील किमान 6 लाख 75 हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे .

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹पाकबरोबरील व्यापार अर्धा टक्क्याहून कमी

नवी दिल्ली - भारताच्या एकूण जागतिक व्यापाराच्या तुलनेत पाकिस्तानबरोबरील व्यापाराचे प्रमाण लक्षणीय कमी म्हणजे अर्धा टक्क्यापेक्षाही कमी असल्याचे " असोचेम ' ने प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटले आहे . जागतिक व्यापारात आयात आणि निर्यात दोन्ही गृहीत धरण्यात आली आहे .

या अहवालानुसार , 2015 - 16 या आर्थिक वर्षात भारताच्या 641 अब्ज डॉलरच्या एकूण जागतिक व्यापारापैकी पाकिस्तानबरोबरील व्यापार 2 . 67 अब्ज डॉलरपर्यंतच मर्यादित राहिला आहे . यापैकी भारताची पाकिस्तानला होणारी निर्यात 2 . 17 अब्ज डॉलरची , म्हणजे एकूण निर्यातीच्या 0 . 83 टक्के असून पाकिस्तानकडून 50 कोटी डॉलरपेक्षाही कमी किमतीची आयात ( 0 . 13 टक्के ) करण्यात आली आहे . त्यामुळे भारताच्या एकूण जागतिक व्यापाराच्या तुलनेत पाकिस्ताबरोबरील व्यापाराचे प्रमाण केवळ 0. 41 टक्के आहे . याबाबत बोलताना " असोचेम ' चे सरचिटणीस डी . एस . रावत म्हणाले , "" दोन्ही देशांमधील व्यापाराचे हे प्रमाण असताना "मोस्ट फेवर्ड नेशन ' च्या दर्जाला फारसा अर्थ उरलेला नाही . भारताने पाकिस्तानला हा दर्जा दिला असला तरी पाकिस्तानने याबाबत अद्याप विचार केलेला नाही . हा दर्जा दिला गेला तरी पाकिस्तानची भारतात होणारी निर्यात 50 कोटी डॉलरहून अधिक वाढणार नाही . राजकीय परिस्थितीमुळे दोन देशांमधील व्यापाराला फारसे प्रोत्साहन दिले जात नाही . व्यापार वाढण्यासाठी योग्य वातावरण नजीकच्या काळात निर्माण होण्याचीही शक्यता नाही . '' भारताने आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्यात पाकिस्तानची दर वर्षी असणारी नाममात्र उपस्थितीही उरी हल्ल्यामुळे यंदा नसल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले .

गेल्या वर्षी जागतिक स्तरावर मंदी असतानाही भारताची निर्यात 261 अब्ज डॉलर , तर आयात 380 अब्ज डॉलर होती . भारताची निर्यात प्रामुख्याने युरोपीय महासंघ , अमेरिका , आफ्रिका आणि पूर्व आशिया येथे होते. चीन , आखाती देश , युरोपीय महासंघ आणि अमेरिका यांच्याकडून भारतात मोठी आयात होते .

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹सर्वांत मोठ्या दुर्बिणीतून परग्रहवासीयांचा शोध सुरू

बीजिंग - चीनने आज जगातील सर्वांत मोठी रेडिओ दुर्बिणी कार्यरत केली . तब्बल तीस फुटबॉल मैदानांइतक्या व्याप्तीमध्ये 4 , 450 पॅनेल असलेल्या या दुर्बिणीमुळे विश्वाच्या निर्मितीचे रहस्य शोधण्याच्या कामात आणि परग्रहावरील जीवसृष्टी शोधण्याबाबतच्या संशोधनात मोठी मदत होण्याची शक्यता आहे .

500 मीटर ऍपारचर स्फेरीकल टेलिस्कोपच्या ( फास्ट ) गुझोऊ प्रांतातील पिंगतांग येथे झालेल्या उद्घाटनावेळी शेकडो खगोलशास्त्रज्ञ आणि अभ्यासक उपस्थित होते . अंतराळात अत्यंत दूरपर्यंत शोध घेण्याची क्षमता असलेली ही दुर्बिण बांधण्याचे काम 2011 मध्ये सुरू झाले होते . दुर्बिणीच्या वापरासाठी अत्यंत शांतता आवश्यक असल्याने या भागातील आठ हजार नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे . आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञानातील संशोधनावर लक्ष केंद्रित करत , देशाला उच्च तंत्रज्ञानात अग्रेसर करण्याच्या चीनच्या धोरणाचा एक भाग म्हणूनच हा प्रकल्प हाती घेण्यात आला होता . पुढील दहा ते वीस वर्षांत या दुर्बिणीचा जगभरात दबदबा निर्माण होईल , अशी चीनच्या शास्त्रज्ञांना आशा आहे .

" फास्ट' प्रकल्पाविषयी. . .
18 कोटी डॉलर : एकूण खर्च
4 , 450 : एकूण रिफ्लेक्टर्स
5 किमी : परिसरात शांतता आवश्यक

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹ऐतिहासिक 500 व्या कसोटीत भारताचा विजय

कानपूर - पाहुण्या न्यूझीलंड फलंदाजांची फिरकी घेत भारताने ऐतिहासिक 500 व्या कसोटी क्रिकेट 197 धावांनी विजय मिळविला. भारताच्या या विजयाचे फिरकीपटू आर. अश्विन आणि रवींद्र जडेजा शिल्पकार ठरले . भारताने दिलेल्या 434 धावांच्या आव्हानापुढे न्यूझीलंडचा दुसरा डाव 236 धावांत संपुष्टात आला . भारताचा हा 130 वा कसोटी विजय ठरला .

चौथ्या दिवशी न्यूझीलंडची दुसऱ्या डावात 4 बाद 93 अशी घसरगुंडी उडाली होती . आज अखेरच्या दिवशी सँटनर आणि राँचीने सुरवातीला भारतीय गोलंदाजांचा यशस्वी प्रतिकार केला . अखेर राँचीला 80 धावांवर बाद करत जडेजाने भारताला पाचवे यश मिळवून दिले . त्यानंतर अश्विनने पहिल्या डावाप्रमाणे दुसऱ्या डावातही आपल्या प्रभावी गोलंदाजीचा वापर सुरु केला . पण , मिशेल सँटनर आणि बी. वॅटलिंग यांनी चिवट प्रतिकार करत फिरकीला यशस्वी तोंड दिले . अखेर कर्णधार कोहलीने शमीला पाचारण केले. शमीने वॅटलिंगला 18 धावांवर पायचीत बाद केले . त्यापाठोपाठ आपल्या पुढच्याच षटकात मार्क क्रेगला 1 धावेवर त्रिफळाबाद करून भारताचा विजय दृष्टीक्षेपास आणला .

भारताच्या विजयाचा अडसर ठरलेल्या सँटनरला अश्विनने 71 धावांवर बाद केले. सँटनरने 179 चेंडूत 7 चौकार व 2 षटकारांसह 71 धावा केल्या. त्याने पहिल्या डावातही भारतीय गोलंदाजांना झुंजविले होते . यानंतर मात्र , अश्विनने औपचारिकता पूर्ण करत ईश सोधी आणि वॅगनर यांना बाद करून भारताला ऐतिहासिक 500 व्या कसोटीत विजय मिळवून दिला . अश्विनने दुसऱ्या डावात सहा बळी घेतले . यामुळे त्याने पुन्हा एकदा दोन्ही डावात दहा बळी मिळविण्याची कामगिरी केली .

त्यापूर्वी, चौथ्या दिवशी मुरली विजय , चेतेश्वर पुजारा यांच्यापाठोपाठ रोहित शर्मा आणि रवींद्र जडेजा यांच्या नाबाद अर्धशतकी खेळीने प्रथम न्यूझीलंडसमोरील मार्ग कठीण केला . त्यानंतर अश्विनच्या फिरकीने त्यांना पराभवाच्या खाईट लोटले . ल्युक रॉंची 38 आणि मिशेल सॅंटनेर 8 धावांवर खेळत असून , न्यूझीलंड अजून 341 धावांनी दूर आहे . अखेरच्या पाचव्या दिवशी त्यांना भारतीय फिरकीसमोर तीन सत्रे खेळून काढण्याचे आव्हान आहे . फिरकीस साथ देणाऱ्या खेळपट्टीवर त्यांना हे केवळ अशक्य आहे . त्यामुळे आता ऐतिहासिक कसोटीत भारतीय संघ विजयावर केव्हा शिक्कामोर्तब करणार , हीच अखेरच्या दिवसाची औपचारिकता राहील. 1 बाद 159 धावसंख्येवरून पुढे खेळताना भारताने झटपट विकेट गमावल्या.
 विजय , पुजारा पुन्हा एकदा मोठी खेळी रचण्यात अपयशी ठरले . कोहली लवकर बाद झाला; पण या वेळी रोहितला आवश्यक असणारा कसोटी सामन्यातला धावांचा सूर गवसला . जडेजाच्या साथीत त्याने केलेली वेगवान 100 धावांची भागीदारी भारताची आघाडी भक्कम करणारी ठरली . रोहित 68 ; तर जडेजा 50 धावांवर नाबाद राहिले . जडेजाचे अर्धशतक झाल्यावर कोहलीने भारताचा दुसरा डाव 5 बाद 377 धावसंख्येवर घोषित करून न्यूझीलंडसमोर 434 धावांचे आव्हान ठेवले होते.

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹पेस - बेगेमन उपविजेते

सेंट पीटसबर्ग - भारताचा लिअँडर पेस आणि त्याचा जर्मन जोडीदार आंद्रे बेगेमन यांना सेंट पीटसबर्ग टेनिस स्पर्धेत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले . पहिला सेट जिंकल्यानंतरही या जोडीला खेळात सातत्य राखता आले नाही . डॉमिनिक इंग्लॉट आणि हेन्री कोंटिनेन जोडीकडून त्यांना 4 - 6 , 6 - 3 , 12- 10 असा पराभव पत्करावा लागला . ही लडत 1 तास 19 मिनिटे चालली . पेसने यापूर्वी एटीपी स्पर्धेत 2015 मध्ये अखेरचे दुहेरीचे विजेतेपद मिळविले होते. त्यावेळी त्याने दक्षिण आफ्रिकेच्या रावेन क्लासेनच्या साथीत न्यूझीलंड ओपन स्पर्धा जिंकली होती .

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹अभिमानास्पद!; आठ उपग्रह घेऊन PSLV अवकाशी

भारतीय अवकाश संशोधन संस्था - 'इस्रो'नं आज अंतराळविश्वात आणखी एक इतिहास रचला. हवामान उपग्रह स्कॅटसॅट-१ आणि अन्य देशांचे पाच उपग्रह घेऊन भारताचं प्रमुख प्रक्षेपण यान पीएसएलव्ही-सी३५ अवकाशी झेपावलं.
 हे या यानाचं सर्वात लांबचं उड्डाण असल्यानं इस्रोनं आणखी एक यशोशिखर सर केलं आहे. आयआयटी मुंबईच्या विद्यार्थ्यांनी आठ वर्षं मेहनत करून तयार केलेला प्रथम हा उपग्रहही या रॉकेटमधून अवकाशात रवाना झाला आहे. ही मोहीम यशस्वी झाल्याबद्दल राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शास्त्रज्ञांचं आणि विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलं आहे.

श्रीहरिकोट्टा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरून सकाळी ९.१२च्या ठोक्याला पीएसएलव्ही-सी३५नं उड्डाण केलं. २ तास १५ मिनिटं अवकाशात राहून सर्व आठ उपग्रहांना दोन वेगळ्या कक्षांमध्ये सोडण्याचं यापूर्वी कधीच न केलेलं काम यावेळी पीएसएलव्ही यानाला करायचं होतं. ही जबाबदारी त्यानं चोख बजावली. आधी यानाने स्कॅटसॅट-१ उपग्रहाला त्याच्या कक्षेत नेऊन सोडलं आणि त्यानंतर इंजिन पुन्हा सुरू करून उर्वरित सात उपग्रहांना त्यांच्या कक्षेत स्थापित केलं. त्यात अमेरिका आणि कॅनडाचेही उपग्रह होते. त्यामुळे ही मोहीम यशस्वी करून 'इस्रो'नं पुन्हा आपली ताकद सिद्ध केली आहे.

IIT मुंबईच्या 'प्रथम' उपग्रहाबद्दल...
'प्रथम'च्या निर्मितीसाठी दीड कोटी रुपये खर्च आला आहे. १५ विद्यापीठांमधील माहिती संकलन केंद्रांमध्ये उपग्रहाकडून घेतलेल्या माहितीची नोंद होणार आहे. या उपग्रहाचे वजन १० किलो असून इस्रोचे स्कॅटसॅट उपग्रहाला मदत करणार आहे. या उपग्रहाच्या माध्यमातून रेडिओलहरी परावर्तित करणाऱ्या वातावरणातील लहरींचे स्तर थर मोजण्यास मदत होईल.

आयआयटीच्या सप्तर्षी बंडोपाध्याय आणि शशांक तामसकर या दोन विद्यार्थ्यांनी 'प्रथम' विकसित केला आहे. हा उपग्रह पूर्ण करण्यासाठी ३० विद्यार्थ्यांनी सहकार्य केले आहे. यात मुंबईतील अथर्व महाविद्यालयाचाही समावेश आहे.

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹आयुर्विमा करा ‘जीएसटी’मुक्त
04
खासगी, सार्वजनिक विमा कंपन्यांची एकमुखी मागणी

वस्तू आणि कराला अर्थात 'जीएसटी'ला सर्वपक्षीय मान्यता मिळाल्यानंतर आयुर्विमा कंपन्यांनी प्रीमियमद्वारे मिळणाऱ्या उत्पन्नाला या नव्या करातून सवलत मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. तर, सर्वसाधारण विमा कंपन्यांनी (जीआयसी) आपल्या विविध विमा उत्पादनांसाठी विविध दराने कर आकारणी करावी, असे म्हटले आहे. असे झाल्यास याचा थेट फायदा सर्वसामान्य नागरिकांना होणार आहे. त्याचबरोबर आयुर्विमा कंपन्यांना अधिकाधिक नागरिकांपर्यंत जाणेही शक्य होणार आहे.

आयुर्विमा कंपन्यांनी यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून 'जीएसटी'तून सवलत देण्याची विनंती करण्याची तयारी सुरू केली आहे. कंपन्यांच्या मते २०१२मध्ये सेवाकर लागू झाल्यानंतर प्रीमियमद्वारे मिळणारे कंपन्यांचे उत्पन्न जैसे थे राहिले आहे. त्यामुळे 'जीएसटी'तून सवलत मिळावी, अशी त्यांची भूमिका आहे. ग्राहकांकडून सेवाकराची रक्कम आकारण्यात येत असल्याने कंपन्यांच्या प्रिमियमवाढीचा वेग घटला आहे. सध्या १४.५ टक्के दराने सेवाकर आणि अर्धा टक्के स्वच्छ भारत उपकराची आकारणी करण्यात येते. आयुर्विमा कंपन्यांच्या १६ सप्टेंबर रोजी झालेल्या बैठकीत जीएसटीमधून सवलत मागण्याच्या विनंतीवर शिक्कामोर्तब झाले.

आयुर्विमा क्षेत्रात कार्यरत २४ कंपन्यांची शिखर संघटना असणाऱ्या 'लाइफ इन्शुरन्स कौन्सिल'ने (एलआयसी) या संदर्भात पंतप्रधानांशी पत्रव्यवहार करण्याचे ठरवले आहे. यासंदर्भात त्यांनी यापूर्वी अर्थ मंत्रालयाशी केलेल्या चर्चा निष्फळ ठरल्याने आता हे पाऊल उचण्यात येणार आहे, अशी माहिती 'एलआयसी'च्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. 'ग्राहकांकडून मिळणाऱ्या प्रिमियमवर केंद्र सरकारने २०१२पासून सेवाकर आकारण्याचे बंधनकारक केल्याने दरवर्षी कंपन्यांचे एकूण उत्पन्न १.२५ लाख कोटी रुपयांच्या घरात स्थिरावले आहे. ग्राहकांच्या क्रयशक्तीमध्ये दरवर्षी वाढ होत असूनही कंपन्यांचे वार्षिक उत्पन्न जैसे थे आहे,' अशी माहिती 'एलआयसी'चे सचिव व्ही. मणिकम यांनी दिली.

सेवाकर वगळता केंद्र सरकारतर्फे आयुर्विम्याच्या प्रिमियमवर आयकर आणि स्वच्छ भारत उपकर आकारण्यात येतो. मात्र, मुदतठेवी, रोखे, म्युच्युअल फंड, इक्विटी, एनपीएस आदी गुंतवणुकीच्या साधनांवर कोणतेही कर आकारण्यात येत नाहीत. या भेदभावामुळे जीवन विम्यामध्ये गुंतवणूक करणाऱ्यांचे प्रमाण कमी होत आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. 'एनपीएस' अर्थात राष्ट्रीय पेन्शन योजनेंतर्गत करण्यात येणारी गुंतवणूक आयकर कायद्याच्या कलम ८०सी आणि काही विशेष प्रकरणात आणि ८०सीसीडीनुसार करमुक्त आहे. भविष्यनिर्वाह निधीही करमुक्त करण्यात आले आहेत. 'या सर्व बाबी लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी पत्रव्यवहार करून त्यांना ही माहिती देण्यात येणार आहे. यापूर्वी आम्ही अनेकवेळा अर्थमंत्रालयाशी संपर्क साधला आहे. मात्र, त्यांच्याकडून अद्याप सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही,' असेही मणिकम यांनी स्पष्ट केले.

जीवन विमा कंपन्यांकडून उत्पन्नाच्या ५० टक्के रक्कम केंद्र आणि राज्य सरकारांमध्ये करण्यात येते. मार्च २०१६पर्यंत करण्यात आलेली ही गुंतवणूक १५लाख कोटी रुपयांच्या घरात गेली आहे. या कंपन्यांनी गेल्या वर्षी सात हजार कोटी रुपयांचा सेवाकर केंद्र सरकारच्या तिजोरीत जमा केला.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹पॉलिमेटॅलिक सल्फाइडसच्या शोधासाठी भारताचा आंतरराष्ट्रीय सागरतळ प्राधिकरणासोबत करार

हिंदी महासागरात पॉलिमेटॅलिक सल्फाइडसच्या शोधासाठी भूविज्ञान मंत्रालयाने आज आंतरराष्ट्रीय सागरतळ प्राधिकरणासोबत 15 वर्षांचा करार केला. पॉलिमेटॅलिक सल्फाइडमध्ये लोह, तांबे, झिंक, चांदी, सोने, प्लॅटिनम विविध प्रमाणात असतात आणि ते खोल महासागरात आढळतात. व्यावसायिकदृष्ट्या ते दीर्घकालीन फायद्याचे असतात.

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹पहिला ई-कॉमर्स उपग्रह ‘अलीबाबा’चा!

बीजिंग : ऑनलाइन मार्केटिंग क्षेत्रातील चीनची दिग्ग्ज कंपनी 'अलीबाबा'तर्फे पुढील वर्षी जगातील पहिला 'ई-कॉमर्स' उपग्रह सादर करणार आहे. हा उपग्रह सादर झाल्यानंतर त्याचा फायदा सर्वसामान्यांना होणार असल्याचा कंपनीचा दावा आहे. या उपग्रहाच्या माध्यमातून शेतीच्या संबंधातील आकडेवारी आणि हवामानाच्या नोंदी शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. 'चायना अॅकेडमी ऑफ लाँच व्हेइकल टेक्नॉलॉजी' आणि 'चायना स्पेस म्युझियम' यांच्या मदतीने हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. या उपग्रहाच्या माध्यमातून जगभरात ई-कॉमर्स क्षेत्रातील सर्वप्रकारच्या सेवा देणे सहज शक्य होईल, असेही कंपनीने म्हटले आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹'ड्रीम टेस्ट टीम'चा कर्णधारही धोनीच

बीसीसीआयने ऐतिहासिक ५००व्या कसोटीचं औचित्य साधून 'ड्रीम टेस्ट टीम'साठी मतं नोंदवण्याचं आवाहन क्रिकेट चाहत्यांना केलं होतं. त्याला उदंड प्रतिसाद मिळाला असून चाहत्यांचा कौल आज जाहीर करण्यात आला. त्यात 'ड्रीम टीम'चा कर्णधार म्हणून भारताचा आतापर्यंतचा सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्रसिंग धोनीलाच पसंती मिळाली आहे.

आपली 'ड्रीम टीम' निवडताना चाहत्यांनी सर्वात जास्त मतं भारतीय क्रिकेटचा 'द वॉल' अशी ओळख निर्माण करणाऱ्या राहुल द्रविडच्या पारड्यात टाकली आहेत. द्रविडला ९६ टक्के चाहत्यांचा कौल मिळाला. त्यानंतर ९२ टक्के मते अनिल कुंबळे तर ९१ टक्के मते भारताचा अष्टपैलू माजी कसोटी कर्णधार कपिल देव याच्या पारड्यात पडली. वीरेंद्र सेहवागला ८६ टक्के तर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला ७३ टक्के मते देत चाहत्यांनी आपल्या संघात दोन्ही दिग्गजांना संघात स्थान दिले.

या ऐतिहासिक संघात सुनील गावस्कर, व्ही. व्ही. एस. लक्ष्मण, अश्विन, झहीर खान. जवागल श्रीनाथ यांनाही चाहत्यांनी पसंती दिली आहे. स्फोटक डावखुरा फलंदाज युवराज सिंगला या संघात बारावा खेळाडू म्हणून कौल मिळाला आहे.

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹गंगा नदी (पुनरुज्जीवन, संरक्षण आणि व्यवस्थापन) अधिकार आदेश 2016 ला मंत्रिमंडळाची मंजुरी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने गंगा नदी (पुनरुज्जीवन, संरक्षण आणि व्यवस्थापन) अधिकार आदेश 2016ला मंजुरी दिली. या आदेशामध्ये धोरण आणि अंमलबजावणी जलदगतीने होण्यासाठी नवीन संस्थात्मक आराखडा मांडण्यात आला असून, राष्ट्रीय स्वच्छ गंगा अभियानाला स्वतंत्रपणे आणि जबाबदारीने काम करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. पर्यावरण (संरक्षण) कायदा, 1986 अंतर्गत, प्राधिकरणाला अभियानाचा दर्जा देण्याचा निर्णय घेण्यात आला, यामुळे या कायद्यातील तरतुदींची दखल घेता येईल.

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹मुंबई आयआयटीच्या विदयार्थ्यांनी बनवलेल्या ‘प्रथम’चे अवकाशात यशस्वी प्रक्षेपण

मुंबई आयआयटीच्या विदयार्थ्यांनी तब्बल आठ वर्षे अथक परिश्रम घेऊन तयार केलेला ‘प्रथम’ या लघुउपग्रहाचे सोमवारी सकाळी ९ वाजता अवकाशात यशस्वी प्रक्षेपण झाले. श्रीहरीकोटा येथील सतीश धवन केंद्रातून अंतराळात झेपावणाऱ्या ‘प्रथम’कडे विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञांसह अवघ्या देशाचे लक्ष लागून राहिले होते. महत्त्वाचे म्हणजे विद्यार्थ्यांनी तयार केलेला पहिला लघुउपग्रह असून, या लघुउपग्रहाचे प्रक्षेपण भारतीय अंतराळ संशोधनात एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरला आहे.

आयआयटी मुंबईच्या एरोस्पेस इंजिनीअरिंग विभागात शिक्षण घेणाऱ्या सप्तश्री बंडोपाध्याय आणि शशांक तमासकर या विद्यार्थ्यांना जुलै २००७मध्ये ‘प्रथम’ची संकल्पना सुचली. त्यानुसार आयआयटीच्या एरोस्पेस इंजिनीअरिंगच्या विभागाने त्याची बांधणी सुरू केली. त्सुनामीसारख्या प्रलयाची पूर्वकल्पना देण्याची क्षमता ‘प्रथम’मध्ये आहे, असा दावा मुंबई आयआयटीने केला आहे. विशेष म्हणजे अवघ्या १० किलो वजनाच्या या उपग्रहाचे इस्रोनेही कौतुक केले आहे.

इंडियन स्पेस रिसर्चने २००९मध्ये या लघुउपग्रहाबाबत करार केला. मात्र काही कारणास्तव या उपग्रहाच्या उड्डाणाला हिरवा कंदील मिळत नव्हता. दरम्यानच्या काळात ‘प्रथम’मध्ये अनेक बदल करण्यात आले. सोमवारी अंतराळात उड्डाण केल्यानंतर हा लघुउपग्रह ४ महिने पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालणार आहे. यातील २ महिन्यांत विद्यार्थी ‘प्रथम’ची अंतराळातील बाह्य चाचणी करतील. त्यातील त्रुटी टिपून नव्या प्रकल्पामध्ये बदल करण्यात येतील. हा लघुउपग्रह अंतराळात असताना भारतातील वातावरणाचा अभ्यास करेल, तसेच वातावरणातील बदल टिपेल.

प्रकल्पाचे उद्दिष्ट
आयआयटीसोबतच एरोस्पेस इंजिनीअरिंगची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ‘प्रथम’ हक्काचे व्यासपीठ आहे. भविष्यात देशभरातील विद्यापीठे, महाविद्यालयांना एकत्र घेऊन प्रथमचे काम अखंड सुरू राहावे, हा या मागील हेतू आहे.

‘प्रथम’चे उद्दिष्ट
वातावरणातील बदल अभ्यासणे. इलेक्ट्रॉनचा अभ्यास करणे.
अधिकाधिक विद्यार्थ्यांमध्ये अंतराळ विज्ञानाची आवड निर्माण करणे

अशी होते निवड
आयआयटी मुंबईच्या एरोस्पेस इंजिनिअरिंगमध्ये सप्टेंबरमध्ये ‘प्रथम’च्या नव्या टीमची निवड केली जाते. यासाठी प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. त्याशिवाय विद्यार्थ्यांना सादरीकरण करावे लागते. त्यातून विद्यार्थी निवडले जातात. दरवर्षी साधारणत: ३० विद्यार्थ्यांची टीम प्रथमसाठी काम करते.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹मंगळयानाचा ग्रहण काळ कमी करण्याचे पुढील वर्षी प्रयत्न

‘इस्रो’ अध्यक्षांची माहिती; मोहिमेला दोन वर्षे पूर्ण

मार्स ऑर्बिटर मिशन (मॉम) या भारताच्या मंगळ मोहिमेला काल दोन वर्षे पूर्ण झाली असून अपेक्षेपेक्षा यानाने अधिक काळ काम दिले आहे. आता पुढील वर्षी या अवकाशयानाचा अंधारात असण्याचा काळ म्हणजे ग्रहण काळ कमी करण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत.

इस्रोचे अध्यक्ष ए. एस. किरणकुमार यांनी सांगितले, की मॉम मोहिमेला दोन वर्षे पूर्ण झाली असून त्याचा अपेक्षित कार्यकाल सहा महिने होता. त्यानंतर वर्षभर त्याच्या पाच पेलोडमधून मिळालेली माहिती भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजे इस्रोने प्रसारित केली. ग्रहण काळात त्याला बॅटरीचा आधार घ्यावा लागतो. जर ग्रहण काळ कमी केला तर ती बॅटरी जास्त काळ टिकू शकेल. ग्रहण काळाचा परिणाम अवकाशयानाच्या कार्यक्षमतेवर कमी व्हावा यासाठी हा प्रयत्न केला जाणार असून अजूनही यानात बऱ्यापैकी इंधन आहे. त्यामुळे ते इतके दिवस कार्यरत राहू शकले.

मॉम म्हणजे मंगळयान ५ नोव्हेंबर २०१३ रोजी भारतीय अवकाश संशोधन संस्थेने सोडले होते. त्यासाठी पीएसएलव्ही सी २५ हा प्रक्षेपकही वापरण्यात आला होता. खोल अंतराळातील ३०० दिवसांच्या प्रवासानंतर हे यान २४ सप्टेंबर २०१४ रोजी मंगळाच्या कक्षेत यशस्वीरीत्या स्थापित करण्यात आले होते. मंगळयानाने पहिल्या दोन वर्षांत मिळवलेली माहिती जाहीर करण्यात आली असून भारताच्या या मोहिमेला अमेरिकेच्या अवकाश संस्थेचा स्पेस पायोनियर पुरस्कार तसेच नि:शस्त्रीकरण व विकासासाठीचा इंदिरा गांधी शांतता पुरस्कार मिळाला होता.
 यानाने मंगळाच्या उत्तर ध्रुवावरील संप्लवन प्रक्रियेवर प्रकाश टाकला असून तेथील कार्बन डायॉक्साइड व पाण्याचे बर्फ यांचे थर उन्हाळ्यात नष्ट होत असतात. त्याबाबतच्या माहितीत मॉमच्या निरीक्षणांनी भर पडली आहे.

परग्रहवासियांशी संपर्क करू नये! ; स्टीफन हॉकिंग यांचा इशारा

लंडन : प्रसिद्ध ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांनी मानवाने एलियनशी संपर्क करू नये, असे इशारा देताना म्हटले आहे. मानवापेक्षा जे तांत्रिकदृष्टय़ा अधिक प्रगत आहेत, त्यांच्याशी संपर्क न करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

आपल्यापेक्षा कोणत्याही प्रगत संस्कृतीशी आपण संपर्क केल्यास काही तरी वेगळी स्थिती निर्माण होऊ शकते. जेव्हा मूळ अमेरिकन लोकांनी क्रिस्टोफर कोलंबस याला पाहिले तेव्हा ज्या प्रकारची स्थिती झाली होती, तशीच स्थिती प्रगत संस्कृतीशी संपर्क केल्यास होऊ शकते. ते त्या वेळी खूप चांगले झाले नाही, असे हॉकिंग यांनी नवीन ऑनलाइन व्हिडीओमध्ये म्हटले आहे.

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹महाराष्ट्राचे जय कवळी बीएफआयचे महासचिव

भारतीय मुष्टियुद्ध महासंघाच्या रविवारी झालेल्या निवडणुकीत अजयसिंह यांची अध्यक्ष आणि महासचिव म्हणून महाराष्ट्राचे जय कवळी यांची बहुमताने निवड झाल्यानंतर गेल्या चार वर्षांपासून सुरू असलेल्या बॉक्सिंग संघातील वादाला अखेर पूर्णविराम मिळाला आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹लोकप्रिय गुगल वेबला 18 वर्ष पूर्ण :

आपल्या सर्वांच्या रोजच्या दैनंदिन वापरात येणा-या गूगलचा आज (दि.27) वाढदिवस आहे.
  गूगलचा आज अठरावा वाढदिवस असून यानिमित्ताने खास गूगल डूडलही तयार करण्यात आले आहे.

  4 सप्टेंबर 1998 रोजी गूगल पहिल्यांदा जगासमोर आले होते.

  लॅरी पेज आणि सर्जी ब्रेन यांच्या हस्ते गूगलची स्थापना करण्यात आली होती.
  खरंतर गूगलचा वाढदिवस नेमका कधी यावरुन वाद झाला होता.

  मात्र गतवर्षी 27 सप्टेंबरलाच वाढदिवस साजरा करण्यात आला होता.

  सर्वांच्याच गळ्यातले ताईत बनलेल्या गूगलचे नामकरण चुकीमुळे झाले होते.

  सर्वांनाच माहित आहे की गुगलचे स्पेलिंग 'Google' असे आहे पण खर तर ते 'Googol’ असे ठेवायच होत.

  पण स्पेलिंग मिस्टेकमुळे हे नाव पडले आणि पुढे तेच प्रसिद्ध झाले.

  पेज आणि ब्रेन यांनी सुरुवातीला गूगलचे नाव ‘बॅकरब’ असे ठेवले होते, मात्र त्यानंतर गूगल असे नाव करण्यात आले.

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹आशियातील सर्वाधिक स्वच्छ मॉलिनांग!

साऱ्या जगाला स्वच्छता आणि टापटिपपणा यांचा वस्तुपाठ घालून देणारे भारत - बांगलादेश सीमेवरील मेघालय राज्यातील मॉलिनाँग हे गाव पर्यटकांना आपल्या गुणवैशिष्ट्यांनी आकर्षित करून घेत आहे . . .

भारत - बांगलादेश सीमेवर मेघालय राज्यातील शिलाँगपासून ९० किलोमीटरवर वसलेले अगदी पाचशे लोकसंख्या असलेले आशियातील सर्वाधिक स्वच्छ आणि ‘ इको टुरिझम ’ साठी प्रसिद्ध असलेले मॉलिनाँग ( Mawlynnong) हे गाव. ‘ डिस्कव्हर इंडिया ’ या मासिकाकडून सलग २००३ आणि २००६ मध्येदेखील या गावाला सर्वाधिक स्वच्छ गाव म्हणून मान मिळाला. लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांची दिवसाची सुरवात घर आणि परिसरातील साफसफाईने होते . शाळेत जाण्यापूर्वी विद्यार्थीसुद्धा रस्त्यांवरील कचरा आणि झाडांची पाने गोळा करून कचराकुंडीत टाकतात . प्लॅस्टिकचा वापर टाळण्यासाठी कचराकुंड्यादेखील बांबूच्या काड्यांपासून तयार केलेल्या वापरल्या जातात. विशेष म्हणजे , गावामध्ये ठिकठिकाणी ठेवलेल्या बांबूच्या कचराकुंडीमध्येच ग्रामस्थ कचरा टाकत असतात . आता शंभर टक्के प्लॅस्टिकमुक्तीकडे या गावाची वाटचाल होत आहे . दर्जेदार आयुष्यासाठी स्वच्छता ही गुरुकिल्ली मानली जाते. १३० वर्षांपासून आपल्या पुढच्या पिढीकडे पिढ्यान्पिढ्या स्वच्छतेचे महत्त्व संक्रमित केले जात आहे . स्वच्छतेसह या गावाचे वैशिष्ट्य म्हणजे शंभर टक्के शौचालयाचा वापर हे होय. स्वत : च्या घरासह गावाची स्वच्छता हा आमच्या सर्वांच्याच आयुष्यातील एक सवयीचा भाग झाल्याचे येथील ग्रामस्थ अभिमानाने सांगतात .

स्वच्छतेच्या बाबतीत आशियामध्ये आदर्श निर्माण केलेल्या मॉनिलाँगची दखल घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमीत्त सुरू केलेल्या स्वच्छता अभियानावेळी ‘ मन की बात ’ मध्येही या गावाचा आणि त्याच्या वाटचालीचा आवर्जून उल्लेख केला . ‘ डिस्कव्हर इंडिया ’ मासिकाने आशियातील स्वच्छ गाव म्हणून घोषित केल्यानंतर या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांचीही संख्या आपसूक वाढू लागली आहे . स्वच्छतेसह पर्यटकांना या ठिकाणी झाडांच्या मुळ्यांपासून नैसर्गिकरीत्या तयार झालेला पूल , बांबूपासून तयार केलेला ८५ फुटी स्काय वॉक , बांगलादेशाची सीमा , टेकड्या , झाडे आणि हिरवागार निसर्गरम्य परिसर आकर्षित करणारा आणि भुरळ घालणारा आहे . त्यामुळेच २००३ पर्यंत कधीही देशातील प्रमुख पर्यटन स्थळांच्या यादीत नसलेल्या या गावाने पर्यटकांची पावले वळविण्यास भाग पाडले आहे .

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹पाकमधील 'सार्क ' परिषदेवर भारताचा बहिष्कार

नवी दिल्ली : उरीतील दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारने पाकिस्तानविषयी घेतलेली कडक भूमिका कायम राखत इस्लामाबादमध्ये होणाऱ्या नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या आगामी ' सार्क ' परिषदेवरही बहिष्कार टाकला . ' इस्लामाबादमध्ये होणाऱ्या परिषदेस पंतप्रधान नरेंद्र मोदी जाणार नाहीत , ' असे परराष्ट्र मंत्रालयातर्फे आज ( मंगळवार ) स्पष्ट करण्यात आले .

उरीत लष्कराच्या तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने राजनैतिक पातळीवर पाकिस्तानची चहुबाजूंनी कोंडी करण्याचे धोरण आखले आहे . परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी कालच ( सोमवार) संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेच्या व्यासपीठावरून पाकिस्तानच्या दहशतवादी धोरणांवर कडाडून हल्ला केला होता . सिंधू पाणी वाटप करारातील तरतुदीही भारतीय प्रशासन आता तपासून पाहू लागले आहे . त्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानमध्ये होणाऱ्या ' सार्क ' च्या परिषदेवर प्रश्नचिन्ह होते .

' दक्षिण आशियाई विभागाचा विकास आणि परस्पर सहकार्य याविषयी भारत कटिबद्ध आहे . पण हे सर्व दहशतवादमुक्त वातावरणातच होऊ शकते . या भागातील एक राष्ट्र दहशतवादमुक्तीच्या प्रयत्नांच्या विरोधात काम करत आहे . गेल्या काही दिवसांतील घटना आणि घडामोडी पाहता इस्लामाबादमध्ये आयोजित ' सार्क ' च्या परिषदेमध्ये भारत सरकार सहभागी होऊ शकत नाही . ' सार्क ' चे सध्याचे अध्यक्ष असलेल्या नेपाळलाही याची कल्पना दिली आहे . सीमेपलीकडून हल्ले होत असताना दहशतवादमुक्त परिषद घेता येऊ शकत नाही , ' असे परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले आहे .

विशेष म्हणजे , ' सार्क ' मधील इतर काही सदस्य देशांनीही इस्लामाबादमधील परिषदेस उपस्थित राहण्याविषयी नकारात्मक सूर आळवला आहे , असेही परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे . सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अफगाणिस्तान, बांगलादेश आणि भूतान हे देशही पाकिस्तानमधील ' सार्क ' परिषदेवर बहिष्कार घालण्याच्या तयारीत आहेत.

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹भारत सुधारणार लडाखमधील रस्त्यांचे जाळे

नवी दिल्ली : लडाखमधील प्रत्यक्ष ताबारेषेजवळ चांगल्या दर्जाच्या रस्त्यांचे जाळे उभारण्याच्या योजनेवर भारतीय प्रशासकीय यंत्रणेने काम सुरू केले आहे . येथील वातावरणामुळे सातत्याने रस्त्यांची दुरावस्था होत असते . त्यावर दीर्घकालीन तोडगा काढण्याच्या दिशेने प्रयत्न सुरू आहेत. या भागातील रस्ते हे व्यूहात्मकदृष्ट्याही भारतासाठी महत्त्वाचे आहेत.

चीन आणि पाकिस्तानच्या आर्थिक विभागासाठी ( सीपीईसी) काराकोरम भागात पायाभूत सुविधा उभारण्याची जोरदार मोहीम सुरू आहे . त्या पार्श्वभूमीवर भारताने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे . सीमाभागातील रस्त्यांची देखभाल करणाऱ्या ' बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशन ' ने केंद्रीय रस्ते विकास संस्थेकडून ( सीआरआरआय ) लडाखमधील रस्त्यांसंदर्भात सूचना मागविल्या आहेत. लडाखमधील सासोमा ते सासेर ब्रांग्सा या 55 किलोमीटरच्या टप्प्यातील रस्त्याचा दर्जा उंचावण्यासाठी काय उपाय असू शकतील, यावर त्यांनी मत मागविले आहे . या 55 किमीपैकी 10 किमी रस्ता वातावरणामुळे सतत खराब होत असतो. दरडी कोसळणे, कडाक्याची थंडी आणि बर्फवृष्टी यामुळे वर्षातील सहा ते सात महिने हा रस्ता बंदच असतो. त्यामुळे यावर दीर्घकालीन तोडगा काढण्याची गरज व्यक्त केली जात होती . या प्रकल्पावर आता थेट पंतप्रधान कार्यालयातूनच लक्ष दिले जात आहे , अशी माहिती एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने दिली .

या प्रश्नावरील तातडीचा उपाय म्हणून त्या भागातील रस्त्यावर बर्फापासून बचावासाठी छत उभारण्याचीही एक कल्पना मांडण्यात आली आहे . दीर्घकालीन उपायांमध्ये रस्त्याची नव्याने बांधणी हादेखील एक पर्याय आहे .

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹E = mc 2 झाले एकशे अकरा वर्षांचे .

सामान्य सापेक्षता सिद्धांताच्या एका उपप्रमेयनुसार शक्ती आणि वस्तुमान हे एकमेकांमध्ये परिवर्तित होऊ शकतात . त्याचे हे प्रसिद्ध E =MC2 समीकरण. गणित आणि पदार्थविज्ञानात E = mc 2 या समीकरणाला फारच महत्त्व आहे . यामुळे पहिल्यांदाच पदार्थाचे वस्तुमान आणि उर्जा यांचे गुणोत्तर जगासमोर मांडले गेले .

आल्बर्ट आइन्स्टाइन हे " सामान्य सापेक्षता सिद्धांता ' चे जनक. आजच्या दिवशी म्हणजे 27 सप्टेंबरला 1905 रोजी "भौतिकीचा अभिवृत्तांत ' ( Annalen der Physik) या जर्मन शास्त्रीय नियतकालिकाने आइन्स्टाइन यांचा प्रबंध प्रसिद्ध करून विज्ञानजगतात खळबळ उडवून दिली . या प्रबंधाचा विषय होता "Does the Inertia of a Body Depend Upon Its Energy Content ?" , introducing the equation E= mc ².

खूप थोड्या विद्वानांना हा सिद्धान्त त्या वेळी समजला होता , असे म्हटले जाते. अणू आणि परमाणू यांच्यावर संशोधन होऊन अणूमधली विराट शक्ती प्रकट झाली आणि E = MC2 समीकरणाची महती साऱ्यांनाच पटली .

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹येत्या १ ऑक्टोबरपासून पनवेल महापालिका

गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या पनवेल महानगरपालिकेच्या स्थापनेवर आज अखेर शिक्कामोर्तब करण्यात आले. राज्य सरकारनं आज याबाबतची अधिसूचना काढली असून त्यानुसार येत्या १ ऑक्टोबरपासून पनवेल नगरपरिषदेचं रुपांतर महानगरपालिकेत होणार आहे. महापालिकेत जाण्यास विरोध असलेल्या खारघरसह एकूण ३२ महसुली गावांचा या महापालिका क्षेत्रात समावेश करण्यात आला आहे. रायगड जिल्ह्यातील ही पहिली महापालिका ठरणार आहे.

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही नवी पनवेल महापालिका अस्तित्वात येणार आहे. सिडकोच्या आग्रहामुळे नवी मुंबई विमानतळ परिसरात विकसित होणाऱ्या नयना क्षेत्रातील ३६ गावं महापालिकेतून वगळण्यात आली आहेत. नवी मुंबई-पनवेल-उरण परिसराचं नागरीकरण सातत्यानं वाढत असून त्याचा पायाभूत सोयीसुविधांवर मोठा ताण पडत आहे. या भागाच्या विकासाचे योग्य नियोजन करण्यासाठी महापालिका स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹गुगलने डुडलद्वारे साजरा केला 18 वा वाढदिवस

नवी दिल्ली - जगातील सर्वांत मोठे सर्चइंजिन असलेले गुगल आज ( 27 सप्टेंबर) आपला 18 वा वाढदिवस साजरा करत असून , यानिमित्त त्यांनी खास डुडल सादर केले आहे .

गुगलने 18 वर्षांचे झाल्याने ते खऱ्याअर्थाने प्रौढ झाले असेही बोलण्यात येत आहे . गूगलच्या वाढदिवसावरुन वाद असून , याबाबत अद्यापही संदिग्धता आहे . पण , गुगलने स्वतःच 2006 मध्ये 27 सप्टेंबरला आपला वाढदिवस साजरा केल्यानंतर दरवर्षी हा वाढदिवस डुडलच्या माध्यमातून साजरा करण्यात येतो . 1998 मध्ये गूगलने आपला पहिला वाढदिवस साजरा केला होता .

जगात कोणत्याही गोष्टीची ऑनलाईन माहिती शोधण्यासाठी गुगलचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो . 4 सप्टेंबर 1998 ला गुगल पहिल्यांदा जगासमोर आले होते . लॅरी पेज आणि सर्जी ब्रेन यांनी गुगलची स्थापना केली होती . पेज आणि ब्रेन यांनी गूगलचं नाव ‘ बॅकरब ’ असं ठेवले होते . पण , नंतर ते गुगल असे करण्यात आले.

आमचे चालू घडामोडीचे चॅनेल जॉईन करण्यासाठी @chalughadamodi येथे क्लिक करा.

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹भुकेलेल्यांना अन्न देणाऱ्याचे ' यूएन 'कडून कौतुक

नवी दिल्ली - भारतात विवाहसोहळा म्हणजे एक मोठा उत्सवच असतो. कपडेलत्ते, दागदागिन्यांबरोबरच जेवणावळी हा त्यातील एक महत्त्वाचा भाग असतो. स्वादिष्ट भोजनावरूनच लग्न छान झाले असे समजले जाते. मात्र लग्नातील अन्न मोठ्या प्रमाणावर वाया जाते, असा अनुभवही अनेकदा येतो . असे शिल्लक अन्न भुकेलेल्यांना वाटावे , असा उपाय अंकित कवात्रा याने शोधला आहे .

अंकितने व्यवस्थापनाचे शिक्षण घेतले आहे . कॉर्पोरेट क्षेत्रात तो नोकरी करीत होता . पण लग्नकार्यात शिल्लक राहणाऱ्या अन्नाच्या प्रश्नाने तो अस्वस्थ झाला होता . त्यातून असे अन्न गरिबांना वाटण्याचा मार्ग त्याने शोधला. नोकरी सोडून त्याने "फिडिंग इंडिया ' ची स्थापना केली . अंकितच्या या कामाची दखल संयुक्त राष्ट्रसंघाने घेतली आहे . " यूएन यंग लीडर्स फॉर सस्टनेबल डेव्हलपमेंट गोल्स ' या कार्यक्रमाअंतर्गत संयुक्त राष्ट्रसंघाने शाश्वत विकासाच्या उद्दिष्टासाठी तरुणांना प्रशिक्षण देण्याची योजना आखली आहे . त्यासाठी अंकितसह 17 जणांची निवड झाली आहे . या प्रशिक्षणासाठी 186 देशांमधून 18 हजार अर्ज आले होते .

नोकरी ते "यूएन ' पर्यंतचा आपला प्रवास कथन करताना अंकित म्हणाला , ' सल्लागार क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय कंपनीत मी दोन वर्षे काम केले. एकदा एका सेलिब्रिटीच्या विवाहसोहळ्यास मी गेलो होतो . दहा हजार पाहुण्यांना याचे निमंत्रण होते. श्रीमंती थाटाच्या या सोहळ्यात जेवणात 35 पेक्षा अधिक वैविध्यपूर्ण पदार्थांची रेलचेल होती . एवढ्या अन्नाचे काय करतात या उत्सुकतेपोटी मी तेथे उशिरापर्यंत थांबलो. तेथे जे पाहायला मिळाले त्याने मोठा धक्का बसला. उरलेले अन्न चक्क फेकून दिले होते. हे अन्न एवढे होते की त्यातून पाच हजार माणसे सहज एक वेळ पोटभर जेवू शकली असती. त्यातून मला " फिडिंग इंडिया ' ची कल्पना सुचली. ''

अंकितने स्थापन केलेल्या या स्वयंसेवी संस्थेतर्फे 10 लाख लोकांना जेवण पुरविले जाते, असे सांगण्यात आले . देशातील 28 शहरांमध्ये संस्थेचे दोन हजार कार्यकर्ते आहेत. लग्न समारंभ , कंपन्यांची कॅंटीन , हॉटेल व घरांमधील शिल्लक राहिलेले अन्न गरिबांच्या मुखापर्यंत पोचवून देशातील भूक व कुपोषणाची समस्या सोडविण्याचा प्रयत्न " फिडिंग इंडिया ' करीत आहे . ही योजना अमलात आणण्यासाठी अंकितने गेल्या दोन वर्षांत अनेक उपक्रम राबविले आहेत. "द मॅजिक ट्रक ' या उपक्रमात एक वातानुकूलिक वाहन अन्न गोळा करीत व त्याचे गरजूंना वाटप करीत आठवडाभर दिवसरात्र शहरात फिरत असते . "फिडिंग इंडिया ' मोहिमेच्या जनजागृतीसाठी शेफ रितू दालमिया , शेफ मनजित गिल , टीव्ही निवेदक मयूर शर्मा या खाद्य क्षेत्रातील नामवंतांप्रमाणेच खवय्ये , रेस्टॉरंट यांची मदत घेतली जाते .

' देणगीदार संस्था, शाळा व मुले , ज्येष्ठ व "विशेष ' लोकांसाठी निवारा केंद्रे आम्ही दत्तक घेतली असून त्यांना सकस व पोषक अन्न पुरविले जाते.
- अंकित कवात्रा, संस्थापक , "फिडिंग इंडिया '

शाश्वत विकासाचे उद्दिष्ट
संयुक्त राष्ट्रसंघाच्या कार्यक्रम यादीवर आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्य झालेली 17 उद्दिष्टे आहेत. त्यापैकी एक शाश्वत विकास हे आहे . जगातील दारिद्य्र , असमतोल , हवामानबदल या समस्यांचे 2030 पर्यंत निर्मूलन करण्याचे ध्येय ठेवण्यात आले आहे . या उद्दिष्टपूर्तीसाठी जगभरातील नागरिकांची मदत घेण्यात येते . तसेच आपल्या वसुंधरेचे संरक्षण करण्यासाठी आणि भरभराटीसाठी यात सहभाग घेण्याचे आवाहन जगातील सर्व देशांना करण्यात येते .

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹दिल्ली-काबूलदरम्यान हवाई कॉरिडाेर

भारत व अफगाणिस्तानदरम्यानच्या दळणवळणासाठी आपले रस्ते वापरण्यास पाकिस्तानने नकार दिल्याने आता उभय देशांनी यावर हवाई तोडगा काढण्याचे ठरवले आहे. त्यानुसार भारत व अफगाणिस्तानदरम्यान लवकरच एक विशेष हवाई कॉरिडाेर सुरू करण्याचा निर्णय झाला आहे.

भारताने गेल्या काही वर्षांपासून अफगाणिस्तानातील पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी भरीव योगदान दिले आहे. येत्या पाच वर्षांत उभय देशांत १० अब्ज डॉलरचा द्विपक्षीय व्यापार होणे अपेक्षित आहे. मात्र या दळणवळणासाठी पाकिस्तानातील रस्तेमार्ग अत्यावश्यक असल्याने भारत व अफगाणिस्तान या बाबतीत पाकिस्तानवर अवलंबून होते. मात्र नवी दिल्ली व काबूल अशा दोन्ही ठिकाणी पाकिस्तानचे संबंध बिघडल्याने पाकिस्तानने नकारात्मक पवित्रा घेत उभय देशांना आपले रस्ते वापरू देण्यास नकार दिला आहे. यावर या हवाई कॉरिडाेरचा पर्याय पुढे आला आहे.

अफगाणिस्तानचे अध्यक्ष मोहम्मद अश्रफ घनी यांच्या अलीकडच्या भारत दौऱ्यात या कॉरिडाेर वर शिक्कामोर्तब करण्यात आले. विशेष म्हणजे, जागतिक बँकेने या कॉरिडाेरला मदत करण्याची तयारी दर्शवली आहे.

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹पाक संसदेत हिंदू विवाह विधेयकाला मंजुरी

पाकिस्तानच्या संसदेत अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेलं हिंदू विवाह विधेयक अखेर मंजूर झालं आहे. या विधेयकामुळे पाकमध्ये अल्पसंख्याक असलेल्या हिंदू समाजातील विवाहांना कायद्याचं संरक्षण मिळणार आहे.

पाकमध्ये गेल्या ६६ वर्षांपासून हिंदू धर्मातील विवाहांची नोंदणी होत नव्हती. नवा कायदा अमलात आल्यानंतर विवाह नोंदणीचा मार्ग मोकळा होणार आहे. याशिवाय 'तलाक' आणि जबरदस्तीने करण्यात येणाऱ्या धर्मांतरालाही लगाम बसणार आहे.

विधेयकाचे फायदे...

> प्रामुख्याने हिंदू समाजातील महिलांकडे विवाह सिद्ध करणारा कोणताही ठोस पुरावा नसायचा. तो अडसर आता दूर होईल.

> पुनर्विवाह, दत्तक मूल, उत्तराधिकारी नेमणे असे अधिकारही नव्या कायद्याने हिंदूंना मिळणार आहेत.

> हिंदू महिलांच्या अपहरणाच्या घटनांचे प्रमाण अधिक आहे. त्यालाही आता आळा बसणार आहे.

> भारतातील हिंदू विवाह कायदा आणि पाकिस्तानात होऊ घातलेला हिंदू विवाह कायदा यात मोठं अंतर आहे. पाक संसदेत संमत झालेल्या विधेयकातील तरतुदींनुसार लग्नानंतर १५ दिवसांच्या आत विवाह नोंदणी करणे आवश्यक आहे. भारतात मात्र अशाप्रकारचं बंधन नाही.

> पाकमध्ये आता हिंदू वधू-वराचं लग्नावेळचं वय १८ वर्षे वा त्यापेक्षा अधिक असणं आवश्यक आहे त्याचवेळी भारतात मात्र वरासाठी २१ तर वधूसाठी १८ वर्षे पूर्ण असण्याचे बंधन आहे.

> पती-पत्नी एक वर्षापेक्षा जास्त काळ एकमेकांसोबत राहत नसतील व त्यांना लग्न मोडायचं असेल तर ते आता पाकिस्तानात शक्य आहे. भारतात मात्र यासाठी दोन वर्षांचे बंधन आहे.

> पतीच्या निधनानंतर सहा महिन्यांनी विधवा पत्नीला पुनर्विवाहास आता परवानगी मिळेल. भारतात मात्र कायद्याने अशी कोणतीही मुदतीची अट घातलेली नाही.

> पाकमध्ये हिंदू व्यक्तीने पहिली पत्नी असताना दुसरा विवाह केल्यास तो गुन्हा ठरणार आहे. भारतातही तशाप्रकारची तरतूद आहे.

> हिंदू विवाह नोंदणी नियमांचे उल्लंघन झाल्यास पाकमध्ये सहा महिने कारावासाची शिक्षा होणार आहे. भारतात मात्र अशा शिक्षेची तरतूद नाही.

> पाकिस्तानात हिंदूंची लोकसंख्या केवळ २ टक्के आहे. १९९८च्या जनगणनेनुसार देशात २५ लाख हिंदू आहेत. हिंदूंसोबतच जैन, बौद्ध, शीख, पारसी आणि ख्रिश्चन समाजही असून या सर्वांना हिंदू विवाह कायदा लागू होणार आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹चिनी कंपन्यांची भारताला पसंती

रोजगार कपातीची चीनला भीती

हुआवे या चिनी दूरसंचार कंपनीने नुकतेच भारतात उत्पादन सुरू केले. मात्र यामुळे चीनमध्ये खळबळ माजली आहे. अनेक चिनी कंपन्या भारताला औद्योगिक उत्पादनासाठी पसंती देऊ लागल्या आहेत. असे सातत्याने झाल्यास चीनमध्ये मोठ्या प्रमाणावर नोकरकपात होण्याची भीती तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.

भारत व चीन यांच्यात आर्थिक द्वंद्व वाढत चालले आहे. त्यातच चिनी कंपन्यांचा ओढा भारताकडे वाढत आहे. अनेक चिनी कंपन्या उत्पादनांची निर्मिती करण्यासाठी सुट्या भागांची जोडणी करण्याचे कारखाने भारतात सुरू करत आहेत. मोबाइल निर्मिती बाजारपेठ भारतात जाते की काय असे चित्र सध्या चीनमध्ये निर्माण झाले आहे. असे औद्योगिक स्थित्यंतर झाल्यास त्याची गंभीर दखल घेणे गरजेचे आहे, असे मत ग्लोबल टाइम्स या नियतकालिकाने व्यक्त केले आहे.

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹तंत्रज्ञानाच्या मदतीने ७०० नेत्रहिनांनी पाहिला ‘कबाली’!

तंत्रज्ञानाने आपल्या जीवनावर व्यापक परिणाम केल्याचे आपण सर्वजण जाणतो. तंत्रज्ञानाच्या जोरावर चित्रपटाचा पुरेपुर आनंद घेण्याची संधी काही नेत्रहिनांनी मिळाली. हा चमत्कार चेन्नईत घडला असून, रजनीकांत यांचा अभिनय असलेल्या ‘कबाली’ या सुपरहिट चित्रपटाचा आनंद त्यांनी लुटला. “रजनीकांत यांनी आपला सूट परिधान केला असून, आपल्या अनोख्या शैलीत ते तुरुंगाबाहेर आले आहेत.” हे वाक्य ‘डिस्क्रिप्टिव्ह ऑडिओ टेक्नॉलॉजी’ने सज्ज असलेल्या चित्रपटगृहात गुंजताच उपस्थित सर्व नेत्रहिन प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट करत एकच जल्लोष केला. सातशेहून अधिक नेत्रहिनांनी तंत्रज्ञानाच्या मदतीने चित्रपटाचा आनंद लुटला.

या अनोख्या तंत्रज्ञानामुळे दृष्टिहिनांना चित्रपटातील दृश्ये अनुभवता आली. यात मोठ्या पडद्यावरील दृश्यांचे अभिवाचन केले जाते. हा अनुभव खूप छान होता. इतर चित्रपटांच्या तुलनेत आपण ह्या चित्रपटाचा अधिक आनंद घेऊ शकल्याची प्रतिक्रिया एका नेत्रहिनाने दिल्याचे ‘एनडीटीव्ही’च्या वृत्तात म्हटले आहे. चित्रपटाचे वर्णन खूप चांगल्याप्रकारे करण्यात आले होते. पडद्यावर घडत असलेल्या घटना या माध्यमाद्वारे मी अनुभवू शकत होते, असे मनोगत दिव्या भारती नावाच्या एका तमिळ विद्यार्थिनीने व्यक्त केले. नेत्रहिनांना चित्रपट पाहिल्याचा आनंद घेता यावा, यासाठी एक ट्रेण्ड सेट करत असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. चित्रपटाचा व्हॉइस ओव्हर आणि रेकॉर्डिंग करण्यासाठी तीन जणांच्या चमूला तीन दिवस लागले.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹पाकमध्ये होणाऱ्या सार्कच्या बैठकीतून भारताची माघार

उरी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानमध्ये होणाऱ्या दक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार्य संघटनेच्या (सार्क) बैठकीत भारत सहभागी होणार नाही. नोव्हेंबरमध्ये इस्लामाबाद येथे सार्क परिषद होणार होती.

यापूर्वी अफगाणिस्तानचे राजदूत शायदा मोहम्मद अब्दाली यांनी पाकमध्ये होणाऱ्या सार्कच्या बैठकीत सर्वांनी बहिष्कार टाकावा, अशी भूमिका स्पष्ट केली होती. ते म्हणाले होते, दहशतवादाच्या माध्यमातून प्रदेशातील शांतता आणि स्थैर्य भंग करणा-या पाकिस्तानविरोधात आता सर्व देशांनी एकत्र यायची वेळ आली आहे. सर्व देशांनी एकत्र येऊन इस्लामाबादमध्ये होणा-या सार्क परिषदेवर बहिष्कार घालण्यावर विचार केला पाहिजे, असेही शायदा मोहम्मद अब्दाली यांनी सांगितले होते.

दरम्यान, पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते नफीस झकेरिया यांनी नुकत्याच पार पडलेल्या सार्क देशांच्या परिषदेच्या आधी असे वक्तव्य केले होते की, पाकिस्तान आणि भारत यांच्यादरम्यान काश्मीर हाच महत्त्वाचा मूलभूत प्रश्न आहे आणि तो संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या मध्यस्थीनेच सुटला पाहिजे. काश्मिरी जनतेला तिचा स्वयंनिर्णयाचा जन्मसिद्ध अधिकार दिलाच गेला पाहिजे. हेच नेमके साऱ्या वादाचे मूळ आहे. त्यामुळे जोवर काश्मीरचा पेच सुटत नाही तोवर सार्क देशांच्या परिषदेत व्यापाराच्या मुद्द्यांवर चर्चा होऊ शकत नाही आणि या देशांतर्गत व्यापाराच्या माध्यमातून त्यांना प्रगतीही साधता येणार नाही.

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹यू ट्यूब लाँच करणार डेटा वाचवणारं अॅप

ऑनलाइन व्हिडीयोसाठी सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या यू ट्यूबने यु ट्यूब गो हे अॅप लाँच करण्याची घोषणा केली आहे. या अॅपचं वैशिष्ट्य म्हणजे यू ट्यूबवरचे व्हिडीयो सेव्ह करून ऑफलाइन पाहता येणार आहेत, तसेच ज्यांच्याकडे इंटरनेट कनेक्शनच नाहीये अशांसोबतही हे डाऊनलोड केलेले व्हिडीयो शेअर करता येणार आहेत.

या नव्या सेवेमध्ये व्हिडीयोचा प्री व्ह्यू बघता येण्याची सोय आहे, तसेच व्हिडीयो किती मोठा आहे, किती एमबी डेटा घेईल हे देखील डाउनलोड करायच्या आधी समजणार आहे. दिल्लीमध्ये 'गुगल फॉर इंडिया' या कार्यक्रमात कंपनीने याबाबतची घोषणा केली.

जास्तीत जास्त लोकांना व्हिडीओ शेअरींग सर्विससोबत जोडणं हा या अॅप मागील मुख्य उद्देश आहे. स्लो इंटरनेट कनेक्शन असेल तरी अगदी आरामात ग्राहक ऑफलाइन व्हिडीओ सेव करू शकतात असा कंपनीचा दावा आहे. 'मजा घ्या, डेटा वापरू नका' अशी टॅगलाइन या अॅपला देण्यात आली आहे. कोणत्या क्वालिटीचा आणि किती साइजचा व्हिडीओ डाउनलोड करायचा आहे हे युजर्स ठरवू शकतो. तसेच त्यासाठी किती डेटा वापरला जाणार आहे हे देखील युजरला कळणार आहे. प्ले-स्टोअरमधून हे अॅप डाउनलोड करता येणार आहे.

येत्या दोन महिन्यात हे अॅप दाखल करण्यात येणार आहे. सध्या हे अॅप 5 भारतीय भाषांना सपोर्ट करतं मात्र येणा-या काही दिवसात 10 भाषांना अॅप सपोर्ट करेल असं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे.

Studykatta:
पुरस्कार :-
गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार:-
-----------------------------------------------------------

• ज्येष्ठ संगीतकार, संगीत संयोजक आणि व्हायोलिन वादक उत्तम सिंग यांना 2016 या वर्षीचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जाहीर करण्यात आला
• पाच लाख रुपये, मानचिन्ह आणि मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
उत्तम सिंग:-
• उत्तम सिंग यांचा जन्म 25 मे 1948 रोजी झाला. त्यांचे वडील सतारवादक होते. त्यांनी वडिलांकडून बालपणापासूनच संगीताचे धडे गिरवले.
• सात वर्षे मटका वाद्य, सहा महिने सतार वाद्य व दोन वर्षे गायनाचे शिक्षण घेतले.
• 1963 मध्ये त्यांनी नौशाद, मदन मोहन, सचिन देव बर्मन, सी. रामचंद्र, राहुल देव बर्मन यांच्यासारख्या ज्येष्ठ संगीतकारांसोबत काम केले.
• राजश्री प्रॉडक्श्नच्या "मैंने प्यार किया‘, "हम आपके है कौन‘ या हिंदी; तसेच अनेक तमिळ आणि पंजाबी चित्रपटांसाठीही त्यांनी संगीत संयोजक म्हणून काम केले.
• मनोज कुमार यांच्या "पेंटरबाबू‘ व "क्ल"र्क‘ या चित्रपटांनाही संगीत दिले.
• 1992 मध्ये जगदीश खन्ना यांच्या मृत्यूनंतर त्यांनी स्वतंत्रपणे काम सुरू केले. यश चोप्रा यांच्या दिल तो पागल है, दुश्म न, फर्ज, दिल दिवाना होता है या गाजलेल्या चित्रपटांना त्यांनी संगीत दिले.
• 1997 मध्ये "दिल तो पागल है‘ या चित्रपटासाठी त्यांना फिल्मफेअरचा सर्वोत्तम संगीत दिग्दर्शक पुरस्कार मिळाला. 2002 मध्ये "गदर - एक प्रेमकथा‘ या चित्रपटासाठी आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट अकादमी पुरस्कार (सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक) मिळाला.
• सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखालील समितीतील सदस्यांनी एकमताने उत्तम सिंग यांची निवड केली. या समितीत सांस्कृतिक कार्यप्रधान सचिव वल्सा नायर सिंह, श्रीधर फडके, आशा खाडिलकर, स्वानंद किरकिरे, अजय व अतुल गोगावले आणि श्रेया घोषाल यांचा समावेश होता.

•या पूर्वी हा पुरस्कार :-
२०१५:- प्रभाकर जोग
२०१४:-कृष्णा कल्ले

Source: study circle fb page

Studykatta:
चालू घडामोडी:-
----------------------------------------

* लष्करी  सराव:-
युद्ध अभ्यास २०१६ :-
भारत  आणि अमेरिका
ठिकाण:- उत्तराखंडातील चौबतियाच्या जंगलात
मैत्री 2016:-
पाकिस्तान आणि रशिया

* चर्चित चित्रपट;-
विसरनाई:-
* राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त तमीळ चित्रपट विसरनाई २०१७ च्या ऑस्करमधील उत्कृष्ट परदेशी चित्रपटांच्या गटात भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.
* एम. चंद्रकुमार यांच्या "लॉक अप‘ कादंबरीवर हा चित्रपट आधारित आहे.
गुन्हेगारीपट असलेल्या विसरनाई चित्रपटाचा निर्माता अभिनेता धनुष हा आहे
* दिनेश रवी, आनंदी आणि आडुकुलम मुरुगदास यांच्या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत. पोलिसी क्रौर्य, भ्रष्टाचार आणि निरागसतेचा होणारा लोप याचे दर्शन चित्रपट घडवितो.

नवा पक्ष:-
विदर्भ राज्य आघाडी:- ऍड. श्रीहरी अणे (संस्थापक अध्यक्ष)

Source : study circle fb page

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹कोकण पर्यटन विकासासाठी 300 कोटींची तरतूद - फडणवीस

मुंबई - कोकण पर्यटन व्हिजन परिषदेत पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या गावांत जागतिक दर्जाचे सल्लागार नेमण्यात येतील . या मागास भागात पर्यटन व्यवसाय वाढावा , यासाठी 300 कोटींची तरतूद केली आहे . अधिक गरज भासल्यास त्याची तजवीज केली जाईल , असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितले .

तारकर्ली , दापोलीसारख्या नयनरम्य ठिकाणी उत्तम दर्जाचे रस्ते; तसेच पायाभूत सुविधांची गरज आहे , याकडे या परिषदेचे प्रमुख माधव भंडारी आणि संजय यादवराव यांनी लक्ष वेधले होते . त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी पर्यटनाचा विकास झाला , तर कोणत्याही प्रदेशाचा महसूल वाढतो, हे लक्षात घेत विकासाची रूपरेषा आखली पाहिजे, असे मत मांडले . राज्यात पर्यटनाला चालना देताना कोकणचा स्वतंत्र विकास व्हावा , यासाठी तरतूद केली जाईल ; मात्र युरोपप्रमाणे तिथे व्यवस्था करणे आवश्यक आहे , असे फडणवीस म्हणाले . या वेळी पर्यटनमंत्री जयकुमार रावळ यांनी कोकण पर्यटनाकडे लक्ष देण्यासाठी आपण 100 दिवस तेथे राहणार आहोत , असे जाहीर केले.
गृह राज्यमंत्री दीपक केसरकर या वेळी उपस्थित होते . दिवसभर झालेल्या या परिषदेत कोकण विकासाच्या विविध कल्पनांवर उच्चस्तरीय अधिकारी आणि उद्योजकांनी चर्चा केली .

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹लवकरच येणार यु ट्यूब गो ऍप

नवी दिल्ली - ' गुगल फॉर इंडिया' या कार्यक्रमात व्हिडिओसाठी लोकप्रिय असलेल्या यू ट्यूबने ''यु ट्यूब गो '' हे ऍप लाँच करण्याची घोषणा केली . जास्तीत जास्त लोकांना व्हिडिओ शेअरींग सर्विसबरोबर जोडणे हा या ऍप मागील मुख्य उद्देश आहे .

व्हिडिओ पाहण्यासाठी युजर्सचा भरमसाठ डेटा खर्च होऊ नये यासाठी , तसेच इंटरनेट कनेक्शन हा व्हिडिओ बघण्यामधील अडथळा होऊ नये यासाठी या ऍपची मदत होणार आहे .

काय आहे या ऍपमध्ये . .

- यू ट्यूबवरचे व्हिडीयो सेव्ह करून ऑफलाइन पाहता येणार
- स्लो इंटरनेट कनेक्शन असतानाही ऑफलाइन व्हिडीओ सेव्ह करता येणार
- इंटरनेट कनेक्शन नसतानाही व्हिडीयो शेअर करण्याची सोय
- व्हिडीयोचा प्री - व्ह्यू बघता येण्याची सोय
- किती एमबी डेटा घेईल हे देखील व्हिडिओ डाउनलोड करायच्या आधी समजणार
- कोणत्या क्वालिटीचा आणि किती साइजचा व्हिडीओ डाउनलोड करायचा आहे हे युजर्स ठरवू शकणार .

येत्या दोन महिन्यात हे अॅप येणार असून , सध्या हे ऍप मिळविण्यासाठी युजर्सला youtubego . com या संकेतस्थळावर signup करावे लागणार आहे . यासाठी भारतातल्या 15 शहरांमध्ये अभियंते, डिझायनर्स आणि संशोधकांनी सर्वेक्षण केले असल्याची माहिती कंपनीने दिली आहे .

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹' सार्क ' परिषदेवर अफगाणिस्तानचाही बहिष्कार

नवी दिल्ली - इस्लामाबादमध्ये नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या ' सार्क ' परिषदेत भारत, भूतान , बांगलादेशपाठोपाठ आता अफगाणिस्ताननेही बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे .

उरीतील दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारने पाकिस्तानविषयी घेतलेली तीव्र भूमिका कायम राखत भारताने ‘ सार्क ’ परिषदेवरही बहिष्कार टाकला होता . यात भूतान आणि बांगलादेशनेही बहिष्कार घातला होता . आता अफगाणिस्तानही यात सहभागी झाले आहे . ‘ इस्लामाबादमध्ये होणाऱ्या परिषदेस पंतप्रधान नरेंद्र मोदी जाणार नाहीत , ’ असे परराष्ट्र मंत्रालयातर्फे स्पष्ट करण्यात आले. भारताच्या या भूमिकेनंतर बांगलादेशानेही सार्क परिषदेला उपस्थित न राहण्याचा निर्णय जाहीर केला . भूताननेही सार्क परिषदेला अर्थ नसल्याचे म्हटले आहे .

उरीत लष्कराच्या तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने राजनैतिक पातळीवर पाकिस्तानची चहुबाजूंनी कोंडी करण्याचे धोरण आखले आहे . परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेच्या व्यासपीठावरून पाकिस्तानच्या दहशतवादी धोरणांवर कडाडून हल्ला केला होता . सिंधू पाणीवाटप करारातील तरतुदीही भारतीय प्रशासन आता तपासून पाहू लागले आहे . त्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानमध्ये होणाऱ्या ‘ सार्क ’ च्या परिषदेवर प्रश्नचिन्ह होते.

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹तीघांच्या 'डीएनए ' चा वापर करुन बाळाचा जन्म

मेक्सिको ( अमेरिका ) - आजकालच्या धकाधकीच्या आयुष्यात आणि असलेल्या तणावाचा परिणाम म्हणून अनेक जोडप्यांना आई- बाबा होण्याचा आनंद मिळविण्यासाठी वैद्यकीय उपचार घ्यावे लागतात . त्यामुळे , या क्षेत्रातही तंत्रज्ञानाचा वापर केला जात असून , त्यात नवनवीन संशोधनही केले जात आहे . ' न्यू सायन्टीस्ट' या नियतकालिकाने प्रसिद्ध केलेल्या एका अहवालानुसार , तीन जणांच्या डीएनएचा वापर करुन बाळाला जन्म देण्यात डॉक्टरांना यश आले आहे .

यामध्ये आई, वडील व एक माता डोनरच्या डिएनएचा वापर करण्यात आला असून , या तंत्रज्ञानामुळे आईच्या गुणसुत्रांमध्ये असलेले दोष बाळामध्ये आले नसून , हे बाळ निरोगी जन्माला आले आहे .

या बाळाचे पालक जॉर्डन येथील रहिवासी असून , बाळाच्या आईला लेह सिंड्रोम ( Leigh syndrome ) होता . आपल्या प्रत्येक पेशीमध्ये माईटोकॉन्ड्रिया ( mitochondria ) भाग असतो. ज्याचे काम पेशींना उर्जा देणे हे असते . ज्याला पेशींचे पॉवर हाऊस असेही म्हटले जाते. परंतु यामध्ये दोष असल्यास ही अनुवंशिकता बाळातही येते . त्यालाच लेह सिंड्रोम असे म्हणतात . यामुळे या दाम्पत्याला चार गर्भपात आणि दोन बाळांच्या मृत्यूला सामोरे जावे लागले होते.

तीन जणांच्या डिएनएचा वापर करुन बाळाला जन्म देता येऊ शकतो. यावर 90च्या दशकाच्या अखेरीस संशोधन सुरु झाले . त्याचा आधार घेत नवीन तंत्रज्ञानाचा वापर करुन या बाळाला जन्म देण्यात आला आहे . यावर पुढील संशोधन करण्यात येणार असून , याचा फायदा अनेक दांपत्यांना होणार आहे . परंतु , माइटोकॉन्ड्रियल डोनेशनच्या या तंत्रज्ञानाचा आणखी सखोल आभ्यास होण्याची गरज असल्याचे तज्ञांचे मत आहे .

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹गुरगाव नव्हे 'गुरुग्राम'...नामांतरावर शिक्कामोर्तब

हरयाणातील गुरगाव जिल्ह्याच्या नामांतरावर अखेर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. यापुढं गुरगाव शहर व जिल्हा 'गुरुग्राम' या नावानं ओळखला जाणार आहे. केंद्र सरकारनं हा नामांतराचा प्रस्ताव स्वीकारल्याची माहिती हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी दिली आहे.

महाभारतापासून प्रेरणा घेऊन हरयाणा सरकारनं हा प्रस्ताव ठेवला होता. मागील एप्रिल महिन्यात मुख्यमंत्र्यांनी नामांतराची घोषणा केली होती. त्यानंतर अवघ्या सहा महिन्यांच्या आत केंद्रानं त्यास मान्यता दिली. येत्या १ नोव्हेंबर रोजी हरयाणा राज्याचा सुवर्ण महोत्सव साजरा केला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. त्यामुळंच केंद्रानं नामांतराला तातडीनं मान्यता दिल्याचं बोललं जात आहे.

मी गुरगावच म्हणणार: योगेंद्र यादव
गुरगावचं नामांतर 'गुरुग्राम' करण्याच्या निर्णयाचं अनेकांनी स्वागत केलं आहे. मात्र, आम आदमी पक्षातून हकालपट्टी करण्यात आलेले व नंतर 'स्वराज अभियान'ची स्थापना करणारे योगेंद्र यादव यांनी मी गुरगावच म्हणेन,' असं स्पष्ट केलं आहे.

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹अंबानी बंधू 'व्हर्च्युअली' एकत्र!

दहा वर्षांपूर्वी आपापली वेगळी चूल मांडलेले अंबानी बंधू आता रिलायन्स जिओच्या निमित्तानं एकत्र आले आहेत. आपल्या वडिलांचं धीरुभाई अंबानी यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्या भावासोबत काम करण्याचा निर्णय अनिल अंबानी यांनी घेतला आहे. त्यांच्या 'रिलायन्स ग्रुप' वर हे टि्वट करून सांगितलं आहे. अर्थात हे एकत्र येणं केवळ 'व्हर्च्युअल' पातळीवर आहे. म्हणजेच अनिल अंबानी यांची रिलायन्स कम्युनिकेशन आणि मुकेश अंबानी यांची रिलायन्स जिओ या दोन्ही कंपन्या यापुढे त्यांचं टेलिकॉम इन्फ्रास्ट्रक्चर वाटून घेणार आहेत. रिलायन्सच्या फोर जी ग्राहकांना यामुळे अधिक चांगल्या सेवेचा लाभ होईल.

टेलिकॉम इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये रिलायन्स कम्युनिकेशनचे मोबाइल टॉवर्स, ऑप्टीकल फायबरचं जाळं, स्पेक्ट्रम आणि रिलायन्स जिओच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि फोर जी एलटीई सेवा एकत्र काम करतील, अशी माहिती अनिल अंबानी यांनी रिलायन्स कम्युनिकेशनच्या भागधारकांना मंगळवारी दिली.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹रायगड जिल्ह्य़ात २४१ बालके अतिकुपोषित

१४७ गावांमध्ये आहार योजना बंद; निधीचा अभाव

ठाणे आणि पालघर जिल्ह्य़ातील कुपोषित बालकांचा प्रश्न चच्रेत असताना रायगड जिल्ह्य़ातही २४१ तीव्र कुपोषित, तर ९५८ कुपोषित बालके असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

कुपोषणाचे प्रमाण कमी व्हावे यासाठी राज्यातील १६ जिल्ह्य़ात राज्य सरकारच्या महिला बाल कल्याण विभागाची एपीजे अब्दुल कलाम अमृत आहार योजना करण्यात आली. कोकणातील पालघर, ठाणे आणि रायगड जिल्ह्य़ाचा समावेश होता. कर्जत तालुक्यातील १४७ गावांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर ही योजना राबवण्याचे निश्चित करण्यात आले. मात्र मे महिन्यात सुरू झालेली ही योजना अंगणवाडीसेविका आणि मदतनीस यांचे सहकार्य न मिळाल्याने १५ दिवसांत बंद पडली.

योजनेनुसार कुपोषित बालके, स्तनदा माता आणि गरोदर महिलांना आठवडय़ातून एक दिवस अतिरिक्त आहार पुरवला जाणार होता. यात केळी, अंडी, खजूर यांचा समावेश उपलब्ध करून दिले जाणार होते. मात्र अन्न शिजवण्यासाठी निधी नसल्याने ही योजना बंद पडल्याचे सामाजिक संस्थेने केलेल्या पाहणीत समोर आले.

आदिवासी विभाग आणि महिला व बालकल्याण विभाग यांचा समन्वय नसल्याचा आरोप आदिवासी विभागात काम करणाऱ्या संघटनांकडून केला जातो आहे. महिला व बालकल्याण विभागातील अनेक पद सध्या रिक्त आहे. त्यामुळे शासनस्तरावर योजनांची अंमलबजावणी करण्यात मर्यादा येत आहेत. दरम्यान, आरोग्य तपासणीत आजारी असलेल्या बालकांना आणि त्यांच्या मातांना संदर्भ सेवा देण्यात येत आहे. त्यांना योग्य आणि पूरक आहार मिळेल यांची खबरदारी घेतली जात आहे. कुपोषण निर्मूलनासाठी सामाजिक संस्थांची मदत घेतली जात असल्याचे जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण विभागामार्फत सांगण्यात आले.

कुपोषणाची कारणे
आदिवासी विभागाकडून पोषण आहार योजनेसाठी केली जाणारी आíथक तरतूद ३२ टक्क्यांनी कमी करण्यात आली आहे. सुरुवातीला ही तरतूद ६२ टक्क्यांपर्यंत करण्यात आली होती. मात्र शासनाकडे केलेल्या पाठपुराव्यानंतर यात ३० टक्के वाढ करण्यात आली. गाव पातळी, तालुका पातळीवरील समित्या अस्तित्वात नाही. अंगणवाडीत दिला जाणारा पोषण आहार हा शिजवून दिला पाहिजे. शासनाकडून वाटप करण्यात येणारी पाकीट ही मुले खाऊ शकत नाही. ती बरेचदा टाकून दिली जातात.

नवे काय?

महिला व बालकल्याण विभागामार्फत रायगड जिल्ह्य़ातील एकात्मिक बाल विकास सेवा योजनेतील १७ प्रकल्पांतील २ हजार ६०४ अंगणवाडय़ांचे तसेच ६०४ छोटय़ा (मिनी) अंगणवाडय़ांतील मुलांचे सर्वेक्षण करण्यात आले. यात एकूण १ लाख ५५ हजार ७७७ बालकांची तपासणी करण्यात आली. या सर्वेक्षणात २४१ बालके अतिकुपोषित , ९५८ बालके कुपोषित आढळून आली. याशिवाय कमी वजनाच्या श्रेणीतील १ हजार १५२ बालके आढळून आली. कर्जत, सुधागड पाली, पेण, खालापूर या तालुक्यात कुपोषित बालकांचे प्रमाण अधिक आहे.

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹राज्यात फलोत्पादन योजनेला खीळ!

रोजगार हमी योजनेशी निगडीत फळबाग लागवड कार्यक्रमातून राज्यात आतापर्यंत सुमारे १८ लाख हेक्टर क्षेत्र विस्तारले गेले असले, तरी गेल्या काही वर्षांपासून या योजनेला ‘ब्रेक’ लागल्याचे चित्र आहे. पाच-सहा वर्षांपूर्वी या योजनेतून वर्षभरात ७० ते ९० हजार हेक्टर फळबाग लागवडीखाली आली. आता लक्ष्यांक केवळ ७ हजार हेक्टपर्यंत मर्यादित करण्यात आले आहे.

राज्यात कोरडवाहू शेतीचे प्रमाण सुमारे ८५ टक्के असल्याने या शेतीवर अवलंबून असलेल्या लक्षावधी अल्प आणि अत्यल्प भूधारकांच्या शेती पद्धतीत परिवर्तन घडवून आणण्याचा उद्देश फलोत्पादन योजनेत ठेवण्यात आला होता. हा फळबाग लागवड कार्यक्रम १९९०-९१ पासून हाती घेण्यात आला. या योजनेअंतर्गत १९९० पूर्वी असलेले २.४२ लाख हेक्टर क्षेत्र धरून २०१५-१६ अखेर राज्यातील एकूण १८.३६ लाख हेक्टर क्षेत्र फळबाग लागवडीखाली आणण्यात आले आहे. या योजनेत लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांची संख्याही २१.११ लाखांवर गेली आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून या योजनेला उतरती कळा लागली आहे. शंभर टक्के अनुदानावर राबविण्यात येणाऱ्या रोहयोतील फळबाग लागवडीत पहिल्या वर्षी निम्मे अनुदान, तर दुसऱ्या वर्षी ३० टक्के आणि तिसऱ्या वर्षी २० टक्के अनुदान मिळते. २०१५-१६ या वर्षांत यासाठी ११३ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती.

कृषी विभागाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार २००८-०९ या वर्षांत फलोत्पादन योजनेत फळबाग लागवडीचे उद्दिष्ट १ लाख हेक्टरचे ठेवण्यात आले होते. त्या वर्षी ९१ हजार ५३० हेक्टरचे लक्ष्य साध्य झाले. २००९-१० मध्ये लक्ष्य कमी करून ८० हजार हेक्टर करण्यात आले. या वर्षांत ७७ हजार हेक्टरमध्ये फळबाग लागवड झाली. २०१०-११ मध्ये ५० हजार हेक्टरचे लक्ष्य ठेवण्यात आले होते. ४० हजार ५८६ हेक्टरची लक्ष्यप्राप्ती झाली. २०११-१२ मध्ये केवळ २० हजार हेक्टरच लक्ष्य ठेवण्यात आले होते आणि तेही साध्यही झाले. २०१३-१४ मध्ये ही योजना न राबवल्याने १९९० नंतर प्रथमच या योजनेत एक वर्षांचा खंड पडला होता. मात्र, कमी झालेल्या फळबाग लागवडीमुळे पुन्हा ही योजना कार्यान्वित करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत होती. केंद्राच्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या तुलनेत जुन्या रोहयोतून फळबाग लागवड मोठय़ा प्रमाणात होत असल्याचे निदर्शनास आल्याने २०१४-१५ मध्ये पुन्हा या योजनेला मान्यता देण्यात आली आणि १० हजार ६९८ हेक्टर क्षेत्रावर फळबाग लागवड झाली. आता या योजनेत लक्ष्यांकच कमी ठेवण्यात येत आहे. २०१५-१५ मध्ये केवळ ७ हजार, तर २०१६-१७ मध्ये २० हजार हेक्टर क्षेत्र प्रस्तावित आहे. लक्ष्य कमी ठेवल्याने यंत्रणेवरील ताण कमी झाला असला, तरी शेतकऱ्यांना मात्र त्याचा फटका बसला आहे. अनेक भागात सिंचनाच्या सोयी उपलब्ध असूनही वीज पुरवठा नाही, विहिरीसाठी अनुदान वेळेवर मिळत नाही व आता फळबाग लागवड कार्यक्रमालाही कात्री लावण्यात आली आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹केंद्राकडून राज्याला दुष्काळासाठी १२०० कोटींची अतिरिक्त मदत

राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील शेतक-यांना केंद्र सरकारने दिलासा दिला आहे. केंद्र सरकारने दुष्काळग्रस्त भागातील पिकांच्या नुकसान भरपाईसाठी १ हजार २६९ कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. शेतक-यांना मदत दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारचे आभार मानले आहेत.

दिल्लीत बुधवारी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत कृषीमंत्री राधामोहन सिंह, गृहराज्यमंत्री किरेन रिजीज, केंद्रीय गृहसचिव राजीव महर्षी आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. केंद्र सरकारच्या पथकाने राज्यातील दुष्काळग्रस्त भागाची पाहणी केली होती. या पथकाने दिलेल्या अहवालाच्या आधारे केंद्र सरकारने राज्यासाठी १,२६९ कोटी रुपयांचे आर्थिक सहाय्य मंजूर केले आहे. यातील ५८९.४६ कोटी रुपये खरीप पिकांच्या तर ६७९.५४ कोटी रुपये रब्बी पिकांच्या नुकसान भरपाईसाठी मंजूर करण्यात आले आहे.

राज्यातील २९ हजार ६५ गावांमध्ये यंदा दुष्काळी परिस्थिती जाहीर करण्यात आली होती. त्या गावांमध्ये विविध उपाययोजना राबवण्यात आल्या होत्या. यानंतर नव्याने दुष्काळग्रस्त म्हणून घोषित केलेल्या ११ हजार गावांच्या मदतीसाठी केंद्र सरकारकडे पुरवणी प्रस्ताव सादर करण्यात आला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन राज्यातील दुष्काळी स्थितीबाबत त्यांच्याशी चर्चा केली होती. राज्याची ही मागणी केंद्र सरकारकडे प्रलंबित होती. बुधवारी बैठकीत पाहणी अहवालावर विचारमंथन केल्यावर राज्याला मदत जाहीर करण्यात आली आहे.

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹पहिल्याच अध्यक्षीय निवडणूक चर्चेत क्लिंटन यांच्याकडून ट्रम्प चितपट

अमेरिकेत अध्यक्षीय निवडणूक जवळ येत असताना झालेल्या पहिल्या जाहीर अध्यक्षीय चर्चेत डेमोकॅट्रिक पक्षाच्या उमेदवार हिलरी क्लिंटन यांनी त्यांचे रिपब्लिकन प्रतिस्पर्धी डोनाल्ड ट्रम्प यांना बचावात्मक पवित्रा घेण्यास भाग पाडले. या चर्चेत वंशवाद, दहशतवाद व संयम अशा अनेक मुद्दय़ांवर सडेतोड चर्चा झाली.

