Post views: counter

Current Affairs January 2017 Part- 4

🔰 Current Affairs Marathi 🔰:
#eMPSCkatta_Current_Affairs

🔹बावीस टक्के विद्यार्थ्यांनाच येतो भागाकार

राज्यातील शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेणारा "प्रथम' या शिक्षण संस्थेचा अहवाल बुधवारी प्रसिद्ध झाला असून, या पाहणीत विद्यार्थ्यांची गणिताबाबत घाबरगुंडी उडत असल्याचे दिसून आले आहे. 2016 च्या या अहवालात केवळ 22 टक्के विद्यार्थी भागाकार करू शकतात, असे समजले. ही भयावह स्थिती शैक्षणिक प्रगतीत मोठा अडथळा असल्याचे "प्रथम'च्या संचालिका उषा राणे यांनी सांगितले.

"महाराष्ट्र असर 2016' हा अहवाल शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या उपस्थितीत सादर झाला. देशातील ग्रामीण भागात मुले शाळेत जातात का? त्यांना वाचन करता येते का? आणि सोपी गणिते सोडवता येतात का? याची पाहणी करण्यात आली. 3 ते 16 या वयोगटातील मुलांचे हे सर्वेक्षण होते. 5 ते 16 वयोगटातील मुलांची गणित आणि वाचनाची चाचणी घेण्यात आली. बुधवारी पत्रकार परिषदेत अहवालाचा लेखाजोखा मांडण्यात आला.

राज्यात 6 ते 14 वयोगटातील शाळेत जाणाऱ्या मुलांचे प्रमाण 99.1 टक्के आहे. पाच वर्षांखालील 96 टक्के मुले बालवाडी-अंगणवाडीत जात आहेत, असे दिसून आले. वाचनात जिल्हा परिषदेच्या शाळांतील विद्यार्थ्यांनी खासगी शाळांना मागे टाकले आहे. जिल्हा परिषदेच्या 41.2 टक्के आणि खासगी शाळांतील 38.8 टक्के तिसरीतील मुले दुसरीच्या स्तरावरील वाचन करू शकतात. राज्यात पहिलीतील मुलांच्या वाचनात 60.7 टक्के सुधारणा दिसून आली. देशात हे प्रमाण 53.9 टक्के आहे.



इतर राज्यांच्या तुलनेत पहिली ते पाचवीतील उपस्थितीही महाराष्ट्रात जास्त आहे. "प्रथम'ने राज्यात सर्वेक्षण केले त्या दिवशी सरासरी 85.1 टक्के उपस्थिती होती. देशात या सर्वेक्षणाच्या वेळी सरासरी 71.4 टक्के उपस्थिती होती. याच इयत्तांमधील शिक्षकांची सरासरी उपस्थिती 91.8 टक्के होती.

मुलींच्या प्रसाधनगृहांच्या संख्येत यंदा 62.5 टक्के वाढ झाली आहे. 2010 मध्ये केवळ 43.2 टक्के प्रसाधनगृहे होती. सहा वर्षांच्या तुलनेत माध्यान्ह भोजनातही चार टक्के वाढ दिसून आली. 2016 मध्ये 94.5 टक्के शाळांत माध्यान्ह भोजन दिल्याचे दिसून आले.

गणिताचा स्तर खालावलेला

जिल्हा परिषद शाळा आणि खासगी शाळांत तिसरी इयत्तेतील अनुक्रमे 22 व 29 टक्के मुले वजाबाकी करू शकतात. ही आकडेवारी इतर राज्यांच्या तुलनेत समाधानकारक नाही. जिल्हा परिषदेच्या शाळांतील पाचवीच्या 29 टक्के मुलांना आणि खासगी शाळांतील 17 टक्के मुलांना वजाबाकी येते. हिमाचल प्रदेश, तमिळनाडू यांच्याशी तुलना केली तर हे प्रमाण खूपच कमी आहे. बिहारसारखे राज्यही गणितात पुढे आहे.

🔹कॉम्रेड पी. बी. कडू पाटील यांचे निधन

एकेकाळी संपूर्ण नगर जिल्ह्यात कम्युनिस्ट पक्षाचा दबदबा निर्माण करणारे ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक आणि राहुरीचे माजी आमदार कॉम्रेड पुंजाजी बापूजी अर्थात पी. बी. कडू पाटील यांचे गुरुवारी त्यांच्या सात्रळ या गावातील निवास्थानी निधन झाले. ते ९७ वर्षांचे होते. शेतकरी, शेतमजूर आणि पाटपाण्याच्या प्रश्नासाठी लढणाऱ्या नेत्याला अखेरचा ‘लाल सलाम’ करण्यासाठी हजारोंची गर्दी उसळली होती. त्यांच्या मागे रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागाचे अध्यक्ष अरुण कडू, विजय, डॉ. विलास ही मुले, उषा, लता, मीना, मंगल या विवाहित मुली तसेच सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

सात्रळ,सोनगाव, धानोरे, पाथरे, हनुमन्त गाव या पंचक्रोशीतील गावांनी दिवसभर बंद पाळून आदरांजली वाहिली. पी.बी. कडू पाटील यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात महात्मा गांधी यांच्या ‘चले जाव’ चळवळीत सहभाग घेतला होता. कॉम्रेड डांगे यांच्या प्रभावाखालील कम्युनिस्ट पक्षाकडे ते वळले आणि अखेरपर्यंत लाल निशाणाखालीच त्यांनी कार्य केले. १९७२ मध्ये ते राहुरी विधानसभा मतदारसंघातून कम्युनिस्ट पक्षाचे आमदार म्हणून निवडून आले होते.

सायंकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी स्नेहलता कोल्हे, आमदार शिवाजी कर्डिले, बबनराव पाचपुते, अण्णासाहेब म्हस्के, शालिनीताई विखे, चंद्रशेखर घुले, दादा कळमकर, दादा पाटील शेळके, सुरेंद्र गांधी, प्राजक्त तनपुरे, डॉ. सुजय विखे, दुर्गाताई तांबे, डॉ राजेंद्र पिपाडा, सिद्धार्थ मुरकुटे आदी नेते उपस्थित होते. रयत संकुलात येत्या सोमवारी सकाळी शोकसभा होणार आहे.

पी. बी. कडू पाटील यांच्या निधनाने विचारांशी बांधिलकी जपणारा नेता गमावला आहे. ‘रयत’च्या माधमातून ग्रामीण भागात त्यांनी शिक्षण प्रसाराचे मोठे काम केले. अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम त्यांनी केले, अशी श्रद्धांजली विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी वाहिली. पी. बी. कडू पाटील हे स्वातंत्र्य सेनानी, साम्यवादी विचाराशी पूर्णपणे वाहून घेतलेले नेतृत्व,पददलित, गोरगरीब यांच्यासाठी आंदोलने करून त्यांना न्याय्य हक्क मिळवून देणारे, विचारांशी एकनिष्ठ असणारे नेते होते. त्यांच्या निधनाने जिल्ह्याची मोठी हानी झाली आहे, अशी प्रतिक्रिया माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली. पी. बी. कडू पाटील हे शेतकरी,कष्टकरी, कामगार यांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी सतत संघर्ष करणारे नेते होते. खंडकरी व दूध उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्नही त्यांनी विधानसभेत मांडले. अभ्यासू नेता जिल्ह्याने गमावला आहे, असे ज्येष्ठ नेते शंकरराव कोल्हे म्हणाले.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹डॉ. विजया राजाध्यक्ष यांना ‘जनस्थान’ जाहीर

कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने दिला जाणारा मानाचा जनस्थान पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिका डॉ. विजया राजाध्यक्ष यांना जाहीर झाला आहे. कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या जन्मदिनी म्हणजे येत्या २७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता नाशिकच्या महाकवी कालिदास कलामंदिरात हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.

Join us @ChaluGhadamodi

कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे अध्यक्ष, ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांनी गुरुवारी मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत या पुरस्कारांची घोषणा केली. एक लाख रुपये रोख, सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹हवेच्या प्रदुषणाचे मुंबई, दिल्लीत ८०,००० बळी!

हवेच्या प्रदूषणामुळे २०१५ मध्ये मुंबई आणि दिल्लीत ३० वर्षांवरील नागरिकांचे ८०,६६५ अकाली मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती आयआयटी मुंबईच्या एका अभ्यासाद्वारे पुढे आली आहे. ही आकडेवारी १९९५ पेक्षा दुप्पट आहे.

आर्थिक गणितात मांडायचे तर या दोन्ही शहरांचे २०१५ मध्ये हवेच्या प्रदुषणामुळे १०.६६ अब्ज डॉलर्स म्हणजे सुमारे ७० हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे किंवा असे म्हणता येईल की या शहरांचे जीडीपी ०.७१ टक्क्याने घसरले आहे. दर दशकानंतर प्रदुषणामुळे आरोग्यावर आणि पर्यायाने उत्पादनक्षमतेवर होणाऱ्या विपरित परिणामांमध्ये वाढ होत असल्याचा निष्कर्ष या अभ्यासाद्वारे काढण्यात आला आहे.

हवेतले PM10 म्हणजेच धुलिकणांचे प्रमाण, लोकसंख्या आणि मृत्यूदर यांच्या परिणामांची एकत्रित सांगड अभ्यासकर्त्यांनी घातली आहे. दिल्लीत हवेच्या प्रदुषणाचे प्रमाण अधिक असल्याने त्याच्या परिणामांमुळे होणाऱ्या आजारांनी मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. १९९५ मध्ये हे प्रमाण १९,७१६ होते तर २०१५ मध्ये ते ४८,६५१ पर्यंत पोहोचले आहे. मुंबईत हे प्रमाण १९९५ मध्ये १९,२९१ होते ते २०१५ मध्ये ३२,०१४ पर्यंत पोहोचले आहे.

दुसरीकडे हवेच्या प्रदुषणामुळे उत्पादन क्षमतेत होणारी घटही या अभ्यासात मोजण्यात आली आहे. २०१५ मध्ये कामाचे कमी दिवस भरल्याची प्रकरणे मुंबईत २ कोटी ३० लाख तर दिल्लीत २ कोटी ९० लाख आहेत. श्वसनाचे आजार होऊन आयसीयुत दाखल होणाऱ्यांची संख्या २०१५ मध्ये मुंबईत ६४,०३७ तर दिल्लीत १ लाख २० हजार आहे.

आरोग्य आणि आयुष्यमान मोजण्याचे मापक 'डिसॅबिलीटीअॅडजस्टेड लाइफ इयर्स' (DALY) हे विविध आजारांमुळे कमी झालेले आयुष्यमान दर्शवते. दिल्ली १९९५ DALY ३ लाख ४० हजार होते जे २०१५ ला ७ लाख ५० हजारांवर पोहोचले. हेच प्रमाण मुंबईत १९९५ ला DALY ३ लाख ४० हजार होते ते २०१५ ला ५ लाख १० हजार झाले.

कमल ज्योती माजी यांनी हा अभ्यास केला आहे. एन्व्हायर्नमेंटल सायन्स अॅंड पोल्युशन रिसर्च जर्नलमध्ये हा अभ्यास अलिकडेच प्रकाशित झाला आहे. माजी यांच्यासह आयआयटी मुंबईचे प्राध्यापक अनिल दिक्षित, बर्कले इनिशिएटिव्ह इन सॉफ्ट कॉम्प्युटिंग, युएसएचे अशोक देशपांडे यांनी हा अभ्यास केला आहे.

Join us  @ChaluGhadamodi

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹चीनमध्ये ‘रोबोट’ झाला रिपोर्टर

https://t.me/chalughadamodi/3757

पत्रकारांचं जग भाऊ जाम धावपळीचं असतं. काळवेळाचं काही भान नाही, खाण्यापिण्याची शुध्द नाही. कशाचा कशाला पत्ता नाही आणि दिवसभर नुसती पळापळ. सणवार नाही, दोन दिवसांचं एकसारखं शेड्युल नाही. एकदम मशीनसारखं काम करावं लागतं.

याच भावनेतून कदाचित चीनमध्ये एक ‘रोबोट’ पत्रकार तयार करण्यात आला आहे. या रोबोट पत्रकाराचं नाव आहे झाओ नान. या रोबोटने नुकतंच एक ३०० शब्दांचा लेख लिहून पूर्ण केला. शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार हा लेख या रोबोटने एका सेकंदात लिहित पूर्ण केला. हा लेख सदर्न मेट्रोपोलीस डेली या तिथल्याच एका पेपरमध्ये छापून आलाय.तिथल्या सणासुदीच्या काळात तिथे होणाऱ्या गर्दीवर हा लेख या रोबोटने लिहिला आहे.चीनमधल्या बीजिंग युनिव्हर्सिटीमधल्या अभ्यासकांचा एक गट हे रोबोट तयार करण्याच्या प्रकल्पावर काम करत आहे.

या गटाने शाओ नान हा रोबोट तयार केला आहे. हा रोबोट सध्या लहान आणि विस्तृत असे दोन्ही प्रकारचे न्यूज रिपोर्ट तयार करू शकतो.

शाओ नान रोबोटने लिहिलेला हा न्यूज रिपोर्ट या अभ्यासकांच्या गटाने तपासला तेव्हा त्यांना त्या पेपरमधल्या रिपोर्टर्सनी लिहिलेल्या रिपोर्टर्सपेक्षा चांगला आढळला. मिळालेल्या माहितीचं विश्लेषण हा रोबोट मानवी रिपोर्टर्सपेक्षा चांगल्या पध्दतीने करू शकतो असं आढळून आलं. यामुळे या वर्तमानपत्रात काम करणारे रिपोर्टर आश्चर्यचकित झाले.

पण रोबोट रिपोर्टरने लेख लिहिला म्हणजे मानवी पत्रकारांची सद्दी संपली असं नाही. अजूनही एका माणसाची प्रत्यक्ष मुलाखत रोबोट संपूर्णपणे घेऊ शकत नाही. मानवी चेहऱ्यावरचे सूक्ष्म हावभाव लगेच टिपत त्यावरून संभाषण पुढे नेण्याचं कौशल्य या प्रकारच्या रोबोट्समध्ये अजून आलेलं नाही.

पण मानवी पत्रकारांना पूरक असं काम हे रोबोट्स नक्कीच करू शकतात असं या प्रकल्पावर काम करणाऱ्या अभ्यासकांचं मत आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹प्रगतीशील शहरांच्या यादीत बंगळुरू नंबर वन; शांघाय, सिलिकॉन व्हॅलीला टाकले मागे

शांघाय, सिलिकॉन व्हॅलीला मागे टाकत बंगळुरू शहराने प्रगतीशील शहरांच्या यादीत पहिला क्रमांक पटकावला आहे. जागतिक आर्थिक मंचाने (वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम) प्रगतीशील शहरांची नवी यादी जाहीर केली आहे. तंत्रज्ञानाचा आणि नाविण्यपूर्ण गोष्टींचा अंगिकार हे मुदे विचारात घेऊन प्रगतीशील शहरांची यादी तयार करण्यात आली आहे. बंगळुरुसोबतच हैदराबाद शहरानेही पहिल्या दहा शहरांमध्ये स्थान मिळवले आहे. प्रगतीशील शहरांच्या यादीत हैदराबाद पाचव्या स्थानावर आहे.

बंगळुरूनंतर प्रगतीशील शहरांच्या यादीत व्हिएतनामच्या हो ची मिन्ह शहराने दुसरे स्थान पटकावले आहे. तर सिलिकॉन व्हॅली या यादीत तिसऱ्या स्थानी आहे. ‘प्रगतीशील शहरांच्या यादीत बंगळुरूने प्रथम स्थान मिळवले आहे. मी याबद्दल बंगळुरूवासियांचे आभार मानतो,’ असे कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारमय्या यांनी म्हटले आहे. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने ३० प्रगतीशील शहरांची यादी तयार केली आहे. यामध्ये बंगळुरू, हैदराबादसह दिल्ली, मुंबई आणि चेन्नईला स्थान देण्यात आले आहे.

प्रचंड वाहतूक कोंडी, कचरा व्यवस्थापनाचा अभाव, प्रदूषित तलाव आणि नुकत्याच घडलेल्या विनयभंगाच्या घटना यामुळे बंगळुरू चर्चेत राहिले आहे. बंगळुरू शहरातील अनेक भागांमध्ये पाणी आणि विजेची समस्या आहे. याशिवाय उद्योगस्नेही शहरांच्या यादीत केंद्राने बंगळुरूला तळाचे स्थान दिले आहे. मात्र बंगळुरूत मोठ्या प्रमाणात थेट परकीय गुंतवणूक आल्याचा राज्य सरकारचा दावा आहे.

पाणी आणि विजेच्या समस्या असलेले बंगळुरू शहर देशाची माहिती तंत्रज्ञान क्षेत्राची राजधानी समजली जाते. याशिवाय नवउद्यमींसाठी (स्टार्ट अप) बंगळुरूतील वातावरण पोषक समजले जाते. इन्फोसिससारख्या बड्या कंपन्यांची कार्यालये बंगळुरूत असल्याने देशभरातील हजारो तरुण-तरुणी बंगळुरूमध्ये नोकरीसाठी राहतात. या भागात असणारे काही बाजार नोटाबंदीनंतर कॅशलेस झाले आहेत.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹आता 30 हजारांवरील व्यवहारांवर पॅनकार्ड गरजेचे ?

नोटाबंदीचा निर्णय लागू झाल्यापासून कॅशलेस व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने विविध योजना आणल्या. त्यातच आता 30 हजारांवरील व्यवहारांसाठी पॅनकार्ड गरजेचे करण्याबाबत विचार सुरु आहे.

केंद्र सरकारने पाचशे आणि हजार रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर देशवासियांनी जास्तीत जास्त कॅशलेस व्यवहार करावे, यासाठी केंद्राकडून विविध सवलती देण्यात येत आहेत. यातच सध्या 50 हजार रुपयांपेक्षा जास्त रोख व्यवहारांवर पॅनकार्ड गरजेचे आहे. याची मर्यादा कमी करण्याबाबत सध्या विचार सुरु आहे. त्यामुळे ही मर्यादा आता 30 हजार रुपयांवर नेण्याचा विचार सुरु केला आहे. तसेच मर्यादेपेक्षा अधिक रोख रक्कम काढण्यावर कॅश हँडलिंग चार्जेसही लावण्यात येणार आहेत.
https://t.me/chalughadamodi/3760

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹युरोपीय संसदेच्या अध्यक्षपदी ऍण्टोनियो तजानी

 युरोपियन पीपल्स पार्टी ग्रुपचे (ईपीपी) ऍण्टोनियो तजानी यांना मंगळवारी युरोपीय संसदेचा अध्यक्ष म्हणून निवडण्यात आले. वृत्तसंस्था शिन्हुआनुसार तजानी यांनी प्रोगेसिव्ह अलायन्स ऑफ सोशालिस्ट्स अँड डेमोक्रेट्सचे नेते गियानी पिटेला यांना पराभूत केले आहे. त्यांनी पिटेला यांच्या 282 मतांच्या तुलनेत 351 मते मिळवत विजय मिळविला. फोर्जा इटालिया पार्टीचे संस्थापक असणारे तजानी हे उद्योग आणि उद्यमता विषयक युरोपचे आयुक्त राहिले आहेत. युरोपीय आयोगात आपल्या कार्यकाळाच्या समाप्तीवेळी तजानी यांनी कथित गोल्डन हँडशेक फेटाळले होते. ज्यांतर्गत माजी आयुक्तांना सार्वजनिक क्षेत्रातून बाहेर काढण्यादरम्यान मदत म्हणून तीन वर्षांसाठी 468000 युरो दिले जाणार होते. तजानी विद्यमान सोशलिस्ट अध्यक्ष मार्टिन शुल्ज यांची जागा घेतील. ब्रिटन युरोपीय महासंघातून बाहेर पडणार असल्याने त्यांची ही नवी कारकीर्द आव्हानात्मक असणार आहे.
https://t.me/chalughadamodi/3762

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹धोनीचा नवा विक्रम, मॅक्युलमला पछाडत चौथ्या क्रमांकावर

येथे सुरू असलेल्या दुसऱ्या सामन्यात माजी कर्णधार एम.एस. धोनीने तुफानी फलंदाजी करताना आज नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे. धोनीने 10 वे आंतरराष्ट्रीय एकदिवसीय शतक पूर्ण केले.

 यावेळी धोनीने 122 चेंडूचा सामना करताना सहा षटकार लगावत 134 धावांची खेळी केली. जेव्हा धोनीने चौथा षटकार मारत न्यूझीलंडचा माजी खेळाडू ब्रॅण्डन मॅक्क्युलमच्या सर्वाधिक षटकार ठोकण्याचा विक्रम मोडला. मॅक्क्युलमने आपल्या क्रिकेट करियरमध्ये २०० षटकार ठोकण्याचा पराक्रम केला होता. सध्या धोनीच्या नावार एकूण 203 षटकार झाले आहेत. सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजामध्ये धोनी चौथ्या क्रमांकावर आहे.

सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजाच्या यादीत शाहिद आफ्रीदी 351 षटकारासह प्रथम क्रमांकावर आहे. तर 270 षटकारांसह जयसुर्या दुसऱ्या आणि 238 षटकारांसह ख्रिस गेल तिसऱ्या क्रमांकावर विराजमान आहे. दरम्यान, युवराज सिंगने आज तीन षटकार लगावत 150 षटकारांचा टप्पा पार केला आहे. युवराजच्या नावार 152 षटकारांची नोंद झाली आहे. या समान्यापुर्वी युवराजच्या नावावर 149 षटकार होते.
https://t.me/chalughadamodi/3765

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹मंगळावरील वातावरणात सूक्ष्म जीव टिकू शकतात

https://t.me/chalughadamodi/3767
मंगळावरील विरळ हवेत सूक्ष्म जीव जिवंत राहू शकतात, असे वैज्ञानिकांनी म्हटले आहे. पृथ्वीवरील मिथेन निर्मिती करणारे जिवाणू मंगळावर टिकाव धरू शकतील असा त्यांचा अंदाज आहे. भारतीय वंशाच्या एका वैज्ञानिकाचा या संशोधनात समावेश आहे. मंगळाचा पृष्ठभाग सध्या कोरडा व थंड आहे, पण तेथे नद्या, सरोवर व सागर अब्जावधी वर्षांपूर्वी होते याचे पुरावे आहेत. पृथ्वीवर जेथे द्रव आहे तेथे सूक्ष्म जीव आहेत. मंगळावरील ओलसरपणा होता त्यामुळे तेथे अजूनही सूक्ष्म जीव असावेत.

 अमेरिकेतील अरकान्सास विद्यापीठाच्या रिबेका मिकॉल यांनी सांगितले की, पृथ्वीवर जसे सूक्ष्म जीव आहेत तसे तिथेही असू शकतात. अगदी आपल्यासारखेच सूक्ष्म जीव तिथे असतील असे नाही, तर त्यात फरक असू शकतो. आधीच्या संशोधनानुसार मंगळाच्या वातावरणात मिथेनचा कार्बनी रेणू सापडला होता. मिथेन निर्मितीचे अजैविक मार्गही आहेत, त्यात ज्वालामुखीची क्रिया हा एक आहे. पृथ्वीवर या वायूची निर्मिती गाईगुरांच्या शेणातून होत असते. मंगळाच्या वातावरणातही मिथेन आहे. पृथ्वीवर जैविक पद्धतीने मिथेनची निर्मिती होते.

 पृथ्वीवर मिथॅनोजेन्स नावाचे सूक्ष्म जीव आहेत, त्यांचा यात मोठा वाटा आहे. त्या सूक्ष्म जिवांना अॅनेरोब्स म्हणतात. त्यांना ऑक्सिजन लागत नाही. ते ऊर्जेसाठी हायड्रोजन वापरतात व कार्बनी रेणू निर्मितीत ते कार्बन डायॉक्साईडमधील कार्बन अणू वापरतात. मिथॅनोजेन्सना ऑक्सिजन लागत नाही व प्रकाशसंश्लेषणही लागत नाही. याचा अर्थ ते मंगळाच्या पृष्ठभागाखाली जिवंत राहू शकतात. त्यामुळे ते मंगळावर असण्याची शक्यता नाकारता येत नाही. पदवीधर विद्यार्थिनी नविता सिन्हा यांनी मिथॅनोजेन्सच्या चार प्रजातींवर प्रयोग केले असून त्यात मिथॅनोथर्मोबॅक्टर वुल्फेई, मिथॅनोसारसिना बारकेरी, मिथॅनो बॅक्टेरियम फॉर्मिसिसीयम व मिथॅनोकॉकस मारीपॉलुडिस या जिवाणूंचा समावेश आहे. हे संशोधन ‘जर्नल ओरिजिन्स ऑफ लाईफ अँड इव्होल्यूशन ऑफ बायोस्पिअर्स’मध्ये प्रकाशित झाले आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹पाच विमा कंपन्यांचे होणार लिस्टिंग

स्टॉक एक्स्चेंजमध्ये सार्वजनिक क्षेत्रातील पाच कंपन्यांची नोंदणी करण्यास आर्थिक व्यवहारांच्या मंत्रिमंडळ समितीने मंजुरी दिली. न्यू इंडिया अशुरन्स, युनायटेड इंडिया इन्शुरन्स, ओरिएन्टल इन्शुरन्स, नॅशनल इन्शुरन्स आणि जनरल इन्शुरन्स या कंपनीच्या समभागांची नेंदणी भांडवली बाजारात करण्यात येईल. याचप्रमाणे या कंपन्यांतील सध्याची सरकारची हिस्सेदारी 100 टक्के असून ती 75 टक्क्यांपर्यंत आणण्यात येईल. या सर्व कंपन्यांची लिस्टिंग एकाच वेळी सरकारकडून करण्यात येणार नाही. लिस्टिंगची प्रक्रिया तत्काळ सुरू करण्यात येणार आहे. पहिल्यांदा या कंपन्यांचा आयपीओ बाजारात आणण्यात येईल. सरकारने केंद्रीय अर्थसंकल्पात जनरल इन्शुरन्स कंपनीची लिस्टिंग करण्याची घोषणा केली होती, त्याच्यावर बुधवारी निर्णय घेण्यात आला.

2015-16 मध्ये या सर्व विमा कंपन्यांनी नफा मिळविला होता. यामुळे या कंपन्यांचे नोंदणी एक-एक करून करण्यात येणार आहे. निर्गुंतवणूक करताना सेबी आणि आयआरडीएआयच्या नियमांचे पालन करण्यात येईल. पाचही कंपन्यांची लिस्टिंग इक्विटी आणि ऑफर ऑफ सेल या दोन्ही प्रकारात करण्यात येणार आहे. सेबीच्या नियमांनुसार इक्विटीमध्ये सरकारचा हिस्सा 100 टक्क्यांवरून 75 टक्क्यांपर्यंत घसरणार आहे, असे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सांगितले.

या पाचही कंपन्यांचे लिस्टिंग करण्यात आल्याने कार्यालयीन प्रशासनात सुधारणा होईल आणि व्यवहारात पारदर्शकता येईल. याचप्रमाणे कंपन्यांची वाढ आणि उत्पन्नात वाढ होण्यास मदत होईल. यामुळे कंपन्यांना बाजारातून निधी गोळा करण्यास मदत होईल आणि सरकारकडून आर्थिक निधी मिळविण्यासाठी कमी प्रमाणात अवलंबून राहता येईल.
https://t.me/chalughadamodi/3769

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹खासगी शाळांहून सरकारी शाळा सरस

https://t.me/chalughadamodi/3771
खासगी शाळांमध्ये चांगले शिक्षण मिळते, असा समज असला तरी प्रत्यक्षात जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रगती ही खासगी शाळांत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांपेक्षा चांगली असल्याचे चित्र ‘प्रथम’ या स्वयंसेवी संस्थेने केलेल्या राज्यव्यापी सर्वेक्षणात समोर आले आहे.

राज्यातील प्राथमिक आणि उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षणाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी ‘प्रथम’ संस्थेने सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणाचा ‘असर’ अहवाल बुधवारी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला. २०१६मध्ये केलेल्या या सर्वेक्षणात राज्यातील ३ ते १६ वयोगटातील मुलांचा समावेश करण्यात आला होता. ५ ते १६ वयोगटातील मुलांची वाचन आणि गणिताची चाचणी घेण्यात आली. त्यात खासगी शाळांपेक्षा जिल्हा परिषदेच्या शाळांत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती तुलनेत चांगली असल्याचे स्पष्ट झाले आहे.

जिल्हा परिषदेतील शाळांतील इयत्ता तिसरीच्या ४१.२ टक्के विद्यार्थ्यांना दुसरीच्या स्तरावरचा मजकूर वाचता आला. तर, खासगी शाळांमध्ये शिकणाऱ्या तिसरीच्या फक्त ३८.८ टक्के विद्यार्थ्यांनाच दुसरीचा मजकूर वाचता आल्याचे या अहवालात म्हटले आहे. जिल्हा परिषदेतील शाळांतील इयत्ता पाचवीचे ५१.७ टक्के विद्यार्थी २०१४ मध्ये इयत्ता दुसरीच्या क्षमतेचा परिच्छेद वाचू शकत होते. हे प्रमाण २०१६मध्ये ११ टक्क्यांनी वाढून ६२.७ टक्के इतके झाले आहे.

राज्यातील ५ वर्षांखालील ९५ टक्के बालके ही बालवाडी, अंगणवाडी व प्राथमिक शाळेत दाखल झाली आहेत. गेल्या १० वर्षांत खासगी शाळांमध्ये दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. ६ ते १४ वयोगटातील मुलांचे खासगी शाळांत प्रवेश घेण्याचे प्रमाण २००६ मध्ये १८.३ टक्के इतके होते. तर, २०१६ मध्ये हे प्रमाण ३८.३ टक्के इतके झाले आहे. पण, प्राथमिक स्तरावरील शिक्षण हे खासगी शाळांपेक्षा जिल्हा परिषदेच्या शाळांत चांगले मिळत असल्याचे या सर्वेक्षणातून समोर आले आहे.

राज्यात इयत्ता पहिलीत शिकणाऱ्या आणि अक्षरे व त्यापेक्षा अधिक वाचू शकणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण हे ६०.७
टक्के आहे. तर देशात हे प्रमाण ५३.९ टक्के इतके आहे. इयत्ता पाचवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची गणित सोडवण्याची क्षमता २०१४च्या तुलनेत वाढली आहे. पाचवीच्या विद्यार्थ्यांना भागाकाराचे गणित (तीन अंकी संख्येला एक अंकी संख्येने भागणे) सोडवण्याचे प्रमाण २०१४मध्ये १८.९ टक्के होते.

 २०१६मध्ये हे प्रमाण २०.३ टक्क्यांवर पोहचले आहे. राज्यातील प्राथमिक शाळांची परिस्थिती चांगली असली तरी माध्यमिक शाळांची परिस्थिती म्हणावी तितकी चांगली नसल्याचेही या सर्वेक्षणातून समोर आले आहे. राज्यातील इयत्ता आठवीच्या २४.२ टक्के विद्यार्थ्यांना दुसरीचा मजकूर वाचता आलेला नाही.

 देशाच्या तुलनेत राज्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये मुलांची आणि शिक्षकांची उपस्थिती अधिक आहे. इयत्ता पहिले ते चौथी-पाचवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची सरासरी उपस्थिती ८५.१ टक्के एवढी आहे. तर, देशातील शाळांमध्ये उपस्थितीचे प्रमाण ७१.४ टक्के आहे. ज्या दिवशी सर्वेक्षण केले, त्या दिवशी पहिली ते चौथी-पाचवीच्या शाळेतील विद्यार्थ्यांची उपस्थिती ९१.८ टक्के होती. तर, देशातील अन्य शाळांतील उपस्थिती ही ८५.४ टक्के होती.

>शाळांच्या सुविधेत वाढ
मुलींकरिता स्वतंत्र व स्वच्छ शौचालयाचे प्रमाण २०१०मध्ये 43.2%इतके होते. त्यात वाढ होऊन प्रमाण २०१६मध्ये 62.5% इतके झाले

>शाळा भेटीच्या दिवशी २०१० मध्ये 99.7% शाळेत माध्यान्ह भोजन दिले जात होते.

२०१६ मध्ये हे प्रमाण 94.5%इतके झाले आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹अनुदानित विमान प्रवास लवकरच 200 मार्गांवर सुरू

अनुदानित विमान प्रवास लवकरच 200 मार्गांवर सुरू

सरकारकडून ठरविण्यात आलेल्या 200 प्रादेशिक मार्गांवर लवकरच अनुदानित विमान सेवा सुरू करण्यात येणार आहे. सरकारकडे यासाठी आतापर्यंत 11 बोलधारकांकडून 45 प्रस्ताव मांडण्यात आले आहेत असे सरकारकडून सांगण्यात आले.

भारतात हवाई प्रवास व्यवस्थापन पाहणाऱया भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडे प्रादेशिक जोडणी योजनेंतर्गंत उडान 200 आरसीएस मार्गावर 45 प्रस्ताव सादर करण्या तआले आहे. हे प्रस्ताव सादर करण्याची मुदत 16 जानेवारी होती. या प्रस्तावामध्ये देशातील 65 विमानतळांचा समावेश करण्यात आला असून यापैकी 52 विमानतळांचा वापर करण्यात येत नसून 13 विमानतळे वापरात आहेत असे सांगण्यात आले. या प्रस्तावांविरोधात प्रतिस्पर्धी बोली लावण्यासाठीची मुदत 1 फेब्रुवारीपर्यंत आहे.

या प्रस्तावित मार्गांवर सर्वात कमी बोली लावणाऱया कंपनीचा प्रस्ताव स्वीकारण्यात येईल. याचप्रमाणे कमीत कमी वेळेत कंपनीचे विमान निर्धारित ठिकाणी पोहोचेल याचीही काळजी घेण्यात येईल. या प्रस्तावांवर सध्या नागरी हवाई मंत्रालय, राज्य सरकारे, डीजीसीए आणि ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सुक्युरिटीचा लक्ष आहे. ही योजना पुढील 10 वर्षांसाठी लागू करण्यात येणार आहे.
https://t.me/chalughadamodi/3773

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹अमरावती जिल्ह्यातील सामूहिक गोबरगॅस प्रकल्प असणारे गाव- वायविहीर ता. चिखलदरा.

मायक्रोसॉफ्ट कंपनीच्या मदतीने देशातील पहिले आदर्श डिजीटल व्हीलेज अमरावती जिल्ह्यातील मेळघाट भागात असणारे हरिसाल हे गाव बनणार आहे.
 बेंबळा धरण/प्रकल्प यवतमाळ जिल्ह्यात बाभुळगाव तालुक्यात उभारला जात आहे.
 जालना जिल्ह्यात पाणलोट क्षेत्र विकासाची कामे होऊनकडवंची हे आदर्श गाव ठरलेले आहे.

 जालना शहर कुंडलिका नदीकिनारी आहे.
 रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर हे शहर अर्जुना नदीकिनारी आहे तर खेड हे शहर जगबुडी या नदीकिनारी आहे.
 नरवीर तानाजी मालुसरे यांची समाधी पुणे जिल्ह्यातसिंहगड किल्ल्यावर आहे.
 भारताची आर्थिक, व्यापारी व औद्योगिक राजधानीम्हणून मुंबई ओळखले जाते.
 महाराष्ट्र सरकार नक्षलवादग्रस्त गडचिरोली, चंद्रपूर,भंडारा, गोंदिया या जिल्ह्यात नक्षलवाद्यांना गावबंदी करणार्‍या गावांना प्रोत्साहन म्हणून 3 लाख रु. विकासनिधी देते.
 प्रसिद्ध रामाळा तलाव चंद्रपूर शहरात आहे.

 सीमी/एसआयएमआय म्हणजे स्टूडन्टस इस्लामिक मुव्हमेंट ऑफ इंडिया होय. या दहशतवादी संघटनेचे मुंबईत 11 जुलै 2006 रोजी झालेल्या साखळी रेल्वे बॉम्ब स्फोट मालिकेत सहभागी होती.

 कै. शंकराव चव्हाण जलाशय म्हणून नांदेड शहराजवळ गोदावरी नदीवर उभारण्यात आलेल्याविष्णूपुरी धरणातील जलाशयास म्हटले जाते.

समावेशक वाढ व विकास अहवाल 2017



          16 जानेवारी 2017 रोजी जागतिक आर्थिक मंचाद्वारे (डब्ल्यूईएफ) सोमवारी ‘समावेशक वाढ आणि विकास अहवाल 2017’ प्रकाशित करण्यात आला. 12 निर्देशक घटकांच्या आधारे हा अहवाल तयार करण्यात आला असून यामध्ये देशाच्या सकल राष्ट्रीय उत्त्पनाशिवाय (जीडीपी) वाढ आणि विकास, समावेशकता आणि शाश्‍वतपणा या अन्य तीन निकषांचा विचार करण्यात आला होता.

          सर्वसमावेशक विकास निर्देशांक Inclusive Development Index खपवशु अहवालानुसार बहुतांश विकसित राष्ट्रांमध्ये आर्थिक विकासाच्या संधी आणि विषमता कमी करण्याच्या संधींना मुकावे लागत आहे. यासाठी धोरणकर्त्यांकडून तयार करण्यात येणारे विकासाचे प्रारूप आणि विकास मोजण्याच्या निकषांमधील त्रुटी कारणीभूत आहेत. त्यामुळे या सगळ्यांमध्ये आमूलाग्र बदल होण्याची गरज आहे.

          या अहवालानुसार...

          * सर्वसमावेशक विकासाच्या अनुषंगाने तयार केलेल्या जगातील 79 विकसित राष्ट्रांच्या यादीत, प्रचंड मनुष्यबळ व प्रति मानसी जीडीपीच्या बाबतीत जगातील पहिल्या दहा देशांमध्ये असूनही भारताला यादीत 60 वे स्थान मिळाले.

          * समावेशक विकास निर्देशंकात भारताला शेजारच्या पाकिस्तान व चीन यांच्यापेक्षाही खालचे स्थान आहे.

          * 79 देशांच्या यादीत लिथुआनिया या देशाने पहिला क्रमांक पटकावला असून अझेरबैजान व हंगेरी या दोन राष्ट्रांनी अनुक्रमे दुसरे व तिसरे स्थान मिळवले आहे.

          * चीन 15 व्या, नेपाळ 27 व्या, बांगलादेश 36 व्या आणि पाकिस्तान 52 व्या स्थानावर आहे.

          * ब्रिक्स राष्ट्रांपैकी एक असणारे रशिया आणि ब्राझील अनुक्रमे 13 व्या आणि 30 व्या स्थानावर आहेत.

          * विकसित राष्ट्रांसाठी अशाचप्रकारे तयार करण्यात आलेल्या अहवालात नॉर्वेने पहिला क्रमांक मिळवला आहे. तर लक्झेम्बर्ग, स्वित्झर्लंड, आईसलँड आणि डेन्मार्क या राष्ट्रांनी अनुक्रमे पहिल्या पाचांमध्ये स्थान पटकावले आहे.

रिंगलिंग ब्रदर्स अँड बार्नुम अँड बेली सर्कस



          जगातील सर्वात मोठा शो’ अशी ख्याती असलेली अमेरिकेतील 146 वर्षे जुनी सर्कस मे 2017 महिन्यात आपला शेवटचा खेळ करणार आहे. त्यामुळे ‘रिंगलिंग ब्रदर्स अँड बार्नुम अँड बेली सर्कस’ ही इतिहासजमा होणार आहे.

          ओरलँडो आणि मायामी येथील सर्कशीच्या खेळानंतर फेल्ड एंटरन्मेंट कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी व अध्यक्ष केनेथ फेल्ड यांनी आपल्या कर्मचार्‍यांना या निर्णयाची माहिती दिली. सर्कशीला येणार्‍यांची घटती संख्या, वाढता खर्च आणि लोकांची बदलणारी आवड यामुळे सर्कशीला हा निर्णय घ्यावा लागला. त्याचप्रमाणे प्राणी हक्क संघटनांच्या दबावामुळेही कंपनीला हा निर्णय घेणे भाग पडले.

          * या सर्कशीची स्थापना 1841 साली झाली होती.

          * तिचे सध्याचे नाव 1919 सालापासून प्रचलित होते.

          * प्रदीर्घ काळ खटलेबाजी केल्यानंतर 2016 मध्ये या सर्कशीतील 2 हत्तींचे काम बंद करून त्यांना फ्लोरिडातील प्राणी पुनर्वसन केंद्रात पाठवावे लागले. त्यानंतर प्रेक्षकांची संख्या झपाट्याने घसरली.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹सर्वाधिक फॉलोअर्स असलेले 'राजकीय नेते' मोदी !

https://t.me/chalughadamodi/3781
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा हे पदावरून पायउतार होत असताना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एका वेगळ्या उंचीवर विराजमान होत आहेत. जगात सोशल नेटवर्किंगवर सर्वाधिक फॉलोअर्स असलेले 'राजकीय नेते' मोदी बनणार आहेत.

मोदी सोशल नेटवर्किंगचा मोठ्या प्रमाणात वापर करत असून, ते नेहमीच चर्चेत असतात. जगभरात त्यांचे कोट्यावधी चाहते आहेत. सोशल नेटवर्किंगसाठी प्रसिद्ध असलेले फेसबूक, ट्विटरवर त्यांना फॉलो करणाऱयांची संख्या मोठी आहे.
ओबामांचे ट्विटरवर 8 कोटी 7 लाख 24 हजार 780 फॉलोअर्स आहेत, तर मोदींचे 2 कोटी 64 लाख 80 हजार 518 आहेत. परंतु, ओबामांचा कार्यकाल संपत असल्याने मोदी प्रथम क्रमांकाचे राजकीय नेते बनणार आहेत.

सोशल नेटवर्किंगवर मोदींचे फॉलोअर्स-

फेसबुक- 3 कोटी 92 लाख 73 हजार 849.
ट्विटर- 2 कोटी 65 लाख.
गूगल प्लस- 30 लाख
इन्स्टाग्राम- 50 लाखांहून अधिक
यूट्यूब- 5 लाखाहूंन अधिक

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹ठाणेकर तरुणीला 'व्हाइट हाउस'चं निमंत्रण

https://t.me/chalughadamodi/3783
अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आज अमेरिकी अध्यक्षांचे शासकीय निवासस्थान असलेल्या 'व्हाइट हाउस'मध्ये प्रवेश करणार असून अध्यक्षपदाची शपथ घेणार आहेत. संपूर्ण जगाचे लक्ष लागलेल्या या सोहळ्यात सहभागी होण्याचा मान ठाण्यातील ओशिका नौगी या तरुणीला मिळाला आहे.

मूळची कोलकात्याची असलेली व ठाण्यात वास्तव्यास असलेली ओशिका सध्या पुण्यातील सिम्बॉयसिस स्कूल ऑफ लिबरल आर्टसमधून पदवीचा अभ्यास करते आहे. ती सामाजिक संदेश देणाऱ्या लघुपटांची निर्मितीही करते. २०१४मध्ये हैदराबादेतील इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटरमध्ये झालेल्या 'हॉर्वर्ड मॉडल युनायटेड नेशन्सनं इंडिया कॉन्फरन्स'मधील वादविवाद स्पर्धेत तिनं विजय मिळवला होता. या विजयानंतर तिला अमेरिकेतील ग्लोबल यंग लीडर्स कॉन्फरन्समध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली. तिथंही तिनं आपल्या बुद्धिमत्तेची चमक दाखवत विजय मिळवला. त्यामुळं तिला अमेरिकी अध्यक्षांच्या व्हाइट हाउस प्रवेश सोहळ्याला उपस्थित राहण्याचा मान मिळाला आहे. ओशिकाला व्हाइट हाउसचं निमंत्रण आल्याबद्दल हॉर्वर्ड कॉन्फरन्सचं आयोजन करणाऱ्या 'मूनकॅफे'चे सीईओ आदित्य सोमा यांनी आनंद व्यक्त केला आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹हार्बरवरील सँडहर्स्ट रोड स्टेशन पाडणार

सीएसटीपासून ते कुर्ल्यापर्यंत पाचव्या आणि सहाव्या मार्गासाठी मध्य रेल्वेला मंजुरी मिळाली आहे. या मार्गांना जागा करण्यासाठी हार्बर रेल्वे मार्गावरील सँडहर्स्ट रोड रेल्वे स्टेशन पाडावे लागणार आहे. हार्बरवर हे सँडहर्स्ट स्टेशन नव्याने पी. डिमेलो रोडच्या बाजूलाच उभारलं जाणार आहे.

प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता मध्य रेल्वे सीएसटी-कुर्ला असा पाचवा आणि सहावा नवा ट्रॅक बनवणार आहे. त्यामुळे मध्य रेल्वेला या मार्गात अनेक बदल करावे लागतील. यासाठी रेल्वेला ऐतिहासिक वास्तूंवर हातोडा चालवावा लागणार आहे. यात हार्बर मार्गावरील सँडहर्स्ट रोड रेल्वे स्टेशन जमीनदोस्त करावे लागणार आहे.

कुर्ला स्थानकातील हार्बर मार्ग एलिव्हेटेड (उन्नत) केला जाणार आहे. त्याखालून पाचव्या-सहाव्या मार्गासाठी जागा उपलब्ध केली जाईल. हार्बर मार्ग कुर्ला, डॉकयार्ड रोड येथून पी.डिमेलो रोडमार्गे वळवला जाणार आहे. मेन लाइनवरील सँडहर्स्ट रोड स्टेशन मात्र तसेच राहणार आहे. सँडहर्स्ट रोड १८९५ ते १९०० दरम्यान फर्स्ट विस्काउंट सँडहर्स्ट मुंबईचे गव्हर्नर होते. त्यांच्या नावाने या स्थानकाचे नाव सँडहर्स्ट रोड ठेवण्यात आले. १९२१ मध्ये हे स्थानक बांधले गेले.

पाचव्या-सहाव्या ट्रॅकना जागा उपलब्ध करण्यासाठी भायखळा, चिंचपोकळी, करी रोड, सायन स्थानकांमध्येही बदल करण्यात येणार आहेत. तसंच दादर स्टेशनच्या पश्चिमेला दोन नवे प्लॅटफॉर्म बदलण्यात येणार आहेत.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹वर्षभर मेहनत करून गावकरी महिलांनी हत्तींसाठी विणले स्वेटर

उत्तर भारतात थंडीची लाट आहे. गेल्या कित्येक आठवड्यापासून तर उत्तर भारतात तापमान अत्यंत खाली उतरले आहे. काही ठिकाणी तर थंडीमुळे दाट धुक्याची चादर देखील पसरली आहे. या कडाक्याच्या थंडीने माणसे गारठून गेली आहे. थंडीपासून बचाव व्हावा यासाठी कोणी शेकोटीची ऊब घेत आहे, तर कोणी उबदार वस्त्रे घालून आपले संरक्षण करत आहे. पण या कडाक्या्च्या थंडीत प्राण्यांची हालत काय होत असेल याची कल्पना केलीय का कधी? म्हणून मथुरामधल्या काही महिला आणि येथल्या स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घेत थंडीपासून बचाव करण्यासाठी हत्तींकरता स्वेटर विणले आहेत. हे स्वेटर विणण्यासाठी गावकरी महिला गेल्या कित्येक महिन्यांपासून मेहनत करत आहेत.

मथुरामध्ये हत्तींचे पुनर्वसन केंद्र आहेत. या केंद्रात जवळपास २० हत्ती आहेत. यातील काही हत्ती जखमी अवस्थेत येथे आणले होते. शिकार आणि तस्करांच्या तावडीतून वाचवलेल्या हत्तींना या पुनर्वसन केंद्रात आणण्यात आले. यातल्या काही हत्तींना डोळ्यांनी नीट दिसतही नाही. येथे त्यांची काळजी घेतली जाते. या पुनर्वसन केंद्राच्या बाजूला राहणा-या गावकरी महिलांनी थंडीपासून हत्तींचे संरक्षण व्हावे यासाठी स्वेटर विणले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून ते हत्तीसाठी स्वेटर विणत आहेत. उत्तर प्रदेशमध्ये थंडीची लाट आहे. अनेक ठिकाणी पारा हा १० अंश सेल्शिअसच्याही खाली आहे. तेव्हा हत्तीचे संरक्षण करण्यासाठी येथील महिलांनी पुढाकार घेत हत्तींसाठी स्वेटर विणले आहेत.
https://t.me/chalughadamodi/3786

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹‘चर्च कोर्टाच्या घटस्फोटांना कायदेशीर मान्यता नाही’

ख्रिश्चन पर्सनल लॉअंतर्गत धर्मोपदेशकांच्या लवादाने मंजूर केलेला घटस्फोट कायद्याने ग्राह्य धरता येणार नाही, असा निर्वाळा गुरुवारी सुप्रीम कोर्टाने दिला. चर्च कोर्टाने मंजूर केलेल्या घटस्फोटांना कायदेशीर मान्यता देण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका फेटाळून लावताना ख्रिश्चन पर्सनल लॉ कायद्याची पायमल्ली करू शकत नाही, असे सुप्रीम कोर्टाने हे स्पष्ट केले.

‘मॉली जोसेफ आणि जॉर्ज सबेस्टियन या प्रकरणात सन १९९६मध्ये आदेश देतानाच हा प्रश्न निकाली निघाला आहे,’ असे सांगून सरन्यायाधीश जे. एस. खेहर आणि न्या. डी. वाय. चंद्रचूड यांच्या खंडपीठाने कर्नाटक कॅथलिक असोसिएशनचे माजी अध्यक्ष क्लॅरेन्स पेस यांनी दाखल केलेली याचिका फेटाळली. ‘घटस्फोट कायदा अस्तित्वात आल्यानंतर ‘कॅनन लॉ’नुसार (ख्रिश्चनांसाठीचा पर्सनल लॉ) मंजूर केलेले घटस्फोटांना कायदेशीर ग्राह्यता देणे शक्य नाही,’ असे कोर्टाने नमूद केले.

‘मुस्लिमांमधील ‘तीनदा तलाक’ला दिल्या जाणाऱ्या मान्यतेप्रमाणेच चर्चने पर्सनल लॉअंतर्गत मंजूर केलेल्या घटस्फोटाला भारतीय कायद्यानुसार कायदेशीर ग्राह्यता देण्यात यावी,’ अशी मागणी करणारी याचिका पेस यांनी सन २०१३ मध्ये केली होती. ‘मुस्लिम जोडप्यांना घटस्फोट मंजूर करणाऱ्या तीनदा तलाकला कायदेशीर मान्यता मिळत असेल, तर कॅनन कायद्याच्या तरतुदी न्यायालयांवर बंधनकारक का असू नयेत,’ असा युक्तिवाद पेस यांच्या वतीने बाजू मांडताना माजी अॅटर्नी जनरल सोली सोराबजी यांनी म्हटले.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹माडबनच्या किनाऱ्यावर ऑलिव्ह रिडले कासव

तालुक्याच्या पश्चिम किनारपट्टीवरील माडबन येथील समुद्रकिनाऱ्यावर सलग दुसऱ्या वर्षी समुद्र कासवाची प्रजाती असलेल्या ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या कासवाची अंडी आढळली आहेत. त्यामध्ये सुमारे १३७ हून अधिक अंडी असून समुद्र किनारपट्टीवरील वाळूमध्ये खड्डा खोदून त्यांचे सुरक्षित ठिकाणी वनविभागाने स्थानिकांच्या साथीने संवर्धन केले आहे. त्यामुळे सतत दुसऱ्या वर्षी माडबनवासियांना पुन्हा एकदा ऑलिव्ह रिडले कासवांचा थरारक जीवनप्रवास अनुभवता येणार आहे.

तालुक्याला लाभलेल्या पश्चिम सागरी किनारपट्टीच्या भागामध्ये विविध दुर्मिळ प्राणी, पक्षी यांचे वास्तव्य असल्याचे यापूर्वी वारंवार आढळून आले आहे. मात्र, ऑलिव्ह रिडले प्रजातीचे कासव वा त्याची अंडी तालुक्याच्या सागरी किनारपट्टीवर यापूर्वी कधीही आढळली नव्हती. मात्र, गतवर्षी प्रथमच तालुक्यातील माडबनच्या किनारपट्टीवर ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या कासवाच्या मादीने अंडी घातल्याचे ग्रामस्थांना आढळून आले होते. त्यानंतर सलग दुसऱ्या वर्षी या ऑलिव्ह रिडले कासवाची तब्बल १३७ हून अधिक अंडी माडबन किनारपट्टीवर शामसुंदर गवाणकर यांना आढळली आहेत. वनपाल सागर गोसावी, दीपएक चव्हाण, स्थानिक ग्रामस्थ गवाणकर, संतोष राजापकर, चंद्रकांत आडीवरेकर आदी ग्रामस्थांच्या सहकार्याने या अंडय़ाचे वनविभागाने स्थानिक ग्रामस्थांच्या साथीने वाळूमध्ये खड्डा खोदून सुरक्षितपणे संवर्धन केले आहे. या अंडय़ांना श्वापदांपासून धोका पोहचू नये म्हणून जाळीही लावण्यात आली आहे. त्यातच, ज्या ठिकाणी अंडय़ाचे संवर्धन करण्यात आले आहे त्या ठिकाणी अंडी संवर्धित करण्यात आल्याचा फलकही लावण्यात आला आहे. वनविभागाने सुरक्षितपणे संवर्धन केले आहे. या अंडय़ांमधून सुमारे ५३ ते ५५ दिवसांनंतर पिल्ले बाहेर येऊन पुढील जीवनप्रवासासाठी समुद्राकडे झेपावणार आहेत. त्यामुळे माडबनवासियांना पुन्हा एकदा ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या कासवांच्या पिल्लांचा थरारक समुद्रप्रवास अनुभवण्याची संधी मिळणार आहे.
https://t.me/chalughadamodi/3789

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹भाजपच्या देवराव होळी यांची आमदारकी रद्द

शासकीय सेवेत असताना निवडणूक लढवल्याप्रकरणी भाजपचे आमदार डॉ. देवराव होळी यांचे विधानसभेचे सदस्यत्व उच्च न्यायालयाने रद्द केले आहे. डॉ. देवराव होळी हे गडचिरोली जिल्हा परिषदेत वैद्यकीय अधिकारी म्हणून शासकीय सेवेत होते. शासकीय सेवेत असतानाच निवडणूक लढवल्याप्रकरणी त्यांचे विधानसभेचे सदस्यत्व मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने रद्द केले आहे.

शासकीय सेवेत असताना त्यांनी पैशांचा गैरव्यवहार केल्याचा ठपका होता. त्यामुळे त्यांच्याविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच, त्यांच्याविरोधात महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक कायद्यान्वये विभागीय चौकशी सुरू करण्यात आली होती.

 चौकशीदरम्यानच त्यांनी आपला राजीनामा पाठवला होता. आरोग्य उपसंचालकांनी चौकशी सुरू असल्याने १४ ऑक्टोबर २०१३ रोजी त्यांचा राजीनामा नामंजूर केला. आरोग्य उपसंचालकांच्या या निर्णयाला डॉ. होळी यांनी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधीकरणात (मॅट) आव्हान दिले होते. परंतु, मॅटने सुद्धा विभागीय चौकशी सुरू असल्याचे कारण सांगून त्यांची याचिका खारीज केली.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹आयएनएस विक्रमादित्यवर एटीएमची सुविधा

https://t.me/chalughadamodi/3792
भारताची सर्वात मोठी युद्धनौका आणि नौदलाचे सामर्थ्य वाढवणा-या आयएनएस विक्रमादित्यवर आता एटीएम मशिन लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही मशिन सॅटेलाईटवर चालणार असून एटीएमची सुविधा असलेली विक्रमादित्य ही पहिलीच युद्धनौका ठरणार आहे.

भारतीय नौदलात दाखल झालेली आयएनएस विक्रमादित्य ही तिसरी विमानवाहू युद्धनौका आहे. आयएनएस विक्रमादित्य या बलशाली विमानवाहू युद्धनौकेवर अतिअद्ययावत संवाद आणि युद्धयंत्रणा बसविण्यात आली आहे. आयएनएस विक्रमादित्य या तरंगत्या युद्धभूमीची उंची ६० मीटर्स उंच असून ही उंची २० मजली इमारतीएवढी आहे. तिच्या २० मजल्यांमध्ये २४ डेक्स आहेत. युद्धनौकेची लांबी २८४ मीटर्स म्हणजेच फुटबॉलची तीन मैदाने एका ओळीत ठेवली तर त्यांच्या लांबीइतकी आहे. तिच्यावर असलेल्या १६०० ते १८०० नौसनिकांना महिन्याभरासाठी दर महिन्याला एक लाख अंडी, २० हजार लीटर्स दूध आणि १६ टन तांदूळ लागतो. ही रसद पूर्ण भरलेल्या अवस्थेत ही विमानवाहू युद्धनौका सलग ४५ दिवस प्रवास करू शकते. दर दिवशी ४०० टन खारे पाणी शुद्ध करून पिण्यासाठी वापरले जाते. त्यासाठी यावर एक जलशुद्धीकरण प्रकल्पच वसविण्यात आला आहे. या युद्धनौकेची २४ विमान आणि १० हेलिकॉप्टर वाहून नेण्याची क्षमता आहे.२०१३ मध्ये यूपीए सरकारच्या काळात ही युद्धनौका भारतीय नौदलाच्या सेवेत दाखल झाली होती.

देशाच्या रक्षणासाठी दिवसरात्र झटणा-या जवानांना जास्तीत जास्त सुविधा देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. विक्रमादित्य युद्धनौकेवरील नौसैनिकांच्या मदतीसाठी युद्धनौकेवर एटीएम मशिन बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मदतीने ही मशिन बसवली जाणार असून सॅटेलाईटच्या मदतीने ही मशिन चालणार आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹अंतराळातील तंत्रज्ञानच्या आधारे रस्त्यावर धावणार इलेक्ट्रॉनिक वाहने

भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) आणि ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया (एआरएआय) संयुक्तपणे एका प्रकल्पावर काम करत आहेत. या प्रकल्पामुळे अंतराळात वापरली जाणारे तंत्रज्ञान जमिनीवर चालणाऱ्या गाड्यांमध्ये वापरले जाऊ शकते. या प्रकल्पांतर्गत एका गाडीवर हा प्रयोगदेखील करण्यात आला आहे. विशेष म्हणजे हा प्रयोग यशस्वी झाला आहे.

इस्रो आणि एआरएआय मिळून लिथियम ऑयन बॅटरी तंत्रज्ञानाच्या आधारे जमिनीवर चालणाऱ्या गाड्यांची निर्मिती करण्याच्या तयारीत आहेत. एका प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून इस्रो आणि एआरएआय ही माहिती दिली आहे. जर हे तंत्रज्ञान यशस्वी ठरले तर इलेक्ट्रॉनिक वाहनांच्या क्षेत्रात क्रांती होऊ शकते. रस्ते आणि राज्यमार्ग सचिव संजय मित्रा यांना या तंत्रज्ञानावर चालणारे एक मॉडेल दाखवण्यात आल्याची माहिती इस्रो आणि एआरएआयच्या प्रसिद्धीपत्रकात देण्यात आली आहे. अंतराळ क्षेत्रातील तंत्रज्ञान रस्त्यांवर चालणाऱ्या वाहनांमध्ये वापरल्यास तो मैलाचा दगड ठरेल, असे प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

इस्रो आणि एआरएआयने ज्या गाडीमध्ये अंतराळातील तंत्रज्ञान वापरण्याचा प्रयोग केला, त्या गाडीमध्ये ४८ वोल्ट आणि ५० ऍम्पियरची बॅटरी लावण्यात आली होती. प्रयोगासाठी वापरण्यात आलेली गाडी २ तासांच्या चार्जिंगनंतर ९० किलोमीटर चालू शकते. ही गाडी ४० ते ५० किलोमीटर प्रतितास वेगाने रस्त्यावर धावू शकते.
https://t.me/mpscscience/535

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹एडवर्ड स्नोडेनला 2020 पर्यंत रशियात वास्तव्याची अनुमती

रशियाच्या प्रशासनाने अमेरिकेची गुप्त माहिती उघड करणाऱया एडवर्ड स्नोडेनचा आपल्या देशात वास्तव्याचा मंजूर कालावधी 3 वर्षांनी वाढविला आहे.

 स्नोडेनला रशियात राहण्याची अनुमती 2020 पर्यत वाढविण्यात आल्याचे रशियन विदेश मंत्रालयाच्या प्रवक्त्या मारिया जकारोवा यांनी सांगितले. याआधी त्यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये स्नोडेनला वाढीव कालावधी मिळेल असा संकेत दिला होता. रशियन विभागाने जानेवारीच्या प्रारंभीच स्नोडेनच्या वास्तव्याची मुदत तीन वर्षांसाठी वाढविल्याची पुष्टी स्नोडेनच्या वकील ऐनातोली कुचेराना यांनी दिली. स्नोडेनने 2013 साली अमेरिकेची हेरयंत्रणा नॅशनल सिक्युरिटी एजेन्सीची माहिती उघड केली होती. त्याचवर्षी रशियाने स्नोडेनला आश्रय दिला होता. यावर्षी त्याचा परवाना संपला होता, आता तो 2020 पर्यंत वाढविण्यात आला आहे. जर स्नोडेन 2018 पर्यंत रशियात राहिला तर तो तेथील नागरिकत्वासाठी अर्ज करण्यास पात्र होणार आहे.
https://t.me/chalughadamodi/3795

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹फिफाच्या अर्थसमितीवर प्रफुल्ल पटेल

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल यांची जागतिक फुटबॉल महासंघ अर्थात फिफाच्या अर्थ समितीवर नियुक्ती करण्यात आली आहे. प्रफुल्ल पटेल हे सध्या अखिल भारतीय फुटबॉल महासंघटनेचे अध्यक्ष आहेत.

प्रफुल्ल पटेल यांची मागील वर्षी डिसेंबरमध्ये आशियाई फुटबॉल संघटनेच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. प्रफुल्ल पटेल यांची फुटबॉल महासंघात महत्त्वाची कामगिरी आहे. त्यांनी 17 वर्षांखालील फिफा विश्वचषकाचे यजमानपद भारताला मिळवून देण्यासाठी पटेल यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यानंतर आता त्यांची फिफाच्या अर्थ समितीवर निवड करण्यात आली आहे.
https://t.me/chalughadamodi/3797

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹स्मरणशक्तीच्या जोरावर भारतीय मुलीने केला विश्वविक्रम

https://t.me/chalughadamodi/3799
मथुरामध्ये ‘मेमरी गर्ल’ या नावाने प्रसिद्ध असलेली प्रेरणा शर्मा हिने आपल्या असामान्य स्मरणशक्तीच्या जोरावर ‘गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये आपल्या नावाची नोंद केली आहे. फक्त १९ वर्षांची असलेली प्रेरणा हिची स्मरणशक्ती चकित करून सोडणारी आहे. ५०० वेगवेगळे आकडे तिने लक्षात ठेवले आणि फक्त ८ मिनिटे ३३ सेकंदात तिने ते उलट आणि सुटल क्रमाने अगदी अचूक सांगितले. त्यामुळे तिच्या नावाची नोंद आता गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली आहे.

गेल्याच वर्षी ‘लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ आणि ‘एशियाई रेकॉर्ड’मध्ये तिच्या नावाची नोंद झाली होती. त्यामुळे ही मेमरी गर्ल चर्चेत आली होती. पण यंदा मात्र कॅनडामधल्या अरविंद पशुपतिचा रेकॉर्ड मोडत तिच्या नावे नवा विश्वविक्रम जमा झाला आहे. अरविंदने २७० वेगवेगळे आकडे लक्षात ठेवले होते. याआधीही तिने एकाचा रेकॉर्ड मोडला होता.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹पाककडून जवान चंदू चव्हाणांची सुटका

https://t.me/chalughadamodi/3804
पाकिस्तानच्या हद्दीत नजरचुकीने गेलेले भारतीय जवान चंदू बाबूलाल चव्हाण यांची आज (शनिवार) पाकिस्तानकडून सुटका करण्यात आली. वाघा बॉर्डरवर पाक सैन्याकडून भारतीय हद्दीत त्यांना सोडण्यात आले.

पाकिस्तानच्या ताब्यातील चंदू चव्हाण लवकरच मायदेशी येतील. पाकिस्तानी लष्कराच्या महासंचालकांशी (डीजीएमओ) सकारात्मक चर्चा झाली आहे. त्यांची तेथील सर्व चौकशी पूर्ण झाली आहे. त्यामुळे ते लवकरच मायदेशी येतील, अशी माहिती संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी नुकतीच दिली होती. अखेर चंदू चव्हाण यांची सुटका करण्यात भारत सरकारला यश आले आहे.

गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये चंदू चव्हाण हे राजस्थानमध्ये कर्तव्य बजावत असताना पाकिस्तानी हद्दीत गेले होते. त्यांना पाकिस्तानी लष्कराने ताब्यात घेतले होते. त्यांची तेव्हापासून चौकशी सुरु होती. पाकिस्तानने आज त्यांना वाघा बॉर्डरवरून भारतीय हद्दीत सोडण्यात आले. भारतीय लष्करात 37 राष्ट्रीय रायफल्समध्ये ते कार्यरत आहेत.

चंदू चव्हाण हे महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यातील बोरवीर गावचे आहेत. संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांचा लोकसभा मतदारसंघात हे गाव येत असल्याने त्यांनी त्यांच्या सुटकेसाठी विशेष प्रयत्न केले. चंदू चव्हाण यांच्या कुटुंबीयांनी नुकतीच भामरे यांच्यासह परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांची भेट घेतली होती. चंदू चव्हाण यांचे भाऊही लष्करातच आहेत.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹ऑनलाईन व्यवहारांवरील शुल्क भार कमी करण्यासाठी प्रयत्नशील

नोटाबंदीनंतर उद्भवलेली परिस्थिती निवळायला मदत व्हावी आणि रोकडरहित डिजिटल उलाढालींना चालना मिळावी यासाठी आता ऑनलाईन व्यवहारांवरील शुल्कभार कमी करण्यासाठी प्रयत्नशील असल्याची ग्वाही रिझव्र्ह बँकेचे गव्हर्नर ऊर्जित पटेल यांनी दिली. गव्हर्नर पटेल यांच्यासह डेप्युटी गव्हर्नर आर. गांधी आणि अन्य उच्चाधिकाऱ्यांना शुक्रवारी संसदेच्या लोकलेखा समितीने साक्ष देण्यासाठी पाचारण केले होते.

केंद्र सरकारने ८ नोव्हेंबरला ५०० आणि १००० रुपये मूल्याच्या नोटांना चलनातून अवैध ठरविण्याच्या घेतलेल्या निर्णयांनंतर निर्माण झालेल्या अभूतपूर्व स्थितीचा सामना करताना ऑनलाईन आर्थिक उलाढालींवर आकारण्यात येणाऱ्या शुल्काला सरकारने काही काळ स्थगिती दिली होती. पण ३१ डिसेंबर २०१६ नंतर ही स्थगिती उठवण्यात आली आणि हे शुल्क पुन्हा लागू करण्यात आले होते. आता या शुल्कांना पुन्हा स्थगिती मिळणार नसली तरी त्यामध्ये कपात करण्यात येणार असल्याची शक्यता आहे. यासंबंधी रिझव्र्ह बँकेमध्ये विचारविनिमय सुरू असल्याचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी स्पष्ट केले.

ऑनलाईन व्यवहारांवर आकारण्यात येणाऱ्या या शुल्कांमध्ये कपात केल्यामुळे डिजिटल बँकिंगला आणि रोकडरहित पारदर्शी व्यवस्थेला चालना मिळेल असा विश्वास पटेल यांनी लोकलेखा समितीपुढे बोलताना व्यक्त केला.

सध्या एनईएफटी, आरटीजीएस आणि आयएमपीएसद्वारे पैसे पाठवल्यावर २.५ ते २५ रूपयांपर्यंत अधिभार आकारला जातो. या शिवाय सेवा कर अतिरिक्त आकारला जातो. त्याचप्रमाणे जर डेबिट कार्डचा वापर करत दुकानात खरेदी व्यवहार केले तर २००० रूपयांपर्यंत ०.२५ टक्के अधिभार लागतो. हे अधिभार कमी करायचा विचार रिझव्र्ह बँकेकडून होणार आहे.

नोव्हेंबर महिन्यात झालेल्या नोटाबंदीच्या निर्णयाचा अर्थव्यवस्थेवर सध्या परिणाम होत असला तरी मध्यम आणि दीर्घ पल्लय़ात या निर्णयाचा देशाला फायदा होणार असल्याचे ऊर्जित पटेल यांनी लोकलेखा समितीला सांगितले.

संसदेच्या या समितीपुढे नोटाबंदीनंतरच्या आर्थिक परिस्थितीची त्यांनी माहिती दिली. प्रत्यक्ष साक्षीसाठी समितीच्या सदस्यांनी त्यांना १० प्रश्नांची सूची दिली असल्याचे समजते. त्यांच्या उत्तराप्रीत्यर्थ पटेल यांना १५ दिवसांचा अवधीही दिला गेला होता. बुधवारी ते संसदेच्या अर्थविषयक स्थायी समितीलाही नोटाबंदीच्या निर्णयाच्या अंमलबजावणीच्याच मुद्दय़ासंबधाने सामोरे गेले होते. त्यावेळी खासदारांनी विचारलेल्या प्रश्नांमुळे ते निरूत्तर झाले होते. अखेर त्यांची बाजू सावरायला माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना पुढे यावे लागले होते.

नोटाबंदीनंतरच्या काळानंतर निर्माण झालेली परिस्थिती लवकरच आटोक्यात येईल असेही त्यांनी लोकलेखा समितीपुढे बोलताना स्पष्ट केले. ८ नोव्हेंबरनंतर रिझव्र्ह बँक आणि प्राप्तिकर विभाग देशभरात बँकांत जमा होणाऱ्या ठेवींवर लक्ष ठेवून असल्याचं पटेल यांनी समितीला आश्वासन दिले. समितीच्या काही सदस्यांनी बँकांमधील व विशेष करून सहकारी बँकांमधील लक्षणीय वाढलेल्या ठेवींबद्दल त्यांना प्रश्न केला होता.
https://t.me/chalughadamodi/3806

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹ट्रम्प यांचा स्वदेशीमंत्र!

https://t.me/chalughadamodi/3808
ट्रम्पकाल सुरू!.. ‘प्रथम अमेरिका’चा नारा; स्वदेशी वस्तूंची खरेदी, देशी हातांनाच काम देण्याची हाक; अतिरेकी इस्लामी दहशतवादाचे समूळ उचाटन करण्याचा निर्धार

अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टनमधील कॅपिटॉल हिल परिसरात शुक्रवारी महासत्तेच्या दिमाखाला साजेशा कार्यक्रमात सत्तेची सूत्रे हाती घेताना नवे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकी जनतेला स्वदेशीचा मंत्र दिला. ‘अगदी आज, आतापासून अमेरिकेची विपन्नावस्था संपणार आहे. अमेरिकी हातांनी आणि अमेरिकी श्रमांनीच आता आपण अमेरिकेची पुनर्बाधणी करणार आहेत. अमेरिकी हातांनाच काम देणार आहोत आणि अमेरिकी उत्पादनेच विकत घेणार आहोत’, अशी भावनिक साद घालत ट्रम्प यांनी आपल्या अध्यक्षीय कारकीर्दीची सुरुवात केली. आपल्या भाषणात ट्रम्प यांनी इस्लामी कट्टरतावादाचा समूळ नाश करण्याची घोषणाही केली. मात्र तो मुद्द ओझरता आला. त्यावर अधिक भाष्य करण्याचे ट्रम्प यांनी टाळले.

वॉशिंग्टनमधील सेंट जॉन्स चर्चमध्ये शुक्रवारी सकाळी प्रार्थना करून डोनाल्ड आणि मेलनिया हे ट्रम्प दाम्पत्य व्हाइट हाऊसकडे रवाना झाले. मावळे अध्यक्ष बराक ओबामा यांनी त्यांचे सपत्नीक स्वागत केले. तेथून ट्रम्प यांच्या वाहनांचा ताफा कॅपिटॉल हिल परिसरात होणाऱ्या पदग्रहण सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी निघाला. निळ्या वेशातील नव्या ‘फर्स्ट लेडी’ मेलनिया आणि पांढरा सदरा, लालभडक टाय आणि निळा सूट परिधान केलेले नवे अध्यक्ष ट्रम्प कार्यक्रमस्थळी पोहोचण्यापूर्वी उपाध्यक्ष माइक पेन्स सपत्नीक हजर होते. त्यासह ओबामा दाम्पत्य आणि अन्य अधिकाऱ्यांनीही आपापले स्थान ग्रहण केले होते. सुमारे दहा लाखांचा जनसमुदाय या शपथग्रहण सोहळ्याचा साक्षीदार होण्यासाठी कॅपिटॉल हिल परिसरात उपस्थित होता. प्रथम उपाध्यक्ष पेन्स यांना आणि नंतर ट्रम्प यांना सरन्यायाधीश जॉन रॉबर्ट्स यांच्याकडून शपथ देण्यात आली. उजवा हात उंचावून दोघांनीही घटनेशी प्रामाणिक राहून अमेरिकेच्या हितासाठी झटण्याची शपथ घेतली.

त्यानंतर लगेचच ट्रम्प यांनी देशवासीयांना संबोधित केले. ‘आज येथे केवळ एका अध्यक्षांकडून दुसऱ्या अध्यक्षांकडे, एका सरकारकडून दुसऱ्या सरकारकडे सत्तेचे हस्तांतरण होत नसून वॉशिंग्टन डीसीकडून अमेरिकी नागरिकांच्या हाती सत्तेचे हस्तांतरण होत आहे’, अशा शब्दांत अमेरिकेचे डोनाल्ड ट्रम्प यांनी जनतेच्या भावनांना साद घातली. आजवर केवळ अमेरिकी सरकारे आणि सरकारी अधिकारी गलेलठ्ठ बनले. त्यांनी केवळ आपल्याच तुंबडय़ा भरल्या. यापूर्वीच्या सरकारांचा विजय हा आपल्या नागरिकांचा विजय नव्हता. मात्र हा क्षण तुमचा आहे. हा तुमचा दिवस आहे. हा तुमचा आनंदोत्सव आहे. कोणता पक्ष सरकारवर नियंत्रण करतो हे महत्त्वाचे नाही तर देशाचे नागरिक त्याचे नियंत्रण करतात की नाही हे महत्त्वाचे आहे. आजच्या दिवशी सत्ता पुन्हा लोकांच्या हाती जात आहे, असे ट्रम्प म्हणाले.
ट्रम्प पुढे म्हणाले, आम्ही अन्य देशांशी चांगले संबंध प्रस्थापित करू. आपली संस्कृती कोणावर लादणार नाही. पण अमेरिकेचे भले साधू. देशभक्ती व्यक्त करत असताना कोणाविरुद्ध पूर्वग्रहाला थारा नसेल. मतभेदांवर चर्चा करू पण एकता सोडणार नाही.

देशाच्या शहरी किंवा ग्रामीण भागात जन्मलेल्या बालकाच्या रोमरोमांत विधात्याचा एकच श्वास असेल. सर्वाच्या रक्ताचा वर्ण लालच असेल. आपल्या मनांत भीती असता कामा नये. आपण आपले संरक्षण करू, आपली सेनादले आपले संरक्षण करतील आणि आपला देव आपले संरक्षण करेल. एकत्रपणे आपण अमेरिकेला पुन्हा बलशाली, सुरक्षित, संपन्न आणि महान बनवू असे ट्रम्प म्हणाले.

शपथविधी सोहळ्याच्या या क्षणाच्या मुळाशी एकच श्रद्धा आहे, ती म्हणजे लोकांसाठी सत्ता राबवणे

आजवर आपण आपल्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करून अन्य देशांच्या सीमांचे रक्षण केले
अमेरिकेची संपत्ती अन्य देशांच्या घशात गेली. कारखाने बंद होत गेले. नागरिकांच्या नोकऱ्या जात होत्या. मात्र तो भूतकाळ आहे. आता फक्त भविष्याकडे पाहायचे आहे

बंद कारखाने, बिघडलेली शिक्षणव्यवस्था अशा अमेरिकेच्या अडचणी आता संपणार आहेत. आजपासून नवी दृष्टी आपल्या शासनाला प्रेरणा देईल

प्रत्येक निर्णय अमेरिकेच्या भल्यासाठी असेल. आम्ही आमच्या नोकऱ्या, आमची सुरक्षा, आपली स्वप्ने पुन्हा खेचून आणू. आपल्या संरक्षणावर भर देऊ. या संरक्षणातून सुबत्ता येईल

मी कधीही तुम्हाला पराभूत होऊ देणार नाही. नवे रस्ते, नवे पूल, नवे रेल्वेमार्ग अशा नव्या पायाभूत सुविधांची उभारणी करू

केवळ बोलघेवडय़ा राजकारण्यांची सद्दी आता संपेल. आता प्रत्यक्ष काम करणाऱ्यांनाच जागा असेल

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹‘बोईंग पी-81’ कराराला अमेरिकेची मंजुरी

https://t.me/chalughadamodi/3810
हिंदी महासागरामध्ये चीनच्या पाणबुडय़ा शोधण्यासाठी अमेरिका भारताला साहाय्य करणार आहे. याबाबत आगामी काळात उभय देश एकत्रितपणे काम करणार असून, आतापर्यंतच्या इतिहासात दोन्ही देश या मुद्यावर एकत्रपणे काम करण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे जाणकारांचे मत आहे. पाणबुडय़ा शोधण्याच्या कामी भारताला मदत करण्यासाठी वॉशिंग्टनने बोईंग पी-81 कराराला मंजुरी दिली आहे. ‘बोईंग पी-81’ हे बहुउद्देशीय मेरिटाइम एअरक्राफ्ट आहे. याचा वापर अनेक ठिकाणी केला जाऊ शकतो. या विमानात असलेल्या अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे ‘सबमरिन हंटर’ अशीही याची ओळख आहे.

अमेरिकेचे पॅसिफिक कमांडचे ऍडमिरल हॅरी हॅरिस यांनी उभय देशांच्या या कराराला पुष्टी दिली आहे. यामधील तंत्रज्ञानामुळे भारताच्या क्षमतेत वाढ होणार असल्याचे अमेरिकेचे म्हणणे आहे. पाणबुडय़ांच्या शोधासाठी आखण्यात येणाऱया मोहिमेची माहिती परस्पर देशांना देण्यात येणार असून, या मुद्यावर एकमेकांचे सहकार्यही घेण्यात येणार आहे. सद्यस्थितीत शत्रूराष्ट्रांच्या पाणबुडय़ांवर नजर ठेवणे जिकिरीचे ठरत असल्याचे हॅरिस यांचे म्हणणे आहे.
सागरी सुरक्षा मजबूत करणे हाच उद्देश
जपान-अमेरिका आणि भारत यांच्या दरम्यान अरबी समुद्रात मलबार प्रात्यक्षिकांच्या दरम्यान मित्रराष्ट्रांचे सहकार्य घेण्याबाबत विचारविमर्ष करण्यात आला होता. ही प्रात्यक्षिके दरवर्षी घेतली जातात. याचा मुख्य उद्देश स्वदेशी सुरक्षेची क्षमता वाढविण्याबरोबरच भारताची सागरी सुरक्षा अधिक मजबूत करणे हा असल्याचे ऍडमिरल हॅरिस यांचे म्हणणे आहे.

पाकिस्तान आणि चीनदरम्यान आर्थिक कॉरिडॉरची निर्मिती
चीन पाकिस्तानच्या साहाय्याने एका आर्थिक कॉरिडॉरची निर्मिती करीत आहे. या माध्यमातून चीन आपल्या व्यापार वाढीसाठी प्रयत्नरत आहे. भारताने सुरुवातीपासूनच या कॉरिडॉरच्या निर्मितीला बेकायदेशीर मानले आहे. ज्या जागेवर या कॉरिडॉरची निर्मिती होत आहे, त्या क्षेत्रात पाकने बेकायदेशीररित्या कब्जा केलेला आहे. तर दुसरीकडे चीनने भारताला या योजनेत सहभागी होण्यासाठी आवाहन केले आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹जर्मनी मध्ये प्रथम फुटबॉल साठी समर्पित वर्तमानपत्र सुरू करण्यात आले आहे

जर्मन मधील बुंडेस्लिंगा हंगामाच्या बरोबरीने, फुटबॉल चाहत्यांसाठी प्रथमच फूटबॉल खेळासाठी समर्पित असे "फूसबॉलबिल्ड / FussballBild" (किंवा फूटबॉलबिल्ड') नावाने दैनिक वृत्तपत्र सुरू करण्यात आले आहे. निवृत्त जर्मनी स्ट्रायकर लुकास पोदोल्स्की, जो आता गालातसरे साठी खेळत आहे, यासाठी एक साप्ताहिक लेख लिहणार.

32 पानांचे हे वृत्तपत्र सोमवार ते शनिवार दरम्यान प्रकाशित केले जाणार आणि याची किंमत एक युरो ($ 1.06) इतकी राहणार. यामधील सामग्री ही बिल्ड च्या 23 प्रादेशिक आवृत्ती पासून संचयीत केली जाईल. हे अॅक्सेल स्प्रिंगर मीडिया हाऊस (युरोपचा सर्वात मोठा प्रसारमाध्यम समूह) कडून प्रकाशित करण्यात आले आहे.

स्पेन मध्ये AS आणि मरका, इटली मध्ये ला गज्जेट्टा डेल्लो स्पोर्ट आणि फ्रान्स मध्ये ला’ईक्विप असे देखील दैनिक क्रीडा वृत्तपत्रे इतर देशात प्रक्स्शित होतात.

जनस्थान पुरस्कार:-२०१७
-------------------------------
* मराठी साहित्यक्षेत्रात मानाचा समजला जाणारा यंदाचा जनस्थान पुरस्कार ज्येष्ठ समीक्षक व कथाकार डॉ. विजया राजाध्यक्ष यांना जाहीर झाला.
* कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणाऱ्या या पुरस्काराचे हे १४ वे वर्ष आहे.
* एक लाख रूपये, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप असते.
विजया राज्याध्यक्ष:-
* कथाकार आणि समीक्षक म्हणून प्रसिद्ध असलेल्या विजया राजाध्यक्ष यांनी मानिनी सदरातून ललित लेखनाला सुरवात केली.
* त्याचे नाव होते नित्य नवा दिस जागृतीचा. सहा दशकं अविरतपणे लेखन करणाऱ्या ज्येष्ठ साहित्यिक विजया राज्याध्यक्ष यांची प्रामुख्याने ओळख आहे ती कथालेखिका आणि समीक्षक म्हणून.
* १९६५ मध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘अधांतर’ या पहिल्या कथासंग्रहानंतर त्यांचे तब्बल १९ कथासंग्रह प्रसिद्ध झाले आहेत. मराठी साहित्यक्षेत्रात त्यांचे ‘मर्ढेकरांची कविता : स्वरूप आणि संदर्भ’ , ‘बहुपेडी विंदा (चरित्र-आत्मचरित्र समीक्षा)’, ‘आहे मनोहर तरी … वाचन आणि विवेचन’ हे समीक्षापर लेखन प्रसिद्ध आहे. याशिवाय ‘अन्वयार्थ’, ‘दोनच रंग’ , ‘अनोळखी’ , ‘जास्वंद’ , ‘चैतन्याचे ऊन’ , ‘समांतर कथा’ हे कथासंग्रहही आहेत.
* या अगोदर हा पुरस्कार
विजय तेंडुलकर (१९९१),
विंदा करंदीकर (१९९३),
इंदिरा संत (१९९५),
गंगाधर गाडगीळ (१९९७),
व्यंकटेश माडगुळकर (१९९९),
ना. पेंडसे (२००१),
मंगेश पाडगावकर (२००३),
नारायण सुर्वे (२००५),
बाबुराव बागुल (२००७),
ना. धो. मनोहर (२००९),
महेश एलकुंचवार (२०११),
भालचंद्र नेमाडे (२०१३),
अरुण साधू (२०१५)
यांना जनस्थान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

राष्ट्रीय पर्यटन पुरस्कार :-२०१६
--------------------------------------
* सर्वश्रेष्ठ विमानतळ:- छत्रपती शिवाजी विमानतळ (मुंबई)
* व्यापक पर्यटन विकास:- मध्यप्रदेश, गुजराथ,कर्नाटक
* सर्वश्रेष्ठ पर्यटन अनुकूल रेल्वे स्थानक:- सवाई माधोपर(राजस्थान)
* सर्वश्रेष्ठ हेरीटेज हॉटेल:- कोकोनट लगून (कुमारकॉम)
* सर्वश्रेष्ठ विरासत शहर:- वारंगळ (तेलगणा)
* सर्वश्रेष्ठ पंचतारांकित  हॉटेल:- टरटल ऑन द बीच (कोवलम, केरळ

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹राष्ट्रपतींकडून चौघांची फाशीची शिक्षा माफ

गया जिल्ह्यातील 1992 रोजी झालेल्या सामूहिक हत्याकांड प्रकरणातील चार आरोपींना आज नववर्षानिमित्त राष्ट्रपतींकडून दिलासा मिळाला. राष्ट्रपतींनी चौघांची फाशीची शिक्षा रद्द करत शिक्षेचे रूपांतर जन्मठेपेत केले. विशेष म्हणजे केंद्रीय गृह मंत्रालयाने या आरोपींची फाशीची शिक्षा रद्द करू नये, अशी शिफारस केली होती.

कृष्णा मोची, नन्हेलाल मोची, वीर कुंवर पासवान आणि धर्मेंद्र सिंह ऊर्फ धारु सिंह अशी त्या आरोपींची नावे आहेत. त्यांनी फाशीची शिक्षा माफ व्हावी, यासाठी 2004 मध्ये दयेचा अर्ज केला होता, तर केंद्रीय गृह मंत्रालयाने शिक्षा रद्द करू नये, अशी विनंती केली होती; परंतु राष्ट्रपतींनी दयेच्या अर्जावर निर्णय घेण्यास झालेला विलंब आणि मानवाधिकार आयोगाची मते लक्षात घेत आरोपींची शिक्षा माफ करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येते.

जून 2001 मध्ये नन्हेलाल मोची, कृष्णा मोची, वीर पासवान आणि धर्मेंद्र सिंह या चौघांना फाशीची शिक्षा सुनावली होती. ही शिक्षा सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवली होती. हे चौघेही माओवादी असून, त्यांनी 34 जणांची सामूहिक हत्या केली होती. बिहारच्या गृह विभागाकडून 2004 मध्ये दयेचा अर्ज पाठवण्यात आल्याचे म्हटले होते; परंतु तो अर्ज राष्ट्रपती भवनकडे पोचला नाही अन् गृह मंत्रालयाकडेही पोचला नसल्याचे उघडकीस आले होते.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹वायू प्रदुषणामुळे पक्षी स्थलांतरात घट

सुलतानपूर पक्षी अभयारण्य हे पक्षी निरिक्षकांचे आवडते ठिकाण. हिवाळ्यात अनेक परदेशी पक्ष्यांचे येथे स्थलांतर होते.

 गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी अनेक वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी येथे स्थलांतरीत झाले आहेत. असे असले तरी एकूण स्थलांतरीत पक्ष्यांची संख्या मात्र कमी झाली आहे. अभयारण्याच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, वायू प्रदूषणामुळे ही संख्या कमी झाली आहे.
मागील हंगामात जवळजवळ 25 हजार परदेशी पक्षी सुलतानपूर पक्षी अभयारण्यात स्थलांतरीत झाले होते. परंतु, यावर्षी मात्र पक्ष्यांची संख्या 18 हजारांवर आली आहे. असे असले तरी येत्या दोन महिन्यात ही संख्या वाढण्याची शक्यता पक्षी निरिक्षकांनी नोंदवली आहे.

पक्षी निरिक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार, काही पक्षांच्या प्रजाती या फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यानंतरच अभयारण्यात दाखल होतात. त्यामुळे अनेक वेगवेगऴ्या प्रकारचे पक्षी बघण्याची परवणी पर्यटकांना मिळण्याची शक्यता आहे.

गेले दोन वर्षी उन्याळ्याचे आगमन लवकर होते आहे. तापमानात होणाऱ्या वाढीचा पक्ष्यांच्या स्थलांतरावर नक्कीच परिणाम होत आहे. मागील वर्षी देखील अशी परिस्थीती असली तरी हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यात अनेक पक्षांचे स्थलांतर झाले होते. यावर्षी देखील अशीच शक्यता असल्याचे पक्षीतज्ञ करुणा सिंग यांनी म्हटले आहे.
https://t.me/chalughadamodi/3823

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹चीनमध्ये युरोपच्या लोकसंख्येएवढे इंटरनेट युजर्स!

चीनमध्ये इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या ही गेल्या वर्षात 6.2 टक्क्यांनी वाढून सुमारे 70 कोटी 31 लाख इतकी झाली आहे. चीनमध्ये इंटरनेट वापरणाऱ्यांचा हा आकडा युरोपच्या एकूण लोकसंख्येएवढा आहे! चीनमधील सरकारी मालकीचे वृत्तपत्र असलेल्या "ग्लोबल टाईम्स'ने यासंदर्भातील एका अहवालाचा दाखला देत हे वृत्त दिले.

देशात इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या ही 2016 या वर्षात सुमारे 4.2 कोटींनी वाढली. चीनच्या एकूण लोकसंख्येपैकी 53.2 % नागरिक आता इंटरनेट वापरत असल्याचे या अहवालामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. स्मार्टफोन्सचा प्रचंड प्रमाणात वाढलेला वापर, हे एकंदर इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या वाढण्यामागील एक प्रमुख कारण असल्याचे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील शांघायमधील तज्ज्ञ ली यी यांनी सांगितले.
इंटरनेट वापरणाऱ्या नागरिकांमध्ये स्मार्टफोन वापरणाऱ्यांचे प्रमाण 95.1 इतके प्रचंड असल्याचे आढळून आले आहे. 2015 मध्ये हे प्रमाण 90.1 % इतके होते.

याचबरोबर, इंटरनेटच्या माध्यमामधूनच आर्थिक व्यवहार करणाऱ्या नागरिकांच्या संख्येतही गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये 31.2 टक्क्यांनी वाढ झाली आहे. चीनमध्ये स्मार्टफोन्स व इंटरनेटच्या माध्यमामधून आर्थिक व्यवहार केलेल्या नागरिकांची संख्या 46.9 कोटी इतकी असल्याचे निष्पन्न झाले आहे. डाऊनलोड करण्यात आलेल्या "ऍप्स'मध्ये ऑनलाईन म्युझिक व व्हिडिओ, ऑनलाईन पेमेंट्ससंदर्भातील मोबाईल ऍप्लिकेशन्सचे प्रमाण सर्वाधिक आहे.

याचबरोबर, अन्न मागविण्यासाठी वापरण्यात येत असलेल्या मोबाईल ऍप्सच्या युजर्सचे 2016 या वर्षात तब्बल 83.7 टक्क्यांनी वाढल्याचे या अहवालात म्हटले आहे. या माध्यमामधून अन्न मागविणाऱ्या नागरिकांच्या संख्येत तब्बल 20.86 कोटींनी वाढ झाली आहे.

https://t.me/chalughadamodi/3825
चीनमध्ये इंटरनेट वापरणाऱ्या नागरिकांमध्ये तब्बल 27% हे ग्रामीण भागामधील आहेत.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹चाइल्ड पॉर्न पाहण्यात दिल्ली, अमृतसर आघाडीवर

लहान मुलांचं लैगिंक शोषण करुन अश्लिल व्हिडिओ दाखवणाऱ्या वेबसाईट सर्फ करण्यात अमृतसर, दिल्ली आणि लखनऊ आघाडीवर असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या शासकीय आकडेवारीनुसार ही बाब उघड झाली आहे.

https://t.me/chalughadamodi/3827
अशा प्रकारच्या अश्लिल वेबसाईट, साहित्य पाहण्यात आणि शेअर करण्यात देशात अमृतसर हे शहर क्रमांक एकवर आहे. तर त्या पाठोपाठ दिल्ली शहराचा क्रमांक लागतो. उत्तर प्रदेशातील लखनऊ तिसऱ्या, तर केरळमधील अलप्पुझा चौथ्या स्थानावर आहे.

विशेष म्हणजे सहा महिन्यांपूर्वी प्रसिद्ध झालेल्या अहवालात आगरा, कानपूर, बराकपूर आणि दिमापूर अशा शहरांचा समावेश नव्हता. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीनुसार आता या शहरांचा देखील बाल लैंगिक शोषणाचे अश्लिल व्हिडिओ पाहणाऱ्या शहरांच्या यादीत समावेश झाला आहे.

केवळ भारतात तयार झालेल्या आयपी अॅड्रेसच्या आधारे ही आकडेवारी प्रसिद्ध करण्यात आली आहे. मात्र टीओआर ( The Onion Router)चा वापर करून भारतात सर्फिंग करुन देखील ते परदेशात कुठेतरी सर्फ केल्याचं भासवणारी उदाहरणं देखील समोर आली आहेत. हे पाहता अशा वेबसाइट सर्फ करण्याचा आवाका आणखी मोठा असण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

ऑनलाइन बाल लैंगिक शोषणावर आधारित अश्लिल वेबसाइट या ऑफलाइन बाल लैंगिक शोषण दाखवणाऱ्या वेबसाइटशी थेट जोडल्या गेल्या आहेत. ज्या अर्थी लहान मुलांचं लैंगिक शोषण करणारे व्हिडिओ आहेत, त्या अर्थी लैंगिक शोषणाचे बळी ठरलेली मुलं समाजात कुठे तरी वावरत आहेत या वास्तवाकडेही शासकीय माहितमुळे लक्ष वेधलं गेलं आहे.

इतक्या मोठ्या प्रमाणावर बाल लैंगिक शोषणाचे व्हिडिओ खासगी सोशल मीडियावर शेअर होत असताना देखील त्या प्रमाणात तक्रारी मात्र नगण्यच आहेत. अशा तक्रारी करता याव्यात यासाठी हॉट लाइन सुरू केलेल्या मुंबईतील 'आरंभ इंडिया' या स्वयंसेवी संस्थेकडे गेल्या ४ महिन्यांच्या काळात केवळ २११ तक्रारी आल्या. तसंच, २०१५-१६ मध्ये राष्ट्रीय क्राइम रेकॉर्ड ब्युरोकडे केवळ १,५४० प्रकरणांची नोंद झाली आहे.

बाल लैंगिक शोषणाचे व्हिडिओ पाहणे किंवा शेअर करणं हा किती गंभीर गुन्हा आहे, याबाबत बोलताना सायबर क्राइम कायदातज्ज्ञ प्रशांत माळी म्हणाले, ' असे व्हिडिओ पाहणे किंवा शेअर करणे किती गंभीर गुन्हा आहे याची फारच थोड्या लोकांना कल्पना आहे. विद्यमान कायद्यानुसार हा गुन्हा अजामीनपात्र आहे. तो करणाऱ्याला ७ वर्षं तुरुंगवास आणि १० लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात येतो.'
अशा प्रकारच्या गुन्ह्यांचा आंतरराष्ट्रीय संबंध असणे हा असे गुन्हे शोधून काढण्यातील मोठी अडचण आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹‘लुपिन’च्या नैराश्यावरील औषधास ‘यूएसएफडीए’ची मान्यता

https://t.me/chalughadamodi/3829
लुपिनला आणखी एका औषधासाठी अमेरिकी अन्न औषध प्रशासनाची (यूएसएफडीए) मंजुरी मिळाली आहे. कंपनीच्या नैराश्यावर उपचार करणार्या जेनेरिक औषधास मंजुरी मिळाली आहे.

''यूएसएफडीए'कडून 12.5 मिग्रॅ, 25 मिग्रॅ आणि 37.5 मिग्रॅ औषधाची मात्रा असलेल्या औषधांच्या विक्रीस परवानगी देण्यात आली आहे,'' असे लुपिनने बीएसईला सादर केलेल्या अहवालात सांगितले आहे. कंपनी लवकरच उत्पादनाची जाहिरात करणार असल्याचेही कंपनीने स्पष्ट केले आहे.

औदासिन्य आणि महिलांना मासिक पाळी येण्याअगोदर होणार्या मानसिक बदलांवर उपचारासाठी हे औषध उपयोगी आहे. या सकारात्मक बातमीमुळे आज (सोमवार) मुंबई शेअर बाजारात कंपनीचा शेअर वधारला होता. शेअरने आज इंट्राडे व्यवहारात 1494 रुपयांची उच्चांकी पातळी गाठली.

सध्या मुंबई शेअर बाजारात लुपिनचा शेअर 1483.70 रुपयांवर व्यवहार करत असून 18.70 रुपयांनी म्हणजेच 1.28 टक्क्यांनी वधारला आहे. दोन रुपये दर्शनी मूल्य असलेल्या शेअरने वर्षभरात 1294.05 रुपयांची नीचांकी तर 1911.55 रुपयांची उच्चांकी पातळी गाठली आहे. सध्याच्या शेअरच्या बाजारभावानुसार कंपनीचे रु.66,950.83 बाजारभांडवल आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹साईनाला मलेशिया मास्टर्स स्पर्धेचे विजेतेपद

https://t.me/chalughadamodi/3831
गुडघ्याच्या दुखापतीतून सावरल्यानंतर भारताची बॅडमिंटनपटू साईना नेहवालला प्रथमच मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद पटकाविण्यात यश आले आहे.

आज (रविवार) झालेल्या अंतिम फेरीतच्या सामन्यात साईनाने 46 मिनिटे चाललेल्या सामन्यात थायलंडच्या पोर्नपावी चोचूवोंगचा 22-10, 22-10 असा पराभव करत विजेतेपदावर आपले नाव कोरले. अग्रमानांकित साईनाने पहिल्या गेममध्ये 4-0 आघाडी घेतली होती. पण, 19 वर्षीय चोचूवोंगने कडवी लढत दिली. अखेर साईनाने 22-20 असा पहिला गेम जिंकण्यात यशस्वी झाल्यानंतर दुसऱ्या गेममध्येही तुल्यबळ लढत पहायला मिळाली. साईनाने हाँगकाँगच्या यिप पुई यिन हिचा उपांत्य फेरीत 21-13, 21-10 असा पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली होती.

साईना दुखापतीनंतर पुनरागमन करीत आहे. त्यामुळे तिच्यासाठी हे विजेतेपद महत्त्वाचे आहे. साईनाने यापूर्वी जून 2016 मध्ये ऑस्ट्रेलियन ओपनचे विजेतेपद मिळविले होते.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹‘आयआयएम’ना पदवी देण्याचे अधिकार

देशातील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटना (आयआयएम) पदवी देण्याचे अधिकार बहाल करणारे विधेयक लवकरच केंद्रीय मंत्रिमंडळासमोर मंजुरीसाठी मांडण्यात येणार आहे.

‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट बिल २०१७’ नावाचे हे विधेयक असून, एखाद्या ‘आयआयएम’ने प्रस्तावित कायद्याच्या अपेक्षेनुसार कामगिरी न केल्यास त्या संस्थेच्या संचालकाची हायकोर्टाचे न्यायाधीश किंवा त्याच्याहून मोठ्या पदावरील व्यक्तीकरवी चौकशी करण्याची ‘आयआयएम’च्या प्रशासकीय मंडळाला देऊ केलेली मुभा, ही या विधेयकाच्या मसुद्यातील एक महत्त्वाची तरतूद आहे.

या चौकशीच्या आधारावर प्रशासकीय मंडळाला संचालकाला पदावरून दूर करता येऊ शकेल किंवा इतर कोणतीही कारवाई करता येईल. मात्र, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संचालकाला त्याची बाजू मांडण्याची संधी दिल्यानंतरच मंडळाला त्यांच्यावर कारवाई करता येईल. ‘आयआयएम’ची प्रशासकीय मंडळे दर काही वर्षांनी आपापल्या संस्थेचे मूल्यमापन करतील, असेही या विधेयकाच्या प्रस्तावित मसुद्यात म्हटल्याचे समजते.

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने या प्रस्तावित विधेयकाची कायदा मंत्रालयाकडून छाननी करून घेतली असून, ते लवकरच केंद्रीय मंत्रिमंडळापुढे मंजुरीसाठी येईल. हे विधेयक गेल्याच वर्षी आणण्याची मनुष्यबळ विकास मंत्रालयाची इच्छा होती; पण यावर अधिक चर्चा व्हावी, असे मत पडले.
 ‘आयआयएम’च्या प्रशासकीय मंडळांना अधिक स्वायत्तता आणि अधिकार देण्याचा सरकारचा मनोदय आहे.

विधेयकातील महत्त्वाच्या तरतुदी

■ ‘आयआयएम’ना पदवी बहाल करण्याचे अधिकार मिळतील.
■ ‘आयआयएम’ना वैधानिक मान्यता देऊन आणि अधिक स्वायत्तता बहाल करून त्यांना राष्ट्रीय महत्त्वाच्या संस्था म्हणून घोषित केले जाईल.
■ संचालकाचे पद रिक्त झाल्यास त्या जागी सर्वांत वरिष्ठ शिक्षक पदभार स्वीकारेल.
■ सर्व ‘आयआयएम’साठीचे जे समान विषय असतील, ते समन्वय समितीसमोर येतील.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹यंदा ‘अल निनो’मुळे कमी पावसाची भीती

गतवर्षी पाऊस चांगला झाला असला तरी आता २०१४ व २०१५ नंतर ‘अल निनो’ परत येणार असल्याचा अंदाज ‘स्कायमेट’ या खासगी हवामान संस्थेने दिला आहे. ‘अल निनो’ परत आल्यास यंदाच्या वर्षी पाऊस कमी होण्याची भीती आहे.

‘स्कायमेट’चे मुख्य कार्यकारी अधिकारी जतिन सिंग यांनी सांगितले की, साधारणपणे ‘अल निनो’ नंतर ‘ला निना’ परिणाम दिसत असतो. तो मान्सूनला चांगला असतो. ‘ला निना’ हा पॅसिफिकमधील पाणी थंड होण्याशी तर ‘एल निनो’ पाणी गरम होण्याशी संबंधित आहे. डिसेंबरमध्ये हवामान प्रारूपांनी ‘ला निना’ कमजोर असल्याचे दाखवले आहे. त्यामुळे पावसाची थोडी आशा होती. पण जानेवारीत हवामान प्रारूपे ‘एल निनो’ पुन्हा येणार असे दाखवत आहेत. तो सहा महिने टिकू शकतो त्यामुळे पावसावर वाईट परिणाम होण्याची शक्यता आहे. नौऋत्य मान्सूनमध्ये इंडियन ओशन डायपोल हा घटक महत्वाचा असतो. तो मात्र सकारात्मक असून पावसासाठी तो फायद्याचा ठरणार आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹बँकांची सायबर सुरक्षा पडताळण्यासाठी रिझर्व्ह बँक हॅकिंग करणार

मागील सहा महिन्यांमध्ये चार सरकारी बँका सायबर गुन्ह्याच्या शिकार झाल्या आहेत. यामुळे आता रिझर्व्ह बँकेने बँकांच्या ऑनलाईन सुरक्षेचा पडताळा करण्यासाठी एथिकल हॅकिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी रिझर्व्ह बँकेने एथिकल हॅकर्सची टिम तयार करण्यास सुरुवात केली आहे.

रिझर्व्ह बँक तयार करत असलेल्या टिमकडे बँकेच्या सुरक्षा यंत्रणेतील त्रुटी शोधण्याचे काम देण्यात येणार आहे. यानंतर बँकांच्या सुरक्षा यंत्रणेत काही त्रुटी आढळल्यास ही टिम संबंधित बँकेला त्यामध्ये दुरुस्ती करण्यास मदत करणार आहे. ‘सायबर हल्ल्यापासून स्वत:चा आणि सर्व बँकांचा बचाव करण्यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाची सुरक्षा यंत्रणा उभारण्याचा रिझर्व्ह बँकेचा विचार आहे,’ अशी माहिती या क्षेत्रातील एका सूत्राने दिली आहे. ‘रिझर्व्ह बँकेकडून सुरक्षा यंत्रणेची तपासणी करण्यासाठी एथिकल हॅकिंग, नियोजित आणि अनियोजित ऑडिट करणे अशा मार्गांचा वापर करण्यात येणार आहे. सर्व बँकांनी सायबर सुरक्षेच्या अत्याधुनिक उपायांचा अवलंब करावा, यासाठी रिझर्व्ह बँक प्रयत्नशील असणार आहे,’ अशी माहिती वरिष्ठ पातळीवरील सूत्रांनी दिली आहे.
https://t.me/chalughadamodi/3835

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹विशेष दुग्ध प्रकल्प यादीत यवतमाळऐवजी चंद्रपूरचा समावेश

विदर्भ आणि मराठवाडय़ात दुग्ध उत्पादन वाढविण्यासाठी निश्चित करण्यात आलेल्या दहा जिल्ह्य़ांच्या यादीतून यवतमाळला वगळून त्याऐवजी चंद्रपूर जिल्ह्य़ाचा समावेश करण्यात आला आहे. यवतमाळात यापूर्वीच ‘अमूल’च्या माध्यमातून दुग्ध उत्पादन वाढीसाठी प्रयत्न सुरू असल्याने हा बदल करण्यात आल्याचे कृषी खात्याकडून कळविण्यात आले आहे.

पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत विदर्भ आणि मराठवाडा या भागात दुधाचे उत्पादन कमी होत असल्याने ते वाढावे म्हणून केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून वरील दोन्ही मागासभागातील एकूण दहा जिल्ह्य़ात राष्ट्रीय दुग्धविकास मंडळाच्या माध्यमातून विशेष प्रकल्प राबविण्याचा निर्णय यापूर्वीच झाला आहे. प्रस्तावित दहा जिल्ह्य़ांपैकी यवतमाळ जिल्ह्य़ात अमूलमार्फत यापूर्वीच दुध नियोजनाचे काम सुरू आहे. त्यामुळे या जिल्ह्य़ाऐवजी चंद्रपूर जिल्ह्य़ाचा समावेश प्रकल्पांच्या यादीत करण्यात आला आहे. या प्रकल्पात विदर्भातील अकोला, अमरावती, बुलढाणा, वर्धा, नागपूर आणि यवतमाळ आणि मराठवाडय़ातील लातूर, नांदेड, जालना व उस्मानाबाद या जिल्ह्य़ांचा समावेश होता. मात्र, राष्ट्रीय दुग्धविकास मंडळाने केलेल्या सूचनेनंतर यवतमाळऐवजी आता चंद्रपूरचा समावेश करण्यात येणार आहे.

२०१७ ते २०२० या काळात ही योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेसाठी प्रकल्प संचालक म्हणूून जात पडताळणी समिती अमरावतीचे अध्यक्ष रवींद्र ठाकरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रकल्पाचे काम पूर्ण होईपर्यंत त्यांची इतत्र बदली करू नये, अशी विनंती महसूल खात्याकडे विनंती केली जाणार आहे. त्याचप्रमाणे प्रकल्पाकरिता कृषी खात्याच्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात आली आहे. नागपूरमध्ये राष्ट्रीय दुग्धविकास मंडळाला शासकीय दूध योजनेची जागा भाडेपट्टीवर देण्यात आली आहे. तसा करारही यापूर्वीच झाला आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹लोकमान्य टिळकांची सिंहगर्जना राजपथावर घुमणार

प्रजासत्ताक दिन अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपले असून यंदा ‘स्वराज्य हा माझा जन्मसिध्द हक्क आहे आणि तो मि मिळवणारच’ ही लोकमान्या टिळकांची धीरगंभीर आवाजातील सिंहगर्जन यांदाच्या प्रजासत्ताकदिनी राजपथावर घुमणार आहे. प्रजासत्ताकदिनाच्या संचलनात महाराष्ट्राकडून सादर होणारा चित्ररथ लोकमान्यांच्या जीवनकार्याचा वेध घेणारा आहे.

https://t.me/chalughadamodi/3838
प्रसिध्द कलादिगदर्शक चंद्रशेखर मोरे यांनी या चित्ररथाची संकल्पना मेंडली असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली 40 कलाकारांनी हा देखवा चित्ररथ उभारला आहे.लोकमान्य टिळकांच्या 160व्या जयंतीनिमित्त या चित्ररथाच्या माध्यमातून त्यांच्या बहूआयामी व्यक्तिमत्त्वाला आणि स्वातंत्र्य चळवळीत त्यांच्या योगदानाला उजाळा दिला जाणार आहे. ‘मराठा’ व ‘केसरी’ या वृत्तपत्रांच्या माध्यमांतून लोकमान्यांनी केलेली जनजागृती, ब्रिटिश राजवटीविरोधात केलेला संघर्ष, सार्वजनिक गणेशोत्सव व शिवजयंती यांसारखे उत्सव सुरू स्वातंत्र्यचळवळीसाठी केलेली जनजागृती, टिळकांवर ब्रिटिश सरकारतर्पे चालवण्यात आलेले खटले आदी बाबी चित्ररथाच्या माध्यमातून दाखविल्या जाणार आहेत. या चित्ररथाच्या दोन्ही बाजूला ‘पयलं नमन, करितो वंदन..’ या गीतावर नृत्य केले जाईल.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹आता पासवर्ड आणि पिन नंबरशिवाय डिजिटल व्यवहार शक्य; सरकारकडून ‘आधार पे’ ऍप लॉन्च

गरिब आणि अशिक्षित लोकांना डिजिटल व्यवहार करता यावे, यासाठी केंद्र सरकारकडून ‘आधार पे’चा प्रचार-प्रसार सुरू करण्यात आला आहे. ‘आधार पे’च्या माध्यमातून फिंगरप्रिंटच्या सहाय्याने व्यवहार करता येणार आहेत. आधार पे हे आधीपासूनच आधार कार्डशी संलग्न असलेल्या पेमेंट यंत्रणेचे एईपीएसचे व्यापाऱ्यांसाठीची आवृत्ती (मर्चंट व्हर्जन) आहे.

‘आधार पे’ पासवर्ड आणि पिनच्या मदतीने केल्या जाणाऱ्या ऑनलाईन आणि डेबिट-क्रेडिट कारच्या माध्यमातून होणाऱ्या व्यवहारांची जागा घेणार आहे. या ऍपचा वापर सहजसोपा करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या ऍपच्या माध्यमातून व्यवहार करताना लोकांना आधार नंबर, बँकेचे नाव आणि फिंगरप्रिंट द्यावे लागले. ‘आधार पे ऍप सर्व एँड्रॉईड फोनवर चालेल. यासाठी फक्त फिंगर बायोमेट्रिक डिव्हाईस जोडलेले असणे आवश्यक आहे. या ऍपच्या माध्यमातून डेबिट-क्रेडिट कार्ड आणि पिन नंबरशिवाय कॅशलेस व्यवहार करणे शक्य होणार आहे. त्यासाठी ग्राहकांकडे स्मार्टफोन असणे बंधनकारक आवश्यक असणार नाही,’ असे यूआयडीएआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी ए. बी. पाण्डेय यांनी सांगितले आहे.

आधार पे दुकानदारांमध्ये लोकप्रिय करण्यासाठी सरकारने बँकांच्या प्रत्येक शाखेला ३० ते ४० व्यापाऱ्यांना या सुविधेशी जोडण्याच्या सूचना केल्या आहेत. आतापर्यंत आंध्रा बँक, आयडीएफसी बँक, सिंडिकेट, एसबीआय आणि इंडसइंड बँक या पाच बँका ‘आधार पे’शी जोडण्यात आल्या आहेत. लवकरच इतरही अनेक बँका आधारे पेला जोडण्यात येणार आहेत. ‘आधार पे विषयी व्यापाऱ्यांच्या मनात विश्वास निर्माण करण्याचे काम सुरू आहे. आधार पेच्या माध्यमातून व्यवहार करण्यासाठी दुकानदारांना २ हजार रुपयांचे बायोमेट्रिक यंत्र विकत घ्यावे लागले. या यंत्राची किंमत व्यापाऱ्यांकडून हळूहळू वसूल करण्याचा विचार सरकारकडून सुरू आहे. असे झाले तरच व्यापारी आधार पेच्या माध्यमातून व्यवहार करतील, असे सरकारला वाटते,’ अशी माहिती एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने दिली आहे.

आधार पेच्या माध्यमातून होणारे व्यवहार सुरक्षित असल्याचा दावा यूआयडीएआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी ए. बी. पाण्डेय यांनी केला आहे. ‘आधार पे इतर डिजिटल व्यवहारांपेक्षा जास्त सुरक्षित आहे. ग्राहक आणि व्यापारी यांची बँक खाती या व्यवहारांमध्ये संलग्न असतील. त्यामुळे याचा गैरवापर होण्याची शक्यता कमी आहे. फिंगरप्रिंटची नक्कल करणे अशक्य आहे. जर एखाद्या व्यापाऱ्याने फिंगरप्रिंटचा गैरवापर करण्याचा प्रयत्न केला, तर तो लगेच पकडला जाऊ शकतो. कारण या ऍपच्या माध्यमातून व्यवहार झालेल्या ठिकाणाची माहिती बँकेला मिळते,’ असे यूआयडीएआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी ए. बी. पाण्डेय यांनी सांगितले.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹म्हशींच्या कंबाला शर्यतींवरील बंदी उठवण्यासाठी निदर्शनांची तयारी

कर्नाटकात २६ जानेवारीला आंदोलन

तामिळनाडूत बैलांच्या खेळाबाबत जलिकट्टूचा वाद शमला नसतानाच आता कर्नाटकात म्हशींच्या कंबाला शर्यतींसाठी परवानगी मिळावी यासाठी मोठे आंदोलन मंगळुरू येथे आयोजित केले जाणार आहे.

 म्हशींच्या शर्यतींना परवानगीच्या मागणीसाठी हे आंदोलन पुढील आठवडय़ात होणार आहे. कंबाला समितीचे अध्यक्ष अशोक राय यांनी सांगितले की, आम्ही पुढील आठवडय़ात निदर्शने करणार असून त्यात राजकीय नेत्यांसह ५० हजार लोक उपस्थित राहतील. कंबाला हा पारंपरिक खेळ असून किनारी भागातील जिल्ह्य़ात दलदलीच्या शेतात तो खेळला जातो. जलीकट्टूला परवानगी दिली असून त्याचा आदर्श ठेवत आम्ही मंगळुरूत आंदोलन करणार आहोत त्यात ५० हजार लोक येतील. चित्रपट उद्योगातील लोकही त्याला पाठिंबा देणार आहेत. २६ जानेवारीला हे आंदोलन करण्याचा आमचा विचार आहे असे राय यांनी सांगितले.

गेल्या वर्षी मंगळुरूत याच मागणीसाठी झालेल्या आंदोलनात ७५ हजार लोक सहभागी झाले होते. निदर्शनांच्या वेळी दोनशे म्हशीही आणल्या जाणार आहेत. तीन ते चार तास निदर्शने करून विभागीय आयुक्तांना निवेदन दिले जाईल असे राय यांनी सांगितले.

कंबाला शर्यतींवर बंदी घालणारा अंतरिम आदेश गेल्या वर्षी पेटाच्या याचिकेवर कर्नाटक उच्च न्यायालयाने जारी केला होता. त्यावर आता पुढील सुनावणी ३० जानेवारीला होणार आहे. बंगळुरू येथे उपआयुक्त कार्यालयावर २४ जानेवारीला कंबाला शर्यतींना परवानगी देण्याच्या मागणीसाठी तुलुनाद रक्षणा वेदिके ही संघटना आंदोलन करणार आहे.
https://t.me/chalughadamodi/3841

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹देशांतर्गत उड्डाणांमध्ये भारताने चीनला टाकले मागे
आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक संघटनेचा अहवाल : भारताच्या अंतर्गत उड्डाणांचा वृद्धी दर 22.3 टक्के

भारताने देशांतर्गत उड्डाणात चीनला खूपच मागे टाकले आहे. नोव्हेंबर महिन्यात चीनच्या तुलनेत भारतात देशांतर्गत उड्डाणांचा वृद्धी दर 22.3 टक्के राहिला, तर चीनमध्ये हा वृद्धी दर फक्त 14.9 टक्के राहिला.

आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक संघटनेने हा अहवाल जारी केला आहे. जगभरात देशांतर्गत उड्डाणांच्या दरात सकारात्मक वाढ झाली आहे. नोव्हेंबर 2015 च्या तुलनेत नोव्हेंबर 2016 मध्ये जगभरात देशांतर्गत उड्डाणाच्या दरात 7.1 टक्क्यांची वृद्धी नोंदली गेली. ज्यात सर्वाधिक देशांतर्गत उड्डाणातील वृद्धी भारतात दिसून आली.

नोटाबंदीचा प्रभाव नाही

नोव्हेंबर महिन्यात केंद्राने भारतात नोटाबंदीची घोषणा केली होती. त्याचबरोबर डिसेंबरच्या प्रारंभापर्यंत जुन्या नोटांद्वारे विमानतळांवरून तिकीट खरेदी करता येईल अशी घोषणा केली होती. नोटाबंदीमुळे कंपन्यांना विमानोड्डाण क्षेत्रावर प्रतिकुल प्रभाव पडेल अशी भीती होती, परंतु असे काहीही झाले नाही.

हे देखील कारण

भारतीय रेल्वेची सर्ज प्रायसिंग व्यवस्था देखील देशांतर्गत उड्डाणात वृद्धीचे कारण असू शकते. 9 सप्टेंबर 2016 पासून राजधानी, शताब्दी अणि दुरंतो एक्स्प्रेसमध्ये ही व्यवस्था सुरू करण्यात आली. यांतर्गत प्रत्येक 10 टक्के जागा आरक्षित झाल्यानंतर तिकिटाच्या दरात 10 टक्के वाढ होत जाते. अशावेळी लोक विमानप्रवासाकडे वळत आहेत.

अमेरिकेत सर्वाधिक उड्डाणे

जागतिक स्तरावर देशांतर्गत उड्डाणाचा वापर करणाऱया प्रवाशांच्या संख्येत 15.3 टक्के वाटा अमेरिकेतील आहे. हा दर चीनमध्ये 8.3 टक्के, रशिया आणि ब्राझीलमध्ये 1.4 टक्के, जपानमध्ये 1.2 टक्के, भारतात 1.1 टक्के आणि ऑस्ट्रेलियात 1 टक्के आहे. अमेरिकेत विमानतळांची संख्या देखील इतर देशांच्या तुलनेत अधिक आहे.

अजून लढाई शिल्लक आहे

परंतु अजूनही अशी अनेक क्षेत्रे आहेत, जेथे भारत चीनपेक्षा खूप पिछाडीवर आहे. सामान्य नागरिकांच्या काही मूलभूत गरजांकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे.
https://t.me/chalughadamodi/3843

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹गांबियाच्या जामेह यांना सोडावी लागली सत्ता

https://t.me/chalughadamodi/3845
आफ्रिकेतील छोटा देश गांबियामध्ये 22 वर्षांपासून राष्ट्राध्यक्ष राहिलेले याह्या जामेह यांना अखेर पद सोडणे भाग पडले आहे. शनिवारी 5 देशांच्या लष्करांचा दबाव आणि दोन देशांच्या राष्ट्राध्यक्षांनी समजाविल्यानंतर ते पद आणि देश सोडण्यास राजी झाले. जामेह यांनी 1994 साली लष्करी बंडखोरीनंतर सत्ता हस्तगत केली होती.

सलग 4 वेळा राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत विजय मिळविलेल्या जामेह यांना मागील वर्षी एक डिसेंबर रोजी झालेल्या निवडणुकीत बांधकाम व्यावसायिक अडामा बॅरो यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला होता. पराभव मानल्यानंतर देखील त्यांनी पद सोडण्यास नकार दिला होता. देशात 3 महिन्यांची आणीबाणी लादून त्यांनी आपला कार्यकाळ 90 दिवसांनी वाढविला होता. विजयी झालेले उमेदवार बॅरो यांनी पलायन करत शेजारी देश सेनेगल येथे आश्रय घेतला होता.

आफ्रिकी देशांनी दिली होती धमकी
आफ्रिकी देशांची संघटना इकोवासने जामेह यांनी जर पद सोडले नाही तर आपले लष्कर पाठवून जबरदस्तीने त्यांना पदावरून हटविले जाईल अशी धमकी दिली होती. नायजेरिया आणि सेनेगल सहित पाच देशांचे लष्कर गांबियात दाखल झाले होते. गांबियाच्या लष्कर प्रमुखांनी आधी जामेह यांचे समर्थन केले, परंतु नंतर तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹आता सिमकार्डसाठीही ईकेवायसी योजना येणार

https://t.me/chalughadamodi/3847
ग्राहकांनी सिमकार्ड खरेदी करताना दिलेल्या पुराव्यांसाठी दूरसंचार नियामक ट्रायकडून दूरसंचार विभागाला आधार कार्डसंबंधित ईकेवायसीचा वापर करण्यासाठी लवकरच सूचना करणार आहे. त्यामुळे आपल्या घरापासून दूर राहणाऱया व्यक्तींना दुसऱया राज्यातही मोबाईल सिमकार्ड खरेदी करणे सोपे जाणार आहे. याचप्रमाणे सध्या ग्राहक असणाऱया मोबाईल कार्डधारकांनाही ईकेवायसीचा वापर करावा असेही सांगण्यात येणार आहे. सध्या असणाऱया ग्राहकांकडून ईकेवायसीचा वापर करण्यात आल्यानंतर त्यांची अचूक माहिती मिळण्यास मदत होईल. याचप्रमाणे बनावट सिम खरेदी करण्यासही मर्यादा येतील अशी अपेक्षा आहे.

ग्राहकांची माहिती ईकेवायसीच्या आधारे घेण्यात आल्यानंतर कंपन्यांनाही फायदा होणार आहे. सध्या कंपन्यांची ग्राहक संख्या कोटय़वधीमध्ये असल्याने त्यांची माहिती साठविण्यासाठी जागेची गरज भासते. तसेच ही कागदपत्रे हरविण्याची आणि खराब होण्याची शक्यता असते. कागदपत्रे शोधत ग्राहकांची माहिती मिळविण्यासही प्रदीर्घ कालावधी लागतो. त्यामुळे ग्राहकांबरोबरच कंपन्यांनाही या नव्या सुविधेचा लाभ सुलभपणे घेता येईल. ईकेवायसीचा वापर करण्यात आल्याने ग्राहकांना सिमकार्ड तत्काळ वापर करण्यास मदत होईल आणि वेळेची बचत होण्यास मदत होईल.

मात्र सध्या असणाऱया ग्राहकांना ईकेवायसी सादर करण्याची ट्रायकडून सक्ती करण्यात येणार नाही. जास्तीत जास्त ग्राहकांनी अधिक प्रमाणात ईकेवायसीचा वापर करावा यासाठी जनजागृती करण्यात येणार आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹5 % जागा जिंकणाऱ्यांना एकसमान निवडणूक चिन्ह

https://t.me/chalughadamodi/3849
मागील स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीत किमान पाच टक्के जागा जिंकणाऱ्या नोंदणीकृत राजकीय पक्षाच्या सर्व उमेदवारांना संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत तात्पुरत्या स्वरूपात एकच निशाणी देण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने घेतला आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाकडील मान्यताप्राप्त पक्षांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत त्यांच्या अधिकृत निशाणीवर निवडणूक लढविता येते. केंद्रीय निवडणूक आयोगाची मान्यता नसलेल्या मात्र राज्य निवडणूक आयोगाकडील इतर नोंदणीकृत पक्षांना उरलेल्या चिन्हांमधून एक चिन्ह देण्यात येते. परंतु एखाद्या विशिष्ट चिन्हाची एकापेक्षा अधिक पक्षांनी मागणी केल्यास लॉटरीद्वारे चिन्हाचे वाटप केले जाते. त्यामुळे एकाच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकाच पक्षाच्या उमेदवारांना वेगवेगळ्या चिन्हांवर निवडणूक लढवावी लागते. यात दुरुस्ती करण्याची मागणी विविध राजकीय पक्षांनी केली होती. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र निवडणूक चिन्ह (आरक्षण व वाटप) आदेश २००९मध्ये राज्य निवडणूक आयोगाने सुधारणा केली आहे. त्यानुसार नोंदणीकृत राजकीय पक्षाने एखाद्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मागील निवडणुकीत एकूण जागांपैकी किमान पाच टक्के जागा जिंकल्या असल्यास त्या पक्षाच्या सर्व उमेदवारांना संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत तात्पुरत्या स्वरूपात एकच चिन्ह देण्याची तरतूद करण्यात आली आहे. संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेच्या एकूण सदस्य संख्येच्या पाच टक्के जागा या एकापेक्षा कमी येत असल्यास किमान एक जागा तरी जिंकलेली असणे आवश्यक आहे. एकसमान चिन्हासाठी संबंधित पक्षांनी नामनिर्देशनपत्रे दाखल करण्याच्या दिनांकापासून किमान तीन दिवस आधी सक्षम प्राधिकाऱ्याकडे अर्ज करावा. अर्जासोबत मागील निवडणुकीत विजयी झालेल्या सदस्यांची यादी आणि संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सचिवांचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक असल्याचे राज्य निवडणूक आयोगाने आपल्या प्रसिद्धिपत्रकात स्पष्ट केले आहे. महापालिका निवडणुकांसाठी आयुक्त; तर जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, नगर परिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी जिल्हाधिकारी सक्षम प्राधिकारी असतील. संबंधित राजकीय पक्षास प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी स्वतंत्र अर्ज करावा लागेल. एकापेक्षा जास्त नोंदणीकृत राजकीय पक्षांनी एकसमान चिन्हाची मागणी केल्यास प्रथम अर्ज प्राप्त झालेल्या पक्षास ते चिन्ह देण्यात येईल व अन्य पक्षास किंवा पक्षांना उर्वरित मुक्त चिन्हांमधून एका चिन्हांची मागणी करण्याची संधी देण्यात येईल, असेही या पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹मणिपूर चे करंग बेट भारतामधील पहिले रोख विरहित बेट

मणिपूर मधील एक लहान तलावातील बेट–करंग हे देशातील पहिले रोख विरहित (कॅशलेस) बेट झाले आहे. ही घोषणा केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या डिजिटल इंडिया कार्यक्रमाअंतर्गत केली गेली.ईशान्य भारतातील सर्वात मोठा गोड्या पाण्याचा तलाव म्हणून ओळखल्या जाणार्‍या लोकतक तलावामध्ये करंग बेट स्थित आहे.100% रोख विरहित व्यवहार चालवण्याकरिता कार्ड स्वाइप मशीनचा वापर केला जातो. शिवाय, भारताची पहिली रोख विरहित बाजारपेठ रायपूर, छत्तीसगढ मध्ये विकसित झाली आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹कुसुमाग्रजांच्या जन्मदिनी राज्यभरात कार्यक्रम

दरवर्षीप्रमाणे यंदाही कविकुलगुरू वि. वा. शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनी 27 फेब्रुवारीला "मराठी भाषा गौरव दिन' साजरा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यंदा "संगणक व महाजालावरील मराठी' या संकल्पनेवर भर देण्यात आला आहे. मातृभाषेची माहिती, तसेच मातृभाषेचे व्यक्तिगत व समाजजीवनातील स्थान आणि मातृभाषेचे मानसशास्त्रीय व शिक्षणाच्या दृष्टीने महत्त्व या विषयांवर कार्यक्रम होणार आहेत.

 राज्यभरात ग्रंथप्रदर्शन, ग्रंथदिंडी, ग्रंथोत्सव आणि शाळा-महाविद्यालयांत निबंध व वक्तृत्व स्पर्धा घेण्यात येतील. सरकारी व अन्य कार्यालयांत परिसंवाद तसेच युनिकोड, इनस्क्रिप्ट याशी संबंधित विषयांवरील प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात येतील. सोशल मीडियातील मराठी विषयांवर लिहिणाऱ्या तज्ज्ञांची व्याख्यानेही होतील.
https://t.me/chalughadamodi/3857

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹शेतकऱ्यांच्या पीक कर्जावरील व्याज माफ

शेतकऱ्यांच्या पीक कर्जावरील ६६०.५ कोटी रुपयांचे व्याज माफ करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळणार आहे.

https://t.me/chalughadamodi/3859
नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यातील पीककर्जावरील व्याज सरकारने माफ केले आहे. ज्या शेतकऱ्यांनी सहकारी बॅंकेकडून अल्पमुदतीचे कर्ज घेतले होते त्यावर व्याज लागणार नाही. नोटाबंदीचा सर्वाधिक फटका हा शेतकरी, कामगारांना बसला होता. कर्ज व्याज माफ करुन फुंकर मारण्याचा प्रयत्न सरकार करत असल्याची चर्चा आहे. त्याशिवाय ज्या शेतकऱ्यांनी नोटाबंदीच्या काळात अल्पमुदत पीककर्जावर व्याज भरले आहेत त्यांची व्याजाची रक्कम परत केली जाणार आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत इतर निर्णय घेण्यात आले आहेत. आयआयएममधून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पदविकाऐवजी पदवी प्रदान करण्यात येणार आहे. त्याशिवाय दिल्लीतील प्रगती मैदानाच्या विकासासाठी २२५४ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. प्रगती मैदानावर आंतरराष्ट्रीय स्तरावरील सांस्कृतिक केंद्र उभारण्यात येणार आहे. क्योटो प्रोटोकॉलच्या हरित वायूच्या उत्सर्जन कराराच्या मुदतवाढीस मंजुरी देण्यात आली आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹माईक पॉंपेओ हे "सीआयए'चे नवे संचालक

https://t.me/chalughadamodi/3861
अमेरिकेची गुप्तचर संस्था असलेल्या सेंट्रल इंटेलिजन्स एजन्सीच्या (सीआयए) संचालकपदाची शपथ माईक पॉंपेओ यांनी घेतली. पॉंपेओ हे "कॉंग्रेस'चे माजी सदस्य आहेत.

"जगामधील सर्वश्रेष्ठ गुप्तचर खात्याचे नेतृत्व आता तुम्ही करणार आहात. तुमच्या नेतृत्वाखाली काम करणारे स्त्री व पुरुष हे धैर्य या शब्दाला खरा अर्थ प्राप्त करुन देत असतात,'' असे गौरवोद्गार अमेरिकेचे उप राष्ट्राध्यक्ष माईक पेन्स यांनी या प्रसंगी बोलताना काढले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शिफारस केलेल्या पॉंपेओ यांच्या नावास सिनेटने सहमती दर्शविली.

पॉंपेओ यांच्या नावास डेमोक्रॅटिक पक्षाने विरोध दर्शविला होता. अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणुकीमध्ये रशियाने हस्तक्षेप केल्याच्या आरोपासंदर्भात पॉंपे यांची भूमिका पारदर्शी नसल्याची टीका डेमोक्रॅटिक पक्षाकडून करण्यात आली होती. पॉंपेओ हे या कामासाठी "अयोग्य उमेदवार' असल्याचे टीकास्त्र डेमोक्रॅटिक नेते रॉन वेडेन यांनी केली होती. पॉंपेओ यांची निवड 66-32 अशा मतांनी झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

पॉंपेओ हे कॅन्सासमधील रिपब्लिकन नेते आहेत. जागतिक राजकारणामध्ये अमेरिकेपुढे आव्हानात्मक परिस्थिती निर्माण होत असताना सीआयएच्या नव्या भूमिकेबद्दल अत्यंत उत्सुकता आहे. या पार्श्वभूमीवर पॉंपेओ यांची ही निवड अत्यंत संवेदनशील मानली जात आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹लिअँडर विक्रमाच्या उंबरठ्यावर

https://t.me/chalughadamodi/3863
दुहेरीतील भारतीय टेनिसस्टार लिअँडर पेसला पुण्यात डेव्हिस करंडक लढतीत आपले नाव सुवर्णाक्षरांनी लिहिण्याची संधी मिळणार आहे. सर्वाधिक विजयाची बरोबरी त्याने केली आहे. चार दशकांनंतर पुण्यात 3 ते 5 फेब्रुवारीदरम्यान होणाऱ्या या लढतीचे बिगुल आज मुंबईत वाजले.

ग्रॅंड स्लॅम आणि ग्रां. प्रि. स्पर्धा होत असल्या तरी टेनिसमध्ये डेव्हिस करंडक स्पर्धेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. याच स्पर्धेतील भारत-न्यूझीलंड लढत पुण्यात होईल. पुण्यात ही लढत 43 वर्षांनंतर होत असली, तरी महाराष्ट्रात 10 वर्षांनंतर होत आहे. 2006 मध्ये ब्रेबॉर्न स्टेडियम भारत आणि पाकिस्तान यांच्यात आशिया-ओशियाना यांच्यात मुकाबला झाला होता. त्या वेळी अखेरच्या एकेरीत पेसने सनसनाटी विजय मिळवून भारताच्या यशावर शिक्कामोर्तब केले होते. तोच लिअँडर आता 10 वर्षांनंतर महाराष्ट्रात इतिहास घडवण्याच्या उंबरठ्यावर आहे.

इटलीचे टेनिसपटू निकोल पित्रांजेली डेव्हिस करंडक स्पर्धेत 66 सामने खेळले असून, 42 विजय आणि 12 पराभव अशी त्यांची कामगिरी आहे. पेसनेही आत्तापर्यंत 42 विजय मिळवले आहेत. पुण्यातील लढतीत पेस दुहेरीत खेळेल. हा सामना जिंकला, तर सर्वाधिक विजयांचा विक्रम त्याच्या आणि देशाच्या नावावर लागेल.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹वृद्धीमानची द्विशतकी खेळी, शेष भारताने जिंकला इराणी करंडक

https://t.me/chalughadamodi/3865
दुखापतीवर मात करून वृद्धीमान साहा याने इराणी करंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीत द्विशतकी खेळी साकारली. साहाच्या नाबाद २०३ आणि चेतेश्वर पुजाराच्या नाबाद ११६ धावांच्या जोरावर शेष भारतीय संघाने इराणी करंडक स्पर्धा जिंकली. शेष भारतीय संघासमोर रणजी विजेत्या गुजरात संघाने विजयासाठी ३७९ धावांचे आव्हान ठेवले होते. गुजरातचे आव्हान शेष भारतीय संघाने केवळ चार विकेट्सच्या मोबदल्यात गाठले. साहा आणि पुजारा यांनी पाचव्या विकेटसाठी तब्बल ३१६ धावांची भागीदारी रचली.

तत्पूर्वी, सोमवारी पंचांबद्दल अपशब्द वापरणारा गुजरातचा कर्णधार पार्थिव पटेलला अखेरच्या सत्रात दुखापतीमुळे मैदान सोडावे लागले होते. पार्थिवपुढील अडचणी एकीकडे वाढत असताना शेष भारताच्या वृद्धिमान साहाने चिकाटीने खेळपट्टीवर पाय रोवत शतक झळकावले आणि आपले नाणे खणखणीत असल्याचे सिद्ध केले. गुजरातच्या गोलंदाजीपुढे सुरुवातीला ४ बाद ६३ अशी केविलवाणी अवस्था झाल्यानंतर शेष भारताचा संघ इराणी करंडक क्रिकेट स्पध्रेच्या चौथ्या दिवशीच नामशेष होण्याची चिन्हे दिसत होती. मात्र कर्णधार चेतेश्वर पुजारा आणि वृद्धिमान यांचा ‘साहा’रा मिळाल्यामुळे दिवसअखेर शेष भारताने ४ बाद २६६ अशी मजल मारली. त्यानंतर आज साहा आणि पुजाराने आपला फॉर्म कायम ठेवत गुजरातच्या गोलंदाजांना पुनरागमनाची संधी न देता संघाला महत्त्वपूर्ण विजय प्राप्त करून दिला.

साहाने आपल्या द्विशतकी खेळीत तब्बल २६ चौकार आणि ६ षटकार ठोकले. तर पुजाराने आपल्या ११६ धावांच्या खेळीत १६ खणखणीत चौकार लगावले.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹महाराष्ट्रातील तीन पोलीस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदक

https://t.me/chalughadamodi/3867
महाराष्ट्र पोलीस दलातील तीन अधिकाऱ्यांना मंगळवारी राष्ट्रपती पदक मिळाल्याचे जाहीर करण्यात आले. येत्या प्रजासत्ताक दिनाला या अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदक देऊन गौरविण्यात येणार आहे. उत्कृष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पदक देऊन या अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदकाने सन्मानित करण्यात येणार आहे. तर देशभरातील ८० पोलीस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदकाने सन्मानित करण्यात येणार आहे. राष्ट्रपती पोलीस पदक विजेत्यांमध्ये अतिरिक्त पोलीस महासंचालक व्ही व्ही लक्ष्मीनारायण, रत्नागिरीचे पोलीस उपअधीक्षक महादेव गावंडे आणि कोल्हापूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवप्पा मोरटी यांचा समावेश आहे. त्याशिवाय राज्यातील ३९ पोलीस अधिकाऱ्यांना पोलीस पदक देऊन सन्मान करण्यात येणार आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹भारतीय रेल्वेचा वेग वाढविण्यासाठी रशियाची मदत

वर्तमान वेग दुप्पटीपेक्षा अधिक करण्याची मोहीम

रशियन रेल्वे विभाग भारतीय रेल्वेगाडय़ांचा वेग वाढविण्यासाठी मदत करत आहे. एका वृत्तसंस्थेच्या अहवालानुसार रशियन रेल्वे भारतात रेल्वेंचा वेग वाढवून 200 किलोमीटर प्रतितास एवढा करण्यास सहाय्य करत आहे. सध्या रशियाकडून नागपूर आणि सिकंदराबाद दरम्यान 575 किलोमीटर लांब रेल्वेमार्गावर काम केले जात असून मागील आठवडय़ात त्याने प्राथमिक अहवाल देखील सोपविला आहे. सध्या देशाच्या सर्वात वेगवान गतिमान एक्स्प्रेसचा कमाल वेग 160 किलोमीटर प्रतितास एवढा आहे.

रशियन रेल्वेने अपेक्षित वेग प्राप्त करण्यासाठी या अहवालात काही तांत्रिक आणि तंत्रज्ञानविषयक उपाय सुचविले आहेत. भारतात रेल्वेंचे डबे त्यांचा वेग वाढवून 200 किलोमीटर प्रतितासांपर्यंत करण्यास सक्षम नाहीत. यामुळे उर्वरित उपायांबरोबरच नव्या प्रकारच्या डब्यांची देखील गरज भासणार आहे. अहवालात नागपूर-सिकंदराबाद दरम्यान अनेक मोठय़ा पूलांवर मर्यादित वेगात रेल्वेवाहतूकीच्या अनिवार्यतेबाबत चिंता व्यक्त करण्यात आली.

याच संदर्भात रशियन रेल्वेने अशा मोठय़ा पूलांच्या सर्वेक्षणाची शिफारस केली आहे, याद्वारे कोणते बांधकाम पुन्हा नव्याने बांधण्याची गरज आहे आणि कोणाची दुरुस्ती आवश्यक आहे याचा शोध घेणे अपेक्षित आहे.

रेल्वेगाडी एका मार्गावरून दुसऱया मार्गावर नेण्याची व्यवस्था देखील 200 किलोमीटरच्या वेगाच्या दृष्टीने सक्षम नाही, यामुळे दुसऱया प्रकारच्या स्विचच्या वापराची शिफारस करण्यात आली. प्रस्तावात पूर्ण नागपूर-सिकंदराबाद क्षेत्रावर वर्तमान रेडिओ कम्युनिकेशनच्या जागी डिजिटल टेक्नॉलॉजिकल कम्युनिकेशन नेटवर्क वापरण्यात यावे असे सुचविण्यात आले आहे.

याशिवाय हायस्पीड रेल्वे नेटवर्कसाठी रेल्वे क्रॉसिंगवर पायी प्रवासी आणि मोटर वाहनांसाठी सुरक्षा उपायांचा विकास करण्याची गरज अहवालात अधोरेखित करण्यात आली. या दृष्टीने ओव्हरपास, अँटी कॉलिजन, अँटी रॅम बॅरियर्स आणि ऑटोमॅटिक अलार्म सिस्टीमची व्यवस्था करण्यास सांगण्यात आले. त्याचबरोबर रेल्वेमार्गांवर अपघात रोखण्यासाठी रुळाच्या शेजारी कुंपण घालण्याचा सल्ला देण्यात आला.

https://t.me/chalughadamodi/3869
रेल्वेमार्गाच्या शेजारी ज्या ठिकाणी वस्त्या तयार झाल्या आहेत, तेथे आवाज नियंत्रित करण्याची व्यवस्था केली जावी असे रशियन रेल्वेने म्हटले. या प्रकल्पासाठी मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये दोन्ही देशांच्या रेल्वे मंत्रालयादरम्यान करार झाला होता. हायस्पीड प्रकल्पाचा खर्च दोन्ही देश निम्मा-निम्मा उचलतील.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹वर्ध्यात अस्वलांचे अभयारण्य?

https://t.me/chalughadamodi/3871
मनुष्यवस्तीवरील वारंवार होणाऱ्या हल्ल्याच्या पाश्र्वभूमीवर अस्वलांची राजधानी ठरलेल्या वर्धा जिल्ह्य़ातील कारंजा-आष्टी वन्यपरिसरास अस्वलांचे ‘अभयारण्य’ म्हणून घोषित करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे.

विदर्भात सर्वाधिक अस्वल वर्धा जिल्ह्य़ातील डोंगरकपारीचा भाग असणाऱ्या कारंजा-आष्टी-सेलू परिसरात निवासी असल्याचे वनाधिकाऱ्यांचे मत आहे. खरांगणा भागात तर अस्वलांचा वावर शहरी वस्त्यांपर्यंत वाढला. कारंजा परिसरातील जंगलात गत वर्षभरात अस्वलांनी १८ वेळा हल्ला केल्याची नोंद आहे. परिसरातील गावकरी भयभीत होणे नेहमीचेच झालेले आहे. १५ दिवसांपूर्वी तर अस्वलांचा वावर गावकऱ्यांना जखमी करण्यापर्यंत वाढल्याने वनविभागाला आठवडाभर पिंजरे लावून निगराणी करावी लागली. यावर पर्याय काय, असा प्रश्न सातत्याने उपस्थित होतो. वन्यजीव संवर्धन कायद्याच्या परिशिष्ट एक अंतर्गत अस्वलाचा समावेश करण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय वन्यजीव संघटनेने संभाव्य संकटग्रस्त म्हणून घोषित केलेल्या अस्वलांवर चोरटय़ा शिकारीमुळे गंडांतर आले आहे. महाराष्ट्रात ७०० ते ८००च्या संख्येत अस्वलांची संख्या आहे. त्यामुळे मानवी वस्तीच्या संरक्षणासोबतच अस्वलांची काळजी घेणे अपरिहार्य ठरले आहे. अस्वल माणसांपासून दूरच असतो. दिवसभर कडेकपारीत राहणारे अस्वले सायंकाळी खाद्याच्या शोधात फि रतात. त्यांच्या वाटेत येणाऱ्यांवरच अस्वल हल्ला करतात. मोठाली नखे व दात याद्वारे झालेल्या हल्ल्यात मनुष्य गंभीर जखमी होतो. कारंजा परिसरात अस्वलांना अनुकूल स्थिती आहे. डोंगरदऱ्या, कडेकपारी, भरपूर हिरवळ, नैसर्गिक पाणवठे व मोहाफु लांची झाडे, अशा स्थितीत अस्वलांचा वावर वाढला. फ लाहारी असणाऱ्या अस्वलांचे मध हे सर्वात प्रिय खाद्य आहे. या परिसरातील मधमाशांचे मोठय़ा प्रमाणात असणारे पोळे हे आकर्षण ठरते. वाघ, साप, मधमाशीचे भय अस्वलास नाही. झाडावर चढून ते पोळ पाडतात. अंगावरील केसांच्या आवरणामुळे त्याला कसलेच भय नाही. गुरेचराई, तेंदूपत्ता संकलन, शिकार व अन्य कारणास्तव जंगलात फिरणाऱ्यांवर अस्वल हल्ला करतात.

नागपूर जिल्ह्य़ातील वन्यपरिसरातील अस्वल याच कारणास्तव कारंजा परिसरात स्थलांतरित झाल्याने त्यांची संख्या ५० ते ६० घरात पोहोचली आहे. अस्वल-मानव संघर्ष टाळून अस्वलांची निगराणी करण्याच्या हेतूने अस्वलांचे अभयारण्य घोषित करण्याचा प्रस्ताव बळावत आहे. या जंगल परिसरात मनुष्याचा वावर कमीच आहे. टायगर प्रोजेक्टअंतर्गत शेतीचाही समावेश होतो. त्यामुळे त्या प्रकल्पांचे विभाजन करावे लागते. अस्वलांचा निवास असणारे क्षेत्र तसे नाही. अभयारण्य घोषित झाल्यास पर्यटनस्थळ म्हणून विकास होऊ शकतो. मानवी वस्तीवरचे हल्ले कमी होतील.

व्यवस्थापनात सुसूत्रता राहील. गुजरात शासनाने मानवी वस्ती सुरक्षित करण्यासाठीच अभयारण्य घोषित केल्याचे निदर्शनास आणले जाते. अस्वलांची वाढती संख्या म्हणजे हा वन्यपरिसर त्यांच्यासाठी अत्यंत आरोग्यदायी असल्याचे म्हटले जाते.

३० किलोमीटर क्षेत्राचे अभयारण्य शक्य

अस्वलांसाठी हे क्षेत्र राखीव करणे व पर्यटनास चालना देण्याच्या हेतूने अभयारण्य करणे योग्य आहे. गुजरात शासनाने बनासकांठा व राजमहल भालू अभयारण्य घोषित केले आहे. कारंजाच्या ३० किलोमीटरचे क्षेत्र अभयारण्य होऊ शकते.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹वॉर्नरला सलग दुसऱया वर्षी ऍलन बोर्डर पदक

ऑस्ट्रेलियन क्रिकेट क्षेत्रामध्ये प्रतिष्ठेचे समजले जाणारे ऍलन बोर्डर पदक सलामीचा फलंदाज डेव्हिड वॉर्नरने सलग दुसऱयावर्षी पटकाविले. असा पराक्रम करणारा वॉर्नर हा ऑस्ट्रेलियाचा चौथा क्रिकेटपटू आहे. यापूर्वी माजी कर्णधार पाँटींग, शेन वॅटसन आणि कर्णधार मायकेल क्लार्क यांनी हा पराक्रम केला होता.

ऍलन बोर्डर पदकासाठी यावेळी वॉर्नर आणि कर्णधार स्टीव्ह स्मिथ यांच्यात जोरदार चुरस निर्माण झाली होती. 31 वर्षीय वॉर्नरने या प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी घेण्यात आलेल्या मतदानामध्ये 269 मते मिळविली. स्मिथला 248 तर स्टार्कला 197 मते मिळाली. प्रत्येकी वर्षी या पुरस्कारांसाठी माजी क्रिकेटपटू, प्रसार माध्यम आणि पंच यांची मते घेतली जातात.

उपकर्णधार डेव्हिड वॉर्नरने वनडे क्रिकेटमधील सर्वोत्तम ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंचा बहुमान पटकाविला तर मिचेल स्टार्कने 2016 च्या क्रिकेट हंगामातील सर्वोत्तम कसोटी क्रिकेटपटू म्हणून बहुमान मिळविला. शेन वॅटसनने सलग तिसऱयांदा टी-20 प्रकारातील सर्वोत्तम क्रिकेटपटू म्हणून बहुमान घेतला. वॅटसनने या क्रीडाप्रकारात 298 धावा जमविल्या असून 9 बळी घेतले आहेत. डेव्हिड वॉर्नरने सिडनीच्या मैदानावर कसोटीतील डावामध्ये केवळ 23 चेंडूत जलद अर्धशतक झळकविले होते. त्याने वनडे क्रिकेटमध्ये 2016 च्या हंगामात 1388 धावा जमविल्या असून क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात त्याने या कालावधीत एकूण 2420 धावा केल्या आहेत. स्टार्कने कसोटी क्रिकेटमध्ये 2016 च्या हंगामात 52 गडी बाद केले.

https://t.me/chalughadamodi/3874

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹बेटी बचाओ बेटी पढ़ाओ’ साठी जळगाव व उस्मानाबाद जिल्ह्यांना राष्ट्रीय पुरस्कार

https://t.me/chalughadamodi/3876
- ‘बेटी बचाओ बेटी पढ़ाओ’ या केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी अभियानाची उत्कृष्ट अमलबजावणी करण्यासाठी महाष्ट्रातील जळगाव व उस्मानाबाद जिल्ह्यांना राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. केंद्रीय महिला व बाल विकास मंत्री मेनका गांधी यांनी जळगावच्या जिल्हाधिकारी रूबल अग्रवाल आणि उस्मानाबाद चे जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांना पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला.

‘बेटी बचाओ बेटी पढ़ाओ’ अभियानाचा दूसरा वर्धापन दिन तसेच ‘राष्ट्रीय बालिका दिना’चे औचित्य साधून येथील प्रवासी भारतीय केंद्रात एका भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी केंद्रीय महिला व बाल विकास मंत्री मेनका गांधी, महिला व बाल विकास सचिव लीना नायर, रिओ पॅरा ऑलम्पिक विजेत्या दीपा मलिक, फ्लाईंग ऑफिसर अवनी चतुर्वेदी, पद्श्री गिर्यारोहक अरुनिमा सिन्हा, गिर्यारोहक रेखा चोकन या मंचावर उपस्थित होत्या. यासह दिल्लीस्थित शाळेकरी विद्यार्थ्यांनी, महिला व मुलींसाठी कार्यरत गैरसरकारी संस्था, अंतरराष्ट्रीय पातळीवर कार्यरत संस्थांचे प्रतिनिधी मोठया प्रमाणात उपस्थित होते. या कार्यक्रमात ‘बेटी बचाओ बेटी पढ़ाओ’ अभियानातंर्गत देशभरातील 10 जिल्ह्यांना पुरस्कृत करण्यात आले. त्यामध्ये महाराष्ट्रातील जळगाव व उस्मानाबाद या दोन जिल्ह्यांचा समावेश आहे.

जळगाव जिल्ह्याला ‘बेटी बचाओ बेटी पढ़ाओ’ अंतर्गत सर्वोत्कृष्ट कार्य केल्या बद्दल गौरविण्यात आले. जळगाव जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी रूबल अग्रवाल यांच्या नेतृत्वात जिल्ह्यामध्ये ‘बेटी बचाओ बेटी पढ़ाओ’ अंतर्गत सर्वसमावेशक जागरुकता अभियान राबविण्यात आले.

 समाजातील सर्व स्तरात यासाठी प्रचार-प्रसार करण्यात आला. केंद्र सरकारच्या डिजीटल इंडिया उपक्रमातंर्गत या अभियानाला जनतेपर्यंत घेऊन जाण्यासाठी ‘बेटी बचाओ बेटी पढ़ाओ’या अभियानाच्या लोगोचा उपयोग करून ‘डिजीटल गुड्डा गुड्डी’ बोर्ड तयार करण्यात आला. यामध्ये ऑनलाईन जोडणीकरून मुला-मुलीच्या जन्मदराचे अवलोकन करता येते. हे एक ऑडीओ व्हिज्युअल डिस्प्ले कटआऊट आहे. या डिस्पलेवर मान्यवरांचे संदेश, कन्याभ्रुण हत्या विरोधी जनजागृतीपर संदेश, महिला सक्षमीकरणाबाबतच्या योजना,महिलासंदर्भांत महत्वाचे असणारे टोल फ्री क्रमांक आदी माहिती प्रसारीत केली जाते. जिल्हा व तालूका स्तरावरील शासकीय कार्यालय,ग्रामपंचायत व आरोग्य केंद्रामध्येही बोर्ड दर्शनिय भागात बसविण्यात आले आहेत. याच्या परिणाम हा सकारात्मक झाला असून जळगाव जिल्ह्यामध्ये मुलींच्या जन्मदरात वाढ झाली आहे. 2011 मध्ये दर हजार मुलांमागे मुलींचा जन्मदर 842 होता. बेटी बचाओ बेटी पढ़ाओ अंतर्गंत राबविण्यात आलेल्या उपक्रमानंतर हा जन्मदर 2015 मध्ये 863 तर 2016 मध्ये हा 922 पर्यंत पोहोचला असल्याचे श्रीमती अग्रवाल यांनी सांगितले.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹प्रवीण्ड जगन्नाथ बनले मॉरिशसचे नवे पंतप्रधान

https://t.me/chalughadamodi/3878
भारतीय वंशाचे अनिरुद्ध जगन्नाथ यांनी मॉरिशसच्या पंतप्रधानपदाचा सोमवारी राजीनामा दिला आणि पंतप्रधानपदाची सूत्रे आपले पुत्र प्रवीण्ड जगन्नाथ यांच्याकडे सोपविली. अनिरुद्ध जगन्नाथ यांनी राजीनाम्यानंतर संसदेच्या निवडणुका जाहीर कराव्यात, अशी मागणी विरोधकांनी केली. मात्र ती अमान्य करण्यात आली. अनिरुद्ध जगन्नाथ (वय ८६) यांनी आपल्या राजीनाम्याचे पत्र राष्ट्रपतींना सादर केले. तिथे राष्ट्रपतीपद हे शोभेचे असते. मात्र राजीनामा त्यांच्याकडेच द्यावा लागतो. त्यांच्या राजीनाम्यानंतर प्रवीण्ड जगन्नाथ यांच्या पंतप्रधान म्हणून नियुक्तीचे पत्र राष्ट्रपती अमीनाह फिरदोस गुरीब-हकीम यांनी लगेचच जारी केले. नवीन रक्ताला वाव देण्यासाठी आपण हा निर्णय घेत असल्याचे मावळत्या पंतप्रधानांनी जाहीर केले. त्यांचे पुत्र प्रवीण्ड (वय ५५) हे सध्या अर्थमंत्री होते.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹या क्रिकेटपटूने चार वेळा केला होता आत्महत्येचा प्रयत्न

https://t.me/chalughadamodi/3880
ऑस्ट्रेलियाच्या 2003 व 2007 विश्वचषक विजेत्या संघाचा हिस्सा राहिलेला फिरकीपटू ब्रॅड हॉगने चार वेळा आत्महत्या करण्यचा प्रयत्न केला होता. निवृत्ती आणि विवाहात आलेल्या अपयशातील नैराश्यामुळे आत्महत्येचा विचार केला होता असा खुलासा त्याने केला आहे. आपली आत्मकथा द राँग वन मध्ये त्याने हा खळबळजनक खुलासा केला आहे.

2007-8 मध्ये क्रिकेटच्या सर्व प्रकारामधून निवृत्ती घेण्यावाचून माझ्याकडे अन्य कोणताही पर्याय नव्हता. कारण आंद्रियासोबत घटस्फोट घेतल्यानंतर पुढचे तीन वर्ष माझे खूपच तनावपूर्ण गेले. याकाळातच मला दारुचे व्यसन जडले. अनेक वेळा दु:खातिरेकाने हॉटेल सोडून जंगलातील झाडाझूडपांमध्ये जाऊन मी झोपत असे असा खुलासा हॉगने आपल्या आत्मकथेत केला आहे.

हॉगने द राँग वनमध्ये म्हटले आहे की, आत्महत्या करण्याच्या उद्देश्याने समुद्राकडे गेलो. समुद्र किनारी गाडी पार्क केली व चालत-चालत समुद्रकिनाऱ्यावर गेलो. त्यावेळी विचार केला की, यामध्ये उडी मारून जीव देऊ, वाचलो तर ठीक नाहीतर दुदैव. आयुष्याची दोरी नशीबावर सोडण्यास तयार होतो. असा विचार एक नाही चार वेळा केला परंतू आत्महत्या करण्याचे धाडस झाले नाही.

दरम्यान, ब्रॅड हॉग हा ऑस्ट्रेलियाच्या 2003 व 3007 च्या विश्व चषकाच्या संघातील प्रमुख खेळाडू होता. आयपीलएलमध्ये त्याने कोलकाकाताच्या संघाचे प्रतिनीधित्व केले आहे. गेल्या वर्षी आयपीएलमध्ये तो वयाच्या 44 व्या वर्षी कोलकाताकडून खेळला होता. यामुळे आयपीएलमध्ये खेळणारा सर्वांत वयस्कर क्रिकेटपटू ठरला होता. तो सध्या बिग बॅशमध्ये मेलबर्न रेनेगेड्सकडून खेळत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा