Post views: counter

Current Affairs May 2016 Part - 4

  • भारत-ओमानमध्ये संरक्षणविषयक करार :

भारत आणि ओमान यांनी (दि.22) द्विपक्षीय संरक्षण संबंध आणखी बळकट करण्याच्या दिशेने पावले टाकली.
 दोन्ही देशांनी लष्करी सहकार्याला चालना देण्यावर लक्ष केंद्रित करताना चार महत्त्वपूर्ण करारांवर स्वाक्षऱ्या केल्या.
 संरक्षण सहकार्य, समुद्रातील गुन्ह्यांना प्रतिबंध, समुद्राशी संबंधित मुद्दे आणि उड्डाण सुरक्षा माहितीची देवाणघेवाण यासंबंधीच्या करारावर स्वाक्षऱ्या झाल्या.
 संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर पहिल्यांदाच मध्य पूर्वेतील जवळचा देश असलेल्या ओमानच्या दौऱ्यावर पोचल्यानंतर हे करार झाले.
 ओमानमधील नेतृत्वाशी झालेल्या चर्चेदरम्यान द्विपक्षीय संरक्षण सहकार्याच्या सर्व मुद्यांवर बोलणी झाली.
 परस्पर हिताच्या दृष्टीने प्रादेशिक विकासावर दोन्ही देशांनी आपली मते मांडली, असे निवेदन संरक्षण मंत्रालयाने प्रसिद्धीस दिले आहे.
 संरक्षण सहकार्य हा द्विपक्षीय रणनीती भागीदारीचा महत्त्वाचा पैलू असल्याची नोंद दोन्ही देशांनी घेतली.
  • ‘नॅक’कडून मूल्यांकनासाठी नवीन पद्धत :

विद्यापीठ आणि महाविद्यालयांच्या मुल्यांकनासाठी ‘नॅक’ने (नॅशनल असेसमेंट अ‍ॅण्ड अ‍ॅक्रेडिटेशन कौन्सिल) नवीन आठ श्रेणी पद्धती (ग्रेडेशन) जाहीर केली असून, त्याची अंमलबजावणी 1 जुलैपासून करण्यात येणार आहे.
 नव्या धोरणानुसार आता ‘ए’ ग्रेडमध्ये सुधारणा करून ‘ए ए प्लस’ आणि ‘ए प्लस प्लस’ असे ग्रेड राहणार आहेत. बंगळुरू येथील ‘नॅक’ संस्थेचे संचालक डी. पी. सिंग यांनी यासंदर्भातील आदेश नुकतेच जाहीर केले आहेत.
 प्रचलित पद्धतीमध्ये ‘नॅक’तर्फे डी (1 ते 1.5 सीजीपीए), सी (1.51 ते 2.00 सीजीपीए), बी (2.01 ते 3.00 सीजीपीए) आणि ए (3.01 ते 4.00 सीजीपीए) असे ग्रेड देण्यात येतात.

Current Affairs May 2016 Part - 3

  • आयसीसीच्या क्रिकेट समितीवर राहुल द्रविडची निवड :

आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीने भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविड आणि श्रीलंकेचा माजी कर्णधार माहेला जयवर्धने यांची क्रिकेट समितीवर निवड केली.
तसेच या समितीच्या कार्याध्यक्षपदी अनिल कुंबळेची फेरनिवड करण्यात आली.
आयसीसीने (दि.13) प्रसिद्धिपत्रकाद्वारे हे निर्णय जाहीर केले. या समितीत ऍण्ड्रयू स्ट्रॉस, केविन ओब्रायन आणि डॅरेन लीमन यांचाही समावेश आहे.
द्रविडने श्रीलंकेच्या कुमार संगकारा, तर जयवर्धने याने मार्क टेलर यांची जागा घेतली.
तीन वर्षांचा कालावधी संपल्यामुळे भारताच्या एल. शिवरामकृष्णन हेदेखील समितीतून बाहेर पडले असून, त्यांच्या जागी टीम मे यांची निवड करण्यात आली.
खेळाडूंच्या बरोबरीने रिचर्ड केटलबोरोघ आणि स्टिव्ह डेव्हिस या पंचांचीदेखील पंच प्रतिनिधी म्हणून या समितीत निवड करण्यात आली आहे.
  • देशातील पहिले बौद्धिक संपदा धोरण मंजूर : 

केंद्रीय मंत्रिमंडळाने सृजनात्मकता, नवोन्मेष आणि उद्यमशीलतेला प्रोत्साहन देण्यासाठी राष्ट्रीय बौद्धिक संपदा अधिकार (आयपीआर) धोरणाला मंजुरी दिली.
राष्ट्रीय बौद्धिक संपदा अधिकाराचे आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक लाभ समाजातील प्रत्येक घटकांपर्यंत पोहोचवत जागरूकता निर्माण करण्याचा त्यामागे उद्देश असल्याचे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी (दि.12) झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीबाबत माहिती देताना सांगितले.
तसेच त्यांनी या धोरणाची सात उद्दिष्ट्येही स्पष्ट केली.
2017 पर्यंत ट्रेडमार्क नोंदणीची मुदत केवळ एक महिन्यासाठी राहील.
बौद्धिक संपदेच्या प्रत्येक स्वरूपाची माहिती देतानाच त्यासंबंधी नियम आणि संस्थांमधील समन्वयाचा ताळमेळ राखण्यावर भर दिला जाईल.

Current Affairs May 2016 Part - 2


  • आता स्थानिक संस्थांना जादा अधिकार :

केंद्र सरकार आणत असलेल्या नवीन बांधकाम नियमावलीमध्ये बांधकाम विषयक जादा अधिकार स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्यात येणार असल्याचे केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू यांनी सांगितले.
 मुंबई महापालिकेच्या वतीने आयोजित व्यावसायिक सुलभता (ईज ऑफ डुइंग बिझनेस) अंतर्गत इमारत बांधकाम प्रस्ताव मंजुरीबाबतच्या कार्यशाळेत ते बोलत होते.
 मानवी हस्तक्षेप कमी केल्याशिवाय नागरिकांना चांगली सेवा देता येणार नाही.
 तसेच त्यामुळे मुंबई महापालिकेने इमारत बांधकाम परवानगीची प्रक्रि या पारदर्शक व सुलभ व्हावी, यासाठी ती संपूर्णपणे डिजिटल प्लॅटफॉर्मवर आणावी, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.
 मुंबई महापालिकेने इमारत बांधकाम मंजुरीच्या प्रक्रियेत आणलेली सुलभीकरण हे देशाच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण पाऊल आहे, यामुळे कामामध्ये पारदर्शकता येण्यास मदत होईल.
 बांधकामांसाठी पर्यावरण, वन, ग्राहक संरक्षण, संरक्षण, नागरी वाहतूक मंत्रालय, रेल्वे मंत्रालय, उद्योग मंत्रालय आदी विविध विभागाच्या परवानग्या लागतात, त्या एकाच ठिकाणी व ऑनलाईन मिळाव्यात, यासाठी केंद्र शासन प्रयत्नशील आहे.
 नव्या नियमावलीमध्ये बांधकाम परवान्याचे काही अधिकार स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्यात येणार आहेत, त्यामुळे प्रक्रिया सुलभ होऊन तीस दिवसाच्या आत परवाने मिळतील.
 तसेच अनिधकृत बांधकामास संबंधित अधिकाऱ्यास जबाबदार धरण्याची तरतूद करण्यात येणार आहे.
 महापालिका आयुक्त अजय मेहता यांनी महापालिकेने बांधकाम मंजुरीच्या सुलभीकरणात केलेले बदल सांगितले.
  • स्टार्टअप गुगलने खरेदी केले ‘सिनर्जाइज’ :

वरुण मल्होत्रा या भारतीय वंशाच्या उद्योजकाने तयार केलेले ‘सिनर्जाइज’ हे टेक्नोलॉजी स्टार्टअप गुगलने खरेदी केले आहे.
 गुगलच्या विविध अॅपचा वापर कसा करावा, याचे प्रशिक्षण देण्यासाठी 2013 मध्ये त्यांनी ‘सिनर्जाइज’ तयार केले होते.
 

Current Affairs May 2016 Part - 1

  • एलपीजी कनेक्शनसाठी ‘उज्ज्वला’ योजनेचा प्रारंभ :

दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना पाच कोटी एलपीजी कनेक्शन(घरगुती गॅस)देण्यासाठी आठ हजार कोटी रुपयांच्या योजनेचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी (दि.1) उद्घाटन केले. तसेच यापूर्वीच्या सरकारांनी गरिबांच्या घरांऐवजी मतपेटींवर लक्ष केंद्रित करीत निव्वळ घोषणा दिल्या होत्या, असा आरोप करतानाच त्यांनी जागतिक कामगारदिनानिमित्त ‘लेबर्स युनाइट द वर्ल्ड’ हा नारा दिला. कामगारदिनाचे औचित्य साधत त्यांनी उत्तर प्रदेशातील बलिया येथे उज्ज्वला योजनेचा प्रारंभ करताना त्यांनी रालोआ सरकारने कामगारांच्या कल्याणासाठी केलेल्या उपाययोजनांची माहिती देत स्वत:ला कामगार क्रमांक एक असे संबोधले. पंतप्रधान उज्ज्वला योजनेंतर्गत दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांतील महिलांच्या नावे मोफत एलपीजी कनेक्शन पुरविले जातील. पहिल्यावर्षी दीड कोटी कनेक्शन दिले जातील, येत्या तीन वर्षांत पाच कोटी गॅस कनेक्शन देण्याचे उद्दिष्ट गाठले जाईल. स्वातंत्र्यानंतरच्या 60 वर्षांत केवळ 13 कोटी गॅस कनेक्शन पुरविण्यात आल्याचे सांगत मोदींनी तुलनात्मक लेखाजोखा मांडला. 2016-17 च्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री अरुण जेटली यांनी या योजनेसाठी दोन हजार कोटी रुपयांची तरतूद केली असून कोणतेही रक्कम जमा न करता गरिबांना गॅस कनेक्शन मिळेल, अशी माहितीही त्यांनी दिली.
  • विश्व तिरंदाजी स्पर्धेत भारताला एक रौप्य, दोन कांस्य :

भारतीय खेळाडूंनी शानदार कामगिरी करीत चीनच्या शांघाय शहरात सुरू असलेल्या विश्व तिरंदाजी स्पर्धेत एक रौप्य आणि दोन कांस्य पदकांची कमाई केली. रिकर्व्ह प्रकारात जर्मनीवर सनसनाटी विजय नोंदवित अंतिम फेरीत दाखल झालेल्या महिला संघाला चायनीज तायपेईकडून 2-6 ने पराभवाचा धक्का बसताच रौप्यावर समा  गोव्याला पर्यटन विकासासाठी 100 कोटीचा निधी :
जगभरातील पर्यटकांची पसंती असलेल्या गोव्यामध्ये राज्य सरकार वर्षभरात अनेक विकास प्रकल्प मार्गी लावणार आहे.केंद्र सरकारने त्यासाठी प्रथमच गोव्याला सुमारे 100 कोटींचा निधी दिला आहे.
गोव्यात सागरी विमान सेवा मार्गी लावण्यासाठी सरकारने पावले उचलली आहेत.
सागरी विमान प्रकल्पाचे एक प्रात्यक्षिकही पणजीत सरकारने करून पाहिले आहे.समुद्रावर उतरू शकणारे विमान हे देश-विदेशातून गोव्यात येणाऱ्या पर्यटकांसाठी मोठे आकर्षण ठरेल.केंद्र सरकारच्या परवानगीनंतर आम्ही सागरी विमान उपक्रम सुरू करू, असे गोवा पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष निखिल देसाई यांनी सांगितले.जमीन व पाण्यावर चालू शकतील, अशी तीन वाहने