सुमारे ९० मिनिटे हे वाक्युद्ध सुरू होते; त्यात माजी परराष्ट्र सचिव असलेल्या क्लिंटन व सत्तर वर्षांचे स्थावर मालमत्ता सम्राट व रिअॅलिटी टीव्ही स्टार असलेले रिपब्लिकन उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी अनिश्चित मतांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला. सीएनएन व ओआरसी यांच्या मतदानात असे जाहीर करण्यात आले, की पहिल्या वादविवादात क्िंलटन या विजयी ठरल्या आहेत व त्यांना ६२ टक्के मतदारांनी पसंती दिली आहे. ट्रम्प यांना केवळ २७ टक्के मते मिळाली आहेत. दोन्ही नेत्यांनी आक्रमक भूमिका घेताना ते व्यक्तिगत पातळीवर उतरले. ट्रम्प यांनी, क्लिंटन यांना न्यूमोनिया झाल्यानंतर त्यांच्यात आता अध्यक्ष होण्यासाठी दम उरलेला नाही असे सांगितले. क्िंलटन यांनी ट्रम्प यांच्या या वादग्रस्त विधानांना हसून उत्तरे देताना उलट त्यांना बचावात्मक पातळीवर जाण्याची वेळ आणली. ट्रम्प यांना फारसा संयम नाही, त्यांनी करविवरणपत्रे जाहीर केलेली नाहीत व त्यांनी महिला व काही वंशाच्या लोकांविषयी वाईट मते व्यक्त केली, असे क्लिंटन यांनी सांगितले.

क्िंलटन यांनी त्यांच्या परराष्ट्र सचिव काळातील काढून टाकलेले ३३ हजार ई-मेल जाहीर केले तर आपण आपली करविवरण पत्रे जाहीर करू असे ट्रम्प यांनी सांगितले, करविवरण पत्रे जाहीर का करीत नाही या प्रश्नावर त्यांनी हा पवित्रा घेतला. दोन्ही नेते समोरासमोर आले होते व हेम्पस्टेड येथील हॉफस्ट्रा विद्यापीठात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. क्िंलटन यांनी ट्रम्प यांच्यावर ते महिला-विरोधी असल्याचा आरोप करताना सांगितले की, माझ्यात अध्यक्ष होण्याची ताकद किंवा दम नसल्याची जी टीका त्यांनी केली त्यातून हे दिसून येते.

बराक ओबामा यांच्याबाबत ट्रम्प यांनी ते जन्माने अमेरिकी नसल्याची टीका केली आहे. ट्रम्प यांचे वर्तन वंशभेदाचे असून ते खोटे बोलून अनेकांना दुखावत आहेत, असे क्लिंटन यांनी सांगितले.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹पश्चिम घाटातील जंगलात २०४ पक्ष्यांच्या प्रजातींचा आशियाना

पश्चिम घाटातील कॉफी, रबर व पोफळीची झाडे ही पक्ष्यांच्या २०० प्रजातींचा आशियाना असून त्यातील १३ प्रजाती या नष्टचर्याच्या मार्गावर आहेत. गेली दोन वर्षे वैज्ञानिकांनी उष्णकटीबंधीय पक्षी विविधतेचा अभ्यास ३० हजार चौरस कि.मी क्षेत्रात केला. त्याचे नेतृत्व वन्य जीव संवर्धन सोसायटीचे डॉ. कीर्ती कारंथ यांनी केले. त्यात पक्ष्यांच्या २०४ प्रजाती सापडल्या असून त्यातील १३ नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. पश्चिम घाटात त्या सापडल्या आहेत. कॉफीचे मळे, रबर व पोफळीची झाडे येथे पक्ष्यांची घरटी आहेत.

पश्चिम घाट हा परिसंस्थात्मक दृष्टीने संपन्न मानला जातो. कबुतरासारखे मोठे पक्षी, हार्नबील हे कॉफीच्या मळ्यांमध्ये जास्त आहेत. हे पक्षी बिया पसरवण्याचे काम करीत असतात असे संशोधनाचे सहलेखक शशांक दळवी यांनी सांगितले. झाडांची विविधता व दाटपणा यावर पक्ष्यांचे वास्तव्य अवलंबून असते.

कृषी पद्धती बदलल्याने पक्षी आता कॉफी व पोफ ळीच्या मळ्यांकडे वळले आहेत. रबरासारखी पिके सारखी घेतली तर मात्र पक्ष्यांना कृषिवने फायद्याची ठरत नाहीत, असे ‘फ्रंटीयर्स इन इकॉलॉजी अँड इव्होल्यूशन’ नियतकालिकात म्हटले आहे. कृषिवने पश्चिम घाटातील पक्ष्यांच्या संवर्धनाची भूमिका पार पाडतात. या जंगलांची जैवविविधता मोठी आहे, त्यांचा वापर आगामी नियोजनात व धोरण निर्धारणात करणे गरजेचे असते, त्यामुळे जैवविविधतेचे दीर्घकालीन रक्षण होईल.

वैज्ञानिक निष्कर्षांचा वापर जर धोरणे व इतर क्षेत्रात केला तर कृषीजंगलांना प्राधान्य मिळून शाश्वत शेती पद्धती विकसित होतील. त्यामुळे रबर, पोफळी व कॉफीच्या झाडांच्या कृषीजंगलात पक्ष्यांची संख्या वाढेल, असे वैज्ञानिकांचे म्हणणे आहे.

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹उजनीवरील वीजनिर्मिती केंद्र कार्यान्वित, १२ मेगावॅट निर्मिती होणार

उजनी धरणाच्या पातळीत कमालीची वाढ झाल्यामुळे उजनीची टक्केवारी १०० टक्केच्या जवळ आली आहे. त्यामुळे बुधवार सायंकाळी ५ वाजल्यापासून पॉवर हाऊस (वीज प्रकल्पासाठी १५०० क्युसेकने) पाणी सोडण्यास सुरूवात केली आहे. यावर्षी प्रथमच वीज निर्मितीसाठी पाणी सोडण्यास सुरुवात केली आहे. या वीज प्रकल्पातून १२ मेगावॅट वीज निर्मिती चालू झाली आहे.

उजनी धरणाची पाणीपातळी ४९१ मीटरच्या खाली आल्यास वीज प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालवता येत नाही. कारण या प्रकल्पाला १६०० क्युसेक पाणी वापरावे लागते. त्यामुळे उजनी धरणात पुरेशा पाणी साठा झाल्याशिवाय वीजप्रकल्प पूर्ण क्षमतेने चालवला जात नाही. सध्या उजनी धरणात ९७ टक्के पाणीसाठा झाला आहे. दौंड येथुन ७६९३ क्सुसेकने पाणी धरणात येत आहे. कालव्यात चालू असलेल्या १५०० क्युसेकमध्ये वाढ करून तो १८०० करण्यात आला आहे़ तर वीजनिर्मिती प्रकल्पासाठी १५०० क्युसेक चालू केला आहे.

उजनी धरण १०० टक्के होण्यास केवळ ३ टक्के म्हणजे १ टीएमसी पाणी आवश्यक आहे. परंतु उजनी धरणात ११० टक्के म्हणजेच १२३ टीएमसी पाणीसाठा केला जातो. त्यामुळे पूर्ण क्षमतेने भरण्यास फक्त ७ टीएमसी पाण्याची गरज आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹हवाई उड्डाणात १८ टक्क्यांची वाढ

जागतिक स्तरावर भारताची सर्वोत्तम कामगिरी

देशातील नागरी हवाईउड्डाण क्षेत्रात गेल्या वर्षी १८ टक्क्यांची वाढ नोंदली आहे. जागतिक स्तरावर भारताने नागरी हवाईउड्डाण क्षेत्रात घेतलेली झेप सर्वोत्तम गणली गेली आहे.

सार्वजनिक सेवांच्या प्रदानात सुधारणा करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असून त्यासाठी विशेष मेहनत घेत असल्याचे प्रतिपादन या खात्याचे नवे राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी नुकतेच केले. व्यवसायातील सर्व कार्यामध्ये दर्जाविषयक मानकांचा अंगीकार व्हावा, याकरिता प्रोत्साहन देणारी सरकारी संस्था ‘क्वालिटी काऊंसिल ऑफ इंडिया’तर्फे ‘नॅशनल क्वालिटी कॉन्क्लेव्ह’च्या ११व्या आवृत्तीचे आयोजन नवी दिल्लीत करण्यात आले होते. या वेळी ते बोलत होते.

‘१२५ कोटी नागरिकांसाठी दर्जात्मक सुधारणा’ संकल्पनेवर आधारित या परिषदेत सिन्हा यांनी म्हटले की, देशातील काही काही विमानतळे जगात सर्वोत्तम आहेत आणि हवाई नागरी महासंचालनालय व इतर नियामक संस्थांच्या माध्यमातून सरकार प्रवासीस्नेही उपाययोजना हाती घेत प्रवाशांच्या हक्कांना सर्वोच्च प्राधान्य देणार आहे.
भारताने २०१६ च्या ऑगस्टमध्येही या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करताना २४ टक्के प्रवासी वाढ नोंदविली आहे. या कालावधीत ८३ लाख प्रवाशांची वाहतूक देशातील हवाई सेवेने केल्याचे नागरी हवाई महासंचालनालयाने स्पष्ट केले आहे.

क्षेत्रीय हवाई जोड योजना नव्या वर्षांत कार्यान्वित

छोटय़ा शहरांना हवाई सेवेद्वारे जोडणाऱ्या क्षेत्राय हवाई जोड योजनेला जानेवारी २०१७ पासून सुरुवात होईल, अशी घोषणा केंद्रीय नागरी हवाई उड्डाणमंत्री अशोक गजपती राजू यांनी मंगळवारी केली. क्षेत्रीय हवाई जोडअंतर्गत पहिले विमान जानेवारीच्या सुरुवातीच्या उड्डाण घेईल, असेही ते म्हणाले. याबाबत महाराष्ट्र, गुजरात, छत्तीसगड, झारखंड राज्यांबरोबर करार करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹जळगावात अहिंसा व शांतीसाठी महिलांची आंतरराष्ट्रीय परिषद

संपूर्ण जग हे आज अस्वस्थतेच्या उंबरठ्यावर उभे असून यात देशांतर्गत सामाजिक अस्वस्थता तर सीमेवरच्या युद्धजन्य परिस्थितीमुळे अनेक देश भरडले जात आहेत. धर्म, जात, आर्थिक विषमता, पर्यावरण आदी सर्वच घटकात तिरस्कार आणि हिंसेच्या राजकारणाला सामान्य बळी पडत आहेत. युगानयुगापासून ही अस्वस्थता सहन करूनही स्वतःसह परिवाराला सावरून धरणाऱ्या नारीशक्तीने सहिष्णुता व अहिंसेला कधी दूर सारले नाही. आजच्या जगाला आवश्यक असलेल्या सहिष्णुता व अहिंसेच्या विचार व वर्तनाला भक्कम करण्याच्या उद्देशाने गांधी तीर्थ जैन हिल्स येथे 2 ऑक्टोबर ते 4 ऑक्टोबर दरम्यान तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय महिला परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. गांधी रिसर्च फाऊंडेशन, एकता फाउंडेशन ट्रस्ट भोपाळ आणि इंटरनॅशनल गांधी इन्स्टिट्युट ऑफ नॉनव्हायलन्स अण्ड पीस मदुराई यांच्या संयुक्तविद्यमाने होणाऱ्या या परिषदेत 35 देशांतील सुमारे 200 महिला प्रतिनिधी सहभागी होत आहेत.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹व्यापार, उद्योगात दक्षिण आशियात भारत पहिला, पाकिस्तान शेवटच्या स्थानावर

व्यापार, उद्योगासाठी अनुकूल असलेल्या देशांमध्ये भारताच्या क्रमवारीत सलग दुस-यावर्षी सुधारणा झाली आहे. जागतिक आर्थिक फोरमने तयार केलेल्या जागतिक स्पर्धात्मक निर्देशांकात भारताच्या क्रमवारीत १६ स्थानांची सुधारणा होऊन भारत ३९ व्या स्थानावर आला आहे.
सलग दुस-यावर्षी भारताच्या क्रमवारीत सुधारणा झाली आहे. एकूण १३८ देशांच्या यादीत दक्षिण आशियाई देशांमध्ये पाकिस्तान सर्वात शेवटच्या १२२ व्या स्थानावर आहे. श्रीलंका ७१, नेपाळ ९८, भूतान ९७ आणि बांगलादेश १०६ व्या स्थानावर आहे.

मोदी सरकारसाठी ही दिलासा देणारी बाब आहे. २०१५-१६ मध्ये भारत ५५ व्या स्थानावर होता. एकूण १२ मुद्दे विचारात घेऊन जागतिक स्पर्धात्मक निर्देशांकाची क्रमवारी ठरवली जाते. यात उद्योगाच्या नव्या संकल्पना, आधुनिकीकरण, वस्तू बाजारपेठ, आरोग्य, पायाभूत सुविधा आणि अन्य मुद्यांचा समावेश आहे. एकूणच भारताच्या उत्पादकतेमध्ये वाढ झाली आहे. जागतिक स्पर्धात्मक निर्देशांकात ब्रिक्स देशांमध्ये चीन पाठोपाठ भारत दुस-या स्थानावर आहे. चीनला २८ वे स्थान मिळाले आहे.

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹‘डिजिटल इंडिया’ची अल्पावधीत मोठी मजल

भारताने अल्पावधीत डिजिटल इंडिया संकल्पनेने मोठी मजल मारली आहे. आपल्या माहिती तंत्रज्ञान उद्योगाने गतवर्षी आजपर्यंतची सर्वाधिक ८ लाख कोटींची निर्यात केली. जगातल्या ८0 देशांच्या २00 शहरांमधे भारताचे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातले व्यावसायिक सध्या कार्यरत आहेत. रिसर्च अँड डेव्हलपमेंट (आर.अँड डी.) क्षेत्रात भारत जगातला मोठा हब बनला आहे.

अमेरिकेच्या खालोखाल गुगल, मायक्रोसॉफ्ट आणि फेसबुकचा सर्वाधिक वापर भारतात होतो आहे. १२५ कोटी लोकसंख्येच्या देशात १0५ आधार कार्डधारक, १0३ कोटी मोबाईल ग्राहक आणि ४0 कोटी लोक इंटरनेट युजर्स आहेत. डिजिटल इंडियाची ही आकडेवारी बोलकी आहे, अशी माहिती केंद्रीय माहिती तंत्रज्ञानमंत्री रविशंकर प्रसाद यांनी दिली.
भारतात डिजिटल इंडिया संकल्पना केवळ श्रीमंत व उच्च मध्यम वर्गापुरती मर्यादित नाही, तर मुख्यत्वे ती गरीबांसाठीच आहे, असे नमूद करीत रविशंकर प्रसाद म्हणाले, चहावाला, रिक्षावाला, हातगाडीवाला अशा प्रत्येकाला डिजिटल इंडियाच्या माध्यमातून व्यवसायाच्या नवनव्या संधी शोधता आल्या पाहिजेत, अशी पंतप्रधानांची भूमिका आहे.

देशात जागोजागी कॉमन सर्व्हिस सेंटर उभारण्याची चळवळ त्यासाठीच सरकारने सुरू केली आहे. ग्रामीण भारताला आॅनलाइन सुविधेचा लाभ मिळावा, आधार कार्डपासून पासपोर्ट तयार करण्यापर्यंत साऱ्या गोष्टीत छोट्या गावात तयार करता याव्यात, अशी सेवा देणारी २ लाख ३0 हजार कॉमन सर्व्हिस सेंटर्स सध्या देशाच्या कानाकोपऱ्यात कार्यरत आहेत. प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर अशी केंदे्र सुरू व्हावीत, यासाठी माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने कसोशीने प्रयत्न चालवले आहेत. फ्रान्स आणि इटलीची जितकी लोकसंख्या आहे, तितके मोबाईल फोन गेल्या दोन वर्षात भारतात वाढले आहेत.

आधार कार्डाबाबत बोलायचे तर एक माध्यम म्हणून केंद्र आणि राज्य सरकारांनी आधार कार्डचा गांभीर्याने वापर केला तर प्रतिवर्षी देशाचे ७0 हजार कोटी रूपये वाचतील, असे मत जागतिक बँकेच्या एका पथकाने सखोल अध्ययनानंतर व्यक्त केले आहे. आधारचा उपयोग गुड गव्हर्नन्स व पारदर्शकतेसाठी व्हावा, हा सरकारचा आग्रह आहे.
केंद्र सरकारने आधार साठी नवा कायदा तयार केला, व्यक्तिगत माहिती तसेच निजतेचे त्यात उल्लंघन होऊ नये, याची पुरेपूर काळजी घेण्यात आली. सरकारी तिजोरीतून देशात ज्याला सब्सिडी हवी, त्याला आधार अनिवार्य करण्यात आले. अन्य सुविधा हव्यात, नकोत, याचा निर्णय प्रत्येकाला आपल्या मर्जीनुसार घेता येईल, असे ते म्हणाले.

वेबसाइट हॅकिंगचा धोका

- सायबर सिक्युरिटी एक रक्तविहिन युद्ध आहे. दिवसेंदिवस वेबसाइट हॅकिंगचा धोका वाढतो आहे, याचे गांभीर्य लक्षात घेत, सायबर सिक्युरिटीला अधिकाधिक मजबूत करण्यासाठी सरकारतर्फे आम्ही सायबर को-आॅर्डिनेशन सेंटर्स विकसित करीत आहोत. नवी आव्हानांना सामोरे जाण्यासाठी मनुष्यबळाला प्रशिक्षित करीत आहोत.
- सरकारने सुरू केलेली डिजिटल लॉकर्सची सुविधा १00 टक्के सुरक्षित आहे. आजपर्यंत २१.५ लाख लोक त्याचा वापर करीत असून, २५ लाखांहून अधिक दस्तऐवज अपलोड झाले आहेत. भारतीय लोक कोणत्याही नव्या तंत्रज्ञानाला प्रथम बारकाईने न्याहाळतात आणि त्याचे महत्त्व समजले की मग त्याचा स्वीकार करून त्याचा उत्तम प्रकारे उपभोग घेतात. डिजिटल लॉकर्सबाब तसेच घडेल, याची आम्हाला खात्री आहे, असे प्रसाद म्हणाले.
- भारताच्या इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात २ वर्षांपूर्वी ११ हजार कोटींची गुंतवणूक होती आता ती १ लाख २३ हजार कोटींवर पोहोचली आहे. इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रातही भारत नवा हब बनू पहातो आहे.
- गतवर्षी भारतात मोबाईल फोनचे उत्पादन करणारी ३८ नवी केंद्रे भारतात सुरू झाली. त्यातली ११ दिल्लीजवळ नोएडात आहेत. येत्या काही वर्षात भारताचे रंगरूप डिजिटल क्रांती बदलून टाकणार आहे, असा विश्वास रविशंकर प्रसादांनी व्यक्त केला.

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹सामुदायिक शेततळ्यांसाठी राज्याला 50 कोटी

राष्ट्रीय कृषी विकास योजना ; यंदा पाच प्रकल्पांसाठी 237 कोटींची मंजुरी
सोलापूर - राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून 2016 - 17 या आर्थिक वर्षासाठी पाच प्रकल्पांची निवड केली आहे . त्यामध्ये सामुदायिक शेततळ्यांसह पाच प्रकल्पांचा समावेश आहे . सामुदायिक शेततळ्यांसाठी राज्यासाठी 50 कोटी रुपयांची तरतूद केली आहे . या योजनेतील पाच प्रकल्पांसाठी 237 कोटी रुपयांची तरतूद केली आहे . त्याबाबतचा आदेश सरकारने काढला आहे .

राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून सामुदायिक शेततळ्यांसह कांदाचाळ , संरक्षित शेती प्रकल्प , शेततळ्यास प्लॅस्टिक अस्तरीकरण प्रकल्प , महात्मा फुले जलभूमी संधारण अभियान ( जलयुक्त शिवार मोहिमेसाठी ) या नव्या पाच प्रकल्पांना सरकारने मंजुरी दिली आहे . चालू वर्षात यासाठी देण्यात आलेला 237 कोटी रुपयांचा निधी खर्च करण्याचे बंधनही कृषी विभागावर घातले आहे . या योजनेतून मंजूर झालेल्या प्रकल्पांसाठी केंद्राचा 60 , तर राज्याचा 40 टक्के हिस्सा असेल.

दोन वर्षांपूर्वी शंभर टक्के अनुदानावर सामूहिक शेततळ्यासाठी कृषी विभागाने योजना सुरू केली होती . त्या योजनेला शेतकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला होता . त्या पार्श्वभूमीवर यंदाच्या वर्षी शंभर टक्के अनुदानावर सामुदायिक शेततळ्यांसाठी 50 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे . सोलापूर , नगर , नाशिक, धुळे, सांगली, सातारा या जिल्ह्यांतील शेतकऱ्यांची सामुदायिक शेततळ्यासाठी मोठ्या प्रमाणात मागणी असते . त्यामुळे यासाठी आणखी निधीची तरतूद करणे अपेक्षित होते .

या योजनेतून 50 टक्के अनुदानावर शेतकऱ्यांना कांदाचाळीचा प्रकल्प उभारता येणार आहे . त्यासाठी 27 कोटींची तरतूद आहे . 50 टक्के अनुदानावर संरक्षित शेती प्रकल्प करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी 50 कोटींची तरतूद केली आहे . शेततळ्याला प्लॅस्टिकचे अस्तरीकरण करण्यासाठी 50 टक्के अनुदान देण्यात येईल . त्यासाठी 35 कोटी रुपये मंजूर केले आहेत . महात्मा फुले जल भूमी संधारण अभियानातून राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांना 50 टक्के अनुदान देण्यात येईल . त्यासाठी 75 कोटी रुपयांची तरतूद केली आहे .

सामुदायिक शेततळ्यासाठी शंभर टक्के अनुदान

राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून सुरू करण्यात येणाऱ्या या पाच प्रकल्पांमध्ये सामुदायिक शेततळे व महात्मा फुले जल भूमी संधारण अभियानासाठी शंभर टक्के अनुदान देण्यात येईल . उर्वरित तीन प्रकल्पांसाठी शेतकऱ्यांना 50 टक्के अनुदान देण्यात येणार आहे .

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹' सर्जिकल स्ट्राईक' म्हणजे नेमके काय ?

श त्रू देशाच्या हद्दीत प्रवेश करून आपल्या विरोधात सुरू असलेल्या कारवाया नष्ट करणे म्हणजे ' सर्जिकल स्ट्राईक ' . ' सर्जिकल स्ट्राईक ' चा अत्यंत कमी वेळासाठी वापर केला जातो . अशा प्रकारची कारवाई करायची असेल तर हवाई दलाची परवानगी घ्यावी लागते . अमेरिकेने 2003 मध्ये ' सर्जिकल स्ट्राईक ' चा वापर करून इराक युद्धादरम्यान बगदादमध्ये बॉम्बद्वारे हल्ले केले होते . शिवाय , सिरीयाने सद्दाम हुसैन यांच्या विरोधात ' सर्जिकल स्ट्राईक ' केले होते .

' सर्जिकल स्ट्राईक ' ही विशिष्ट भागावरच केली जाते. हल्ल्याचे नियोजन करताना सर्व बाबींचा विचार केला जात असून ही कारवाई रात्रीच्या वेळीच केली जाते. प्रत्येक कारवाई नियोजनाप्रमाणे केली जाते अन् घड्याळाच्या काट्यावरच ही कामगिरी पार पडते . भारतीय लष्कराने म्यानमारमाध्ये घुसून अशा प्रकारची कारवाई केली होती . भारताच्या पॅरा कमांडोने एका तासात 40 हून अधिक दहशतवाद्यांना ठार केले होते .
भारतीय लष्कराने आज केलेल्या ' सर्जिकल स्ट्राईक ' ची योजना सात दिवसांपासून सुरू होती . भारताने केलेल्या या कारवाईत 38 दहशतवादी तर 9 पाकिस्तानचे सैनिक ठार झाले आहेत.

' सर्जिकल स्ट्राईक ' ची वैशिष्ट्ये -

👉भारतीय लष्कराची हेलिकॉप्टर 12 . 30 वाजता पाकव्याप्त काश्मीरमध्ये दाखल.
👉पाकव्याप्त काश्मीरमध्ये दोन किलोमीटर आंतर आतमध्ये जाऊन कारवाई .
👉भारतीय कमांडो दहशतवादी तळापर्यंत पायी गेले .
👉दहशतवाद्यांच्या सात तळांवर हल्ले करून नष्ट केले.
👉भिंबर , लीपा , केल , हॉटस्ट्रिंगमधील दहशतवादी नष्ट .
👉पहाटे 4 . 30 वाजेपर्यंत कारवाई चालली .
👉' सर्जिकल स्ट्राईक ' पूर्ण करून जवान परत .

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹' पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवादी मारले '

नवी दिल्ली - पाकव्याप्त काश्मीरमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ ( एलओसी ) दहशतवादी एकत्र येऊन घुसखोरी करण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाल्यानंतर भारतीय लष्कराकडून सर्जिकल स्ट्राईक ( नियंत्रित हल्ले) करण्यात आल्याची माहिती महासंचालक ( लष्करी कारवाई ) लेफ्टनंट जनरल रणबीर सिंग यांनी दिली .

उरी येथील लष्करी तळावर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 17 जवान हुतात्मा झाल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे . या पार्श्वभूमीवर लष्कर आणि संरक्षण मंत्रालयाकडून आज ( गुरुवार) पत्रकार परिषद घेण्यात आली . या परिषदेत रणबीरसिंग यांनी पाकव्याप्त काश्मीरमधील हल्ल्यांबाबत माहिती दिली .

रणबीरसिंग म्हणाले , '' सीमेजवळ दहशतवादी एकत्र आल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर भारतीय सैन्याकडून सर्जिकल स्ट्राईक करण्यात आले . माझी याबाबत पाकिस्तानच्या महासंचालकांशी चर्चा झाली असून , त्यांना या कारवाईची माहिती दिली आहे . सीमेवरून सतत होत असलेली घुसखोरी हे काळजी करण्यासारखे आहे . पाकविरोधात भारताकडे अनेक पुरावे आहेत. जानेवारी 2004 मध्ये पाकिस्तानने आश्वासन दिले होते की दहशतवाद्यांना पाकिस्तानच्या भूमीचा वापर करू देणार नाही . पण , पाकिस्तानकडून हे आश्वासन पाळण्यात येत नाही . जम्मू काश्मीरमध्ये सीमेवरून घुसखोरीचे प्रमाण वाढले आहे . पुँछ आणि उरी याची उदाहरणे आहेत. भारतीय जवानांनी 20 घुसखोरीचे कट उधळून लावले आहेत. आम्ही सीमेवरून घुसखोरी होऊ देणार नाही . पाकिस्तानी सैन्याने आमची मदत करावी , तरच आपण दहशतवादी कटांना उधळून लावू . आम्ही उरी हल्ल्यात ठार झालेल्या दहशतवाद्यांचे डीएनए देण्याची तयारी पाकिस्तानला दर्शविली आहे . ''

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹तेल उत्पादन कमी करण्याचा ' ओपेक ’ चा निर्णय

अल्जायर्स : कच्च्या तेलाचे उत्पादन प्रतिदिन 7 लाख 50 हजार बॅरलपर्यंत कमी करण्याचा निर्णय ' ओपेक ' या तेल उत्पादक देशांच्या संघटनेने घेतला आहे . या निर्णयामुळे कच्च्या तेलाच्या भावात आंतरराष्ट्रीय बाजारात गुरुवारी पाच टक्के वाढ झाली.

अल्जायर्स येथे सुरू असलेल्या ' ओपेक ' च्या बैठकीत कोणताही तोडगा निघण्याची आशा आंतरराष्ट्रीय बाजाराला वाटत नव्हती . यातच अनपेक्षितपणे ' ओपेक "ने तेल उत्पादन घटविण्याचा निर्णय घेतल्याने तेलाचे भाव वाढले . लंडनमध्ये ब्रेंट नॉथ सी क्रूड तेलाचा भाव प्रतिबॅरल 2. 72 डॉलरने वाढून 48 . 69 डॉलरवर गेला . न्यूयॉर्कच्या वेस्ट टेक्सास इंटरमिजिएटचा भाव प्रतिबॅरल 2. 38 डॉलरने वाढून 47 . 05 डॉलरवर पोचला. ' ओपेक ' चे सदस्य देश जगभरातील कच्च्या तेलापैकी 40 टक्के उत्पादन करतात. नोव्हेंबरपासून त्यांनी प्रतिदिन 3 . 25 कोटी बॅरलपर्यंत उत्पादन कमी करण्यावर सहमती दर्शविली आहे .

तेलाचे भाव 2014 च्या मध्यापासून निम्म्यापेक्षा अधिक घसरले आहेत. भावातील घसरण रोखण्यासाठी उत्पादन घटविण्याच्या पर्यायावर मागील काही काळ चर्चा सुरू होती . मात्र याला ' ओपेक ' मधील काही देशांचा आक्षेप होता . आता या निर्णयावर एकमत झाल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव वाढून स्थिरता येणार आहे .

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹गुरूच्या युरोपा या चंद्रावर पाण्याच्या वाफा

गुरूच्या युरोपा या चंद्रावर पाण्याच्या वाफा असल्याचे दिसून आले असून नासाच्या हबल अवकाश दुर्बीणीच्या मदतीने हे संशोधन करण्यात आले आहे. या चंद्रावर सूक्ष्मजीवसृष्टी असण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. अॅस्ट्रॉफिजिकल जर्नलमध्ये हे संशोधन प्रसिद्ध झाले असून युरोपाच्या संशोधनासाठी जर यान पाठवले तर तेथील काही मैलांच्या प्रदेशातील बर्फाचे उत्खनन न करताही महासागराचे निरीक्षण करता येईल. नासाचे सहायक प्रशासक जॉफ योडर यांनी सांगितले की, युरोपा चंद्रावरील सागर हा जीवसृष्टीस पोषक असू शकतो. तेथील पाण्याच्या वाफांमुळे त्याबाबतच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

गुरूच्या ६७ चंद्रांपैकी युरोपा हा सर्वात मोठा चंद्र असून २०१३ च्या अखेरीस तेथे पाण्याच्या वाफा हबल दुर्बीणीला दिसून आल्या होत्या. वैज्ञानिक जगतात हा उत्कंठावर्धक शोध मानला जात आहे. पाण्याच्या वाफा २०० कि.मी. उंचीवर जातात. त्यामुळे तेथे पाऊसही पडतो. स्पेस टेलिस्कोप सायन्स इन्स्टिटय़ूटचे विल्यम स्पार्कस यांनी सांगितले की, पाण्याच्या वाफांचे प्रवाह बोटांच्या आकाराचे पण मोठे दिसतात. युरोपावर वातावरण आहे का हे शोधण्याचा या मोहिमेचा हेतू होता. युरोपा चंद्राभोवती पातळ वातावरण असून त्यात गुरूचा प्रकाश रोखण्याची क्षमता आहे. त्यामुळे सावलीसारखे दृश्य दिसते. युरोपा गुरूसमोरून तीन वेळा तरी जातो. पंधरा महिने तो गुरूसमोरून जात असताना निरीक्षण केले असता त्यात पाण्याच्या वाफा दिसल्या. जर हा निष्कर्ष खरा ठरला तर पाण्याच्या वाफा असलेला तो सौरमालेतील दुसरा चंद्र असणार आहे. दरम्यान नासा युरोपा चंद्रावर संशोधनासाठी यान पाठवणार असून त्यात पाण्याच्या वाफांच्या शक्यतेचा उलगडा होईल.

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹प्रतापराव पवार यांना महर्षी पुरस्कार जाहीर

पुणे - सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल पुणे नवरात्रौ महोत्सवातर्फे यंदाचा " महर्षी पुरस्कार ' " सकाळ ' चे अध्यक्ष प्रतापराव पवार यांना जाहीर झाला आहे . माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या हस्ते गुरुवारी ( ता. 6 ) हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल . गणेश कला क्रीडा रंगमंच येथे सायंकाळी सहा वाजता हा कार्यक्रम होणार आहे .

पुरस्कार वितरण सोहळ्याला माजी आमदार उल्हास पवार , मोहन जोशी उपस्थितीत राहणार आहेत, अशी माहिती महोत्सवाचे अध्यक्ष आबा बागूल यांनी दिली . श्री लक्ष्मीमातेची चांदीची प्रतिमा , मानपत्र , स्मृतिचिन्ह , शाल आणि श्रीफल असे पुरस्काराचे स्वरूप आहे . यापूर्वी भारतरत्न पंडित भीमसेन जोशी , पं. जसराज , शिल्पकार बी. आर. खेडकर , शास्त्रज्ञ डॉ . रघुनाथ माशेलकर , डॉ . विजय भटकर यांना या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे .
महोत्सवाचे यंदा 22 वे वर्ष असून , 1 ते 11 ऑक्टोबर या कालावधीत हा महोत्सव होणार आहे .

पवार हे उद्योगांशी संबंधित अनेक कंपन्यांचे संचालकपद भूषवीत आहेत. देशातील विविध वृत्तपत्र संस्थांचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले असून , वर्ल्ड असोसिएशन ऑफ न्यूजपेपर्समध्येही त्यांनी देशाचे प्रतिनिधित्व केले आहे . ऑडिट ब्यूरो ऑफ सर्क्युलेशन ( एबीसी ) या संस्थेच्या कार्यकारिणीवर त्यांची नुकतीच निवड झाली आहे .

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹औद्योगिक वापरासाठीच्या नैसर्गिक वायू दरात कपात

नवी दिल्ली : औद्योगिक वापरासाठीच्या नैसर्गिक वायूच्या दरात केंद्र सरकारने आज ( शुक्रवार) 18 टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला आहे . मागील 18 महिन्यांतील ही चौथी दरकपात आहे . नैसर्गिक वायूच्या दरात कपात झाल्याने घरगुती गॅसच्या दरातही कपात होण्याची शक्यता आहे .

ऊर्जा निर्मिती, खतनिर्मिती आणि सीएनजी पुरवठ्यासह अन्य औद्योगिक वापरासाठी लागणाऱ्या नैसर्गिक वायूच्या दरात 2 . 5 डॉलर प्रति दशलक्ष ब्रिटिश थर्मल युनिट ( एमएमबीटीयू) कपात करण्यात आली आहे . सरकारी मालकीची ओएनजीसी आणि रिलायन्स इंडस्ट्रीज यांच्या तेल क्षेत्रातून मिळालेल्या नैसर्गिक वायूच्या दरात 2 . 5 डॉलर प्रति एमएमबीटीयू कपात पुढील सहा महिन्यांसाठी करण्यात आली आहे . सध्या हा दर 3 . 06 डॉलर प्रति एमएमबीटीयू असून , ही दरकपात 1 ऑक्टोबरपासून लागू होणार आहे . वायू दर निश्चितीच्या नव्या धोरणाला केंद्र सरकारने ऑक्टोबर 2014 मध्ये मंजुरी दिली होती . या धोरणानुसार दर सहा महिन्यांनी नैसर्गिक वायूच्या दराचा आढावा घेतला जातो .

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹सार्क परिषदेवर श्रीलंकेचाही बहिष्कार

कोलंबो - भारताबरोबरच , अफगाणिस्तान, बांगलादेश , भूतान पाठोपाठ श्रीलंकेनेही पाकिस्तानमध्ये होणाऱया सार्क परिषदेवर बहिष्कार घातला आहे . सध्याच्या दक्षिण आशियाई देशांमधले वातावरण बघता सार्कमध्ये सहभागी होण्याची इच्छा नसल्याचे श्रीलंकेने आज ( शुक्रवार) म्हटले आहे .
परराष्ट्र मंत्रालयाने प्रसिद्धीसाठी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की , ' दक्षिण आशियाई देशांमधले परस्पर सहकार्य यशस्वी होण्यासाठी शांतता व सुरक्षा हे घटक महत्वाचे आहेत. सार्कचा संस्थापक सदस्य या नात्याने प्रादेशिक सहकार्यासाठी कटिबद्ध आहोत . आम्ही सर्व प्रकारच्या दहशतवादाचा निषेध करतो . '

दहशतवादाला प्रोत्साहन देत भारताला सातत्याने डिवचण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाकिस्तानला यामुळे जोरदार धक्का बसला आहे . भारतासह पाच देशांनी पाकिस्तानात नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या दक्षिण आशियाई देशांच्या ( सार्क ) शिखर परिषदेवर बहिष्कार टाकल्यानंतर ही परिषदच रद्द झाल्यात जमा आहे . आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर पाकिस्तानला वेगळे पाडण्याच्या भारताच्या रणनीतीसाठी हे मोठे यश मानले जात आहे . एका सदस्य देशाने जरी परिषदेतून माघार घेतली तर परिषद पुढे ढकलली जाते किंवा रद्द होते . पाकिस्तानमध्ये 9 आणि दहा नोव्हेंबरला सार्क परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे . मात्र, सध्याच्या परिस्थितीत भारताने बहिष्कार टाकल्यानंतर ही परिषद रद्द झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे .

प्रादेशिक सहकार्यासाठी दक्षिण आशियाई संघटना ( सार्क ) 1985 मध्ये स्थापन झाली असून , यामध्ये भारतासह अफगाणिस्तान, बांगलादेश , भूतान , मालदीव , नेपाळ , पाकिस्तान आणि श्रीलंका हे देश सदस्य आहेत.

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹व्हिक्टोरियाच्या निवडणुकीत विक्रमी संख्येने भारतीय उमेदवार

मेलबर्न - ऑस्ट्रेलियामध्ये व्हिक्टोरिया येथे पुढील महिन्यात होणाऱ्या कौन्सिलरच्या निवडणुकीसाठी विक्रमी संख्येने भारतीय वंशाचे उमेदवार रिंगणात उतरले आहेत. भारतीय वंशाच्या नागरिकांची सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या व्हिक्टोरिया राज्यातील 78 कौन्सिलच्या 637 कौन्सिलरच्या जागेसाठी व्हिक्टोरिया निवडणूक आयोगाकडे एकूण दोन हजार 135 जणांचे उमेदवारी अर्ज आले आहेत. यात 50 पेक्षा अधिक भारतीय वंशाचे उमेदवार त्यांचे नशीब आजमावणार असून , एवढ्या संख्येने भारतीय वंशाचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची ही पहिलीच वेळ आहे .

व्हिक्टोरियातील अन्य शहरांच्या तुलनेत व्हिन्डम शहर कौन्सिलमध्ये सर्वाधिक 14 भारतीय वंशाचे उमेदवार रिंगणात आहेत. व्हिन्डम शहर कौन्सिलच्या 2012 मध्ये झालेल्या निवडणुकीत भारतीय वंशाचे गौतम गुप्ता आणि इंताज खान हे दोघे निवडून आले होते . व्हिन्डमचे महापौरपद भूषविलेले आणि यंदा पुन्हा निवडणूक लढवित असलेले गुप्ता म्हणाले , ' कोणत्याही समाजाला प्रतिनिधित्वासाठी ऑस्ट्रेलियातील राजकारणात मुभा आहे . आपण भारतीय म्हणून या निवडणुकीत उतरतो. प्रचारासाठी अनेक स्थानिक प्रश्न आहेत. औद्योगिक विकासाबरोबरच, दिवाळी आणि होळीसारखे सण येथे सर्वजण एकत्रितपणे साजरे करतात . ही परंपरा आम्ही कायम ठेवणार आहोत . ''

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹इस्रोच्या 'आकाशातील डोळ्या'ची लष्कराला मदत
.
पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवादी तळांवर केलेल्या हल्ल्यांसाठी भारतीय लष्करानं भारतीय अंतराळ संशोधन संस्थेची - इस्रोची मदत घेतली होती. या धडक कारवाईत, 'आकाशातील डोळा' मानल्या जाणाऱ्या कार्टोसॅट उपग्रहाद्वारे मिळालेल्या हाय-रेझोल्युशन प्रतिमांचा खूपच फायदा झाला. एखाद्या मोठ्या 'ऑपरेशन'साठी कार्टोसॅट उपग्रहाची मदत घेतल्याची ही पहिलीच वेळ आहे.
.
लष्कराला हव्या त्या भूभागाचे फोटो पुरवण्याचं महत्त्वपूर्ण काम इस्रोचं पथक करत असतं. कार्टोसॅट इमेजद्वारे त्यांना विशिष्ट भूभागाचा पूर्ण अंदाज येतो आणि त्यादृष्टीनं रणनीती आखता येते. 'कार्टोसॅट-२ सी'मुळे भारतीय लष्कराची पाळत ठेवण्याची आणि शत्रूच्या हालचालींची माहिती मिळवण्याची क्षमता चांगलीच वाढली आहे. ०.६५ मीटरच्या हाय-रेझोल्युशन प्रतिमा या उपग्रहामुळे मिळू लागल्या आहेत. गेल्या आठवड्यात असे अनेक फोटो इस्रोकडून संरक्षण खात्याला पाठवण्यात आल्याचं सूत्रांकडून कळतं. दहशतवाद्यांचे तळ ज्या भागात होते, प्रामुख्याने तिथले (एरिया ऑफ इंटरेस्ट) फोटो लष्कराने मागवले होते.
दरम्यान, अंतराळातून आलेल्या फोटोंवर हैदराबाद येथील नॅशनल रिमोट सेन्सिंग सेंटरमध्ये काम केलं जातं. अस्पष्ट फोटो स्वच्छ-स्पष्ट करून ते लष्कराला पाठवले जातात.

'कार्टोसॅट-२ सी'कडून संवेदशनशील प्रदेशातील व्हिडिओ रेकॉर्डिंगही मिळवता येत असल्यानं लष्कराची मोठीच सोय झाली आहे. गेल्या जून महिन्यातच हा उपग्रह अवकाशात पाठवण्यात आला होता. त्याबद्दल इस्रोला दाद द्यावीच लागेल.

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹भारताचा विकासदर सात टक्क्यांहून अधिक

चालू आर्थिक वर्षात भारत विकासदराच्या बाबतीत चीनपेक्षा पुढे राहील, असा विश्वास आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (आयएमएफ) व्यवस्थापकीय संचालक क्रिस्तिन लगार्ड यांनी व्यक्त केला. त्यांच्या मते चालू आर्थिक वर्षात भारताचा विकासदर सात टक्क्यांपेक्षा अधिक राहील. तर, चीनचा विकासदर ६ टक्क्यांवर राहील.
.
लगार्ड यांच्या मते चालू आर्थिक वर्षासाठी अमेरिकेच्या विकासदराचे अनुमान कमी राहण्याची शक्यता आहे. पुढील आठवड्यात आयएमएफ आणि जागतिक बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा असून, त्यापूर्वी लगार्ड यांनी केलेल्या विधानांना महत्त्व प्राप्त झाले आहे. भारत आणि चीनमध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक सुधारणा घडवून आणण्यात येत आहेत. त्यामुळे दोन्ही देशांच्या विकासदराचा वेग चांगला राहण्याची शक्यता आहे, असेही लगार्ड यांनी स्पष्ट केले.

यापूर्वी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने जुलैमध्ये पहिल्या तिमाहीतील वाढीच्या आधारावर अमेरिकेच्या विकासदराचे अनुमान २.४ टक्क्यांवरून २.२ टक्क्यांवर आणले होते. लगार्ड यांच्या मते याच कालावधीत ब्राझील आणि रशियानेही विकास आणि आर्थिक सुधारणांमध्ये मोठ्या प्रमाणावर बदल घडवून आणले होते.

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹आशिया कप: भारताला जेतेपद

चुरशीच्या अंतिम सामन्यात शेवटच्या मिनिटाला निर्णायक गोल डागून बांगलादेशचा पराभव करत भारताने १८ वर्षांखालील मुलांच्या आशिया कप हॉकी स्पर्धेचे जेतेपद पटकावले आहे. उपांत्य सामन्यात पाकिस्तानला नमवून भारताने अंतिम फेरीत प्रवेश केला होता.

भारताला सलामीच्या लढतीत बांगलादेशकडून ४-५ ने पराभव पत्करावा लागला होता. त्या पराभवाचा वचपा काढत अंतिम सामन्यात भारताने बांगलादेशवर ५-४ अशा गोलफरकाने विजय मिळवला.

भारताने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ केला. चौथ्या मिनिटालाच गुरजंत सिंहने गोल डागून भारताला १-० अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर १४व्या मिनिटाला अजितकुमार पांडेने दुसरा गोल डागला तर पाठोपाठ २०व्या मिनिटाला परमिंदर सिंहने तिसरा गोल डागला आणि ३-० अशी आघाडी घेत भारताने सामन्यावर घट्ट पकड बसवली.

दुसऱ्या सत्रात मात्र बांगलादेशने जोरदार कमबॅक केला. काही मिनिटांच्या फरकाने बांगलादेशने दोन गोल डागले. त्यानंतर भारत आणि बांगलादेश दोन्ही बाजूने अधिक आक्रमक खेळ पाहायला मिळाला. यादरम्यान भारताकडून एक तर बांगलादेशकडून आणखी दोन गोल डागण्यात आले आणि ४-४ अशी बरोबरी झाली. शेवटच्या मिनिटापर्यंत सगळ्यांचीच उत्कंठा ताणली गेली होती. मात्र सामन्याचा निर्धारित वेळ संपायला अवघे २० सेकंद उरले असतानाच अभिषेकने चेंडू गोलपोस्टमध्ये डागला आणि भारताने विजयावर शिक्कामोर्तब केले.

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹डिजिटल लॉकरमध्ये महाराष्ट्र टॉपर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरु केलेल्या ‘डिजिटल इंडिया’ कार्यक्रमांतर्गत ‘डिजिटल लॉकर योजने’चा देशात सर्वाधिक लाभ घेण्यात महाराष्ट्र आघाडीवर आहे. देशातील सर्वांसाठी असलेल्या या सेवेमुळे वेळ व कष्ट वाचतोच, शिवाय सर्वांत महत्त्वाचे म्हणजे या लॉकरमुळे कागदपत्रांची सॉफ्टकॉपी आपणास हवी तेव्हा मिळू शकते. अवघ्या दीड वर्षात २६ लाख ५९ हजार १२२ इतके नागरिक हे लॉकर वापरत आहेत.

एकप्रकारे ‘इलेक्ट्रॉनिक तिजोरी’च असलेल्या या लॉकरचा वापर मोठ्या प्रमाणावर होत आहे. फेब्रुवारी २0१५ मध्ये पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते या योजनेचा प्रारंभ झाला. सध्या डिजिटलचे युग असल्याने सर्वच क्षेत्रांत पेपरलेस कामकाजाला प्राधान्य दिले जात आहे. त्यामुळे जन्मदाखल्यापासून शालेय, पदवीची प्रमाणपत्रे, महसूल विभागातील दस्तावेज, आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट, आदी अनेक महत्त्वाची कागदपत्रे जपून ठेवणे आणि सहजासहजी उपलब्ध करणे यामुळे शक्य होणार आहे. यासाठीच ‘डिजिटल लॉकर’ची सोय अतिशय फायदेशीर ठरली आहे.

‘डिजिटल लॉकर’चा वापर करण्यात महाराष्ट्र आघाडीवर असून, पंजाब सर्वांत कमी म्हणजे १३ व्या स्थानावर आहे. केवळ ४२,७९0 इतकी पंजाबमधील ‘डिजिटल लॉकर’ वापरणाऱ्या नागरिकांची नोंद आहे. तर शेजारी हरियाणात ६५,000 इतकी नोंद आहे. महाराष्ट्राने मात्र आघाडी घेतली असून, १.२ लाख नागरिकांनी नोंद केली असून, मुंबई राज्यात अव्वल स्थानावर आहे.
मेल हॅक होण्याचे प्रमाण वाढल्याने ई-मेलवर कागदपत्रे ठेवून धोका पत्करण्यापेक्षा शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर कागदपत्रे डाउनलोड करून निश्चिंत राहण्याकडे अनेकांचा कल वाढला आहे.

कसे उघडावे अकाऊंट
http://digitallocker.gov.in या वेबसाईटवर आधार क्रमांक आणि आपला मोबाईल क्रमांक लॉग इन करून खाते उघडता येते. मूळ कागदपत्रे स्कॅन करून या वेबसाईटवर डाउनलोड करता येतात. १0 एमबी ते १ जीबीपर्यंत डाटा अपलोड करण्याची क्षमता यामध्ये उपलब्ध आहे.

देशातील स्थिती
नोंदणीकृत सदस्यसंख्या - २६,५९,१२२
अपलोड कागदपत्रांची संख्या-३२,७७,११७
लॉकरमध्ये उपलब्ध जागा-३४,६१,२९,५९५

डिजिटल लॉकर म्हणजे काय?
आपल्या मूळ कागदपत्रांच्या छायांकित प्रती सुरक्षित ठेवण्यासाठी केंद्र शासनाने सुरु केलेली योजना म्हणजे डिजिटल लॉकर होय. इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी विभागाने सुरु केलेल्या या लॉकरमध्ये एका क्लिकवर आपली वैयक्तिक माहिती उपलब्ध होवू शकते. अतिशय सुरक्षित आणि सुलभ पध्दतीने कधीही आणि कोठेही लॉकर हाताळता येतो.

वयोगटानुसार सदस्यसंख्या
१0 वर्षांखालील : १६,७६६
११ ते २0 वयोगट : २,४५,0३९
२१ ते ३0 वयोगट : ४,७६,७४७
३१ ते ४0 वयोगट : ३,२१,९७२
४१ ते ४५ वयोगट : १,७४,३१२
५१ ते ६0 वयोगट : ८,९१00
६१ ते ७0 वयोगट : ३,७२६७

कोणत्या प्रकारचे दस्तावेज
ओबीसी प्रमाणपत्र -१२७६
हिंदू मॅरेज प्रमाणपत्र - ९८७
ट्रान्सफर प्रमाणपत्र - १७२५
विवाह प्रमाणपत्र - १८२५
आधार कार्ड - १,३१,५२३
शासकीय आयडी कार्ड - ८0५३
बारावी प्रमाणपत्र - ४१,७७९
आयडेंटिफिकेशन प्रमाणपत्र - १0५८
इनकम प्रमाणपत्र - २८२१
इलेक्ट्रिसिटी बिल - ३३५३
ड्रायव्हिंग लायसन्स - ५0,५२१
जन्म दाखला - ११,४७४
पदवी प्रमाणपत्र - ६00२३
दहावी प्रमाणपत्र - ४४,३७७
निवडणूक ओळखपत्र - ५५,२७५
रेशन कार्ड - १५,८0४
पॅन कार्ड - ७९,६७७
पासपोर्ट - ३७,६५४

राज्यात मुंबईतील सदस्य सर्वाधिक
मुंबई - २४,७५३
ठाणे - २0,६२0
पुणे - १७,१३२
चंद्रपूर - ८,८८९
नागपूर - ६,६७0
सांगली - ६,३६६
नाशिक - ६,0७८
लातूर - ४,६५४
औरंगाबाद - ४,१२१
अकोला - ३,९४३
जळगाव - ३,७८२
सातारा - ३,७२९
अमरावती - ३,७१४
कोल्हापूर - ३,६५६
रत्नागिरी - ८३९
सिंधुदुर्ग - ७१0

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत विघ्नेशचे कांस्यपदक

नुकत्याच पार पडलेल्या पोलंड येथील आंतरराष्ट्रीय सिरीझ अजिंक्यपद स्पर्धेत ठाणे शहरातील विघ्नेश देवळेकरने कांस्यपदकाला गवसणी घातली. स्पर्धेत पुरुष दुहेरीत दिल्लीच्या रोहन कपूरसह खेळताना विघ्नेशने डेन्मार्कच्या मानांकित क्रितोफर क्नुडसेन-टॅबिस सुडेर जोडीचा २-० असा धुव्वा उडवला.

ठाणे महापालिकेच्या सय्यद मोदी बॅडमिंटन प्रशिक्षण योजनेत विघ्नेशने बॅडमिंटनचे धडे गिरवले. एकेरीत उल्लेखनीय कामगिरी केल्यानंतर दुहेरीत रोहनच्या साथीने त्याने खेळास सुरुवात केली. पोलंड स्पर्धेत विघ्नेश-रोहन जोडीने शानदार खेळाचे प्रदर्शन करत पहिल्या सेटमध्ये २१-१२ असा विजय मिळवत सामन्यात १-० अशी आघाडी घेतली.

 दुसऱ्या सेटमध्ये क्रितोफर-टॅबिस जोडीने योग्य समन्वय दाखवत काहीअंशी प्रतिकार केला. मात्र विघ्नेश-रोहन जोडीने आक्रमक स्मॅशच्या मदतीने त्यांचा प्रतिकार २१-१६ असा मोडीत काढत सामन्यात २-० अशा फरकाने विजय मिळवला व कांस्यपदकावर नाव कोरले.
नुकत्याच झालेल्या बेल्जिअम आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत देखील विघ्नेशने चांगला खेळ करत उपांत्यपूर्व सामन्यापर्यंत मजल मारली होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा