Post views: counter

Current Affairs November 2016 Part - 4


#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹बाल शांतता पुरस्कार ; अंतिम तिघांत केहकशाचा समावेश

दुबई - बालकांच्या हक्कांमध्ये सुधारणा घडविण्यात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या केहकशा बासू या मूळ भारतीय वंशाच्या मुलीची निवड यंदाच्या आंतरराष्ट्रीय बाल शांतता पुरस्कारासाठीच्या अंतिम तीन स्पर्धकांमध्ये करण्यात आली आहे .

या पुरस्कारासाठी जगभरातून 120 नावे पुढे आली होती . तज्ज्ञांनी त्यातून ही निवड केली . केहकशासह कॅमेरूनमधील दिवीना मालौम आणि सीरियातील मुझून अलमेल्लेहान यांचीही निवड झाल्याची घोषणा आंतरराष्ट्रीय बालहक्क संघटनेने केली आहे . शांततेसाठी नोबेल पुरस्कार प्राप्त मोहम्मद युनूस यांच्या हस्ते 2 डिसेंबर रोजी हॅंग्वे येथे या पुरस्काराचे वितरण होणार आहे .

केहकशा ही आठ वर्षांची असताना तिने पर्यावरणाच्या रक्षणासाठी एक मोहीम हाती घेतली होती . टाकाऊ वस्तूंपासून पुनर्निर्माण करण्याविषयी तिने मोठ्या प्रमाणात जनजागृती केली असून , यासाठी तिने ग्रीन होप नावाची एक संस्थाही स्थापन केलेली आहे . ही संस्था दहा देशांमध्ये कार्यरत असून , टाकाऊ वस्तू गोळा करणे , समुद्रकिनारे स्वच्छ ठेवणे आदी कामे तिच्या माध्यमातून होतात .

दिवीना या 12 वर्षांच्या मुलीने कॅमेरूनमधील मुलांमध्ये अराजक स्थिती, संभाव्य धोके यांबाबत मोठी जागृती केली असून , ती त्यांना शांतता प्रस्थापित करण्याचे धडेही देत आहे . याची दखल घेत तिची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे .

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹इंदिरा गांधी यांचे जन्मशताब्दी वर्ष सुरू

नवी दिल्ली : भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जन्मशताब्दी वर्षाची शनिवारी दिल्लीत सुरुवात झाली. जागतिक शांतता, न्याय्य अर्थव्यवस्था आणि
निःशस्त्रीकरणाचा पुरस्कार करणाऱ्या इंदिरा गांधी यांनी इतिहासातील अत्यंत अवघड कालखंडात देशाचे विधिलिखित निश्चित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली, अशा शब्दांत राष्ट्रपती प्रणव मुखर्जीं यांनी त्यांच्या स्मृतींना उजळा दिला, तर माझ्यासाठी इंदिरा गांधी ऐतिहासिक व्यक्तिमत्त्व आणि देशाच्या पंतप्रधान नव्हे तर माझ्या सासू, आई, मार्गदर्शक आणि मैत्रीण होत्या, अशी संवेदना सोनिया गांधी यांनी यावेळी व्यक्त केली.

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹मेक इन इंडियाला मिळणार चालना

काळ्या पैशाला मूठमाती देण्याच्या उद्देशाने मोदी सरकारने अंमलात आणलेल्या नोटाबंदीमुळे चिनी मालाचा बाजार पुरता कोसळला आहे. नोटाबंदी जाहीर केल्यानंतर दोनच दिवसांत चिनी मालाच्या किमती तीस टक्क्यांनी वाढल्याचे दिसून आले आहे. यामुळे चलनबदलाची ही मोहिम ‘मेक इन इंडिया’च्या पथ्यावर पडणार .

तीस टक्क्यांनी किमती वाढलेल्या चिनी वस्तू बाजारात नव्याने आलेल्या नाहीत. पूर्वीपासून बाजारात असलेल्या वस्तूंच्या किमतीत वाढ झाली आहे, असे व्यापाऱ्यांनी सांगितले. येत्या काही दिवसांत चिनी मालाच्या किमतीत पन्नास टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता असल्याचेही व्यापाऱ्यांनी नमूद केले.

 नोटाबंदीचा सरसकट फटका इलेक्ट्रॉनिक, हार्डवेअर, वस्त्रप्रावरणे, बूट आदी वस्तूंना बसला आहे. नोटाबंदीमुळे चिनी वस्तूंच्या किमती अचानक का वाढल्या या विषयी अर्थतज्ज्ञ खल करीत आहेत. दोन्ही देशातील व्यापाराशी संबंध येणाऱ्या व्यापाऱ्यांच्या मते नोटाबंदीमुळे हवाला व्यवहारांना लगाम घालण्यात यश आले आहे. यापूर्वी चीनमधून कर बुडवून माल देशात येत असे. त्यामुळे तो बाजारभावापेक्षा कितीततरी पटीने स्वस्त असे. मात्र, आता देशात येणाऱ्या चिनी मालाची देयके अधिकृतरित्या देण्यात येत असल्याने या व्यवहारांवर कर लावण्यात येत आहे. त्यामुळे हा माल महाग होत आहे.

देशात येणाऱ्या चिनी मालाच्या व्यवहारात हवालाची मोठी भूमिका राहिली आहे. त्यामुळे या मालाचे देण्यात आलेले पैसे काही क्षणांतच विदेशात पोहोचत असत.

 मात्र, भारताने जुन्या नोटांवर बंदी घातल्याने हवाला व्यवहार मोठ्या संकटात सापडले आहेत. चिनी वस्तूंचे दर वाढल्यामुळे त्यांच्या खरेदीविक्रीवर मोठा परिणाम झाला आहे. एकीकडे बाजार साफ तोंडावर आपटले असून, ग्राहकांकडे मोठ्या प्रमाणात रोखतेचा अभाव आहे. तर, दुसरीकडे नवीन माल महाग झाल्याने धंदा मंदावला आहे. बहुसंख्य घाऊक व्यापाऱ्यांनी व्यवसायाला रामराम ठोकला आहे.

‘मेक इन इंडिया’ला प्राधान्य हवे

चिनीमाल महागल्याचे भविष्यात दूरगामी परिणाम होण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. सरकारकडे कर भरावा लागत असल्याने या वस्तूंची खरेदी महागली आहे. एकीकडे सरकारकडून कर वाढल्याने उत्पादनांचे निर्मितीमूल्यही वाढले आहे. ‘ऑल इंडिया रेडिओ अँड इलेक्ट्रॉनिक्स’चे अध्यक्ष संजय नागपाल यांच्या मते केंद्र सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयाचा परिणाम दिसण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे उद्योगांनी आणि सरकारने मेक इन इंडियाला प्राधान्य देण्याची आवश्यकता आहे, असेही नागपाल यांनी स्पष्ट केले.

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹सिंधूचा 'सुपर' पराक्रम

रिओ ऑलिम्पिकमध्ये ऐतिहासिक कामगिरी करणारी भारताची रुपेरी कन्या पी व्ही सिंधूनं आज चायना ओपन सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेचं जेतेपद पटकावलं. विशेष म्हणजे, सुपर सिरीज स्पर्धा जिंकण्याची किमया तिनं पहिल्यांदाच केली आहे.

चायना ओपनच्या अंतिम सामन्यात सिंधूने चीनच्या सून यू हिचा २१-११, १७-२१, २१-११ असा पराभव केला. दुसऱ्या गेममध्ये धडाकेबाज खेळ करणाऱ्या सून यू हिला सिंधूनं शेवटच्या गेममध्ये साफ गारद करून टाकलं आणि 'सुपर'हिट विजय साकारला.

रिओ ऑलिंपिकमध्ये रौप्यपदक पटकाविणाऱ्या सिंधूला गेल्या दोन स्पर्धांत दुसऱ्या फेरीतच पराभवाला सामोरे जावे लागले होते.

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹धोक्याच्या यादीत नसलेल्या २०० पक्षी प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर

आययूसीएनची धोक्याची यादी ही २५ वर्षांपूर्वीच्या प्रक्रियाआधारे केली गेली

इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्वेशन ऑफ नेचर या संस्थेच्या धोक्याच्या यादीत नसलेल्या पक्ष्यांच्या २०० प्रजाती वेगाने विकसित होत असलेल्या सहा विकसित भागात नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत असे नवीन अभ्यासात म्हटले आहे.

 अमेरिकेतील डय़ूक विद्यापीठाच्या संशोधकांनी दूरसंवेदन माहितीच्या आधारे तयार केलेल्या जमीन वापराच्या नकाशाचा वापर यात केला आहे त्यात असे दिसून आले की, ब्राझीलमधील अॅटलांटिक जंगल, मध्य अमेरिका, कोलंबियातील वेस्टर्न अँडीज, सुमात्रा, मादागास्कर व आग्नेय आशियातील पक्ष्यांच्या ६०० प्रजातींचे अधिवास यात कमी झाले आहेत. या सहाशे प्रजातींपैकी १०८ प्रजाती सध्या आययूसीएनच्या धोक्याच्या यादीत आहेत. पण २१० प्रजाती वेगाने नष्ट होण्याच्या मार्गावर असून १८९ प्रजाती धोक्याच्या दिशेने वाटचाल करीत आहेत.

आययूसीएनची धोक्याची यादी ही २५ वर्षांपूर्वीच्या प्रक्रियाआधारे केली गेली असून त्यात जिओस्पॅटिअल तंत्रज्ञानाचा वापर केलेला नाही, असे डय़ूक विद्यापीठाचे स्टुअर्ट एल पिम यांनी सांगितले. फिंगरटिप, डिजिटल मॅप, जागतिक जमीन वापराच्या उपग्रह प्रतिमा ही आधुनिक साधने आता वापरण्यात आली आहेत.

पिम यांच्या मते धोक्याच्या यादीत आणखी पक्ष्यांचा समावेश असायला हवा. सध्याच्या निकषात प्रजातीच्या भौगौलिक क्षेत्राचा विचार केला जातो त्यामुळे अधिवासाचे बरेचसे क्षेत्र हे त्याच्या बाहेरच राहते, असे नतालिया पेन्युला यांचे म्हणणे आहे. काही पक्ष्यांच्या प्रजाती या जंगलांचा मध्यम भाग अधिवास म्हणून वापरतात, तर काही सखल भागात वास्तव्य करतात. कमी भौगोलिक क्षेत्रात ही अधिवास क्षेत्रे येत नाहीत. काही वेगळे निकष लावले, तर आता धोक्याच्या यादीत नसलेल्या अनेक प्रजाती अधिवासाअभावी धोक्याच्या यादीत येतात असे जैवविविधता संकेतस्थळाचे संचालक क्लिंटन जेटकिन्स यांनी सांगितले.

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹मंगळयानाने टिपलेले छायाचित्र नॅशनल जियोग्राफिक मासिकाच्या मुखपृष्ठावर

मंगळयान मोहिमेचे याआधी टाईम्स मासिकाकडूनही कौतुक

मंगळयानाद्वारे काढण्यात आलेल्या एका छायाचित्राला नॅशनल जियोग्राफिक या प्रसिद्ध मासिकाने मुखपृष्ठावर स्थान दिले आहे. दोन हजार रुपयाच्या गुलाबी नोटेला मासिकाच्या मुखपृष्ठावर स्थान मिळाल्यानंतर आता मंगळयानाच्या मोहिमेने भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. यासोबतच मंगळयानाने या आठवड्यात मंगळाच्या कक्षेत तीन वर्षे पूर्ण केली आहेत.

भारताच्या मंगळयान मोहिमेआधी जगभरातील देशांनी मंगळाच्या ५० पेक्षा अधिक मोहिमा केल्या आहेत. मात्र आतापर्यंत कोणालाही मंगळ ग्रहाचे मंगळयानाने काढलेल्या छायाचित्राइतके सुस्पष्ट छायाचित्र काढता आलेले नाही. मंगळयानात लावण्यात आलेल्या कमी किमतीच्या कॅमेऱ्याने मंगळ ग्रहाची अनेक छायाचित्रे टिपली आहेत. या छायाचित्रांमधील एका छायाचित्राला नॅशनल जियोग्राफिक मासिकाने मुखपृष्ठावर स्थान दिले आहे.

भारताने मंगळयान मोहिमेवर एकूण ४५० कोटी रुपये खर्च केले आहेत. या मोहिमेला भारताकडून ‘मार्स ऑर्बिट मिशन’ (एमओएम) असे नाव देण्यात आले आहे. २४ सप्टेंबर २०१४ रोजी भारताने मंगळयान अवकाशात सोडत इतिहास रचला. पहिल्याच प्रयत्नात मंगळ मोहिम यशस्वी करणारा देश हे बिरुद या मोहिमुळे भारताने पटकावले. २४ सप्टेंबरला हे मिशन यशस्वी झाल्यावर पंतप्रधान मोदींनी ‘एमओएमचे मंगळाशी मिलन’ असे म्हणत आनंद साजरा केला होता.

प्रतिष्ठीत टाईम्स मासिकाने मंगळयानाचा उल्लेख २०१४ च्या सर्वश्रेष्ठ कामगिरींमध्ये केला होता. मंगळयानामुळे भारताला अंतराळ क्षेत्रात अधिक प्रगती करण्याची संधी मिळेल, अशा शब्दांमध्ये जगभरातून भारताचे कौतुक केले होते. टाईम्स मासिकाने मंगळयान मोहिमेचा उल्लेख ‘द सुपरमार्ट स्पेसक्राफ्ट’ या शब्दांमध्ये केला होता. ‘आतापर्यंत कोणताही देश मंगळ ग्रहावर पहिल्या प्रयत्नात पोहोचू शकला नाही. अमेरिका, रशिया किंवा कोणत्याही युरोपीय देशाला आतापर्यंत ही कामगिरी जमलेली नाही. मात्र २४ सप्टेंबरला भारताने ही किमया साधली,’ अशा शब्दांमध्ये टाईम्स मासिकाने भारताच्या मंगळयान मोहिमेचे कौतुक केले होते.

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹‘स्वच्छ भारत’ मोहीम असूनही शहरांत ‘उघड्यावरच’

भारतात शहरांचे विस्तारीकरण भयंकर वेगाने होत असून जगात सर्वांत जास्त नागरी वसाहती भारतात असल्या तरी तिथे सुरक्षित आणि खासगी स्वच्छतागृहे नाहीत. त्यामुळे सरकारने स्वच्छ भारत मोहिमेला सर्वोच्च प्राधान्य दिले असले तरी लोकांना उघड्यावर शौचास जाणे बंद झालेले नाही.

ही माहिती वॉटरएड या जागतिक पातळीवरील अशासकीय संस्थेने अहवालात दिली. सुरक्षित, खासगी स्वच्छतागृहांशिवाय १५७ दशलक्ष लोक शहरी भागांत वास्तव्यास असून भारताचा याबाबतीत पहिला क्रमांक आहे. शहरी भागांतील ४१ दशलक्ष लोक उघड्यावर शौचास जातात, असे हा अहवाल म्हणतो.

वॉटरएड ही इंग्लडमधील संस्था असून ती सुरक्षित पाणी आणि आरोग्य यासाठी काम करते. या संस्थेने जागतिक पातळीवर स्वच्छतागृहांचे वार्षिक विश्लेषण करणारा ‘ओव्हरफ्लोर्इंग सिटीज द स्टेट आॅफ द वर्ल्डस् टॉयलेट्स २०१६’ अहवाल तयार केला असून तो १९ नोव्हेंबर या जागतिक स्वच्छतागृह दिनाच्या पूर्वसंध्येला प्रकाशित केला आहे. त्यात म्हटले आहे की अतिलोकसंख्येच्या नागरी भागांत आरोग्याच्या चांगल्या सोईसुविधांच्या अभावामुळे रोगराई तेथे झपाट्याने पसरत आहे.

भारतातील शहरे आणि गावांमध्ये दररोज निर्माण होणारी मानवी विष्ठा ही रोज आॅलिंपिक स्पर्धेसाठीच्या आठ पोहण्याचे तलाव किंवा आठ जंबोजेट विमाने भरतील एवढी आहे. भारतात शहरी भागात स्थलांतर वाढत आहे. ही गावे आणि शहरांची वाढ समान आणि विशिष्ट पातळीवर कायम राहिल्यासच देशाचे आरोग्य सुधारेल, हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत मोहिमेने ओळखले आहे, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

आज पश्चिम युरोपच्या लोकसंख्येइतकी म्हणजे साधारणत: ३८१ दशलक्ष भारताची लोकसंख्या वेगाने वाढणाऱ्या नागरी भागात राहात आहे तर १५७ दशलक्ष लोकांना सुरक्षित असे स्वच्छतागृहेच उपलब्ध नाहीत.

भारत सरकारने स्वच्छतेला प्राधान्य दिलेले असले तरी शहरांमध्ये स्वच्छतागृहांशिवाय वाढलेल्या वसाहतींची संख्या २००० वर्षांत २६ दशलक्षांनी वाढली आहे. शहरांच्या विस्तारीकरणाचा वेग हा भयंकर म्हणता येईल असा असल्याचे हा अहवाल सांगतो. (वृत्तसंस्था)

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹शरियानुसार बँकिंग सेवा सुरु करावी, आरबीआयचा अर्थमंत्रालयाकडे प्रस्ताव

शरियानुसार बँकिंग व्यवहार सुरु झाल्यास व्याजमुक्तीची संकल्पना पूर्ण होऊ शकते.

देशात सध्या चलन कलह सुरु असताना अग्रणी बँक असणाऱ्या ‘रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया’ने व्याज मुक्त बँकिंग सेवा पुरविण्यासाठी शरियानुसार बँक व्यवहार सुरु करावेत, असा प्रस्ताव मांडला आहे. देशातील बँकांनी आपल्या शाखेत ‘इस्लामिक खिडकी’ला स्थान द्यावे, असे प्रस्तावात नमुद करण्यात आले आहे. केंद्र आणि रिझर्व्ह बँक बऱ्याच दिवसांपासून इस्लामिक बँकिंग सुविधा सुरु करण्यासाठी प्रयत्नशील होते. आरबीआने यासंदर्भात अर्थ मंत्रालयाकडे इस्लामिक बँकिंगचा प्रस्ताव पाठवल्याचे समोर आले आहे.

रिझर्व्ह बँकेने शरिया बँकिंगचा प्रस्ताव मांडल्याची माहिती ‘पीटीआय’ वृत्तसमुहाला माहितीच्या अधिकारे प्राप्त झाली आहे. ‘पीटीआय’ वृत्तसमुहाला मिळाल्या माहितीनुसार, शरिया बँकिंग सुविधा सुरु करण्यासंदर्भात आरबीआयने अर्थ मंत्रालयाला पत्र पाठविले आहे. या पत्रामध्ये आरबीआयने इस्लामिक वित्तीय गुंतागूंत आणि शरिया बँकिंग विषयातील आव्हानांचा भारतीय बँकिंग क्षेत्राला अनुभव नसल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. पण धीम्या गतीने या बँकिंग सेवेला व्यवहारात आणले जाऊ जाऊ शकते, असेही आरबीआयने म्हटले आहे. अनुभवानुसार यामध्ये व्यापकता आणता येऊ शकते. असे आरबीआयला वाटते. इस्लाममधील शरियानुसार अर्थिक व्यवहारात व्याजाची वसुली करण्याचा सिद्धात नाही.

या पत्रातील उल्लेखानुसार, देशात व्याज मुक्त बँकिंग सुरु करायची झाल्यास इस्लामधील शरियानुसार व्यवहार करावे लागतील. व्याज मुक्त बँकिंग अन्य फंडामध्ये होऊ नयेत यासाठी व्याजमुक्तीसाठी स्वतंत्र खिडकी उघडावी लागेल, असे आरबीआयने म्हटले आहे. आरबीआयने मांडलेला हा प्रस्ताव अतंर्गत विभागातील शिफारशीच्या आधारावर बनविण्यात आला असून भारतात इस्लामिक बँकिंग सुविधा सुरु करण्यासाठी कायदे आणि नियमांची देखील चाचपणी करण्यात आली आहे. ही सेवा सुरु केल्यानंतर बँकिंग क्षेत्राला काय फायदा होईल यासंबंधी देखील आरबीआयने विश्लेषण अहवाल अर्थ मंत्रालयाकडे सुपुर्द केला आहे.

यापूर्वी शरिया बँकिंग प्रणालीच्या नियोजनाला राजकीय वर्तुळातून विरोध देखील करण्यात आला होता. २००८ मध्ये आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांच्या नेतृत्वाखालील अर्थिक सुधारणा समितीने देशामध्ये व्याज मुक्त बँकिंगची गरज असल्याचे म्हटले होते.

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹‘आयएनएस चेन्नई’ला नौदलाचे पहिले ‘कवच’!

स्वदेशी बनावटीच्या क्षेपणास्त्रविरोधी यंत्रणेच्या चाचण्या यशस्वी

गेल्या काही वर्षांत संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेमध्ये (डीआरडीओ)भारतीय नौदलाच्या युद्धनौकांना शत्रूपासून रोखणारे ‘कवच’ प्राप्त करून देणारे संशोधन सुरू होते. या ‘कवचा’चे सर्व पहिले प्रयोग ‘आयएनएस चेन्नई’ या, सोमवारी भारतीय नौदलात समारंभपूर्वक दाखल होणाऱ्या विनाशिकेवर करण्यात आले. त्याच्या सर्व चाचण्या यशस्वी झाल्यानंतर सर्वात पहिले ‘कवच’ही आता याच युद्धनौकेवर चढविण्यात आले आहे. आता यापुढे नौदलात दाखल होणाऱ्या सर्व युद्धनौकांनाही ‘कवच’प्राप्ती होईल!
शत्रूच्या युद्धनौका अथवा हवाई टेहळणीदरम्यान भारतीय युद्धनौका आढळल्यानंतर त्यांनी क्षेपणास्त्र डागल्यास युद्धनौकेचा हमखास बचाव करणारे क्षेपणास्त्रविरोधी क्षेपणास्त्र वापरण्याखेरीज दुसरा पर्याय आजवर नौदलाकडे उपलब्ध नव्हता. म्हणूनच गेली काही वर्षे ‘डीआरडीओ’तर्फे शत्रूच्या क्षेपणास्त्राला चकवा देणाऱ्या ‘कवच’ या नव्या चकवायंत्रणेची निर्मिती सुरू होती.

 शत्रूचे क्षेपणास्त्र येते आहे, हे लक्षात येताच ‘कवचा’मधून एक विशिष्ट आभासी असे काही डागले जाते की, त्यामुळे युद्धनौकेपासून दूर अंतरावर एक मोठी युद्धनौकाच असल्याचा आभासी ढग निर्माण होतो. क्षेपणास्त्राला अधिक मोठी युद्धनौकाच असल्याचा आभास आहे, हे लक्षात येत नाही आणि युद्धनौकेऐवजी त्या आभासी ठिकाणी जाऊन ते फुटते. परिणामी युद्धनौकेचा यशस्वी बचाव होतो, असे हे तंत्र आहे. भारतीय नौदल आणि डीआरडीओने या संदर्भातील सर्व चाचण्या ‘आयएनएस चेन्नई’च्या सागरी व शस्त्रास्त्र चाचण्यांदरम्यानच घेतल्या. या सर्व चाचण्यांच्या यशस्वीतेनंतर हे ‘कवच’ सर्वप्रथम याच विनाशिकेवर चढविण्याचा निर्णय झाला, अशी माहिती पश्चिमी नौदल मुख्यालयाचे प्रमुख व्हाइस अॅडमिरल गिरीश लुथ्रा यांनी दिली.

भारतीय नौदलाच्या ‘प्रकल्प१५अल्फा’ मध्ये कोलकाता वर्गातील गायडेड मिसाईल विनाशिकांची निर्मिती करण्यात आली. त्यातील ही तिसरी आणि अखेरची विनाशिका आहे, असे सांगून लुथ्रा म्हणाले की, या तीन विनाशिकांच्या प्रकल्पावर नौदलाने सुमारे साडेअकरा हजार कोटी रुपये खर्च केले आहेत. १६४ मीटर्स लांबीच्या या विनाशिकेचे वजन तब्बल साडेसात हजार टनांचे असून त्यावर स्वनातीत वेगात भूपृष्ठावरून भूपृष्ठावर मारा करणारी ब्राह्मोस, त्याचप्रमाणे लांब पल्ल्याची भूपृष्ठावरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे बसविण्यात आली आहेत.

 याशिवाय पाणतीरांचा मारा झाल्यास त्यालाही चकवा देणारी ‘मारीच’ नावाची यंत्रणा प्रथमच बसविण्यात आली आहे. शत्रूचा संहार करणारी या अर्थाने संस्कृतमधील ‘शत्रो संहारक:’ हे या विनाशिकेचे घोषवाक्य आहे. सोमवारी, संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या हस्ते ही विनाशिका समारंभपूर्वक नौदलात दाखल होईल आणि ती नौदलाच्या पश्चिमी ताफ्यामध्ये कार्यरत असेल.

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹9 दिवसांत 5 लाख कोटींहून अधिक ठेवी जमा

काही दिवसांतच बँकांमध्ये मोठ्या ठेवी जमा झाल्या आहेत . याचा बँकिंग क्षेत्रावर सकारात्मक परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे . मोदी सरकारने 8 नोव्हेंबरला पाचशे आणि हजाराच्या नोटा चलनातून रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर बँकांमध्ये जुन्या नोटा बदलून घेण्यासाठी लोकांनी गर्दी केली . त्यामुळे हा परिणाम दिसून येत आहे .

रिझर्व्ह बँकेने दिलेल्या माहितीनुसार, 10 ते 18 नोव्हेंबर या काळात नागरिकांनी बँकांमध्ये जुन्या नोटांच्या स्वरुपात 5 लाख 11 हजार 565 कोटी रुपयांच्या ठेवी जमा केल्या आहेत. तसेच 33 हजार 6 कोटी रुपयांची रक्कम नागरिकांनी बदलून घेतली आहे . यादरम्यान नागरिकांनी बँका आणि एटीएममधून 1 लाख 3 हजार 316 कोटी रुपये काढण्यात आले आहेत.

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹‘पृथ्वीवरील मानवी अस्तित्व आणखी हजार वर्षेच’

‘पृथ्वीखेरीज अन्य ग्रहांवर आसरा शोधल्याशिवाय मानवजात आणखी हजार वर्षांपेक्षा जास्त अस्तित्वात राहणार नाही,’ असा इशारा ज्येष्ठ भौतिकशास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांनी दिला आहे. ऑक्सफर्ड युनियन डिबेटिंग सोसायटीमध्ये एका व्याख्यानादरम्यान त्यांनी भविष्यातील विश्वाचे चित्र श्रोत्यांसमोर उभे केले. विश्व आणि मानवाचे मूळ असा व्याख्यानाचा विषय होता.

गेल्या पाच दशकातील महत्त्वाच्या वैज्ञानिक शोधांचे वैश्विक संचितावर प्रकाशझोत टाकताना प्रा. हॉकिंग म्हणाले, ‘सन २०१६ हा जगण्यासाठी आणि भौतिकशास्त्रातील मूलभूत संकल्पनांचा अभ्यास करण्यासाठी उत्तम काळ आहे. गेल्या पन्नास वर्षांत विश्वाचे चित्र मोठ्या प्रमाणावर बदलले असून, त्यात माझा खारीचा वाटा असेल, तरीही मी आनंदी आहे. आपण मानव विश्वाचे केवळ एक मूलभूत घटक आहोत. असे असूनही आपण स्वतःचे आणि विश्वाचे नियमन करणारे नियम शोधून काढले हा विजयच आहे.’

विश्वाचे आणखी अचूक चित्र मांडणाऱ्या महत्त्वाकांक्षी प्रयोगांविषयी प्रा. हॉकिंग म्हणाले, ‘कॉसमॉससारख्या सुपर कम्प्युटरच्या मदतीने आपण कोट्यवधी आकाशगंगाचे स्थान निश्चित करू शकलो. आपल्याला विश्वातील आपली जागा अधिक चांगल्या पद्धतीने जाणून घेता आली. कदाचित एक दिवस आपण गुरुत्वीय लहरींचा वापर बिग बँगचे अंतरंग जाणून घेण्यासाठी करू शकू. मात्र, आपल्याला भविष्यातील मानव प्रजातीसाठी अवकाश मोहिमा सुरूच ठेवाव्या लागतील.’

गेल्या काही दिवसांत हॉकिंग यांचे मानवाबाबतचे चिंतन सातत्याने निराशाजनक आहे. ‘मंगळावर स्वयंपूर्ण मानवी वसाहती उभारणे आणखी शंभर वर्षे तरी शक्य होणार नाही,’ असे त्यांनी म्हटले होते.

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹भारताची इंग्लंडवर २४६ धावांनी मात

इंग्लंडविरोधातील कसोटी मालिका विजयाचा दुष्काळ संपवण्याच्या दिशेने भारताने दमदार पाऊल टाकलं आहे. विशाखापट्टणम् कसोटीत भारताने इंग्लंडवर २४६ धावांनी दणदणीत विजय मिळवला असून पाच सामन्यांच्या मालिकेत १-० अशी महत्त्वपूर्ण आघाडी घेतली आहे. दरम्यान, पहिल्या डावात १६७ धावा आणि दुसऱ्या डावात ८१ धावा करणारा कर्णधार विराट कोहली सामन्याचा मानकरी ठरला.

भारताने दिलेल्या ४०५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना चौथ्या दिवसअखेर इंग्लंडने २ बाद ८७ धावा केल्या होत्या. अर्थात सामना वाचवण्याचे आव्हान असल्याने अत्यंत सावध आणि संथपणे इंग्लंडची आघाडीची फळी फलंदाजी करत होती. कूक आणि हमीद या सलामीच्या जोडीने तब्बल ५० षटकं टिच्चून फलंदाजी करून भारतीय गोलंदाजीला झुंजवलं. मात्र आजच्या शेवटच्या दिवशी इंग्लंडला फलंदाजीतील हा बचाव कायम राखता आला नाही. भारतीय गोलंदाजांनी इंग्लंडची मधली फळी भेदून काढली.

स्कोअरकार्ड

अश्विन, जयंत यादव आणि रवींद्र जाडेजा या फिरकी त्रिकुटाने प्रभावी मारा करत इंग्लंडच्या फलंदाजीची दाणादाण उडवली. कालच्या धावसंख्येत केवळ ७१ धावांची भर घालून इंग्लंडचे सात फलंदाज माघारी परतले. लंचनंतर काही वेळातच इंग्लंडचा डाव १५८ धावांवर संपुष्टात आला. भारताकडून अश्विन, जयंत या दोघांनी प्रत्येकी ३ तर शमी आणि जाडेजाने प्रत्येकी २ बळी टिपले.

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹आर. अश्विन यंदाच्या वर्षात सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज

भारतीय संघाच्या फिरकीची धुरा समर्थपणे वाहणाऱया रविचंद्रन अश्विन याने यंदाच्या वर्षात आपल्या फिरकीच्या जोरावर सर्वाधिक विकेट्स घेण्याचा पराक्रम केला आहे. भारतीय संघाने सोमवारी इंग्लंडविरुद्धच्या विशाखापट्टणम येथील कसोटी सामना तब्बल २४६ धावांनी जिंकला. अश्विनने या सामन्यात दोनही डावांत मिळून ८ विकेट्स घेतल्या. याशिवाय, अर्धशतकी खेळी देखील साकारली. अश्विनने २०१६ या वर्षात आतापर्यंत एकूण ८० विकेट्स घेतल्या असून यंदाच्या वर्षात सर्वाधिक विकेट्स घेणाऱया यादीत अश्विन अव्वल स्थानावर आहे. यातील ५५ विकेट्स अश्विनने कसोटी सामन्यांत घेतल्या आहेत.
भारतीय संघाच्या विजयात अश्विनचा वेळोवेळी मोठा वाटा राहीला आहे. प्रतिस्पर्धी संघ देखील अश्विनच्या फिरकीचा धसका घेतात. अनेकदा प्रतिस्पर्धी संघातील फलंदाज अश्विनच्या फिरकीचा सामना करण्यासाठीच्या उद्देशाने नेट्समध्ये सराव देखील करतात.

 अश्विनने आपल्या फिरकीसोबतच गोलंदाजीतील वैविध्यतेने सर्वांची मने जिंकली आहेत. अश्विनच्या नावावर आजवर अनेक विक्रमांची नोंद आहे.

 अश्विनने आपल्या आंतरराष्ट्रीय करिअरमध्ये आतापर्यंत ४१ कसोटी सामन्यांत २३१, तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये १०२ सामन्यांत १४२ विकेट्स घेतल्या आहेत. याशिवाय ट्वेन्टी-२० विश्वात अश्विनच्या खात्यात ५२ विकेट्स जमा आहेत. ५ जून २०१० रोजी अश्विनने भारतीय संघात पदार्पण केले होते. गेल्या सहा वर्षांत अश्विनच्या कामगिरीचा आलेख चढता राहिला असून अनेक महत्त्वपूर्ण स्पर्धेत अश्विनने उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹आयएनएस चेन्नई भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल

केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या हस्ते सोमवारी आयएनएस चेन्नई ही विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल झाली. आयएनएस चेन्नई ही कोलकाता श्रेणीतील क्षेपणास्त्र मार्गदर्शन प्रणाली असलेली तिसरी स्वदेशी बनावटीची युद्धनौका आहे. या कार्यक्रमाला नौदलप्रमुख सुनील लांबा हेदेखील उपस्थित होते. भारतीय नौदलातील सर्वात मोठ्या विनाशिकांपैकी एक असलेल्या आयएनएस चेन्नईची लांबी १६४ मीटर असून वजन ७,५०० टन इतके आहे. याशिवाय, ही विनाशिका भूपृष्ठावरून भूपृष्ठावर मारा करणाऱ्या ब्राह्मोस आणि बराक-८ या भूपृष्ठावरून हवेत मारा करू शकणाऱ्या क्षेपणास्त्रांनी सज्ज आहे. याशिवाय पाणतीरांचा मारा झाल्यास त्यालाही चकवा देणारी ‘मारीच’ नावाची यंत्रणा प्रथमच बसविण्यात आली आहे. काही चाचण्यानंतर आयएनएस चेन्नई नौदलाच्या पश्चिमेकडील ताफ्यात दाखल होईल. याशिवाय, संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेमध्ये (डीआरडीओ)भारतीय नौदलाच्या युद्धनौकांना शत्रूपासून रोखणारे ‘कवच’ हे आयएनएस चेन्नईचे वैशिष्ट्य आहे.

 शत्रूच्या युद्धनौका अथवा हवाई टेहळणीदरम्यान भारतीय युद्धनौका आढळल्यानंतर त्यांनी क्षेपणास्त्र डागल्यास युद्धनौकेचा हमखास बचाव करणारे क्षेपणास्त्रविरोधी क्षेपणास्त्र वापरण्याखेरीज दुसरा पर्याय आजवर नौदलाकडे उपलब्ध नव्हता. म्हणूनच गेली काही वर्षे ‘डीआरडीओ’तर्फे शत्रूच्या क्षेपणास्त्राला चकवा देणाऱ्या ‘कवच’ या नव्या चकवायंत्रणेची निर्मिती सुरू होती. शत्रूचे क्षेपणास्त्र येते आहे, हे लक्षात येताच ‘कवचा’मधून एक विशिष्ट आभासी असे काही डागले जाते की, त्यामुळे युद्धनौकेपासून दूर अंतरावर एक मोठी युद्धनौकाच असल्याचा आभासी ढग निर्माण होतो. क्षेपणास्त्राला अधिक मोठी युद्धनौकाच असल्याचा आभास आहे, हे लक्षात येत नाही आणि युद्धनौकेऐवजी त्या आभासी ठिकाणी जाऊन ते फुटते. परिणामी युद्धनौकेचा यशस्वी बचाव होतो, असे हे तंत्र आहे.

भारतीय नौदलाच्या ‘प्रकल्प१५अल्फा’ मध्ये कोलकाता वर्गातील गायडेड मिसाईल विनाशिकांची निर्मिती करण्यात आली. त्यातील आयएनएस तिसरी आणि अखेरची विनाशिका आहे. या तीन विनाशिकांच्या प्रकल्पावर नौदलाने सुमारे साडेअकरा हजार कोटी रुपये खर्च केले आहेत.

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹देशातील सर्वात मोठ्या द्रुतगती महामार्गावर उतरली लढाऊ विमाने…

देशातील सर्वात मोठ्या आणि आगरा लखनऊ द्रुतगती महामार्गावर हवाई दलाच्या मिराज २००० चे प्रात्यक्षिक पाहायला मिळाले. उत्तरप्रदेशमधील नव्या महामार्गच्या लोकार्पण सोहळ्यापूर्वी लढाऊ विमाने महामार्गावर उतरुन पुन्हा उड्डाण करताना दिसली. या महामार्गावरील बांगरमऊ आणि गंज-मुरादाबाद दरम्यान तीन किलोमीटरच्या पट्टा हा हवाई दलाच्या लढाऊ विमानांच्या उड्डाण आणि लॅडिगसाठी निवडण्यात आला आहे. हवाई दलातील कोणकोणती विमाने या ठिकाणाहून उड्डाण करतील याबाबत अद्याप कोणतीही सविस्तर माहिती उपलब्ध नाही.

देशातील सर्वात मोठ्या महामार्गासाठी १५ हजार कोटी इतका खर्च करण्यात आला असून या महामार्गाचे काम २३ महिन्यामध्ये पूर्ण करुन कमी कालावधीत हा महामार्ग उभारला असल्याचा दावा उत्तरप्रदेश सरकारने केला आहे. आगरा ते लखनऊ या दोन शहरांना जोडणाऱ्या महामार्ग फिरोजाबाद -मैनपूरी- इटावा- ओरिया- कन्नोज -हरदोई- कानपूर -उन्नाव या शहरातून लखनऊ ला जोडला जाईल. या महामार्गामुळे आगरा -लखनऊ या दोन शहराच्या दरम्यानचे ३०२ किलोमीटर अंतर पार करण्यासाठी लागणारा ५ ते ६ तासांच्या वेळ कमी होऊन हे अंतर कमी वेळात पार करणे शक्य होणार आहे.

यापूर्वी मागील वर्षी भारतीय हवाईदलाने मथुरा जवळच्या राया गावत यमुना महामार्गावर लढाऊ विमान उतरविले होते. युद्दपरिस्थितीमध्ये देशातील किती महामार्ग लढाऊ विमाने उतरविण्यासाठी उपयोगात आणता येऊ शकतात. याची चाचणी म्हणून हवाई दलाने या महामार्गावर देखील मिराज-२००० विमान उतरविण्यात आले होते.

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹पृथ्वीसारखा बाहय़ग्रह शोधण्यात वैज्ञानिकांना यश

वैज्ञानिकांनी सूर्याजवळच्या एका ताऱ्याभोवती फिरणारा एक पृथ्वीसारखा ग्रह शोधून काढला आहे. त्याचे वर्णन महापृथ्वी असा करता येईल. हा ग्रह पृथ्वीपेक्षा ५.४ पट मोठा आहे. बाहय़ग्रह असलेल्या या ग्रहाचे नाव जीजे ५३६ बी असे ठेवण्यात आले असून, तो ताऱ्याच्या वसाहतयोग्य क्षेत्रात नाही. त्याचा परिभ्रमण काळ ८.७ दिवस असून, त्याच्या ताऱ्याची प्रकाशमानता जास्त असल्याने कदाचित हा ग्रह शोधण्याचा जास्त मोह खगोलवैज्ञानिकांना झाला असावा. तारा जी ५३६ हा तांबडा बटू तारा असून, तो तुलनेने थंड आहे. सूर्याच्या जवळ तो आहे असे सांगण्यात आले. त्याची चुंबकीय आवर्तने ही सूर्यासारखीच असून, त्यांचा कालावधी मात्र तीन वर्षांचा आहे. या ताऱ्याभोवती आम्हाला सध्यातरी हा एकच ग्रह सापडला असून, इतर ग्रह सापडतात का याचा शोध सुरू आहे, असे स्पेनच्या अॅस्ट्रोफिजिक्स कॅनरियास व ला लागुना विद्यापीठआचे अॅलेजांद्रो सुआरेझ यांनी सांगितले. खडकाळ ग्रह हे गटाने सापडतात, त्यामुळे या ताऱ्याच्या भोवती कमी वस्तुमानाचे आणखी ग्रह असू शकतील व त्यांचा परिभ्रमण काळ १०० दिवस ते काही वर्षे असू शकतो असे सांगून ते म्हणाले, की नवीन बाहय़ग्रहाच्या अधिक्रमणावेळी त्याची त्रिज्या व घनता शोधून काढली जाईल. खडकाळ ग्रह सूर्यापेक्षा लहान व थंड अशा ताऱ्याभोवती फिरत आहे, पण तो तारा पुरेसा प्रकाशमान आहे असे संशोधक जोनाय इसाय गोन्झालेझ यांनी सांगितले. असे ग्रह शोधण्यासाठी संशोधकांना ताऱ्याचा वेग सेकंदाला काही मीटर इतक्या अचूकतेने शोधावा लागतो. आयएसी व जीनिव्हा वेधशाळा यांनी हार्पस स्पेक्ट्रोग्राफ च्या मदतीने हा ग्रह शोधला आहे. चिलीतील ला सिला येथील दुर्बिणीने याबाबत निरीक्षणे करण्यात आली होती. अॅस्ट्रॉनॉमी अँड अॅस्ट्रोफिजिक्स या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹इंटरनेट वापरात महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर

सध्या देशात डिजिटल इंडियाचा बोलबोला सुरू असताना महाराष्ट्राने इंटरनेट वर्गणीदारांच्या संख्येत पहिला क्रमांक पटकावला आहे. राज्यात २९.४७ दशलक्ष इतके इंटरनेटधारक आहेत. त्यानंतर तामिळनाडू, आंध्र प्रदेश व कर्नाटक यांचा क्रमांक लागला आहे. सरकारी माहितीनुसार मार्चअखेर भारतात ३४२.६५ दशलक्ष इतके इंटरनेट वर्गणीदार आहेत.

तामिळनाडूत त्यांची संख्या २८.०१ दशलक्ष, आंध्रात २४.८७ दशलक्ष, तर कर्नाटकात २२.६३ दशलक्ष इतकी आहे. हिमाचल प्रदेशात सर्वात कमी इंटरनेट वर्गणीदार असून त्यांची संख्या ३.०२ दशलक्ष आहे. शहरी भारतात इंटरनेट वर्गणीदारांची संख्या ३४२ दशलक्ष असून, ग्रामीण भारतात ही संख्या १११.९४ दशलक्ष आहे. याचा अर्थ ग्रामीण व शहरी भारतात अजून डिजिटल दरी कायम आहे. तामिळनाडूत शहरी वर्गणीदार सर्वाधिक २१.१६ दशलक्ष आहेत, तर उत्तर प्रदेशात ग्रामीण वर्गणीदार सर्वाधिक म्हणजे ११.२१ दशलक्ष आहेत. मार्चअखेर दिल्लीत इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या २०.५९ दशलक्ष होती, तर मुंबई व कोलकात्यात ती अनुक्रमे १५.६५ दशलक्ष व ९.२६ दशलक्ष होती. सरकारने डिजिटल इंडियाला प्राधान्य दिले असून, भारत नेट प्रकल्प सर्व २.५ लाख ग्रामपंचायतींना जोडण्यासाठी राबवला आहे. भूमिगत फायबर लाइन्स व इतर साधनांचा वापर करून इंटरनेटची सेवा देण्याचा प्रयत्न केला जात आहे. कंपन्यांनी यात भेदभाव न करता सेवा द्यावी अशी सरकारची अपेक्षा आहे. हा प्रकल्प तीन टप्प्यांत राबवला जात असून, मार्च २०१७ पर्यंत १ लाख ग्रामपंचायती इंटरनेटने जोडल्या जाणार आहेत.

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹मार्केल चौथ्यांदा चॅन्सलरपदाच्या उमेदवार !

पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकीत उतरण्याचा निर्णय जर्मनीच्या चॅन्सलर अँजेला मार्केल यांनी घेतला आहे. ख्रिचन डेमोकेट्रिक युनियन पार्टीच्या सभेत मार्केल यांनी रविवारी वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत पत्रकाराशी बोलताना ही घोषणा केली. त्या चौथ्यांदा निवडणूक रिंगणात आपले भाग्य आजमावतील. मार्केल 2005 पासून चॅन्सलरपदी विराजमान आहेत. त्यांना यावेळी उजव्या एफडी पक्षाकडून कडवे आव्हान मिळण्याची शक्यता आहे. ६२ वर्षीय मार्केल यांच्या जनमानसातील प्रभावात ३९ टक्के घट झाली असली तरी ५५ टक्के लोक त्यांच्या पाठीशी आहेत. युरोपियन युनियनमधून ब्रिटन बाहेर पडल्यानंतर व अमेरिकेच्या अध्यक्षपदी डोनाल्ड ट्रम्प यांच्या निवडीनंतर जर्मनीला स्थैर्य मिळण्याच्या दृष्टिकोनातून हा निर्णय असल्याचे सांगितले जाते.

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹सौर ऊर्जा क्षमता 10 गिगावॅटवर

छतावरील आणि ऑफ-ग्रिड प्रकारातील सोलर पॅनेलमुळे देशातील सौर ऊर्जा निर्मिती 10 गिगावॅटवर पोहोचली आहे. या वर्षात 5.1 गिगावॅट वीजनिर्मिती सौर क्षेत्रातून करण्यात येईल अशी अपेक्षा आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत या वर्षी 137 टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे, असे ब्रिज टु इंडिया या संस्थेने म्हटले आहे.

पुढील वर्षापासून देशातील वार्षिक ऊर्जा निर्मिती 8 ते 10 गिगावॅट सरासरीने वाढण्याची शक्यता आहे. सरकारकडून या क्षेत्राला समर्थन मिळाल्याने आणि क्षेत्रात स्पर्धा वाढल्याने किमतीत गेल्या दोन वर्षात चांगली वाढ झाली आहे. चीन आणि अमेरिका या दोन देशानंतर भारत जगातील तिसरी बाजारपेठ पुढील वर्षी बनण्याची शक्यता आहे. गेल्या पाच वर्षात 10 गिगावॅट सौर ऊर्जेची निर्मिती करण्यास आपण यशस्वी ठरलो, तर पुढील पाच वर्षात 100 गिगावॅटचा टप्पा पार करता येईल का असे अनेकांकडून विचारण्यात येत आहे. मात्र हा मैलाचा दगड असेल असे संस्थेची व्यवस्थापकीय संचालक विनय रुस्तगी यांनी सांगितले.

उदय या योजनांमुळे देशातील कमी विक्रीच्या ठिकाणी मागणी मोठय़ा प्रमाणात वाढली आहे. यामुळे कमी वेळात सकारात्मक निकाल दिसून आला. सध्या 17 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी यामध्ये सहभाग घेतला आहे. सर्वात जास्त तामिळनाडू या राज्यात सौर ऊर्जेचा वापर मोठय़ा प्रमाणात करण्यात येत आहे. यानंतर राजस्थान, आंध्र प्रदेश, गुजरात, तेलंगणा, मध्य प्रदेश आणि पंजाब या राज्यांचा क्रमांक लागतो. या सात राज्यांतून एकूण सौर ऊर्जेमध्ये 80 टक्के हिस्सा आहे. मात्र महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश यासारख्या ऊर्जेचा मोठया प्रमाणात वापर करणारी राज्ये अजूनही वापरात मागे पडत आहेत.

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹उवेना फर्नांडिस यांचा विशेष रेफ्री पुरस्काराने गौरव

भारताची महिला फुटबॉल रेफ्री उवेना फर्नांडिस हिला रविवारी क्वालालांपूर येथे एका कार्यक्रमामध्ये एएफसी रेफ्री विशेष पुरस्काराने गौरविण्यात आले. विशेष म्हणजे, भारतीय फुटबॉल क्षेत्रासाठी ही असाधारण कामगिरी आहे.

एएफसी रेफ्री समितीचे उपाध्यक्ष हनी बालन यांच्या हस्ते उवेना यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. जॉर्डन येथे झालेल्या अंडर १७ महिला विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात केलेल्या चमकदार कामगिरीमुळे उवेना यांची या पुरस्कारासाठी निवड झाली.

Current Affair :

IMPORTANT DAYS

· Universal Children's Day is observed on November 20
· World Day of Remembrance for Road Traffic Victims 2016 observed globally

NATIONAL

· Prime Minister to launch Pradhanmantri Grameen Awas Yojna to provide 3 crore affordable housing units across country
· Smriti Irani launches 'pehchan' identity cards to Gujarat artisans
· PM Modi promises houses for all by 75th Independence Day
· AR Rahman performs at Global Citizen Festival

INTERNATIONAL

· World’s first Bollywood-themed park opens in Dubai

BANKING NEWS

· RBI proposes 'Islamic window' in banks for Sharia banking

BUSINESS NEWS

· India, Cyprus ink new tax pact to replace 2 decade-old treaty

AGREEMENTS &MoUs

· Google launches online exhibition on iconic Indian women

APPOINTMENTS

· Jagdish Singh Khehar appointed Executive Chairman of National Legal Services Authority
· Catholic Syrian Bank to appoint CVR Rajendran as MD & CEO

AWARDS

· Al Nahyan granted Mother Teresa International Award

SCIENCE & TECHNOLOGY

· Indian firm to deliver Apache chopper parts to US in 2018
· Russia's Soyuz spacecraft arrives at International Space Station

SPORTS NEWS

· R Ashwin 1st bowler ever to take 50 wickets in consecutive years
· Kenya's Olympic champion Eliud Kipchoge wins men's Delhi Half Marathon
· Manavjit Singh clinches gold medal in National Shooting championship
· PV Sindhu wins her 1st tournament post Rio Olympics
· Indian keeper effected record 14 dismissals on this day

OBITUARY

· World’s first heart transplant doctor passes away

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹विधानपरिषद निवडणुकीत भाजप , काँग्रेसला दोन जागा

मुंबई - विधान परिषदेच्या सहा जागांसाठी झालेल्या निवडणुकीत सत्ताधारी भाजप आणि विरोधी पक्ष काँग्रेसला प्रत्येकी दोन जागांवर विजय मिळविण्यात यश आले . तर, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेला एक जागेवर विजय मिळाला .

नांदेड विधान परिषद निवडणुकीत अमर राजुरकर विजयी झाले आहेत. राजुरकर यांना 251 मते तर अपक्ष उमेदवार श्याम सुंदर शिंदे यांना 208 मते मिळाली . 12 मते बाद ठरली . काँग्रेसने याठिकाणी 43 मतांनी कॉंग्रेसचा विजय मिळविला. तर , पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अनिल भोसले विजयी झाले . त्यांनी भाजपचे उमेदवार अशोक येनपुरे आणि काँग्रेसचे उमेदवार संजय जगताप यांचा पराभव केला .

सांगली- सातारा विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार मोहन कदम 64 मतांनी विजयी झाले आहेत. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शेखर गोरे यांचा पराभव केला . यवतमाळ -वाशीम विधानपरिषद निवडणुकीत शिवसेनेचे तानाजी सावंत विजयी झाले आहेत . जळगाव विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात भाजपचे उमेदवार चंदू पटेल मोठ्या मताधिक्याने विजयी झाले . या ठिकाणी काँग्रेस , राष्ट्रवादी , शिवसेना या प्रमुख पक्षांनी माघार घेतली होती . भंडारा -गोंदिया निवडणुकीत भाजपचे परिणय फुके विजयी झाले .

कॉंग्रेस विरुद्ध इतर सर्व पक्ष असे समीकरण बनलेल्या या निकालांची उत्सुकता शिगेला पोचली होती . स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेवर पाठवण्यात येणाऱ्या सहा सदस्यांसाठी ही निवडणूक झाली होती . भंडारा -गोंदिया , जळगाव , यवतमाळ -वाशीम , नांदेड , पुणे आणि सांगली-सातारा या मतदारसंघांत ही निवडणूक पार पडली होती .

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹डॉ. जब्बार पटेल यांना गदिमा पुरस्कार जाहीर

कलाक्षेत्रात प्रतिष्ठेचा समजला जाणारा ‘गदिमा पुरस्कार’ यंदा ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांना जाहीर झाला आहे. ग. दि. माडगूळकर यांच्या ३९ व्या स्मृतीदिनानिमित्त येत्या १४ डिसेंबरला पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.

अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे माजी अध्यक्ष अरुण काकडे यांच्या हस्ते टिळक स्मारक मंदिरात सायंकाळी ५ वाजता पुरस्कार वितरण होणार आहे, अशी माहिती गदिमा प्रतिष्ठानचे विश्वस्त आनंद माडगूळकर यांनी पत्रकार परीषदेत दिली. या वेळी श्रीधर माडगूळकर, प्रकाश भोंडे उपस्थित होते.

या समारंभात देण्यात येणारा गृहिणी सखी सचिव पुरस्कार वीणा तांबे यांना, चैत्रबन पुरस्कार गायक गीतकार नंदेश उमप यांना तसेच विद्या प्रज्ञा पुरस्कार गायिका आर्या आंबेकर यांना जाहीर करण्यात आला आहे. गदिमा पारितोषिकासाठी उद्गगीर येथील श्यामलाल मेमोरियल हायस्कूलच्या ऋतूजा कांकरे हिची निवड केली आहे. पुरस्कार समारंभानंतर डॉ. उल्हास आणि विनया बापट यांच्या संकल्पनेतून नऊ रसांवर आधारीत आणि गदिमांच्या गीताचा अविष्कार सादर करण्यात येणार आहे.

२०१८मध्ये गदिमा यांचा जन्मशताब्दी महोत्सव साजरा करण्यात येणार आहे, तत्पूर्वी पुण्यात त्यांचे स्मारक व्हावे, अशी अपेक्षा माडगूळकर यांनी या वेळी व्यक्त केली. महापालिकेला या स्मारकासाठी २००८मध्ये पाच कोटी रुपये मंजूर झाले होते. पुणे-मुंबई महामार्गावर जागाही निश्चित झाली होती. मात्र पुढे काही घडले नाही, असेही माडगूळकर यांनी सांगिले.

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹बलात्काराच्या क्रमवारीत भारत शेवटून चौथा '

नवी दिल्ली - जगभरात होत असलेल्या बलात्काराच्या जागतीक क्रमवारीत भारताचा शेवटून चौथा क्रमांक लागत आहे , असे केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांनी म्हटले आहे .

महिला पत्रकारांसाठी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमावेळी गांधी उपस्थित होत्या . यावेळी बोलताना त्या म्हणाल्या , ' जगामध्ये महिलांवर होत असलेल्या अत्याचाराबाबतची आकडेवारी मिळविली आहे . या आकडीवारीनुसार जागतीक स्तरावर भारताचा शेवटून चौथा क्रमांक लागत आहे . यामध्ये स्विडनचा प्रथम क्रमांक आहे . दिल्लीत झालेल्या निर्भया अत्याचारा प्रकरणानंतर स्विडनचा दौरा केला होता . दौऱयावेळी भारतामध्ये येण्यास कोणीही इच्छुक नसल्याचे एकाने सांगितले . '

दरम्यान , गांधी यांनी जाहिर केलेल्या आकडेवारीनंतर सर्वच महिला पत्रकारांना धक्का बसला. परंतु , हि सत्य परिस्थिती असून आकडेवारी बोलत असल्याचे त्यांनी सांगितले .

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹जनरल सुहाग चीन दौऱ्यावर

बीजिंग - लष्करप्रमुख जनरल दलबीरसिंह सुहाग हे आजपासून चार दिवसांच्या चीन दौऱ्यावर रवाना झाले आहेत. दोन देशांमधील सहकार्य आणि विश्वास वाढण्यासाठी ते चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतील आणि काही महत्त्वाच्या लष्करी संस्थांना भेट देतील , असे सूत्रांनी सांगितले .

 जनरल सुहाग यांच्याबरोबर भारताच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांचे शिष्टमंडळही जाणार आहे . दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांमध्ये दहशतवाद, नैसर्गिक आपत्तींमध्ये मदत आणि शांतता सहकार्य या विषयांवर चर्चा होणार आहे .

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹वे​लिंगकर आणि इस्रायलच्या विद्यापीठांमध्ये करार

नवसंशोधन, उद्योजकता, तंत्रज्ञान, नेतृत्व विकासासाठी मुंबईच्या वेलिंगकर इन्स्टि्यट्यूट ऑफ इंडिया आणि इस्त्राइलच्या दोन विद्यापीठांमध्ये नुकताच नवी दिल्लीत सामंजस्य करार करण्यात आला. इस्त्रालयचे राष्ट्रध्यक्ष रूव्हेन रिव्हलिन आणि केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांच्या उपस्थितीत हैफा युनिव्हर्सिटी ऑफ इस्त्रायल आणि आयडीसी हर्झलिया यांचा समवेत हे करार झाले आहेत.

नवी मुंबईत झालेल्या या समारंभात शिक्षण प्रसारक मंडळीचे अध्यक्ष अॅड. एस. के. जैन यांच्यासह समूह संचालक डॉ. उदय साळुंखे यांनी करारावर स्वाक्षरी केली. तर हैफा विद्यापीठाचे प्रतिनिधीत्व प्रॉ. रॉन रॉबिन आणि प्रॉ. सोशी झाल्का यांनी केले, तर आयडीसी हर्झलियाचे प्रतिनिधीत्व प्रॉ. युरियल राइशमन यांनी केले.

मुंबई विद्यापीठाबरोबर चार करार

इस्त्रालयमधील नेगेवच्या बेन गुरियन विद्यापीठाबरोबर मुंबई विद्यापीठाने दोन करार केले आहेत. यातील एक करार हा साधारण सहकार्य स्वरुपाचा असून त्याद्वारे विद्यार्थी आणि शिक्षक यांनी परस्परांच्या विद्यापीठांमध्ये लेक्चर्स, सेमिनार यांना हजेरी लावण्याबरोबरच त्यांना संशोधन सहकार्याचीही संधी मिळणार आहे. याच बरोबर बेन गुरियन विद्यापीठाबरोबर एक विशेष सामंजस्य करारही केला आहे. या कराराद्वारे दोन्ही विद्यापीठातील विद्यार्थी सयुंक्तपणे पी.एचडी पदवी प्राप्त करु शकतील. सहकार्य करार हिब्रु युनिव्हर्सिटी ऑफ जेरुसलेमचे अध्यक्ष प्रा. मेनाहेम बेन सासन यांच्याबरोबरही करण्यात आला.

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹जोकोविचला नमवून मरे जेता

ब्रिटनच्या अँडी मरे याने एटीपी वर्ल्ट टूर फायनल्स टेनिस स्पर्धेचे जेतेपद पटकावले. यासह मरेने जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान कायम राखत मोसमाची सांगता केली. एकेरीच्या अंतिम लढतीत मरेने सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचला ६-३, ६-४ अशी सरळ सेटमध्ये मात केली. क्रमवारीत मरे अव्वल स्थानावर, तर जोकोविच दुसऱ्या स्थानावर आहे. आतापर्यंत हे ३४वेळा आमनेसामने आले होते. त्यात जोकोविचने २४वेळा, तर मरेने दहा वेळा बाजी मारली होती. तसेच, या वर्षी हे दोघे पाचव्यांदा अंतिम फेरीत समोरासमोर आले होते. यावर्षी जोकोविचने मरेला हरवूनच माद्रिद मास्टर्स, ऑस्ट्रेलियन आणि फ्रेंच ओपन स्पर्धा जिंकली होती. साहजिकच तशाच कामगिरीची पुनरावृत्ती करण्यासाठी जोकोविच उत्सुक होता, तर दुसरीकडे मरेने या वर्षी रोम मास्टर्समध्ये जोकोविचला पराभूत करून जेतेपद मिळविले होते. क्रमवारातील अव्वल स्थान कायम राखण्यासाठी मरेला जेतेपद आवश्यक होते. त्यामुळे जेतेपद पटकावून मरे क्रमवारीतील अव्वल स्थानासह मोसमाची सांगता करण्यास उत्सुक होता.

पहिल्या सेटमध्ये दोघांत प्रत्येक गुणासाठी चुरस पाहायला मिळाली. सहाव्या गेमअखेर दोघांत ३-३ अशी बरोबरी होती. सहाव्या गेममध्ये मरेला ब्रेक पॉइंट मिळाले होते. मात्र, ही संधी मरेला साधता आली नाही. सातव्या गेममध्ये मरेने सर्व्हिस राखली. मात्र, त्यानंतर मरेने जोकोविचची सर्व्हिस भेदली आणि सेटमध्ये ५-३ अशी आघाडी घेतली. पहिला सेट जिंकण्यासाठी मरेला केवळ सर्व्हिस राखण्याची आवश्यकता होती. अर्थात, मरेने सर्व्हिस राखत पहिल्या सेटमध्ये बाजी मारली.
आव्हान राखण्यासाठी जोकोविचला दुसरा सेट जिंकणे गरजेचे होते. मात्र, मरेने पहिल्याच गेममध्ये जोकोविचची सर्व्हिस भेदली. त्यानंतर पाचव्या गेममध्येही मरेने जोकोविचची सर्व्हिस भेदून ४-१ अशी आघाडी मिळविली. त्या वेळी मरेच्या चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. त्यानंतर जोकोविचने झुंज दिली. मात्र, दहाव्या गेममध्ये सर्व्हिस राखत विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.

खेळ आकड्यांचा...

१- जागतिक टेनिस रँकिंगमध्ये अव्वल क्रमांक राखत २९ वर्षीय अँडी मरेने मोसमाची सांगता केली. कारकीर्दीत प्रथमच मरेने हे यश मिळविले. तसेच, एटीपी वर्ल्ड टूर फायनल्स जिंकणारा तो ब्रिटनचा पहिलाच टेनिसपटू ठरला.

५- मरेने सलग पाचवी स्पर्धा जिंकली. त्याने ऑक्टोबरमध्ये चीन ओपन, शांघाय मास्टर्स, व्हिएन्ना ओपन, नोव्हेंबरमध्ये पॅरीस मास्टर्स आणि वर्ल्ड टूर फायनल्सचे जेतेपद पटकावले. या मोसमात मरेने एकूण नऊ स्पर्धा जिंकल्या. ऑक्टोबरपूर्वी त्याने इटालियन ओपन, क्वीन्स क्लब चॅम्पियनशिप, विम्बल्डन स्पर्धा जिंकली होती. तसेच, त्याने रिओ ऑलिंपिकमध्ये सुवर्ण मिळविले होते.

२४- मरेने सलग चोवीस सामने जिंकत मोसमाची सांगता केली.

७८- २०१६मध्ये मरेने ७८ सामने जिंकले, तर ९ सामने गमावले.

६- सहाव्यांदा वर्ल्ड टूर फायनल्सचे जेतेपद पटकाविण्याचे २९ वर्षीय जोकोविचचे स्वप्न भंगले. जोकोविचने २००८, २०१२, २०१३, २०१४, २०१५मध्ये ही स्पर्धा जिंकली होती.

मोसमाअखेर अव्वल रँकिंग पटकावणारे खेळाडू

अँडी मरे (ब्रिटन) ः २०१६
नोव्हाक जोकोविच (सर्बिया) ः २०११, १२, १४, १५
रफाएल नदाल (स्पेन) ः २००८, १०, १३
रॉजर फेडरर (स्वित्झर्लंड) ः २००४, ०५, ०६, ०७, ०९
अँडी रॉडीक (अमेरिका) ः २००३
लेटन ह्युईट (ऑस्ट्रेलिया) ः २००१, ०२
गुस्तावो कुर्तन (ब्राझिल) ः २०००
आंद्रे अगासी (अमेरिका) ः १९९९
पीट सॅम्प्रास (अमेरिका) ः १९९३, ९४, ९५, ९६, ९७, ९८
जिम कुरियर (अमेरिका) ः १९९२
स्टीफन एडबर्ग (स्वीडन) ः १९९०, ९१
मॅट विलँडर (स्वीडन) ः १९८८
इव्हान लेंडल (चेक प्रजासत्ताक) ः १९८५, ८६, ८७, ८९
जॉन मॅकन्रो (अमेरिका) ः १९८१, ८२, ८३, ८४
बियाँ बोर्ग (स्वीडन) ः १९७९, १९८०
जिमी कॉनर्स (अमेरिका)ः १९७४, ७५, ७६, ७७, ७८
इलिए नस्तासे (रोमानिया) ः १९७३

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹एम. जी. के. मेनन यांचे निधन

प्रख्यात वैज्ञानिक, इस्त्रोचे माजी अध्यक्ष आणि टाटा इन्स्टिट्यूट आॅफ फंडामेंटल रिसर्चचे माजी संचालक प्रा. एम. जी. के. मेनन (वय ८८) यांचे मंगळवारी निधन झाले. ते काही काळ आजारी होते.

प्रो. मेनन यांचा देशाच्या विज्ञान व तंत्रज्ञानाच्या विकासात खूप मोठा वाटा होता. विश्वनाथ प्रताप सिंग यांच्या मंत्रिमंडळात ते विज्ञान व तंत्रज्ञान खात्याचे राज्यमंत्रीही होते. त्याआधी याच खात्याचे सचिव म्हणून त्यांनी केंद्र सरकारमध्ये कामही केले होते. पद्मभूषण, पद्मविभूषण किताबांचे मानकरी असलेल्या प्रो. मेनन यांनी नियोजन आयोगाचे सदस्य, पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार, कौन्सिल आॅफ सायन्स अॅण्ड इंडस्ट्रीअल रिसर्चचे उपाध्यक्ष अशा अनेक पदांवर काम केले होते. रॉयल सोसायटी आॅफ लंडनचे तसेच इंडियन अॅकॅडमी आॅफ सायन्सेसचे प्रो. मेनन फेलो होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी ल एक मुलगा असा परिवार आहे.

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹कोलकात्यात सर्वाधिक दुर्गंधीयुक्त स्वच्छतागृहे, तर मुंबई चौथ्या स्थानावर

देशभरातील सर्वाधिक दुर्गंधीयुक्त स्वच्छतागृहे कोलकात्यात असून दिल्ली दुस-या स्थानावर तर त्यापाठोपाठ चेन्नई आणि मुंबईचा क्रमांक लागतो. 'हॉलिडे आय क्यू ' या ट्रॅव्हल साईटने केलेल्या सर्व्हेतून ही माहिती समोर आली आहे. दिल्ली, मुंबई, बंगळुरू, चेन्नई, कोलकाता, हैदराबाद आणि पुणे येथील सुमारे १०,००० प्रवाशांशी बोलून हा सर्वे करण्यात आला होता. ९५ टक्के भारतीय प्रवाशांनी स्वच्छतागृहांची संख्या वाढवण्याची मागणी केली असून सध्याच्या स्वच्छतागृहांच्या दर्जाबाबत असमाधान व्यक्त केले आहे. तर पुरेशी स्वच्छता नसल्यामुळे आपण फिरायला जाण्याचे ठिकाण वा तेथे जाण्याचा मार्ग बदलल्याचे सर्व्हेत सहभागी झालेल्या ७० टक्के लोकांनी नमूद केले.

कोलकाता येथे सर्वाधिक दुर्गंधीयुक्त स्वच्छतागृहे असल्याचे ४३ टक्के लोकांनी नमूद केले असून त्यापाठोपाठ दिल्लीचा नंबर लागतो असे मत ३२ टक्के लोकांनी नोंदवले. तर चेन्नई आणि मुंबईतील सार्वजनिक स्वच्छतागृहांमध्येही खूप दुर्गंधी असल्याचे २९ टक्के लोकांनी म्हटले आहे. हैदराबादला २० टक्के तर पुणे १८ टक्के आणि बंगळुरूला सर्वात कमी १४ टक्के मतं मिळाली.

बस स्टॉप, रेल्वे स्थानकं, धार्मिक स्थळं आणि सरकारी कार्यालयांजवळ अधिक स्वच्छतागृहांची सोय असली पाहिजे, असे मत अनेकांनी व्यक्त केलं. तर आपल्या शहरांत तसेच देशभरातील प्रसिद्ध पर्यटन स्थळांच्या ठिकाणी सर्वाधिक स्वच्छतागृहं आवश्यक आहेत असे मत ५४ टक्के प्रवाशांनी नोंदवले.

रेल्वे स्थानकांत अधिक स्वच्छतागृहं हवी असे ४१ टक्के लोकांवी तर धार्मिक स्थळांजवळही ही सोय हवीच असे ३१ टक्के प्रवाशांना वाटते.

महामार्गांवर दर २५ किमी अंतरावर तरी स्वच्छतागृहे असलीच पाहिजेत असे २५ टक्के प्रवाशांना वाटते तर देशभरातील समुद्रकिना-यांजवळही चांगल्या दर्जाच्या स्वच्छतागृहांची गरज असल्याचे मत १५ टक्के प्रवाशांनी नोंदवल्याचे या सर्व्हेत नमूद करण्यात आले आहे. पैस देऊन वापरता येतात अशा स्वच्छतागृहांमध्ये खूपच घाण असते असे मत ३२ टक्के प्रवाशांनी नोंदवले.

अमृतसरमधील सुवर्ण मंदिर, कर्नाटकातील नंदी हिल्स, हैदराबादमधील गोवळकोंडा किल्ला, दिल्लीतील हुमायूनची कबर, कर्नाटकमधील मैसूर पॅलेस, आग्रा येथील ताज महाल, महाराष्ट्रातील अजिंठा-वेरूळची लेणी, दिल्लीतील कुतुबमिनार, कोलकाता येथील प्रिन्सेप घाट, लखनऊमधील बडा इमामबरा आणि राजधानी दिल्लीतील लाल किल्ला, या ठिकाणी (स्वच्छतागृहांमध्ये) पुरेशी स्वच्छता नसल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले.

स्वच्छतेचा अभावामुळे पर्यटन, आरोग्य, पर्यावरण आणि अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम होतो. सुट्टीदरम्यान स्वच्छ आणि दर्जेदार स्वच्छतागृहे मिळणे ही प्रत्येक प्रवाशाची मूलभूत गरज आहे. त्यामुळे पर्यटनस्थळांची व तिथपर्यंत पोहोचण्याच्या मार्गाच्या निवडीवरही परिणाम होतो' असे मत हॉलिडे आयक्यूचे सीईओ हरी नायर यांनी व्यक्त केले.

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹मूळ भारतीय वंशाच्या मुस्लिम-अमेरिकी महिलेचा स्थानिक निवडणुकीत विजय

अमेरिकेमध्ये एका मुस्लिम-अमेरिकी महिलेने स्थानिक निवडणुकीमध्ये विजय प्राप्त केला असून, राहिला अहमद नावाच्या या २३ वर्षीय महिलेचे वडील भारतीय तर आई पाकिस्तानी आहे. प्रवासी नागरिक आणि मुसलमानांच्या विरोधातील वक्तव्यांचा बोलबाला असलेले अमेरिकेतील राज्य मेरीलँड येथे तिने हा विजय नोंदविला. बऱ्याच काळापासून प्रशासकीय कारभार सांभाळत असलेल्या व्यक्तीपेक्षा १५ टक्के अधिक मते प्राप्त करून मेरीलँड प्रिंस जॉर्ज काऊंटीमधील स्कूल बोर्डाची निवडणूक राहिलाने जिंकली. याच पदासाठीच्या निवडणुकीत चार वर्षांपूर्वी म्हणजेच २०१२ मध्ये तिच्या पदरी अपयश आले होते. या जिल्ह्यातील ८० टक्के जनता ही अफ्रिकी-अमेरिकन असल्याने राहिलाच्या विजयाला अनन्यसाधारण महत्व प्राप्त होते.

राहिलाला रिपब्लिकन राष्ट्रीय समितीचे पूर्वाध्यक्ष माइकल स्टील यांचे समर्थन होते. ज्यादिवशी डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले, त्याच दिवशी हिजाब परिधान करणारी माझ्यासारखी महिला सार्वजनिक कार्यालयात सेवा प्रदान करण्यासाठी निवडून आली ही खरोखरीच एक लक्षवेधी घटना आहे. ही घटना अमेरिकेतील जनतेच्या विचारांमधील विविधता दर्शविते. त्याचप्रमाणे अमेरिकी स्वप्न अद्याप चांगल्या स्थितीत असून जिवंत असल्याची साक्ष देत असल्याचे मत या प्रसंगी बोलताना राहिलाने व्यक्त केले.

निधन:-
-------------
*  एम. बालमुरलीकृष्ण :-
* कर्नाटकी संगीताला वेगळी दिशा देणारे प्रख्यात गायक एम. बालमुरलीकृष्ण यांचे  निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते.
* १९८८ मध्ये लोकसेवा संचार परिषदेने व दूरदर्शनने बनविलेल्या मिले सूर मेरा तुम्हारा या सर्व भारतीय भाषीय गीतासाठी एम. बालमुरलीकृष्ण यांनी गायन केले होते
* तेलगू चित्रपट ‘भक्त प्रल्हाद’ यात त्यांनी नारदाची भूमिका साकारली होती. व्हॉयलिन, मृदंग आणि कंजिरा ही वाद्ये वाजविण्यातही ते निष्णात होते.
* भारतीय संगीत कलेमध्ये दिलेल्या बहुमूल्य योगदानाबद्दल भारत सरकारतर्फे देण्यात येणाऱ्या  ‘पद्मविभूषण९१९९१),पद्मभूषण,पद्मश्री ’ या पुरस्काराने त्यांना  गौरविण्यात आले होते. .
* फ्रांस सरकाने त्यांना चेव्हालिअर सन्मान दिला होता\
.

चर्चित राज्य/देश:-
-----------------------
महाराष्ट्र:-
* महाराष्ट्राने इंटरनेट वर्गणीदारांच्या संख्येत पहिला क्रमांक पटकावला आहे. राज्यात २९.४७ दशलक्ष इतके इंटरनेटधारक आहेत.
* त्यानंतर तामिळनाडू, आंध्र प्रदेश व कर्नाटक यांचा क्रमांक लागला आहे.
*  हिमाचल प्रदेशात सर्वात कमी इंटरनेट वर्गणीदार असून त्यांची संख्या ३.०२ दशलक्ष आहे.
*  तामिळनाडूत शहरी वर्गणीदार सर्वाधिक २१.१६ दशलक्ष आहेत,

स्वीडन:-
*  ई-चलन आणणारा स्वीडन पहिला देश
* ३०० वर्षांपूर्वी युरोपात पहिल्यांदा नोटा वापरण्याची सुरुवात स्वीडनमधूनच झाली होती. मात्र गेल्या काही वर्षांपासून स्वीडनमधील नोटांचा वापर मोठ्या प्रमाणात कमी झाला.
*
 ई-चलन किंवा डिजीटल चलन डेबिट क्रेडिट कार्ड सारखेच काम करते. ई-चलनाची देवाणघेवाण इंटरनेटच्या माध्यमातून केली जाते. ऑनलाइन दुकानांमध्ये ई-चलनाचा वापर वाढू लागला आहे.त्यामुळे स्वीडनच्या केंद्रीय बँकेकडून ई-चलन आणण्याचा विचार सुरू

चर्चित शब्द:-
पोस्ट ट्रथ:-
* अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांचा अध्यक्षीय निवडणुकीतील अनपेक्षित विजय व ब्रेक्झिट म्हणजे ब्रिटनने युरोपीय समुदायातून बाहेर पडण्यासाठी दिलेला कौल यासारख्या घटनांमुळे पोस्ट ट्रथ हा या वर्षांतील आंतरराष्ट्रीय शब्द ठरल्याचे ऑक्सफर्ड डिक्शनरीजने जाहीर केले
* .या शब्दाचा वापर दोनशे पटींनी वाढला आहे. वस्तुनिष्ठ परिस्थिती जनमतावर प्रभाव पाडण्यात अपयशी ठरल्याच्या परिस्थितीत हा शब्द वापरला गेला असून, लोकांनी भावना व व्यक्तिगत श्रद्धा यांच्या आधारे त्यांचे जनमत ठरवले आहे.
*  गेल्या वर्षभरापासून लोकप्रिय ठरलेल्या या शब्दाचा वापर २००० टक्के वाढला असल्याचे शब्दकोश संशोधनातून दिसून आले आहे.
* गेली वीस वर्षे हा शब्द अस्तित्वात असून, युरोपीय समुदायात राहायचे की बाहेर पडायचे, याबाबत ब्रिटनची जनमत चाचणी, अमेरिकी अध्यक्षीय निवडणूक या दोन घटनांत या शब्दाचा वापर जास्त वाढला होता. ब्रेक्झिट मतदानानंतर जूनमध्ये या शब्दाच्या वापरात वाढ झाली व नंतर ट्रम्प यांना रिपब्लिकन पक्षाची उमेदवारी मिळाल्यापासून या शब्दाचा वापर आणखी वाढला. होता
* २०१५ या वर्षी वर्षी आनंदाश्रू असलेल्या चेहऱ्याचा उल्लेख करणारा इमोजी हा शब्द निवडला गेला होता,

चालू घडामोडी:-
-------------------------------
पुरस्कार:-
गदिमा पुरस्कार:-
* गदिमा प्रतिष्ठानतर्फे ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांना २०१६ चा गदिमा पुरस्कार जाहीर झाला
* २१ हजार रुपये, स्मृतिचिन्ह आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
*  २०१५:-सुमन कल्याणपूरकर
*  २०१४:- अरुण साधू
*  २०१३:-श्रीकांत मोघे

 चर्चित खेळाडू:-
पी. व्ही. सिंधू:-
* ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या भारताच्या पी. व्ही. सिंधूने चायना खुल्या बॅडमिंटन स्पर्धेचे विजेते पद पटकावले आहे.
* सिंधूने चीनच्या सून यू हिचा पराभव करून आपले पहिलेवहिले सुपरसीरिज विजेतेपद साजरे केले आहे. अंतिम फेरीत सिंधूने चीनच्या सून यू हिचा २१-११, १७-२१ आणि २१-११ अशा सेटमध्ये पराभव केला.
*  गेल्या ३० वर्षांमध्ये आजवर केवळ तीन चीन व्यतिरिक्त बॅडमिंटनपटूंनी ही स्पर्धा जिंकली होती. यात दोन भारतीय महिला बॅडमिंटनपटूंचा समावेश आहे. याआधी ही स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम सायना नेहवाल हिने केला होता.

रविचंद्रन अश्विन:-
*  रविचंद्रन अश्विन याने यंदाच्या वर्षात फिरकीच्या जोरावर सर्वाधिक विकेट्स घेण्याचा पराक्रम केला आहे.
 अश्विनने २०१६ या वर्षात आतापर्यंत एकूण ८० विकेट्स घेतल्या
* यंदाच्या वर्षात सर्वाधिक विकेट्स घेणाऱया यादीत अश्विन अव्वल स्थानावर आहे. यातील ५५ विकेट्स अश्विनने कसोटी सामन्यांत घेतल्या आहेत.
* आतापर्यंत ४१ कसोटी सामन्यांत २३१, तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये १०२ सामन्यांत १४२ विकेट्स घेतल्या आहेत. याशिवाय ट्वेन्टी-२० विश्वात अश्विनच्या खात्यात ५२ विकेट्स जमा आहेत.
* ५ जून २०१० रोजी अश्विनने भारतीय संघात पदार्पण केले होते

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹मृत समुद्राचे अस्तित्व धोक्यात

सर्वाधिक खाऱ्या पाण्याचा समुद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मृत समुद्राचे अस्तित्व मानवी हस्तक्षेपामुळे धोक्यात आल्याचा इशारा पर्यावरण तज्ज्ञांनी दिला आहे . जॉर्डन आणि इस्राईलच्या सीमेवर असलेल्या या समुद्राचा आकार दिवसेंदिवस कमी होत असल्याचे निरीक्षण आहे .

मृत समुद्र हे नैसर्गिक आश्चर्य मानले जाते. या समुद्राचा पृष्ठभाग सामान्य समुद्र पातळीपासून 429 मीटर खाली असल्याने तो जगातील सर्वांत खोलवर असलेला भाग मानला जातो . हा समुद्र पन्नास किमीपर्यंत पसरला असून , त्याची रुंदी पंधरा किमीपर्यंत आहे . या समुद्राच्या पाण्यात सोडिअम क्लोराइडचे प्रमाण प्रचंड असल्याने त्या पाण्यात सहज पोहता येते . हा समुद्र पाहण्यासाठी हजारो पर्यटक येथे येत असतात . क्षाराचे प्रमाण प्रचंड असलेल्या या पाण्यात कोणतेही प्राणी , मासे जगत नसल्यानेच याला मृत समुद्र म्हणतात . समुद्रातील क्षाराच्या दहा पट अधिक क्षार मृत समुद्रात आहेत.

मृत समुद्राच्या पाण्यात त्वचा आणि इतर काही रोग बरे करण्याची क्षमता असल्याचा अनेकांचा विश्वास आहे . त्यामुळेच येथे पर्यटक मोठ्या प्रमाणावर येतात . त्यामुळे त्यांना अधिक आकर्षित करण्यासाठी कारंजे उभारणे , सुशोभिकरण करणे, हॉटेल बांधणे आणि खनिजद्रव्ये पाण्यातून काढणे यामुळे मृत समुद्राला हानी पोचत आहे . याशिवाय या समुद्राला येऊन मिळणाऱ्या जॉर्डन नदीचे पाणीही वळविण्यात आले आहे . त्यामुळे समुद्रातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस कमी होत असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे . मागील पंधरा वर्षांमध्ये हा समुद्र जवळपास 25 मीटर आटला आहे .

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹तब्बल 87 टक्के लोकांचा नोटाबंदीला पाठिंबा

पाचशे आणि हजार रूपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्णयाला बहुसंख्य भारतीयांनी भक्कम पाठिंबा दिल्याचा दावा हफिंग्टन पोस्ट -बीडब्ल्यू आणि सीव्होटर या संस्थांच्या सर्वेक्षणात केला आहे . सर्वेक्षणात भाग घेतलेल्या तब्बल 87 टक्के लोकांनी नोटाबंदीच्या निर्णयामुळे काळापैसा बाळगणाऱयांना धक्का बसेल , असे मत व्यक्त केले आहे ; तर 85 टक्के लोकांनी नोटाबंदी निर्णयामुळे होत असलेली गैरसोय हा देखील काळ्या पैशाच्या विरोधातील लढाईत एकवटण्याचा भाग असल्याचे म्हटले आहे .

हफिंग्टन पोस्ट , द टाईम्स ऑफ इंडिया यांच्या संकेतस्थळावर आणि सी व्होटरचे व्यवस्थापकीय संचालक- संपादक यशवंत देशमुख यांच्या ट्विटर हॅन्डलवर यासंदर्भात मंगळवारी रात्री तपशील प्रसिद्ध झाले आहेत.

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹आता अॅपच्या माध्यमातून पैसे मागताही येणार, NPCI कडून नवे अॅप विकसित

निश्चलनीकरणानंतर जास्तीत जास्त लोकांनी इलेक्ट्रॉनिक किंवा ऑनलाईन माध्यमातून पैशांचे व्यवहार करावेत, यासाठी केंद्र सरकारकडून विविध पातळ्यांवर प्रयत्न करण्यात येत आहेत. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने नवे अॅप विकसित केले असून, या माध्यमातून आता राष्ट्रीयकृत बॅंकांच्या ग्राहकांना पैशांचे व्यवहार पूर्ण करता येणार आहेत. विशेष म्हणजे आतापर्यंत उपलब्ध असलेल्या विविध अॅप्समध्ये केवळ पैसे पाठविण्याची सुविधा उपलब्ध होती. मात्र, या अॅपमध्ये समोरच्या व्यक्तीकडून पैसे मागण्याची आणि ते आपल्या खात्यामध्ये जमा करून घेण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे समोरच्या व्यक्तीच्या खात्यामधून आपल्या खात्यात पैसे वळते करून घेता येणार आहेत.

केंद्रीय अर्थसचिव शक्तिकांत दास यांच्या नेतृत्त्वाखाली बुधवारी नवी दिल्लीमध्ये एक पत्रकार परिषद घेण्यात आली. या परिषदेमध्ये केंद्र सरकारने निश्चलनीकरणानंतर केलेल्या वेगवेगळ्या उपाययोजनांची आणि त्यासंदर्भातील आढाव्याची माहिती दिली. याच पत्रकार परिषदेत नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्यांनी या नव्या अॅपबद्दल माहिती दिली. राष्ट्रीयकृत बॅंकेमधील तुमचे कोणतेही खाते या अॅपला जोडता येणार आहेत. प्रत्येक बॅंकेसाठी वेगवेगळे अॅप असेल. जर तुमचे पीएनबी बॅंकेमध्ये खाते असेल, तर तुम्हाला पीएनबी यूपीआय (यूनिफाईड पेमेंट इंटरफेस) अॅप डाऊनलोड करावे लागेल. जर स्टेट बॅंकेत खाते असेल तर एसबीआय यूपीआय अॅप डाऊनलोड करावे लागेल. या दोन्ही बॅंकांमध्ये तुमची खाती असतील आणि त्या दोन खात्यांमध्ये तुम्हाला काही व्यवहार करायचे असतील, तर ते सुद्धा या अॅपच्या माध्यमातून करता येऊ शकतील, असे एनपीसीआयच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

या अॅपचे सर्वांत महत्त्वाचे वैशिष्ट म्हणजे त्या माध्यमातून तुम्ही समोरच्या व्यक्तीच्या खात्यातून पैसे तुमच्या खात्यामध्ये वळते करून घेऊ शकणार आहात. आतापर्यंत केवळ पैसे पाठवण्याची सुविधाच अॅप्समध्ये उपलब्ध होती. हे अॅप त्यापुढे एक पाऊल आहे. उदा. तुम्हाला समोरच्या व्यक्तीकडून ठरावीक रक्कम येणे असेल आणि ती तुम्हाला मागायची असेल, तर तुम्ही अॅपच्या माध्यमातून ती मागू शकतो. समोरच्या व्यक्तीला त्याचा एक एसएमएस जाईल. समोरच्या व्यक्तीने ती रक्कम देण्यास होकार दिल्यावर मागणी केलेली रक्कम थेट तुमच्या बॅंकेच्या खात्यामध्ये लगेचच जमा होईल. गूगल प्लेस्टोअरवरून हे अॅप डाऊनलोड करता येईल.

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹चीनपेक्षा भारतात हवाप्रदूषणाचे जास्त बळी

गेल्या वर्षी चीनपेक्षा भारतात हवा प्रदूषणाने जास्त बळी गेले असा दावा ग्लोबल बिझिनेस बर्डन ऑफ डिसीज प्रोजेक्टच्या अहवालात करण्यात आला आहे. २०१५ मध्ये भारतात चीनपेक्षा ५० जण जास्त मरण पावले असे त्यात म्हटले आहे. २०१५ मधील माहितीनुसार भारतात हवा प्रदूषणाने ३२८० लोकांचा ओझोन संहती व सूक्ष्म कणांमुळे दरदिवशी मृत्यू झाला. चीनमध्ये हे प्रमाण ३२३० होते. २०१० मध्ये अकाली मृत्यूचे प्रमाण चीनमध्ये ते ३१९०, तर भारतात २८६३ होते.

२००५ मध्ये ते चीनमध्ये ३३३२ तर भारतात २६५४ होते. हवा प्रदूषणामुळे होणारे अकाली मृत्यू भारतात दशकभरात २३ टक्क्य़ांनी वाढले. चीनमध्ये उलट परिस्थिती असून मृत्यूचे प्रमाण ३ टक्क्य़ांनी कमी झाले आहे. ग्लोबल बिझिनेस बर्डन ऑफ डिसीज प्रोजेक्टच्या अहवालाची मांडणी सियाटलच्या वॉशिंग्टन विद्यापीठाने केली आहे. भारतात अकाली मृत्यूचे प्रमाण वेगाने वाढते आहे. ते दिवसाला १९९० मध्ये २१४० होते ते २०१५ मध्ये ३२८० झाले आहे. गेल्या पंचवीस वर्षांत हवा प्रदूषणाने होणाऱ्या अकाली मृत्यूचे प्रमाण ५३ टक्के वाढले आहे.

चीनपेक्षा ही स्थिती वाईट आहे. तेथे मृत्यूचे प्रमाण १६ टक्के वाढले आहे. ग्रीनपीस इंडियाने स्वतंत्र निवेदनात म्हटले आहे की, आम्ही केलेल्या संशोधनाशी हे निष्कर्ष मिळतेजुळते आहेत व सूक्ष्म कणांचे प्रमाण भारतात चीनपेक्षा जास्त वाढले आहे व त्यावर तातडीने कृतीची गरज आहे. चीनने हवाप्रदूषणावर कडक नियमांची अंमलबजावणी केली आहे व भारतातही ती होण्याची गरज आहे असे ग्रीनपीसचे सुनील दहिया यांनी सांगितले.

उपग्रहातून चीन व भारताच्या घेतलेल्या प्रतिमा बघितल्या असता भारतावर हवाई प्रदूषण जास्त तर चीनमध्ये कमी दिसते आहे. चीनमधील प्रदूषण २००५ ते २०१६ या काळात कमी झाले आहे. भारतात मात्र ते वाढतच चालले आहे.

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹‘ट्रान्स पॅसिफिक पार्टनरशिप’ करारातून सत्ता स्वीकारताच पहिल्या दिवशी माघार

ट्रान्स पॅसिफिक पार्टनरशिप (टीपीपी) करारातून माघार घेण्याचे सूतोवाच अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले आहे. जगातील हा सर्वात मोठा व्यापार करार मानला जातो.

 कामासाठी व्हिसा देण्याच्या कार्यक्रमातील गैरप्रकार शोधून काढले जातील, कारण त्यामुळे अमेरिकी लोकांच्या नोक ऱ्यांवर गदा आली आहे असे त्यांनी सूचित केले.

व्हाइट हाऊसमध्ये आल्यानंतर पहिल्या शंभर दिवसातील धोरणात्मक योजना त्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून जाहीर केल्या. टीपीपी करार अमेरिकेसाठी घातक असून २० जानेवारीला अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेताच या करारातून बाहेर पडू , असे त्यांनी सांगितले. व्यापार, ऊर्जा, नियमन, राष्ट्रीय सुरक्षा, स्थलांतर, नैतिक सुधारणा या मुद्दय़ांवर भर देऊन अमेरिकेला सर्वोच्च स्थान मिळवून देण्याचा प्रयत्न राहील.
पोलाद, मोटारींची निर्मिती, रोगांवर इलाज यासह सर्व क्षेत्रात मला अमेरिका पुढे दिसली पाहिजे. एवढेच नव्हे, तर प्रत्येक क्षेत्रात मला नवीन कल्पना अमेरिकेतच पुढे येत आहेत असे चित्र दिसले पाहिजे.

 आम्ही अमेरिकेसाठी संपत्ती व तेथील लोकांसाठी नोक ऱ्या निर्माण करणार आहोत. स्थलांतर नियमांमुळे काही नोक ऱ्या अमेरिकेच्या ताब्यातून गेल्या आहेत, त्या परत आणण्याला प्राधान्य देणार असल्याचे त्यांनी सांगितले. २०१५ मध्ये अमेरिका, जपान, मलेशिया, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, कॅनडा व मेक्सिको या देशांनी टीपीपी करारावर स्वाक्षऱ्या केल्या होत्या, पण आता या ऐतिहासिक करारातून अमेरिका बाहेर पडणार आहे असे ट्रम्प यांनी सांगितले. जपानचे पंतप्रधान शिन्झो अॅबे यांनी मात्र अमेरिकेच्या सहभागाशिवाय हा करार निर्थक असल्याचे म्हटले होते. व्हिसा कार्यक्रमातील गैरप्रकार शोधण्याचे आदेश कामगार विभागांना दिले जातील कारण त्यामुळे अमेरिकी लोकांचे रोजगार गेले आहेत, असे ट्रम्प यांनी सांगितले. त्यामुळे आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या भारतासह इतर परदेशी व्यक्तींची छाननी होणार आहे. ट्रम्प यांचे अॅटर्नी जनरल जेफ सेशन्स हे ‘एच १ बी व्हिसा’ कार्यक्रमाचे जुने टीकाकार आहेत.

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹मंत्रिमंडळाने 2016-17 हंगामाच्या रब्बी पिकांसाठी सुधारीत MSP मंजूर केले आहे

आर्थिक विषयावरील मंत्रिमंडळाच्या समितीने 2016-17 हंगामाच्या सर्व रब्बी लागवडीसाठी किमान आधारभूत किंमती (Minimum Support Prices -MSPs) मध्ये वाढ करण्यासाठी त्यांची मंजुरी दिली आहे.
यानुसार, गहू - प्रति क्विंटल रु 1625 (100 रुपयांची निरपेक्ष वाढ), बार्ली - प्रति क्विंटल रु 1325 (100 रुपयांची निरपेक्ष वाढ), ग्राम - प्रति क्विंटल रु 4000 (500 रुपयांची निरपेक्ष वाढ), मसूर - प्रति क्विंटल रु 3950 (550 रुपयांची निरपेक्ष वाढ), मोहरी - प्रति क्विंटल रु 3700 (350 रुपयांची निरपेक्ष वाढ) आणि करडई - प्रति क्विंटल रु 3700 (400 रुपयांची निरपेक्ष वाढ).
रब्बी पीक हे भारतातील वसंत ऋतूत कापणी होणारे हिवाळी पीक आहे. याची दरवर्षी ऑक्टोबर च्या शेवटी लागवड केली जाते आणि मार्च-एप्रिल मध्ये कापणी होते. भारतातील रब्बी हंगामातील प्रमुख पीक म्हणजे गहू, बार्ली, मोहरी, तीळ, मटार हे आहेत.

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹राष्ट्रीय घडामोडी संकीर्ण

भारतातील 7500 कि.मी. सागरी किनार्‍याची क्षमता विकसित करणार्‍या आर्थिक विकासाला गती देण्याच्या उद्देशाने महत्वाकांक्षी 'सागरमार्ग' प्रकल्पाचे (27 फेब्रु. 2016) उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उद्घाटन केले.
 
भारतातील सर्वाधिक ई-कचरा असणारे राज्य महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, तामिळनाडू, उत्तरप्रदेश, प.बंगाल.
 
महाराष्ट्र राज्यातील सर्वाधिक ई-कचरा असणारी शहरे मुंबई, नागपूर, पुणे.
 
देशातील पहिले भाषा भवन घुमान (पंजाब) येथे नियोजित.
 
आसाम, पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू या चार राज्यांसह पुदूच्चेरी केंद्रशासित प्रदेशात 2016 मध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत ही घोषणा 4 मार्च 2016 रोजी केंद्रिय निवडणूक आयोगाने केली.
 
आसाम 4 व 11 एप्रिल, पश्चिम बंगाल 4, 11, 17, 21, 25, 30 एप्रिल व 5 मे, केरळ 16 मे तमिळनाडू 16 मे, पुदूच्चेरी 16 मे रोजी मतदार झाले आहे.
 
कोणालाही मत नाही (नोटा) पर्याय साठीही चिन्हाचा वापर करण्यात येणार असून नॅशनल स्कूल ऑफ डिझाइनने या चिन्हाची निर्मिती केली.
 
या निवडणुकीत कुष्ठरोग्यानांही मतदान करता आले यासाठी कुष्ठरोग निवारण केंद्रावरच स्वतंत्र मतदान केंद्राची व्यवस्था करण्यात आली होती.
 
मतदान यंत्रावर उमेदवाराचे नाव आणि निवडणूक चिन्हा सोबतच उमेदवारांच्या फोटोचाही समावेश करण्यात आला आहे.
 
संसदेत एकूण 12 टक्के महिला खासदार आहेत. लोकसभेत महाराष्ट्रातून 3 महिला खासदार आहेत. राज्याच्या विधानसभेत 19 महिला आमदार आहे.

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹'युनो'तील दूत म्हणून निक्की हेली यांचे नामांकन

अमेरिकेचे नियोजित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दक्षिण कॅरोलिनाच्या भारतीय वंशाच्या गव्हर्नर निक्की हेली यांचे अमेरिकेच्या संयुक्त राष्ट्रातील (युनो) दूत म्हणून नामांकन केले आहे.
 
नियोजित अमेरिकी प्रशासनात कॅबिनेट दर्जाच्या पदावर नियुक्त होणाऱ्या त्या पहिल्या भारतीय-अमेरिकी नागरिक असतील. गव्हर्नर हेली यांनी राज्य व देशाच्या भल्यासाठी महत्त्वपूर्ण धोरणे राबविण्याकरिता लोकांना एकजूट करण्याची कामगिरी केली असल्याचे ट्रम्प म्हणाले.
 
तसेच त्या जागतिक पातळीवर प्रतिनिधित्व करीत एक मोठ्या नेत्या म्हणून नावारूपाला येतील, अशा शब्दांत ट्रम्प यांनी त्यांची प्रशंसा केली. ट्रम्प यांनी वरिष्ठ स्तरीय प्रशासनासाठी निवडलेल्या हेली पहिल्या महिला आहेत.

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹नासाच्या हबल दुर्बिणीच्या सहाय्याने मेकमेक ह्या ग्रहाचा शोध लावला.

मेकमेक ग्रहाभोवती फिरणारा चंद्र हा 13 हजार मैलावर आहे. त्याचा व्यास 100 मैल आणि 870 मैल रुंद आहे. तसेच या चंद्राला एमके-2 असे टोपणनाव देण्यात आले आहे. त्याची दृश्यमानता मेकमेकपेक्षा 1300 पटींनी कमी आहे.

पहिल्या 100 मध्ये भारतातील एकही विद्यापीठाचा समावेश नाह. अमेरिकेची संस्था 'टाइम्स हायर एज्युकेशन रॅंकिंग' ने जगातील सर्वाधिक प्रतिष्ठेच्या शैक्षणिक संस्थांची 100 देशांची यादी प्रसिद्ध केली.
 
या यादीत हॉवर्ड विद्यापीठ (अमेरिका) प्रथम, मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी व्दितीय (अमेरिका), स्टनफोर्ड विद्यापीठ (अमेरिका) तृतीय क्रमांक, केंब्रिज (लंडन), ऑक्सफर्ड (लंडन) अनुक्रमे चौथ्या व पाचव्या क्रमांकावर आहे. या यादीत आशियातील 18 विद्यापीठे आहेत. जपान विद्यापीठ 12 व्या क्रामांकावर, चीन मधील विद्यापीठ 18, 21 क्रमांकावर आहेत, चीन मधील पाच विद्यापीठ, रशिया तीन विद्यापीठाचा यादीत समावेश आहे. यादीमध्ये अमेरिका आणि ब्रिटनमधील विद्यापीठांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे.

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹तंत्रनिकेतन राज्यात सर्वोत्तम

शासकीय तंत्रनिकेतन नागपूरला राज्यातील सर्वोत्तम स्वायत्त संस्था म्हणून असोसिएशन ऑफ इंडियन कम्युनिकेशन मल्टीमिडीया अॅण्ड इनफ्रास्ट्रक्चरने आयोजित केलेल्या महाराष्ट्र शिक्षण शिक्षण परिषदेन पुरस्कार प्रदान करण्यात आला.

मुंबईत झालेल्या कार्यक्रमात अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेचे अध्यक्ष डॉ. अनिल सहस्त्रबुद्धे यांच्या हस्ते तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ. सी.एस. थोरात यांना पारितोषिक व मानचिन्ह प्रदान करण्यात आले. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालय, अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद, असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीज, एनआयएलटीटी, माहिती व तंत्रज्ञान मंत्रालय, अपारंपारिक उर्जा मंत्रालय आणि लघी व मध्यम उद्योग मंत्रालयाच्या संयुक्त विद्यमाने पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यात नागपुरातील शासकीय तंत्रनिकेतन संस्थेला सर्वोत्कृष्ट संस्था म्हणून सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्रातील एकमेव शासकीय संस्थेला हा पुरस्कार मिळाला आहे.

नागपुरातील तंत्रनिकेतनची स्थापना १९१४ मध्ये झाली होती. तेव्हापासून अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान शिक्षणाच्या प्रचार आणि प्रसार कार्यात संस्था कार्यरत आहे. या संस्थेने विविध बहुराष्ट्रीय कंपन्यांसोबत सहयोग करार करीत अभ्यासक्रम आणि कौशल्य ज्ञानाच्या विकासावर कार्य केले आहे. उद्योगांना आवश्यक असणारे कुशल मनुष्यबळ विकास करण्यात नागपूर तंत्रनिकेतन आघाडीवर असल्यानेच राष्ट्रीय पुरस्काराकरिता निवड करण्यात आली. या पुरस्काराबाबत सहसंचालक गुलाबराव ठाकरे व संस्थेचे प्राचार्य डॉ. सी. थोरात यांनी संस्थेतील प्राध्यापक व कर्मचारी वर्गाचे अभिनंदन केले आहे.

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹भारत - जपान आण्विक करार अमेरिकेबरोबरच्या कराराप्रमाणे

नवी दिल्ली - नुकताच झालेला भारत- जपान आण्विक करार हा अमेरिकेबरोबरच्या आण्विक कराराप्रमाणेच असल्याचे सरकारने आज संसदेत सांगितले . लोकसभा आणि राज्यसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जपान दौऱ्याबाबत दिलेल्या लेखी उत्तरात ही माहिती देण्यात आली आहे .

परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री एम . जे. अकबर यांना राज्यसभेत गोंधळामुळे याचे वाचनही करता न आल्याने त्यांनी सभागृहाच्या टेबलावर हे लेखी उत्तर ठेवल्याची माहिती सूत्रांनी दिली .

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹भारतात दत्तक मुलं घेण्याचं प्रमाण सर्वाधिक, महाराष्ट्र आघाडीवर

गेल्या काही दिवसांपासून भारतात मुलं दत्तक घेण्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. महाराष्ट्र राज्यही मुलं दत्तक घेण्यात आघाडीवर आहे. 2015-16 या वर्षात महाराष्ट्रात आतापर्यंत 724 मुलं दत्तक घेण्यात आली आहेत. तर त्यापाठोपाठ कर्नाटक राज्यात 273 मुलं दत्तक घेण्यात आली आहेत. तसेच तेलंगणा राज्यातही 240 मुलांचं पालकत्व स्वीकारण्यात आलं आहे. ओडिशा राज्यातही 230 मुलांना दत्तक घेण्यात आलं आहे, अशी माहिती ओडिशा राज्यातील दत्तक संसाधन एजन्सीनं प्रसिद्ध केली आहे.

उत्तर भारतातल्या पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये मुलं दत्तक घेण्याचं प्रमाण फार कमी आहेत. भारतातल्या जवळपास 3677 मुलांचं पालकत्व भारतीय पालकांसह विदेशातील पालकांनी स्वीकारलं आहे. दरम्यान, केंद्रीय दत्तक संसाधन प्राधिकरणानं दिलेल्या अहवाल विसंगत आहे. देशात मुलं दत्तक घेण्यासाठी फारच कमी आहेत. अहवालानुसार दत्तक घेण्यासाठी मुलं मागणीनुसार 1/4 तृतीयांश उपलब्ध आहेत, अशी माहिती या अहवालात आहे. "भारत हा एक विशाल देश आहे. प्रत्येक जण अनाथ आणि सोडलेली हजारो मुलं दत्तक घेत असतो", अशी माहिती केंद्रीय दत्तक संसाधन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार म्हणाले आहेत.

भारतात मुलं दत्तक देणा-या जवळपास 425 एजन्सी आहेत. त्या मुलं दत्तक घेण्याची प्रक्रिया व्यवस्थितरीत्या समजावून सांगतात. केंद्रानं 2015पासून ई-गव्हर्नन्स लागू केलं आहे. या माध्यमातून आपल्याला ऑनलाइन पद्धतीनं दत्तक घेण्याची प्रक्रिया पूर्ण करता येते. दत्तक नोंदणीकृत मुले आणि अवलंब शोधत पालक यांचीही माहिती देण्यात आली आहे. तुम्हाला मुलं दत्तक घ्यायचं असल्यास तुम्ही आधी ऑनलाइन नोंदणी करणं गरजेचं असतं. सर्व माहिती टाकल्यानंतर तुम्हाला युझऱ नेम आणि पासवर्ड मिळेल, अशी माहिती कुमार यांनी दिली आहे.

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹दोन वर्षांत लोकपालांची नियुक्ती का नाही?

केंद्र सरकारने गेल्या दोन वर्षांत लोकपालांची नियुक्ती का केली नाही, असा सवाल बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने केला आणि याबाबत करण्यात आलेल्या कायद्याचे आम्ही कलेवर होऊ देणार नाही, असेही न्यायालयाने सरकारला खडसावले.
सरन्यायाधीश टी. एस. ठाकूर यांच्या नेतृत्वाखालील पीठाने स्पष्ट केले की, तीव्र संघर्षांनंतर लोकपाल कायदा मंजूर करण्यात आला, त्यामुळे विद्यमान सरकारची इच्छा नसली तरी लोकपालांची नियुक्ती केलीच पाहिजे. सरकारने आतापर्यंत यामध्ये सुधारणा का केली नाही, असे खंडपीठाने म्हटले आहे.

लोकपाल संस्था कधी कार्यान्वित होईल याबाबत अॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांच्याकडे पीठाने मुदत मागितली. लोकपाल कायदा २०१४ मध्ये मंजूर होऊनही अद्याप लोकपालांची नियुक्ती करण्यात आली नाही या स्थितीबाबत सरकारला काहीच वाटत नाही, अशी विचारणाही पीठाने रोहतगी यांच्याकडे केली.

विद्यमान सरकारने, भ्रष्टाचाराने पोखरलेली यंत्रणा स्वच्छ करण्याचे ठरविले असतानाही दोन वर्षे होऊनही लोकपालांची नियुक्ती का करण्यात आली नाही, त्यामुळे लोकपालसारख्या संस्थेचे आम्ही कलेवर होऊ देणार नाही, असेही पीठाने यावेळी बोलताना स्पष्ट केले.
आपल्याला बदल हवा आहे. मात्र आपण लोकपालंची नियुक्ती करत नाही. केंद्र सरकारने लोकपालसाठी अंतिम तारीख ठरवण्याची गरज आहे, असे न्यायालयाने म्हटले आहे.

लोकपाल विधेयकामध्ये संशोधन करायचे असल्याने हे विधेयक प्रलबिंत आहे. कायद्यानुसार, समितीमध्ये विपक्ष नेता आवश्यक आहे. मात्र सध्या असा नेता नाही. त्यामुळे सर्वात मोठय़ा पक्षाचा नेता समितीमध्ये सहभागी करण्यासाठी विधेयक प्रलंबित आहे, असे सरकारने यावर उत्तर देताना म्हटले आहे. आता यावरील पुढील सुनावणी ७ डिसेंबरला होणार आहे.

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹जगाच्या तुलनेत भारताची संपत्ती घटली

भारतातील एकूण संपत्ती 0.8 टक्क्यांनी म्हणजे 26 अब्ज डॉलरने कमी होऊन तीन लाख कोटी डॉलरएवढी झाली आहे. आंतरराष्ट्रीय आर्थिक सेवा देणारी कंपनी क्रेडिट स्यूसच्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे. भारताचा एकूण जागतिक संपत्तीत 1.2 टक्के वाटा आहे.

मुंबई: भारतातील एकूण संपत्ती 0.8 टक्क्यांनी म्हणजे 26 अब्ज डॉलरने कमी होऊन तीन लाख कोटी डॉलरएवढी झाली आहे. आंतरराष्ट्रीय आर्थिक सेवा देणारी कंपनी क्रेडिट स्यूसच्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे. भारताचा एकूण जागतिक संपत्तीत 1.2 टक्के वाटा आहे.

क्रेडिट स्यूस संशोधन संस्थेने संपादित केलेल्या 'जागतिक संपत्ती अहवालात' 2000 ते 2016 दरम्यान जगातील विविध देशांमधील संपत्ती आकडेवारी मांडण्यात आली आहे. त्यानुसार, भारतातील संपत्ती (डॉलरमध्ये) 2016 मध्ये 0.8 टक्क्याने घसरून 3.099 लाख कोटी डॉलरएवढी झाली आहे. चलनाचे अवमूल्यन हे त्यामागील प्रमुख कारण आहे.

भारतीयांच्या संपत्तीचे सरासरी प्रमाण 3835 डॉलर आहे. मागील 16 वर्षांमध्ये देशातील संपत्तीत वाढ झाली तरी यात प्रत्येकाचा वाटा सारखा नाही हे नमूद करीत देशातील आर्थिक विषमता अधोरेखित करण्यात आली आहे. अजूनही 96 टक्के प्रौढांकडे असलेल्या संपत्तीचे प्रमाण 10 हजार डॉलरपेक्षा कमी आहे. याउलट, केवळ 0.3 टक्के म्हणजे केवळ 24 लाख लोकांकडे 1 लाख डॉलरपेक्षा अधिक संपत्ती आहे.

प्रत्येक नागरिकावरील सरासरी कर्जाचे प्रमाण 376 डॉलरएवढे आहे. अनेक गरीब भारतीयांसाठी कर्जाची समस्या मोठी असली तरी इतर विकसनशील देशांच्या तुलनेत हे प्रमाण कमीच असल्याचे अहवालात म्हटले आहे.

जगभरातील एक टक्का सर्वाधिक श्रीमंतांमध्ये 2,48,00 भारतीयांचा समावेश आहे. एकूण 2260 प्रौढांकडे 5 कोटी डॉलरपेक्षा जास्त संपत्ती असून 1040 प्रौढांकडे 10 कोटी डॉलरहून अधिक संपत्ती आहे. भारतातील बहुतांश संपत्ती ही प्रॉपर्टी किंवा चल स्वरुपात असल्याचेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, आशियाई-पॅसिफिक प्रदेशातील संपत्ती 4.5 टक्के वाढीसह 80 लाख कोटी रुपयांवर पोचली आहे. त्यापैकी भारत व चीनमधील संपत्ती अनुक्रमे 2.8 टक्के आणि 0.8 टक्क्यांनी घसरुन 23 लाख कोटी डॉलर व 3 लाख कोटी डॉलरएवढी झाली आहे. दोन्ही देशांमधील संपत्तीच्या घसरणीला चलनातील अस्थिरता कारणीभूत असल्याचे या अहवालात म्हटले आहे.

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹एअरटेलने सुरू केली देशातील पहिली पेमेंट बँक

एअरटेल या मोबाईल कंपनीने डिजीटल आणि पेपरलेस बँक सुरू केली असून देशातील ही पहिली पेमेंट बँक ठरली आहे. याद्वारे ग्राहकांना एअरटेलच्या गॅलरीतून रोख रक्कम काढण्याची मुभाही देण्यात आली असून मोबाईल फोनच्या माध्यमातूनही या सेवेचा लाभ घेण्यात येणार आहे. राजस्थानमधून भारती एअरटेलने प्रायोगिक तत्वावर ही बँक सुरू केली आहे. ११ एप्रिल रोजी रिझर्व्ह बँकेने एअरटेल बँकेला पेमेंट बँकेचा परवाना दिला होता. या बँकेतील बचत खात्यातील रकमेवर ७.२५ टक्के या दराने व्याज देण्यात येणार आहे. बँकिग क्षेत्रात एवढ्या मोठ्या प्रमाणात व्याज देण्याची ही पहिलीच वेळ आहे, यापूर्वी अनेक बँकांनी ४ टक्क्यांपर्यत व्याज दिले आहे.

एअरटेलच्या या पेमेंट बँकेच्या पहिल्या टप्प्यात बँकिगविषयक सर्व सुविधांची चाचपणी करण्यात येणार असून त्यानंतरच बँकेची सेवा देशभरात शाखांद्वारे उपलब्ध करून देण्यात येईल. राजस्थानमधील शहरे आणि ग्रामीण भागांतील नागरिकांना एअरटेल रिटेल आउटलेटमध्ये जाऊन बँकेत खातं उघडता येणार असून राज्यातील १० हजार रिटेल आऊटलेट्सच्या माध्यमातून ही सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

 ग्राहकांना मोबाईल फोनच्या माध्यमातूनही बँकिंग सेवेचा लाभ घेता येणार असून बँकेत पेपरलेस खाते उघडण्यासाठी ग्राहकांना आधार कार्ड क्रमांकाच्या मदतीने 'ई-केवायसी' प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹आकाशगंगेच्या प्रभामंडळात फिकट दीर्घिकेचा शोध

आकाशगंगेच्या प्रभामंडळात असलेली बटू उपदीर्घिका सापडली असून ती सर्वात फिकट आहे. त्यातून दीर्घिकांची निर्मिती व कृष्णद्रव्याचे अवकाशातील विखुरणे याबाबत नवीन माहिती मिळणार आहे. या बटू उपदीर्घिकेचे नाव व्हिरगो १ असून ती कन्या तारकासमूहात आहे. जपानच्या टोहोकू विद्यापीठाच्या संशोधकांनी ही दीर्घिका शोधली असून आकाशगंगेच्या प्रभामंडळात अशा अनेक फिकट उपदीर्घिका असू शकतात असे त्यांचे मत आहे. सध्या अशा ५० उपदीर्घिका शोधण्यात आलेल्या असून त्यातील ४० फिकट व ड्वार्फ स्फेरॉइडल गॅलेक्सिज प्रकारातील आहेत. त्यातील अनेक दीर्घिका अलीकडे शोधल्या असून त्यांची प्रकाशमानता उणे ८ आहे. यापूर्वी २.५ ते ४ मीटर व्यासाच्या दुर्बिणीतून दीर्घिका शोधण्यात आल्या आहेत, त्यामुळे जास्त प्रकाशमान दीर्घिका शोधल्या गेल्या आहेत. दूरच्या व कमी प्रकाशमान दीर्घिका यात शोधण्यात आल्या नव्हत्या. आता ८.२ मीटर सुबारू दुर्बीण व हायपर सुप्राइम कॅम उपकरणाने शोध घेतला असता फिकट व बटू दीर्घिका सापडत आहेत. या दोन्ही उपकरणांची माहिती तपासून पाहिली असता कन्या तारकासमूहात जास्त घनतेचे तारे दिसले होते, ते प्राचीन तारका प्रणालीचे निदर्शक आहेत, असे टोहोकू विद्यापीठाचे डायसुक होमा यांनी सांगितले. आता शोधण्यात आलेली दीर्घिका ही फिकट असून तिची प्रकाशमानता उणे ०.८ आहे. होमा यांना व्हिर्गो १ दीर्घिका मसाशी छिबा यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षण करताना सापडली आहे. तिची त्रिज्या १२४ प्रकाशवर्षे आहे. यापूर्वी सेग्यू १ ही फिकट म्हणजे कमी प्रकाशमान दीर्घिका स्लोन डिजिटल स्काय सव्र्हेत, तर सेटस २ दीर्घिका डार्क एनर्जी सव्र्हेत सापडली होती. सेटस २ या दीर्घिकेच्या शोधावर अजून शिक्कामोर्तब होणे बाकी आहे. व्हिर्गो १ ही आतापर्यंत शोधलेली सर्वात फिकट दीर्घिका असून ती सूर्यापासून २ लाख ८० हजार प्रकाशवर्षे दूर आहे. आकाशगंगेच्या प्रभामंडळात अनेक फिकट दीर्घिका असू शकतात, असे छिबा यांनी म्हटले आहे.

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹पाकिस्तान बिथरला, संयुक्त राष्ट्राकडून मागितली मदत

पाकिस्तानच्या प्रत्येक नापाक कृतीला भारताकडून ठोस उत्तर मिळाल्याने बॅकफुटवर ढकलल्या गेलेल्या पाकिस्तानने आता संयुक्त राष्ट्राचे दरवाजे ठोठावले आहेत.  गंभीर स्वरुपातील संकट निर्माण होण्याआधी संयुक्त राष्ट्राने या प्रकरणात हस्तक्षेप करावा, अशी मागणी पाकिस्तानने केली आहे.

यूएनमधील पाकिस्तानच्या राजदूत मलीहा लोदी यांनी संयुक्त राष्ट्राचे उप सरचिटणीस जान इलासन आणि कॅबिनेट सरचिटणीस एडमाँड मूलेट यांची भेट घेतली. 'भारत- पाकिस्तानदरम्यान नियंत्रण रेषेवरील तणावामुळे आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षेला धोका असल्याचा आरोप पाकिस्तानच्या राजदूत त्यांनी यावेळी केला. तसेच भारतच नियंत्रण रेषेवर तणाव निर्माण करत असल्याचा कांगावाही यावेळी करण्यात आला.

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाने गाठली नीचांकी पातळी

नोटाबंदीच्या निर्णयाची धास्ती आणि अन्य कारणांमुळे गुरुवारी डॉलरच्या तुलनेत रुपयाने नीचांकी पातळी गाठली. ३० पैशांनी घसरुन ६८.८६ पैशापर्यंत पोहोचलेल्या रुपयाला सावरण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला हस्तक्षेप करावा लागला.

यापूर्वी २८ ऑगस्ट २०१३ रोजी रुपयाने ६८.८५ पैशांची नीचांकी पातळी गाठून दिवसअखेर ६८.८० पैशांवर बंद झाला होता. आरबीआयच्या हस्तक्षेपानंतर रुपयामध्ये ६८.८३ पैशांची किंचित सुधारणा झाली. या महिन्यात रुपयामध्ये ३ टक्क्यांपर्यंत घसरण झाली आहे. ऑगस्ट २०१५ नंतरची ही मोठी घसरण आहे.

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹फेसबुककडून सेन्सॉर विषयक यंत्रणा निर्मिती

चीनमध्ये पुन्हा शिरकाव करण्यासाठी मजकुराच्या योग्यायोग्यतेचे परीक्षण करण्यास फेसबुकने सेन्सॉर करणाऱया केंद्रासाठी एक साधन बनविल्याचे वृत्त न्यूयॉर्क टाईम्सने दिले आहे. फेसबुकच्या माजी कर्मचाऱयांनी यासंदर्भात स्वतःचे नाव उघड होऊ न देण्याच्या अटीवर असे सांगितले. आम्हाला चीनबद्दल जास्तीत जास्त माहिती घेण्याची उत्सुकता आहे. त्यादृष्टीने सेन्सॉरविषयक उपकरण महत्त्वाचे ठरते. तथापि, यासंदर्भात अद्याप निर्णय घेतला नसल्याची बाब स्पष्ट करण्यात आली. फेसबुकचे प्रमुख कार्यकारी अधिकारी मार्क झुकेरबर्ग यांनी या धोरणास पाठिंबा दिला आहे. त्यासाठी त्यांनी त्या देशाची व नेत्यांची गाठ घेतली आहे. चीनमध्ये 2009 पासून सोशल नेटवर्कवर बंदी घालण्यात आली आहे.

 देशातील स्थानिक कायदे लक्षात घेऊन अमेरिकन इंटरनेट कंपन्या माहिती गोळा करतात. शासनाकडून तक्रार येण्याआधी या साधनामुळे वाट पाहण्याऐवजी उपलब्ध माहितीचा पाठपुरावा करणे शक्मय होणार आहे, असे न्यूयॉर्क टाईम्सच्या बातमीत म्हटले आहे.

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹भारतीय पत्रकार मालिनी सुब्रह्मण्यम यांच्यासह चार पत्रकारांना वृत्तपत्र स्वातंत्र्य पुरस्कार प्रदान

भारतीय पत्रकार मालिनी सुब्रह्मण्यम यांना नक्षलग्रस्त बस्तर भागातून केलेल्या वार्ताकनासाठी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र स्वातंत्र्य पुरस्कार प्रदान करण्यात आला. एकूण चार पत्रकारांना दरवर्षी या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. मालिनी सुब्रह्मण्यम यांना एल साल्वादेरचे ऑस्कर मार्टिनेझ व तुर्कस्थानचे कान डुंदर यांच्यासमवेत पुरस्कार देण्यात आला.

इजिप्तचे सध्या तुरुंगात असलेले छायाचित्रकारअबाऊ झैद ऊर्फ शौकन यांना अनुपस्थितीत पुरस्कार प्रदान करण्यात आला. सुब्रह्मण्यम या स्क्रॉल या संकेतस्थळासाठी काम करीत असून, त्यांनी नक्षलग्रस्त भागात महिलांविरोधात होणारा लैंगिक हिंसाचार, पोलीस व सुरक्षा दले यांच्याकडून होणारा अत्याचार याविरोधात बातम्या दिल्या होत्या. छत्तीसगडमधील बस्तर जिल्हय़ात नक्षलग्रस्त भागात लहान मुलांना होणारा कारावास, बंद पडलेल्या शाळा, न्यायबाहय़ मृत्यू, पत्रकारांना धमक्या असे विषय त्यांनी बातम्यांतून हाताळले.

सुब्रह्मण्यम यांनी सांगितले, की माझे जाबजबाब घेण्यात आले, पोलीस व पोलिसांच्या खबऱ्यांनी छळ केला, माझ्यावर पाळतही ठेवण्यात आली. या परिस्थितीतही मानवी हक्कांच्या उल्लंघनाबाबत व तेथील राजकारणाबाबत बातम्या दिल्या. पोलिसांनी मला माओवाद्यांची हस्तक ठरवण्याचाही प्रयत्न केला.

मार्टिनेझ यांना एल साल्वादोर येथून तीन आठवडे बाहेर जावे लागले, कारण त्यांना पोलिसांनी ठार केलेल्या आठ संशयितांच्या प्रकरणातील चौकशीबाबत धमक्या येत होत्या. दुंदर यांना २६ नोव्हेंबर २०१५ रोजी अटक करण्यात आली होती, कारण सरकारी गुप्तचरांनी सीरियन बंडखोर गटांना शस्त्रे पाठवण्याचा प्रयत्न केल्याबाबत लेख त्यांनी लिहिला होता. सरकारी गुपिते फोडल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. झैद यांना १४ ऑगस्ट २०१३ रोजी अटक करण्यात आली असून, त्यांच्यावर हत्यारे बाळगणे, बेकायदेशीर जमाव जमवणे, खून व खुनाचा प्रयत्न असे आरोप ठेवण्यात आले आहेत.

या चार पत्रकारांनी जीव धोक्यात घालून वृत्तपत्र स्वातंत्र्य जिवंत ठेवले आहे व समाजाला महत्त्वाच्या घटनांबाबत खरी माहिती दिली आहे, असे कमिटी टू प्रोटेक्ट जर्नालिस्ट या संस्थेने पुरस्कारार्थीचा सन्मान करताना म्हटले आहे.

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹छोट्या आकारामुळे नोटांचा छपाईखर्च कमी

एका कागदाच्या तुकड्यातून ४२ नोटांची छपाई शक्य

नोटाबंदीनंतर चलनात आलेल्या नव्या पाचशे आणि दोन हजार रुपयांच्या नोटा ‘व्यापार’ किंवा ‘मोनोपॉली’ या प्रसिद्ध खेळांची आठवण करून देणाऱ्या असल्या तरी, त्यांची निर्मिती तशी करण्यामागे साधे, सरळ गणित असल्याचे दिसून आले आहे. नोटा आकाराने छोट्या असल्याने त्यांच्या निर्मितीसाठी कमी रंग लागत आहे. त्यामुळे रिझर्व्ह बँकेच्या खर्चातही बचत होत असून, कमी कालावधीत अधिकाधिक नोटा छापणे शक्य झाले आहे.

‘सध्याच्या दोन हजार आणि पाचशेच्या नोटेचा आकार लहान असल्याने छपाईच्या कागदाच्या एका पूर्ण शीटमध्ये चाळीस नोटा छापता येतात. पूर्वीच्या नोटांचा आकार मोठा असल्याने तेवढ्याच कागदाच्या शीटमध्ये हजार रुपयाच्या ३२ ते ३६ नोटा छापल्या जात होत्या,’ अशी माहिती नोटांच्या छपाईशी संबंधित रिझर्व्ह बँकेच्या निवृत्त कर्मचाऱ्याने नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर दिली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अधिक मूल्याच्या नोटांचा आकार कमीच ठेवण्याची कल्पना मूळची रिझर्व्ह बँकेची. बँकेतर्फे सातत्याने ही कल्पना यापूर्वीच्या सरकारांसमोर मांडण्यात आली होती. मात्र, मोदी सरकारने ती उचलून धरली.

अधिक मूल्याची नोट आकाराने मोठीच असली पाहिजे, हा आपल्या देशात रूढ झालेला समज आहे. यापूर्वी छापण्यात आलेल्या पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटांचा आकार आणि रचना ‘नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड’ या संस्थेच्या मदतीने ठरविण्यात आला होता. मात्र, सध्याच्या नोटांचा आकार पूर्वीच्या नोटांपेक्षा थोडा कमी करण्यात आला आहे. याचे सर्वांत महत्त्वाचे कारण म्हणजे परदेशात छोट्या आकाराच्या नोटा व्यवहारात आहेत. ‘नव्या नोटांचा आकार ठरविण्यासाठी कोणत्याही आंतरराष्ट्रीय संदर्भाची मदत अथवा मत विचारात घेण्यात आलेले नाही. नोटांचा आकार आणि डिझाइन रिझर्व्ह बँक अॅक्ट १९३४ अन्वये निर्धारित करण्यात आला आहे,’ असे रिझर्व्ह बँकेच्या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

नोटांची छपाई

नोटांची छपाई करण्यासाठीची मार्गदर्शक तत्वे रिझर्व्ह बँक अॅक्ट १९३४मध्ये नमूद करण्यात आली आहेत. त्यानुसारच नव्या नोटांची छपाई झाली आहे.

रिझर्व्ह बँक १०,००० रुपयांच्या चलनी नोटाही छापू शकते.

नोटांची सीरीज

पाचशे आणि दोन हजारांच्या नोटा या नवीन महात्मा गांधी सीरीजचा भाग आहेत.

२००५मधील जुनी सीरीज बदलण्यात आली आहे.

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹जगातील पहिली "फ्लोटिंग सिटी'!

आम्हाला एकाच जागी राहायचा कंटाळा आला असेल व जगभर प्रवास करण्याची आवड असेल, तर तुमच्यासाठी "फ्लोटिंग सिटी' हा अगदी योग्य पर्याय आहे. फ्लोरिडातील "फ्रीडम शिप इंटरनॅशनल' या कंपनीने असं जहाज बनविण्याचा प्रस्ताव मांडला आहे. कंपनीने संगणकाच्या मदतीने त्याचे संकल्पचित्रही तयार केले आहे.

हे फ्रीडम शिप पंचवीस मजली असून, त्यात कॅसिनो, आर्ट गॅलरी, पार्क, शॉपिंग सेंटर, हॉस्पिटल, शाळा असं सगळं काही आहे. येथे पन्नास हजार लोक कायमस्वरूपी राहू शकतील. त्याशिवाय, वीस हजार खलाशी, तीस हजार व्हिसिटर्स आणि दहा हजार पाहुणे येथे राहू शकतील. यात सौर ऊर्जा व पवन ऊर्जेचा उपयोग केला जाईल.

जहाजाच्या छतावर विमानतळसुद्धा असेल. एकावेळी 40 प्रवाशांना घेऊन खासगी आणि व्यावसायिक विमाने येथून उड्डाण करू शकतील. हे जहाज अमेरिकेच्या समुद्रातून प्रवासाला सुरवात करेल आणि जगभर प्रवास करून दोन वर्षांनी परतेल.

कंपनीचे संचालक रॉजर गूच म्हणाले, ""फ्रीडम शिप हे "पहिले तरंगते शहर' आणि आजपर्यंतचे सर्वांत मोठे जहाज असेल. यासाठी अंदाजे 10 अब्ज डॉलर खर्च अपेक्षित आहे.''

#eMPSCkatta_Telegram_Updates


NATIONAL

Portugal PM António Costa to be chief guest at 14th Pravasi Bharatiya Divas
Palampur assembly constituency becomes first e-assembly of nation
MASSAI, MTDC to organize Advantage Maharashtra Expo-2017
US Consul General Katherine Hadda calls on AP Chief Minister
Parliamentary panel asks Food dept to complete Aadhaar linkage with ration cards
President recalls Guru Teg Bahadur’s sacrifices
Central team visits Telangana to assess demonetisation situation
Maha govt amendes 2008 liquor prohibition orders

INTERNATIONAL

World Robot Olympiad to be held for the first time in India
Colombia Govt, FARC rebels to sign new peace deal tomorrow

BANKING NEWS

RBI asks banks to ensure adequate cash supply to cooperative, rural Banks
Over two thousand industrialists owe Rs 3.89 lakh crore to banks

BUSINESS NEWS

Railways waives off service tax for booking online tickets

AGREEMENTS &MoUs

India, Switzerland sign Joint declaration on bank account holders

AWARDS

Indian Journalist Malini Subramaniam honoured with International Press Freedom Award
Thailand Princess Sirindhorn to be conferred first 'World Sanskrit Award'
President Obama Awards 21 Presdential Medals of Freedom
Akshaya Mukul wins Shakti Bhatt prize

SCIENCE & TECHNOLOGY

China successfully launches 4th data satellite

OBITUARY

Veteran Carnatic Music exponent Balamurali Krishna passes away
Former ISRO chief MGK Menon passes away
Irish novelist William Trevor dies aged 88
Spanish politician Rita Barbera passes away in Madri
Renowned Hindi & Bhojpuri writer Dr. Viveki Rai passed away

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹 केंद्रीय मंत्रिमंडळाने 62 नवीन जवाहर नवोदयविद्यालयांना मंजूरी दिली

आर्थिक विषयावरील मंत्रिमंडळ समितीने 17 राज्यांमध्ये 62 नवीन जवाहर नवोदय विद्यालय (JNV) उघडण्यास मंजूरी दिली आहे, ज्यामध्ये छत्तीसगड मध्ये दहा, गुजरात मध्ये आठ आणि जम्मू- काश्मीर मध्ये पाच यांचा समावेश आहे. यासाठी 2,871 कोटी रुपये देखील मंजूर करण्यात आले आहे.भारतात सध्या 591 जवाहर नवोदय विद्यालय कार्यरत आहेत. आतापर्यंत, 35 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील 576 जिल्ह्यांमध्ये 598 जवाहर नवोदय विद्यालयांना मंजूरी देण्यात आली आहे.जवाहर नवोदय विद्यालय किंवा नवोदय विद्यालय हा मानव संसाधन विकास मंत्रालयाकडून चालवला जाणारा पुर्णपणे निवासी, यासह शिक्षण, केन्द्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ, नवी दिल्ली शी संबंधित शिक्षण प्रकल्प आहे.

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹भारतामध्ये वर्ल्ड रोबोट ऑलिम्पियाड चे प्रथमचआयोजन

वर्ल्ड रोबोट ऑलिम्पियाड च्या 13 व्या सत्राचे 25-27 नोव्हेंबर 2016 दरम्यान ग्रेटर नोएडा मध्ये आयोजन केले गेले आहे. हे प्रथमच भारतात आयोजित करण्यात येत आहे. 2016 ऑलिम्पियाड ची “रॅप द स्क्रॅप” ही संकल्पना आहे.संस्कृती मंत्रालय आणि इंडिया STEM फाउंडेशन (ISF) च्या वतीने राष्ट्रीय विज्ञान संग्रहालये परिषद (National Council of Science Museums -NCSM) यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन केले गेले आहे.2004 साली वर्ल्ड रोबोट ऑलिम्पियाड पहिल्यांदा सिंगापूर मध्ये आयोजित करण्यात आले होते. मात्र, या स्पर्धेची औपचारिकपणे सन 2003 मध्ये स्थापना केली गेली होती. चीन, जपान, सिंगापूर आणि कोरिया यांना या स्पर्धेचे संस्थापक देश मानले जाते.12 वे वर्ल्ड रोबोट ऑलिम्पियाड नोव्हेंबर 2015 मध्ये दोहा, कतार येथे आयोजित करण्यात आले होते. 2017 साली, ही स्पर्धा कोस्टा रिका येथे आयोजित केली जाईल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा