Post views: counter

Current Affairs December 2016 Part 4


#eMPSCkatta_Current_Affairs

🔹India vs England: चेन्नईत इंग्लंडला ‘नायर’ वादळाचा तडाखा, करुण नायरची त्रिशतकी खेळी

चेन्नईत इंग्लंडला ‘नायर’ वादळाचा तडाखा बसला. करुण नायर या कर्नाटकच्या युवा खेळाडूने इंग्लंडच्या गोलंदाजांच्या चिंधड्या उडवत कसोटी कारकिर्दीतील आपले पहिलेवहिले त्रिशतक झळकावले आहे. नायरच्या अफलातून खेळीच्या जोरावर भारतीय संघाला इंग्लंडसमोर ७ बाद ७५९ धावांचा डोंगर उभारता आला. भारतीय संघाची एका डावातील ही सर्वोच्च धावसंख्या ठरली आहे. भारतीय संघाकडे २८२ धावांची भक्कम आघाडी आहे. विशेष म्हणजे, आपल्या तिसऱयाच आंतरराष्ट्रीय कसोटी सामन्यात शतक ठोकून त्रिशतकापर्यंत मजल मारणारा करुण नायर हा पहिलाच भारतीय फलंदाज ठरला आहे. करुण नायर याने ३२ चौकार आणि ४ खणखणीत षटकारांच्या जोरावर केवळ ३८३ चेंडूत नाबाद ३०३ धावांची खेळी साकारली. नायरचे त्रिशतक पूर्ण झाल्यानंतर भारताने आपला डाव ७५९ धावांवर घोषित केला. त्यानंतर आजचा दिवसाचा खेळ संपण्यासाठी शिल्लक असलेल्या पाच षटकांमध्ये इंग्लंडला बिनबाद १२ धावा करता आल्या आहेत.

करुण नायरने आज दिवसाच्या सुरूवातीपासूनच आश्वसक खेळी केली. कारकिर्दीतील पहिलेवहिले शतक गाठल्यानंतर उपहारानंतरही त्याने इंग्लंडच्या गोलंदाजांना कोणतीही संधी न देता मैदानात टीच्चून फलंदाजी केली.

 अश्विन, मुरली विजय आणि जडेजा यांनी नायरला साजेशी साथ देत भारताच्या धावसंख्येला आकार दिला. मुरली विजयने सुरूवातीला करुण नायरला चांगली साथ दिली पण नायरचे शतक झाल्यानंतरच्या पुढच्याच षटकात मुरली विजय डॉसनच्या फिरकीवर पायचीत होऊन माघारी परतला. मुरली विजयने यावेळी फक्त २९ धावांचे योगदान देऊ शकला. तिसऱया सत्रात करुण नायरने २५० धावांचा पल्ला गाठल्यानंतर आपल्या पोतडीतील अनोख्या आणि जोरकस फटक्यांचा नजराणा पेश करून उपस्थितांच्या डोळ्याचे पारणे फेडले.

तत्पूर्वी, तिसऱ्या दिवसअखेर भारताने ४ बाद ३९३ अशी मजल मारली होती. कसोटीच्या तिसऱया दिवशी केएल राहुल याने आपल्या सर्वोत्तम कामगिरीचा नजराणा पेश करत १९९ धावांची खेळी साकारून संघाला मोलाचे योगदान दिले. तर करुण नायर याने तिसऱया दिवसाच्या अखेरीस नाबाद ७१ धावा केल्या होत्या. भारताच्या सलामीजोडीने आजच्या दिवसाची सुरवात देखील चांगली केली होती. पार्थिव पटेल आणि केएल राहुल यांनी शतकी भागीदारी पूर्ण करून संघाला मजबूत धावसंख्या उभारून दिली.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹व्यावसायिक हित जोपासल्याप्रकरणी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या प्रमुख ख्रिस्तीना लेगार्ड दोषी

फ्रान्सच्या अर्थमंत्री असताना एका व्यावसायिकाचे आर्थिक हित जोपासल्याबद्दल आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या प्रमुख ख्रिस्तीना लेगार्ड यांना फ्रान्सनमधील न्यायालयाने दोषी ठरवले आहे. मात्र याप्रकरणात लेगार्ड यांना कोणतीही शिक्षा सुनावण्यात
आलेली नाही.

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे प्रमुख होण्यापूर्वी ६० वर्षीय लेगार्ड या फ्रान्सच्या अर्थमंत्री होत्या. उद्योगपती व नंतर मंत्री झालेल्या बर्नार्ड टॅपे यांचे कर्ज व फसवणूक प्रकरण हाताळताना लेगार्ड यांचा प्रत्यक्ष सहभाग असल्याचा आरोप होता. आदिदास या क्रीडा साहित्य निर्मिती कंपनीच्या विक्री समयी टॅपे यांची बँकांमार्फत फसवणूक झाल्याची तक्रार करण्यात आली होती. १९९० ते १९९३ दरम्यान कंपनी दिवाळखोरीत गेल्यानंतर टॅपे यांची आदिदासवरील मालकी संपुष्टात आली. यानंतर २००७ मध्ये ते मंत्री बनले. या वेळी अर्थमंत्री असलेल्या लेगार्ड यांनी टॅपे व संबंधित बँक यांच्यातील लढा लवादाद्वारे सोडविण्याचे आदेश दिले. त्या अंतर्गत टॅपे यांना ४०.४० कोटी युरोची नुकसान भरपाई मिळाली. २००७ च्या निवडणूक मोहिमेत तत्कालीन अध्यक्ष निकोलस सार्कोझी यांना पाठिंबा देणाऱ्या टॅपे यांच्या बाजूने लवादाने निर्णय दिल्याचा आरोप विरोधकांमार्फत करण्यात आला. २००७ ते २०११ दरम्यान अर्थमंत्री असताना लेगार्ड यांनी टॅपे यांना सहकार्य केल्याचाही त्यांचा दावा होता.

कर्तव्यात कसूर केल्याबद्दल आणि व्यावसायिकाचे आर्थिक हित जोपासल्याबद्दल लेगार्ड यांच्याविरोधात फ्रान्समधील न्यायालयात खटला सुरु होता. सोमवारी झालेल्या सुनावणीदरम्यान लेगार्ड या कोर्टात गैरहजर होत्या. लेगार्ड यांनी यापूर्वीही स्वतःवरील आरोप फेटाळून लावले आहेत. मी चांगल्या हेतूनेच निर्णय घेतला असे त्यांच्यावतीने कोर्टात सांगण्यात आले होते. मात्र आता कोर्टाने त्यांना दोषी ठरवले आहे. कोर्टाच्या निकालानंतर लवकरच आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे बैठक होणार आहे. या बैठकीत लेगार्ड यांच्याविरोधातील निकालावर चर्चा होण्याची शक्यता आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹कॅशलेससाठी ग्रामीण भागात १०० एमबी डेटा मोफत द्या, ट्रायची शिफारस

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लेस कॅश इकॉनॉमीला चालना देण्यासाठी भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण अर्थात ट्रायने ग्रामीण भागातील ग्राहकांना मर्यादित स्वरुपात मोफत इंटरनेट डेटा देण्याची शिफारस केली आहे. ग्रामीण भागात प्रति महिना १०० एमबी इंटरनेट डेटा मोफत देता येऊ शकतो असे ट्रायने म्हटले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीनंतर आता लेस कॅश इकॉनॉमी म्हणजे व्यवहारात कमी रोकड असलेली अर्थव्यवस्था निर्माण करण्याचा संकल्प जाहीर केला आहे. केंद्र सरकारने डिजिटल व्यवहारांसाठी सवलतीही जाहीर केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर ट्रायनेही ई पेमेंटला चालना देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. ग्रामीण भागातील ग्राहकांना डिजिटल व्यवहारांकडे आकर्षित करण्यासाठी त्यांना प्रत्येक महिन्याला मर्यादित स्वरुपात मोफत इंटरनेट डेटा देता येईल.

 उदाहरणार्थ प्रत्येक ग्राहकाला १०० एमबीचा मोफत डेटा देता येऊ शकेल असे ट्रायने म्हटले आहे. यासाठी येणारा खर्च युनिव्हर्सल सर्व्हिस ऑब्लिगेशन फंडच्या (यूएसओएफ) माध्यमातून केला जाऊ शकतो असे ट्रायच्या शिफारशीमध्ये म्हटले आहे. यूएसओएफअंतर्गत सरकार ग्रामीण भागात दूरसंचार क्षेत्रासाठी आवश्यक पायाभूत सुविधांचा विकास करते. यासाठी सरकार टेलिकॉम कंपन्यांकडून अतिरिक्त कर आकारु शकते.

मोफत इंटरनेट डेटा द्यायची योजना ही टेलिकॉम ऑपरेटर आधारित असेल. यात टेलिकॉम सर्व्हिस प्रोव्हायडर आणि कंटेट प्रोव्हायडर यांचा संबंध नसेल असे शिफारशीमध्ये म्हटले आहे. अद्याप ट्रायने मोफत इंटरनेट डेटा किती द्यायचा हे मात्र निश्चित सांगितलेले नाही. ट्रायने यापूर्वी फेब्रुवारीमध्ये फेसबुकच्या फ्रि बेसिक्स आणि एअरटेल झिरो या योजनांना विरोध दर्शवला होता. मोफत इंटरनेट डेटा देण्याबाबत मार्गदर्शक नियमावलीही लवकरच जाहीर केली जाईल असे सूत्रांनी सांगितले.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹राज्यात अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत शिक्षा मिळण्याचे प्रमाण ७.६ टक्के

महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा किंवा अॅट्रॉसिटी प्रिव्हेंशन अॅक्ट अंतर्गत गुन्हेगारांना शिक्षा मिळण्याचे प्रमाण ७.६ टक्के असल्याचे एका अहवालानुसार समोर आले आहे. केंद्र सरकारच्या समाज कल्याण मंत्रालयाने ही आकडेवारी जाहीर केली आहे.

आंध्र प्रदेशात ६.३ टक्के, गुजरातमध्ये ३.१ टक्के, कर्नाटकामध्ये ३.५ टक्के ओडिशामध्ये ४.३ टक्के, तामिळनाडूमध्ये ७.५ टक्के आणि तेलंगणामध्ये ७.५ टक्के आणि पश्चिम बंगालमध्ये ३ टक्के शिक्षेचे प्रमाण आहे.

अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत २०१३ ते २०१५ काळात सर्वाधिक प्रकरणांची नोंद राजस्थानमध्ये झाली आहे. या काळात राज्यात सुमारे २३,८६१ प्रकरणांची नोंद झाली आहे. त्या खालोखाल दलितांवर अत्याचारासंदर्भातील गुन्ह्यात उत्तर प्रदेशात (२३,५५६) आणि बिहारमध्ये (२१,०६१) यांचा क्रमांक लागतो.

मध्यप्रदेशात १४,०१६, आंध्रप्रदेशमध्ये ९,०५४, ओडिशामध्ये ८,०८४, कर्नाटकात ७,५६५, महाराष्ट्रामध्ये ६,५४६, तामिळनाडूमध्ये ५१३१ आणि गुजरातमध्ये ३,९६९ प्रकरणांची नोंद झाली आहे. या गुन्ह्यांच्या तपासाचे आणि न्याय मिळण्याचे काम देखील हळु गतीने चालते असे या अहवालात म्हटले आहे. २०१३-१५ या काळात देशभरात एकूण १,३८,०७७ प्रकरणांची नोंद झाली आहे. त्यापैकी केवळ ४३ टक्के प्रकरणांचा निकाल लागला आहे. तर त्यापैकी २५.७ टक्के म्हणजेच ५९,७७९ प्रकरणांमध्ये गुन्हेगाराला शिक्षा झाल्याचे अहवालात म्हटले आहे.

समाज कल्याण मंत्री थावरचंद गेहलोत यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली होती. अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्याअंतर्गत नोंदविण्यात आलेल्या प्रकरणांना जलद न्याय मिळावा या दृष्टीने पाहणी करण्यात आली. या प्रकरणांना न्याय देण्यासाठी देशात या कायद्यांतर्गत केवळ १४ राज्यांत जलदगती न्यायालये आहेत.

तर, दिल्ली, पंजाब, झारखंड, हरियाणा, गोवा, पश्चिम बंगाल, अरुणाचल प्रदेश आणि आसाममध्ये ही प्रकरणे हाताळण्यासाठी जलदगती न्यायालये आहेत की नाही याबाबत कुठलीही माहिती उपलब्ध नसल्याचे म्हटले आहे.
अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार राज्यांना विशेष जलदगती न्यायालये स्थापित करण्याचा अधिकार आहे.

या कायद्याअंतर्गत नुकसान भरपाईची रक्कम वाढवून ८५,००० ते ८,२५,००० रुपये करण्यात आली आहे. ही रक्कम पीडित व्यक्तीला ७ दिवसाच्या आत मिळते की नाही याबाबतची माहिती या समितीला हवी आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹‘देसी गर्ल’ प्रियांका आसाम पर्यटन विभागाची ‘सदिच्छा दूत’ म्हणून मिरवणार

बॉलिवूड चित्रपटांद्वारे प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडल्यावर अभिनेत्री प्रियांका चोप्रा सध्या हॉलिवूडमध्ये आपली छाप उमटविण्याची तयारी करत आहे. सध्या प्रियांका तिच्या ‘क्वांटिको २’ या मालिकेच्या चित्रीकरणामध्ये व्यग्र आहे. यासोबतच ती लवकरच ‘बेवॉच’ या चित्रपटातही झळकणार आहे. अभिनय क्षेत्रात अनेकांच्याच मनावर छाप पाडण्यात यशस्वी ठरलेल्या प्रियांकाची युनिसेफने जागतिक ‘सदिच्छा दूत’ म्हणून नियुक्ती केली होती. त्यानंतर आता आसाम सरकारने प्रियांकाला पर्यटन विभागाची ‘सदिच्छा दूत’ (ब्रँड अॅम्बेसेडर) म्हणून नियुक्ती केली आहे. आसामचे अर्थ आणि पर्यटनमंत्री हेमंत विश्व शर्मा यांनी सोमवारी प्रियांकाची ‘सदिच्छा दूत’ म्हणून नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा केली. २४ डिसेंबरला प्रियांकाला गुवाहाटीला भेट देणार आहे. यावेळी प्रियांकाच्या नियुक्तीची औपचारिकता पूर्ण करण्यात येणार आहे. असे शर्मा म्हणाले.

प्रियांका गुवाहाटीमध्ये आल्यानंतर प्रकल्पाच्या संबंधित व्हिडिओ आणि फोटोशूट केले जाणार असल्याची माहिती देखील त्यांनी शर्मा यांनी यावेळी दिली. प्रियांकाने फक्त भारतातच नव्हे तर परदेशातही आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यामुळे प्रियांका पुढील दोन वर्षासाठी पर्यटन विभागाची सदिच्छादूत म्हणून कार्यरत राहणार असल्याचे ते म्हणाले. या दोन वर्षात आसामच्या पर्यटन क्षेत्राचा प्रियांका प्रचार करेल. पुढील काही महिने प्रियांकाचे आसाममधील वेगवेगळ्या भागात व्हिडिओ चित्रिकरण आणि फोटोशूट करण्यात येणार आहे. प्रियांकाच्या माध्यमातून आम्ही आसाम पर्यटन क्षेत्राचा जगभर विस्तार करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे शर्मा यांनी प्रियांकाच्या नियुक्तीची घोषणा करताना म्हटले आहे. आसाम पर्यटन क्षेत्रांच्या विकासासाठी सरकार सध्या जागतिक स्तरावर आकर्षक प्रकल्प उभारण्यासाठी नियोजन करत आहे. असे शर्मा यांनी म्हटले आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹बीड जिल्ह्यत महिलांना गर्भाशयाच्या पिशवीच्या कर्करोगाचा विळखा

तपासणी शिबिरात तीनशे पकी ७६ महिलांना बाधा

जिल्हा प्रशासनाने महिलांसाठी बार्शीच्या कर्करोग तज्ज्ञांच्या टीमने केलेल्या आरोग्य तपासणीत तीनशे पकी तब्बल ७६ महिलांमध्ये पिशवीचा कर्करोग असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे.

 ग्रामीण भागात स्वच्छतागृहांची सुविधा नसल्यामुळे बहुसंख्य महिला उघडय़ावर जातात आणि त्यामुळे त्यांच्या आरोग्याचे प्रश्न निर्माण होत असल्याचा आरोग्य तज्ज्ञांचा कयास आहे. यामुळे प्रशासनाने घरोघरी स्वच्छतागृह व्हावे यासाठी जनजागृती सुरू केली आहे. जिल्हा रुग्णालयात महिन्यातील दोन दिवस कर्करोग तपासणीसाठी बाह्यरुग्ण विभागही सुरू करण्यात आला आहे.
बीड जिल्ह्यात मोठय़ा संख्येने ऊसतोडणी मजूर स्थलांतरित होतात. त्यांच्याबरोबर असलेल्या महिलांनाही कुठल्याच आरोग्याच्या सुविधा मिळत नाहीत.

 शेतामध्ये झोपडीत राहत असल्यामुळे उघडय़ावरच शौचालयास जातात. तर ग्रामीण भागात गेल्या पंधरा वर्षांपासून वेगवेगळ्या माध्यमातून हागणदारी मुक्त अभियान राबवले जात असले तरी जिल्ह्यात ३२ टक्क्यांचा आकडाही स्वच्छतागृहांनी पार केला नाही. बहुतांश गावात महिला सडकेच्या कडेला शौचालयासाठी जातात. परिसरात पूर्णपणे दरुगधी असते. याचा महिलांच्या आरोग्यावर मोठय़ा प्रमाणात परिणाम होत असल्याचे दिसत आहे. प्रशासनाने काही महिन्यापूर्वी जिल्ह्यात महिलांसाठी आरोग्य शिबिर राबवले. यात तपासलेल्या तीनशे महिलांपकी तब्बल ७६ महिलांमध्ये पिशवीचा कर्करोग आढळून आला. हे प्रमाण देशात जास्त असल्याचे सूत्रांनी सांगितले. स्त्री भ्रूण हत्येपाठोपाठ महिलांमध्ये कर्करोगाचे प्रमाण जास्त असल्याची बाब समोर आल्याने प्रशासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली. गावागावात स्वच्छतागृह बांधून नागरिकांनी त्याचा वापर करावा यासाठी वरिष्ठ अधिकारी थेट गावात जाऊन वेगवेगळ्या माध्यमातून काम करत आहेत. मात्र नागरिकांकडून फारसा प्रतिसाद मिळत नसल्याने गावांमध्ये पाणंदमुक्तीची केवळ चर्चाच रंगते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव ननावरे यांनी सायकलवर जाऊन अनेक ठिकाणी जनजागृती केली. पहाटेच्या वेळी गावात जाऊन बाहेर जाणाऱ्यांना पुष्पगुच्छ देऊन गांधीगिरीही केली. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे पालकमंत्री असलेल्या जिल्ह्यात शौचालये केवळ ३२ टक्केच असून महिलांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹पक्षांच्या देणग्यांवर आयोगाचा बडगा

राजकीय पक्षांना दोन हजार रुपये आणि त्यापेक्षा जास्त रकमेची निनावी देणगी देण्यावर बंदी घालावी, अशी मागणी निवडणूक आयोगाने केली आहे. निवडणुकांमधील काळ्या पैशाचा ओघ रोखण्यासाठी आयोगाने हे पाऊल उचलले असून त्यासाठी लोकप्रतिनिधी कायद्यामध्ये सुधारणा करण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली आहे.

राजकीय पक्षांना निनावी देणग्या स्वीकारण्यावर सध्या कोणतीही घटनात्मक किंवा वैधानिक मनाई नाही. मात्र १९५१च्या लोकप्रतिनिधी कायद्यानुसार २० हजार रुपयांवरील निनावी देणग्यांची घोषणा करणे पक्षांना बंधनकारक आहे. या कायद्यात सुधारणा करून निनावी देणगीची मर्यादा २० हजारऐवजी दोन हजार रुपये करण्याची मागणी आयोगाने केली आहे. तसेच लोकसभा, विधानसभा निवडणुकांमध्ये काही जागा जिंकणाऱ्या पक्षांनाच करसवलत द्यावी, अशी मागणीदेखील निवडणूक आयोगाने केली आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹पाणीवादासाठी एकच लवाद

देशात राज्या-राज्यांमध्ये नद्यांच्या पाणीवाटपाबाबत असलेल्या सर्व वादांवर तोडगा काढण्यासाठी एकच लवाद स्थापन करण्याचे केंद्र सरकारने ठरवले आहे. सध्याच्या सर्व लवादांचे एकत्रिकरण करून हा नवा लवाद स्थापन केला जाणार आहे. राज्यांमधील वाद वेगाने सोडविण्यासाठी हे पाऊल उचलण्यात येणार आहे.

आंतरराज्य पाणी वाद कायदा, १९५६मध्ये सुधारणा करून हे वाद सोडविण्यासाठी काही नवी खंडपीठे स्थापन करण्याचाही प्रस्ताव आहे. संसदेच्या पुढील अधिवेशनात या सुधारणा सादर केल्या जाण्याची शक्यता आहे. ‘सुप्रीम कोर्टाच्या निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली एकच लवाद असेल. आवश्यकतेनुसार खंडपीठांची स्थापना केली जाईल. वादावर तोडगा निघाल्यानंतर खंडपीठे समाप्त केली जातील,’ असे जलसंपदा मंत्रालयातील सचिव शशी शंकर यांनी सांगितले. ‘अंतिम निर्णय देण्यासाठी लवाद अनेक वर्षे घेतात. मात्र, प्रस्तावित लवाद तीन वर्षांच्या काळात निर्णय देईल,’ असेही शंकर म्हटले आहे.

लवादासोबत वाद निवारण समिती (डीआरसी) स्थापन करण्याचाही प्रस्ताव आहे. या समितीत तज्ज्ञ, धोरणकर्ते यांचा समावेश असेल. लवादाकडे जाण्यापूर्वी ही समिती वाद हाताळेल. ‘राज्यांनी विनंती केल्यास केंद्र सरकार वाद निवारण समितीची स्थापना करेल. बहुतांश वाद या समितीच्या पातळीवरच मिटवले जातील, अशी आम्हाला अपेक्षा आहे. मात्र, राज्याचे समाधान झाले नाही, तर ते लवादाकडे दाद मागू शकतात,’ असेही शंकर यांनी सांगितले.

लवादाला अधिक सक्षम करण्यासाठी या लवादाने आदेश दिल्यानंतर तो आपोआप अधिसूचित (नोटिफाइड) होईल, असेही प्रस्तावित आहे. आतापर्यंत लवादाने दिलेल्या आदेशांना सरकारने अधिसूचित करावे लागते. त्यामुळे या आदेशांच्या अंमलबजावणीत विलंब होतो. १९५६मधील कायद्याच्या सध्याच्या तरतुदींनुसार राज्य सरकारने केंद्राकडे विनंती केल्यानंतर, तसेच केंद्राला ही विनंती पटल्यानंतर लवादाची स्थापना होते.

सध्या आठ लवाद कार्यरत

कावेरी, महादायी, रावी आणि बियास, वंसधारा आणि कृष्णा नदीसह एकूण आठ लवाद सध्या कार्यरत आहेत. सध्या तमिळनाडू आणि कर्नाटक (कावेरी खोरे), गोवा-कर्नाटक-महाराष्ट्र (महादायी), तसेच ओडिशा आणि छत्तीसगड (महादायी) या राज्यांमध्ये नद्यांच्या पाणी वाटपावरून वाद सुरू आहेत.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹न्यूटनच्या पुस्तकाला ३७ लाख डॉलरचा भाव

भौतिकशास्त्रातील ऐतिहासिक गतिविषयक नियम मांडणाऱ्या ब्रिटिश शास्त्रज्ञ आयझॅक न्यूटनच्या पुस्तकाने लिलावामध्येही इतिहास केला आहे. न्यूटनच्या पुस्तकाला तब्बल ३७ लाख डॉलरचा भाव मिळाला असून, आतापर्यंत एखाद्या विज्ञानविषयक पुस्तकाला मिळालेला हा सर्वांत जास्त भाव असल्याचे सांगण्यात येते.

न्यूटनचे गतिविषयक तीन नियम भौतिकशास्त्रामध्ये महत्त्वाचे मानले जातात आणि हे नियम आजही वापरण्यात येत असतात. या पुस्तकासह विविध वैज्ञानिक मांडणी करत, न्यूटनने १६८७मध्ये ‘प्रिन्सिपिया मॅथेमॅटिका’ हे पुस्तक लिहिले होते. हे पुस्तक दुसरा किंग जेम्सला भेट देण्यात आले होते. ‘ख्रिस्ती’ या कंपनीने २०१३मध्ये २५ लाख डॉलरने त्याची खरेदी करत, ते न्यूयॉर्क येथे आणले होते. सुमारे नऊ इंच लांबी व सात इंच रुंदी या आकारात असणाऱ्या पुस्तकामध्ये २५२ पाने आहेत. त्यामध्ये अनेक आकृत्याही आहेत. या पुस्तकाच्या लिलावामध्ये त्याला दहा ते १५ लाख डॉलरची किंमत येण्याचा अंदाज होता. मात्र, एका निनावी व्यक्तीने अपेक्षेपेक्षा चौपट ३७ लाख डॉलरची किंमत देऊन हे पुस्तक खरेदी केले आहे.

न्यूटनच्या लेखनातील हे एकमेव मूळ पुस्तक उपलब्ध होते. ‘प्रिन्सिपिया मॅथेमॅटिका’ची चामड्याच्या बांधणीतील पुस्तकाची प्रत ४७ वर्षांपूर्वी एका लिलावामध्ये विकण्यात आली आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹डॉ. धनंजय दातार यांना 'गल्फ इंडियन एक्सलन्स ॲवॉर्ड'

‘अल अदील ट्रेडिंग’ कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. धनंजय दातार यांचा ‘एनडीटीव्ही’तर्फे ‘गल्फ इंडियन एक्सलन्स ॲवॉर्ड’ पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. दुबई क्रीक हाईट्स येथील हयात रीजन्सी हॉटेलमध्ये झालेल्या समारंभात ‘ओम्नियत प्रॉपर्टीज’चे विक्री व विपणन संचालक मोहम्मद हमीद यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. संयुक्त अरब अमिरातीत रीटेल क्षेत्र सेवांमध्ये दिलेल्या योगदानाबद्दल डॉ. दातार यांना हा पुरस्कार देण्यात आला.

या प्रसंगी डॉ. दातार म्हणाले, 'आम्ही आमचे कामकाज भक्कम बनवून व्यवसायाचा मोठ्या प्रमाणावर विस्तार करत असताना अगदी योग्य टप्प्यावर हा पुरस्कार मिळाला आहे. पुरस्कारामुळे आपली जबाबदारी आणखी वाढत असते. आमच्या ग्राहकांना सामाजिक जबाबदारीच्या भावनेतून अधिक मूल्य मिळवून देण्यासाठी आम्ही यापुढेही प्रयत्नशील राहू. पुरस्काराचे श्रेय अल अदील समूहातील सर्व कर्मचाऱ्यांच्या समर्पित करत असून त्यांच्या सांघिक प्रयत्नांचे हे प्रतिबिंब आहे.'

'मसालाकिंग' म्हणून ओळखले जाणारे डॉ. दातार यांच्या‘अल अदील ट्रेडिंग’ कंपनीने ‘पिकॉक’ ब्रँडखाली ९००० भारतीय उत्पादने संयुक्त अरब अमिरातीत आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. मसाले व पिठे तयार करुन पॅकबंद करण्यासाठी डॉ. दातार यांनी दुबई इन्व्हेस्टमेंट पार्कमध्ये दीड लाख चौरस फुटांचा भव्य प्रकल्प उभारला आहे.

 त्यांच्या उद्योगाची भारतीय शाखा ‘मसाला किंग एक्स्पोर्ट्स’ या नावाने मुंबईत कार्यरत आहे. ‘अल अदील’ समूहाची ३४ सुपर मार्केट्स, २ पिठाच्या गिरण्या व २ मसाल्याच्या गिरण्या असे जाळे दुबई, अबू धाबी, शारजा व अजमान येथे विस्तारले आहे. ‘मसाला किंग एक्स्पोर्ट्स (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड’ या नावाने ते मुंबईतून निर्यात करत असतात. आखाती प्रदेशातील नामवंत व्यक्ती, आघाडीचे भारतीय उद्योजक व व्यावसायिक पुरस्कार प्रदान सोहळ्यात उपस्थित होते.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ थॉमस शिलिंग कालवश

वॉशिंग्टन : नोबेल पुरस्कार विजेते ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ थॉमस शिलिंग यांचे मेरिलँड येथे मंगळवारी निधन झाले. ते ९५ वर्षांचे होते. त्यांचे मित्र व सहकारी रिचर्ड झेकहॉसर यांनी ही माहिती दिली. शिलिंग यांनी हार्वर्ड तसेच मेरिलँड विद्यापीठात प्राध्यापकी केली होती. शिलिंग यांना २००५मध्ये अर्थशास्त्राचे नोबेल देण्यात आले होते. स्पर्धात्मक परिस्थितीत वापरण्यात येणाऱ्या गणितीय गेम थिअरीचा त्यांनी प्रभावी वापर केला होता.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹भारत जगज्जेता

हरजीतसिंगच्या भारतीय ज्युनियर संघाने रविवारी बेल्जियमवर २-१ अशी मात करत ज्युनियर वर्ल्डकप हॉकी स्पर्धेचे जेतेपद पटकावले. हरजीतसिंगच्या या ज्युनियर शिलेदारांनी यंदा दोनवेळा बेल्जियमला नमवण्याची किमया केली; पण रविवारी बेल्जियमवर मिळवलेला विजय भारतासाठी खासमखास होता; कारण हे यश भारतीय ज्युनियर्सना जगज्जेतेपदाचा मान देऊन गेले. भारताने तब्बल १५ वर्षांनी ज्युनियर वर्ल्डकप पटकावला. गगन अजितसिंगच्या नेतृत्वाखाली भारतीय ज्युनियर संघाने २००१मध्ये हा वर्ल्डकप जिंकला होता. भारतीय हॉकी इतिहासातील मोठे अन् महान खेळाडू मेजर ध्यानचंद यांचे नाव देण्यात आलेल्या लखनऊच्या या स्टेडियमवर भारत ज्युनियर हॉकीत पुन्हा जगज्जेता झाला हे विशेष.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹अमेरिकन समोआचे टाउ बेट सौर ऊर्जेवर निर्भर

3 दिवसांपर्यंत पूर्ण बेटाची गरज पूर्ण करण्याएवढी क्षमता

अमेरिकन समोआचे टाउ बेट आता पूर्णपणे सौर ऊर्जेच्या वापरावर निर्भर आहे. टेस्ला कंपनी या पूर्ण बेटाला सौरऊर्जा पुरवत आहे, सोल सिटीने 1.4 मेगावॅट क्षमतेचा सौर मायक्रोग्रिड लावला आहे. या बेटाच्या ऊर्जा विषयक सर्व गरजा पूर्ण करण्यासाठी एवढी वीज पुरेशी आहे. या मायक्रोग्रिडमध्ये 10 टेस्ला पॉवरपॅक्स लावलेले आहेत. हा पॉवपॅक्स म्हणजे कंपनीची मोठी व्यावसायिक बॅटरी असून ते रात्रीच्या वेळी देखील सौरऊर्जा संग्रहण करतात. सौरऊर्जेवर पूर्णपणे निर्भर बेटाचा दर्जा प्राप्त करण्याचे शेय सोलर सिटी कंपनीला जाते. सोमवारीच टेस्लाने या कंपनीचे अधिग्रहण केले होते.

या बेटावर सूर्यकिरणे जमा करण्यासाठी 5328 सौर पॅनल्स लावण्यात आले आहेत. याद्वारे निर्माण झालेली ऊर्जा 3 दिवसांपर्यंत पूर्ण बेटाच्या गरजा पूर्ण करू शकतात. हे पॅनल्स 7 तासांच्या प्रकाशात पूर्णपणे चार्ज होतात. या प्रकल्पाला अमेरिकन समोआ आर्थिक विकास प्राधिकरण, द इन्वायरन्मेंट प्रोटेक्शन संस्था आणि द डिपार्टमेंट ऑफ इंटीरियरने मिळून अर्थसाहाय्य केले आहे. या प्रकल्पाच्या तयारीसाठी केवळ एक वर्षाचा कालावधी लागला आणि मागील आठवडय़ापासून तो कार्यान्वित झाला आहे.

टाउ बेटाची एकूण लोकसंख्या जवळपास 600 एवढीच आहे. अमेरिकेच्या पश्चिम किनाऱयापासून जवळपास 4000 मैलाच्या अंतरावर वसलेले हे बेट आल्या ऊर्जा विषयक गरजा पूर्ण करण्यासाठी आधी पूर्णपणे डिझेल जनरेटर्सवर अवलंबून होते. टेस्ला आपल्या या सोलर बॅटरीचा वापर आणखी अनेक सौरप्रकल्पांमध्ये करत आहे. सोलर सिटी आणि टेस्लाने यावर्षी फेब्रुवारीत हवाईस्थित कौआइ बेटात वीज पोहोचविण्याचा करार केला होता. यासाठी देखील कंपनीने 52 एमएच पॉवरपॅकचा वापर केला. आपण पुढील 20 वर्षांपर्यंत कौआइ बेटासाठी सौरऊर्जेची व्यवस्था करू असे कंपनीने म्हटले. सोलरसिटीने येथे 12 मेगावॅटचा सोलर फार्म बनविला आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹चीन-पाकच्या कॉरिडॉरला रशियाचंही समर्थन

रशियानं सार्वजनिक स्वरूपात पाकिस्तानशी संबंध सुधारण्याच्या आडून भारताला मोठा झटका दिला आहे. उरी दहशतवादी हल्ल्यानंतर भारत दहशतवाद्याच्या मुद्द्यावर पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय स्तरावर एकटं पाडण्याच्या प्रयत्नात होता. मात्र चीनपाठोपाठ आता रशियानं यात खोडा घातला आहे. रशियानं चीन-पाकिस्तानच्या कॉरिडॉरचं समर्थन करत युरेशियन इकोनॉमिक युनियन प्रोजेक्टशी जोडण्याचाही मानस व्यक्त केला आहे.

पाकिस्तानमधले रशियाचे राजदूत एलेक्सी वाई देदोव यांच्या मते, भारत आणि पाकिस्तान सामोपचारानं काश्मीरचा मुद्दा सोडवला पाहिजे, असं वृत्त पाकिस्तानमधल्या जिओ न्यूजनं दिलं आहे. तत्पूर्वी रशियानंही अधिकृतरीत्या चीन पाकिस्तानमध्ये होत असलेल्या आर्थिक कॉरिडॉर(सीपीईसी)मध्ये रशियाला कोणताही रस नाही, असं सांगितलं होतं.

मात्र आता रशियानं अचानक घेतलेल्या यू-टर्नमुळे भारताला मोठा धक्का मानला जातो आहे. भारत हा रशियाचा पारंपरिक मित्र आहे. सीपीईसीमुळे पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळणार असून, क्षेत्रीय संपर्क वाढवण्यात मदत होणार असल्याचं ते म्हणाले आहेत.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹‘प्रथम’च्या संदेशाने आयआयटीत उत्साह

आयआयटी मुंबईकडून नुकत्याच सोडण्यात आलेल्या प्रथम उपग्रहाकडून काही दिवसांपासून संदेश मिळत नव्हते, मात्र १७ डिसेंबरला उपग्रहाने दिवसातून तीन वेळा संदेश दिले. त्यामुळे आयआयटीच्या पवई कॅम्पसमध्ये पुन्हा उत्साह संचारला आहे. हे आतापर्यंतचे सर्वांत शक्तीशाली संदेश असल्याचे उपग्रह टीमचे प्रमुख रत्नेश मिश्रा यांनी सांगितले.

आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेला प्रथम हा उपग्रह नुकताच अवकाशात सोडण्यात आला होता. याचे यशस्वी प्रक्षेपण झाल्यानंतर यातून योग्य संदेश मिळत होते. परंतु एक महिन्यापासून ते बंद झाले.

त्यामुळे संपूर्ण आयआयटी आणि प्रथमची टीम चिंतेत होती. १७ डिसेंबरला सकाळी दोनदा संदेश मिळाले. सिग्नल नेदरलँड, शिकागो, ब्राझील आणि इंडोनेशिया या देशांकडूनही प्रथमचे संदेश फाइल झाल्याचे सांगण्यात आले. त्यांच्याकडून प्रथम कार्यरत असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. सध्या हा उपग्रह ९० मिनिटांत पृथ्वीला एक फेरी पूर्ण करतो. यात पूर्ण जगाचा आढावा घेतला जातो, असे रत्नेश यांनी सांगितले.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹हाँगकाँगला जाण्यासाठी व्हिसा लागणार, विशेष तरतुदीतून भारत वगळला

भारतातून हाँगकाँगला जाण्यासाठी आता भारतीय पर्यटकांना व्हिसा घ्यावा लागणार आहे. याआधी भारतातून हाँगकाँगला जाण्यासाठी व्हिसा लागत नसे. या विशेष तरतुदीतून भारताला वगळण्यात आले आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून भारतीय पर्यटकांना हाँगकाँगला जाण्यासाठी प्री-अराइव्हल रजिस्ट्रेशन किंवा जाण्यापूर्वी नोंदणी करावी लागणार आहे.

भारतीयांना २३ जानेवारीपासून प्री अराइव्हल रजिस्ट्रेशन करावे लागणार असल्याची माहिती हाँगकाँग इमिग्रेशन विभागाने दिली आहे. हाँगकाँगला जाण्यासाठी या नोंदणीचे फॉर्म खुले झाले आहेत असे इमिग्रेशन विभागाने सांगितले.
जर भारतीयांना या हाँगकाँगमध्ये यावयाचे असेल तर त्यांना आधी सर्व प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण करणे अनिवार्य राहील असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

जर समजा तुम्हाला हाँगकाँगच्या विमानतळावरुन विमान बदलून जावयाचे असेल तर या व्हिसाची गरज नाही. जर, ट्रांझिट एरिया सोडून शहरात फिरण्यासाठी जावयाचे असेल व्हिसाची आवश्यकता लागणार आहे. आतापर्यंत, १४ दिवसांपेक्षा कमी काळ हाँगकाँगमध्ये राहण्यासाठी व्हिसाची आवश्यकता नव्हती. हाँगकाँगमध्ये आसरा घेणाऱ्या निर्वासितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत होती त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे म्हटले जात आहे.

निर्वासितांचे कारण पुढे करुन भारतीय पर्यटकांना व्हिसा फ्री प्रवेशापासून वंचित ठेवले जात आहे अशी खंत भारतीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. भारतीय पर्यटकांकडून सर्वाधिक महसूल हाँगकाँगला मिळत असताना असा नियम तयार होणे ही दुःखद बाब असल्याचे अधिकाऱ्यांनी पीटीआयला म्हटले.

दरवर्षी हाँगकाँगला हजारो निर्वासितांचे अर्ज येतात. या निर्वासितांना परवानगी मिळेपर्यंत त्यांना तेथे राहण्याची आणि खाण्याची मोफत व्यवस्था केली जाते.

 भारताव्यतिरिक्त पाकिस्तान, व्हिएतनाम, बांग्लादेश या देशातून अनेक निर्वासित अर्ज करतात. सध्या १०,३३५ जणांनी हाँगकाँगमध्ये आसरा मिळण्यासाठी अर्ज केले आहेत, यापैकी ८० टक्के लोक हे वरील देशांपैकी असतात अशी माहिती इमिग्रेशन विभागाने दिली. इतर देशातील निर्वासितांना रीतसर अर्ज करुन यावे लागते. आतापासून भारताला देखील अर्ज करुनच यावे लागेल असे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹७३ टक्के अविवाहित स्त्रिया नोकरीविनाच!

आज स्त्रिया पुरूषांच्या बरोबरीने सर्वच क्षेत्रात उच्च पदापासून ते सामान्य पदांपर्यंत कामगिरी बजावत आहेत. पण या नोकरी करणाऱ्या स्त्रियांमध्ये विवाहित किती आणि अविवाहित किती, अशी आकडेवारी मांडण्याचा प्रयत्न केला तर अर्थातच अविवाहित स्त्रियांमध्ये नोकरी करण्याचे प्रमाण सर्वाधिक असेल असे आपले सर्वसामान्य अनुमान असेल. मात्र धक्कादायक बाब ही आहे की, सेन्सस २०११ ने प्रसिद्ध केलेल्या एका अभ्यासात अविवाहित स्त्रियांमध्ये नोकरी करण्याचे प्रमाण नगन्य असून ७३ टक्के स्त्रिया जॉबलेस असल्याचे म्हटले आहे.

लग्नानंतर आणि विशेषतः मातृत्वाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर स्त्रियांना घरगुती जबाबदाऱ्यांमध्ये गुंतवून नोकरीसाठी घराबाहेर पडण्यापासून परावृत्त केले जाते. अनेक कुटुंबांमध्ये मुलग्याला पसंती दिली जात असल्याने मुलग्याच्या आग्रहास्तव स्त्रीची गर्भधारणा सुरूच राहते. आणि मग बाळंतपण करता करता नोकरी करण्याची महत्त्वाची वर्षेही निघून जातात. तरीही आर्थिक, सामाजिक आणि लिंगभेदाभेद या समस्यांवर मात करत आज अनेक स्त्रिया आवर्जून अर्थार्जनासाठी बाहेर पडत आहेत.

अविवाहित स्त्रिया मात्र तुलनेने कमी जबाबदारी स्वीकारून उच्च शिक्षणाच्या वाटा धुंडाळताना दिसत आहेत. त्यामुळे त्यांच्यात नोकरीसाठी बाहेर पडण्याचे प्रमाण विवाहित स्त्रियांच्या तुलनेत कमी दिसते. यात तिसरा वर्ग म्हणजे अनियमितपणे किरकोळ स्वरुपाची नोकरी करणाऱ्या विशेषतः वंचित घटकातील स्त्रिया. यांचे प्रमाण पाहता शहरी आणि ग्रामीण भागातील ही दरी अधिक तफावत दर्शविणारी आहे. त्यामागची कारणेही गंभीर स्वरुपाची असल्याचा सेन्सचा अहवाल सांगतो.

विवाहित आणि मातृत्त्व स्वीकारलेल्या १५-४९ वयोगटातील स्त्रियांमध्ये नोकरी करण्याचे प्रमाण अविवाहित स्त्रियांपेक्षा जास्त असून नियमितपणे नोकरी करत आलेल्या स्त्रियांनी मातृत्वाची जबाबदारीही स्वीकारलेली दिसते. पण यात एक कळीचा मुद्दा हा की, 'छोटे कुटुंब, सुखी कुटुंब' संकल्पनेला मानणाऱ्या या स्त्रियाही मुलग्यालाच जन्म देण्याला प्राधान्य देताना दिसल्या. हा विचार स्त्री-पुरुष गुणोत्तर खालाविण्यासाठी पुरेसा आहे. याउलट नोकरी न करणाऱ्या बहुतांश स्त्रियांमध्ये या प्रमाणात बरीच तफावत आढळली. घरगुती कामांना प्राधान्य देणाऱ्या या स्त्रियांनी अनेकदा गर्भधारणा स्वीकारताना लिंगभेदालाही पाठिंबा दिला. त्यांचा हा विचार पारंपरिक मूल्यांचा प्रभाव दर्शविणारा आहे.

मातृत्त्वाची जबाबदारी पेलणाऱ्या गटात नोकरी करणाऱ्या स्त्रियांमध्ये २७ टक्के अविवाहित तर ४१ टक्के विवाहित स्त्रिया आहेत. तज्ञांच्या म्हणण्यानुसार, अविवाहित स्त्रिया या नवतारुण्यात पदार्पण केलेल्या असून काहींचे कुटुंबीय त्यांना नोकरी करण्यास परवानगी नाकारतात, तर काहीजणी उच्च शिक्षण घेणाऱ्या आहेत.

नोकरदार स्त्रियांमध्ये यौवनात आल्यानंतर आई होण्यापर्यंतच्या संपूर्ण काळात मागील दहावर्षांतील मुलांना जन्म देण्याचे एकूण प्रमाण (जन्मदर) ३.३ टक्क्यांवरून २.९ टक्क्यांवर आले आहे. याउलट नोकरी न करणाऱ्या स्त्रियांमध्ये हा जन्मदर २००१ मध्ये ३.२ टक्के होता. तो २०११ मध्ये काहीच अंशी घसरून ३.१ टक्के एवढा झाला. लिंग गुणोत्तराचे प्रमाण मात्र दोन्ही गटात घसरलेले दिसले
तिसऱ्या गटात म्हणजे अनियमितपणे, वर्षातून सहा महिने किंवा प्रासंगिकपणे नोकरी करणाऱ्या स्त्रियांमध्ये आदिवासी, मुस्लिम अशा समाजातील वंचित घटकातील स्त्रियांचे प्रमाण जास्त आहे. या स्त्रियांच्या मुलांना जन्म देण्याच्या दरात आणि मुलग्यांना प्राधान्य देण्याबाबत गंभीर समीकरण पाहायला मिळाले.

 दहावर्षांपूर्वीचा ३.७ टक्के जन्मदर घसरून सध्या तो ३.४ टक्के असला तरी इतर गटांच्या तुलनेत तो अजूनही जास्तच आहे. मुलग्यांना प्राधान्यक्रम देताना गर्भपात न करण्याची काही आर्थिक कारणेही यामागे असू शकतात, असे सेन्ससने म्हटले आहे. पण लिंग गुणोत्तराचे प्रमाण २००१ मध्ये ९११ होते ते २०११ मध्ये ९१४ दिसले. लिंग प्राधान्य गर्भपात या समुदायांमध्ये स्वीकारार्ह नसल्याने हे प्रमाण एवढे दिसते.

भारतात नोकरी करणाऱ्या, न करणाऱ्या किंवा किरकोळ स्वरुपाची नोकरी करणाऱ्या स्त्रियांच्या एकूण प्रमाणात शहरी आणि ग्रामीण दरीही मोठी आहे. ग्रामीण भागातील निम्म्याहून अधिक विवाहित स्त्रिया अर्थाजर्नासाठी बाहेर पडतात तर शहरात हे प्रमाण केवळ २२ टक्के आहे. ग्रामीण स्त्रियांच्या तुलनेत शहरी भागात जन्मदरही घसरलेला दिसतो. 'छोटे कुटुंब, सुखी कुटुंब' संकल्पना शहरी भागात चांगलीच रुजलेली पाहायला मिळते.

नोकरी करणाऱ्या, न करणाऱ्या, किरकोळ नोकरी करणाऱ्या त्यातही विवाहित, अविवाहित वर्गीकरण आकडेवारीसह स्पष्ट करणारा हा इन्फोग्राफही पाहा...

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹टीम इंडियाची चेन्नई कसोटीत ‘साहेबां’वर मात, जडेजाच्या बळींचे ‘सप्तक’

भारतीय संघाने चेन्नई कसोटी तब्बल १ डाव आणि ७५ धावांनी जिंकली असून पाच कसोटी सामन्यांची मालिका भारताने ४-० अशी खिशात टाकली. भारताने मिळवलेल्या २८२ धावांच्या आघाडीचा आकडा देखील इंग्लंडला गाठता आलेला नाही. भारतीय संघाने इंग्लंडला अवघ्या २०७ धावांत गुंडाळले. रवींद्र जडेजाने यावेळी दमदार कामगिरी करत सात विकेट्स मिळवल्या. त्रिशतकी खेळी साकारणारा करुण नायर सामनावीर ठरला, तर संपूर्ण मालिकेत एकूण ६५५ धावा करणाऱया कर्णधार विराट कोहली मालिकावीराचा मानकरी ठरला.

पाचव्या कसोटीत जडेजाच्या फिरकीवर इंग्लंडचे फलंदाजांनी अक्षरश: नांगी टाकली. पाचव्या दिवसाच्या पहिल्या सत्रात इंग्लंडच्या सलामीजोडीने जम बसवला होता. उपहारापर्यंत भारताला एकही यश मिळवता आले नव्हते. त्यामुळे इंग्लंडला ‘व्हाईटवॉश’ देण्याचे स्वप्न अधुरे राहणार अशी चिंता निर्माण झाली होती, पण दुसऱया सत्रात जडेजाने अॅलिस्टर कुक आणि जेनिंग्सची शतकी भागीदारी फोडली. जडेजाने अॅलिस्टर कुक याला ४९ धावांवर पायचीत केले. त्यानंतर जेनिंग्ज देखील ५४ धावांवर जडेजाच्याच फिरकीवर झेलबाद होऊन माघारी परतला. त्यामुळे दुसऱया सत्राची सुरूवात भारतीय संघासाठी आशादायक झाली. पुढे जडेजाने जो रुटला बाद करून संघाला तिसरे यश मिळवून दिले.

 जडेजाच्या फिरकीवर जो रुट पायचीत झाल्याची अपील भारतीय संघाने केली होती. पण पंचांनी त्यास नकार दिला. मग भारताने डीआरएस प्रणालीचा वापर केला. यात भारताला यश प्राप्त झाले असून रिव्ह्यूमध्ये जो रुट बाद नसल्याचे निष्पन्न झाले. विकेट्स मिळवण्यासोबतच जडेजाने आज एक अप्रतिम झेल टीपला. जडेजाने डीप मिड विकेटच्या दिशेने धावत बेअरस्टोचा झेल टीपला आणि इंग्लंडला चौथा धक्का बसला.

तिसऱया सत्रात कसोटीला नाट्यमय वळण मिळाले. जो रुटनंतर मोईन अली जडेजाच्या फिरकीवर मोठा फटका मारताना झेलबाद झाला. तर बेन स्टोक्सला(२३) जडेजाने माघारी धाडले. मग अमित मिश्राने आपली फिरकी जादू दाखवत इंग्लंडच्या डॉसन याला क्लीनबोल्ड करुन शून्यावर बाद केले आहे. भारताने आक्रमक क्षेत्ररक्षणक करत इंग्लंडवर दबाव निर्माण करण्यात यश मिळवले आणि पुढील दोन्ही विकेट्स जडेजाने आपल्या खात्यात जमा करत इंग्लंडवर ऐतिहासिक विजय प्राप्त केला.

तत्पूर्वी, कसोटीचा चौथा दिवस भारताच्या करुण नायरने गाजवला होता. कर्नाटकच्या या युवा खेळाडूने इंग्लंडच्या गोलंदाजांच्या चिंधड्या उडवत कसोटी कारकिर्दीतील आपले पहिलेवहिले त्रिशतक झळकावले. नायरच्या अफलातून खेळीच्या जोरावर भारतीय संघाला इंग्लंडसमोर ७ बाद ७५९ धावांचा डोंगर उभारता आला. भारतीय संघाची एका डावातील ही सर्वोच्च धावसंख्या ठरली आहे. भारतीय संघाने २८२ धावांची भक्कम आघाडी घेतली.

 विशेष म्हणजे, आपल्या तिसऱयाच आंतरराष्ट्रीय कसोटी सामन्यात शतक ठोकून त्रिशतकापर्यंत मजल मारणारा करुण नायर हा पहिलाच भारतीय फलंदाज ठरला. करुण नायर याने ३२ चौकार आणि ४ खणखणीत षटकारांच्या जोरावर केवळ ३८३ चेंडूत नाबाद ३०३ धावांची खेळी साकारली. नायरचे त्रिशतक पूर्ण झाल्यानंतर भारताने आपला डाव ७५९ धावांवर घोषित केला. त्यानंतर आजचा दिवसाचा खेळ संपण्यासाठी शिल्लक असलेल्या पाच षटकांमध्ये इंग्लंडला बिनबाद १२ धावा करता आल्या होत्या.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹२०१७ मध्ये सिंगापूरच्या रस्त्यावर धावणार विनाचालक बस

आधुनिक तंत्राज्ञानाने सज्ज असलेले सिंगापूर जगात अनेक कारणांसाठी प्रसिद्ध आहे. फार कमी कालावधीत सिंगापूरने प्रगती केली. अनेक परदेशी पर्यटकांची पसंती या शहराला आहे. याचवर्षी जगातील महागड्या शहरांच्या यादीत सिंगापूरचे नाव असल्याने हे शहर चांगलेच चर्चेत होते. पण पुन्हा एकदा हे शहर चर्चेत आले आहे. कारण नवीन वर्षात सिंगापूरमध्ये विनाचालक बस धावणार आहे. २०१७ मध्ये पहिल्या तीन महिन्यात ही विनाचालक बस धावणार आहे. १५ प्रवशांची क्षमता असलेली ही बस सुरूवातीला दीड किलोमीटर पर्यंत अंतर कापणार असल्याचे समजते.

‘आर्मा’ म्हणून ओळखली जाणारी ही बस २०१७ मध्ये सिंगापूरच्या रस्त्यावर धावणार आहे. विनाचालक धावणारी ही बस वीजेवर चालणार आहे. तसेच या बसमध्ये बॅटरी देखील आहे तिचा वापर करून अर्धा दिवस ही बस प्रवास करू शकते. या बसमध्ये सेन्सॉर बसवण्यात आले आहे, ज्यामुळे मार्गात येणार अडथळा ही बस सहज ओळखू शकते.

 जीपीएस सुविधाने युक्त अशा या बसमध्ये कॅमेरा देखील बसवण्यात आला आहे. ऑगस्ट महिन्याच्या आसपास सिंगापूरच्या रस्त्यावर ‘नुटोनोमी’ कंपनीने विनाचालक टॅक्सी उतरवल्या होत्या. २०१८ पर्यंत संपूर्ण सिंगापूर शहरातच विनाचालक टॅक्सी उतरवण्याचा या कंपनीचा मानस आहे. पण विनाचालक बस धावणारे सिंगापूर हे काही पहिले शहर नाही. याआधी जून महिन्यात नेदरलँडच्या रस्त्यावर विनाचालक बस धावली होती. मर्सडिज कंपनीने ही बस तयार केली आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹१९ वर्षांची तरुणी विश्वसुंदरी

पोर्टो रिको या कॅरेबियन समुद्रातील छोट्याशा द्वीपसमूहावरील १९ वर्षांची स्टेफनी डेल वॅले हिची रविवारी रात्री येथे झालेल्या दिमाखदार सोहळ््यात ‘विश्वसुंदरी २०१६’ म्हणून निवड झाली. डॉमिनिकन रिपब्लिकची यारित्झा मिग्युलिना रेयेस रमिरेज व इंडोनेशियाची नताशा मॅन्युएला या अनुक्रमे ‘फर्स्ट रनर-अप’ व ‘सेकंड रनर-अप’ ठरल्या.

१९५१ मध्ये ब्रिटनमध्ये सुरू झालेल्या या सर्वात जुन्या जागतिक सौंदर्य स्पर्धेचे यंदाचे ६६ वे वर्ष होते. येथील एमजीएम नॅशनल हार्बरमध्ये झालेल्या अंतिम फेरीत परीक्षकांनी जगभरातील १०० हून अधिक स्पर्धकांमधून स्टेफनीची ‘मिस वर्ल्ड’ म्हणून निवड केली. अंतिम फेरीत तिघींखेरीज केनिया व फिलिपीन्सच्या सौंदर्यवतीही पोहोचल्या होत्या.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹बँक ऑफ अमेरिकेसह पाच विदेशी बँकांना आरबीआयचा दणका, दंडाची कारवाई

नोटाबंदीच्या निर्णयानंतर नवनवे नियम घोषित करणाऱ्या भारतीय रिझर्व्ह बँकेने पाच विदेशी बँकांना दंड ठोठावला आहे. त्यात बँक ऑफ अमेरिका, बँक ऑफ टोकिओ-मित्सुबिशी, डॉएश बँक, बँक ऑफ स्कॉटलंड, स्टॅण्डर्ड चार्टर्ड बँकेचा समावेश आहे. या बँकांवर परकीय विनिमय व्यवस्थापन कायद्याचे (फेमा) उल्लंघन केल्यामुळे रिझर्व्ह बँकेने ही कारवाई केली आहे.

दंडाची कारवाई केलेल्या बँकांनी परकीय विनिमय व्यवस्थापन कायद्यातील (फेमा) नियमांचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे या बँकांवर दंडाची कारवाई करण्यात आल्याचे रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केले आहे. जर्मनीच्या डोएश बँकेला २० हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे. तर बँक ऑफ अमेरिका, बँक ऑफ टोकिओ – मित्सुबिशी, बँक ऑफ स्कॉटलंड आणि स्टॅण्डर्ड चार्टर्ड बँकेला प्रत्येकी १० हजार रुपयांच्या दंडाची कारवाई करण्यात आली आहे. आरबीआयने फेमा १९९९ च्या कलम ११ (३) नुसार ही कारवाई केली आहे. दरम्यान, या सर्व बँकांना आरबीआयने कारणे दाखवा नोटीस बजावली होती. बँकांनी या नोटिशीला लेखी स्वरुपात उत्तर दिले होते. मात्र, बँकांनी दिलेली उत्तरे असमाधानकारक होती. त्यामुळेच दंडाची कारवाई करण्यात आली आहे, असे आरबीआयने सांगितले आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹आसाराम लोमटे यांना साहित्य अकादमी पुरस्कार

‘आलोक’ या कथासंग्रहातून खेड्यातील वास्तवाचे भेदक चित्रण करणारे आसाराम लोमटे यांना साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे. २२ फेब्रुवारीरोजी आसाराम लोमटे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार असून आलोक या कथासंग्रहासाठी त्यांना मराठी भाषेसाठीचा पुरस्कार मिळाला आहे. पुरस्कारासाठी साहित्य अकादमीचा आभारी आहे, शोषण व्यवस्थेच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न मी केला, अशा लेखनासाठी हा पुरस्कार मिळाल्याने मी समाधानी आहे अशी प्रतिक्रिया लोमटे यांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलताना दिली.

‘आलोक’ या कादंबरीत सहा कथांचा समावेश असून कथासंग्रहातून लोमटे यांनी ग्रामीण भागातील वास्तव मांडले होते. या कथासंग्रहाला वाचकांनीही दाद दिली होती. साहित्य अकादमीच्या तीन सदस्यीय समितीने ‘आलोक’ या कथासंग्रहाची साहित्य अकादमी पुरस्कारासाठी निवड केली. १ लाख रुपये रोख आणि मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप असते. कोंकणी भाषेसाठीच्या साहित्य अकादमी पुरस्कारासाठी अॅडविन जे एफ डिसूझा यांची निवड झाली. काले बांगर या कादंबरीसाठी त्यांना पुरस्कार देण्यात आला.

साहित्य अकादमीचे डॉ. के श्रीनिवास राव यांनी मंगळवारी २८ भाषांसाठीचे पुरस्कार जाहीर केले. तर साहित्य अकादमी भाषा सन्मान या पुरस्कारासाठी देशभरातील ६ साहित्यिकांची निवड करण्यात आली. २२ फेब्रुवारीरोजी दिल्लीत साहित्य अकादमी पुरस्कार प्रदान केले जातील.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹भारताची ‘अर्थ’भरारी!; १५० वर्षांत प्रथमच ब्रिटनला टाकले मागे

भारताने अर्थव्यवस्थेच्या आकारमानाच्या बाबतीत ब्रिटनला मागे टाकले आहे. तब्बल १५० वर्षांमध्ये पहिल्यांदाच भारतीय अर्थव्यवस्थेचा आकार ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेपेक्षा मोठा झाला आहे. युरोपियन युनियनमधून बाहेर पडल्याचा फटका ब्रिटनला बसला आहे, तर भारताचा विकास दर वेगाने वाढतो आहे. या दोन्हींचा एकत्रित परिणाम अर्थव्यवस्थेवर दिसून आला आहे. १५० वर्षांमध्ये प्रथमच भारताच्या अर्थव्यवस्थेने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला पिछाडीवर टाकले आहे.

मागील २५ वर्षांमध्ये भारताची अर्थव्यवस्था वेगाने वाढते आहे. मात्र गेल्या वर्षभरात पाऊंडचे मूल्य घसरले आहे. या नाट्यपूर्ण बदलांमुळे भारतीय अर्थव्यवस्थेने ब्रिटनला मागे टाकले आहे, असे फोर्ब्स मासिकाने म्हटले आहे.

 ‘२०२० पर्यंत सकल राष्ट्रीय उत्पन्नात भारत ब्रिटनला मागे टाकेल, असा अंदाज वर्तवण्यात येत होता. मात्र गेल्या १२ महिन्यांपासून पाऊंडची किंमत २० टक्क्याने घसरली आहे. त्यामुळे भारताने ब्रिटनला मागे टाकले आहे. ब्रिटनची अर्थव्यवस्था सध्या २.२९ ट्रिलियन डॉलर इतकी आहे. तर भारताची अर्थव्यवस्था २.३० ट्रिलियन डॉलर इतकी आहे,’ असे फोर्ब्स मासिकाने नमूद केले आहे.

२०११ मध्ये सेंटर फॉर इकॉनॉमिक्स ऍण्ड बिझनेस रिसर्च (सीईबीआर) या अर्थक्षेत्रातील संस्थेने भारतीय अर्थव्यवस्था २०२० मध्ये जगातील पाचवी मोठी अर्थव्यवस्था असेल, असे भाकीत केले होते. मात्र भारताने तीन वर्षांपूर्वीच हा मैलाचा दगड पार केला. ‘यापुढे ब्रिटन आणि भारत यांच्यातील अंतर वाढत जाईल. भारताची अर्थव्यवस्था ६ ते ८ टक्क्यांच्या दराने वाढत जाईल. मात्र ब्रिटनचा विकासाचा दर १ ते २ टक्के असेल,’ असेही फोर्ब्सने म्हटले आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹रायगडसाठी ४०० शेततळ्यांची निर्मिती होणार

राज्यात मागेल त्याला शेततळे मिळणार

राज्यातील पर्जन्यमानावर आधारित कोरडवाहू शेतीची पाणलोट व जलसंधारण माध्यमातून उपलब्धता वाढविण्यासाठी महाराष्ट्र शासनाने यापूर्वी विविध योजनांच्या मध्यमातून अनुदान पद्धतीने शेततळे ही योजना राबवली होती. आता शासन ‘मागेल त्याला शेततळे’ ही वैयक्तिक लाभाची योजना राबवणार आहे. यासाठी रायगड जिल्ह्य़ासाठी चालू वर्षांत ४०० शेततळ्यांचे लक्षांक देण्यात आले आहे. राज्यातील पर्जन्यावर आधारित कोरडवाहू शेतीची पाणलाट व जलसंवर्धन माध्यमातून जलसिंचन उपलब्धता वाढवण्यासाठी रोजगार हमी योजने अंतर्गत वैयक्तिक लाभार्थी योजनेच्या धर्तीवर अनुदान पद्धतीने शेततळी बांधण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला. मुंबई शहर व मुंबई उपनगर हे दोन जिल्हे वगळता राज्यातील उर्वरित सर्व जिल्ह्य़ांमध्ये ही योजना राबविण्यात आली. त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन व उत्पन्नात वाढ होऊन शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत झाली.

 सद्यस्थितीत राज्यातील टंचाईग्रस्त परिस्थिती पाहता व शेतकऱ्यांकडे स्वतची सिंचन व्यवस्था करण्यासाठी मागेल त्याला शेततळे ही योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेत राज्यात ५१ हजार ५०० तळी बांधण्यात येणार आहेत. रायगड जिल्ह्य़ात चालू वर्षांसाठी ४०० तळ्यांचे लक्षांक देण्यात आले आहे.

यासाठी शेतकऱ्यांकडे त्याच्या नावावर कमीत कमी दीड एकर जमीन असणे आवश्यक आहे. यापूर्वी शेततळे, सामुहिक शेततळे अथवा भात खाचरा सोबत तयार होणारी बोडी या घटकांचा शासकीय योजनांमधून लाभ घेतलेल्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.

आणेवारीची अट कोकणासाठी शिथील

या योजनेचा निधी मदत व पुनर्वसन विभागामार्फत उपलब्ध होणार असल्याने मागील पाच वषार्ंत किमान एक वर्षतरी ५० पशापेक्षा कमी पसेवारी जाहीर झालेल्या गावामधील लाभार्थी या योजनेसाठी पात्र असतील. मात्र कोकणात ५० पशांपेक्षा कमी आणेवारी असलेले एकही गाव नाही. त्यामुळे या योजनेत कोकणचा समावेश करण्यात आला नव्हता. ही अट कोकणासाठी शिथील करण्याची मागणी करण्यात आल्यानंतर शासनाने कोकणपुरती ही अट शिथील करून या योजनेत कोकणचा समावेश करण्यात आला.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹रवींद्र जडेजाची झेप! ICCच्या क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर

चेन्नई कसोटीत इंग्लंडचे सात फलंदाज गारद करून भारतीय संघाला आश्चर्यकारक व दणदणीत विजय मिळवून देणाऱ्या टीम इंडियाचे 'सर' रवींद्र जडेजा यानं प्रथमच कारकिर्दीतील नवं शिखर 'सर' केलं आहे. कसोटी सामन्यातील सर्वोत्तम गोलंदाजांच्या आयसीसीच्या क्रमवारीत जडेजानं थेट दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. भारताच्या आर. अश्विननं आपलं पहिलं स्थान अबाधित राखलं आहे.

क्रिकेटच्या मैदानावर सध्या गाजत असलेले जोश हेजलवूड, जेम्स अँडरसन, डेल स्टेन व रंगना हेराथ या गोलंदाजांना मागं टाकून जडेजानं हे स्थान पटकावलं आहे. जडेजाच्या या हनुमान उडीमुळं आयसीसीच्या यादीत पहिल्या दोन्ही क्रमांकावर भारतीय खेळाडू चमकत आहेत. गेल्या ४२ वर्षांतील ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वी, १९७४ साली बिशनसिंग बेदी आणि बी. एस. चंद्रशेखर या जोडीनं आयसीसीच्या यादीतील पहिले दोन्ही क्रमांक पटकावले होते.

अष्टपैलूंच्या यादीतही 'प्रमोशन'

गेल्या काही कसोटी सामन्यांतील कामगिरीमुळं अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीतही जडेजाला एका क्रमांकानं बढती मिळाली आहे. यंदाच्या वर्षात खेळलेल्या ९ कसोटी सामन्यांत जडेजानं ४३ गडी बाद केले. त्याचबरोबर, फलंदाजीत चमक दाखवत तीन अर्धशतकं ठोकली आहेत. त्यामुळं तो चौथ्यावरून तिसऱ्या स्थानावर आला आहे. सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूंच्या यादीतही आर. अश्विनच हाच पहिल्या क्रमांकावर आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹२०१८ पासून सीबीएसई दहावी बोर्ड परीक्षा पुन्हा सुरू

केंद्रीय माध्यमिक शिक्षा मंडळाकडून (सीबीएसई) २०१८ पासून पुन्हा दहावीची बोर्ड परीक्षा सुरू करण्यात येणार आहे. ‘सीबीएसई’च्या सर्वोच्च निर्णय समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे आता या निर्णयाला केवळ केंद्रीय मनुष्यबळ खात्याची परवानगी मिळणे आवश्यक आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यासंदर्भात लवकरच घोषणा करण्याची शक्यता आहे.

 मनुष्यबळ खात्याचा कारभार हाती घेतल्यानंतर जावडेकरांचा हा पहिलाच मोठा निर्णय असेल. सध्या सीबीएसई दहावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाची किंवा शालातंर्गत अशा दोन पर्यायांपैकी एक ऐच्छिक पर्याय निवडण्याची मुभा आहे. काँग्रेस सरकारच्या काळात विद्यार्थ्यांवरी वाढत्या तणावामुळे तत्कालीन शिक्षणमंत्री कपिल सिब्बल यांनी सीबीएसईची बोर्ड परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता.

दरम्यान, मंगळवारी झालेल्या सीबीएसई निर्णय समितीच्या बैठकीत आणखी काही महत्त्वपूर्ण निर्णयही घेण्यात आले. यामध्ये सीबीएसईशी संलग्न देशभरातील १८००० शाळांमध्ये इयत्ता दहावीपर्यंत तीन भाषा विषयांचे शिक्षण सक्तीचे करण्यात येणार आहे. आतापर्यंत केवळ आठवीपर्यंतच भाषा विषय सक्तीचे होते. याशिवाय, सीबीएसईशी संलग्न असलेल्या शाळांच्या प्राचार्यांसाठी पात्रता परीक्षा सुरू करण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला. दरम्यान, सीबीएसची दहावी बोर्डाची परीक्षा पुन्हा सुरू होण्याच्या निर्णयाचा परिणाम महाराष्ट्रात तितकासा जाणवणार नाही. सीबीएसई दहावीची परीक्षा शालांतर्गत परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण अत्यल्प आहे. नव्या शैक्षणिक धोरणातील त्रिभाषा सूत्रानुसार हिंदी भाषिक राज्यातील विद्यार्थ्यांनी हिंदी आणि इंग्रजीशिवाय आणखी एक आधुनिक भारतीय भाषा शिकणे अपेक्षित आहे. तर बिगरहिंदी राज्यातील विद्यार्थ्यांनी हिंदी व इंग्रजीसोबत स्थानिक भाषा शिकणे, अपेक्षित आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹२२ डिसेंबर वर्षातील सर्वात लहान दिवस

पूर्व दिशेला उगवणारा सूर्य आपल्या पृथ्वीच्या आसाच्या तिरपेपणामुळे दररोज उदयस्थान बदलत असतो; परंतु हा फरक काही दिवसांनंतर लक्षात येतो. कधी पृथ्वीचा उत्तर तर कधी दक्षिणी गोलार्ध सूर्यासमोर येतो. यामुळे दिनमानात फरक पडून पृथ्वीवरील विविध वृत्तावरील अक्षवृत्तावर हा फरक कमी जास्त असतो. आपल्या भागात २२ डिसेंबर हा दिवस सर्वात लहान असून, या दिवशी रात्र सव्वातेरा तासांची असणार आहे. या दिवशी सूर्य नेमका मकरवृत्तावर उगवणार आहे.

पृथ्वीचा अक्ष भ्रमण कक्षेशी कललेला असल्याने सूर्याचे भासमान चलन सतत सुरु असते. २१ मार्च व २२ सप्टेंबर या विषूवदिनी सूर्य नेमका पूर्वेस असतो. म्हणूनच या दिवशी दिवस व रात्र समान असतात. २१ जून हा उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस, तर २२ डिसेंबर हा सर्वात लहान दिवस असतो. या उलटस्थिती दक्षीण गोलर्धात पहावयास मिळते. सध्या आपल्याकडे हिवाळा सुरु असून, आकाश बव्हंशी निरभ्रच असते.

 गुरुवार, २२ डिसेंबरची रात्र मोठी असल्याने रात्रीचे वेळी ग्रह, तारे बघण्याचा आनंद घेता येईल. सूर्यमालेतील पृथ्वीवरून मंगळ, बूध, गुरु, शुक्र व शनी हे पाच ग्रह नुसत्या डोळ्यांनी पाहता येतात. सध्या सायंकाळी पश्चिम क्षितीजावर तेजस्वी स्वरुपा शुक्रग्रह दर्शनार्थ सज्ज आहे. २४ डिसेंबरला बुध ग्रहाचा पश्चिमास्त होऊन शनी ग्रहाचे पहाटे पूर्वेस दर्शन घेता येईल.

उत्तरायणास प्रारंभ

२२ सप्टेंबरपासून दिनमानात वाढ होत जाऊन, सूर्याचे उत्तरेकडे सरकणे सुरु होते. या स्थितीला उत्तरायणाचा प्रारंभ असे म्हटले जाते. सूर्य उत्तरेकडे अर्थात आपल्या गोलार्धाकडे येत असून, याच दिवसापासून तापमानात किंचीत वाढ होण्यास प्रारंभ होणार आहे.

पृथ्वीच्या तिरप्या अक्षामुळे दरवर्षी हा खगोलीय अनुभव येतो. २२ डिसेंबर हा सर्वात लहान दिवस राहणार आहे. या दिवशी रात्र मोठी असल्याने आकाशातील ग्रह,ताऱ्यांचे निरीक्षण करण्यासाठी सूवर्णसंधी आहे. - प्रभाकर दोड, खगोल अभ्यासक, निसर्ग शिक्षण कार्यसंस्था, अकोला.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹स्वदेशी क्षेपणास्त्र ‘निर्भय’ची यशस्वी चाचणी

भारताने स्वदेशी आंतरखंडीय क्षेपणास्त्र ‘निर्भय’ची यशस्वी चाचणी केली आहे. अण्वस्त्र वाहून नेण्यास सक्षम या क्षेपणास्त्राची मारक क्षमता 1000 किलोमीटरपर्यंत आहे. शत्रूच्या नजरेपासून वाचत वार करणाऱया या क्षेपणास्त्राची तुलना अचूक लक्ष्य साधण्यासाठी प्रसिद्ध अमेरिकन टोमाहॉक क्षेपणास्त्राशी केली जात आहे.

मागील 3 वषांत निर्भय क्षेपणास्त्र यंत्रणेच्या 3 चाचण्या करण्यात आल्या आहेत. यातील दोन अपयशी ठरल्या तर तिसरी चाचणी आंशिक प्रमाणात यशस्वी मानण्यात आली. बुधवारी ओडिशाच्या व्हिलर बेटावरून चौथ्यांदा याची चाचणी घेण्यात आली.

या क्षेपणास्त्राच्या यंत्रणेचा विकास डीआरडीओच्या ऍडव्हान्स्ड सिस्टीम प्रयोगशाळेने केला आहे. 2010 मध्ये मंजूर हा प्रकल्प 3 वर्षात पूर्ण होणार होता, परंतु भारताला आपल्या साधनसामग्रीवर निर्भर राहून याचा विकास करावा लागला. भारत-रशियाच्या सहकार्याने विकसित ब्राह्मोस क्षेपणास्त्रानेच काम चालवावे लागेल असेही एकवेळ बोलले जात होते. याची मारक क्षमता 290 किलोमीटर एवढीच आहे.

भारताला क्षेपणास्त्र तंत्रज्ञान नियंत्रण गटात जून महिन्यात सदस्यत्व मिळाल्यानंतर झालेलया चौथ्या चाचणीला महत्त्वपूर्ण मानले जात आहे. आता या स्वनातीत क्षेपणास्त्राला सुपरसोनिक क्षेपणास्त्र ब्राह्मोसला पूरक म्हणून पाहिले जात आहे. सध्या या क्षेपणास्त्राच्या दोन उड्डाणांचे निरीक्षण केले जाणार आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹अमुल-मोबिक्विक भागीदारी

नोटाबदलीच्या निर्णयानंतर मोबिक्विक या डिजिटल देयक कंपनीने अमुल या दुग्धजन्य पदार्थांच्या उत्पादक कंपनीबरोबर करार केला आहे. यानुसार देशातील कंपनीच्या विविध भागातील ग्राहकांना डिजिटल माध्यमाच्या सहायातून देयके देता येईल. देशातील नागरिकांना आता अमुल उत्पादने खरेदी करताना सहकारी संस्थेच्या अधिकृत ठिकाणी देयके देण्यासाठी मोबिक्विकचा वापर करता येईल असे मोबिक्विकचे सहसंस्थापक बिपीन प्रित सिंग यांनी म्हटले. यामुळे अमुलच्या एकूण दुकानांपैकी 15 ते 20 टक्के दुकाने डिजिटल होण्याची शक्यता आहे. संपूर्ण भारतात ही सेवा सुरू करण्यात आल्याने 3 लाख किरकोळ दुकानदार आणि 7 हजार पुरवठादारांना ऑनलाईन आणण्याचा प्रयत्न आहे. नोटाबदलीनंतर सध्या डिजिटल व्यवहार मोठय़ा प्रमाणात होत आहेत, असे अमुलचे व्यवस्थापकीय संचालक आर. एस. सोधी यांनी म्हटले.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹प्रफुल पटेल एआयएफएफच्या अध्यक्षपदी बिनविरोध

एआयएफएफ अर्थात, अखिल भारतीय फुटबॉल संघटनेच्या अध्यक्षपदी प्रफुल पटेल यांची सलग तिसऱयांदा बिनविरोध निवड झाली. बुधवारी संघटनेच्या वार्षिक बैठकीत त्यांच्या निवडीवर अधिकृतरित्या शिक्कामोर्तब झाले. संघटनेचा कारभार आपण पारदर्शकपणे चालवू, असे अभिवचन पटेल यांनी यावेळी दिले.

दिल्ली उच्च न्यायालयाने निवडणुकांवरील बंदी मागे घेतल्यानंतर दुसऱयाच दिवशी संघटनेची सर्वसाधारण सभा झाली आणि त्यात प्रफुल पटेल यांना 4 वर्षांची नवी टर्म मिळाल्याचे स्पष्ट झाले. न्यायालय नियुक्त निवृत्त न्या. बिपीन चंद्र कंदपाल यांनी पटेल यांच्या बिनविरोध निवडीची घोषणा केली. माजी केंद्रीय मंत्री राहिलेल्या प्रफुल पटेल यांनी मागील वर्षभरासाठी हंगामी अध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे. प्रदीर्घकाळ सर्वेसर्वा राहिलेले प्रियरंजन दासमुन्शी यांना 2008 मध्ये ह्रदयविकाराचा झटका आल्यानंतर पटेल यांना अध्यक्षपदाची संधी लाभली होती. त्यानंतर ऑक्टोबर 2009 मध्ये ते पूर्णवेळ अध्यक्ष म्हणून रुजू झाले. पुढे डिसेंबर 2012 मध्येही त्यांना मुदतवाढ मिळाली व तीच परंपरा आताही कायम राहिली आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹दिल्लीचे नायब राज्यपाल नजीब जंग यांचा राजीनामा

दिल्लीचे नायब राज्यपाल नजीब जंग यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. जंग यांच्या राजीनाम्याने दिल्लीतील राजकीय चर्चेला उधाण येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून दिल्लीचे नायब राज्यपाल नजीब जंग आणि आम आदमी पक्षाचे संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल या दोघांमध्ये अनेकदा खटके उडाले आहेत. यातच जंग यांनी आपल्या पदाचा कार्यकाळ दीड वर्षांपर्यंत बाकी असताना आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या राजीनाम्याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. दरम्यान, दिल्लीकरांचे मी आभार मानतो. एक वर्ष राज्यात राष्ट्रपती राजवट होती. तेव्हा दिल्लीकरांनी मला सहकार्य केले. याबद्दल मी त्यांचे आभार मानतो, असे जंग यांनी सांगितले.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹ऊर्जामंत्र्यांकडून समितीची घोषणा

ऊर्जा विभागातील महानिर्मिती, महावितरण आणि महापारेषण या तीनही कंपन्यांमधील कंत्राटी कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ सूत्रधारी कंपनीच्या संचालिका अनुराधा भाटिया यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्याचा निर्णय ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी घेतला.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹मेरी कोम, विकासला एआयबीए पुरस्कार

स्वित्झर्लंडमध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय मुष्टियुद्ध संघटनेच्या (एआयबीए) 70 व्या वार्षिक सोहळय़ात भारताची अव्वल महिला बॉक्सर एमसी मेरी कोम व आशियाई सुवर्णजेता विकास कृष्णन यांची विविध पुरस्कारांसाठी निवड करण्यात आली.

माँट्रा येथे झालेल्या या सोहळय़ात पाचवेळची वर्ल्ड चॅम्पियन व ऑलिम्पिक कांस्यविजेती मेरी कोमला एआयबीएच्या लेजेंड्स पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तर विकासला एपीबीचा (एआयबीए प्रो बॉक्सिंग) सर्वोत्तम बॉक्सरचा करंडक मिळाला. ‘एआयबीएचे अध्यक्ष डॉ. वु यांच्यासह एपीबीचे संचालक मिरको वुल्फ यांचे मी या पुरस्कारांबद्दल आभार मानतो. गेली चार वर्षे आमच्याकडे अधिकृत फेडरेशन नव्हती. पण आता त्याची स्थापना करण्यात आली असून त्यातील सर्वचजण कठोर मेहनत घेत आहेत.

 भविष्यात आमच्याकडून आणखी चांगली कामगिरी होत राहील, अशी अपेक्षा आहे,’ असे विकास कृष्णन पुरस्कार स्वीकारल्यानंतर म्हणाला. या वर्षात एपीबीच्या दोन स्पर्धांत त्याने भाग घेतला होता. विकासने ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत कांस्यपदक पटकवले असून रिओ ऑलिम्पिकमध्ये त्याने उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली होती.

मेरी कोमला तिच्या चमकदार कारकिर्दीबद्दल पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. तिने पाच विश्व अजिंक्यपदासह अनेकदा आशियाई चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदके पटकावलेली आहेत. 2008 मध्ये तिने चौथे विश्व अजिंक्यपदक मिळविल्यानंतर एआयबीएने तिला ‘मॅग्निफिशंट मेरी’ असे संबोधन दिले होते. याशिवाय या वर्षीच्या विश्व अजिंक्यपद स्पर्धेची ती आठपैकी एक ब्रँड ऍम्बॅसेडरही होती. 33 वर्षीय मेरी कोमने पुन्हा 48 किलो वजन गटात खेळणार असल्याचा अलीकडेच घेतला आहे. गेली चार वर्षे ती 51 किलो गटात खेळत होती. 2020 च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये मुष्टियुद्ध क्रीडा प्रकारात 48 किलो वजन गटाचा समावेश केला जाण्याची शक्यता गृहित धरून तिने हा निर्णय घेतला असावा, असे मानले जात आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹देशभरात उघड्यावर कचरा जाळण्यावर निर्बंध

राष्ट्रीय हरित लवादाने देशभरात उघड्यावर कचरा जाळण्यावर बंदी घातली आहे. या आदेशाचे उल्लंघन करणा-यांवर २५ हजार रुपयांचा दंड आकारला जाईल असे हरित लवादाने स्पष्ट केले आहे.

देशभरात उघड्यावर कचरा जाळण्याचे प्रकार सर्रास घडत असतात. अखेर राष्ट्रीय हरित लवादानेच याची दखल घेतली आहे. लवादाने उघड्यावर कचरा जाळण्यावर निर्बंध घातले आहे. लवादाने उघड्यावर कचरा जाळण्यावर बंदी घातलीच. पण त्यासोबत या आदेशाचे उल्लंघन करणा-यांना दंड आकारावा असे निर्देश दिले आहेत. याशिवाय राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी घनकचरा व्यवस्थापन अधिनियम २०१६ ची तातडीने अंमलबजावणी करावी असे निर्देश हरित लवादाने दिले आहेत. आदेश दिल्याच्या चार आठवड्यात या नियमांची कशी अंमलबजावणी केली जाईल याचा कृती आराखडा सादर करावा असे लवादाने सांगितले.

लवादाने पीव्हीसी आणि क्लॉरिनेटेड प्लॅस्टिकवर सहा महिन्यात बंदी घालण्याचे आदेश दिले. याचा वापर पीव्हीसी पाइप आणि बॉटल तयार करण्यासाठी केला जातो. राष्ट्रीय हरित लवादाने अलमित्रा पटेल यांनी दाखल केलेल्या याचिकेवर हा निर्णय दिला आहे. राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये घनकचरा व्यवस्थापनासंदर्भात स्थानिक स्वराज्य संस्थांना आदेश द्यावेत अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली होती.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹अॅपलकडून कॉपीराइट कायद्याचा भंग, नोकियाचा दावा

कॉपीराइट कायद्याचा भंग केल्याप्रकरणी नोकिया कंपनीने अॅपलविरोधात जर्मनी आणि अमेरिकेतील पेटंट न्यायालयात तक्रार दाखल केली आहे. अॅपल त्यांच्या अनेक उत्पादनांमध्ये आम्ही विकसित केलेल्या तंत्रज्ञानाचा वापर करीत असल्याचे त्यांनी त्यांच्या तक्रारीमध्ये म्हटले आहे.

२०११ पासून नोकियाशी दोन कंपन्यांनी करार केले आहेत. त्याअंतर्गत आम्ही विकसित केलेल्या तंत्रज्ञानाचा वापर ते करत आहेत. आम्ही हा प्रस्ताव अॅपलला दिला होता मात्र त्यांनी तो स्वीकारला नसल्याची माहिती नोकियाच्या पेटंट विभागाच्या प्रमुखांनी दिली.
अनेक वर्षांपासून आमची त्यांच्याशी बोलणी सुरू आहे परंतु त्यांनी कुठलाही मोबदला देण्यास नकार दिल्याचे या विभागाचे प्रमुख इलक्का राहनस्तो यांनी म्हटले आहे.

जर्मनीतील तीन शहरे आणि टेक्सासच्या न्यायालयात या तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. अॅपलने एक दोन नव्हे तर तब्बल ३२ पेटंटचा भंग केल्याचे त्यांनी म्हटले आहे. नोकियाच्या मालकीचे असणारे फोन डिस्प्ले, युजर इंटरफेस, सॉफ्टवेअर, अॅंटिना, चीपसेट्स आणि व्हिडिओ कोडिंग संदर्भातील पेटंट अॅपलने वापरले असे राहनस्तो यांनी एका प्रसिद्धिपत्रकाद्वारे म्हटले आहे.

१९९८ ते २०११ या काळात मोबाइल क्षेत्रात नोकियाचा दबदबा होता. २०११ मध्ये त्यांनी मायक्रोसॉफ्टशी करार करुन केवळ त्यांचीच ऑपरेटिंग सिस्टम वापरण्याचे मान्य केले. त्यानंतर नोकियाच्या प्रगतीला जी खीळ बसली. नोकिया नवीन तंत्रज्ञानाशी जुळवून घेण्यास अपयशी ठरल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. नोकिया या कंपनीने स्मार्टफोन्सच्या अॅप्सकडे दुर्लक्ष केले त्यांचे लक्ष केवळ हार्डवेअरवर होते असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

स्मार्टफोनच्या क्षेत्रात अॅपलने गेली कित्येक वर्षे सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. २०११ साली अॅपलने सॅमसंगविरोधात कॉपीराइट कायद्याचा भंग केल्याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. या प्रकरणाचा निकाल अॅपलच्या बाजूने लागला होता. सॅमसंगने अॅपलला ९३० दशलक्ष डॉलर्स द्यावे असा निकाल दिला होता. सॅमसंगने परत अर्ज केल्यानंतर ही रक्कम ४०० दशलक्ष डॉलर्सपर्यंत करण्यात आली होती.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹आर. अश्विन 'क्रिकेटर ऑफ द इयर'

भारतीय क्रिकेट संघातील स्टार फिरकीपटू रविचंद्रन अश्विन याची आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) यंदाच्या 'क्रिकेटर ऑफ द इयर' या प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. राहुल द्रविड व सचिन तेंडुलकर यांच्यानंतर हा मान मिळवणारा अश्विन हा केवळ तिसरा भारतीय खेळाडू आहे.

आयसीसीच्या २०१६च्या पुरस्कारांची यादी जाहीर केली आहे. वेगवेगळ्या दहा विभागांत हे पुरस्कार देण्यात येणार आहेत. 'क्रिकेटर ऑफ द इयर' या पुरस्काराबरोबरच 'टेस्ट क्रिकेटर ऑफ द इयर' हा पुरस्कारही अश्विननं पटकावला आहे. १२ कसोटी सामन्यांत अश्विननं ७२ गडी बाद करण्याची कामगिरी केली आहे. त्याच्या याच कामगिरीची दखल आयसीसीनं घेतली आहे. याआधी राहुल द्रविड व गौतम गंभीर या दोन भारतीय खेळाडूंनी या पुरस्कारावर नाव कोरले होते.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹फ्रान्सने बनवला जगातील पहिला सोलार महामार्ग

फ्रान्सने जगातील पहिला सोलार महामार्ग बनवला आहे. या सौरउर्जेचा वापर करून दररोज तीन हजांराहून अधिक लोकसंख्या असलेल्या गावाला रोज वीज उपलब्ध होणार आहे. अशाप्रकारे अनोखा उपक्रम राबवणारा फ्रान्स हा जगातील पहिलाच देश आहे.

आपल्या देशातील वीजेचा तुटवडा भरून काढण्यासाठी फ्रान्सने अनोखा उपक्रम राबवला आहे. या देशाने सोलार पॅनल बसवलेला मोठा महामार्ग तयार केला आहे. यातून तयार होणा-या उर्जेचा वापर करून जवळपास साडेतीन हजार लोकांना रोज विद्युत पुरवठा उपलब्ध होणार आहे. दोन वर्षांपूर्वीच हा रस्ता तयार करण्यात आला होता मात्र या रस्त्यात कोणत्याही त्रुटी भविष्यात निर्माण होऊ नये यासाठी वेगवेगळ्या चाचण्या घेण्यात आल्या. या मोठ्या महामार्गावर २ हजार ८८० सोलार पॅनल बसवण्यात आले आहे. अक्षय उर्जेचा वापर करून असा अनोखा उपक्रम राबवल्याबद्दल फ्रान्सचे कौतुक होत आहे.

हा महामार्ग आजपासून खुला करण्यात आला आहे. हा महामार्ग अत्यंत मजबूत असल्याचे फ्रान्स सरकारने सांगितले आहे. पण तरीही या महामार्गावरून अवजड वाहाने गेलीच तर मात्र या सोलार पॅनलला मोठे नुकसान पोहचू शकते अशी भिती अनेकांनी व्यक्त केली आहे. या महामार्गामुळे एका गावाला रोज विजपुरठा होऊ शकतो असे फ्रान्सने सांगितले आहे. पण अनेकांनी या महामार्गाला विरोध केला आहे. फ्रान्स सरकारने हा सोलार महामार्ग बनवण्यासाठी अवाजवी खर्च केला असल्याचे अनेकांचे मत आहे. इतका खर्च करण्यापेक्षा सरकारने रस्ते दुरूस्त करायला हवे होते असेही मत व्यक्त करत अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. या रस्त्यामुळे वर्षभर २८० मेगाव्हॅट विद्युत निर्मिती होईल असा दावा सरकारने केला आहे. जर्मनी, नेदरलँड आणि अमेरिकेतही असा प्रयोग केला जाणार आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹लीबियाः ११८ प्रवाशी असलेल्या विमानाचं अपहरण

लीबियामध्ये ११८ प्रवाशांना घेऊन जात असलेल्या आफ्रिकेच्या एअरवेज प्रवाशी विमानाचे अपहरण करण्यात आले आहे.

एअरबेस ए ३२० या विमानाचे अपहरण करण्यात आले असून या विमानाचे लॅंडिंग माल्टामध्ये करण्यात आल्याची माहिती माल्टाचे पंतप्रधान जॉसेफ मस्कट यांनी एका ट्विटद्वारे दिली आहे. विमानात दोन लोकांनी घुसून विमानाचे अपहरण केले आहे. अपहरणकर्त्यांनी पहिल्या टप्प्यांत महिलांसह २५ प्रवाशांची सुटका केली आहे. विमानात बंदीस्त असलेल्या इतर प्रवाशांची सुखरूप सुटका करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती माल्टाच्या पंतप्रधानांनी दिली आहे.

अपहरणकर्त्यांशी चर्चा सुरू असून आतापर्यंत १०९ प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आल्याचे पंतप्रधान जॉसेफ मस्कट यांनी सांगितले. पहिल्या टप्प्यात २५ प्रवाशांना, दुसऱ्या टप्प्यात ४० तर तिसऱ्या टप्प्यात ४४ प्रवाशी असे एकूण १०९ प्रवाशांची सुटका करण्यात यश आले असून आता विमानातील क्रू मेंबर्सची सुटका करण्यासाठी प्रयत्न केले जात आहे, अशी माहिती माल्टाच्या पंतप्रधानांनी दिली आहे. दरम्यान, अपहरणकर्त्यांजवळ ग्रेनेड होते व ते विमानाला उडवणार होते, अशी माहिती काही मीडिया रिपोर्ट्सकडून मिळत आहे. विमानात एकूण ११८ प्रवाशी असून या सर्वांना सुखरुप बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असे माल्टाच्या पंतप्रधानांनी सांगितले.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹जालना येथे रसायन तंत्रज्ञान संस्थेचे उपकेंद्र

रसायन तंत्रज्ञान संस्था ही जागतिक दर्जा प्राप्त असलेली अग्रगण्य शिक्षण संस्था असून, मुंबई येथील माटुंगा परिसरात १६ एकर जागेवर तिची उभारणी केलेली आहे. या संस्थेच्या उपकुलगुरूंनी गेल्या एप्रिलमध्ये मुख्यमंत्र्यांकडे उपकेंद्रासाठी २०० एकर जागेची मागणी केली होती. ही संस्था महाराष्ट्र शासनाच्या आधिपत्याखालील अभिमत विद्यापीठ असून, केंद्र सरकारच्या मानवविकास मंत्रालयाने संस्थेस तो दर्जा दिलेला आहे. संशोधन कार्य, जागतिक स्थान आणि वैज्ञानिक बाबी लक्षात घेऊन राज्य शासनाने या संस्थेस विशेष दर्जा प्रदान केलेला आहे.

जालना शहराजवळील सिरसवाडी परिसरातील २०० एकर शासकीय जागेवर हे उपकेंद्र उभारण्यात येणार आहे. या जमिनीचे शासकीय मूल्य २३ कोटी ६७ लाख रुपये असून, उपकेंद्रासाठी ही जमीन विनामूल्य देण्याची मागणी उच्च व तंत्र शिक्षण विभागाने केलेली आहे. त्यामुळे नाममात्र एक रुपया वार्षिक भूभाडय़ावर ही जमीन ३० वर्षांसाठी देण्यात येणार असून, याच तत्त्वावर पुढे भाडेपट्टय़ाचे नूतनीकरण करण्यात येणार आहे. जालना ते सिरसवाडी रस्ता या जमिनीमधून जातो. प्रादेशिक योजनेमध्ये उपकेंद्रासाठी देण्यात येणाऱ्या जमिनीचा वापर सार्वजनिक आणि निमसार्वजनिक कामासाठी वापरण्याची तरतूद आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹डाऊनलोड स्पीडमध्ये भारत नेपाळ, बांगलादेशच्याही मागे

भारतात कॅशलेस आर्थिक व्यवहार नियमित होण्यासाठी अत्यंत महत्वाची असलेली गोष्ट म्हणजे सर्वात चांगला इंटरनेट स्पीड आणि उत्तर सायबर सुरक्षा. नोटाबंदीमुळे सध्या डिजीटल आर्थिक व्यवहार करण्यावर भर देण्याचं आवाहन केलं जात आहे. मात्र डाऊनलोड स्पीडमध्ये भारताचा 96 वा क्रमांक लागतो आणि सरासरी बॅण्डविड्थ उपलब्धतेत 105 व्या क्रमांकावर आहोत. आणि ही परिस्थिती दिवसेंदिवस खराब होत चालली आहे. डाऊनलोड स्पीडमध्ये आपण नेपाळ आणि बांगलादेशच्याही मागे आहोत. सायबर हल्ल्यांमध्ये मात्र आपण वरच्या स्थानावर आहोत. बँकांच्या आणि संवेदनशील, गुपित माहितीवर सहज डल्ला मारला जात आहे.

भारतामधील या परिस्थितीमुळे युझर्स आणि एक्स्पर्ट्स दोघेही चिंतेत आहेत. सायबर एक्स्पर्ट्सच्या म्हणण्याप्रमाणे 'भारतातील लोक सायबर व्यवहार करायला घाबरतात. कारण यामध्ये हॅकिंग होऊन आपली वैयक्तिक माहिती चोरीला जाण्याची भीती असते. आणि अशावेळी बँक आणि पोलीस मात्र कारवाई करण्याऐवजी हतबलता दाखवत असतात',. सायबर एक्स्पर्ट विजय मुखी यांनी 'आपल्यासारखी व्यक्तिदेखील ऑनलाइन व्यवहार करताना घाबरते', असं सांगितलं आहे.

सुरक्षित ऑनलाइन व्यवहार व्हावा यासाठी सरकारकडूनच काही पावलं उचलण्याची गरज असल्याचं तज्ञांनी सांगितलं आहे. सायबर हल्ल्यांविषयी जेव्हा बोललं जातं तेव्हा भारताचा सहावा क्रमांक लागतो. फक्त एका वर्षात सायबर हल्ले दुपटीने वाढले आहेत.

बॅण्डविड्थ उपलब्धतेबद्दल बोलायचं गेल्यास श्रीलंका, चीन, दक्षिण कोरिया, इंडोनेशिया, मलेशिया यांच्यासह अनेक देश आपल्यापेक्षा खूप पुढे आहेत. सायबर तज्ञांनी डिजीटल व्यवहाराचं स्वागत केलं आहे, मात्र आयटीला मिळणा-या पायाभूत सुविधा आणि शिक्षणावरुन नाराजी व्यक्त केली आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹अवकाशातील उपग्रह नष्ट करणा-या शस्त्राची रशियाकडून चाचणी

अमेरिका आणि रशियामध्ये सुरु असलेली अत्याधुनिक शस्त्रास्त्रांची स्पर्धा अवकाशापर्यंत जाऊन पोहोचली आहे. उद्या युद्धाला तोंड फुटलेच तर शत्रू राष्ट्राचे अवकाशातील उपग्रह नष्ट करण्याच्या शस्त्राची रशियाने नुकतीच चाचणी घेतली असे सीएनएन वृत्तवाहिनीने अमेरिकन सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे.

रशियाच्या या चाचणीने अवकाशात कुठलाही कचरा निर्माण केला नाही तसेच लक्ष्याचा वेध घेतला नाही असे सूत्रांनी सांगितले. अशी चाचणी करण्याची रशियाची पहिली वेळ नाही. यापूर्वीही रशियाने उपग्रह नष्ट करणा-या शस्त्राची चाचणी करुन आपली क्षमता दाखवून दिली आहे.

लष्करी आणि अन्य व्यावसायिक कामांसाठी अमेरिका मोठया प्रमाणावर उपग्रहांवर अवलंबून आहे. रशियाने अमेरिकन उपग्रहापर्यंत पोहोचणारे कॉसमॉस 2499 तैनात केल्याची अमेरिकेकडे माहिती आहे.

वाचता वाचता:-
-----------------------
* महाराष्ट्र फाऊंडेशनचे (अमेरिका) पुरस्कार जाहीर, ज्येष्ठ साहित्यिक अरुण साधू यांना साहित्यातील योगदानाबद्दल जीवनगौरव पुरस्कार.
* महाराष्ट्र फाऊंडेशनचे (अमेरिका) पुरस्कार जाहीर, हमीद दलवाई यांना मरणोत्तर समाजकार्य जीवनगौरव पुरस्कार जाहीर
* कॅशलेसच्या वटहुकूमावर केंद्रीय कॅबिनेटची मोहोर, कर्मचा-यांचा पगार आता खात्यात जमा होणार.
* बँक खात्यामध्ये 5 हजारपेक्षा जास्त रक्कम डिपॉझिट करण्यावरील निर्बंध आरबीआयने मागे घेतले.
* प्रफुल्ल पटेल यांची ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनच्या अध्यक्षपदी फेरनिवड.
* ओबीसींसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली
* 26 जानेवारीला दिल्लीत होणाऱ्या परेडमध्ये लोकमान्य टिळकांवर चित्ररथ साकारण्यात येणार आहे. प्रजासत्ताक दिनी दिल्लीत राजपथावर होणाऱ्या परेडमध्ये सर्व राज्यांचे चित्ररथ सहभागी होतात. यावर्षी महाराष्ट्राकडून लोकमान्य टिळकांवर आधारित चित्ररथ सहभागी होणार आहे.

स्टारडस्ट पुरस्कार २०१६:-
--------------------------------

सर्वोत्कृष्ट अभिनेता- अमिताभ बच्चन (पिंक)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री- अनुष्का शर्मा (ऐ दिल है मुश्किल, सुलतान)
सर्वोत्कृष्ट अभिनेता (संपादकीय पसंती)- शाहरुख खान (फॅन)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (संपादकीय पसंती)- सोनम कपूर (नीरजा)
सर्वोत्कृष्ट अभिनेता (प्रेक्षकांची पसंती)- शाहरुख खान (फॅन)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (प्रेक्षकांची पसंती)- सोनम कपूर (नीरजा)
सर्वोत्कृष्ट खलनायक – जीम सार्भ (नीरजा)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता- ऋषी कपूर (कपूर अॅण्ड सन्स)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री- शबाना आझमी (नीरजा)
सर्वोत्कृष्ट पदार्पण अभिनेता- हर्षवर्धन कपूर (मिर्झिया)
सर्वोत्कृष्ट पदार्पण अभिनेत्री- सैयामी खेर (मिर्झिया), दिशा पतानी (एम एस धोनी- द अनटोल्ड स्टोरी)
जीवनगौरव पुरस्कार- रेखा
ग्लोबल आयकॉन ऑफ द इयर- प्रियांका चोप्रा
सर्वोत्कृष्ट उल्लेखनीय अभिनय- ऐश्वर्या राय बच्चन (सरबजीत)
सर्वोत्कृष्ट चित्रपट (प्रेक्षक पसंती)- सुलतान
सर्वोत्कृष्ट कथा- कपूर अॅण्ड सन्स
सर्वोत्कृष्ट पटकथा- उडता पंजाब
सर्वोत्कृष्ट वेशभूषा- सुलतान
सर्वोत्कृष्ट गीतकार- अमिताभ भट्टाचार्य (चन्ना मेरेया, ऐ दिल है मुश्किल)
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक- अरिजीत सिंग (चन्ना मेरेया, ऐ दिल है मुश्किल)
सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शन- प्रितम (ऐ दिल है मुश्किल)

चर्चित व्यक्ती:-
-------------------------------------
राकेश अस्थाना:-
• भारतीय पोलीस सेवेतील गुजरात कॅडरचे अधिकारी राकेश अस्थाना यांनी सीबीआयच्या हंगामी प्रमुखपदाची सूत्रे स्वीकारली. संचालक निवृत्त होण्यापूर्वी नव्या संचालकाच्या नावाची घोषणा केली जाते.
• सीबीआयच्या प्रमुखांची पंतप्रधान, विरोधी पक्षनेते आणि सरन्यायाधीश या त्रिसदस्यीय निवड मंडळाकडून निवड केली जाते. मावळते संचालक सिन्हा यांच्या निवृत्तीच्या दोन दिवस आधी सरकारने सीबीआयतील क्रमांक दोनचे अधिकारी आर. के. दत्ता यांची गृहमंत्रालयात विशेष सचिव म्हणून बदली केली. दत्ता यांच्यासाठी विशेष सचिव दर्जाचे दुसरे पद गृहमंत्रालयात निर्माण करण्यात आले.
• गुजरातमधील वादग्रस्त गोध्रा रेल्वे जळीतकांड तपासावर बडोदा विभागाचे महानिरीक्षक म्हणून लक्ष घातले होते. बडोदा आणि सुरतचे पोलीस आयुक्तपदी त्यांनी भूषविले आहे.

विजय कुमार (व्ही. के.) शर्मा:-
• भारतीय आयुर्विमा महामंडळ (एलआयसी) च्या अध्यक्षपदी विजय कुमार (व्ही. के.) शर्मा यांची नियुक्ती करण्यात आली
• गेल्या तीन महिन्यांपासून हंगामी अध्यक्ष म्हणून कार्यभार पाहणारे शर्मा यांची नियक्ती ही पुढील पाच वर्षांसाठी असेल.
• महामंडळाचे एस. के. रॉय यांनी निवृत्तीला दोन वर्षे शिल्लक असतानाच जून २०१६ मध्ये अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर हे पद रिक्तच होते. तर व्यवस्थापकीय संचालकपद असलेले शर्मा १६ सप्टेंबरपासून अध्यक्षपदाचा कार्यभार पाहत होते.
• १९८१ मध्ये अधिकारी म्हणून महामंडळात रुजू झालेले शर्मा २०१३ मध्ये व्यवस्थापकीय संचालक बनले. कंपनीच्या दक्षिण परिमंडळाचे ते व्यवस्थापकही राहिले आहेत. एलआयसी समूहातील एलआयसी हाऊसिंग फायनान्स या गृहवित्त कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे.
• एकूण आयुर्विमा योजनांमधील ७५.४८ टक्के बाजारहिश्श्यासह कंपनी २२ लाख कोटी रुपयांचे निधी व्यवस्थापन पाहते. कंपनीने गेल्या आर्थिक वर्षांत ४०,००० कोटी रुपयांचा नफा कमाविला असून मार्च २०१६ अखेरचे कंपनीचे एकूण उत्पन्न ४.३१ लाख कोटी रुपये नोंदविले आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹कॅशलेस सुविधा सुलभ करण्यासाठी ‘आधार अॅप’

काळ्यापैशावर लगाम घालण्यासाठी नोटाबंदीचा कठोर निर्णय घेतल्यानंतर कॅशलेस सुविधा सुलभ करण्याच्या दृष्टीने सरकार प्रयत्नशील आहे. याच पार्श्वभूमीवर सरकार आता नवीन अॅप ला परवानगी दिली आहे. कॅशलेस सेवा सुलभ करण्याच्या हेतून सरकार ‘आधार अॅप’ची ओळख करुन देणार आहे. या अॅपमध्ये प्लॅस्टिक आणि पॉइंट सेल सारख्या समस्या दुर होणार आहेत. कॅशलेस सुविधेमधील अडथळा वाटणाऱ्या गोष्टींवर मात करण्यासाठी सरकारने नवीन अॅपला परवानगी दिली आहे. २५ डिसेंबरला सरकारकडून या अॅपचे अनावरण करण्यात येईल. या अॅपच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या व्यवहारामध्ये कोणतीही अधिक फी आकारली जाणार नाही. सध्या कार्डद्वारे करण्यात येणाऱ्या व्यवहारामध्ये ग्राहकांना अधिक मोबदला द्यावा लागतो. या अॅपच्या माध्यमातून ग्रामीण भागातील कॅशलेस सेवेचा मार्गही सुलभ होण्यास मदत होईल.

हे अॅप एड्रॉइड मोबाइलवर उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. स्मार्टफोनच्या बायोमेट्रिक रिडरने संलग्नित करावे लागेल. हा रिडर केवळ २००० रुपयांना उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. या अॅपद्वारे ग्राहक आपल्या आधार कार्डनंबरच्या आधारे व्यवहार करु शकतात. आधार कार्डचा नंबरनुसार,बँकेची निवड करावी लागेल. बायोमेट्रिक स्कॅनर पासवर्डचे काम करेल. युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) चे मुख्यकार्यकारी अधिकारीअजय भूषण पांडे यांनी इकोनॉमिक्स टाइम्सला दिलेल्या माहितीनुसार, सध्या देशातील ४० कोटी लोकांनी आधारकार्ड बँकेशी संलग्नित केले आहे. मार्च २०१७ पर्यंत सर्व आधार नंबर बँकेशी संलग्नित करण्याचे लक्ष असल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली.

कॅशलेस सुविधा सुलभ करण्यासाठी आईडीएफसी बँक आणि नॅशनल पमेंट डेव्हलपमेंट कार्पोरेशन ऑफ इंडिया यांनी संयुक्तरित्या आधार अॅप विकसीत केले आहे.

अर्थमंत्री अरुण जेटली आणि केंद्रीयमंत्री रविशंकर प्रसाद यांनी देखील या नव्या अॅपची पाहणी केली आहे. ही व्यवस्था आधार कार्डवर चालणारी असल्यामुळे मोठ्या संख्येत लोकांना जोडणारी असेल,असे आईडीएफसी बँकेचे व्यवस्थापकिय संचालक आणि मुख्यकार्यकारी अधिकारी राजीव शुक्ला यांनी म्हटले आहे. ज्यांच्याकडे आधार कार्ड आहे अशी कोणतीही व्यक्ती या अॅपच्या माध्यमातून व्यवहार करु शकते. मोबाईल नंबर, क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड याशिवाय कॅशलेस व्यवहार करणे शक्य होणार आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹अंडर १९ आशिया कप, श्रीलंकेवर मात करत भारताने पटकावले विजेतेपद

भारताने श्रीलंकेवर मात करत अंडर १९ आशिया चषकावर नाव कोरले आहे. भारताचा कर्णधार अभिषेक शर्माच्या अष्टपैलू कामगिरीमुळे भारताने लंकेवर ३४ धावांनी विजय मिळवला असून या कामगिरीसाठी शर्माला सामनावीराचा पुरस्कारही मिळाला.

श्रीलंकेत अंडर-१९ आशिया चषक पार पडले. शुक्रवारी संध्याकाळी भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात अंतिम सामना झाला. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करत ५० षटकांत ८ गडी गमावत २७३ धावा केल्या. हिमांशू राणाने ७१ तर शुभम गिलने ७० धावांची खेळी करत भारताच्या डावाला आकार दिला. कर्णधार अभिषेक शर्माने चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येऊन २९ धावांची खेळी केली. सलमान खान २६ धावांवर बाद झाला त्यावेळी भारत ५ बाद २४४ धावांवर होता. मात्र त्यानंतर प्रियम गर्ग आणि हेत पटेल हे दोघेही लागोपाठ बाद झाल्याने भारताची अवस्था ७ बाद २४५ अशी झाली. तळाचा फलंदाज कमलेश नागरकोटीने २३ धावांची महत्त्वाची खेळी करत भारताला २७३ धावांची मजल गाठून दिली.

घरच्या मैदानात खेळणा-या श्रीलंकेच्या संघाची सुरुवात फारशी चांगली नव्हती. भारतीय गोलंदाजांनी श्रीलंकेची सलामीची जोडी संघाच्या २७ धावा झाल्या असतानाच फोडली. मात्र त्यानंतर रेवेन केलीने ६२ आणि तिस-या क्रमांकावर आलेल्या हासिथ बोयागोडाने ३७ धावांची महत्त्वपूर्ण खेळी करत संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. ही जोडी जमली असताना कर्णधार अभिषेक शर्माने भारताला मोठे यश मिळवून दिले. शर्माने बोयागोडाला बाद करत भारताच्या विजयाचा मार्ग मोकळा केला. यानंतर शर्माने अर्धशतक ठोकणा-या कामिंदू मेडिंसचीही विकेट घेतली. शर्माने ३७ धावांमध्ये ४ विकेट घेतल्या. तर राहुल चाहरने तीन विकेट घेतल्या. भारतीय गोलंदाजांच्या अचूक मा-यापुढे श्रीलंकेचा संघ २३९ धावांवर गारद झाला. सामन्यात २९ धावा आणि ४ विकेट घेणारा अभिषेक शर्मा सामनावीर ठरला. तर हिमांशू राणाला मालिकावीराचा पुरस्कार देण्यात आला.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹ज्येष्ठ साहित्यिक वामन होवाळ यांचे निधन

ज्येष्ठ साहित्यिक वामन होवाळ यांचे शुक्रवारी संध्याकाळी निधन झाले. ते ८१ वर्षांचे होते. बेनवाडा, येळकोट, आडवाटा, वारसदार हे त्यांचे कथासंग्रह वाचकांमध्ये चर्चेचा विषय ठरले होते. दलित साहित्यात त्यांचे मोलाचे योगदान असून आंबेडकर चळवळीतही ते सक्रीय होते.

वामन होवाळ यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील तडसर येथे झाला. होवाळ यांचे शालेय शिक्षण गावातच झाले. तर महाविद्यालयीन शिक्षण त्यांनी ठाणे आणि नंतर सिद्धार्थ महाविद्यालयात घेतले. शालेय जीवनापासून त्यांनी कथालेखन केले. त्यांची पहिली कथा पुण्यातील एका मासिकात छापून आली. यानंतर त्यांच्या विविध मासिकांमधून ३५० हून अधिक कथा प्रसिद्ध झाल्या.

दलित- शोषितांचे विदारक जग मांडत असताना आणि समाज परिवर्तनासाठी झटत असतानाही होवाळ यांचे लेखन हे प्रचारकी नसल्याचे नेहमीच सांगितले जायचे. दलित साहित्याला वामन होवाळ यांच्या लेखणीने नवी उंची गाठून दिली. होवाळ यांच्या कथा मराठी भाषेसोबतच अन्य भाषांमध्ये गाजल्या. हिंदी, इंग्रजीपासून ते अगदी उर्दू, कन्नड आणि फ्रेंच भाषेतही त्यांच्या कथा अनुवादित झाल्या आहेत.

होवाळ यांचे बेनवाड, येळकोट, वारसदार, वाटा आडवाटा आणि ऑडिट हे कथासंग्रह प्रसिद्ध होते. यातील तीन कथासंग्रहांना पुरस्कारही मिळाला होता. यात राज्य सरकारच्या पुरस्काराचा समावेश आहे. ‘आमची कविता’ या कविता संग्रहाचेही त्यांने संपादन केले होते.

शुक्रवारी संध्याकाळी विक्रोळी येथील राहत्या घरी वामन होवाळ यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. वामन होवाळ यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले आणि एक मुलगी असा परिवार आहे. होवाळ यांच्या निधनाने साहित्य क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹पासपोर्ट नियमांत बदल; साधू-संत आई-वडिलाऐवजी गुरूंच्या नावाचा करू शकतील उल्लेख

सरकारने शुक्रवारी पारपत्र (पासपोर्ट) नियमांत मोठे फेरबदल केले आहेत. पासपोर्टच्या नव्या नियमानुसार साधू व संन्यासी यांना आता त्यांच्या जैविक पालकांऐवजी आध्यात्मिक गुरूंच्या नावाचा उल्लेख करण्याची परवानगी देण्यात आली आहे. पूर्वीच्या नियमानुसार २६ जानेवारी १९८९ नंतर जन्म झालेल्यांना पासपोर्ट बनवण्यासाठी जन्म दाखल्याची आवश्यकता होती. परंतु या नियमात आता बदल करण्यात आले आहे.
नव्या नियमानुसार आता जन्म दाखला, ट्रान्सफर सर्टिफिकेट, शाळा सोडल्याचा दाखला, अखेरचे शैक्षणिक प्रमाणपत्र (मान्यताप्राप्त शाळा किंवा महाविद्यालय असणे गरजेचे), पॅन कार्ड, आधार कार्ड, वाहन परवाना, मतदान ओळखपत्र, पॉलिसी, बाँड आणि जीवन विमा पॉलिसी ज्यावर जन्मतारखेचा उल्लेख असेल, अल्पवयीन मुलांचा पासपोर्ट आता आई-वडील यांच्यापैकी एकाच्या कागदपत्रांवरून काढता येऊ शकेल, लग्नाच्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही, साधू-संत आपल्या आई-वडिलांच्या नावाऐवजी गुरूंचेही नाव देऊ शकणार आहेत. त्याचबरोबर साधू-संतांना एक ओळखपत्र आणि प्रतिज्ञापत्रही द्यावे लागेल. नव्या नियमांनुसार आता पासपोर्टसाठी जन्म तारखेच्या पुराव्यासाठी जन्म प्रमाणपत्राच्या अनिवार्यतेची अट काढण्यात आली आहे.

परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. के. सिंग यांनी जाहीर केलेल्या नव्या नियमांत सरकार नोकरशहांसाठीही तरतुदी करण्यात आले आहे. जे कर्मचारी संबंधित मंत्रालय किंवा विभागांकडून नाहरकत प्रमाणपत्र मिळत नसलेल्यांसाठीही नव्या तरतुदी करण्यात आल्या आहेत. पासपोर्ट प्रक्रिया वेगवान आणि सोपी होण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाने हे पाऊल उचलल्याचे सिंग यांनी सांगितले. नव्या नियमानुसार नागरिकांसाठी अर्ज प्रक्रिया सोपी असेल, असेही त्यांनी म्हटले.
अर्ज करतेवेळी जन्म तारखेवरून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. पासपोर्ट अर्जासोबत शाळा सोडण्याचा दाखला, शालांत प्रमाणपत्र, पॅन कार्ड, आधार कार्ड, इ-आधारकार्ड, अर्जदाराच्या सर्व्हिस रेकॉर्डशी संबंधित कागदपत्रे, वाहन परवाना, मतदान ओळखपत्र, एलआयसी पॉलिसी बाँड आदी दस्तऐवजही संलग्नित करता येतील.

२६ जानेवारी १९८९ नंतर जन्मलेल्या सर्व अर्जदारांना पारपत्र मिळण्यासाठी जन्मतारखेचा पुरावा म्हणून जन्म प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य होते. आताही हे प्रमाणपत्र चालणार असले, तरी ते अनिवार्य असणार नाही. साधू संतांनी आई-वडिलांऐवजी आपल्या गुरूंचे नाव वापरता यावे अशी मागणी केली होती. त्यांची ही मागणीही मान्य करण्यात आली आहे. परंतु असे करताना साधू-संतांना कमीत कमी कागदपत्रे सरकारला द्यावीच लागतील. आपल्या विभागाकडून ओळखपत्र, नाहरकत प्रमाणपत्र मिळवण्यास अडचणी येत असलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना आता प्रतिज्ञापत्राद्वारे पासपोर्ट मिळवता येईल. यासाठी या कर्मचाऱ्याने आपल्या प्रमुखाला पासपोर्टसाठी अर्ज केल्याची माहिती देणे आवश्यक आहे.

नव्या नियमांनुसार एकल पालकाला पारपत्रात आपल्या जोडीदाराचे नाव जाहीर करण्याची गरज नसेल. त्यांच्या पारपत्रावर जोडीदाराऐवजी पालक किंवा कायदेशीर ताबा असलेल्या व्यक्तीचे नाव देता येईल. विभक्त झालेल्या जोडय़ा आणि घटस्फोटित व्यक्तींनाही अशाच प्रकारे जोडीदाराचे नाव जाहीर करण्याची आवश्यकता नसेल. महिला संघटनांकडून ही मागणी गेल्या काही वर्षांपासून होत आहे. कोणताही जन्म दाखला नसलेल्या अनाथ व्यक्ती आपल्या अनाथालयाच्या प्रमुखाकडून जन्मतारिख निश्चित करून त्या चा अधिकृत दाखला पारपत्र मिळविण्यासाठी जोडू शकतात.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹महाराष्ट्रातील ४.१५ लाख गरीब कुटुंबे धुरापासून मुक्त

गरिबाच्या स्वयंपाकघरात नि:शुल्क एलपीजी कनेक्शन उपलब्ध करून देण्याच्या पंतप्रधान उज्ज्वला योजनेंतर्गत महाराष्ट्रातील ४.१५ लाख कुटुंबीयांची स्वयंपाकघरे धूररहित झाली आहेत.
पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) धर्मेंद्र प्रधान यांच्या पुढाकाराने मंत्रालयाने धडक कार्यक्रम हाती घेतला असून देशभरातील दारिद्र रेषेखाली राहणाऱ्या ५ कोटी कुटुंबातील महिलांना या योजनेचा लाभ होणार आहे. या योजनेंतर्गत सर्वाधिक अर्ज पुणे येथून आले, पण कनेक्शन मिळण्यात लातूर आघाडीवर आहे. महाराष्ट्रातील १४ लाख गरीब कुटुंबांनी अर्ज केले. पैकी १०.८६ लाख अर्ज मंजूर करण्यात आले. यापैकी ४ लाख १५ हजार कुटुंबाकडे गॅस कनेक्शन पोहोचवून देण्यात आले.

 सर्वाधिक अर्ज पुणे (७८,७५७), सोलापूर (७६,७४४), नांदेड (७२,८५९), नाशिक (७१,३७३) आणि अहमदनगर (७०,०५२) या जिल्ह्यातील लोकांनी केले. अर्जाच्या तुलनेत सर्वाधिक गॅस कनेक्शन लातूर (२९,४४३), सांगली (१७,७८७), अहमदनगर (१७,४६६), धुळे (१७,६३२) आणि पुणे (१७४६६) या जिल्ह्यातील लोकांना देण्यात आले. तसेच नागपूर येथे ३१,७२६ लोकांनी अर्ज भरले. पण १२,२१८ कुटुंबाला कनेक्शन देण्यात आले तर औरंगाबाद येथे ३७,१८८ अर्जापैकी ११,८०७ लोकांना कनेक्शन मिळाले. मंजूर झालेल्या अर्जदारास काही महिन्यातच कनेक्शन देण्यात येणार असल्याची माहिती मंत्रालयातील सूत्रांनी दिली.

घरगुती गॅस कनेक्शनमध्ये महाराष्ट्र आघाडीवर आहे. यावर्षी आॅक्टोबरपर्यंत ८१ टक्के कुटुंबाकडे घरगुती गॅस कनेक्शन आहे. एकूण २.३८ कोटी कुटुंबांपैकी २.०९ कोटी कुटंब गॅसवर स्वयंपाक करतात.

६०० जिल्हा नोडल अधिकारी

संपूर्ण देशात जिल्हास्तरावर ६०० नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांना या योजनेचा कणा समजला जात आहे. अधिकाऱ्यानुसार ते फिल्ड काम करतात. ते अर्जदार व गॅस वितरणादरम्यान समन्वयाचे काम करताना योजनेच्या अन्य पैलूंवर बारकाईने लक्ष ठेवत आहेत.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹दक्षिण सॅन फ्रान्सिस्को शहराचा महापौर बनला भारतीय अभियंता

वॉशिंग्टन :
अमेरिकेच्या कॅलिफोर्नियात स्थित दक्षिण सॅन फ्रान्सिस्को सिटीत भारतीय अमेरिकन अभियंता महापौर म्हणून निवडून आला आहे. आयआयटी चेन्नईचे विद्यार्थी असणारे प्रदीप गुप्ता यांनी शहराच्या महापौरपदाची शपथ घेतली आहे.

 कोणत्याही अमेरिकन शहरासाठी महापौर म्हणून निवडून आलेले ते दुसरे भारतीय व्यक्ती आहेत. मी माजी महापौर मार्क एड्डिगो यांच्याद्वारे सुरू करण्यात आलेले काम सुरू ठेवेन, ही माझ्यासाठी सन्मानाची बाब असल्यचे गुप्ता यांनी म्हटले. 31 डिसेंबर 2012 रोजी एक वर्षासाठी दक्षिण सॅन फ्रान्सिस्को नगर परिषदेत गुप्ता यांना नियुक्त करण्यात आले होते. नगर परिषदेसाठी त्यांच्या नियुक्तीआधी ते 3 वर्षांसाठी दक्षिण सॅन फ्रान्सिस्को नियोजन आयोगात अध्यक्ष म्हणून कार्यरत होते. गुप्ता यांनी इलेक्ट्रिकल इंजिनियरिंगमध्ये डॉक्टरेट केले आहे. अमेरिका आणि इतर देशांमध्ये इलेक्ट्रिकल यूटिलिटी क्षेत्रासोबत गुप्ता यांची 30 वर्षांपेक्षा अधिक काळाची कारकीर्द राहिली आहे.

याआधी ते शहराचे उपमहापौर देखील राहिले आहेत.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹एअरटेलकडून 100 एमबीपीएस इंटरनेट स्पीड

भारताच्या दूरसंचार क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी भारती एअरटेलने अहमदाबादमध्ये आपल्या अत्याधुनिक तंत्रज्ञान व्ही-फायबरचा प्रारंभ केला. या तंत्ज्ञानाच्या सहाय्याने सध्या शहरात असणाऱया ग्राहकांना 100 एमबीपीएस वेगाने इंटरनेट वापरण्याची सेवा मिळणार आहे. व्ही फायबर हे तंत्रज्ञान व्हेक्टोराझेशनवर आधारित आहे. या तंत्रज्ञानात ब्रॉडबॅन्ड धारकांना अतिवेगवान डेटा, एचडी व्हिडिओ स्ट्रीमिंग आणि अपलोड एकाच वेळी अनेक उपकरणांवर करण्याची सोय आहे. या सेवेनुसार नवीन ग्राहकांना तीन महिन्यासाठी अमर्यादित डेटा मिळणार असून त्याची किंमत 999 रुपये आहे. सध्याच्या इंटरनेट वेगापेक्षा व्ही फायबर हे भविष्यातील इंटरनेट वापरण्याची सेवा असणार आहे. कंपनीच्या सध्याच्या ग्राहकांनाही या सेवेचा लाभ घेता येणार आहे. लवकरच अनेक शहरात ही सेवा सुरु करण्यात येईल.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹फिफा मानांकनात भारताला 135 वे स्थान

भारतीय फुटबॉल संघाने फिफाने जाहीर ताज्या क्रमवारीत दोन स्थानांची प्रगती केली असून 135 वे स्थान मिळवित त्यांनी वर्षाची अखेर केली आहे. गेल्या सहा वर्षातील भारताची हे सर्वोच्च मानांकन आहे.

यापूर्वी 2009 मध्ये भारताने 134 वे स्थान मिळवित सर्वोच्च मानांकन मिळविले होते. भारताच्या मानांकनात वाढ होण्याचे श्रेय प्रमुख प्रशिक्षक स्टीफन कॉन्स्टन्टाईन यांनी खेळाडू व साहाय्यक स्टाफला दिले. ‘खेळाडूंच्या मदतशिवाय हे यश साध्य करता आले नसते. आपल्याकडे असाधारण खेळाडूंचा संच असून आम्ही भविष्यातील संघ बनविण्याच्या प्रक्रियेत आहोत,’ असे ते म्हणाले. मात्र मानांकनावरून हुरळून जाण्याची गरज नसल्याचेही त्यांना वाटते. ‘जेव्हा मी पदभार स्वीकारला तेव्हा ज्या गोष्टींना मी प्राधान्य दिले होते, त्यापैकी राष्ट्रीय संघाचे मानांकन सुधारणे हे एक होते. निकालावरून तरी आमच्या सुधारणा झाल्याचे वाटते. पण आम्हाला अजून बरीच मोठी मजल मारावयाची आहे,’ असे त्यांनी स्पष्ट केले.

‘फुटबॉलमधील निकाल मैदानाबाहेरून मिळणाऱया मदतीवरही अवलंबून असतात. एआयएफएफचे अध्यक्ष प्रफुल पटेल व एआयएफएफचे सरचिटणीस कुशल दास यांनी माझ्या मनाप्रमाणे काम करण्याचे स्वातंत्र्य दिले, याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. दोघांनी भारतीय फुटबॉलसाठी दीर्घकालीन योजना आखली असून पूर्ण सांघिक प्रयत्नांमुळेच आजचे हे यश मिळविता आले आहे,’ असेही कॉन्स्टन्टाईन म्हणाले. ‘2016 मध्ये अनेक सकारात्मक गोष्टी घडल्या. राष्ट्रीय संघाने सॅफ चॅम्पियनशिप स्पर्धा जिंकली तर महिला संघाने एसएजी स्पर्धेचे सुवर्ण मिळविले आणि आंतरराष्ट्रीय मित्रत्वाच्या सामन्यात राष्ट्रीय संघाने आपल्यापेक्षा वरचे मानांकन (114) असलेल्या प्युर्टो रिकोसारख्या बलवान संघाला 4-1 असे नमविण्याचा पराक्रम केला. त्यामुळे भारतीय फुटबॉलचे भवितव्य उज्ज्वल असल्याचे दिसत आहे,’ असे मतही त्यांनी मांडले.

‘मैदानाबाहेरील घडामोडीही आश्वासक ठरल्या आहेत. भारताला 2016 मधील सर्वोत्तम विकसनशील सदस्य संघटनेचा एएफसी पुरस्कार मिळाला. याशिवाय युवेना फर्नांडीस या विश्वचषक स्पर्धेत रेफरीचे काम पाहणाऱया भारताच्या पहिल्या महिला बनल्या. याशिवाय एका भारतीय क्लबने पहिल्यांदाच एएफसी चषकाची अंतिम फेरी गाठली आणि भारताच्या एका उदयोन्मुख खेळाडूने युरोपा लीगमध्ये खेळण्याचा मान मिळविला, हेही विसरून चालणार नाही,’ असेही ते म्हणाले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा