Post views: counter

Current Affairs Jan 2017 Part - 2

🔰 Current Affairs Marathi

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹"स्वच्छता' मानांकनासाठी राज्यातील सर्वांधिक शहरे

"स्वच्छता अभियानात' पात्र ठरून देशपातळीवरील मानांकन स्पर्धेत यशस्वी लढा देण्यासाठी राज्यातील सर्वांधिक 44 शहरे पात्र ठरली आहेत. राज्यातील शहरांचा हा आकडा यंदा प्राथमिक निकष पात्र ठरलेल्या देशातील 500 शहरांमध्ये सर्वांधिक असून, महाराष्ट्राचा देशात पहिला क्रमांक लागला आहे. मागील वर्षी देशभरातील 73 शहरांमध्ये राज्यातील 9 शहरांचा समावेश होता.

"स्वच्छ भारत अभियानांतर्गत' दरवर्षी देशातील शहरांची निकष लावून निवड केली जाते. यानंतर केंद्रीय नगरविकास विभागाची पथके एका ठराविक काळात प्रत्येक शहरांना भेट देऊन स्वच्छतेची पाहणी करताना प्रत्येक शहरांना मानाकन देतात. यासाठी दोन हजार गुणांच्या परीक्षेला प्रत्येक शहराला सामोरे जावे लागते. यापैकी 1200 गुण हे घनकचरा व्यवस्थापन, हागणदारीमुक्त शहर यासाठी, तर उरलेले 800 गुण शहर, प्रशासन कागदपत्रे आदींविषयी आहेत. घनकचरा व्यवस्थापनामध्ये प्रकल्प, त्याची अंमलबजावणी, त्यातील कल्पकता, पर्यावरण, नावीन्यपूर्ण बाबी असे अनेक घटक विचारात घेतले जातात. तर हागणदारीमुक्त शहर यात शौचालये, स्वच्छता, आरोग्य आदी घटकांचा विचार करून हे गुण दिले जातात. ज्या शहराला जास्तीत जास्त गुण त्या शहराचे मानांकन सगळ्यात वरचे राहणार आहे. यामध्ये देशातील सर्वांधिक स्वच्छतेचे पहिल्या मानांकनाचे शहर ते अगदी तळाच्या म्हणजे 500 व्या स्थानावर स्थानावर असलेले शहर असे मानांकन राहणार आहे.

राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने "स्वच्छता अभियान' राबविताना यंदा राज्यातील जास्तीत जास्त शहरांचा देशपातळीवर नामांकनासाठी विचारव व्हावा, या दृष्टिकोनातून गेल्या आठ महिन्यांपासून काम केले. त्यानुसार घनकचरा व्यवस्थापन, त्यातील गती, हागणदारीमुक्तीच्या दिशेने योग्य कार्यवाही, यासाठी प्रयत्न सुरू ठेवले होते. यासाठी जागतिक स्तरावरील जाणकारांच्या कार्यशाळा, शहरपातळीवरील नगरविकास विभागाच्या अधिकारी-कर्मचारी यांना "उद्दिष्ट पूर्तीचे' लक्ष्य दिले. त्यानुसार अंमलबजावणी केल्यामुळे 44 शहरे प्राथमिक निवडीचे निकष पार करू शकली.

केंद्रीय पथके 4 जानेवारी ते 4 फेब्रुवारी 2017 या कालावधीत या शहरांची पाहणी करून मानांकन करणार आहेत. यानंतर 15 फेब्रुवारीच्या दरम्यान देशातील 500 शहरांचे मानांकन जाहीर केले जाणार आहे.

मानांकनाच्या शर्यतीतील शहरे

बृहन्मुंबई, पालघर, अंबरनाथ, बदलापूर, भिवंडी, कल्याण-डोंबिवली, मीरा-भाईंदर, ठाणे, उल्हासनगर, रायगड, पुणे, पिंपरी-चिंचवड, सातारा, कोल्हापूर, इचलकरंजी, सोलापूर, बार्शी, उस्मानाबाद, लातूर, उदगीर, नांदेड-वाघाळा, चंद्रपूर, यवतमाळ, वर्धा, हिंगणघाट, गोंदिया, नागपूर, अमरावती, अचलपूर, अकोला, जालना, परभणी, बीड, नगर, शिर्डी, औरंगाबाद, जळगाव, भुसावळ, धुळे, नंदूरबार, नाशिक, मालेगाव, सांगली, नवी मुंबई.

मुंबई, पुणे, नागपूर
गेल्या वर्षी राज्यातील मुंबई शहर देशपातळीवर मानांकनात 10व्या स्थानी होते. त्यानंतर पुणे (11), नवी मुंबई (12), ठाणे (17), नागपूर (20) यांची मानांकने होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹मुंबई- पुणे द्रुतगती मार्ग होणार "वाय-फाय'

मुंबई- पुणे द्रुतगती मार्गावरील प्रवाशांना वाय-फाय सेवा देण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) घेतला आहे. त्याकरिता कंपन्यांकडून स्वारस्य निविदा मागविल्या आहेत. "बीओटी' तत्त्वावर हा प्रकल्प राबवण्यात येणार असून, त्याद्वारे महामार्गावर नियम मोडणाऱ्यांवरही कारवाई करणे शक्य होणार आहे.

द्रुतगती मार्गामुळे मुंबई -पुणे शहरांदरम्यानचा प्रवास वेगवान झाला आहे. या मार्गावरून दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. या मार्गावर घाट आणि काही परिसरात मोबाईल आणि इंटरनेट कनेक्टिव्हिटी नसते, त्यामुळे नागरिकांची गैरसोय होते. ही गैरसोय दूर करण्यासाठी "एमएसआरडीसी'ने महामार्गावर मोफत "वाय-फाय' सेवा सुरू करण्याचे ठरवले आहे. कंपन्यांना ऑनलाइन निविदा भरता येणार असून, त्याला टेलिकॉम कंपन्या व अन्य सेवा पुरवठादारांकडून चांगला प्रतिसाद मिळेल, अशी अधिकाऱ्यांना आशा आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹महाबळेश्वरला हिमकणांची चादर

देशासह राज्यात सर्वत्र थंडीचा कडका वाढत असताना महाराष्ट्राचे नंदनवन म्हणून ओळखले जाणारे महाबळेश्वरही रविवारी त्याला अपवाद नव्हते. काश्मीर, कुलू-मनाली, सिमला येथे प्रचंड बर्फवृष्टी सुरू असतानाच महाबळेश्वरमध्येही थंडीचा जोर वाढल्याने प्रसिद्ध वेण्णा तलाव, लिंगमाळा परिसरात निसर्गाने हिमकणांची पांढरी शुभ्र दुलई पांघरलेली कायम पहावयास मिळाली.

निसर्गाच्या या चमत्काराची मौज मनमुराद लुटण्यासाठी पर्यटक, निसर्गप्रेमी, स्थानिक हौशींनी वेण्णा तलाव व लिंगमाळा परिसर बहरून गेला. हवामान खात्याच्या नोंदीनुसार शनिवारी या शहराचे किमान तपमान १०.६ अंश सेल्सियस होते, तर खात्यानेच नोंदविलेले दवबिंदू तपमान उणे ०.६ अंश सेल्सियस होते.

रविवारी भल्या पहाटेपासूनच वेण्णा तलावाच्या नौकाविहारासाठीच्या जेट्टीवर मोठ्या प्रमाणावर दवबिंदू गोठल्यामुळे हिमकण जम झाले, संपूर्ण जेट्टी पांढरीशुभ्र झाल्याचे दिसत होते. त्यामागील वेण्णा तलावाचा पृष्ठभाग थंड वाफांमुळे व्यापून गेल्याचे मनोहारी दृश्य निसर्गप्रेमींना पहावयास मिळाले. स्मृतिवन भागातही दवबिंदू मोठ्या प्रमाणात गोठल्यामुळे सर्व परिसर हिमकणांनी पांढराशुभ्र झाला. वनस्पतींची पाने, फुले, वेलींनी हिमकणांचा साज परिधान केल्याचे विहंगम दृश्य मोहून टाकत होते.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹बळीराजालाही मिळणार ‘नवप्रकाश’

थकबाकीमुळे वीज पुरवठा खंडित झालेल्या शेतकऱ्यांनाही महावितरणने सुरू केलेल्या नवप्रकाश योजनेचा लाभ मिळणार आहे. न्यायप्रविष्ट प्रकरणात हुकूमनामा (डिक्री) मंजूर झालेल्या विशिष्ट प्रकरणांचाही या योजनेत समावेशही करण्यात आला आहे. थकीत देयकांमुळे कायमस्वरुपी वीज पुरवठा खंडित झालेल्या उच्च व लघुदाब वीज ग्राहकांच्या थकबाकीच्या मुक्तीसाठी महावितरणने १ नोव्हेंबरपासून नवप्रकाश योजना सुरू केली आहे. त्याचा आता थकबाकीदार शेतकरीही फायदा घेऊ शकणार आहेत.

नवप्रकाश योजनेच्या सुरुवातीला सार्वजनिक नळपाणी पुरवठा व शेतीपंप वगळण्यात आले होते. मात्र, आता थकीत देयकापोटी ३० मार्च २०१६ पूर्वी कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित केलेल्या शेतकऱ्यांनाही नवप्रकाश योजनेचा लाभ गेट येणार आहे. ३० मार्च २०१६ पूर्वी वीज पुरवठा कायमस्वरूपी खंडित करण्यात आलेल्या उच्च व लघुदाब ग्राहकांसह संबंधित कृषिपंप ग्राहकांनी जानेवारी अखेरपर्यंत त्यांच्या मूळ थकबाकीचा भरणा केल्यास व्याज व विलंब आकाराची रक्कम माफ होईल. ही योजना एप्रिल अखेरपर्यंत सुरू राहणार असून फेब्रुवारी ते एप्रिल दरम्यान थकबाकीदारांना मूळ थकबाकी तसेच व्याज व विलंब आकाराची २५ टक्के रक्कम भरावी लागेल. या ग्राहकांना थकबाकीवरील व्याज व विलंब शुल्कात ७५ टक्के सूट मिळेल. न्यायप्रविष्ट प्रकरणात हुकूमनामा (डिक्री) मंजूर होऊन १२ वर्षे पूर्ण झालेल्या थकबाकीदारांना योजनेचा लाभ घेता येणार आहे. योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या ग्राहकांनी अधिक माहितीसाठी www.mahadiscom.in या वेबसाइटला भेट द्यावी. ग्राहकांना थकबाकीचा तपशील महावितरणच्या शाखेत मिळेल.

१७ हजार सहभागी

नाशिक परिमंडळातील सुमारे १७ हजार ग्राहकांनी आतापर्यंत नवप्रकाश योजनेत आपला सहभाग नोंदवला आहे. नाशिक शहर मंडळातील ४ हजार ९३१ ग्राहकांनी योजनेअंतर्गत १ कोटी ५५ लाख, मालेगाव मंडळातील ५ हजार ५५९ जणांनी १ कोटी ४९ लाख तर अहमदनगर मंडळातील ६ हजार ४५२ जणांनी २ कोटी ५ लाख रुपयाचा भरणा केला आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव सुरू

अहमदाबाद - येथील साबरमती नदीच्या किनारी आज सकाळी आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवाला सुरवात झाली. राज्यपाल ओ. पी. कोहली, मुख्यमंत्री विजय रुपानी आणि उपमुख्यमंत्री नीतीन पटेल यांच्या हस्ते या महोत्सवाची सुरवात झाल्यानंतर देश-विदेशांतील पतंगप्रेमींनी मोठा जल्लोष केला.

यंदा या महोत्सवात 160 पतंग तज्ज्ञांनी सहभाग घेतला असून, यामध्ये 31 देशांतील 114 जणांसह भारताच्या विविध राज्यांतील 51 लोकांचाही समावेश आहे.

 गुजरात सरकार आणि पर्यटन महामंडळातर्फे दरवर्षी भरविला जाणारा हा महोत्सव यंदा 14 जानेवारीपर्यंत म्हणजेच संक्रातीपर्यंत सुरू राहणार आहे. आज परदेशी पतंग प्रेमींच्या पतंगांनी आकाश रंगबिरंगी झाले होते. यामध्ये चीनचा ड्रॅगनच्या आकाराचा पतंग, अनेक कार्टून्स, पक्षी आदींच्या आकारांत पतंग तयार करण्यात आले आहेत. असेच महोत्सव आता वडोदरा, सुरत आणि राजकोटसह 14 राज्यांमध्ये भरविण्यात येणार असून, यंदा व्हायब्रंट गुजरात परिषदेसाठी आलेले मान्यवरही या महोत्सवाला भेट देणार असल्याचे समजते.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹प्रदूषण रोखण्यासाठी ‘पर्यावरण पोलिस’

वाढत्या प्रदूषणाशी लढा देण्यासाठी चीन सरकारने पर्यावरण पोलिस पथकाची स्थापना केली आहे. हे पथक उघड्यावरील बार्बेक्यू, कचरा आणि नाशवंत माल जाळून टाकणे आदी गोष्टींवर नियंत्रण आणेल.

बीजिंग शहरातील प्रदूषणासंबंधात देण्यात आलेला ‘ऑरेंज अलर्ट’ शनिवारी रात्री उठविण्यात आला. त्यामुळे वाहनांवरील आणि कारखान्यांमधील उत्पादनांवरील निर्बंध संपुष्टात आले आहेत. चीनमध्ये प्रदूषणाच्या पातळीनुसार लाल, नारिंगी, पिवळा आणि निळा असे दक्षतेचे इशारे देण्यात येतात. दरम्यान, नव्या वर्षापासून पर्यावरण पोलिस देशातील १६ जिल्ह्यांतील प्रदूषणावर नजर ठेवून राहतील, अशी माहिती बीजिंगचे कार्यकारी महापौर त्साय छ्यी यांनी दिली. बीजिंगमध्ये सुमारे आठवडाभर प्रदूषणाची पातळी वाढली होती. त्यामुळे नागरिकांकडून संबंधित अधिकाऱ्यांवर टीका सुरू झाली होती. त्या पार्श्वभूमीवर, नव्या पोलिस पथकाचा निर्णय घेण्यात आला. काही भागांत हिमवृष्टी होत असून, हा बर्फ प्रदूषित असल्याने त्याच्या संपर्कात येऊ नये, बाहेर जायचे असल्यास छत्रीचा वापर करावा, असा इशारा हवामान खात्याने दिला होता.

‘डिजिटल’मुळे चीनमध्ये ४० कोटी रोजगार
चीनमधील डिजिटल अर्थव्यवस्थेमुळे सन २०३५ पर्यंत ४० कोटी रोजगार निर्माण होणार असून, त्यापैकी १० कोटी रोजगार हे केवळ ‘अलिबाबा’ या ई-कॉमर्स क्षेत्रातील बलाढ्य उद्योगाद्वारे निर्माण होणार असल्याचा अंदाज नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अहवालामध्ये वर्तवण्यात आला आहे.

‘बोस्टन कन्सल्टिंग ग्रुप’ या संस्थेने हा अहवाल प्रसिद्ध केला असून, पुढील दोन दशकांमध्ये इंटरनेटवर आधारित अर्थव्यवस्थेचे मूल्य सोळाशे अब्ज अमेरिकन डॉलर्सच्या घरात पोहोचणार असल्याचे या अहवालात म्हटले आहे. अलिबाबा समुहातर्फे प्रायोजित करण्यात आलेल्या नवअर्थव्यवस्थेसंबंधी परिषदेमध्ये हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला. चीनमधील सर्वांत मोठा ऑनलाइन व्यापारसमूह असणाऱ्या ‘अलिबाबा’ने गेल्या वर्षभरात ‘अलिबाबा’ने तीन कोटी रोजगार निर्माण केले आहेत. या क्षेत्रातील रोजगारनिर्मिती वाढत जाईल, तशी सध्या मानवाकडून करण्यात येणारी कामे ही क्लाउड कम्प्युटिंग, आर्टिफिशयल इंटेलिजन्स (कृत्रिम बुद्धिमत्ता) यांसारख्या डिजिटल तंत्रज्ञानामार्फत करण्यात येतील, असेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹"मनरेगा'साठी एप्रिलपासून "आधार' बंधनकारक

ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला वर्षाला शंभर दिवस हक्काचे काम देणाऱ्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेसाठी (मनरेगा) एप्रिलपासून आधार कार्ड बंधनकारक करण्यात आले आहे.
या योजनेत नाव नोंदविणाऱ्या व्यक्तींना आता आधार कार्डचा पुरावा द्यावा लागेल.

 त्यांच्याकडे आधार कार्ड नसल्यास ते 31 मार्चपर्यंत त्यांना ते काढून घ्यावे लागेल, अशी माहिती सूत्रांनी दिली. आधार कार्ड मिळेपर्यंत शिधापत्रिका, वाहन चालविण्याचा परवाना, मतदार ओळखपत्र, किसान पासबुक, मनरेगाचे ओळखपत्र आणि राजपत्रित अधिकारी अथवा तहसीलदारांनी दिलेले प्रमाणपत्र पुरावा म्हणून या योजनेसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे. आधारसाठी नाव नोंदणी केलेल्यांना याची पावती अथवा बाराआकडी आधार क्रमांक पुरावा म्हणून देता येईल, असे सूत्रांनी नमूद केले.

जम्मू-काश्मीरसह अन्य काही राज्यांत मनरेगासाठी आधार क्रमांक बंधनकारक करण्याबाबत केंद्र सरकारने योग्य ते आदेश दिले आहेत. आधार क्रमांक मिळवण्यात नागरिकांना कोणत्याही अडचणी येऊ नयेत, यासाठी पुरेशा उपाययोजना करण्याचे निर्देश सरकारने सर्व यंत्रणांना दिले आहे. सरकारने आधार कायद्यातील कलम 7 लागू केले आहे. या कलमानुसार सरकारी अंशदान व सरकारकडून निधी मिळविताना आणि विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार क्रमांक देणे बंधनकारक आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹हिंदू कॉलेज झाले 200 वर्षांचे

हिंदू कॉलेज ते प्रेसेडन्सी विद्यापीठ अशी विविध नामावलीचा प्रवास करणारे येथील हिंदू कॉलेज यंदा आपल्या स्थापनेची दोनशे वर्षे पूर्ण करीत असून 20 जानेवारीला होणाऱ्या स्थापनादिनाच्या कार्यक्रमासाठी एक हजारांहून अधिक माजी विद्यार्थ्यांनी आपली नोंदणी केली आहे.

स्थापनादिनाच्या कार्यक्रमाला पाच जानेवारीला सुरवात झाली आहे. आत्तापर्यंत या कॉलेजचे तीनदा नावही बदलण्यात आले आहे. मूळ हिंदू कॉलेजची स्थापना ही 1817 मध्ये झाली.

 त्यानंतर 1855 मध्ये त्याचे नाव प्रेसेडन्सी कॉलेज असे झाले तर 2010 मध्ये त्याचे नामकरण प्रेसेडन्सी विद्यापीठ असे झाले असून त्याच्या शैक्षणिक दर्जाची ख्याती सातासमुद्रापार पोचली आहे. दोनशे वर्षांच्या इतिहासात या विद्यापीठाने काळानुसार आपल्यात अनेक शैक्षणिक बदलही केले असून 21 व्या शतकानुसार आता शिक्षण देण्यात येत आहे.

या हिंदू कॉलेजच्या स्थापनेला 20 जानेवारीला दोनशे वर्षे पूर्ण होत असून त्यानिमित्त पाच जानेवारीपासून कार्यक्रम सुरू झाले आहेत. येत्या 20 ला होणाऱ्या स्थापनादिनाच्या कार्यक्रमासाठी एक हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. मात्र, ज्यांनी या कार्यक्रमासाठी नोंदणी केलेली नाही त्यांच्यासाठी सभागृहाच्या बाहेर लावण्यात येणाऱ्या स्क्रीनवर स्थापना दिवसाचा थेट कार्यक्रम पाहता येणार आहे. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे या वेळी भाषण होणार आहे, असे संस्थेचे सचिव बिवास चौधरी यांनी सांगितले. गेल्या वर्षी सहा डिसेंबरला संगीत रजनीच्या कार्यक्रमाद्वारे हिंदू कॉलेजच्या स्थापनेच्या 200 वर्षाच्यानिमित्त वर्षभर होणाऱ्या कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹स्पेनच्या रॉबर्तोला विजेतेपद

स्पेनच्या रॉबर्तो बौतिस्ता अगुत याने चेन्नई ओपन टेनिस स्पर्धेतील पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकावून मोसमाची धडाक्यात सुरुवात केली. त्याचे हे या स्पर्धेतील पहिलेच आणि कारकीर्दीतील पाचवे एटीपी विजेतेपद ठरले.

पुरुष एकेरीच्या अंतिम लढतीत रॉबर्तोने रशियाच्या डॅनिल मेद्वेदेववर ६-३, ६-४ अशी सरळ सेटमध्ये मात केली. हे दोघे प्रथमच आमनेसामने आले होते. यापूर्वी रॉबर्तोने २०१३मध्ये चेन्नई ओपनची अंतिम फेरी गाठली होती. त्या वेळी सर्बियाच्या यांको टिपसरेविचने त्याला हरवून जेतेपद पटकावले होते.

गेल्यावर्षी फेब्रुवारीत रॉबर्तोने सोफिया ओपन स्पर्धा जिंकली होती. त्यानंतर त्याचे हे पहिलेच विजेतेपद ठरले.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹सानियाने जेतेपद पटकावले, अव्वल रँकिंग गमावले

भारताची आघाडीची महिला टेनिसपटू सानिया मिर्झासाठी शनिवार आनंदासह थोडेसे दुःख घेऊन आला. अमेरिकेच्या बेथनी मटेक-सँड्ससह सानियाने ब्रिस्बेन आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत दुहेरीचे जेतेपद पटकावले; पण जेतेपद पटकावूनदेखील तिला जागतिक दुहेरी टेनिस रँकिंगमधील आपला अव्वल क्रमांक गमवावा लागला आहे. विशेष म्हणजे सानियावर सरशी साधून अव्वल क्रमांक पटकावला आहे तो तिची या जेतेपदातील जोडीदार बेथनी मटेक-सँड्सने.

शनिवारी पार पडलेल्या अंतिम फेरीत अव्वल सीडेड सानिया-बेथनी यांनी एकतेरिना मॅकारोव्हा आणि एलेना व्हेसनिना या रशियाच्या दुसऱ्या सीडेड जोडीवर ६-२, ६-३ असा सहज विजय मिळवला. या जेतेपदामुळे सानियाला जे गुण मिळाले त्यापेक्षा बेथनीला मिळालेले गुण सरस ठरले अन् सानियाला सलग ९१ आठवड्यांनंतर जगतिक दुहेरीतील आपला अव्वल क्रमांक गमवावा लागला.

‘मला असे वाटते आहे की माझा ‘मिस वर्ल्ड नंबर वन’चा मुकूट मी बेथनीकडे सोपवला आहे’, अशी प्रतिक्रिया सानियाने दिली. गेल्यावर्षीदेखील सानियाने ही ब्रिस्बेन स्पर्धा जिंकली होती. त्यावेळी तिची जोडीदार होती ती स्वित्झर्लंडची मार्टिना हिंगिस. ‘व्हेसनिना आणि मॅकारोव्हा यांच्याविरुद्धचा सामना नेहमीच आव्हानात्मक ठरतो. असे सामने खूप छान रंगतात. गतविजेते या बिरुदासह तुम्ही स्पर्धेत सहभागी होता, ही भावनाच मनाला सुखावून जाणारी असते. बेथनी ही फक्त या स्पर्धेतील माझी जोडीदार नाही, तर माझी खास मैत्रीणही आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून आम्ही एकमेकींना ओळखत आहोत. जवळपास प्रत्येक मोसमात आम्ही एकदा तरी दुहेरीत एकत्र खेळतो. याआधी आम्ही एकत्र खेळलो होतो ते सिडनी स्पर्धेत’, अशा आठवणी सानियाने सांगितल्या.

यावेळी सानियाने बेथनीसह दुहेरीत अधिकाधिक स्पर्धांमध्ये भाग घेण्याची इच्छाही व्यक्त केली. ‘मला वाटते की आम्ही दुहेरीत खूप स्पर्धांमध्ये एकत्र खेळायला हवे. बेथनी तुझे खूप आभार, तू माझ्यासह खेळलीस. मी जागतिक रँकिंगमध्ये अव्वल होते; आता तू त्या क्रमांकावर आहेस. तुझे अभिनंदन. मी नाही तर तू माझी मैत्रीण अव्वल झाली आहेस याचाही आनंद आहे. बेथनीला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा...’, असे सानिया म्हणाली.

पुढील आठवड्यात रंगणाऱ्या सिडनी स्पर्धेत सानिया चेक प्रजासत्ताकच्या बार्बरा स्ट्रीकोव्हासह दुहेरीत भाग घेणार आहे. १६ जानेवारीपासून रंगणाऱ्या ऑस्ट्रेलियन ओपनमध्येही सानिया बार्बरासह दुहेरीत भाग घेईल.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹परदेशात नोकरीसाठी प्रवासी कौशल्य विकास योजना

परदेशात रोजगार मिळविण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या भारतीयांसाठी केंद्र सरकार लवकरच प्रवासी कौशल्य विकास योजना सुरू करणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केली.

बंगळूरमध्ये प्रवासी भारतीय दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान मोदी बोलत होते.

प्रवासी कौशल्य विकास योजनेअंतर्गत परदेशात ठराविक क्षेत्रांमध्ये काम करू इच्छिणाऱ्या भारतीयांना आंतरराष्ट्रीय मानकांप्रमाणे प्रशिक्षित आणि प्रमाणित करण्यात येईल. राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळाच्या वतीने पररष्ट्र मंत्रालय आणि कौशल्य विकास मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षकांच्या साह्याने ही योजना राबविण्यात येणार आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹1 फेब्रुवारीलाच अर्थसंकल्प; राष्ट्रपतींची मंजुरी

संसदेचे अर्थसंकल्पी अधिवेशन 31 जानेवारीपासून सुरू करण्याच्या केंद्र सरकारच्या प्रस्तावास राष्ट्रपतींनी आज मंजुरी देऊन शिक्कामोर्तब केले. आता सरकारने ठरविल्याप्रमाणे एक फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला जाईल. अधिवेशनाचा कालावधी तूर्तास नऊ फेब्रुवारीपर्यंतच आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या संसदीय कामकाजविषयक समितीने अर्थसंकल्पी अधिवेशन 31 जानेवारी ते नऊ फेब्रुवारी या कालावधीत घेण्याचा प्रस्ताव राष्ट्रपतींकडे सादर केला होता. 31 जानेवारीला दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीसमोर राष्ट्रपतींच्या अभिभाषणाने या अधिवेशनाला प्रथेनुसार प्रारंभ होईल. यानंतर सरकारतर्फे अर्थसंकल्पपूर्व पाहणी अहवाल संसदेला सादर केला जाईल. दुसऱ्या दिवशी; म्हणजे एक फेब्रुवारीला केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला जाईल.

दरम्यानच्या काळात निवडणूक आयोगाने उत्तर प्रदेशासह पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर केले. त्यामुळे जवळपास सर्व विरोधी पक्षांनी राष्ट्रपतींसह निवडणूक आयोगाकडे अर्थसंकल्पाची तारीख पुढे ढकलण्याची मागणी केली आहे.

 अर्थसंकल्पातील संभाव्य सवलतींमुळे सरकारला म्हणजेच सत्तारूढ पक्षाला या निवडणुकीत विरोधी पक्षांच्या तुलनेत अधिक लाभ मिळेल आणि निवडणुकीत सर्व पक्षांना समान संधी मिळण्याच्या तत्त्वाचे पालन होणार नाही असे विरोधी पक्षांचे म्हणणे आहे. 2012 मध्ये नेमक्या याच परिस्थितीत तत्कालीन केंद्र सरकारने (यूपीए; डॉ. मनमोहनसिंग) अर्थसंकल्प पुढे ढकलल्याची बाबही या विरोधी पक्षांनी आयोगाच्या निदर्शनास आणून दिली आहे. आयोगाने याबाबत केंद्रीय मंत्रिमंडळ सचिवांकडे सरकारच्या भूमिकेबाबत विचारणा केली आहे. परंतु, राष्ट्रपतींची मंजुरी लक्षात घेता, सरकार अर्थसंकल्पाचा दिवस बदलण्याच्या मनःस्थितीत नसल्याचे स्पष्ट होते.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹रणदीप हुडा भारताचा 'फायर' ब्रँड अँबॅसेडर

भारतातील अग्निशमन सेवेचा बँड अँबॅसेडर म्हणून अभिनेता रणदीप हुडा याची निवड करण्यात आली आहे. केंद्र सरकारची संस्था 'द स्टँडिंग फायर अॅडवायजरी काउन्सिल'ने (SFC) रणदीपची निवड केली आहे.

"प्रत्येक सेवेचा एक ब्रँड अँबॅसेडर असतो. त्याचप्रमाणे आम्हीही आमचा एक बँड अँबॅसेडर बनविण्याचा निर्णय घेतला. अभिनेता रणदीप हुडा आधी मुंबई अग्निशामक दलाचा ब्रँड अँबॅसेडर राहिलेला आहे.

देशातील अग्निशमन सेवेचा चेहरा बनण्यासाठी SFC आणि केंद्र सरकारने त्याच्याशी संपर्क केला," असे मुंबई अग्निशामक दलाचे प्रमुख अग्निशमन अधिकारी पी.एस. रहंगदले यांनी सांगितले.

रणदीपने हा प्रस्ताव स्वीकारला असून, तो भविष्यात अग्निसुरक्षा अभियानांमध्ये सहभागी होईल.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹आर.अश्विनचा नेत्रदान करण्याचा कौतुकास्पद निर्णय

भारतीय संघाचा फिरकीपटू रविचंद्रन अश्विन याने नुकतेच आपल्या फेसबुक पेजवर नेत्रदान करण्याचा निर्णय घेतल्याचे जाहीर केले. चेन्नईतील एका रुग्णालयाच्या नेत्रदान मोहिमेत हातभार लावत कसोटी क्रमवारीतील या अव्वल मानांकित गोलंदाजाने नेत्रदान करण्याचा निर्णय घेतला. नेत्रदानाच्या जनजागृतीसाठी प्रयत्न करावेत असे अश्विनच्या पत्नीचे स्वप्न होते. आपल्या पत्नीचे स्वप्न सत्यात उतरल्याचे अश्विनने म्हटले असून नेत्रदानाची जनजागृती करण्यावर लक्ष केंद्रीत करणे हे त्याच्या फाऊंडेशनचे मुख्य उद्दीष्ट असल्याचे त्याने म्हटले.

आम्ही नुकतेच अश्विन फाऊंडेशन सुरू केले आहे. नेत्रदानाची जनजागृतीचे आमचे लक्ष्य असून मी नेत्रदानाचा निर्णय घेऊन या अभियानाची सुरूवात केली आहे. इतरही या निर्णयाला पाठिंबा देण्यासाठी पुढाकार घेतील अशी आशा आहे, असे अश्विनने ‘द हिंदू’ला दिलेल्या मुलाखतीत म्हटले. अश्विनच्या फाऊंडेशनची सुरूवात ७ जानेवारी रोजी झाली. क्रिकेटचे मैदान गाजवणारा अश्विन सामाजिक क्षेत्रात देखील तितकाच सक्रिय आहे. अश्विन फाऊंडेशन सोबतच अश्विनची स्वत:ची ‘जेन-नेक्स्ट’ नावाची क्रिकेट अकादमी देखील आहे. २०१० साली अश्विनने चेन्नईत या अकादमीची स्थापना केली.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹सुभाष वेलिंगकरांच्या पक्षाला मिळाले निवडणूक चिन्ह

गोव्यात भारतीय भाषा सुरक्षा मंचाने स्थापन केलेल्या गोवा सुरक्षा मंच या नव्या राजकीय पक्षाला आज फळा (ब्लॅक बोर्ड) हे निवडणूक चिन्ह मिळाले. प्राथमिक शिक्षणासाठी केवळ भारतीय भाषांतील शाळांनाच अनुदान द्यावे या मागणीसाठीच या पक्षाची स्थापना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे बंडखोर नेते सुभाष वेलिंगकर यांच्या पुढाकारातून झाली आहे.

कॉंग्रेसच्या सरकारने २०११ मध्ये इंग्रजी माध्यमाच्या प्राथमिक शाळांना अनुदान सुरु केले. त्याविरोधात माजी मुख्यमंत्री (स्व.) शशिकला काकोडकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय भाषा सुरक्षा मंच स्थापून हे आंदोलन २०११ साली सुरू करण्यात आले होते. २०१२ च्या निवडणुकीत या प्रश्नावर उभयमान्य असा तोडगा काढू असे भाजपने आश्वासन दिल्याने मागील निवडणुकीत मंचाने भाजपला पाठींबाही दिला होता.

मात्र सत्तेत आल्यावर भाजपने शब्द पाळला नाही. याउलट अनुदान कायम ठेवण्यासाठी विधेयक सादर केले. त्यामुळे २०१५ मध्ये मंचाने पुन्हा आंदोलन सुरु केले. दरम्यानच्या काळात काकोडकर यांचे निधन झाल्याने सर्व धुरा वेलिंगकर यांच्यावर आली. वेलिंगकर यांना संघाने विभाग संघचालक पदावरून मुक्त केल्यानंतर त्या्ंनी संघाचा स्वतंत्र प्रांत स्थापन केला. त्यामुळे संघाला गोव्यात विजयादशमीचे संचलन केवळ एका शहरात घ्यावे लागले होते.

मंचाने आता याच अुनदान बंदीच्या मुद्यावर विधानसभा निव़डणूक लढविण्याचे ठरवून गोवा सुरक्षा मंचाची नोंदणी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली होती आत त्यांना फळा हे चिन्ह मिळाले आहे. या निवडणुकीत मगो व शिवसेनेशी गोवा सुरक्षा मंचाची युती आहे.

 मंच ७, मगो २२ तर शिवसेना ५ जागा मिळून ४० पैकी ३४ जागा ही युती लढविणार आहे. त्यासाठी भाजपसोबतची पाच वर्षांची युती मगोने याच आठवड्यात संपृष्टात आणली होती.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹लवकरच ‘कोक शताब्दी’, ‘पेप्सी राजधानी’सारख्या ब्रँड नावाने धावणार रेल्वे !

येत्या काळात तुम्हाला ‘पेप्सी राजधानी’ किंवा ‘कोक शताब्दी’ या रेल्वेमध्ये प्रवास करावा लागला तर आश्चर्यचकित होण्याची गरज नाही. तिकिट दर किंवा माल वाहतुकीचे दर न वाढवता उत्पन्न वाढवण्यासाठी रेल्वे प्रशासन सातत्याने प्रयत्न करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून रेल्वे प्रशासनाकडून एक्स्प्रेस किंवा रेल्वे स्थानकाला एखाद्या ब्रँडचे नाव देण्यात येईल. त्या ब्रँडकडून रेल्वेला पैसेही मिळतील. याबाबत प्रशासनाने प्रस्ताव तयार केला असून पुढील आठवड्यात रेल्वे बोर्डाच्या बैठकीत याला मंजुरी मिळू शकते.

या प्रस्तावातंर्गत कोणताही ब्रँड किंवा कंपनी कोणत्याही रेल्वेचे मीडिया हक्क खरेदी करू शकेल. ज्या कंपनीला हे हक्क मिळतील त्यांना रेल्वे बोगीच्या आत आणि बाहेरच्या बाजूस जाहिरात करण्याचे स्वातंत्र्य असेल. रेल्वेने जाहिरातीचे हक्क सुट्या भागात विकण्याचा निर्णय सध्या बाजूला ठेवला असून संपूर्ण रेल्वेगाडीच्या जाहिरातीचेच हक्क देण्यात येणार आहेत. त्याचबरोबर रेल्वे स्थानकांचे हक्क ही कॉर्पोरेट कंपन्यांना दिले जातील, असे रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.

नुकताच झालेल्या एका बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रेल्वे प्रशासनाला प्रवासी भाडे किंवा मालगाडीच्या दरात वाढ न करता दुसऱ्या पद्धतीने रेल्वेचे उत्पन्न वाढवण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यांच्या या सूचननेनंतर या प्रस्तावाला वेग आला. अशाप्रकारचा प्रयत्न तत्कालीन यूपीए सरकारनेही केला होता. परंतु, प्रत्यक्षात त्याला मूर्तस्वरूप मिळाले नव्हते. आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन तोटयात असलेल्या रेल्वेला उत्पन्नाचे नवे मार्ग शोधण्यास सांगण्यात आले आहे.

रेल्वेने भाडेवाड न करता २ हजार कोटी रूपयांचे उत्पन्न मिळवण्याचे उद्धिष्ठ ठेवले आहे. गतवर्षी रेल्वेने ४ रेल्वेगाड्यां बाहेर जाहिरातीचे अधिकार एका कंपनीला दिले होते. या माध्यमातून रेल्वे सध्या वार्षिक ८ कोटी रूपये उत्पन्न मिळवत आहे.

त्याचबरोबर देशातील महत्त्वाच्या फलाटांवर २ हजारांहून अधिक एटीएम उभारण्याची जागा उपलब्ध करून देणार असून; रेल्वेगाडय़ा, रेल्वे फाटके आणि रेल्वे रुळांशेजारील जागेत जाहिराती करण्यासाठी या क्षेत्रातील बडय़ा कंपन्यांशी संपर्क साधत आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹चीनची पाणबुडी कराचीच्या किनाऱ्यावर

चीनची अण्वस्त्रवाहू पाणबुडी गेल्या वर्षी मे महिन्यात कराची बंदरावर आली होती, हे गुगल अर्थवरून मिळालेल्या छायाचित्रांवरून स्पष्ट झाले आहे. भारताच्या युद्धनौकांवर लक्ष ठेवून त्यांची माहिती मिळविणे, हा त्यामागील हेतू असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.

उपग्रहाकडून मिळणाऱ्या छायाचित्रांमधील एका तज्ज्ञाला चीनच्या नौदलाची ही पाणबुडी कराचीच्या किनाऱ्यावर असल्याचे दिसली. ही पाणबुडी अत्याधुनिक असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. भारतीय नौदलाने याबाबत अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही. अरबी समुद्रात पाणबुडी तैनात करण्यामागे भारताच्या या क्षेत्रातील प्रभावाला आव्हान देण्याचा प्रयत्न असल्याचे मानले जाते. गेल्या महिन्यात नौदलप्रमुख ऍडमिरल सुनील लांबा यांनीही चीनच्या पाणबुड्या आणि इतर युद्धनौकांवर बारीक लक्ष असल्याचे म्हटले होते.

अणुऊर्जेवर चालणाऱ्या पाणबुड्यांमध्ये वारंवार इंधन भरण्याची गरज नसल्याने त्यांचा पल्ला प्रचंड असतो. त्यामुळे अशा पाणबुड्यांवर क्षेपणास्त्रे सज्ज करून त्या पाण्याखाली बऱ्याच मोठ्या कालावधीसाठी तैनात ठेवल्या जाऊ शकतात. त्यांचा माग काढणेही अवघड असते.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹भारत व्हिएतनामला "आकाश' देणार?

"आकाश' या जमिनीवरुन जमिनीवर मारा करणाऱ्या स्वदेशी बनावटीच्या क्षेपणास्त्रांची विक्री व्हिएतनामला करण्यासंदर्भात भारताने उत्सुकता दर्शविली आहे.

आशिया-प्रशांत महासागर भागामधील चीनच्या वाढत्या आक्रमकतेच्या पार्श्वभूमीवर भारत व व्हिएतनाममधील सबंधही हळुहळू दृढमूल होऊ लागल्याचे सूत्रांनी म्हटले आहे. विशेषत: गेल्या काही महिन्यांत दिसून आलेल्या चीनच्या अडवणुकीच्या धोरणाच्या पार्श्वभूमीवर भारताचे व्हिएतनामसंदर्भातील धोरण अत्यंत महत्त्वपूर्ण मानले जात आहे.

आण्विक पुरवठादार गटाचे सदस्यत्व असो, वा जैश-इ-मुहम्मद या दहशतवादी गटाचा म्होरक्या मसूद अझर याला संयुक्त राष्ट्रसंघाकडून दहशतवादी म्हणून घोषित करण्यासंदर्भातील प्रयत्न असोत; चीनकडून सातत्याने भारताची अडवणूक करण्याचे धोरण अवलंबिण्यात आले आहे. तेव्हा भारताकडूनही चीनला व्हिएतनाम व जपानशी लष्करी संबंध अधिक बळकट करण्याच्या कृतीमधून प्रत्युत्तर देण्यात येत असल्याचे मानले जात आहे.

भारताकडून व्हिएतनामला याआधी ब्राह्मोस क्षेपणास्त्रे व "वरुणास्त्र' हे पाणबुडीविरोधी पाणतीर (टॉर्पेडो) देण्याची तयारी दर्शविण्यात आली होती. आता भारत व्हिएतनामला आकाश क्षेपणास्त्रांची विक्री करण्याचीही दाट शक्यता आहे. 25 किमी पल्ला असलेले हे क्षेपणास्त्र विमान, हेलिकॉप्टर्स वा ड्रोन्सचा वेध घेऊ शकते.

दक्षिण चिनी समुद्रात चीनच्या दांडगाईचा सामना करत असलेल्या व्हिएतनामच्या वैमानिकांस या वर्षापासून भारत प्रशिक्षणही देणार आहे. व्हिएतनाम हा भारताचा "जवळचा मित्र' असून नजीकच्या भविष्यात व्हिएतनामला लष्करीदृष्टया अधिक बळकट करण्यासाठी मोहिम हाती घेण्यात आली असल्याचे विधान संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी केले आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹इराणचे राष्ट्राध्यक्ष रफसंजानी काळाच्या पडद्याआड

इराणचे माजी राष्ट्राध्यक्ष अली अकबर हाशेमी रफसंजानी यांचे आज (रविवार) हृदयविकाराचा झटका आल्याने निधन झाल्याचे वृत्त सूत्रांनी दिले. ते 82 वर्षांचे होते.

रफसंजानी हे इराणचे 1989 ते 1997 अशा दीर्घ काळापर्यंत राष्ट्राध्यक्ष होते. यानंतर 2005 मध्ये लढविलेल्या अध्यक्षीय निवडणुकीत ते महमूद अहमदिनेजाद यांच्याकडून पराभूत झाले होते.

रफसंजानी हे इराणमधील कडव्या धार्मिक गोटाचे प्रतिनिधी असले; तरी पाश्चिमात्य देशांबरोबरील इराणचे तणावग्रस्त संबंध सुधारण्यासंदर्भात त्यांचे धोरण वास्तववादी असल्याचे मानण्यात येते.

 इराणमधील संसद व मार्गदर्शक मंडळामधील (गार्डियन कौन्सिल) वाद मिटविण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या संवेदनशील समितीचे अध्यक्ष म्हणूनही रफसंजानी यांनी काम पाहिले होते. याच समितीने 2013 मध्येही अध्यक्षीय निवडणुकीत उतरलेल्या रफसंजानी यांना अपात्र ठरविले होते.

2005 मध्ये पराभव स्वीकारावा लागल्यानंतर रफसंजानी यांनी इराणमधील सरकारवर सार्वजनिकरित्या टीका केली होती. यानंतर देशातील सुधारणावाद्यांनाही रफसंजानी यांनी पाठिंबा दर्शविला होता. "इराणमधील राजकीय बंद्यांची मुक्तता करण्यात यावी आणि राज्यघटनेच्या मर्यादित परिघात काम करण्यास तयार असलेल्या राजकीय पक्षांना अधिक स्वातंत्र्य देण्यात यावे,' अशा भूमिकेचाही त्यांनी पुरस्कार केला होता.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹उस्ताद झाकीर हुसेन यांना एस डी बर्मन अवॉर्ड

15 व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (पिफ) प्रसिद्ध बंगाली अभिनेत्री अपर्णा सेन व ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. याचबरोबर, संगीत क्षेत्रातील अतुलनीय कामगिरीबद्दल प्रख्यात तबला वादक उस्ताद झाकीर हुसेन यांना "एस.डी. बर्मन आंतरराष्ट्रीय क्रिएटिव अवॉर्ड' जाहीर झाला आहे. महोत्सवाचे संचालक डॉ. जब्बार पटेल यांनी आज (सोमवार) पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

अपर्णा सेन प्रतिथयश अभिनेत्री, चित्रपट निर्मात्या असून त्यांना "पद्मश्री' पुरस्कारानेही गौरविण्यात आले आहे.

 याशिवाय त्यांना चित्रपट क्षेत्रामधील राष्ट्रीय पातळीवरील तीन पुरस्कार मिळाले आहेत. तीन कन्या (1961) या चित्रपटामधून पदार्पण करणाऱ्या सेन यांनी अपरिचितो या चित्रपटामधून जाणकारांचे लक्ष वेधून घेतले होते. यानंतर 60, 70 व 80 च्या दशकांत बंगाली चित्रपट क्षेत्रांत त्यांनी विविध भूमिका साकारत दर्जेदार अभिनयाची छाप पाडली. याचबरोबर, 36 चौरंगी लेन या चित्रपटासाठी 1981 मध्ये त्यांना राष्ट्रीय पातळीवरील सर्वोत्तम दिग्दर्शकाच्या पुरस्काराने गौरविण्यात आले होते.

महोत्सवाचे उद्घाटन येत्या 12 जानेवारी रोजी दुपारी 4.30 वाजता सिटी प्राइड (कोथरूड) चित्रपटगृहामध्ये होणार आहे. पिफचे हे 15 वर्ष "अधिक चित्रपट, अधिक विविधता, सखोलता आणि अधिक मनोरंजन करणारे असेल,' असा आशावाद पिफ संचालक व ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक जब्बर पटेल यांनी व्यक्त केला आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹चीनवर असणार ‘राफेल’ची नजर

फ्रान्सकडून खरेदी होणाऱया राफेल लढाऊ विमानांचे पहिले स्क्वाड्रन (ताफा) चा तळ पूर्व क्षेत्रात बनविला जाईल. हे विमान अण्वस्त्र वाहून नेण्यास सक्षम आहे. चीनवर कुरघोडीसाठी पारंपरिक आणि आण्विक दोन्ही प्रकारच्या हल्ल्यांची क्षमता मजबूत करण्याच्या भारताच्या धोरणाचे हे महत्त्वपूर्ण पाऊल आहे.

भारताने आधीच सुखोई-30एमकेआय लढाऊ विमानांची तैनाती आसामच्या तेजपूर आणि छाबुमामध्ये केली आहे. 2019 च्या अखेरपर्यंत 18 राफेल लढाऊ विमानांना पश्चिम बंगालच्या हाशिमपुरा तळावर तैनात करण्याची योजना हवाईदलाने बनविली आहे. आण्विक क्षमता असणाऱया अग्नी-4 आणि अग्नी-5 क्षेपणास्त्राच्या चाचण्या अंतिम टप्प्यात असताना भारताने ही योजना अंमलात आणण्याचा निर्णय घेतला आहे.

मागील वर्षी सप्टेंबरमध्ये फ्रान्ससोबत 59 हजार कोटी रुपयांचा करार झाला होता. यांतर्गत 2022 च्या मध्यापर्यंत हवाईदलाला 36 राफेल विमाने अनेक टप्प्यात मिळतील. भारतीय स्थितीच्या दृष्टीने यात काही इतर वैशिष्टय़े जोडण्याची मागणी करण्यात आली आहे. यात उंचीवरील क्षेत्रांमध्ये ‘कोल्ड स्टार्ट’ची सुविधा देखील सामील आहे. याशिवाय उर्वरित वैशिष्टय़ांसह राफेल एक सामर्थ्यवान पर्याय ठरतो, जो 9.3 टनाची शस्त्रास्त्रs वाहून नेण्यास सक्षम आहे. हे विमान हवाई सुरक्षेपासून जमिनी हल्ल्याशी संबंधित मोहिमांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

हाशिमपुरा हवाईतळावर सध्या मिग-27 लढाऊ विमाने आहेत, जी पुढील 2-3 वर्षांमध्ये निवृत्त होतील. त्यांची जागा राफेल घेईल. राफेल निर्माता कंपनीने अलिकडेच हाशिमपुराचा दौरा केला होता. या दौऱयाचा उद्देश विमानाची देखभाल आणि इतर पायाभूत सुविधांची समीक्षा करणे होते. उत्तरप्रदेशमधील सरसावा तळावर राफेलची दुसरी तुकडी तैनात करण्याचा विचार केला जातोय.

हवाईदलाने 10 दिवसांपूर्वीच अरुणाचलप्रदेशच्या सियांग जिह्यात स्थित टूटिंग येथे ऍडव्हान्स्ड लँडिंग ग्राउंड सुरू केले होते. पूर्व लडाखबरोबरच अरुणाचलमध्ये सुरू करण्यात आलेले हे सहावे एएलजी आहे. हे सर्व तळ सुरू करण्याचा निर्णय चीनकडून संभाव्य धोक्याच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आला. याशिवाय बंगालच्या पानागढ तळावर देखील लवकरच सी-130जे हर्क्यूलिस विमान तैनात केले जाईल.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹बेशिस्तपणाच्याबाबतीत एअर इंडिया जगात तिसरी !

विमानातील सेवा, लॅण्डिंग-टेक ऑफच्या वेळा, प्रवासातील सुविधा या सगळ्या गोष्टी व्यवस्थित असल्यास प्रवास सुखाचा होतो. यातील एकही गोष्ट नीट नसेल तर त्याचा परिणाम मनस्थितीवर होतो. विमान कंपन्यांनी वेळ न पाळल्यास, अचानक विमानाचे उड्डाणाचे रद्द झाल्यास संपूर्ण नियोजनाचा विचका होतो. त्यामुळे सर्वोत्तम विमान कंपनीसोबत प्रवास करणे कधीही चांगले असते. याच चांगल्या विमान कंपन्यांची माहिती लोकांना मिळावी, यासाठी फ्लाईटस्टॅट्सकडून आंतरराष्ट्रीय कंपन्यांची यादी तयार केली जाते. या बेशिस्तपणाच्या यादीत भारताच्या एअर तिसरे स्थान मिळाले आहे.

प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या सुविधा, विमानांच्या पाळल्या जाणाऱ्या वेळा यांच्या आधारे फ्लाईटस्टॅट्सने सर्वोत्तम सेवा देणाऱ्या कंपन्यांची यादी तयार करण्यात आली आहे. विमानांच्या वेळा न पाळण्याच्या, चांगल्या सुविधा न देणाऱ्या कंपन्यांच्या यादीत एअर इंडिया तिसऱ्या क्रमांकावर आहे. एअर इंडियाचे वेळ न पाळण्याचे प्रमाण तब्बल ३८.७१% इतके आहे. या यादीत एल अल ही इस्रायली कंपनी पहिल्या क्रमांकावर आहे. एल अल कंपनीच्या विमानांच्या वेळा न पाळण्याचे प्रमाण ५६% आहे. तर या यादीत आईसलँडएअर कंपनी (४१.०५%) दुसऱ्या क्रमांकावर आहे.

एअर इंडियानंतर या यादीत चौथ्या क्रमांकावर फिलीपाईन्स एअरलाईन्स (३८.३३%), पाचव्या क्रमांकावर एशियाना एअरलाईन्स (३७.४६%), सहाव्या क्रमांकावर चायना इस्टर्न एअरलाईन्स (३५.८%), सातव्या क्रमांकावर हाँगकाँग एअरलाईन्स (३३.४२%), आठव्या क्रमांकावर एअर चायना (३२.७३%), नवव्या क्रमांकावर कोरियन एअर (३१.७४%) तर दहाव्या क्रमांकावर हेनन एअरलाईन्स (३०.०३%) या कंपन्या आहेत.

विमानांच्या वेळा कसोशीने पाळण्यात केएलएम या नेदरलँडच्या कंपनीचा क्रमांक पहिला लागतो. केएलएम कंपनीच्या विमानांची वेळ चुकण्याचे प्रमाण (११.४७%) इतके आहे. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आयबेरिया (११.८२%), तिसऱ्या क्रमांकावर जपान एअरलाईन्स (१२.२%) आहे. तर चौथ्या क्रमांकावर कतार एअरवेज (१३.६६%) पाचव्या क्रमांकावर ऑस्ट्रियन (१४.२६%), सहाव्या क्रमांकावर एएनए (१४.४६%), सातव्या क्रमांकावर सिंगापूर एअरलाईन्स (१४.५५%), आठव्या क्रमांकावर डेल्टा एअरलाईन्स (१४.८३%), नवव्या क्रमांकावर टॅम लिन्हास एराज (१४.९३%) आणि दहाव्या क्रमांकावर क्वांटास (१५.७%) या कंपन्या आहेत.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹उपराजधानीत सायबर गुन्ह्यांचा व्हायरस वाढतोय!

गेल्या ५ वर्षांमध्ये उपराजधानीत इंटरनेटचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. कॅशलेसच्या युगात आता ई-सेवा थेट मोबाईलपर्यंत येऊन पोहोचल्या आहेत.

 युवापिढीसाठी तर इंटरनेट दैनंदिन जीवनातील अविभाज्य घटक आहे. परंतु ई-क्रांतीसोबतच सायबर क्राईमच्या प्रकरणांमध्येदेखील वाढ होत आहे. गेल्या ५ वर्षांमध्ये नागपुरात सायबर क्राईम किंवा आयटी अॅक्टअंतर्गत २६८ गुन्हे दाखल झाले आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे यातील ७० टक्के गुन्हे हे गेल्या २ वर्षांतील आहेत. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली आहे.

उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी शहरातील सायबर क्राईमसंदर्भात माहितीच्या अधिकाराअंतर्गत विचारणा केली होती. २०१२ ते नोव्हेंबर २०१६ या कालावधीत सायबर क्राईमचे किती गुन्हे दाखल करण्यात आले, किती आरोपींना अटक करण्यात आली हे प्रश्न त्यांनी विचारले होते. यासंदर्भात मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार जानेवारी २०१२ ते नोव्हेंबर २०१६ या कालावधीत भादंवि, सायबर तसेच आयटी अॅक्ट मिळून एकूण २६८ गुन्हे दाखल करण्यात आले. २०१५ व २०१६ मध्ये यातील सुमारे ७० टक्के म्हणजेच १८८ गुन्ह्यांची नोंद झाली. दरवर्षी सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढतच असल्याचे आकडेवारीवरुन स्पष्ट होत आहे.

सायबर गुन्ह्यांची वर्षनिहाय आकडेवारी
वर्ष गुन्हे
२०१२ १५
२०१३ १९
२०१४ ४६
२०१५ ९८
२०१६ (नोव्हेंबरपर्यंत) ९०

१०३ गुन्हेगारांना अटक

माहितीच्या अधिकाराअंतर्गत प्राप्त झालेल्या माहितीनुसार गेल्या पाच वर्षात ह्यसायबर क्राईमच्या गुन्ह्याअंतर्गत १०३ गुन्हेगारांना अटक करण्यात आली. गेल्या २ वर्षात हा आकडा ५० इतका होता.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹एसबीआयची लवकरच डिजि बँक

डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी एसबीआय ही देशातील सर्वात मोठी बँक आपली डिजिटल स्वरुपातील शाखा उघडणार आहे. एसबीआय डिजि बँक या नावाने या शाखा ओळखण्यात येईल. या शाखांमध्ये खातेधारकांना बँकेच्या सर्व सेवा डिजिटल स्वरुपात मिळणार आहेत. बँकेच्या आर्थिक व्यवहारांसाठी हे ऐतिहासिक पाऊल असल्याचे सांगण्यात येते.

सध्या विदेशात अशा प्रकारच्या डिजिटल बँक शाखा मोठय़ा प्रमाणात आहे. युरोपात एम-बँक आणि कॅनडामध्ये टॅन्गरिन बँक या डिजिटल सेवा पुरवितात. पुढील तीन ते सहा महिन्यात या डिजिटल शाखा सुरू करण्यात येणार आहेत. या डिजिटल शाखेतून सर्व व्यवहार ऍप, इंटरनेट बँकिंग आणि मोबाईल बँकिंगच्या सहाय्याने करण्यात येतील. ही अत्याधुनिक सेवा सध्याच्या आणि नव्या ग्राहकांना देण्यात येणार आहे, असे बँकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱयाने सांगितले.

या डिजिटल शाखांमध्ये ग्राहकांना खाते उघडण्यासाठी ई-केवायसीचा वापर करण्यात येणार आहे. बँकेत कोणत्याही प्रकारचे व्यवहार कागदांवर करण्यात येणार नाही. या शाखांत पूर्णतः पेपरलेस व्यवहार होणे अशक्य असले तरी ‘इनटच’ या शाखांच्या सहाय्याने ग्राहकांना खाते उघडण्यास मदत करण्यात येणार आहे.

 सध्या एसबीआय इनटच या शाखा उघडण्यात आल्या आहेत. एसबीआयच्या डिजि बँकेमध्ये चालू आणि बचत खाते उघडणे, कर्ज देणे, विमा उतरविणे, म्युच्युअल फंड काढणे आणि ठेव रक्कम भरणे यासारख्या सर्व सेवा देण्यात येणार आहेत.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹नोटाबंदीनंतर बँकांच्या कर्ज व्यवसायात ऐतिहासिक घसरण

नोटाबदलीची घोषणा करण्यात आल्यानंतर नववर्षाच्या प्रारंभीच बँकांनी आपल्या कर्ज व्याजदरात कपात केली. व्याज दरात मात्र कपात करूनही बँकांच्या कर्ज व्यवसायात मोठय़ा प्रमाणात घसरण सुरूच आहे. 23 डिसेंबर रोजी बँकांचा क्रेडिट विकास ऐतिहासिक नीचांकी स्तर 5.1 टक्क्यांवर आला आहे. गेल्या 60 वर्षातील ही सर्वात खालची पातळी असल्याचे एसबीआयचे प्रमुख अर्थशास्त्रज्ञ कांति घोष यांनी म्हटले.

बँकांकडून व्याजदरात कपात करण्यात आल्यानंतर गृह बांधणी क्षेत्रातील मंदी काही प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा वर्तविण्यात आली आहे. भारतीय स्टेट बँकेने सध्याच्या गृहकर्जासंबंधी अहवाल प्रसिद्ध केला आहे. कमी क्रेडिट विकास हा चिंतेचा विषय आहे. कारण सर्व शेडय़ूल्ड व्यावसायिक बँकांजवळील डेटा हा पेडिट विकास दर प्रतिवर्षाच्या आधारे 23 डिसेंबर रोजी ऐतिहासिक नीचांकी पातळीवर म्हणजेच 5.1 टक्क्यांवर आला आहे, याकडे निर्देश करत आहे असे म्हणण्यात आले.

11 नोव्हेंबर आणि 23 डिसेंबर दरम्याच्या कालावधीत क्रेडिट विकासात 5,229 कोटी रुपयांनी घसरण आली होती. या कालावधीत बँकांकडे जमा करण्यात आलेली रक्कम 4 लाख कोटी रुपयांनी वाढली. व्याजदरात एकाच वेळी 90 बेसिक पॉईंट्सने कपात करण्यात आली आहे. यामुळे भविष्यात गृह क्षेत्राला मजबूती मिळण्याचे संकेत आहे असे अहवालात नमूद करण्यात आले. एसबीआयने 1 जानेवारीला तीन वर्षांसाठी कर्जाच्या दरात 90 बेसिक पॉईन्ट्सपर्यंत कपात केली.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹भारतीय स्क्वॅश संघाला तीन पदके

19 वर्षांखालील वयोगटाच्या प्रतिष्ठेच्या ब्रिटिश कनिष्ठांच्या खुल्या स्क्वॅश स्पर्धेत भारतीय संघाने सुवर्ण, रौप्य आणि कास्य अशी सर्व तीन पदकाची कमाई केली. या स्पर्धेत भारताचा व्ही. सेथिंलकुमारने ड्रिस्डेल चषक मिळविला. हा चषक मिळविणारा सेथिंलकुमार हा भारताचा तिसरा स्क्वॅशपटू आहे. यापूर्वी अनिल नायर आणि सौरव घोशाल यांनी हा बहुमान मिळविला होता.

या स्पर्धेत अंतिम फेरीत सेथिंलकुमारने बिगर मानांकित भारताच्या अभय सिंगचा 15-13, 11-2, 10-12, 11-7 असा पराभव करत सुवर्णपदक मिळविले. अभय सिंगने रौप्यपदक तर आदित्य राघवनने कास्यपदक मिळविले.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹यावर्षी दिसणार पाच धुमकेतू

पृथ्वीजवळून लहान-मोठे ५० धुमकेतू २०१७ या वर्षात जाणार असून पृथ्वीला प्रदक्षिणा करताना त्यापैकी काही धुमकेतू सूर्यावर आदळणार आहेत. मात्र, त्यापासून पृथ्वीला कोणताही धोका नाही. तसेच पाच धुमकेतू १४ जानेवारीपासून साध्या डोळ्यांनी वा दुर्बिणीने पाहता येतील.

यावर्षी खगोलात मोठी ग्रहणे किंवा घडामोडी दिसणार नाहीत. मात्र, सूर्य व पृथ्वीजवळून जाणाऱ्या ५० धुमकेतूंपैकी अनेक धुमकेतू नियमित नाहीत. काही धुमकेतू सूर्यावर आदळणार आहेत, तर काही पृथ्वीच्या अगदी जवळून जाणार असल्याने पृथ्वीकडे आदळण्याचे भय व्यक्त करण्यात येत होते. मात्र तसे होणार नसल्याचा निर्वाळा चंद्रपूर येथील स्कॉय वॉच ग्रुपचे अध्यक्ष प्रा. सुरेश चोपणे यांनी दिला.

आपल्या सूर्यमालेत २०० अब्ज धुमकेतू असण्याचा अंदाज आहे. त्यापैकी २०१६पर्यंत केवळ ४ हजार धुमकेतूंचा शोध लागला आहे. यंदा दिसण्याची शक्यता असलेल्या पाच धुमकेतूंपैकी धुमकेतू-सी/२०१६ हा निओवाईज या अवकाश निरीक्षण केंद्राने २१ आॅक्टोबर २०१६ रोजी शोधून काढला आहे. हा धुमकेतू पुढे हजार वर्षांनी पुन्हा पृथ्वीकडे येणार आहे. हा धुमकेतू पृथ्वीच्या उत्तर-पूर्व दिशेला १४-१५ जानेवारीच्या पहाटे सूर्योदयापूर्वी साध्या डोळ्यांनी दिसण्याची शक्यता आहे.

पाच धुमकेतूंचे दर्शन वेळापत्रक

दर तीन वर्षांनी येणारा २पी/एनके २० फेब्रुवारीपासून दुर्बीणीने शुक्र व मंगळ ग्रहाजवळ दिसू शकेल. त्यानंतर तो १० मार्चला पृथ्वीच्या जवळ येणार असल्याने साध्या डोळ्यांनी दिसणार आहे. धुमकेतू ४५पी/होन्डा-मर्कस-पजदुस्कोव्हा मार्च महिन्यात उत्तर आकाशात दिसेल.

तो ३० मार्चला पृथ्वीजवळ येईल. परंतु त्याला ते महिन्यात पाहता येईल. ४१पी/टुट्टल/जिएकोबिनी-क्रेसाक हा धुमकेतू उत्तर आकाशात ३० मार्च ते ३० एप्रिलपर्यंत दिसणार आहे. तर सी/२०१५व्ही२ (जॉन्सन) हा उत्तर गोलार्धातून मे महिन्यात साध्या डोळ्यांनी दिसेल. जून महिन्यात तो पृथ्वीच्या अगदी जवळ येणार आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹पुण्यातील रेडिओ दुर्बिणीने घेतला वैश्विक आविष्काराचा शोध

दोन आकाशगंगांच्या केंद्रस्थानी असलेली अतिप्रभावी कृष्णविवरे व एकमेकांवर आदळणारे अतिप्रचंड अवकाश समूह यांसारखे इलेक्ट्रॉनला गतिमान करणाऱ्या घटकांच्या अज्ञात आविष्काराचे संशोधन मागील ३० वर्षांपासून सुरू होते. मात्र, शनिवारी भारताच्या एनसीआरए (नॅशनल सेंटर फॉर रेडिओ अॅस्ट्रोफिजिक्स) आणि जीएमआरटीचे (जायन्ट मीटरव्हेव रेडिओ टेलिस्कोप) शास्त्रज्ञ व अन्य देशांतील शास्त्रज्ञांना याचा शोध घेण्यात यश आले. यामुळे जुन्नर तालुक्यातील खोडद येथील जीएमआरटीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹नगरपालिका निवडणुकांत भाजप अव्वल

शिवसेनेलाही लाभ; राष्ट्रवादी कॉंग्रेसला जोरदार धक्का

मुंबई - नगर परिषदा आणि नगरपंचायतींसाठी विविध टप्प्यांत झालेल्या निवडणुकांच्या एकूण निकालांत सत्ताधारी भारतीय जनता पक्ष राज्यात अव्वल ठरला आहे. सत्तेतील सहभागी शिवसेनेलाही अपेक्षित लाभ झाला असला, तरी भाजपने कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष या विरोधी पक्षांवर मात करीत क्रमांक एकची कामगिरी केली आहे. गेल्या निवडणुकीचा विचार करता, राष्ट्रवादी कॉंग्रेसला जोरदार धक्का बसला आहे, तर कॉंग्रेसचे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या तुलनेत तितकेसे नुकसान झाले नाही.

नगर परिषदेच्या अंतिम आणि तिसऱ्या टप्प्याचे निकाल आज हाती आले. यामध्ये भाजपचे वर्चस्व असलेल्या नागपूर जिल्ह्यातील नगर परिषदांचा समावेश होता. तीन टप्प्यांत एकूण 199 नगर परिषदा, नगरपंचायतींसाठी निवडणुका पार पडल्या. यामध्ये पहिल्या टप्प्यात 164, दुसऱ्या टप्प्यात 14, तर तिसऱ्या टप्प्यात 21 नगरपरिषदांसाठी निवडणूक झाली होती. या तिन्हीही टप्प्यांत सत्ताधारी भाजपने जोरदार कामगिरी केली.

नगराध्यक्षपदाचे उमेदवार थेट निवडण्याच्या तरतुदीचा लाभ घेताना भाजपने सर्वाधिक नगराध्यक्ष जिंकून आणण्याचा पराक्रम केला आहे. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकहाती किल्ला लढवताना प्रचाराची सूत्रे आपल्या हाती घेतली होती. अगदी शेवटच्या टप्प्यातील निवडणुकीच्या प्रचारातही त्यांनी दौरे करीत परिश्रम घेतले होते.
पक्षीय बलाबल

- एकूण नगर परिषदा, नगरपंचायती निवडणूक - 199
- एकूण जागा - 4460
- भाजप - 1090, राष्ट्रवादी कॉंग्रेस - 786, कॉंग्रेस - 894, शिवसेना - 598,
- नगराध्यक्ष - भाजप - 64, राष्ट्रवादी कॉंग्रेस - 22, कॉंग्रेस - 32, शिवसेना -26

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹मराठी-उडियाची साहित्यिक देवघेव

 देशातील दोन राज्यांमध्ये सांस्कृतिक देवाणघेवाण व्हावी, यासाठी केंद्राने ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ योजनेला गेल्या वर्षी ऑक्टोबरअखेरीस सुरुवात केली. या योजनेअंतर्गत या वर्षी महाराष्ट्र आणि ओडिशा या दोन राज्यांमध्ये साहित्यिक आणि सांस्कृतिक देवाणघेवाण होणार आहे. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यामध्ये मराठीतील पाच पुस्तके उडियामध्ये अनुवादित केली जाणार आहेत. त्याचप्रमाणे उडियामधील पाच पुस्तके मराठीमध्ये अनुवादित होणार आहेत.

भारतीय प्रादेशिक साहित्यामध्ये मोठी ताकद आहे. मात्र अनेकदा हे वाङ्मय अनुवादाअभावी केवळ त्या- त्या भाषेपुरते सीमित राहते. त्यामुळे या प्रकल्पामधून मराठीमधील पुस्तके इतर भाषांमध्ये जाण्याच्या आणि इतर भाषांमधील साहित्य मराठीमध्ये येण्याच्या प्रक्रियेला चालना मिळेल. याबाबत साहित्यिकांमध्ये सकारात्मक वातावरण आहे.

मराठीमधील राजीव तांबे यांचे ‘गंमतशाळा भाग-३’, संजीवनी खेर यांचे ‘सर्वसाक्षी’, डॉ. मधुकर ढवळीकर यांचे ‘महाराष्ट्राची कूळकथा’, आनंद जातेगावकर यांचे ‘कैफीयत’, अनिल पाटील यांचे ‘गावगाडा शतकानंतर’ या पुस्तकांचा उडियामध्ये अनुवाद करण्यात येणार आहे, अशी माहिती राज्य साहित्य संस्कृती मंडळातर्फे देण्यात आली. या पुस्तकांच्या अनुवादाच्या प्रकल्पावर काम सुरू करण्यात येत आहे.

मात्र मराठीतून उडियामध्ये अनुवाद करण्यासाठी चांगल्या भाषा अभ्यासकांची गरज अजूनही पूर्ण झालेली नाही. या प्रकल्पासाठी भाषातज्ज्ञांचा शोध अजूनही सुरू आहे. मात्र हे प्रकल्प लवकरच मार्गी लागतील, असे सांगण्यात आले.

ऑक्टोबरमध्ये झालेल्या बैठकीमध्ये मराठीतील पाच पुरस्कारप्राप्त पुस्तकांचा अनुवाद करण्याच्या सूचना मराठी भाषा विभागाला देण्यात आल्या होत्या. त्यानुसार या पुस्तकांची निवड करण्यात आली आहे. ही पुस्तके मार्च अखेरपर्यंत अनुवादित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती मराठी भाषा विभागाचे अवरसचिव हर्षवर्धन जाधव यांनी दिली. उडिया भाषेतूनही पाच पुस्तके मराठीमध्ये अनुवादित करण्यात येणार आहेत.

त्यासंदर्भात ओडिशा सरकारच्या संबंधित अधिकाऱ्यांशी पुढील स्तरावर लवकरच चर्चा होऊन या प्रकल्पाला अधिक वेग मिळेल, असेही मराठी भाषा विभागातर्फे सांगण्यात आले.

मराठी साहित्यही अन्य भाषांमध्ये

मराठीतील अक्षर वाङ्मय इतर प्रादेशिक भाषांमध्येही जाण्याची गरज असल्याचे मत राज्य साहित्य-संस्कृती मंडळाचे अध्यक्ष बाबा भांड यांनी या प्रकल्पासंदर्भात बोलताना व्यक्त केले. इतर भाषेतील साहित्य मराठी भाषेत आले आहे. मात्र त्या प्रमाणात मराठीतील साहित्य इतर भाषांमध्ये पोहोचलेले नाही. त्यामुळे ही साहित्यिक देवाणघेवाण वाढावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹पाकची 'बाबर 3' क्षेपणास्त्राची चाचणी बनावट!

अण्वस्त्रवाहू क्षमता असलेल्या 'बाबर-3' या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतल्याचे काल (ता. 9) पाकिस्तानने अभिमानाने जाहीर केले असले तरी, हा पाकचा केवळ बनाव असल्याचा दावा काही तज्ज्ञांनी केला आहे.

या क्षेपणास्त्र चाचणीचा व्हिडिओ पाकिस्तान सरकारने काल प्रसिद्ध केला होता. मात्र, हा व्हिडिओ म्हणजे संगणकाची करामत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. यासाठी त्यांनी तांत्रिक पुरावाही दिला आहे. पेशावरमधील तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, 'पाकिस्तानने समुद्राची पार्श्वभूमी दाखवून संगणकाच्या साह्याने क्षेपणास्त्र चाचणी निर्माण केली आणि 'बाबर-3'ची चाचणी यशस्वी झाल्याचे सांगितले. भारतातील तज्ज्ञांनीही पाकिस्तानचे पितळ उघडे पाडले आहे.
'बाबर-3'च्या चाचणीच्या व्हिडिओमध्ये क्षेपणास्त्राचा रंग सुरवातीला पांढरा आणि नंतर नारंगी झाल्याचे दिसत आहे.

 पाकिस्तानने प्रसिद्ध केलेल्या या व्हिडिओत उड्डाणादरम्यानच या क्षेपणास्त्राचा वेग प्रचंड वाढून ते अशक्य उंचीवर पोचल्याचे दाखविले आहे,' असे कर्नल विनायक भट (निवृत्त) यांनी एका इंग्रजी नियतकालिकाला दिलेल्या प्रतिक्रियेत स्पष्ट केले आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹‘भीम’चे डाउनलोडिंग १० लाखांवर

नवी दिल्ली : ऑनलाइन आणि डिजिटल व्यवहारांसाठी तयार करण्यात आलेल्या ‘भीम’ अॅपला नागरिकांचा चांगलाच प्रतिसाद लाभला आहे. अॅप लाँच केल्यानंतर दहा दिवसांतच डाउनलोडिंगची संख्या दहा लाखांवर गेली आहे. ‘गुगल प्ले स्टोअर’वर ‘भीम’ हे अॅप अग्रभागी असल्याचे पंतप्रधान कार्यालयातर्फे प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

सध्या या अॅपचा लाभ केवळ अँड्रॉइडधारकांनाच घेता येत आहे.

 ‘युनिफाइड पेमेंट इंटरफेस’ अर्थात ‘यूपीआय’चा वापर करून डिजिटल पेमेंट करण्यासाठी ‘भारत इंटरफेस फॉर मनी’ अर्थात ‘भीम’चा वापर वाढत असल्याचे दिसून आले आहे. प्रामुख्याने तरुणांमध्ये ‘भीम’चा वापर अधिक असल्याचे दिसून आले आहे. गेल्या आठवड्यात नवी दिल्ली तालकटोरा स्टेडियममध्ये आयोजित डिजीधन मेळाव्यात पंतप्रधानांनी ‘भीम’ सादर केले होते.

या अॅपच्या वापरासाठी इंटरनेटची आवश्यकता नसल्याने ते फीचर फोनमध्येही वापरता येते. डाउनलोड केल्यानंतर ते संबंधिताच्या बँक खात्याशी जोडून यूपीआयचा पर्याय निवडता येतो. ग्राहकाचा मोबाइल क्रमांक हाच त्याचा पेमेंट अॅड्रेस असणार आहे. मोबाइल क्रमांकाची नोंदणी केल्यानंतर ‘भीम’चा वापर सुरू करता येईल.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹पहिले आंतरराष्ट्रीय एक्स्चेंज सुरू

मुंबई शेअर बाजाराच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय एक्स्चेंजचे (इंडिया आयएनएक्स) सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुजरातमधील गांधीनगर येथील गुजरात इंटरनॅशनल फायनान्स टेक (गिफ्ट) सिटी येथे उद्घाटन झाले. यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी यांच्यासह आयएफएसीचे अध्यक्ष अर्जुन राम मेघवाल उपस्थित होते.

इंडिया आयएनएक्स हा असा अत्याधुनिक प्लॅटफॉर्म आहे जो केवळ चार मायक्रो सेकंदांमध्ये कार्यरत होतो. हे एक्स्चेंज २२ तास कार्यरत राहणार आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदार आणि अनिवासी भारतीयांना जगभरात कोठेही ट्रेडिंग शक्य होणार आहे. इक्विटी डेरिव्हटिव्हज, करन्सी डेरिव्हटिव्हज, कमॉडिटी डेरिव्हटिव्हज यांसह इंडेक्स आणि स्टॉक्समध्ये ट्रेडिंग सुरू करणे हा प्राथमिक उद्देश आहे. याशिवाय आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण झाल्यानंतर याच ठिकाणी डिपॉझिटरी रिसिप्ट आणि बॉण्डचेही व्यवहार होणार आहेत.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹काय आहे जलीकट्टू? जाणून घ्या या परंपरेविषयी..

पोंगल सणादरम्यान खेळण्यात येणारा जलीकट्टू हा तामिळनाडूचा पारंपारिक खेळ आहे. या खेळावर सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातली आहे. जलीकट्टू या खेळाचा अर्थ आहे वळूंना वश करणे. या खेळाला २००० वर्षांची परंपरा आहे. जाणून घेऊया या पारंपारिक खेळाविषयी.

तज्ज्ञांच्या मते जलीकटटू हे नाव या खेळाला त्याच्या वैशिष्ट्यामुळे पडले आहे. सल्ली कासू म्हणजे नाणी आणि कट्टू म्हणजे या नाण्यांचा संग्रह. एक पिशवी वळूच्या शिंगांना बांधली जाते. जेव्हा हे वळू पळतात तेव्हा त्यांच्या मागे युवक धावतात आणि त्यांच्या शिंगांना बांधलेली पिशवी काढून घेण्याचा प्रयत्न करतात. या खेळामध्ये जेलीकट या विशिष्ट जातीच्या वळूंचा वापर केला जातो म्हणून देखील या खेळाला जलीकट्टू हे नाव पडले आहे. शिंगांना पैसे बांधण्याव्यतिरिक्त खेळाडूंना मोठे बक्षीस देखील दिले जाते.

कसा खेळला जातो हा खेळ?

जेव्हा या खेळाला सुरुवात होते तेव्हा वळूंच्या शिंगांना पैसे बांधून त्यांना भडकवले जाते. त्यांना पळण्यास प्रवृत्त केले जाते. बऱ्याचदा गर्दीमुळे हे वळू गांगरुन जातात आणि ट्रॅकवर पळण्याऐवजी ते गर्दीमध्ये घुसू पाहतात. काही वेळा या वळूंना मद्य देखील दिले जाते. त्यांनी जोरात पळावे म्हणून त्यांची शेपटी पिरगाळली जाते.

का आहे हा खेळ वादग्रस्त?

जलीकट्टू हा खेळ देशातील सर्वात धोकादायक खेळांपैकी एक मानला जातो. या खेळामुळे आतापर्यंत कित्येक लोक मृत्यूमुखी पडले आहे तर अनेकांना अपंगत्वदेखील आले आहे. २०१० ते २०१४ दरम्यान या खेळामुळे १,१०० लोक गंभीरिरत्या जखमी झाले तर १७ जणांना आपला जीव गमवावा लागला. गेल्या २० वर्षांमध्ये २०० पेक्षा अधिक लोक बळी पडले आहेत. या खेळात ज्या बैलांचा वापर होतो त्यांच्यावर अत्याचार केले जातात अशी याचिका पेटाने टाकली होती. कित्येक वर्षे पेटाने याविरोधात आंदोलन केले आहे. २०१४ मध्ये या खेळामध्ये बैलांचा वापर थांबविण्यात यावा असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते.

किती वर्षे जुनी आहे परंपरा?

या खेळाची परंपरा किमान २००० वर्षे जुनी आहे असे म्हटले जाते. प्राचीन काळी स्वयंवरासाठी देखील या खेळाचे आयोजन होत असे. या खेळात भाग घेणारा जो कुणी युवक बैलावर नियंत्रण मिळवेल त्याच्या गळ्यात माळ टाकली जात असे. मदुराई, तिरुचिरापल्ली, थेनी, पुदुक्कोटाई आणि दिंडीगुल या तामिळनाडूमधील जिल्ह्यांमध्ये हा खेळ प्रामुख्याने खेळला जात असे. न्यायालयाने बंदी घालण्यापूर्वी मदुराईमध्ये मोठ्या प्रमाणावर हा खेळ खेळला जात असे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹ख्रिस्तियानो रोनाल्डोची मेसीवर मात

युरो चषक विजेत्या पोर्तुगाल संघाचा कर्णधार आणि रियल मांद्रिद संघाचा स्टार खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डोने पुन्हा एकदा अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेसीला मात देत 'फिफा'कडून दिल्या जाणाऱ्या 'प्लेयर ऑफ द इयर' पुरस्कारावर चौथ्यांदा आपलं नाव कोरलं आहे.

झुरिच येथे झालेल्या फिफाच्या वार्षिक पुरस्कार सोहळ्यात ख्रिस्तियानोला हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष जियानो इन्फेंटिनो यांच्याहस्ते रोनाल्डोने पुरस्कार स्वीकारला. याआधी २००८, २०१३, २०१४ अशी तीनवेळा रोनाल्डोने या पुरस्काराला गवसणी घातली होती.

रोनाल्डोने २०१६ मध्ये पोर्तुगाल आणि रियल मांद्रीद संघाकडून खेळताना ५९ गोल डागले तर १६ गोलमध्ये त्याने सहाय्यकाची भूमिका वठवली. रोनाल्डोने आपल्या नेतृत्वात वर्षभरात दोन्ही संघाना एकूण चार स्पर्धांची जेतेपदं मिळवून दिली. रोनाल्डोची स्पर्धा मेसी आणि फ्रान्सच्या फुटबॉलपटू अॅन्टोनियो ग्रिझमन या दोघांशी होती. रोनाल्डोने ३४.५४ टक्के मते मिळवून या दोघांना धोबीपछाड दिला. मेसीच्या पारड्यात २६.४२ तर ग्रिझमनला ७.५३ टक्के मते मिळाली.

दरम्यान, गतवर्ष माझ्यासाठी स्वप्नवत होतं आणि या सन्मानाने मी भारावून गेलो आहे, अशा भावना रोनाल्डोने व्यक्त केल्या.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹इंटरनेटवर कोहलीचा जलवा, सर्चमध्ये अव्वल

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याने २०१६ या वर्षात क्रिकेटच्या मैदानासोबतच इंटरनेट विश्वात देखील अव्वल कामगिरी केली आहे. इंटरनेटच्या महाजालात वर्षभरात सर्वाधिक सर्च झालेल्या हिंदी आणि इंग्रजी कीवर्ड्समध्ये विराट कोहली हे नाव पहिल्या क्रमांकावर आहे. तर देशातील इंटरनेट वापराची परिभाषा बदलून टाकण्याच्या उद्देशाने मोफत सुविधा पुरविणाऱया ‘रिलायन्स जिओ’ हा कीवर्ड्स सर्वाधिक सर्च झालेल्या यादीत दुसऱया स्थानी असल्याचे वृत्त बिझनेस स्टॅण्डर्डने दिले आहे. नुकताच प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार ‘रिलायन्स जिओ’ या कीवर्डला मागील वर्षात तब्बल ११६ कोटी पेजव्ह्युज मिळाले आहेत.

‘रिलायन्स जिओ’ने ग्राहकांसाठी मोफत इंटरनेट आणि कॉल्सची सेवेची घोषणा केली होती. त्यानंतर ‘रिलायन्स जिओ’ने इंटरनेट विश्वात धमाका केला आहे.

 भारतीय नेटिझन्सची इंटरनेटवर शोध घेण्याच्या आवडीचा एकंदर अहवाल पाहता क्रीडा क्षेत्रात नेटिझन्सनी विराट कोहली बद्दलची सर्वाधिक माहिती सर्च केली, तर त्याखालोखाल धोनी इंटरनेटवर चर्चेत राहिला. विराट कोहली या कीवर्डला १०८ कोटी व्ह्युज मिळालेत, तर ‘रिलायन्स जिओ’ला ११६ कोटी पेजव्ह्युज मिळाले असले तरी एका व्यक्तीच्या सर्वाधिक सर्चमध्ये कोहलीच नंबर वन ठरला आहे. कोहलीसोबत बॉलीवूड विश्वात अभिनेता सलमान खान याच्याबद्दलची सर्वाधिक माहिती सर्च केली गेली. तर अभिनेत्रींमध्ये प्रियांका चोप्राने बाजी मारली आहे. बॉलीवूडते हॉलीवूड असा प्रवास केलेल्या अभिनेत्रीबद्दल इंग्रजी कीवर्डने सर्वाधिक माहितीचा इंटरनेटवर शोध घेतला गेला तर हिंदी कीर्वडमध्ये अभिनेत्री करिना कपूर हा कीवर्ड सर्वाधिक सर्च झाल्याचे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.

नुकतेच फोर्ब्सने जाहीर केलेल्या श्रीमंत खेळाडूंच्या यादीत कोहलीने धोनीला मागे टाकून अव्वल स्थान प्राप्त केले होते. कोहलीने फोर्ब्सच्या सर्वाधिक कमाई करणाऱया खेळाडूंच्या यादीत १३४.४४ कोटींच्या उत्पन्नासह पहिल्या, तर धोनी १२२ कोटींच्या कमाईसह दुसऱया स्थानावर होता.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹लस न घेणे भारतीय जवानांना पडले महागात

संयुक्त राष्ट्राने मागितले स्पष्टीकरण : हैतीमधील घटना

हैजा प्रतिबंधक लस न घेताच हैती येथे जाणे भारतीय शांतिदूतांना महागात पडले आहे. आता संयुक्त राष्ट्र या प्रकरणाची चौकशी करेल. कॅरेबियन देश हैतीमध्ये हैजाची लस टोचून घेणे अनिवार्य आहे.

मागील वर्षी जुलै-ऑगस्टमध्ये आसाम रायफल्सचे जवळपास 100 पेक्षा अधिक जवान हैती येथे गेले होते. गृह मंत्रालयाने या जवानांनी हैजाची लस घेतल्याचे सांगितले होते. आता संयुक्त राष्ट्राने अधिकृतपणे भारत सरकारकडून लस घेतल्याचे प्रमाणपत्र का दिले याचे स्पष्टीकरण मागितले आहे.

2010 सालापूर्वी हैती येथे हैजाचे एक देखील प्रकरण नव्हते. परंतु यानंतर जेव्हा संयुक्त राष्ट्र शांतता दल हैती येथे पोहोचले, तेव्हा तेथे या हैजाचे रुग्ण आढळू लागले.

 शांतता दलात बहुतेक जवान नेपाळचे होते. या जवानांवर हैतीत हैजा फैलावण्याचा आरोप होता. मागील 6 वर्षात हैती येथे या आजारामुळे जवळपास 10 हजार लोकांना जीव गमवावा लागला आहे. हैतीकडून कठोर टीकेनंतर संयुक्त राष्ट्राने 2015 साली तेथे जाण्याआधी शांतिदूतांकरता हैजाची लस घेणे अनिवार्य केले होते.

याच्या एक वर्षानंतरच आसाम रायफल्सचे 100 जवान हैतीत दाखल झाले. आपण लस घेतल्याचा या जवानांचा दावा होता. आता या जवानांना स्थानिक प्रशासनाद्वारे हैजाची लस दिली जात आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹फ्लिपकार्टच्या मुख्याधिकारी पदावरुन बिन्नी बंसल यांना हटवले, कृष्णमूर्ती नवे सीईओ

फ्लिपकार्टच्या मुख्य-कार्यकारी अधिकारी पदावरुन फ्लिपकार्टचे सह-संस्थापक बिन्नी बंसल यांना हटविण्यात आले असून त्यांच्या जागेवर कल्याण कृष्णमूर्ती यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सचिन बंसल आणि बिन्नी बंसल या दोघांनी २००७ मध्ये फ्लिपकार्टची स्थापना केली होती. सचिन बंसल यांना मागील वर्षी मुख्याधिकारी या पदावरुन हटवून त्यांच्या जागी बिन्नी बंसल यांची नियुक्ती करण्यात आली होती.

बिन्नी बंसल यांना समूहाचे मुख्याधिकारी बनविण्यात आले आहे तर सचिन बंसल हे समुहाचे कार्यकारी अध्यक्ष या पदावर कायम राहतील असे फ्लिपकार्टने एका प्रसिद्धिपत्रकाद्वारे जाहीर केले आहे.

 तंत्रज्ञानाचाचे साहाय्य घेऊन फ्लिपकार्टचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी आम्ही तयार आहोत असे बिन्नी बंसल यांनी म्हटले. कृष्णमूर्ती यांच्या नियुक्तीनंतर सचिन बंसल आणि बिन्नी बंसल यांच्याजवळ आता त्यांनीच स्थापन केलेल्या कंपनीचे पूर्ण नियंत्रण नसणार. गेल्या काही महिन्यांपासून फ्लिपकार्टच्या नफ्यात सातत्याने घट होत होती त्यामुळे गुंतवणूकदार नाराज होते असे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

मागील वर्षी फ्लिपकार्टने ३०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढून टाकले होते. जर कामगिरीमध्ये सातत्य नसेल आणि जर तुम्ही उद्दिष्टे गाठली नाहीत तर तुम्हाला केव्हाही घरी जावे लागू शकते असे सचिन बंसल यांनी त्यावेळी म्हटले होते. इतकेच नव्हे तर माझ्या कामगिरीमुळेच मला फ्लिपकार्टचे मुख्याधिकाऱ्याचे पद सोडावे लागले होते असा गौप्यस्फोट त्यांनी या बैठकीदरम्यान केला होता.

बिन्नी बंसल यांची मुख्याधिकारी पदावरुन नियुक्ती होऊन केवळ एक वर्ष पूर्ण झाले होते परंतु त्यांची कामगिरी या काळात फारशी समाधानकारक नसल्यामुळे त्यांना पदावरुन बाजूला सरकविण्यात आले.

 कृष्णमूर्ती हे फ्लिपकार्टमध्ये येण्याआधी टायगर ग्लोबल या कंपनीमध्ये व्यवस्थापकीय संचालक पदावर काम करीत होते. सध्या ते फ्लिपकार्टमध्ये कॅटेगरी डिजाईन ऑर्गनायजेशनचे प्रमुख या पदावर काम करीत आहे. त्यांच्याच निगराणीखाली या दिवाळीमध्ये फ्लिपकार्टने विक्रमी सेल्सची विक्री केली. टायगर ग्लोबल ही कंपनी फ्लिपकार्टची प्रमुख गुंतवणूकदार आहे. त्यामुळे आता फ्लिपकार्टचे प्रत्यक्ष नियंत्रण टायगर ग्लोबलच्याच हाती गेले असल्याचे म्हटले जात आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹स्वदेशी तंत्रज्ञानाद्वारे एनएसजी गाठणार भविष्यातील लक्ष्य

मेक इन इंडियाचा अवलंब : फ्यूचर सोल्जर कार्यक्रम

नॅशनल सिक्युरिटी गार्डच्या (एनएसजी) फ्यूचर सोल्जर कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदींची महत्त्वाकांक्षी योजना मेक इन इंडियामुळे वळण मिळाले आहे. जवानांच्या प्रोटोटाइपला (जॅकेट आणि त्यात लावली जाणारी इतर उपकरणे) अंतिम रुप देण्यासाठी एनएसजीने डीआरडीओ आणि आयआयटी मुंबईशी संपर्क साधला आहे.

याआधी 2013 साली एनएसजीच्या फ्यूचर सोल्जर कार्यक्रमाला स्थगित करण्यात आले होते. अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, रशिया आणि इस्रायलसमवेत जगाच्या जवळपास 40 देश असेच कार्यक्रम करत आहेत. या कार्यक्रमाद्वारे विविध आणि असामान्य स्थितीत देखील जवान सुरक्षा प्रदान करू शकतील अशी योजना आखण्यात आली आहे. परंतु पाश्चिमात्य देशांनी आधीच तयारी केली आहे. तर भारत 2025 पर्यंत ही योजना पूर्ण करेल.

2025 सालापर्यंत…

-रियल टाईम पोझिशनिंग सिस्टीमसह शिरस्त्राण.
-उपग्रहीय छायाचित्र तंत्रज्ञानाने युक्त उपकरण.
-सुपर कम्युनिकेशन नेटवर्क आणि एकीकृत संगणक.
-एकीकृत स्मार्ट शस्त्रास्त्रांची जवानांना उपलब्धतता.
-विशेष सामग्रीने बनलेले हलके शिरस्त्राण-शस्त्रास्त्रs.

दल फ्यूचर सोल्जर प्रकल्पावर काम करत असल्याचे सांगत एनएसजी महासंचालक सुधीर प्रताप सिंग यांनी याविषयी अधिक माहिती देण्यास नकार दिला. 26/11 च्या मुंबई हल्ल्यानंतर 2011 मध्ये भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेडला याची जबाबदारी सोपविण्यात आली होती. परंतु 30 जवानांसाठी 12-13 कोटी रुपये खर्च येण्याच्या अनुमानामुळे तो पुढे नेण्यात आला नाही.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹भारतीयांचे दरडोई उत्पन्न लाखावर

भारतीयांच्या जीवनमानात सुधारणा होत आहे. त्याचप्रमाणे त्यांचे दरडोई उत्पन्नही वाढत आहे. 2016-17 मध्ये भारतीयांचे दरडोई उत्पन्नाने एक लाख रुपयांचा आकडा पार केला आहे. गेल्या आर्थिक वर्षात हा आकडा 93,293 रुपये होता.
भारतीयांचे दरडोई उत्पन्न वाढले असे केंद्रीय सांख्यिकी विभागाने म्हटले आहे. विभागाने प्रसिद्ध केलेल्या ‘फर्स्ट ऍडव्हान्स एस्टिमेट्स ऑफ नॅशनल इन्कम, 2016-17’ या अहवालामध्ये ही माहिती देण्यात आली आहे. सध्या भारतीयांचे दरडोई उत्पन्न 1,03,007 रुपयांवर पोहोचले आहे. 2015-16 च्या तुलनेत यामध्ये 10.4 टक्क्यांनी वृद्धी नोंदविण्यात आली. 2015-16 या आर्थिक वर्षामध्ये दरडोई उत्पन्न 93,293 रुपये होते.

 2011-12 या आर्थिक वर्षाला मूळ धरून भारतीयांचे 2016-17 मधील दरडोई उत्पन्न 81,805 रुपये आहे. तर 2015-16 मध्ये ते 77,435 रुपये होते.

भारतीयांच्या दरडोई उत्पन्नात 2016-17 मध्ये 5.6 टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या आर्थिक वर्षात ही वाढ 6.2 टक्के होती. उत्पादन, खाण आणि बांधकाम क्षेत्रातील मंदीमुळे 2016-17 या वर्षाचा विकासदर 7.6 टक्क्यांवरून 7.1 टक्क्यांवर घसरेल असेही म्हणण्यात आले आहे. 9 नोव्हेंबरनंतर भारतीय अर्थव्यवस्थेवर नोटाबंदीचा कोणता परिणाम झाला याचा उल्लेख या अहवालात करण्यता आलेला नाही.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹२६ जानेवारीपासून माहिती अधिकार आॅनलाइन सुरु होणार

राज्यातील माहिती अधिकारांतर्गत अर्ज करणा-यांना २६ जानेवारीपासुन व्यक्तीगत अर्ज करण्यासह माहिती मिळविण्यासाठी थेट आॅनलाइन कार्यप्रणालीचा वापर करावा लागणार आहे. राज्य सरकारने तसे निर्देश सर्व स्थानिक प्रशासन, जिल्हापरिषदा व पोलिस यंत्रणांना दिले असुन त्यांच्या प्रशिक्षणाची व्यवस्थादेखील केली आहे. यामुळे अर्जदारांना घरबसल्या माहिती अर्ज करुन माहिती मिळविता येणार आहे. तसेच संबंधित कार्यालयांना देखील निश्चित मुदतीतच अर्जदारांना माहिती द्यावी लागणार आहे.

देशात डिजिटल युगाची सुरुवात झाल्याने राज्य सरकारने नागरीसेवा आॅनलाइन कार्यप्रणालीद्वारे देण्याला सुरुवात केली आहे. त्यातील काही सुरु झाल्या असुन काही सुरु केल्या जात आहेत. यातील महत्वाच्या आरटीआयला (माहिती अधिकार) आॅनलाइनच्या कक्षेत आणले जात आहे. त्याची सुरुवात २६ जानेवारीपासुन राज्यभर केली जाणार आहे. तत्पुर्वी माहिती अधिकारांतर्गत अर्ज करताना अर्जदाराला थेट संबंधित कार्यालयात जावे लागत होते. त्यानंतर निश्चित मुदतीत माहिती घेण्यासाठी त्या कार्यालयाकडुन अर्जदाराला पाचारण केले जात होते. यात पोस्टाद्वारे अर्ज व माहिती देण्याची सुविधा देण्यात आली असली तरी त्याचा वापर कमी प्रमाणात होतो. पुरविण्यात येणा-या माहितीपोटी आवश्यक कागदपत्रांचे शुल्क आकारुन अर्जदाराला माहिती दिली जाते. हिच पद्धत आॅनलाइन पद्धतीवर अवलंबविण्यात येणार आहे. परंतु, वेळेत माहिती न मिळाल्याने अनेकदा अर्जदारांना अपिलात जावे लागते. त्यावरही अर्जदाराचे समाधान न झाल्यास तो माहिती आयोगाच्या राज्य व विभागीय आयुक्तांकडे दाद मागतो. त्यावेळी घेण्यात येणा-या सुनावण्यांसाठी तसेच माहिती वेळेत मिळविण्यासाठी अर्जदाराचा संबंधित कार्यालयात अनेकदा हेलपटा मारावा लागतो. त्यात त्याचा वेळ व पैसा वाया जातो. सध्या माहिती अधिकारांतर्गत अर्जांची संख्याही सतत वाढत आहे. त्यामुळे प्रशासकीय कामांचा व्याप वाढत असुन त्याचा दैनंदिन कामात मोठा तांत्रिक अडथळा निर्माण होत आहे. माहिती वेळेत मिळावी तसेच ती मिळविण्यासाठी अर्जदार थेट संबंधित कार्यालयात धाव घेत असल्याने कर्मचा-यांच्या कामात व्यत्यय येत असल्याचा दावा कर्मचारी व अधिका-यांकडुन केला जातो. यात प्रामुख्याने स्थानिक प्रशासन, जिल्हापरिषदा व पोलिस (गृह विभाग) यांच्याकडे माहिती अधिकारांतर्गत अर्जाचे प्रमाण अधिक आहे. यामुळे दैनंदिन कामाचा निपटारा तसेच माहिती देताना त्यात येणारे अडथळे दुर करण्यासह अर्जदारांना माहिती घेण्यासाठी थेट संबंधित कार्यालयात न जाता अर्जदाराला अर्ज करण्यासह माहिती मिळावी, यासाठी यासाठी राज्य सरकारने २६ जानेवारीपासुन आॅनलाइन कार्यप्रणाली सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी १० जानेवारीला जिल्हास्तरावर व्हिडीयो कॉन्फरन्सीद्वारे आॅनलाइन कार्यप्रणालीचे सादरीकरण करण्यात आल. १२ जानेवारीलाही त्याचे पुर्नसादरीकरण करण्यात येणार आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹‘गार’ एप्रिलपासून लागू

अनेक कंपन्या आणि विदेशी गुंतवणूकदार कर टाळण्यासाठी प्रयत्न करत आहेत. याविरोधात प्रत्यक्ष कर महामंडळाने पावले उचलली आहेत. यासाठी केंद्रीय प्रत्यक्ष कर महामंडळाने सामान्य कर नियम (जनरल ऍन्टी-अव्हॉयडन्स ऍक्ट) 1 एप्रिल 2017 पासून लागू करण्यात येणार आहे. या गारसाठी 2017-18 हे आकलन वर्ष ठरविण्यात आले आहे. 2016 मध्ये सीबीडीटीने हा नियम लागू करण्यात येणार असल्याचे म्हटले होते. सीबीडीटीने हा नियम लागू करण्यासाठी यातील नियमावलींची माहिती देण्यासाठी मे महिन्यात यासंबंधी चर्चा करण्यास प्रारंभ केला होता. बेनामी व्यवहार (निषेध) संशोधन अधिनियम 2016 संमत करणे, प्रत्यक्ष कर विवाद सोडवणूक योजना 2016 आणि 2017-18 या आर्थिक वर्षापासून गार लागू करणे ही सीबीडीटीसाठी मोठी कामगिरी आहे, असे संस्थेने पत्रकात म्हटले. गार लागू करण्याचा प्रस्ताव 2012-13 मध्ये तत्कालीन अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी मांडला होता. यामुळे गुंतवणुकीमध्ये होणारे गैरव्यवहार रोखता येतील असे म्हणण्यात आले होते. मात्र विदेशी गुंतवणूकदारांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने लागू करण्यास विलंब झाला. 1 एप्रिल 2014 पासून लागू करण्याचा प्रस्ताव मुखर्जी यांनी मांडला होता.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹सांगलीत साकारणार जगातले पहिले ‘बुद्धिबळ भवन’

विश्वनाथन आनंदपासून राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरील अनेक नामांकित बुद्धिबळपटूंना घडविणा-या सांगलीत लवकरच जगातले पहिले ‘बुद्धिबळ भवन’ साकारले जाणार आहे. २५ हजार चौरस फुटातील प्रस्तावित इमारतीस बुद्धिबळाच्या पटाचे स्वरूप देण्यात आले असून, एकाचवेळी पाचशे खेळाडूंच्या स्पर्धेची तसेच आंतरराष्टÑीय सामन्यांची व्यवस्था येथे उपलब्ध होणार आहे.

बुद्धिबळाचे भीष्माचार्य दिवंगत भाऊसाहेब पडसलगीकर यांनी १९४१ मध्ये स्थापन केलेल्या येथील नूतन बुद्धिबळ मंडळाला यंदा ७५ वर्षे पूर्ण झाली आहेत. राज्य, राष्ट्रीय स्पर्धांची पन्नास वर्षांची अखंड परंपराही या मंडळाने जपल्याने संपूर्ण बुद्धिबळ विश्वात सांगलीचे नाव कोरले गेले आहे. या स्पर्धांमध्ये पाचवेळचा विश्वविजेता विश्वनाथन आनंद, ग्रॅण्डमास्टर के. शशिकिरण, पी. हरिकृष्णा, अभिजित कुंटे, बी. अधिबान, राहुल शेट्टी, आर. बंडोपाध्याय, जयंत गोखले, प्रवीण ठिपसे, एन. सुधाकरबाबू आदी खेळाडूंनी सहभाग घेतला आहे. त्यामुळे सांगली ब्रॅँडिंगसाठी पुढाकार घेतलेल्या सांगलीचे जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी बुद्धिबळातील सांगलीची ओळख अधोरेखित करण्यासाठी जगातले एकमेव बुद्धिबळ भवन उभारण्याचा निर्णय घेतला.

भवनासाठीचा प्रस्ताव २८ डिसेंबररोजी क्रीडा संचालकांकडे पाठविण्यात आला आहे. मिरजेतील क्रीडा संकुलाच्या जागेत पाचमजली इमारत प्रस्तावित करण्यात आली आहे. सांगलीचे प्रसिद्ध वास्तुविशारद प्रमोद चौगुले यांनी हा आराखडा केला आहे. सहा कोटी ५८ लाखांचा हा प्रस्ताव आहे. कोणत्याही दिशेने या इमारतीकडे पाहिल्यानंतर बुद्धिबळाचा पट दिसेल, अशी ही रचना आहे. हेलिकॉप्टरमधून खाली पाहिल्यानंतरही एक मोठा पट अंथरल्याचे चित्र दिसणार आहे. आंतरराष्टÑीय सामन्यांसाठी आवश्यक असणारी काचेचे सभागृह, डिजिटल स्क्रीन, पे्रक्षक गॅलरी, प्रेस रुम, कॅन्टीन, निवास व्यवस्था येथे प्रस्तावित आहे. एकाचवेळी पाचशे खेळाडूंना खेळता येईल आणि राहता येईल, अशी रचना करण्यात आली आहे. शासनाच्या मंजुरीनंतर साडेतीन वर्षात ही इमारत उभी राहणार आहे.

काय असेल इमारतीत?

पहिल्या मजल्यावर छोट्या खोल्या, खेळाडू, प्रशिक्षकांसाठी निवास व्यवस्था, भाऊसाहेब पडसलगीकर आणि त्यांच्या नूतन बुद्बिबळ मंडळाशी संबंधित संग्रहालय, दुसºया आणि तिसºया मजल्यावर स्पर्धा सभागृह असून तेथे पार्टीशनची सोयही उपलब्ध आहे. चौथ्या मजल्यावरही निवास व्यवस्था आणि कॅन्टीन होणार असून, सर्वांत शेवटच्या पाचव्या मजल्यावर आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी काचेची खोली आणि त्यासाठी स्वतंत्र लिफ्ट व्यवस्था केली जाणार आहे.

भाऊसाहेबांचे स्वप्न साकारणार

जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, ज्यांनी पूर्ण हयात बुद्धिबळाच्या प्रसारासाठी घालविली, ते भाऊसाहेब पडसलगीकर सांगलीचे भूषण आहेत. त्यांनी पाहिलेले बुद्धिबळाचे स्वप्न आम्ही साकार करण्याचा प्रयत्न करीत आहोत. बुद्धिबळात संपूर्ण भारतात सांगलीचे नाव आदराने घेतले जाते. भवन साकारल्यानंतर संपूर्ण जगात सांगलीची नवी ओळख निर्माण होईल.

अनोखी संकल्पना

वास्तुविशारद प्रमोद चौगुले यांनी सांगितले की, इमारतीमधील प्रत्येक मजल्यास आणि विभागास आम्ही बुद्धिबळातील प्रचलित शब्दांप्रमाणे नावे दिली आहेत. जगातील कोणत्याही ठिकाणच्या बुद्धिबळाच्या स्पर्धा सांगलीत बसून पाहता येणार असून, येथील स्पर्धांची माहिती आणि प्रक्षेपणही अन्यत्र दाखविता येऊ शकेल. जगात कुठेही बुद्धिबळाच्या पटावर आधारित रचनात्मक इमारत नाही. त्यामुळे जागतिक स्तरावरील देखणी वास्तू सांगलीत साकारणार आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹YAHOO होणार इतिहासजमा

-YAHOOची कॉर्पोरेट ओळख लवकरच बदलण्याची शक्यता आहे. कंपनीचं Altaba असं लवकरच नामकरण होणार असल्याची चर्चा आहे. कंपनीचा 4.8 अरब डॉलरचा वेराइजन करार झाल्यानंतर कंपनीच्या बोर्डाचं स्वरुपही छोटं होणार आहे.

याहू स्वतःची डिजिटल सर्व्हिसेस वेराइजन कम्युनिकेशनला विकण्याच्या तयारीत आहे. याअंतर्गत ईमेल, वेबसाइट्स, मोबाईल अॅप्स, जाहिरातीचे टूल्स वेराइजनला मिळणार आहेत. त्यानंतर सीईओ मेरिसा मेयरलाही राजीनामा द्यावा लागणार आहे. या करारांतर्गत नवं नाव alternative and Alibaba यांच्या अक्षरातून निवडण्यात आलं आहे. याहूच्या 10 सदस्यांच्या बोर्डात सध्या सीईओ मेरिसा मेयरसह चार डायरेक्टर आहेत. वेराइजन करारानंतर सर्व बोर्डाचे सदस्य राजीनामा देतील. मात्र मध्यंतरी याहूचे अकाऊंट हॅक झाल्याच्या दोन वेगवेगळ्या घटनांनंतर हा करार धोक्यात आला होता. या हॅकिंगमध्ये 1 अरबहून जास्त युजर्सच्या अकाऊंटची वैयक्तिक माहिती चोरीला गेली होती.

या कराराअंतर्गत एरिक ब्रांट यांना कंपनीचे चेअरमन बनवण्यात आलं. वेब वेराइजन करार पूर्ण होईपर्यंत एमिरटसही चेअरमनपदावर कार्यरत राहणार आहेत. याहूमध्ये 15 टक्के शेअर्स हे अलिबाबाचे आहेत. या करारानंतर चिनी कंपनी अलिबाबाच्या शेअर्सशिवाय काही विकणार नसल्याचीही माहिती मिळाली आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹महाराष्ट्रात कॅनडाची तीन अब्ज डॉलरची गुंतवणूक

महाराष्ट्राचा चेहरामोहरा बदलण्यासाठी आता कॅनडाची मदत होणार आहे. राज्यातील दुष्काळी भागात पाणीपुरवठ्यासाठी जलवाहिन्यांचे जाळे, सर्वांसाठी घरे, वांद्रे-कुर्ला संकुलातील आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र, स्मार्ट शहरे; तसेच माहिती तंत्रज्ञानातील प्रगतीसाठी कॅनडातील पेन्शन फंडातील सुमारे तीन अब्ज डॉलरची गुंतवणूक केली जाणार आहे. याबाबत कॅनडाचे मंत्री अमरजित सोही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बुधवारी (ता. 11) भेट घेणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

राज्यात विविध क्षेत्रांमध्ये कॅनडा गुंतवणूक करणार आहे. ओन्टारिओ टीचर्स पेन्शन योजना, सनलाइफ इन्शुरन्स कंपनी आणि फेअरफॅक्स या कंपन्या या गुंतवणुकीसाठी इच्छुक आहेत. ही केवळ सुरवात आहे, यानंतर आणखी मोठी गुंतवणूक केली जाईल, अशी माहिती मंत्रालयातील सूत्रांनी दिली. उद्या, बुधवारी अमरजित सोही मुख्यमंत्र्यांशी या संदर्भात भेट घेणार आहेत. त्यानंतर मुख्यमंत्री फेब्रुवारीमध्ये कॅनडाला जाणार असल्याचेही सांगण्यात आले. राज्यातील सर्वांसाठी घर योजनेत ब्रुकफिल्ड ही कंपनी इच्छुक आहे. आपले तंत्रकौशल्य भारतातील बिल्डरांना देण्यास ते तयार आहेत. या तंत्रज्ञानामुळे दोन महिन्यांत इमारती उभारता येतील, अशीही माहिती जाणकारांनी दिली.

गेल्या वर्षी भीषण दुष्काळी स्थिती निर्माण झाल्यामुळे लातूरला रेल्वेने पाणी द्यावे लागले होते. अशी वेळ पुन्हा येऊ नये यासाठी दुष्काळी भागात जलवाहिन्यांचे जाळे या गुंतवणुकीतून उभारले जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. यामुळे भविष्यात दुष्काळ पडला तर जलवाहिन्यांच्या जाळ्यामुळे मराठवाड्यात केव्हाही कुठेही पाणी पोचवता येईल. तसेच औरंगाबादच्या वाळुंज येथील ऑटो क्लस्टरशी कॅनडातील ऑटो पुरवठादार सहकार्य करार करणार आहेत. या गुंतवणुकीपैकी काही भाग संरक्षणविषयक वाहनांच्या निर्मितीसाठीदेखील वापरण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

गुंतवणूक क्षेत्रे

पाणी योजना जाळे
सर्वांसाठी घर योजना
वांद्रे-कुर्ला संकुलातील आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र
स्मार्ट शहरे
माहिती तंत्रज्ञान क्षेत्र

निधी पुरवणार...

ओन्टारिओ टीचर्स पेन्शन प्लान
सनलाइफ इन्शुरन्स कंपनी
फेअरफॅक्स

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹एसटी स्थानकांचा होणार कायापालट

राज्यात विमानतळाप्रमाणे 13 ठिकाणी अत्याधुनिक "बस पोर्ट'

मुंबई - राज्यात एसटी बस स्थानकांच्या जागेवर विमानतळाप्रमाणे अत्याधुनिक सोई-सुविधा असलेले 13 "बस पोर्ट' बांधण्यात येणार आहेत. त्यापैकी नऊ बस पोर्टचा आराखडा तयार झाला आहे, अशी माहिती राज्याचे परिवहनमंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी मंगळवारी येथे दिली.

"बस पोर्ट'च्या आराखड्याचे सादरीकरण रावते यांच्या दालनात झाले. त्या वेळी पत्रकारांना त्यांनी ही माहिती दिली. या वेळी परिवहन आयुक्त प्रवीण गेडाम उपस्थित होते. रावते म्हणाले, की राज्यातील बस स्थानकांचा कायापालट करण्याचे राज्य सरकारने ठरवले आहे. बस स्थानकांची अवस्था चांगली नसल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. ही स्थिती बदलण्यासाठी सरकारने विमानतळाप्रमाणे अत्याधुनिक सोई-सुविधा, व्यापारी संकुल, रेल्वे स्थानकाशी जोडण्यासाठी "स्काय वॉक', व्यापारी संकुल असे "बस पोर्ट' उभारण्याचे ठरवले आहे. सध्याच्या एसटी स्थानकाच्या जागेचा पुरेपूर वापर करून "बस पोर्ट' व व्यापारी संकुलाचा आराखडा तयार करण्यात आला आहे.

पहिल्या टप्प्यात बोरिवली-नॅन्सी कॉलनी, पनवेल, शिवाजीनगर (पुणे), पुणे नाका बस स्थानक (सोलापूर), नाशिकचे महामार्ग बस स्थानक, औरंगाबादचे मध्यवर्ती बस स्थानक, नांदेडचे मध्यवर्ती बस स्थानक, अकोला मध्यवर्ती बस स्थानक व नागपूरचे मोरभवन बस स्थानक यांचा समावेश आहे. या सर्व "बस पोर्ट'ची रचना समान असेल. खासगी-सार्वजनिक भागीदारीतून त्याची उभारणी करण्यात येणार आहे. त्याची देखभाल व दुरुस्ती "बस पोर्ट' उभारणारी संस्थाच करणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

या बस पोर्टच्या कामासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर निविदा मागवण्यात येणार आहेत. बस पोर्टचे प्रकल्प व्यवस्थापन व सल्लागार म्हणून प्रसिद्ध वास्तुविशारद शशी प्रभू यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनीच बस पोर्टचा आराखडा तयार केला आहे. उर्वरित सांगली, धुळे, जळगाव व कोल्हापूर या चार बस पोर्टचे काम दुसऱ्या टप्प्यात करण्यात येईल, अशी माहिती रावते यांनी दिली.

राज्यातील इतर बस स्थानकेही विकसित करण्यात येणार आहेत. त्यासाठी 40 वास्तुविशारदांची नेमणूक केली आहे. स्थानिक गरजा लक्षात घेऊन या बस स्थानकांचा आराखडा तयार केला जाईल. त्यात "मिनी थिएटर'चाही समावेश करण्यात येणार आहे. रत्नागिरी बस स्थानकाचा आराखडा तयार असल्याचेही रावते यांनी सांगितले.

असा असेल बस पोर्ट
- भविष्यात लागणाऱ्या सुविधांचा वेध घेऊन सर्व 13 ठिकाणी समान आराखडा
- व्यापारी संकुलाचा वेगळा आराखडा
- सोई-सुविधांचे व्यवस्थापन बांधकाम करणाऱ्या कंपनीकडेच
- प्रत्येक "बस पोर्ट'मध्ये सौर पॅनेल व पर्जन्य जल पुनर्भरणाची सोय
- बस येण्या-जाण्यासाठी स्वतंत्र मार्ग; प्रवाशांसाठी स्वतंत्र व्यवस्था
- प्रवाशांसाठी प्रतीक्षा कक्ष. त्यात बसची माहिती देणारे अत्याधुनिक फलक व रेस्टॉरंट
- पनवेलसारख्या ठिकाणी "बस पोर्ट' व रेल्वे स्थानक स्काय वॉकने जोडणार
- स्काय वॉकवरच व्यापारी संकुल. त्याची मालकी एसटी महामंडळाकडे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹जागतिक अर्थव्यवस्थेला धूम्रपानामुळे मोठा फटका

धूम्रपानामुळे जागतिक अर्थव्यवस्थेला दर वर्षी तब्बल एक ट्रिलियन (एक हजार अब्ज) डॉलरचा फटका बसत असल्याचे धक्कादायक वास्तव जागतिक आरोग्य संघटनेच्या (डल्ब्यूएचओ) ताज्या अहवालातून समोर आले आहे. धूम्रपानामुळे सध्या जेवढे मृत्यू होतात, त्यात 2030 मध्ये 33 टक्क्यांनी वाढ होणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

"डल्ब्यूएचओ' आणि अमेरिकेच्या राष्ट्रीय कर्करोग संस्थेने केलेल्या पाहणीचा अहवाल नुकताच प्रसिद्ध करण्यात आला असून, त्यातील निष्कर्ष धक्कादाय आहेत. तंबाखूवर आकारल्या जाणाऱ्या करातून मिळणाऱ्या उत्पन्नापेक्षा धूम्रपानावर होत असलेला खर्च प्रचंड मोठा आहे. 2012-13 मध्ये तंबाखूवरील करातून एकूण 269 अब्ज रुपयांचा महसूल गोळा झाल्याचा अंदाज "डल्ब्यूएचओ'ने व्यक्त केला आहे.

तंबाखूवरील करातून 269 अब्ज एवढी रक्कम गोळा होत असताना, धूम्रपानावर मात्र जागतिक अर्थव्यवस्थेला एक हजार कोटी रुपयांचा फटका बसला असल्याची धक्कादायकबाब "डल्ब्यूएचओ'च्या अहवालातून समोर आली आहे.

 अहवालात नमूद करण्यात आले आहे, की तंबाखूमुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या 2030 पर्यंत प्रतिवर्षी 60 लाखांवरून 80 लाखांवर पोचणार असल्याची शक्यता आहे. एकूण मृत्यूंपैकी 80 टक्के मृत्यू हे अल्प आणि मध्यम उत्पन्न गटांतील असणार आहेत.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹याहू’ होणार ‘अल्टाबा’

माहितीच्या महाजालावर एकेकाळी वर्चस्व गाजवणाऱ्या ‘याहू’ची कॉर्पोरेट ओळख लवकरच बदलण्याची शक्यता आहे. ‘याहू’चे नाव बदलून ‘अल्टाबा’ असे करण्यात येणार असल्याची चर्चा सध्या असून, ‘याहू’ स्वतःची डिजिटल सर्व्हिसेस ‘वेराइजन कम्युनिकेशन’ला विकण्याच्या तयारीत आहे. या व्यवहारानंतर कंपनीच्या सीईओ मेरिसा मेयर आणि कंपनीचे सहसंस्थापक डेवडि फलिो यांच्यासह अन्य १० अधिकारी राजीनामा देतील, असे ‘याहू’ने मंगळवारी स्पष्ट केले.

‘वेरायजन’ने ही कंपनी ४.८३ अब्ज डॉलर्सला विकत घेतल्यानंतर ‘याहू’ कंपनीकडील भागात चीनी कंपनी ‘अलिबाबा’ची भागीदारी राहणार आहे आणि याचवरून याहूचे नाव ‘अल्टाबा’ (ऑल्टरनेटिव्ह अँड अलिबाबा) होण्याची शक्यता आहे.

‘याहू’ युजर्सची अकाऊंट्स हॅक झाल्याच्या अनेक घटना घडल्या. यापूर्वी २०१३ मध्येही कोट्यवधी ‘याहू’ युजर्सची अकाऊंट्स हॅक झाली होते. त्याचा कंपनीला सर्वात मोठा फटका बसला होता. २०१४ मध्येही ५० कोटी युजर्सची अकाऊंट हॅक झाल्याचे समोर आले होते. या सगळ्या युजर्सचे नाव, पत्ते, फोन क्रमांक, पासवर्ड, इमेल ब्लॉक करण्यात आले होते.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹रोनाल्डो, रनीएरीची बाजी

रिअल माद्रिद क्लब आणि पोर्तुगाल संघाकडून सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ख्रिस्टियानो रोनाल्डोला आंतरराष्ट्रीय फुटबॉल संघटनेचा (फिफा) २०१६चा सर्वोत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार देण्यात आला. गेल्या मोसमात लस्टर सिटीला प्रीमिअर लीग स्पर्धेचे विजेतेपद मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलणाऱ्या क्लाउडिओ रनीएरी यांना सर्वोत्कृष्ट पुरुष प्रशिक्षकाचा पुरस्कार देण्यात आला.

फिफाचा पुरस्कार वितरण सोहळा नुकताच पार पडला. यात ३१ वर्षीय रोनाल्डो याने अर्जेंटिनाचा लिओनेल मेस्सी आणि फ्रान्सचा अँटोनी ग्रिझमन यांना मागे टाकून हा पुरस्कार मिळवला. रोनाल्डोने याआधी बॅलन डीओर पुरस्कारही मिळवला. गेल्या वर्षी रोनाल्डोने चॅम्पियन्स लीगमध्ये १६ गोल नोंदविले. त्याचबरोबर पोर्तुगालने युरो कप उंचावला; तसेच रिअल माद्रिदला चॅम्पियन्स लीगचे विजेतेपद मिळवून देण्यात रोनाल्डोने मोठा वाटा उचलला. त्यामुळे मेस्सीविरुद्ध त्याचे पारडे जड झाले आणि गेल्या वर्षीचा सर्वोत्कृष्ट खेळाडूचा मान त्याला मिळाला. मागील वर्षे आपल्यासाठी सर्वोत्कृष्ट राहिले, अशा शब्दांत रोनाल्डोने फिफाचे अध्यक्ष गिआनी इन्फॅटिनो यांच्याकडून पुरस्कार स्वीकारल्यानंतर आपल्या भावना व्यक्त केल्या.

६५ वर्षीय रनीएरी यांनी रिअल माद्रिदचे प्रशिक्षक झिनेदिन झिदान आणि पोर्तुगालचे प्रशिक्षक फर्नांडो सँटोस यांना मागे टाकून सर्वोत्कृष्ट प्रशिक्षकाचा पुरस्कार मिळवला. अर्जेंटिनाचे महान फुटबॉलपटू दिएगो मॅराडोना यांच्याकडून फर्नांडो यांना हा पुरस्कार देण्यात आला. या पुरस्कारासाठी मतदान घेण्यात आले. यासाठी राष्ट्रीय संघाचे प्रशिक्षक, कर्णधार, काही पत्रकार आणि चाहते यांना मत द्यायला सांगितले. यासाठी वर्षातील सर्वोत्कृष्ट अकरा खेळाडूंचा संघही निवडण्यात आला. यातील ११ पैकी ९ खेळाडू हे ला-लीगामधील आहेत. बायर्न म्युनिचचा गोलकीपर मॅन्युएल नेउरने यात सलग चौथ्या वर्षी स्थान मिळवले. ‘फेअर प्ले’ पुरस्कार कोलंबियाच्या अॅटलेटिको नॅशनल संघाला मिळाला.

सर्वोत्कृष्ट पुरुष खेळाडू : ख्रिस्टियानो रोनाल्डो (पोर्तुगाल)
सर्वोत्कृष्ट महिला खेळाडू : कार्ली लॉयड (अमेरिका)
सर्वोत्कृष्ट पुरुष प्रशिक्षक : क्लाउडीओ रानीएरी (इटली)
सर्वोत्कृष्ट महिला प्रशिक्षक : सिल्विया नेद (जर्मनी)

फिफा फिफप्रो वर्ल्ड ११ :
मॅन्युएल नेउर, डॅनी अॅल्व्हस, गेरार्ड, सर्जिओ रामोस, मार्सेलो, लुका, टोनी क्रूस, इनिएस्टा, लिओनेल मेस्सी, लुईस सुआरेझ, ख्रिस्टियानो रोनाल्डो.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹४८ संघांना परवानगी

झुरिच : फिफाच्या समितीने सर्वसमंतीने २०२६च्या फुटबॉल वर्ल्ड कपमध्ये ४८ संघांना सहभागी होण्याची परवानगी दिली. फिफाच्या अधिकाऱ्यांनी ट्विट करून ही माहिती दिली. १९९८च्या फ्रान्समध्ये झालेल्या वर्ल्ड कपमध्ये २४ वरून ३२ संघ करण्यात आले होते. २०१४च्या वर्ल्ड कपमध्येही ३२ संघांचा सहभाग होता. इतर देशांमध्येही फुटबॉलची प्रगती व्हावी, यासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याचे बोलले जात आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹पाकिस्तानातील हिंदू मंदिराच्या जिर्णोद्धाराचा नवाज शरीफ यांच्या हस्ते शुभारंभ

पाकिस्तान हा देश लवकरच अल्पसंख्यांकांचे हितसंबंध जपणारा देश म्हणून ओळखला जाईल असे पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी म्हटले. पाकिस्तानमधील हिंदूंचे श्रद्धास्थान असलेल्या काटस राज कॉम्प्लेक्स, चकवाल येथील मंदिराच्या जिर्णोद्धार प्रसंगाचा नवाज शरीफ यांच्या हस्ते आज शुभारंभ झाला. या मंदिराला भेट देणारे नवाज शरीफ हे पहिले पाकिस्तानी पंतप्रधान ठरले. मी केवळ येथील मुस्लिमांचाच पंतप्रधान नसून हिंदू, शीख आणि ख्रिश्चन या अल्पसंख्यांक समुदायाचा देखील मी पंतप्रधान आहे असे ते यावेळी म्हणाले.

तो दिवस दूर नाही जेव्हा पाकिस्तानची ओळख एक अल्पसंख्याक समुदाय येथे गुण्यागोविंदाने नांदेल. हे राष्ट्र अल्पसंख्याक समुदायाशी मैत्रीने राहणारे राष्ट्र म्हणून नावाजले जाईल. या देशातील अल्पसंख्यांक समुदायाच्या उन्नतीसाठी आमचे सरकार अनेक पावले उचलत आहे असे ते यावेळी म्हणाले. हिंदू आणि शीख समाजाच्या प्रार्थनास्थळांचे, मंदिरांचे जतन व्हावे त्यांचा जिर्णोद्धार व्हावा यासाठी अधिकाऱ्यांना आदेश देण्यात आले असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. या स्थळांचे जतन व्हावे असे सरकारचे आदेश आहेत असे ते म्हणाले.

मंदिरांचे आणि गुरुद्वारांचे जतन व्हावे यासंबंधी इव्हाक्यू ट्रस्ट प्रॉपर्टी बोर्डाचे चेअरमन सिद्दिकी फारुक यांना सूचना दिल्या गेल्या आहेत असे ते म्हणाले. बाबा गुरू नानक आणि गांधार विद्यापीठांचे पुनर्निमाण व्हावे याकरिता आमचे पूर्णतः समर्थन असेल असे नवाज शरीफ यांनी म्हटले. सर्वांशी मिळून मिसळून राहण्याची शिकवण इस्लाममध्ये आहे, असे ते म्हणाले. आपले म्हणणे पटवून देण्यासाठी पंतप्रधान शरीफ यांनी धार्मिक सलोख्याची अनेक उदाहरणे यावेळी दिली.

अल्पसंख्यांक समुदाय आणि बहुसंख्यांक समुदायांना समान वागणूक मिळावी अशी शिकवण इस्लाममध्ये असल्याचाही त्यांनी दाखला दिला. मुस्लीम, ख्रिश्चन, हिंदू, शीख, पारसी आणि बहाई या सर्व समाजांनी एकत्र येऊन एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून पाकिस्तानच्या प्रगती साधावी असे आवाहन त्यांनी केली. प्रत्येक समुदायाने शांतता आणि समृद्धी वाढविण्यास हातभार लावावा असे ते यावेळी म्हणाले.

काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानच्या सिनेटने हिंदू विवाह कायद्याला मंजुरी देऊन हिंदू समाजाच्या विवाहांना कायदेशीर मान्यता मिळवून दिली आहे. या कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीस दंड ठोठावला जाईल आणि शिक्षा मिळेल अशी तरतूद करण्यात आली आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹प्रदूषणमुक्तीकडे पाऊल, कर्नाटकातून धावणार देशातील पहिली १०० टक्के बायोडिझेल लक्झरी बस

वाढत्या प्रदूषणावर मात करण्यासाठी कर्नाटक परिवहन अर्थात केएसआरटीसीने (कर्नाटक स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन) १०० टक्के बायोडिझेलवर धावणाऱ्या २५ लक्झरी खरेदी केल्या आहेत. या बस बंगळुरू ते तिरूपती, चेन्नई, बिदर आणि कुडानपुरा येथे धावणार आहेत. बायोडिझेलवर धावणाऱ्या या प्रत्येक मल्टिअॅक्सल बसची किंमत ९१.१० लाख इतकी आहे. विशेष म्हणजे या बस डिझेल व बायोडिझेलवर धावू शकतील. केएसआरटीसीने तर १०० टक्के बायोडिझेलवर धावणाऱ्या या भारतातील पहिल्याच बस असल्याचा दावा केला आहे.

या सर्व बसला बायोडिझेल किट बसवण्यात आलेले आहे. या बसमुळे हवेत होणारे प्रदूषण टळणार आहे. या बसची खास रचना करण्यात आली आहे. यातून आरामदायक प्रवास करता येईल अशा पद्धतीने याचे डिझाइन तयार करण्यात आले आहे. प्रत्येक सीट्सच्या रांगेत लॅपटॉप आणि मोबाइल चार्जिंगची सुविधा देण्यात आली आहे.

त्याचबरोबर प्रवाशांच्या मनोरंजनासाठी रांगेत फोल्डेड एलसीडी मॉनिटर आणि डिव्हिडी प्लेअरची सुविधा देण्यात आली आहे. जर्मनीतील टीयूव्ही कंपनीने या सर्व बसची तपासणी करून प्रवासासाठी अत्यंत सुरक्षित असल्याचे प्रमाणपत्र दिले आहे.

आणीबाणीच्या वेळी बसमध्ये अलार्म वाजेल. उल्लेखनीय म्हणजे या बसला ६ इमरजन्सी दरवाजे आहेत. बायोडिझेलवरील या बसमुळे ८६.६ लाखांची बचत होणार असल्याचा दावा केएसआरटीसीने केला आहे. एक लिटर डिझेलची किंमत ही ५७.४९ आणि बायोडिझेलची किंमत ५२.४९ रूपये इतकी आहे. प्रत्येक बसला दररोज १९० लिटर डिझेलची गरज भासणार आहे. २५ बससाठी १७.३ लाख रूपये किंमतीचे सुमारे ४७५० लिटर डिझेल लागणार आहे. या २५ बससाठी वार्षिक ९.९ कोटी रूपयांचे डिझेल लागेल. पण बायोडिझेलमुळे यासाठी ९.१ कोटी रूपये लागतील. यामुळे सुमारे ८६.६ कोटी रूपयांची बचत होणार असल्याचे केएसआरटीसीने म्हटले आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹डिजिटल रेडिओसाठी नॉर्वे बंद करणार एफएमचे प्रसारण

 नॉर्वे बुधवारपासून आपले एफएम रेडिओ नेटवर्क बंद करणार आहे. नॉर्वे या प्रकारचे पाऊल उचलणारा जगाचा पहिला देश बनेल. हे पाऊल डिजिटल रेडिओसाठी उचलले जात आहे. नॉर्वेच्या या साहसी पावलाकडे युरोपचे उर्वरित देश नजर ठेवून आहेत. डिजिटल ऑडिओ प्रसारणाच्या समर्थकांनी डीएबी उत्कृष्ट ध्वनी गुणवत्ता प्रदान करतो असा दावा केला. एफएम (फ्रीक्वेंसी मॉडय़ुलेशन) ट्रान्समिशनच्या तुलनेत डीएबी अधिक वाहिन्या देखील उपलब्ध करवितो. सर्वात आधी 1945 साली डीएबी अमेरिकेत सादर करण्यात आला होता. डीएबी अधिक चांगले कव्हरेज प्रदान करतो, याद्वारे चुकलेले कार्यक्रम देखील श्रोते ऐकू शकतात. एवढेच नाही तर आपत्कालीन स्थितीत आणीबाणीचा संदेश प्रसारित करू शकतो असे अधिकाऱयांनी सांगितले.

या मोठय़ा तांत्रिक बदलामागे मोठे अंतर आणि मुख्य कारण पूर्ण लोकसंख्येला चांगली रेडिओ सेवा उपलब्ध करविणे असल्याचे डिजिटलरेडिओ नॉर्वेचे प्रमुख ओले जॉर्गेन यांनी म्हटले. डिजिटलरेडिओ नॉर्वे कंपनीवर सार्वजनिक प्रसारक एनआरके आणि व्यावसायिक रेडिओ स्थानक पी4 चा अधिकार आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹आता चीनलाही पाकचा वैताग !

पाकिस्तान हे जगातल्या दहशतवादाचं केंद्र आहे ही गोष्ट कधीच स्पष्ट झाली आहे. पण आतापर्यंत पाकिस्तानला कायम पाठिशी घालणारा आणि पाकिस्तानचा ‘आॅल वेदर फ्रेंड’ म्हणवणारा चीनसुध्दा आता पाकिस्तानच्या दहशतवाद्यांना आश्रय देण्याच्या धोरणाला कंटाळलाय. चीनआणि पाकव्याप्त काश्मीरच्या सीमेवरची सुरक्षा व्यवस्था आपण कडक करणार असल्याचं चीनच्या जिनजियांग प्रांताच्या प्रमुखाने सांगितलं.

चीनमध्ये दहशतवादाचा धोका फारसा नाही पण पाकव्याप्त काश्मीरला लागून असणाऱ्या चीनच्या जिनजियांग प्रांतामध्ये इस्लामी दहशतवाद्यांचा उपद्रव होतो. या दहशतवाद्यांना पाकिस्तानने आवर घालावा अशी मागणी चीनकडून सातत्याने होते. पण चीनचा मित्र म्हणवणारा पाकिस्तान हेही करताना दिसत नाहीये. त्यामुळे आता दहशतवाद्यांना आळा घालायला चीनला स्वत:च्याच सुरक्षा दलांचा वापर करावा लागणार आहे.

चीनच्या जिनजियांग प्रांतामध्ये मुस्लिम लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे. या भागाच फुटीरतावादी भावनाही काही प्रमाणात बळावल्याचं दिसतं. या भागात दहशतवाद्यांचा हैदोसही आहे. हे दहशतवादी पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये असलेल्या दहशतवादी तळांमध्ये प्रशिक्षण घेऊन चीनमध्ये येतात आणि दहशतवादी कारवाया करतात असा अंदाज चीनमध्चे व्यक्त होतो आहे. चीनची ही एक मोठी डोकेदुखी ठरली आहे. याचवेळी काश्मीर, आणि अफगाणिस्तानमधल्या दहशतवाद्यांबद्दल पाकिस्तानने जे धोरण वापरलंय तेच चीनच्या बाबतीत पाकिस्तान राबवत असल्याची चिन्हं दिसत आहेत.
चीनची दहशतवादाच्या मुद्द्यावर असलेली भूमिकाही कमालीची दुटप्पी आहे. एकीकजे जिनजियांग प्रांतामधल्या दहशतवादाला आळा बसावा अशी चीनची अपेक्षा आहे पण मौलाना मसूद अझरला दहशतवादी घोषित करण्याच्या भारताच्या संयुक्त राष्ट्रांमधल्या प्रयत्नांना चीनने व्हेटो वापरत नेहमीच आडकाठी केलेली आहे. तसंच जिनजियांग प्रांतामधल्या नागरिकांच्या समस्या जाणून घेण्याचे चीनचे फारसे प्रयत्न दिसत नाहीत. त्याच पध्दतीने पाकिस्तानमध्या चीन राबवत असलेल्या सीपीएसी योजनेबद्दल बलुचिस्तानमधल्या नागरिकांच्या भावनांकडेही चीन सोयीस्कर दुर्लक्ष करतंय.

जिनजियांग प्रांतात होतानमध्ये डिसेंबर महिन्यात झालेल्या एका दहशतवादी हल्ल्यामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला होता. गेल्या रविवारी या ठिकाणी सुरक्षा रक्षकांनी केलेल्या हल्ल्यात तीन दहशतवाद्यांना ठार करण्यात आलं होतं. या पार्श्वभूमीवर या प्रांतात होणारी घुसखोरी रोखण्यासाठी आपण इथल्या यंत्रणांमध्ये मोठ्या प्रमाणावर सुधारणा करणार आहोत असं जिनजियांग प्रांताचे प्रमुख शोहरत झाकीर यांनी सांगितलं.चीनमधल्या सरकारी वृत्तसंस्थांनी याविषयी माहिती दिली.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹भविष्यात पोलीस तक्रार करतानाही लागणार आधार कार्ड

भविष्यात पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवातानाही आधार कार्ड बंधनकारक होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने सर्व सरकारी सुविधा, सेवा, अनुदान आणि लाभ घेणा-या आधार कार्ड बंधन करण्याची तयारी सुरु केली आहे.

केंद्र सरकारने ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे तिकिटवर सूट देताना, महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना आणि ईपीएफसाठी आधार कार्ड बंधनकारक केले होते. आता लवकरच केंद्र सरकार सर्व प्रकारच्या सरकारी सेवांसाठी ओळखपत्र म्हणून आधार कार्ड बंधनकारक करण्याच्या विचारात आहे.

संसदेने मंजूर केलेल्या आधार कार्ड विधयेकानुसार कोणतेही अनुदान, लाभ किंवा सेवेसाठी भारत सरकारच्या निधीतून खर्च होत असल्यास त्यासाठी आधार कार्ड बंधनकारक असणार आहे. आधार कार्डचे फायदे लक्षात घेता प्रत्येक विभागाला आधार कार्डचा वापर करावा लागेल. तुम्ही जर एखाद्या व्यक्तीशी बोलत असाल तर तो व्यक्ती नेमका कोण आहे हे जाणू घेण्याची गरज नाही का असा प्रश्नही एका अधिका-याने उपस्थित केला. उद्या ‘कॅग’कडून ताशेरे येतील. जर तुमच्याकडे सेवा उपलब्ध आहे, मग अनुदानाचे लाभ कोण घेतंय याची तपासणी का करत नाही असा प्रश्न कॅगकडून विचारला जाऊ शकते अशी शक्यताही एका अधिका-याने वर्तवली आहे.

‘आधार’ योजनेच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या प्रकरणांची सुनावणी जलदगतीने करण्यास नकार देतानाच, या योजनेसाठी खासगी संस्थांनी माहिती (डेटा) गोळा करण्याची कल्पना चांगली नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने गेल्या आठवड्यातच स्पष्ट केले होते. खासगी संस्था बायोमेट्रिक डेटा गोळा करत असल्यामुळे प्रत्येक व्यक्तीच्या गोपनीयतेबाबत चिंता व्यक्त होती. याप्रकरणी सुप्रीम कोर्टात याचिकाही दाखल झाल्या असून आधारच्या वैधतेबाबत सुप्रीम कोर्ट काय निकाल देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹तामिळनाडूमध्ये दुष्काळ जाहीर

मुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम यांची घोषणा, शेतकऱयांना शेतसारा माफ,

तामिळनाडूमध्ये यंदा 41 टक्के कमी पाऊस झाल्याने राज्यातील सर्व जिल्हय़ांमध्ये दुष्काळी परिस्थिती आहे. शेतकऱयांसाठी ही परीक्षेची वेळ असल्याने राज्यात दुष्काळ जाहीर करत असल्याची घोषणा मुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम यांनी केली आहे. शेतकऱयांना शेतसारा पूर्णपणे माफ केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. विशेष म्हणजे द्रमुक, काँग्रेससह विरोधकांनीही दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली होती.

गेल्या काही दिवसांमध्ये राज्यातील 17 शेतकऱयांनी आत्महत्येचा मार्ग अनुसरला असून ही गंभीर बाब आहे, असे सांगून ते म्हणाले, त्यांच्या कुटुंबीयांना तातडीची मदत म्हणून 3 लाख रुपये दिले जाणार आहेत. तथापि राज्याच्या विविध भागामधून आलेल्या अहवालानुसार, मान्सूनअभावी परिस्थिती अतिशय कठीण बनली आहे. शेतकऱयांसाठी ही परीक्षेची वेळ आहे. मात्र त्यांनी धीर सोडू नये, शासन त्यांच्या पाठिशी असल्याचा धीरही त्यांनी दिला आहे.

यासाठी आम्ही केंदाकडे तातडीने मदत मागितली जाणार आहे. अनेक जिल्हय़ांमध्ये पिकांचे 33 टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे. दुष्काळी मदतीच्या निकषामध्ये ही आकडेवारी बसते. शेतकऱयांना आधार देण्यासाठी एकरी 5,565 रुपये मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विमा कंपन्यांनाही तातडीने क्लेम मंजूर करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. मनरेगामधील कामांचे दिवस 100 वरून 150 दिवस करण्याचाही निर्णय घेतला आहे. यामुळे शेतकऱयांना, अल्पभूधारकांना किमान आधार मिळू शकेल, असेही मुख्यमंत्री पनीरसेल्वम यांनी सांगितले.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹एन. चंद्रशेखरन टाटा सन्सचे नवे अध्यक्ष

टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे (टीसीएस) मुख्य कार्यकारी अधिकारी नटराजन चंद्रशेखरन यांची टाटा सन्सच्या अध्यक्षपदी आज (गुरुवार) निवड करण्यात आली.

टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरून सायरस मिस्त्री यांना 24 ऑक्टोबर रोजी हटविण्यात आले होते. मिस्त्री यांना हटविल्यानंतर सुमारे तीन महिन्यानंतर चंद्रसेखरन यांची निवड करण्यात आली.
दरम्यान, सायरस मिस्त्री यांना टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरून हटविण्यात आल्यानंतर त्यांनी टाटा समूहातील सहा कंपन्यांच्या संचालकपदाचा राजीनामा दिला होता.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹भारतात वाघ दहा हजार : डॉ. कारंथ

वाघ मृत्यू झाल्यास सर्वत्र चिंता व्यक्त केली जाते. मात्र, वाघांच्या मृत्यूपेक्षा जन्माला येणार वाघ शावकांची संख्या बरीच जास्त आहे. येत्या काळात देशातील वाघांची संख्या दहा हजारांपर्यंत पोहोचल्यास आश्चर्य वाटायला नको, असा आशावाद देशातील नामवंत वन्यजीव वैज्ञानिक डॉ. उल्हास कारंथ यांनी व्यक्त केला.

 वनविभागाच्यावतीने डॉ. कारंथ यांचे व्याघ्रसंवर्धन या विषयावर सादरीकरण आयोजित करण्यात आले होते. वनसभागृहात आयोजित या कार्यक्रमात डॉ. कारंथ यांनी भारतातील वाघ आणि संबंधित विषयावर आपले संशोधन आणि विवेचन मांडले.

पूर्वीच्या तुलनेत वाघांची संख्या आता वाढते आहे. त्याचप्रमाणे, वाघाबद्दल मोठ्या प्रमाणात जागृतीही होते आहे. त्यामळे वाघांची संख्या देशभरात वाढतच जाणार आहे. जंगलांमध्ये कमी होणारी तृणभक्षी प्राण्यांची संख्या आणि जंगलातील अधिवासांचा ढासळता दर्जा ही खरी चिंता करण्याची
बाबत आहे. मध्य भारत, छत्तीसगड, मध्यप्रदेश, कर्नाटक या राज्यांप्रमाणेच इशान्य भारत व इतरत्र असाच चांगला अधिवास तयार झाल्यास वाघांची संख्या वाढेल. शिकारीपेक्षाही तृणभक्षी प्राण्याची संख्या नसणे हा अधिक काळजीचा विषय असल्याचे डॉ. कारंथ म्हणाले.

जगात वेगवेगळ्या देशांमध्ये वाघ आढळून येतो. आशिया आणि आशियाबाहेरील देशांचा अभ्यास केल्यास भारतातच वाघांचे संवर्धन सर्वात चांगल्या प्रकारे केले जाते. भारताने यात उत्तम यश मिळवले असल्याची पावतीही डॉ. कारंथ यांनी दिली.

एक वाघ नाही, प्रजाती महत्त्वाची
उमरेड-कऱ्हांडला येथील जय वाघाप्रमाणेच विविध प्रदेशात विविध वाघ लोकप्रिय ठरतात. अशा वाघांवर अधिकाधिक लक्ष केंद्रित केले जाते. मात्र, कोणत्याही एका वाघावर लक्ष केंद्रित करण्यापेक्षा संपूर्ण प्रजातीच्या संवर्धनासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे.

 एखादा वाघ लोकांसाठी त्रासदायक ठरत असल्यास त्या वाघाचा बंदोबस्त करणे जास्त महत्वाचे आहे, असेही या ज्येष्ठ वैज्ञानिकाने यावेळी बोलताना सांगितले. जय वाघाला रेडिओ कॉलर असतानाही त्याचा पत्ता लागू शकला नाही. त्यामुळे, रेडिओ कॉलरचा उपयोग आहे किंवा नाही याबाबत चर्चा सुरू झाली होती. मात्र, रेडिओ कॉलर ही आजघडीला सर्वात चांगली पद्धत असल्याचा निर्वाळा त्यांनी दिला. योग्य प्रकारे वापर झाल्यास रेडिओ कॉलरमुळे चांगली माहिती मिळू शकते, असेही डॉ. कारंथ म्हणाले.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹सौरउर्जेवरील घर निघाले चीनला

‘आयआयटी’च्या प्रकल्पाची डेकेथ्लॉनसाठी निवड

आपल्या विविध संशोधन आणि नावीन्यपूर्ण प्रकल्पांसाठी ओळखल्या जाणाऱ्या आयआयटी मुंबईच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेले सौरउर्जेवर चालणारे घर आता जगभराचे लक्ष वेधणार आहे. चीन येथे होणाऱ्या डेकेथ्लॉनसाठी या सौरउर्जेच्या घराची निवड झाली असून दोन हजार चौरस फूटांच्या या घराची निर्मिती आयआयटीच्या विविध शाळांतील ७० विद्यार्थ्यांचा समावेश असलेल्या ‘टीम शून्य’ने केली आहे.

प्रदूषणावर नियंत्रण आणण्यासाठी अमेरिकेच्या ऊर्जा विभागातर्फे दर दोन वर्षांनी डेकेथ्लॉनचे आयोजन करण्यात येते. कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी वीजनिर्मितीच्या पर्यायी व्यवस्थांच्या विचाराला प्रोत्साहन देण्यासाठी २००२मध्ये अमेरिकेच्या ऊर्जा विभागाने डेकेथ्लॉन या स्पर्धेचे आयोजन करण्यास सुरुवात केली. त्यानुसार यंदा ही स्पर्धा चीनमध्ये होणार असून त्यासाठी आयआयटीच्या टीम शून्यने हे घर तयार केले आहे.

जगभरातील विविध देशांमधून निवडक देशांतील प्रयोगांना अंतिम फेरीत प्रवेश दिला जातो. यापूर्वी २०१४मध्ये आयआयटीच्या टीम शून्यने उभारलेले सौरउर्जेचे घर युरोपमध्ये पार पडलेल्या स्पर्धेत सादर केले होते. यंदा ही स्पर्धा चीनमध्ये होणार असून यात अंतिम २२ चमूमध्ये ‘टीम शून्य’चा समावेश आहे.

टीम शू्न्यने तयार केलेल्या या घरात सर्व यंत्रणा सौरउर्जेवर काम करणाऱ्या असून यासाठी विशेष पदार्थांचा वापर करून घराच्या भिंती उभारण्यात आल्या आहेत. आंध्र प्रदेशमधील अमरावती येथे अशा प्रकारचे सौरऊर्जा शहर उभारण्याची योजना आखली जात आहे. या शहरात अशा प्रकारच्या घरांची उभारणी केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ‘रायटर बँक’

१६ जानेवारीपासून नोंदणी करण्याचे आवाहन

राज्यातील दिव्यांग विद्यार्थ्यांना बोर्डांच्या परीक्षेत वेळेवर लेखनिक मिळावा, यासाठी ‘रायटर बँक’ स्थापन करण्याची घोषणा शिक्षण विभागाने बुधवारी केली. या निर्णयानुसार सामान्य विद्यार्थ्यांप्रमाणे प्रौढ व्यक्तीही आता दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी लेखनिक होऊ शकणार आहेत.

मुंबईसह राज्यातील दिव्यांग विद्यार्थ्यांना परीक्षेदरम्यान लेखनिक मिळत नसल्याची तक्रार काही विद्यार्थ्यांनी शिक्षणमंत्र्यांकडे केली होती. त्यानुसार शिक्षण विभागाने या ‘रायटर बँक’ची घोषणा बुधवारी केली. अंध विद्यार्थी, अस्थिव्यंग, बहुविकलांग, अध्ययन अक्षमता, स्वमग्नता, सेरेबल पाल्सी आणि मतिमंद विद्यार्थ्यांना या ‘रायटर बँके’चा आधार मिळणार आहे. याबाबत जिल्हा, तालुका आणि केंद्र स्तरावर नियोजनाची सूचना देण्यात आली आहे.

येथे करा अर्ज
https://www.research.net/r/readerwriterbank या वेबसाइटवर याबद्दल अधिक माहिती देण्यात आली असून इच्छुकांनी १६ जानेवारीपासून यासाठी अर्ज सादर करण्याची सूचना शिक्षण विभागाने केली आहे.

इच्छुकांचे अर्ज भरून घेताना त्या शाळेच्या किंवा परिसराच्या जवळ असावा, दिव्यांग विद्यार्थ्यांची संबंधित लेखनिकांना पूर्व कल्पना देणे आवश्यक आहे, असे स्पष्ट करण्यात आले आहे. परीक्षेच्या एक महिना आधी लेखनिकास त्याची पूर्वकल्पना द्यावी, तसेच प्रौढ लेखनिक देताना तो विद्यार्थ्याचा नातेवाईक नसल्याची खात्री करून द्यावी, अशी तरतूदही करण्यात आली आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹नौदलाची ताकद वाढविण्यासाठी चीन प्रयत्नशील

दक्षिण चिनी समुद्रामधील सागरी सीमारेषेच्या वादासंदर्भात दक्षिण पूर्व आशियामध्ये असलेल्या राजनैतिक तणावाच्या पार्श्वभूमीवर चीनकडून आज (गुरुवार) एक महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आली.

चीनच्या नौदलामध्ये आणखी एका नव्या "इलेक्ट्रॉनिक रिकनेसन्स' नौकेचा समावेश करण्यात आल्याचे वृत्त येथील सरकारी मालकीच्या माध्यमांनी दिले आहे.

 याबरोबरच, चीनच्या सैन्यामध्ये आता अशा स्वरुपाच्या नौकांची संख्या एकूण सहा झाली आहे. सागरी मोहिमांसाठी आवश्यक असलेली गुप्त व संवेदनशील माहिती गोळा करण्याची क्षमता या नौकांमध्ये आहे. सीएनएस कैयांगशिंग वा मिझार असे नामकरण करण्यात आलेल्या या नौकेस क्विंगदाओ या पूर्व चीनमधील बंदराजवळ औपचारिकरित्या चिनी नौदलामध्ये समाविष्ट करण्यात आल्याचे, "चायना डेली'ने म्हटले आहे.

या नौकेबरोबरच चीनने एक विमानवाहु नौका बांधत असल्याची घोषणाही केली आहे. सध्या चिनी नौदलामध्ये लिओनिंग ही एकच विमानवाहु नौका आहे. लिओनिंग ही ही मूळची रशियन विमानवाहु नौका आहे.

दक्षिण चिनी समुद्र क्षेत्रात प्रवेश करणाऱ्या अमेरिकन व जपानी जहाजांवर चिनी नौदलाकडून नियमितरित्या लक्ष ठेवण्यात येत असल्याचे चीनने म्हटले आहे. दक्षिण चिनी समुद्राच्या 90 टक्क्यांपेक्षाही भागावर चीनने दावा सांगितला आहे. यामुळे दक्षिण पूर्व आशियामधील इतर देश व चीनमधील मतभेद अधिक तीव्र झाले आहेत. या पार्श्वभूमीवर दक्षिण चिनी समुद्र क्षेत्रात आक्रमक धोरण राबविण्यासाठी चीन प्रयत्नशील आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹हॉकीपटूंच्या समितीत श्रीजेशची निवड

आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाने (एफआयएच) खेळाडूंच्या समितीत भारताचा हॉकी कर्णधार पी. आर. श्रीजेश याची निवड केली आहे. आठ आजी-माजी खेळाडूंचा यात समावेश आहे. महासंघाच्या निर्णयप्रक्रियेत खेळाडूंच्या भूमिकेला वाव मिळावा हा यामागील उद्देश आहे.

श्रीजेशने सांगितले, की ही निवड एक बहुमान आहे. महान खेळाडू मॉरित्झ फ्युएर्स्टी आणि इतर नामवंतांचा या समितीत समावेश आहे. मी नव्या जबाबदारीसाठी उत्सुक आहे. आम्ही खेळाच्या विकासासाठी एकत्रित प्रयत्न करू. खेळाडूंसाठी महत्त्वाचे मुद्दे आणि सूचना मांडू. महासंघाने खेळाडूंना थेट सहभागी करून महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. आमचे प्रशिक्षण दल आणि संघाच्या वतीने मी माझ्या सूचना मांडेन. या नव्या जबाबदारीसाठी त्यांची साथ मिळेल याची खात्री आहे.

महासंघाने अनेक ठिकाणी राष्ट्रीय संघांसह बैठकांचे आयोजन केले आहे. या समितीला आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीचा क्रीडापटू आयोग आणि इतर संघटनांशी संवाद साधून माहिती आणि संशोधनाची देवाणघेवाण करावी लागेल. आरोग्य, कल्याण, कारकिर्दीची तयारी आणि व्यवस्थापन, डोपिंग-सट्टेबाजी-मॅच-फिक्सिंगला विरोध अशा अनुषंगाने समितीला काम करावे लागेल.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹उत्तर-पूर्व भागातील लोकांचे पार्थिव त्यांच्या राज्यात इंडिगो मोफत नेणार

देशाच्या राजधानीमध्ये मृत्यूमुखी पडलेल्या उत्तर पूर्वी भागातील नागरिकांचे पार्थिव त्यांच्या गावी मोफत नेण्याचा निर्णय इंडिगो या एअरलाइन्सने घेतला आहे. ‘आखरी आहुती’ असे या सेवेचे नाव असून दिल्लीत काम करणाऱ्या उत्तर पूर्वी भागातील लोकांच्या नातेवाईकांना ही सेवा मोफत मिळणार आहे. दिल्लीतून आपल्या गावी आपल्या नातेवाइकाचे पार्थिव नेणे ही बाब अवघड ठरते आणि त्यामध्ये अनेक अडचणी येतात. म्हणून इंडिगोने पुढाकार घेऊन ही सेवा सुरू केली आहे. दिल्ली पोलिसांनी ज्या व्यक्तींचे पार्थिव नेण्याची शिफारस केली केवळ त्यांनाच ही सेवा मिळू शकेल. केवळ गरीब कुटुंबातील व्यक्तींनाच शिफारस मिळेल असे दिल्ली पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

दिल्लीमध्ये उत्तर पूर्वी भागातून लोक कामासाठी येतात. या भागातून येणाऱ्यांची संख्या खूप आहे. दिल्ली ते उत्तर पूर्वी भागात जाण्यासाठी रेल्वेने खूप वेळ लागतो तसेच भरपूर खर्चही होतो. त्यामुळे कित्येकदा असे प्रसंग आले आहेत की नातेवाइकांच्या अनुपस्थितीमध्येच पोलिसांना किंवा स्वयंसेवी संस्थांना त्या व्यक्तींचे अंत्यसंस्कार करावे लागले आहे. पैशांअभावी या भागातील लोकांचा आपल्या गावी अंत्यसंस्कार होत नाही. ही अत्यंत दुःखाची बाब आहे असे पोलिसांनी आपल्या प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे.

गरिबांसाठी आम्ही काही करू शकत आहोत याचे आम्हाला समाधान असल्याची भावना इंडिगोच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. ही सेवा करण्याची संधी आम्हाला दिल्ली पोलिसांनी दिली याबद्दल आम्ही त्यांचे ऋणी आहोत. दिल्ली पोलिसांच्या भागीदारीने ही समाजसेवा करण्याची संधी मिळाली याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे असे इंडिगोचे अध्यक्ष आणि पूर्ण वेळ संचालक आदित्य घोष यांनी म्हटले. उत्तर पूर्वी भागातील अगरतळा, दिब्रूगड, दिमापूर, गुवाहाटी आणि इम्फाळ या ठिकाणी इंडिगोची विमानसेवा कार्यरत आहे.

दिल्लीहून आपल्या गावी विमानाने पार्थिव नेणे ही खर्चाची बाब आहे तेव्हा या भागातील गरिब लोकांसाठी इंडिगोनी ही सेवा सुरू केली ही कौतुकास्पद बाब असल्याचे सह-पोलीस आयुक्त रॉबिन हिबू यांनी म्हटले. इंडिगोने उचललेले हे पाऊल म्हणजे आर्थिक आणि भावनिक स्तरावर केलेले मोठे सहकार्य आहे अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹उषा किरण बनली नक्षलग्रस्त भागातील पहिली महिला CRPF अधिकारी

बस्तरच्या नक्षलग्रस्त भागात एकदा गेले की जिवंत परतण्याची शक्यता धुसर, सतत नक्षलवादीयांसोबत सीआरपीएफ जवानांची चमकम सुरू असते. रस्त्यात कुठे सुरंग पेरलेले असतात तर कधी छुपे हल्ले होण्याची शक्यता असते अशा वेळी जिवंत परण्याची शाश्वती नसते. पण या बस्तरच्या भागात पहिल्यांदाच एका महिलेची CRPF अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

हरियाणाच्या उषा किरण हिची नक्षल प्रभावित बस्तर भागात नियुक्ती करण्यात आली. या भागात CRPF जवान म्हणून आलेली उषा किरण ही पहिली महिला आहे. ३३२ महिला बटालियनच्या नियुक्तीवेळी तिने बस्तरची सेवेसाठी निवड केली. खरतर या नक्षलग्रस्त भागात एका महिलेने काम करणे धोक्याचे आहे. पण वडिलांपासून प्रेरणा घेत आपण या भागात सेवा करण्याचे ठरवले असे तिने सांगितले. उषाचे वडिल देखील CRPF जवान आहेत. तर तिचे आजोबा देखील CRPF जवान होते.

बस्तरच्या भागातील एक अनुभव देखील तिने सांगितला. बस्तरमध्ये पहिल्यांदा महिलेची CRPF जवान म्हणून नियुक्ती झाल्याचे कळताच इथल्या महिलांनी आपले उत्साहात स्वागत केले असेही तिने सांगितले.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹‘ऑनलाइन ७/१२’ तयार करण्यात नाशिक आघाडीवर, मुख्यमंत्र्यांनी केले कौतुक

हस्तलिखित व संगणकीकृत सातबारा यामधील साम्य अथवा तफावत तपासणी करून त्यात आवश्यक सुधारणा करण्याचे काम राज्यस्तरावर सुरु आहे. नाशिक जिल्ह्यात एकूण १२ लाख १९ हजार ५५६ सातबारे आहेत. त्यापैकी ७ लाख २२ हजार ४२९ (५९.२४%) सातबारे एडीट मोड्यूलमध्ये तपासून व आवश्यक त्या दुरुस्त्या करून अंतिम करण्यात आले आहे.

ही राज्यातील सर्वात मोठी आकडेवारी ठरल्याने नाशिकने राज्यात प्रथम स्थान पटकावले आहे. हे सर्व सातबारे राज्य शासनाच्या ७/१२ ‘आपले सरकार’ या पोर्टलवर उपलब्ध असल्याचे नाशिकचे जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेच्यावेळी ते बोलत होते.

या पोर्टलद्वारे खातेदार शेतकरी तथा सर्वसामान्य नागरिकांना ऑनलाइन पद्धतीने संगणकीकृत (डिजिटल सिग्नेचर) असलेला सातबारा आता घरबसल्या उपलब्ध होणार आहे. याकरिता नागरिकांना २३ रुपये शुल्क भरावे लागणार आहे. प्रत्यक्ष जाऊन १० रुपये भरून रांगेत उभे राहत प्रतीक्षा करणे, ४-५ चकरा मारणे या जाचातून नागरिकांची १३ रुपये जास्त अदा करून सुटका यामुळे होणार आहे. जिल्ह्यातील सर्व सेतू केंद्र तसेच महा इ सेवा केंद्र येथून उपलब्ध होणार असून याकरिता https://aaplesarkar.mahaonline.gov.in या वेबसाईट वरून आणि ‘Digital 7/12’ या महाऑनलाईनच्या मोबाईल अॅप्लिकेशनवरून देखील घरबसल्या नागरिकांना हे ७/१२ उपलब्ध करून घेता येणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे नाशिक व वर्धा या दोन जिल्ह्यात डिजिटल सिग्नेचर असलेला सातबारा वितरीत करण्यात आला. नाशिकपासून या वितरणाची सुरवात राज्यात प्रथम झाली. मुख्यमंत्री फडणवीस यांना या वेळी नाशिकने आघाडी घेतल्याने त्यांचे कौतुक केले
गेल्या डिसेंबर महिन्यात २३,२३४ डिजिटल सिग्नेचर दाखले केवळ एकाच महिन्यात तयार झाले असल्याची माहिती जिल्हाधिका-यांनी दिली. १६ प्रकारचे प्रमाणपत्र आम्ही ऑनलाइन पद्धतीने वाटप करत असून यामध्ये नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र डिजिटल सिग्नेचरसह विद्यार्थ्यांना मिळणार आहे.

यामुळे मे-जून महिन्यात विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी या सुविधेचा लाभ होणार असून त्यांची नेहमीप्रमाणे होणारी धावपळ आता बऱ्याच अंशी कमी होणार असल्याचेही ते यावेळी म्हणाले. या वेळी उपजिल्हाधिकारी (प्रशासन) शशिकांत मंगरुळे व निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांनीही याबाबत सविस्तर माहिती दिली.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹पोहराच्या जंगलात पुन्हा वाघांचे अस्तित्व

अधिवास व संचारमार्गाच्या सुरक्षेची मागणी

अमरावती जिल्ह्यतील पोहरा राखीव जंगलात पुन्हा दोन वाघांचे अस्तित्व दिसून आले आहे. यापूर्वीही या जंगलात बोर व्याघ्रप्रकल्पातून वाघ स्थलांतर करून आला होता. मात्र, त्याचे अस्तित्व केवळ काही महिनेच होते. यानिमित्तने जंगलातील वाघांचा अधिवास आणि त्यांच्या संचार मार्गाच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

पोहरा मालखेडच्या जंगलातील व्याघ्र इतिहास जुना आहे. इंग्रजांनी त्यांच्या काळात शास्त्रीय दृष्टीकोनातून ज्या जंगलांचा अभ्यास केला, त्यात पोहरा मालखेडचाही समावेश आहे. त्यावेळी त्यांनी शिकारीसाठी हे जंगल राखीव केले होते. स्वातंत्र्योत्तर कालखंडानंतर काही काळ या जंगलाचा हा दर्जा कायम होता १९८५ पर्यंत या जंगलात वाघांचे अस्तित्व होते, पण त्यानंतर २०११ पर्यंत या जंगलात वाघांच्या अस्तित्वाची कोणतीही नोंद नाही. २०११ पासून पुन्हा या जंगलात वाघांच्या पाऊलखुणा आढळल्या, पण त्याला आधार नव्हता. २०१३ पासून कॅमेरा ट्रॅप व इतर यंत्रणांच्या माध्यमातून पाहणी सुरू झाली आणि ऑक्टोबर २०१४मध्ये त्यात वाघाचे छायाचित्र आले. २०१५ मध्ये बोर व्याघ्रप्रकल्पातून १७० किलोमीटर अंतरचे जंगल पार करुन वाघ या जंगलात आल्याचे सिद्ध झाले आणि फेब्रुवारी २०१६ पर्यंत त्याचे अस्तित्व कायम होते. साडेतीन ते चार वषार्ंचा नर वाघ असल्याचे त्यावेळी सिद्ध झाले. नंतर वाघाच्या कोणत्याही पाऊलखुणा या परिसरात आढळल्या नाहीत.

नोव्हेंबरमध्ये पुन्हा एकदा वाघाची चर्चा सुरू झाली. त्यामुळे बोर व्याघ्र प्रकल्पातून आलेल्या वाघाच्या संदर्भात जे वन्यजीव व्यवस्थापन या ठिकाणी राबवण्यात आले तोच कित्ता आताही गिरवण्यात आला. पाऊलखुणा दोन वेगवेगळया वाघांच्या असल्या तरीही कॅमेरा ट्रॅपमध्ये एकाच वाघाचे छायाचित्र आले आहे. मात्र, वाघ एक की दोन हा मुद्दा यावेळी महत्त्वाचा नसून बोरमधून स्थलांतरण करून आलेला वाघ आता कुठे गेला आणि तो पुढे कुठे जाईल? डिसेंबरच्या अखेरीस आणि जानेवारीच्या मध्यात आढळलेला वाघ बोरमधून आला की टिपेश्वरमधून? हे देखील वनखात्याला पाहावे लागणार आहे. तसेच बोर आणि मेळघाटमधला हा महत्त्वाचा संचारमार्ग असल्यामुळे त्याच्या सुरक्षेकडे अधिक लक्ष देण्याची मागणी वन्यजीव अभ्यासकांकडून केली जात आहे.

छायाचित्रे बोर व्याघ्र प्रकल्प व्यवस्थापनाकडे पोहऱ्यात वाघाचे अस्तित्व आढळले आहे आणि कॅमेरा ट्रॅपमध्ये त्याचे छायाचित्रही आले आहे. हा वाघ कोणत्या ठिकाणी फिरतो आहे त्यावर आमचा चमू लक्ष ठेवून आहे. अलीकडेच बोर व्याघ्र प्रकल्पातून एक वाघ स्थलांतर करून आल्यामुळे हा वाघ सुद्धा तेथूनच तर आला नाही ना, याकरिता कॅमेरा ट्रॅपमधील वाघाची छायाचित्रे बोर व्याघ्र प्रकल्प व्यवस्थापनाकडे पाठवण्यात आली आहेत, असे अमरावती वनविभागाचे उपवनसंरक्षक हेमंत मीना म्हणाले.

अभ्यासाचा विषय

पोहरा-मालखेड जंगलाचा वाघाचा इतिहास, दरम्यानच्या काळात वाघांचे अस्तित्व नाहीसे होणे आणि आता पुन्हा एकदा गेल्या पाच-सहा वर्षांपासून या जंगलात वाघांचे येणे आणि जाणे हा अभ्यासाचा विषय आहे. या जंगलातील वाघाच्या अस्तित्वाच्या पाऊलखुणा, पण त्याचे काही काळापुरतेच मर्यादित असलेले अस्तित्त्व पाहता वाघांचा अधिवास आणि त्यांच्या संचार मार्गाची सुरक्षा हा सध्या महत्त्वाचा विषय असल्याचे, वन्यजीव अभ्यासक यादव तरटे पाटील म्हणाले.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹भारतीय नौदलाची ताकद वाढली, अचूक क्षेपणास्त्र डागणारी ‘खांदेरी’ पाणबुडी तैनात

स्कॉर्पिअन श्रेणीची दुसरी पाणबुडी आयएनएस खांदेरीचे गुरूवारी लोकार्पण करण्यात आले. या पाणबुडीला डिसेंबर २०१७ मध्ये अनेक कठीण चाचण्यांना सामोरे जावे लागले. स्कॉर्पिअन पाणबुड्या या डिझेल आणि विजेवर चालतात. प्रामुख्याने याचा उपयोग युद्धात केला जातो. त्याचबरोबर यावरून शत्रूवर क्षेपणास्त्र अचूकपणे डागता येईल. हल्ला करण्यासाठी यामध्ये पारंपारिक टोरपॅडो शिवाय ट्यूब लाँच जहाजविरोधक क्षेपणास्त्रही आहे. जी पाण्यातून व पाण्याबाहेरूनही प्रक्षेपित करता येऊ शकते. माझगाव डॉकयार्ड येथे आयोजित एका कार्यक्रमात संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे, नौदलप्रमुख सुनील लांबा यांची या वेळी प्रमुख उपस्थिती होती.

ही पाणबुडी उष्णकटिबंधीय वातावरणासह कोणत्याही परिस्थितीत सक्षमपणे कार्य करू शकते. संवाद साधण्यासाठी या पाणबुडीत अत्याधुनिक यंत्रणा कार्यान्वीत करण्यात आली आहे. फ्रान्सची मेसर्स डीसीएनएस कंपनी आणि माझगाव गोदी यांनी संयुक्तरित्या या पाणबुडीची बांधणी केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी समुद्रावर प्रभुत्व ठेवण्यासाठी खांदेरी बेटावर केलेल्या लढायांची स्मृती जपण्यासाठी पाणबुडीला खांदेरी हे नाव देण्यात आले आहे.

भारतीय नौदलात स्कॉर्पिअन श्रेणीची पहिली पाणबुडी ही ६ डिसेंबर १९८६ साली सामील झाली होती. सुमारे २० वर्षे सेवा केल्यानंतर या पाणबुडीला निरोप देण्यात आला होता.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹दिल्लीच नव्हे तर देशातील अनेक छोटी शहरे प्रदूषणाच्या विळख्यात

देशातील प्रदूषणाचा स्तर अतिउच्च स्तरावर पोहोचला आहे. प्रदूषणात दिल्ली २६८ मायक्रोग्रॅम प्रति घन मीटरसह अग्रस्थानी आहे. त्यानंतर उत्तर प्रदेशमधील गाझियाबाद, अलाहाबाद, बरेली, कानपूर तसेच हरियाणातील फरिदाबाद, झारखंडमधील झरिया, रांची, कुसेदा, बस्ताकोला आणि बिहारमधील पाटणा या शहरांचा समावेश होतो.

ग्रीनपीस इंडियाने ऑनलाइन अहवाल आणि माहिती अधिकारांतर्गत देशभरातील विविध राज्यातील प्रदूषण नियामक मंडळाकडून मिळवलेल्या माहितीवर आधारित अहवाल बनवला आहे. यामध्ये दक्षिण भारतातील काही शहरे वगळता देशातील कोणत्याही शहरांनी जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) आणि केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने (सीपीसीबी) प्रदूषण नियंत्रणासाठी बनवलेल्या मानकांचे पालन न केल्याचे समोर आले आहे. २४ राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशातील १६८ शहरांच्या स्थितीवर ग्रीनपीस इंडियाने या अहवालात वायू प्रदूषणाला ‘फैलावणारे विष’ असे नाव दिले आहे. यामध्ये प्रदूषणाचे मुख्य कारण हे जीवाश्म इंधन असल्याचे सांगण्यात आले आहे.

ग्रीनपीसचे समन्वयक सुनील दाहिया म्हणाले, वायू प्रदूषणामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या ही तंबाखू सेवनामुळे होणाऱ्या मृत्यूंपेक्षा कमी नाही. देशातील सर्वाधिक २० प्रदूषित शहरातील २०१५ मध्ये वायू प्रदूषणाचा स्तर हा पीएम १० (२) २६८ मायक्रोग्रॅम प्रती घनमीटर ते १६८ मायक्रोग्रॅम प्रती घन मीटरच्या दरम्यान आहे. यामध्ये २६८ मायक्रोग्रॅम प्रति घन मीटरसह दिल्ली क्रमांक एकवर आहे. त्यानंतर गाझियाबाद, अलाहाबाद, बरेली, कानपूर, फरिदाबाद, झरिया, रांची कुसेंदा, बस्ताकोला, पाटणा शहरांचा प्रदूषण स्तर हा १०, २५८ मायक्रोग्रॅम प्रति घन मीटर ते २०० मायक्रोग्रॅम प्रति घन मीटर आहे.

कोळसा, पेट्रोल, डिझेलसारख्या जीवाश्म इंधनामुळे प्रदूषण वाढल्याचे अहवालात म्हटले आहे. सीपीसीबीकडून मिळालेल्या माहितीनुसार उत्तर भारतातील शहरे सर्वाधिक प्रदूषित आहेत.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी आशिष शेलार

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर शरद पवार यांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर आज मुंबई क्रिकेट असोसिएशच्या अध्यक्षपदी भाजपचे मुंबई प्रदेश अध्यक्ष आशिष शेलार यांची निवड करण्यात आली.

मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या कार्यकारिणीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष होते. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर शरद पवारांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्षपद रिक्त राहिले होते. मात्र, आज झालेल्या मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या कार्यकारिणीच्या बैठकीत आशिष शेलार यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली.

दरम्यान, माजी कसोटीपटू दिलीप वेंगसरकर यांची मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹एअर इंडियाच्या विमानातही महिलांना आरक्षण

 भारताची राष्ट्रीय हवाई कंपनी असलेल्या एअर इंडियाच्या विमानांमध्ये महिलांसाठी राखीव आसने ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या १८ जानेवारीपासून देशांतर्गत प्रवास करणाऱ्या विमानांमध्ये या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येईल. महिलांच्या सुरक्षिततेसाठी विमानाच्या पुढच्या भागातील दोन रांगा किंवा सहा आसने आरक्षित करण्यात आली आहेत. यासाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही, अशी माहिती एअर इंडियाचे अध्यक्ष आणि कार्यकारी संचालक अश्वानि लोहानी यांनी दिली. जगात पहिल्यांदाच अशाप्रकारे कोणत्याही विमानांमध्ये महिलांसाठी आसने राखीव ठेवण्यात येणार आहेत.

 भारतामध्ये सध्या रेल्वे, मेट्रो, बस प्रवासामध्ये महिलांसाठी राखीव आसने किंवा डब्ब्यांची सोय आहे. याशिवाय, गुरगाव आणि नोएडा येथे तर महिलांसाठी आरक्षित असलेल्या गुलाबी रंगाच्या रिक्षा सुरू करण्यात आल्या होत्या. दरम्यान, एअर इंडियाच्या विमानांमध्ये देण्यात येणारे हे आरक्षण इकॉनॉमी क्लासपुरते मर्यादित असेल. राष्ट्रीय विमान कंपनी म्हणून महिला प्रवाशांना अधिक सुलभ आणि सुरक्षितरीत्या प्रवास करता यावा, असे आम्हाला वाटते. सध्या अनेक महिला विमानाने एकट्याने प्रवास करतात, असे एअर इंडियातर्फे सांगण्यात आले.
गेल्या महिन्यात एअर इंडियाच्या मुंबईहून न्यूयॉर्कला जाणाऱ्या विमानात एका महिलेशी गैरवर्तन झाले होते. यावेळी बिझनेस क्लासमधील एक प्रवासी इकॉनॉमी क्लासमध्ये बसलेल्या महिलेच्या शेजारी जाऊन बसला. त्यानंतर ती झोपली असताना या प्रवाशाने तिच्याशी गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला. या पार्श्वभूमीवर एकट्याने विमान प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षिततेसाठी एअर इंडियाने हा निर्णय घेतल्याची शक्यता आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून विमानातील सेवा आणि सुविधांच्या दर्जावरून एअर इंडियाला टीकेला सामोरे जावे लागत आहे. प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या सुविधा, विमानांच्या पाळल्या जाणाऱ्या वेळा यांच्या आधारे फ्लाईटस्टॅट्सने सर्वोत्तम सेवा देणाऱ्या कंपन्यांची यादी तयार करण्यात आली आहे. विमानांच्या वेळा न पाळण्याच्या, चांगल्या सुविधा न देणाऱ्या कंपन्यांच्या यादीत एअर इंडिया तिसऱ्या क्रमांकावर आहे. एअर इंडियाचे वेळ न पाळण्याचे प्रमाण तब्बल ३८.७१% इतके आहे. या यादीत एल अल ही इस्रायली कंपनी पहिल्या क्रमांकावर आहे. एल अल कंपनीच्या विमानांच्या वेळा न पाळण्याचे प्रमाण ५६% आहे. तर या यादीत आईसलँडएअर कंपनी (४१.०५%) दुसऱ्या क्रमांकावर आहे.

एअर इंडियानंतर या यादीत चौथ्या क्रमांकावर फिलीपाईन्स एअरलाईन्स (३८.३३%), पाचव्या क्रमांकावर एशियाना एअरलाईन्स (३७.४६%), सहाव्या क्रमांकावर चायना इस्टर्न एअरलाईन्स (३५.८%), सातव्या क्रमांकावर हाँगकाँग एअरलाईन्स (३३.४२%), आठव्या क्रमांकावर एअर चायना (३२.७३%), नवव्या क्रमांकावर कोरियन एअर (३१.७४%) तर दहाव्या क्रमांकावर हेनन एअरलाईन्स (३०.०३%) या कंपन्या आहेत.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹नोटाबंदीतून मंदीछाया; जागतिक बँकेचाही कयास

भारताच्या सकल राष्ट्रीय उत्पादनावर निश्चलनीकरणाचा परिणाम होणार असल्याच्या तमाम वित्तीय संस्था आणि अर्थतज्ज्ञांच्या प्रतिपादनावर शिक्कामोर्तब करताना जागतिक बँकेने चालू आर्थिक वर्षांतील विकास दर ७ टक्क्यांवर खाली आणला आहे. जागतिक बँकेचे २०१६-१७ साठी अर्थवृद्धीचे पूर्वानुमान ७.६ टक्के होते.

नोव्हेंबर व डिसेंबर २०१६ मध्ये राबविलेल्या निश्चलनीकरणाचा विपरीत परिणाम २०१६-१७च्या विकास दरावर होण्याची शक्यता वर्तवितानाच एप्रिल २०१७ नंतरचे काही महिनेही देशातील आर्थिक वातावरण अस्थिर राहील, असे जागतिक बँकेच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. २०१७-१८ व त्यापुढील काही आर्थिक वर्षांत मात्र विकास दर ७.६ ते ७.८ टक्के राहण्याची आशा आहे.

चलनातून जुन्या नोटा बाद करणे व नव्या नोटांचा पुरवठा सुरळीत नसणे ही बाब अर्थव्यवस्थेचा वेग मंदावण्यासाठी कारण ठरल्याचे तिने नमूद केले आहे.
 नोटाबंदीनंतर जागतिक बँकेचा हा विकास दराबाबतचा पहिला अहवाल आहे. आव्हानात्मक काळ असला तरी खनिज तेलाच्या कमी किमती आणि कृषी क्षेत्रातील वाढ आशादायक असल्याचे अहवालाने म्हटले आहे. देशांतर्गत वस्तू पुरवठय़ाबाबतचे अडथळे नाहीसे करणे, उत्पादनवाढीसाठी सरकारद्वारे आर्थिक सुधारणा राबविल्या जातील, अशी आशा आहे. बँकांकडे उपलब्ध अतिरिक्त रोकड व्याजदर कमी करण्यास बँकांना भाग पाडतील. यामुळे अर्थस्थितीला ऊर्जितावस्था प्राप्त होईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

जागतिक वृद्धी २.७ टक्के
आपल्या अहवालात जागतिक बँकेने जागतिक वृद्धी दर २.७ टक्के असेल, असे म्हटले आहे. २०१७ बाबतचे हे आशादायक चित्र मानले जाते. २०१७ मध्ये जागतिक अर्थव्यवस्था अस्थिर राहिली तरी २०१६ मधील २.३ टक्क्यांच्या तुलनेत जागतिक विकास दर अधिक असेल, असे नमूद करण्यात आले आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹‘अय्यो’सह १२ भारतीय शब्द आॅक्सफर्ड डिक्शनरीत

भारतीय चित्रपट आणि गाण्यांमध्ये येणाऱ्या अय्यो या शब्दासह १२ भारतीय शब्दांचा आॅक्सफर्ड डिक्शनरीत समावेश करण्यात आला आहे. आॅक्सफर्ड डिक्शनरीत भारतीय शब्द समाविष्ट होण्याची ही पहिली वेळ नाही. भारतीय खाद्यपदार्थांच्या जागतिक लोकप्रियतेमुळे यापूर्वीही अनेक भारतीय शब्दांना या डिक्शनरीत स्थान मिळाले आहे. आॅक्सफर्डमध्ये स्थान मिळालेले १२ भारतीय शब्द आणि त्यांचे अर्थ पुढीलप्रमाणे.

अय्यो

अय्यो या शब्दाचा अर्थ अय्या वा अरेच्चा असा आहे. दक्षिण भारतीय भाषांत दु:ख, आनंद, आश्चर्य भावना व्यक्त करण्यासाठी या शब्दाचा वापर केला जातो.

बदमाश

बदमाश हा शब्द उर्दूतून आला आहे. पर्शियन बद (दुष्ट) आणि अरेबिक माश (जगण्याची पद्धत) याच्या संकरातून हा शब्द तयार झाला आहे.

चुडीदार

चुडीदार या शब्दाचा इंग्रजीतील वापर १८८० मध्ये पहिल्यांदा आढळून आला होता. हा शब्द अधिकृतरीत्या इंग्रजी भाषेत समाविष्ट होण्यासाठी १३५ वर्षे लागली.

पक्का

पक्का हा भारतीय शब्द आहे. डिक्शनरीत या शब्दाचे दिलेले अर्थ अस्सल, उत्कृष्ट आणि योग्य असे आहेत. भारतात शिजलेला, पिकलेला वा लबाड या अर्थानेही पक्का हा शब्द वापरला जातो.

भेळपुरी, चटणी, घी

(शुद्ध तूप), ढाबा, मसाला, पुरी हे शब्दही आॅक्सफर्ड डिक्शनरीमध्ये आले आहेत. दीदी या शब्दानेही स्थान मिळवले आहे. यानंतर आॅक्सफर्डमध्ये लवकरच भैया या शब्दाचाही समावेश होईल, अशी चिन्हे आहेत. मित्र-मैत्रिणीला वा प्रियकराला सर्रास यार म्हटले जाते. इतकेच काय, अरे यार, असे सहजपणे म्हटले जाते. तो यारही आॅक्सफर्डमध्ये जमा झाला आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹नेदरलँडमध्ये वा-यावर धावतायत ट्रेन्स

नेदरलँडमध्ये वा-यावर ट्रेन धावत आहे असं सांगितलं तर तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. पण विश्वास ठेवा हे खरं आहे. नेदरलँडमध्ये पवनचक्कीच्या माध्यमातून निर्माण करण्यात येणा-या ऊर्जेवर ट्रेन्स धावत आहे. नॅशनल रेल्वे कंपनी एनएसने ही माहिती दिली आहे. 'एक जानेवारीपासून आमच्या 100 ट्रेन्स वा-यावर धावत आहेत', अशी माहिती प्रवक्ता टॉन बून यांनी दिली आहे.

एनएसने दोन वर्षांपूर्वी टेंडर जाहीर केलं होतं. डचमधील इलेक्ट्रिक कंपनी इनेकोने हे टेंडर जिंकलं होतं. यानंतर दोघांमध्ये 10 वर्षांचा करार झाला. यामध्ये सर्व ट्रेन्स वा-यामधील तील ऊर्जेवर चालवण्याचा करार झाला होता, यासाठी जानेवारी 2018 ची सीमारेषा आखण्यात आली होती.

'तसं पाहायला गेल्यास आम्ही एक वर्ष आधीच आमचं ध्येय पुर्ण केलं आहे', असं टॉन बून बोलले आहेत. 'देशभरात वाढणा-या पवनचक्क्या आणि नेदरलँडला लाभलेल्या सागरी किना-यामुळे हे ध्येय वेळेच्या आधी पुर्ण करण्यात यश मिळाल्याचंही', ते बोलले आहेत.

रोज एकूण सहा लाखांहून जास्त प्रवासी वा-यावर चालणा-या या ट्रेन्समधून प्रवास करतात. वा-यातून निर्माण केलेल्या ऊर्जेवर चालणा-या ट्रेनमधून प्रवास करणारे ते पहिले प्रवासी आहेत. अर्धा तास पवनचक्कीच्या माध्यमातून मिळालेल्या ऊर्जेवर ट्रेन किमान 120 किमी अंतर पार करते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा