Post views: counter

Current Affairs May 2017 Part - 1

🔰 Current Affairs Marathi 🔰:

🔹इस्रो अंतराळात जोडणार अंतराळयाने

भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रो आता नव्या यशशिखराकडे जाण्यास सिद्ध होत आहे. नव्याने वेगात वाढू लागलेल्या अंतराळ मोहीम क्षेत्रात मुसंडी मारण्यासाठी महत्त्वाकांक्षी योजना इस्रोने आखली आहे. या आठवड्यात दक्षिण आशियातील सात सार्क देशांत विविध सेवा देणारा उपग्रह पाठवणार असल्याबद्दल मिळणारी शाबासकी ताजी असतानाच अंतराळात मानवांच्या वावराला वेग देणारी योजना त्याने जाहीर केली आहे.

या योजनेनुसार इस्रो अंतराळात दोन वेगवेगळ्या अंतराळयानांना जोडणारे तंत्रज्ञान विकसित करण्याच्या दिशेने पाऊल उचलत आहे. या जोडणी तंत्रज्ञानामुळे दोन अंतराळयाने वेगात प्रवास करत असतानाही एकमेकांशी जोडली जाऊ शकतील आणि त्यामुळे त्यांच्यात सामानापासून माणसांपर्यंतची देवाणघेवाण शक्य होणार असल्याचा इस्रोचा दावा आहे. याचा अर्थ इस्रो मानवाला अंतराळात धाडण्याच्या जगातील मोजक्याच देशांच्या यादीत झळकणार आहे.


'स्पेसक्राफ्ट डॉकिंग अँड बर्थिंगअसे तांत्रिक नाव दिलेली ही नवी महत्त्वाकांक्षी मोहीम केवळ भारतीय अंतराळ संशोधनापुरती मर्यादित राहणार नसूनत्या तंत्रज्ञानाच्या आधारे जागतिक अंतराळ संशोधन आणि दीर्घकालीन अंतराळ मोहिमांसाठी मानवसहित कार्यक्रम आखण्यास मदत होणार आहे.

🔹सबका साथ,  सबका विकास” भारतापुरताच मर्यादित नसून त्याला जागतिक संदर्भही- पंतप्रधान मोदी


सबका साथ, सबका विकास” केवळ भारतापुरताच मर्यादीत नसून तो जागतिक संदर्भातही लागू होतो, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सांगितले. आकाशवाणीवरील “मन की बात” कार्यक्रमाच्या 31व्या भागात बोलताना पंतप्रधान म्हणाले की, या प्रवासात शेजारील राष्ट्रांनीही भारताबरोबर यावे आणि त्यामुळे त्यांचाही समान विकास होऊ शकेल.
पंतप्रधान म्हणाले की, येत्या शुक्रवारी भारत दक्षिण आशिया उपग्रहाचे प्रक्षेपण करणार आहे. ज्यामुळे दक्षिण आशियातील आर्थिक आणि विकासाचे प्राधान्यक्रम, नैसर्गिक स्त्रोतांचे आरेखन, टेलीमेडीसिन, शैक्षणिक क्षेत्र, माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील जोडणी आणि लोकांचा एकमेकांशी संपर्क या क्षेत्रात मोठी वाटचाल होऊ शकेल.  हा उपग्रह संपूर्ण विभागाच्या विकासासाठी मोठे वरदान ठरेल, असे पंतप्रधान म्हणाले. संपूर्ण दक्षिण आशियात सहकार्य वृध्दिंगत करण्यासाठी हे महत्वपूर्ण पाऊल असून तसेच ही अतिशय अमूल्य भेटही आहे.
अतिमहत्त्वाच्या व्यक्तींचे वर्चस्व मोडीत काढण्यासंदर्भात बोलताना पंतप्रधान म्हणाले की, सरकारी निर्णयाच्या माध्यमातून लाल दिव्याचे जाणे हा प्रणालीचा एक भाग असून आपण मनातूनही ते प्रयत्नपूर्वक काढून टाकायला हवे. जर आपण जागरुक प्रयत्न केले तर हे नक्कीच निघून जाऊ शकते, असेही ते म्हणाले. नविन भारताची ही संकल्पना आहे की देशात व्हीआयपीच्या ऐवजी ई पी आयचे महत्व वाढावे, असे सांगून पंतप्रधान म्हणाले व्हीआयपी ऐवजी ईपीआय (एव्हरी पर्सन इम्पॉरटन्ट) म्हणजेच देशातली  प्रत्येक व्यक्ती महत्वपूर्ण असून, या प्रत्येकाला प्राधान्य द्यायला हवे. प्रत्येक व्यक्तीचे स्वत:चे महत्व असून प्रत्येकाध्ये चाणाक्ष आणि सुज्ञ पणाचे अनोखे वलयही असते, असे त्यांनी सांगितले. सव्वाशे कोटी देशबांधवांचे महत्व स्विकारण्यावर पंतप्रधानांनी भर दिला.
युवकांना आवाहन करताना पंतप्रधानांनी सांगितले की त्यांनी चाकोरी बाहेर जाऊन काहीतरी करायला पाहिले. त्यांनी नवी ठिकाणे, नवे अनुभव आणि नविन कौशल्ये पडताळून पाहिली पाहिजे. उन्हाळ्याच्या सुट्टीत युवकांनी नवीन अनुभव घ्यावेत तसेच कुठल्याही विषयाबद्दलचे कुतूहल पूर्ण करावे, असेही पंतप्रधानांनी सुचवले. जीवनात खूप मोठे होण्याचे स्वप्न बाळगणे तसेच जीवनात काही उद्दिष्ट असणे ही चांगली गोष्ट आहे, असे ते म्हणाले. युवकांनी आपले लक्ष्य नक्कीच साध्य करावे पण त्याबरोबरच त्यांच्यातील मानवी घटक कुठे कंटाळत नाही ना?  आणि ते मानवी मुल्यांपासून दूर जात नाहीत ना? यासंदर्भातही त्यांनी आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे, असेही पंतप्रधानांनी सांगितले.
कुटुंबातील छोटी मुले अतिशय उत्साहाने पक्ष्यांसाठी सज्जा आणि गच्चीमध्ये भांड्यात पाणी ठेवतात,  असे सांगून पंतप्रधान पुढे म्हणाले की, या भांड्यामध्ये पाणी भरायला हवे हे त्यांना समजले की ही मुले दिवसातून दहा वेळा जाऊन भांड्यात पाणी आहे की नाही, हे पाहतात आणि या मुलांच्या मनात करुणेची भावना निर्माण करण्याचा हा अतिशय आगळा वेगळा मार्ग आहे.
अनेक ठिकाणी कार्यरत असलेल्या “पोळी बँकाबद्दल” आपल्याला अनेक व्हिडीओ प्राप्त झाले असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. या “पोळी बँकांमध्ये लोकं राहिलेल्या पोळ्या तसेच राहिलेल्या भाज्याही जमा करतात आणि या बँकांतून गरजू लोकांना खाद्य पदार्थ मिळतात. जो व्यक्ती पोळ्या दान करतो त्याला समाधान तर मिळतेच पण ज्या व्यक्तीला या पोळ्या मिळतात त्याच्या मनातही लाजिरवाणी भावना येत नाही, असे पंतप्रधानांनी स्पष्ट केले. समाजाच्या मदतीने कार्य कसे पूरे करता येते याचे हे उत्तम उदाहरण आहे. 1 मे चे आणखी एक महत्व असून हा दिवस जगातल्या अनेक भागात कामगार दिन म्हणून पाळला जातो असे सांगतानाच पंतप्रधानांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मरण केले. कामगारांना ज्या सवलती आणि आदर मिळाला आहे त्याबद्दल सर्वजण बाबासाहेबांचे आभारी आहेत, असेही ते म्हणाले. कष्टकरी वर्गाच्या कल्याणासाठी बाबासाहेबांचे योगदान आपण कधीही विसरु शकत नाही याचा त्यांनी पुनरुच्चार केला.
या वर्षी देश संत रामानुजाचार्य यांची 1000 वी जयंती साजरी करत आहे.  रामानुजाचार्य यांनी जातीभेद, सवर्ण आणि अस्पृश्य यांच्यातील दरी यासारख्या सामाजिक दुष्ट चालीरितींविरुध्द अथक लढा दिला, असे पंतप्रधानांनी सांगितले. आपल्या वर्तणुकीतून रामानुजाचार्य यांनी समाजाने बहिष्कृत केलेल्यांचा स्विकार केला. सरकार उद्या त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ टपाल तिकीट जारी करत असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.

http://empsckatta.blogspot.in/p/empsckatta-empsckatta.html
eMPSCkatta Telegram Channel


#eMPSCkatta_Current_Affairs

🔹'कासव'ला मिळाले 'सुवर्णकमळ'

'कासव' या मराठी चित्रपटाचा सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्काराने गौरव करण्यात आला. सुवर्णकमळ देवून 'कासव' चित्रपटाचा बहुमान करण्यात आला. दिल्लीत ६४ वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा आज पार पडला. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते विजेत्यांचा पुरस्काराने सन्मान केला गेला.
सोनम कपूरला 'नीरजा' साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा आणि अक्षय कुमारला 'रुस्तम'साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार देण्यात आला. तर २०१६ साठी 'नीरजा' चित्रपटाला सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार दिला गेला.

'निरजा' चित्रपटासाठी सोनम कपूरला आणि 'मुक्ती भवन' चित्रपटासाठी सुभाशिष भुतीयानीचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या पुरस्काराने गौरव केला गेला. तर 'दंगल' चित्रपटातल्या उत्तम कामगिरीबद्दल झहिरा वासिमचा उत्कृष्ट सहकलाकाराच्या पुरस्काराने सन्मान करण्यात आला.

दिल्लीत आज 3 मे रोजी ६४ वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा झाला. या पुरस्कारासाठी बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकारांनी उपस्थिती लावली होती. पुरस्कार सोहळ्यात अभिनेता अनिल कपूर उपस्थित होता. मुलगी सोनमचा पुरस्काराने गौरवत अनिल कपूर अतिशय आनंदी होता.

चित्रपट पुरस्कारः

सर्वोत्कृष्ट चित्रपट (सुवर्णकमळ)

सर्वोत्कृष्ट अभिनेताः अक्षय कुमार (रुस्तम)

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेताः मनोज जोशी ( दशक्रिया)

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीः झायरा वासिम ( दंगल )

आधारित पटकथाः दशक्रिया

सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपटः नीरजा

सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटः दशक्रिया

स्पेशल मेन्शनः अभिनेत्री सोनम कपूर (नीरजा)

सर्वोत्कृष्ट सामाजिक विषयावरील चित्रपटः पिंक

चित्रपट दिग्दर्शक के. विश्वानाथ यांचा यावेळी दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मान करण्यात आला.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹बीबीबी’ रेटिंग कायम

जागतिक रेटिंग एजन्सी ‘फिच’ने मंगळवारी भारताचे ‘उणे बीबीबी’ (कमजोर आर्थिक स्थिती आणि व्यवसायासाठी प्रतिकूल वातावरण ) रेटिंग कायम ठेवले आहे. मात्र, आउटलूक ग्रोथमध्ये कोणताही बदल करण्यात
आलेला नाही. या पार्श्वभूमीवर ‘फिच’ने आर्थिक वर्ष २०१७साठी देशाच्या विकासदराचा अंदाज ७.७ टक्के वर्तवला आहे.

देशातील आर्थिक सुधारणांचा वेग वाढविण्याची आवश्यकता असून, बँकिंग व्यवस्थेत सहा लाख कोटी रुपये खर्चण्याची गरज आहे. आर्थिक सुधारणांचा वेग वाढविण्यासाठी केंद्र सरकारने इज ऑफ डुइंग बिझनेसवर भर दिला आहे.

नोमुराने देशाची अर्थव्यवस्था दुसऱ्या सहामाहीत साडेसात टक्क्यांनी वाढेल, असा अंदाज वर्तवला आहे. आर्थिक वर्ष २०१८मध्ये देशाची वाढ ७.७ टक्क्यांनी होणार असल्याचेही ‘नोमुरा’ने नमूद केले आहे. जपानची वित्तीय संस्था असणाऱ्या ‘नोमुरा’च्या मते नोटाबंदीच्या नंतर हळूहळू का होईना आर्थिक सुधारणा झाल्याचे दिसून आले आहे. निर्यात आणि नोटाबंदीचा हा एकत्रित परिणाम असल्याचेही ‘नोमुरा’ने म्हटले आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹त्या’ गोलंदाजावर बांगलादेशची बंदी

पंचांच्या सदोष कामगिरीचा निषेद म्हणून आपल्या षटकातील चार चेंडूवर ९२ धावांची खैरात वाटणाऱ्या स्थानिक गोलंदाजाला याची मोठी किंमत मोजावी लागली आहे. एक, दोन नव्हे तर बांगलादेशने त्याच्यावर तब्बल दहा वर्षांची बंदी घातली आहे. या दुर्दैवी गोलंदाजाचे नाव आहे सुजन महमूद. बांगलादेशातील स्थानिक क्रिकेट स्पर्धेत तो लालमातिया क्लबचे प्रतिनिधित्व करतो.

बांगलादेश क्रिकेट बोर्डाने ही कारवाई केली आहे. त्यांनी या बंडखोरीविरोधात कडक धोरण अवलंबले असून शिक्षा म्हणून त्याच्या लालमातिया क्लबला पुढील पाचवर्षे एकाही स्पर्धत भाग घेण्याची संधी दिली जाणार नाही. याशिवाय या संघाचे प्रशिक्षक, कर्णधार आणि संचालकावरही पाच वर्षांची बंदी असेल. यामुळे ही मंडळी दुसऱ्या गटाच्या ढाका लीगमध्ये खेळू शकणार नाहीत.

काय झाले होते...

गेल्या महिन्यात ५० षटकांच्या सामन्यात लालमातिया क्लबला प्रतिस्पर्धी अॅक्झिओम १४ षटकांत ८८ धावांत गुंडाळले. हे आव्हान अॅक्झिओम क्लबने अवघ्या चार चेंडूंमध्ये पार केले. सुजनने आपल्या षटकांत १३ वाइडचे चेंडू टाकले. तसेच तीन नोबॉलचा मारा केला. हा स्वैर मारा करताना हे सगळे चेंडू सीमारेषेच्या पार जातील याची खबरदारीही सुजनने घेतली. सहाजिकच अॅक्झिओमच्या ८० धावा अशाच झाल्या. नोबॉलवर अॅक्झिओमचा सलामीवीर मुस्तफिझुर रहमानने तीन चौकारही लागवले; पण त्यांची गणना त्याच्या वैयक्तिक धावांमध्ये होत नाही. अॅक्झिओम क्लबने हे आव्हान ०.४ षटकांत पार केले.

बेशीस्त बांगलादेशात खपवून घेतली जात नाही, असे दिसते आहे; कारण अलीकडेच सामना जाणूनबुजून गमावल्याबद्दल गोलंदाज तस्निम हसन व त्याचा फीअर फायटर्स क्लबवर दहा वर्षांची बंदी घालण्यात आली आहे.

काय म्हणणे आहे...

चौकशी दरम्यान आमच्या लक्षात आले की सुजन महमूदने ठरवून वाइड व नोबॉल टाकले होते. यामुळे क्रिकेटची प्रतीमा मलीन झाली’, असे बांगलादेश बोर्डाच्या शिस्तपालन समितीचे प्रमुख शेख सोहेल यांनी मीडियाला सांगितले.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹डोंगरगाव येथे महाराष्ट्रा तील पहिले स्वयंचलित हवामान केंद्र

नागपूर जिल्ह्यातील डोंगरगाव येथे मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्या हस्ते “महावेध” प्रकल्पांतर्गत राज्यातील पहिल्या स्वयंचलित हवामान केंद्राचे उद्घाटन करण्यात आले आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना दर दहा मिनिटांनी हवामानाची अचूक माहिती डिजीटल किऑक्सच्या माध्यमातून उपलब्ध होईल.

▪️प्रकल्पाच्या अंमलबजावणीमधील ठळक बाबी:

स्कायमेट वेदर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची महावेध प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी सेवा पुरवठादार संस्था म्हणून निवड करण्यात आली आहे. ही कंपनी राज्यात 2065 पेक्षाही जास्त ठिकाणी हवामान केंद्र सहा महिन्यात कार्यान्वित करणार आहे. पुढे 7 वर्षांकरिता महावेध प्रकल्प स्कायमेट स्वखर्चाने राबविणार आहे.

सर्व महसूली मंडळामध्ये स्वयंचलित हवामान केंद्राच्या उभारणीकरीता 5 मीटर X 7 मीटर क्षेत्रफळाचा भूखंड शासन उपलब्ध करुन देणार आहे. या भूखंडाच्या कार्यवाहीसाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी हे नोडल अधिकारी असणार आहेत.

या यंत्रणेच्या माध्यमातून 12 X 12 किलोमीटर परिसरातील पाऊसाचा अंदाज, पीक लागवड, सापेक्ष आर्द्रता, वाऱ्याचा वेग व दिशा यासह हवामानविषयक बदलाची सर्व माहिती दर दहा मिनिटाला उपलब्ध होणार असून शेतकऱ्यांना SMS च्या माध्यमातून ती माहिती पाठवली जाणार आहे.

▪️महावेध प्रकल्पाबाबत

राज्यातील हवामानाच्या रिअल टाइम माहिती मिळण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारच्या वतीने ‘महावेध’ प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. राज्यातील सर्व महसूल मंडळात 2065 स्वयंचलित हवामान केंद्र सुरू करण्यात येणार आहेत.

महावेध’ प्रकल्पाच्या माध्यमातून प्राप्त होणाऱ्या हवामान विषयक माहितीमध्ये अचूकता येणार असून त्याचा उपयोग पीक विमा योजना, हवामान आधारित पीक विमा योजना, कृषी हवामान सल्ला व मार्गदर्शन, कृषी संशोधन व आपत्ती व्यवस्थापनासाठी होणार आहे. ही माहिती केंद्र आणि राज्य सरकारच्या अखत्यारित येणाऱ्या संस्थांना आणि विद्यापीठांना संशोधन कार्यासाठी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

🔹खर्च विभागाचे नवे महालेखा-नियंत्रक: अॅंथनी लिएनझुअला

नवी दिल्लीमधील खर्च विभाग (वित्त मंत्रालय) चे नवे महालेखा-नियंत्रक (CGA) म्हणून पदावर अॅंथनी लिएनझुअला यांची 1 मे 2017 पासून नियुक्ती करण्यात आली आहे. लिएनझुअला हे 1982 सालचे भारतीय नागरी लेखा सेवा अधिकारी आहेत.

🔹रामानुजाचार्य यांची 1000 वी जयंती
साजरी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऋषी आणि तत्त्वज्ञानी रामानुजाचार्य यांच्या 1000 व्या जयंतीनिमित्त स्मृतीचिन्ह म्हणून त्यांचे छायाचित्र असलेल्या मुद्रांकाचे अनावरण केले आहे. रामानुजाचार्य (1017-1137 इ.स.) यांचा जन्म सन 1017 मध्ये श्री पेरामबुदुर (तामिळनाडु) येथे झाला होता.

🔹संरक्षण दलाच्या सेवेत DRDO-विकसित साधने

संरक्षण मंत्री अरुण जेटली यांनी संरक्षण संशोधन व विकास संघटनाने विकसित केलेली साधने राष्ट्रीय सुरक्षा रक्षक, दिल्ली पोलीस आणि राष्ट्रीय आपत्ती निवारण दल कडे सुपूर्द केलेली आहेत.

NDRF ला 'ई-नासिका'; NSG ला 'OTL-300'; दिल्ली पोलिसांना 'OTL-300' व दूरस्थ स्फोटक द्रव्यांच्या शोध घेणारे उपकरण सोपविण्यात आले आहे.

🔹देशात 'विद्या वीरता' अभियानाला सुरूवात

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते 2 मे 2017 रोजी देशभरात ‘विद्या-वीरता अभियान’ चालवण्यास सुरुवात करण्यात आली आहे. या अभियानात विद्यापीठांना परमवीर चक्रप्राप्त सैनिकांची छायाचित्रे प्रदर्शित करण्यासाठी प्रोत्साहित केले जाणार आहे.

🔹खेल रत्न पुरस्कारासाठी हॉकीपटू सरदार सिंग यांची शिफारस

राजीव गांधी खेल रत्न पुरस्कारासाठी हॉकी इंडियाने वरिष्ठ खेळाडू व माजी कर्णधार सरदार सिंग यांची शिफारस केली आहे. द्रोणाचार्य पुरस्कारासाठी प्रशिक्षक संदीप सांगवान आणि रोमेश पठानिया यांची शिफारस करण्यात आली आहे.

🔹खनिजांची वाहतूक करणार्या वाहनांमध्ये GPS यंत्रणेची सक्ती:
ओडिशा

ओडिशा सरकारने 1 मेपासून खनिज वाहून नेणार्या वाहनांमध्ये GPS यंत्रणा सक्तीने बसविण्याचा आदेश काढला आहे.
याच्या अंमलबजावणीसाठी ओडिशा स्पेस ऍप्लिकेशन सेंटर (ORSAC) ला नेमले गेले आहे.

🔹PMEGP योजनेंत र्गत रोजगा रात 9.5% ची घट

असोसिएटेड चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज ऑफ इंडिया (ASSOCHAM) च्या अहवालानुसार, पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम (PMEGP) अंतर्गत रोजगाराच्या संधीमध्ये मागील वर्षाच्या तुलनेत आर्थिक वर्ष 2016-17 मध्ये 9.5% ची घसरण आढळून आली आहे.
आर्थिक वर्ष 2015-16 मध्ये PMEGP अंतर्गत 3.5 लाख रोजगार उपलब्ध झाले होते, तर वर्ष 2016-17 मध्ये ही संख्या 3.2 लाख इतकी आली.

▪️अहवालामधील ठळक बाबी

PMEGP अंतर्गत प्रकल्पांच्या संख्येत सुद्धा घट दिसून आली आहे. वर्ष 2015-16 मध्ये 48,100 तर वर्ष 2016-17 मध्ये फक्त 44,300 प्रकल्पांचा विकास केला गेला.

आर्थिक वर्ष 2016-17 मध्ये उत्तर प्रदेशने PMEGP अंतर्गत सर्वाधिक जवळपास 43,000 रोजगारांची निर्मिती केली आहे. मात्र यामध्ये मागील वर्षाच्या तुलनेत 11% पेक्षा अधिकाची घसरण आहे.

क्रेडिट गॅरंटी फंड ट्रस्ट फॉर मायक्रो अँड स्मॉल एंटरप्रायजेस (CGTMSE) अंतर्गत मंजूर झालेल्या कर्ज प्रस्तावांची संख्या वर्ष 2014-15 आणि वर्ष 2015-16 या काळात मागील चार लाखांवरून फक्त 5.1 लाखापर्यंत वाढली. या योजने अंतर्गत मंजूर केलेली रक्कम वर्ष 2015-16 च्या तुलनेत 6% कमी होऊन ती फक्त 19,900 कोटी रुपयांपेक्षा अधिक होती.

विपणन सहाय्य आणि तंत्रज्ञान उन्नतीकरण कार्यक्रमामुळे लाभार्थी ठरलेल्या MSMEs ची संख्या देखील वर्ष 2015-16 मधील 359 वरून वर्ष 2016-17 मध्ये 303 इतक्यावर आली आहे.

उद्यमी विकास कार्यक्रम योजनेंतर्गत प्रशिक्षणार्थींची संख्या वर्ष 2015-16 मधील 1.4 लाखांवरून वर्ष 2016-17 मध्ये 66,000 वर पोहचली.

इन्क्यूबेटर्सद्वारा SME च्या उद्यमी विकास योजनेत मंजूर केलेल्या नवीन कल्पनांची संख्या वर्ष 2015-16 मध्ये 143 तर वर्ष 2016-17 मध्ये 145 इतकी आहे.

देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय व्यापाराला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने ASSOCHAM ही भारतातील सर्वोच्च व्यापार संघटनांपैकी एक आहे. याची 1920 साली स्थापना करण्यात आली आणि याचे मुख्यालय नवी दिल्लीत आहे. शिवाय अहमदाबाद, बेंगळुरू आणि कोलकाता या शहरांमध्ये प्रादेशिक कार्यालये आहेत.

🔹दूरसंचार विभागाचे तरंग संचार संकेतस्थळ सुरू

दळणवळण मंत्री मनोज सिन्हा यांनी 2 मे 2017 रोजी मोबाईल टॉवर आणि EMF बाबत माहिती सामायिक करण्याकरिता “तरंग संचार” संकेतस्थळाचे उद्घाटन केले आहे.

तसेच, यामार्फत वापरकर्त्यांना रु. 4000 शुल्कासह किरणोत्सर्गी उत्सर्जनासाठी टॉवर किंवा बेस स्टेशन तपासण्यासाठी परवानगी दिली जाईल.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹शैक्षणिक संस्थांमध्ये 'वॉल ऑफ व्हॉलर' उपक्रमाचे उद्घाटन

2 मे 2017 रोजी देशभरातील 1000 शैक्षणिक संस्थांमध्ये 'वॉल ऑफ व्हॉलर' उपक्रमाचे उद्घाटन केले गेले आहे. 'विद्या-वीरता अभियानाचा एक भाग म्हणून परमवीर चक्र प्राप्तकर्त्यांची चित्रे संस्थांच्या परिसरात प्रदर्शित करण्यात येणार आहेत.

🔹प्रथम जागतिक ट्यूना दिवस साजरा
संयुक्त राष्ट्रसंघाने ट्यूना माशाच्या

 महत्त्वपूर्ण भूमिकेबाबत जागृती निर्माण करण्याच्या हेतूने 2 मे 2017 रोजी प्रथम जागतिक ट्यूना दिवस साजरा केला आहे. ट्युनाचा व्यवहार हा सागरी अन्नाच्या मूल्याच्या 20% आणि आंतरराष्ट्रीय व्यापारात 8% हून अधिक आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹3 मे: ‘जागतिक प्रसारमाध्यम स्वातंत्र्य
दिवस’ साजरा

जगभरात दरवर्षीप्रमाणे 3 मे रोजी “जागतिक प्रसारमाध्यम स्वातंत्र्य दिवस” साजरा करण्यात आला आहे.

जागतिक प्रसारमाध्यम स्वातंत्र्य दिवस 2017 हा “क्रिटिकल माइंड्स फॉर क्रिटिकल टाइम्स: मिडियाज रोल इन अडवांसींग पीसफुल, जस्ट अँड इंक्लूजिव सोसायटीज” या संकल्पनेखाली साजरा करण्यात आला आहे.

या दिवसाच्या निमित्ताने या वर्षी संयुक्त राष्ट्रसंघ शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना (UNESCO), इंडोनेशिया सरकार आणि प्रेस कौन्सिल ऑफ इंडोनेशिया यांनी संयुक्तपणे मुख्य कार्यक्रम आणि 1-4 मे 2017 दरम्यान जकार्ता, इंडोनेशिया येथे UNESCO/गूईलार्मो कॅनो वर्ल्ड प्रेस फ्रिडम प्राइज समारंभ यांचे आयोजन केले आहे.

याबाबत पार्श्वभूमी व इतिहास
1991 साली आफ्रिकन पत्रकारांनी प्रसारमाध्यमांचे बहुतत्व आणि स्वातंत्र्य वरील विंडहोक जाहीरनामा सादर केला होता. याला प्रतिसाद म्हणून 1993 साली संयुक्त राष्ट्रसंघ महासभेत 3 मे हा दिवस “जागतिक प्रसारमाध्यम स्वातंत्र्य दिवस” म्हणून साजरा करण्यास मंजूरी देण्यात आली.

दरवर्षी हा दिवस UNESCO च्या नेतृत्वात जागतिक स्तरावरील साजरा केला जातो.
प्रसारमाध्यमांचे स्वातंत्र्य व त्यांची मूलभूत तत्त्वे दर्शविण्यासाठी, जगभरातील प्रसारमाध्यमांच्या स्वातंत्र्याचे मूल्यांकन करण्यासाठी, त्यांच्या स्वातंत्र्यावर होणार्या हल्ल्यापासुन प्रसारमाध्यमांचा बचाव करण्यासाठी आणि कर्तव्य बजावताना ज्या पत्रकारांनी त्यांचे जीवन गमावले त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.

शिवाय, 1948 मानवी हक्कांचा सार्वत्रिक जाहीरनामाच्या कलम 19 अन्वये अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार राखून ठेवण्यासाठी आणि त्यांच्या कर्तव्याची सरकारांना जान करून देण्यासाठी आणि पत्रकारांच्या स्वातंत्र्याचे महत्त्व याविषयी जागृती निर्माण करण्याकरिता हा दिवस साजरा केला जातो.

🔹जियो स्क्वॉश स्पर्धेची विजेती - जोशना

चेन्नई येथे झालेल्या जियो-19 वे आशियाई वैयक्तिक स्क्वॉश विजेतेपद 2017 स्पर्धेत, जोशना चिनप्पाने महिला विजेतेपदक मिळविले आहे. प्रथमच भारतीय खेळाडूने आशियाई विजेतेपद जिंकले आहे. आशियाई वैयक्तिक स्क्वॉश विजेतेपद ही स्पर्धा 1981 सालापासून एशियन स्क्वॉश फेडरेशन आयोजित करीत आहे.

🔹IIT संशोधकांनी जांभूळ वापरून सोलर सेल तयार केले

भारतीय तंत्रज्ञान संस्थान रुरकी येथील संशोधकांनी सोलर सेल तयार करण्यासाठी “जांभूळ” या फळाचा वापर केला आहे. संशोधकांनी डाई सेन्सीटायीज्ड सोलर सेल्स (DSSC) किंवा गर्ट्झेल सेल्स साठी जांभळामध्ये आढळणार्या रंगद्रव्याला फोटोसेन्सीटायझर म्हणून वापरले आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹दूरसंचार ग्राहकांची संख्या फेब्रुवारीत
1.18 अब्जांवर पोहोचली: TRAI

TRAI च्या आकडेवारीनुसार, फेब्रुवारी 2017 च्या अंती मोबाइल आणि लँडलाइन अश्या एकत्रित भारताच्या दूरसंचार ग्राहकांची सख्या 1.18 अब्ज वर पोहचली. ग्राहकांच्या संख्येच्या बाबतीत, 13.75 दशलक्ष मोबाइल ग्राहक जोडले गेलेत. फेब्रुवारीच्या अंती आता देशात एकूण 1.16 अब्ज मोबाइल ग्राहक तसेच सुमारे 24.35 दशलक्ष लँडलाइन ग्राहक आहेत.

🔹मोदींच्या आवाहनाला मध्य प्रदेशची ‘साथ’; जानेवारी-डिसेंबर आर्थिक वर्ष करणार

आर्थिक वर्षाची रचना बदलण्यासाठी राज्य सरकारांनी पावले उचलावीत, अशी सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्य सरकारांना केली होती. मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद देत मध्य प्रदेश सरकारने जानेवारी-डिसेंबर हे आर्थिक वर्ष केले आहे. तसेच डिसेंबरमध्ये राज्याचा नवीन अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे.

आर्थिक वर्ष जानेवारी ते डिसेंबर असावे, असा विचार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निती आयोगाच्या बैठकीत मांडला होता. निती आयोगाच्या बैठकीला अनेक मुख्यमंत्र्यांची उपस्थिती होती. ‘वेळेच्या चुकीच्या व्यवस्थापनामुळे अनेक चांगल्या योजनांचा बोजवारा उडाला आहे.

 यासोबतच अनेक चांगल्या उपक्रमांना वेळेचे व्यवस्थापन चुकल्यामुळे अपयश आले आहे. त्यामुळे वेळेचे व्यवस्थापन करण्यासाठी काही बदल आवश्यक आहेत,’ असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले होते. आर्थिक वर्षाची रचना बदलण्यासाठी राज्य सरकारांनी पावले उचलावीत, अशी सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बैठकीला उपस्थित असलेल्या मुख्यमंत्र्यांना केली होती. सध्या देशात एप्रिल ते मार्च अशी आर्थिक वर्षाची रचना आहे. ‘आर्थिक वर्षाची रचना जानेवारी ते डिसेंबर करण्याबाबत विचार करण्यात यावा. कारण अशी रचना देशातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने फायद्याची आहे,’ असे निती आयोगाचे उपाध्यक्ष अरविंद पानगढिया यांनी म्हटले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला सर्वात आधी मध्य प्रदेश सरकारने प्रतिसाद दिला आहे. मोदींच्या आवाहनानुसार, मध्य प्रदेश सरकारने आर्थिक वर्षाची रचना बदलत जानेवारी-डिसेंबर हे आर्थिक वर्ष केले आहे. या निर्णयानुसार आता राज्याचा नवीन अर्थसंकल्प डिसेंबरमध्ये सादर केला जाणार आहे, असे वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने दिले आहे. मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद देत मध्य प्रदेश सरकारने आर्थिक वर्षाची रचना बदलण्याचा निर्णय घेतला आहे. यापुढील काळात आणखी कोणती राज्ये आर्थिक वर्षाची रचना बदलणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

🔹महाराष्ट्र दिनावरून ‘उत्तर प्रदेश दिन’

एवढे मोठे राज्य; पण स्वत:चा स्थापना दिवस नाही.. ही बाब उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जाणवली ती लखनौच्या राजभवनात साजऱ्या झालेल्या महाराष्ट्र दिन सोहळ्यात आणि ती त्यांच्या आवर्जून लक्षात आणून दिली ती उत्तर प्रदेशचे राज्यपाल असलेल्या राम नाईक यांनी.

.. मग काय? दुसऱ्याच दिवशी म्हणजे बुधवारी योगींनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेतला आणि उत्तर प्रदेशला २४ जानेवारी हा स्वत:चा दिन मिळाला. हा दिवस निवडण्याचे कारण म्हणजे २४ जानेवारी १९५० रोजी तत्कालीन संयुक्त प्रांताचे (युनायटेड प्रॉव्हिन्स) नामांतर उत्तर प्रदेश असे केले होते.

एखाद्या राजभवनात दुसऱ्या राज्याचा दिवस साजरा होण्याचा योग तसा विरळाच. पण मराठी संस्कृतीवर अपार प्रेम असणाऱ्या राम नाईक यांनी तो लखनौच्या भव्य राजनिवासामध्ये १ मे रोजी जुळवून आणला. त्यासाठी योगींना विशेष अतिथी म्हणून बोलाविले. ते आले आणि जय महाराष्ट्र या शब्दांनी अभिवादन करतच भाषण सुरू केले. त्यानंतर सुरुवातीची काही वाक्येही ते मराठीतूनच बोलले.

पण त्याच वेळी उत्तर प्रदेशात महाराष्ट्र दिन साजरा होत असताना उत्तर प्रदेशला स्वत:चा दिन नसल्याची जाणीव नाईक यांनी करून दिली, योगींना ते मनापासून पटले आणि दुसऱ्याच दिवशी तसा निर्णयही त्यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेऊनही टाकला..

खरे तर नाईक यांनी मागील सरकारलाच उत्तर प्रदेश दिनाची सूचना केली होती. पण अखिलेशांनी त्याकडे दुर्लक्ष केले होते.

🔹प्रसिद्ध गिर्यारोहक ऊली स्टेक यांचा एव्हरेस्टच्या वाटेवर अपघाती मृत्यू

जगप्रसिद्ध गिर्यारोहक ऊली स्टेक यांचा जगातील सर्वोच्च शिखर एव्हरेस्टच्या वाटेवर रविवारी अपघाती मृत्यू झाला. स्वित्र्झलडच्या या ४१ वर्षीय गिर्यारोहकाने एव्हरेस्टसह जगातील अनेक शिखरे एकटय़ाने आणि कृत्रिम प्राणवायूच्या मदतीशिवाय लीलया सर केली आहेत. तंत्रशुद्ध गिर्यारोहणासाठी ते जगभर ओळखले जात. त्यांच्या निधनाने अवघ्या गिर्यारोहण जगाला मोठा धक्का बसला आहे.

ऊली स्टेक हे यंदा त्यांच्या बहुचर्चित एव्हरेस्ट (८८४८ मीटर) आणि सर्वोच्च चौथे शिखर ल्होत्से (८५१६ मीटर) या जोड मोहिमेसाठी इथे आले होते. ते नवीन मार्गाने तसेच एकटय़ाने या दोन्ही शिखरांवर यंदा चढाई करणार होते. यामुळे त्यांच्या या मोहिमेकडे सर्वाचे लक्ष लागले होते. या मोहिमेच्या तयारीचा एक भाग म्हणून वातावरणाशी समरस होण्यासाठी ३० एप्रिल रोजी सकाळी ते एव्हरेस्टलगतच्या नुप्त्से या शिखरावर गेले होते. एकटय़ाने ही चढाई करत असतानाच पाय घसरून ते तब्बल तीन हजार फूट खोल दरीत पडले आणि या अपघातात त्यांचा मृत्यू झाला.

ऊली स्टेक हे कमीतकमी वेळेत (स्पीड क्लाइंिबग) आणि एकटय़ाने (सोलो) शिखर चढाईसाठी म्हणून जगप्रसिद्ध होते. वयाच्या १७व्या वर्षीच त्यांनी विविध शिखरे चढण्यास सुरुवात केली होता. माऊंट एॅगर नॉर्थ फेस (३९७० मीटर, स्वित्र्झलड), मॅटरहॉर्न नॉर्थ फेस (४४७८ मीटर, स्वित्र्झलड), माऊंट एव्हरेस्ट (८८४८ मीटर नेपाळ), माऊंट अन्नपूर्णा साऊथ फेस (८०९१ मीटर, नेपाळ) अशा त्यांच्या काही उल्लेखनीय मोहिमा आहेत. २०१२ साली त्यांनी कृत्रिम प्राणवायूच्या मदतीशिवाय एव्हरेस्ट शिखर सर केले होते. त्यांना गिर्यारोहणामधले अनेक मानाचे पुरस्कार मिळाले आहेत. ऊली स्टेक यांच्यासोबतच भारतातील ज्येष्ठ गिर्यारोहक उमेश झिरपे हेदेखील एव्हरेस्ट शिखराच्या वाटेवर आहेत. ऊली स्टेक यांच्या या अपघाती मृत्यूने मोठा धक्का बसला असून, त्यांनी गिर्यारोहणाला नवी दिशा दिल्याचे झिरपे यांनी सांगितले.

🔹तिहेरी तलाक खटल्यात सलमान खुर्शिद यांची न्याय मित्र म्हणून नियुक्ती

सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या तिहेरी तलाक खटल्यात बुधवारी न्यायालयाने माजी केंद्रीय मंत्री आणि ज्येष्ठ विधिज्ञ सलमान खुर्शिद यांची अमायकस क्युरी (न्याय मित्र) म्हणून नियुक्ती करण्याला मान्यता दिली. येत्या ११ मेपासून सर्वोच्च न्यायालयात तिहेरी तलाकची कायदेशीर वैधता ठरविण्यासाठी रोज सुनावणी घेण्यात येणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीच या खटल्याच्या कामकाजाला गती देण्यासाठी सदर प्रकरण न्यायमूर्तींच्या पाच सदस्यीय खंडपीठाकडे सुपूर्द केले होते. यावेळी न्यायालयाने मुस्लिम महिलांच्या याचिकेवर उन्हाळी सुट्टीतही सुनावणी होणार असल्याचे स्पष्ट केले होते. तसेच समान नागरी कायद्याच्या वादात न पडता या प्रकरणाचा विचार करण्यात येणार असल्याचेही न्यायालयाने म्हटले होते. या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून तिहेरी तलाक हा मुद्दा देशभरात चर्चेचा विषय ठरला आहे.

काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘तिहेरी तलाक’च्या प्रश्नाकडे राजकीय दृष्टिकोनातून पाहू नका, असे आवाहन मुस्लिम समाजाला केले होते. याच समाजातील विचारवंत मंडळी या प्रथेच्या निर्मूलनासाठी पुढे येतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला होता.

 बाराव्या शतकात अनिष्ठ प्रथांविरोधात बसवेश्वर यांनी केलेल्या सुधारणा चळवळीचा संदर्भ देत मोदी यांनी ‘तिहेरी तलाक’च्या पुन्हा लक्ष वेधले होते. तिहेरी तलाकच्या प्रश्नाकडे राजकीय दृष्टिकोनातून पाहू नका. पुढे या आणि त्यावर तोडगा काढा. हा तोडगा उत्तमच असेल आणि पुढील अनेक पिढय़ा त्याबद्दल तुमची आठवण काढतील. समाजातूनच काही शक्तीशाली लोक पुढे येतील आणि कालबाह्य़ झालेल्या या प्रथेचे उच्चाटन करतील. आमच्या मुस्लीम भगिनी आणि मातांची तिहेरी तलाकच्या तडाख्यातून सुटका करण्याची जबाबदारी समाजातील विचारवंत स्वीकारतील याची आपल्याला खात्री आहे. भारतातील मुस्लिमांनी केवळ देशातील मुस्लिमांनाच नव्हे तर जगातील मुस्लिमांना आधुनिकतेचा मार्ग दाखवावा, असे आवाहनही मोदी यांनी केले होते.

🔹पुस्तकांचे गाव उद्यापासून खुले

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन; भिलार परिसरात वातावरणनिर्मिती
निसर्ग आणि स्ट्रॉबेरीचा गोडवा जपणारं महाबळेश्वरजवळील ‘भिलार’ जगाच्या नकाशावर भारतातील पहिले ‘पुस्तकाचे गाव’ म्हणून नवी ओळख घेऊन येत आहे. जगाच्या पाठीवरील मराठी भाषेच्या पुस्तकांच्या गावाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्या गुरुवारी दुपारी तीन वाजता भिलार येथे होणार आहे.

या पुस्तकांच्या गावामध्ये पंचवीस घरांत आणि सार्वजनिक जागांत पुस्तकांचा ‘वाचनानंद’ घेण्यासाठी सर्व तयारी झालेली आहे. त्या त्या घरांमध्ये पुस्तके पोहोचली आहेत. या पुस्तकांवर अनुक्रमांक टाकून पुस्तक शोधण्याची अद्ययावत व्यवस्था झाली आहे. कुठल्या घरात कोणते पुस्तक आहे, याचे निदर्शक फलक रस्त्यावर लावण्यात आलेले आहेत. पुणे-सुरूर-वाई-महाबळेश्वर व सातारा-वाई-महाबळेश्वर रस्त्यावर पुस्तकांच्या गावाचे दिशादर्शक फलक रस्त्यावर लावण्यात आले आहेत. रंगरगोटी करून गाव आकर्षक करण्यात आले आहे. नवी ओळख घेऊन जगासमोर जाण्याची तयारी गावकऱ्यांनी मनोमन केली आहे. गावात उद्या होणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाची मोठी वातावरणनिर्मिती झाली आहे. कार्यक्रमाच्या निमित्ताने ग्रामस्थ ग्रंथिदडी काढणार आहेत.

सुमारे पंधरा हजारांपेक्षा जास्त विविध साहित्यप्रकारांच्या पुस्तकांचा खजिना, कथा, कादंबरी, कविता, ललित, बालसाहित्य, संतसाहित्य, चरित्र, आत्मचरित्र, विज्ञान, इतिहास, भूगोल, प्रवासवर्णने असे साहित्यातील सर्व प्रकार वाचकांना येथे आनंद देणार आहेत. अशा भारतातील व मराठी साहित्याच्या पुस्तकांच्या गावाचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गुरुवार, दि. ४ रोजी दुपारी तीन वाजता होणार आहे.

🔹इस्रायलच्या स्वातंत्र्यदिनी अंध भारतीयाचा सन्मान

इस्रायलमध्ये अंध भारतीय स्थलांतरित दीना सिमाता यांना सन्मानित करण्यात आले आहे. स्वातंत्र्य दिनी आयोजित समारंभात ज्योत प्रज्ज्वलित करणाऱया 14 जणांमध्ये दीना सिमाता यांचा समावेश होता. इस्रायलने सोमवारी आपला 69 वा स्वातंत्र्य दिन साजरा केला. 19 वर्षीय सिमाता मणिपूरच्या नेई मेनाशे समुदायाशी संबंधित आहे. ती जेरुसलेममध्ये अंधांसाठी काम करणाऱया शाल्वा इन्स्टिटय़ूटची विद्यार्थिनी आहे. सिमाता तेथील दिव्यांग मुलांच्या एका गटाचे नेतृत्व करते. सिमाता उत्कृष्ट गायिका असून अनेक प्रख्यात गायकांसोबत तिने आपली कला सादर केली आहे. सिमाता हिला समाजाप्रति तिच्या योगदानासाठी स्वातंत्र्यदिन समारंभात ज्योत प्रज्ज्वलित करणाऱया समूहात सामील करून सन्मानित करण्यात आले. इस्रायलमध्ये जगभरातील ज्यू समुदायाचे लोक स्थलांतरित झाले आहेत. यानुसार भारतातील ज्यू लोकांनी देखील इस्रायलमध्ये स्थलांतर करत तेथील नागरिकत्व स्वीकारले आहे.

🔹सायबर सुरक्षा मजबुतीसाठी समिती

गुंतवणूकदारांच्या भांडवलाचे सायबर हल्ल्यापासून संरक्षण होण्यासाठी सेबीने पावले उचलली आहे. यानुसार भविष्यात कोणत्याही प्रकारचा हल्ला होणार नाही याची काळजी घेण्यासाठी समितीची स्थापना करण्यात आली आहे. ही समिती गुंतवणूकदारांच्या भांडवलाचे सायबर हल्ल्यापासून संरक्षण करण्यासाठी तरतूदी सांगणार आहे.

चार सदस्यीय या समितीच्या अध्यक्षपदी माधबी पुरी बुच यांची नियुक्ती करण्यता आली. त्या सेबीच्या पूर्णवेळ सदस्या आहेत. याव्यतिरिक्त एस. व्ही. मुरलीधर राव हे सेबीचे व्यवस्थापकीय संचालक, संजय बहल हे सीईआरटीचे महासंचालक आणि आयआयएससी बेंगळूरमधील प्रमुख संशोधक शास्त्रज्ञा एच. कृष्णमुर्ती यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सायबर सुरक्षेसाठी सेबी आणि संपूर्ण भांडवली बाजाराला मार्गदर्शन करणार आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरील सुरक्षा पुरविण्यासाठी मदत होणार आहे. कोणत्याही सायबर हल्ल्याला तोंड देण्यास सज्ज असणारी ही यंत्रणा असणार आहे.

आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत पातळीवर भांडवली बाजारात झालेल्या घटनांचा अभ्यास करण्यात येईल आणि त्यातील चुका शोधण्याचा प्रयत्न करण्यात येईल. सेबीला सायबर लॅब अथवा सायबर केंद्र स्थापन करण्यासाठी मार्गदर्शन करेल. देशाच्या भांडवल बाजारातील संगणकीय प्रणाली मजबुत करण्यासाठी अनेक सरकारी संस्थाची मदत घेण्यात येईल.

🔹गाळमुक्त धरण अन् गाळयुक्त शिवार योजना

राज्यातील धरणे व जलसाठ्याच्या साठवण क्षमतेत वाढ करण्याच्या दृष्टीने तसेच धरणांमधील गाळ काढून तो शेतांमध्ये वापरण्याची तरतूद असलेली गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजना राबविण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. लघु पाटबंधारे तलाव, साठवण तलाव, गाव तलाव, पाझर तलाव व विदर्भातील माजी मालगुजारी तलाव मिळून ३१ हजार ४५९ जलसाठ्यांमधील गाळ काढण्यात येईल. त्यांची साठवण क्षमता ही ४२.५४ लक्ष घनमीटर असून सिंचन क्षमता ८ लाख ६८ हजार हेक्टर आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹राष्ट्रीय पोलाद धोरण 2017

राष्ट्रीय पोलाद धोरण 2017 ला मान्यता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या क्रेंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत “राष्ट्रीय पोलाद धोरण 2017 (National Steel Policy -NSP)” ला मान्यता देण्यात आली आहे. हे धोरण 2005 सालच्या राष्ट्रीय पोलाद धोरणाला बदलणार. भारत जागतिक स्तरावर तिसरा सर्वात मोठा पोलाद उत्पादक देश आहे. पोलाद उत्पादनाचे देशाच्या सकल देशांतर्गत उत्पादनात सुमारे 2% योगदान आहे. भारताने वर्ष 2016-17 मध्ये पोलादाचे उत्पादन 100 MT पर्यंत पोहोचले आहे. वर्तमान परिस्थितीत पोलादाचा दरडोई खप 61 किलोग्रॅम आहे.

NSP 2017 ची प्रमुख वैशिष्ट्ये वर्ष 2030-31 पर्यंत देशांतर्गत कच्च्या पोलादाची क्षमता 300 MT, 255 MT उत्पादन आणि 158 किलोग्रॅम वजनाचा दरडोई खप याप्रमाणे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.देशातील पोलाद क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी दूरदृष्टी ठेवून वर्ष 2030-31 पर्यंत 10 लाख कोटी अतिरिक्त गुंतवणुकीद्वारे, 300 MT (दशलक्ष टन) पोलाद निर्मितीचे उद्दिष्ट या धोरणात ठेवण्यात आले आहे.खाजगी निर्मात्यांना  धोरणात्मक आधार आणि मार्गदर्शनाद्वारे पोलाद उद्योगात स्वयंपूर्णता निर्माण करणे, क्षमता वृद्धीला प्रोत्साहन देणे, वाजवी किमतीत उत्पादन करणे, परकीय गुंतवणूक सुलभ करणे, देशांतर्गत पोलाद मागणी वाढवणे ही या धोरणाची मुख्य वैशिष्ट्ये आहेत.कोकिंग कोळश्यावरील देशांतर्गत उपलब्धता वाढवणे आणि वर्ष 2030-31 पर्यंत त्याच्या आयातावरील निर्भरता सध्याच्या 85% वरून 65% पर्यंत कमी करणे.MSME पोलाद क्षेत्रात ऊर्जा कार्यक्षम तंत्रांचा वापर करून एकूण उत्पादकता सुधारण्यासाठी आणि ऊर्जा वापर कमी करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाईल.स्टील रिसर्च अँड टेक्नॉलॉजी मिशन ऑफ इंडिया (SRTMI) ची स्थापना करून पोलाद मंत्रालय या क्षेत्रात संशोधन व विकास सुविधा देणार आहे. स्पर्धात्मक दरात लोहखनिज, कोकिंग कोळसा आणि नॉन-कोकिंग कोळसा, नॅचरल गॅस इ. कच्च्या मालाची उपलब्धता सुनिश्चित करणार.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹भारताने FIFA क्रमवारीत 100 वे स्थान मिळवले

भारतीय राष्ट्रीय फुटबॉल संघ “ब्ल्यू टायगर” हे नव्या FIFA क्रमवारीत 21 वर्षात प्रथमच 100 व्या स्थानावर पोहचले आहे. क्रमवारीत प्रथम तीन संघामध्ये अनुक्रमे ब्राझिल, अर्जेंटिना आणि जर्मनी यांचा क्रम लागतो.

एप्रिल १९९६नंतरची ही भारताची सर्वोच्च क्रमवारी आहे. त्या वेळी देखील भारत शंभराव्या स्थानी होता. भारताची यापूर्वीची सर्वोच्च क्रमवारीत ९४ आहे. फेब्रुवारी १९९६मध्ये भारताने हे स्थान पटकावले आहे.

स्वातंत्र्यानंतर भारताने केवळ सहा वेळा अव्वल शंभर संघांमध्ये प्रवेश मिळवला आहे. आशियाई क्रमवारीत भारतीय संघ अकराव्या स्थानावर आहे. भारतीय संघाचे प्रशिक्षक स्टिफन कॉन्स्टॅन्टीन म्हणाले, ‘अधिकाधिक सामने खेळल्यावर आम्ही क्रमवारीत निश्चितच प्रगती करू. यानंतर अनेक महत्त्वाच्या लढती खेळायच्या आहेत.’ भारताने एएफसी आशियाई कप पात्रता फेरीत म्यानमारवर १-०ने विजय मिळवला. ६४ वर्षानंतर प्रथमच भारताने म्यानमारवर मात केली. भारताने मागील १३ पैकी ११ लढती जिंकल्या आहेत. यात भारताने ३१ गोल नोंदविले आहेत.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹साऊथ एशिया” उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण

साउथ एशिया” उपग्रहाला 5 मे 2017 रोजी GSLV F-09 च्या सहाय्याने श्रीहरिकोटा येथून ISRO कडून अंतराळात सोडण्यात आले आहे.
प्रकल्पामध्ये अफगाणिस्तान, बांग्लादेश, भूटान, नेपाळ, श्रीलंका आणि मालदीव यांचा सहभाग आहे.

'जीसॅट-९' च्या निर्मितीसाठी २३५ कोटींचा खर्च आला आहे. 'जीसॅट-९' मुळे दक्षिण आशियातील देशांमधील दूरसंचारसाठी मदत होणार आहे. 'जीसॅट-९'मुळे भारताच्या शेजारील देशांना कोणताच खर्च उचलावा लागणार नाही.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹डेव्हिड जे. गॅरो लिखित "राईझिंग स्टार: द मेकिंग ऑफ बराक ओबामा"

डेव्हिड जे. गॅरो यांचे "राईझिंग स्टार: द मेकिंग ऑफ बराक ओबामा" शीर्षकाचे पुस्तक प्रकाशित झाले आहे. पुलित्झर प्राइज(1987) जिंकणारे डेव्हिड गॅरो हे एक अमेरिकन इतिहासकार आहेत.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹नवीन केंद्र पुरस्कृत ‘SAMPADA’ योज नेला मंजूरी

स्कीम फॉर ऍग्रो मरिन प्रोसेसिंग अँड डेव्हलपमेंट ऑफ ऍग्रो प्रोसेसिंग क्लस्टर (SAMPADA/ संपदा) या योजनेअंतर्गत अन्नप्रक्रिया उद्योग मंत्रालयाच्या योजनांच्या फेर रचनेला मंत्रिमंडळाच्या अर्थविषयक समितीने मान्यता दिली आहे.

▪️योजनेची वैशिष्ठ्ये

कृषी प्रक्रियेचे आधुनिकीकरण, कृषी क्षेत्राला जोड आणि कृषी क्षेत्रातले वाया जाणारे धान्य कमी करण्यासाठी ही योजना राबवण्यात येणार आहे.

केंद्रीय सरकारकडून 6000 कोटी रुपयांच्या नियोजनासह या योजनेमध्ये वर्ष 2019-20 पर्यंत 31,400 कोटी रुपयांची गुंतवणूक आकर्षित करणे, 1,04,125 कोटी रुपये किंमतीचे 334 लक्ष मेट्रिक टन (MT) कृषि-उत्पादनाची हाताळणी, देशात 20 लाख शेतक-यांना फायदा तसेच 5,30,500 प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती करणे अशी उद्दिष्टे ठेवली गेली आहे.

SAMPADA ही मेगा फूड पार्क्स, एकात्मिक शीत साखळी आणि मूल्यवर्धित पायाभूत सुविधा, अन्न सुरक्षा आणि गुणवत्ता हमी पायाभूत सुविधा, आदी यासारख्या मंत्रालयाच्या चालू असलेल्या योजना तसेच कृषि-प्रक्रिया समुहासाठी पायाभूत सुविधा, बॅकवर्ड व फॉरवर्ड लिंकेजची निर्मिती, अन्न प्रक्रिया व संरक्षण क्षमतेचा विस्तार/निर्माण यासारख्या नव्या योजनांचा समावेश असलेली एक छत्र योजना आहे.

▪️सद्यपरिस्थिती

अन्न प्रक्रिया क्षेत्र हा भारतीय अर्थव्यवस्थेचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. वर्ष 2015-16 दरम्यान, अन्न प्रक्रिया उद्योगात 7% वाढीची नोंद केली गेली आहे.

▪️केंद्र सरकारचे प्रयत्न

फलोत्पादन आणि फलोत्पादना व्यतिरिक्त उत्पादनांचे कापणीनंतर नुकसान टाळण्यासाठी, देशभरात 42 मेगा फूड पार्क्स आणि 236 एकात्मिक शीतसाखळी तयार करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. शिवाय, या क्षेत्रात 100% FDI ला मान्यता दिली आहे. कमी दरात कर्जासाठी नाबार्डमध्ये 2000 कोटी रुपयांचा विशेष निधि स्थापित केला आहे.

🔹बंगानापल्ले आंब्याला GI टॅग मिळाले

रसाळ बंगानापल्ले आंब्याला भौगोलिक संकेत (Geographical Indication -GI) टॅग मिळाले आहे. आंध्रप्रदेश या आंब्याच्या विविध जातीचा मालक म्हणून ओळखला जातो.

आंध्रप्रदेश सरकार हे आंब्यासाठी GI टॅगचे नोंदणीकृत मालक आहेत. उत्पादन कोणत्या क्षेत्रातून आले आहे ही माहिती GI टॅग दर्शवतो.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹मध्यप्रदेश: जानेवारी-डिसेंबर याप्रमाणे आर्थिक वर्ष करणारे पहिले राज्य

मध्यप्रदेश सरकारने सध्या आचरणात असलेल्या एप्रिल-मार्च या स्वरुपाच्या आर्थिक वर्षाचे स्वरूप बदलून ते आता जानेवारी-डिसेंबर याप्रमाणे जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे. मध्यप्रदेश हे जानेवारी-डिसेंबर याप्रमाणे आर्थिक वर्ष करणारे पहिले राज्य ठरत आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹इंदूर सर्वांत स्वच्छ शहर

केंद्र सरकारने केलेल्या ‘स्वच्छ सर्वेक्षण-२०१७’मध्ये मध्य प्रदेशातील इंदूरने देशातील सर्वांत स्वच्छ शहराचा मान पटकावला आहे. केंद्रीय नगरविकास मंत्री एम. व्यंकय्या नायडू यांनी गुरुवारी ही घोषणा केली.

राज्यांचा विचार करता गुजरातमधील १२ शहरांनी टॉप ५०मध्ये स्थान मिळवल्याने या राज्याची कामगिरी सर्वांत सरस ठरली. जाहीर करण्यात आलेल्या यादीत महाराष्ट्रातील ४४ शहरांचा समावेश आहे, पण टॉप-१०० मध्ये फक्त सात शहरे जागा मिळवू शकली.

या यादीमध्ये ४३४ शहरांचा समावेश असून इंदूरपाठोपाठ मध्य प्रदेशातीलच भोपाळने दुसरा, तर आंध्र प्रदेशच्या विशाखापट्टणमने तिसरा क्रमांक पटकावला आहे. मागील दोन वर्षे पहिल्या क्रमांकावर राहिलेल्या मैसूरला यावेळी मात्र पाचव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले आहे. महाराष्ट्रातील केवळ नवी मुंबईने (आठवा क्रमांक) पहिल्या दहा शहरांमध्ये स्थान मिळवले आहे. टॉप-१००मध्ये महाराष्ट्रातील सातच शहरांचा क्रमांक लागला आहे. नागपूर-मुंबई रेल्वे मार्गावरील महत्त्वाचे स्थानक असलेल्या भुसावळला शेवटून दुसरे म्हणजेच ४३३वे स्थान मिळाले आहे. तर उत्तर प्रदेशमधील गोंडा शहर (४३४) सर्वांत अस्वच्छ ठरले आहे.

▪️चंद्रपूर राज्यात सहावे

चंद्रपूर महाराष्ट्रात नवी मुंबईने पहिला तर बृहन्मुंबईने दुसरा क्रमांक पटकावला आहे. देशातील सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये समावेश असलेल्या चंद्रपूरने स्वच्छतेच्या बाबतीत मात्र बाजी मारली. चंद्रपूरने महाराष्ट्रात सहावा तर देशात ७६वा क्रमांक पटकावला. दोन हजार गुणांच्या या परीक्षेत १२०० गुण हे घनकचरा व्यवस्थापन, हगणदारीमुक्त शहर यासाठी, तर उरलेले ८०० गुण शहर, प्रशासन कागदपत्रे आदीविषयी राखून ठेवले होते. त्यात चंद्रपूरला १ हजार ३१५ गुण मिळाले.

▪️टॉप १० स्वच्छ शहरे

क्रमांक शहर राज्य
१ इंदूर मध्यप्रदेश
२ भोपाळ मध्यप्रदेश
३ विशाखापट्टणम आंध्रप्रदेश
४ सूरत गुजरात
५ म्हैसूर कर्नाटक
६ तिरुविरापल्ली तामिळनाडू
७ नवी दिल्ली नवी दिल्ली
८ नवी मुंबई महाराष्ट्र
९ तिरुपती आंध्रप्रदेश
१० वडोदरा गुजरात

गुरुवारी जाहीर करण्यात आलेल्या ४३४ शहरांच्या यादीत महाराष्ट्रातील ४४ शहरांचा समावेश आहे, पण टॉप-१००मध्ये राज्यातील फक्त सात शहरे जागा मिळवू शकली आहेत. टॉप-१०मध्ये तर केवळ नव्या मुंबईला स्थान मिळाले आहे. राज्यातील नऊ शहरे ३००च्या पलीकडे आहेत. भुसावळला शेवटून दुसरे, अर्थात ४३३वे स्थान मिळाले आहे. त्यामुळे स्वच्छतेच्या बाबतीत महाराष्ट्र पिछाडीवरच असल्याचे चित्र पुन्हा समोर आले आहे.

▪️निकष

शहरी भागांमध्ये हागणदारीमुक्तीसाठी केलेल्या प्रयत्नांचे फलित, घनकचऱ्याचे संकलन, प्रक्रिया व विल्हेवाट या प्रमुख मुद्द्यांच्या आधारे हे सर्वेक्षण करण्यात आले. त्यासाठी एकूण २००० गुणांपैकी हागणदारीमुक्तीमध्ये आणि घनकचऱ्याच्या व्यवस्थापनामध्ये मिळालेल्या यशासाठी ९००, नागरिकांच्या मताला ६०० व स्वतंत्र निरीक्षणाचे ५०० गुण ठरविण्यात आले होते. या गुणांच्या आधारे स्वच्छ शहरांची क्रमवारी जाहीर करण्यात आली आहे.

▪️वाराणसीची प्रगती

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा लोकसभा मतदारसंघ असलेल्या वाराणसीने या सर्वेक्षणात ३२वे स्थान मिळवले आहे. गेल्या वर्षी वाराणसी शहर ६५ व्या, तर २०१४मध्ये ४१८व्या स्थानी होते. मात्र गेल्या दोन सर्वेक्षणांमध्ये अव्वल राहिलेल्या म्हैसुरूचे स्थान घसरून ते पाचव्या क्रमांकावर गेले आहे.

अव्वल ५०मध्ये गुजरातमधील १२, मध्य प्रदेशातील ११, तर आंध्र प्रदेशातील आठ शहरे बगाहा आणि कटिहार (बिहार), हरदोई (उत्तराखंड), बहरैच. शहाजहानपूर आणि खुर्जा (उत्तर प्रदेश) आणि मुक्तसर, अबोहर (पंजाब) ही शहरे तळाच्या १० शहरांमध्ये आहेत.

▪️महाराष्ट्राची स्थिती

शहर क्रमांक
नवी मुंबई ८
बृहन्मुंबई २९
अंबरनाथ ८९
ठाणे ११६
मिरा-भाईंदर १३०
वसई-विरार १३९
कुळगाव-बदलापूर १५८
पनवेल १७०
उल्हासनगर २०७
कल्याण-डोंबिवली २३४
भिवंडी-निजामपूर ३९२

▪️देशातील सर्वांत स्वच्छ १० शहरे

इंदूर (म. प्रदेश)
भोपाळ (म. प्रदेश)
विशाखापट्टणम (आंध्र प्रदेश)
सुरत (गुजरात)
मैसूर (कर्नाटक)
तिरुचिरापल्ली (तमिळनाडू)
नवी दिल्ली महापालिका (दिल्ली)
नवी मुंबई (महाराष्ट्र)
तिरुपती (आंध्र प्रदेश)
बडोदा (गुजरात)

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹के. विश्वनाथ यांना फाळके पुरस्कार प्रदान

चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च मानला जाणारा दादासाहेब फाळके पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते ८७ वर्षीय ज्येष्ठ दाक्षिणात्य चित्रपटनिर्माते, दिग्दर्शक व अभिनेते के. विश्वनाथ यांना प्रदान करण्यात आला. या पुरस्काराचे ते ४८वे मानकरी ठरले. सुवर्णकमळ, मानपत्र व १० लाख रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. हा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाल्याबद्दल मी फार आनंदी आहे. यानिमित्त मी माझे आईवडील व देवाला प्रणाम करतो, अशी भावना विश्वनाथ यांनी व्यक्त केली.
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये अक्षयकुमार (सर्वोत्कृष्ट अभिनेता), राजेश मापुसकर (सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक), कासव (सर्वोत्कृष्ट चित्रपट) आदींना राष्ट्रपतींच्या हस्ते गौरविण्यात आले.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹आमोणकर यांच्या नावाने शिष्यवृत्ती

गोवा राज्य सरकारने दिवंगत ज्येष्ठ गायिका किशोरी आमोणकर यांच्या नावाने संशोधन शिष्यवृत्ती जाहीर केली आहे. ‘गानसरस्वती किशोरी आमोणकर रिसर्च फेलोशिप इन इंडियन क्लासिकल म्युझिक,’ असे शिष्यवृत्तीचे नाव असल्याची माहिती गोव्याचे कला आणि सांस्कृतिक मंत्री गोविंद गावडे यांनी दिली.

गावडे म्हणाले, ‘किशोरी आमोणकर यांच्या सन्मानार्थ सुरू केलेली शिष्यवृत्ती ३१ मार्च, २०२२पर्यंत असेल. तरुणांमध्ये भारतीय शास्त्रीय संगीताची आवड निर्माण व्हावी, आमोणकरांचा वैभवशाली वारसा जतन व्हावा आणि शास्त्रीय संगीताच्या अभ्यासाला चालना मिळावी म्हणून ही शिष्यवृत्ती सुरू केली आहे. राज्य सरकार संचलित कला अकादमीच्या वतीने शिष्यवृत्ती देण्यात येईल. गोव्यातील संगीतकारांनी या शिष्यवृत्तीचा फायदा घेऊन भारतीय शास्त्रीय संगीत, गायन, नृत्य आणि वाद्य आदी क्षेत्रांच्या अभ्यासाठी शिष्यवृत्ती देण्यात येईल. वरिष्ठ आणि कनिष्ठ पातळीवर दोन शिष्यवृत्त्या देण्यात येतील.’ किशोरी आमोणकर यांचे वयाच्या ३ एप्रिल रोजी मुंबईत निधन झाले.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹अग्नि-2 बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी

अग्नि-2 बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची गुरुवारी सकाळी ओडिशातील धमाराच्या एपीजे अब्दुल कलाम बेटावरुन यशस्वी चाचणी घेण्यात आली. ही चाचणी सकाळी 10.22 वाजता करण्यात आली. एपीजे अब्दुल कलाम बेटाला आधी व्हीलर्स बेट या नावाने ओळखले जायचे. 20 मीटर लांब अग्नि-2 क्षेपणास्त्रात दोन सॉलिड फ्यूएल स्टेज लावलेले असून जमिनीवर मारा करणाऱया शस्त्रास्त्रांमध्ये हे सर्वाधिक शक्तिशाली शस्त्रास्त्र आहे. याचे प्रक्षेपण वजन 17 टन असून ते 2000 किलोमीटरपेक्षा अधिक अंतरापर्यंत 1000 किलोचे पेलोड वाहून नेऊ शकते. अग्नि क्षेपणास्त्रांची साखळी डीआरडीओकडून विकसित करण्यात आली आहे. या शेणीचे क्षेपणास्त्र 2007 साली भारतीय लष्कराकडे होते. आता भारताने या क्षेपणास्त्राचे अनेक इतर विकसित मॉडेल तयार केले आहेत.

प्रिन्स फिलिप यांची निवृत्ती


        ब्रिटनचे राजकुमार व ड्यूक ऑफ एडिन्बर्ग प्रिन्स फिलिप यांनी शाही जबाबदारीतून निवृत्तीची घोषणा केली आहे. 95 वर्षांचे फिलिप येत्या ऑगस्टनंतर कोणत्याही जाहीर कार्यक्रमात शाही घराण्याचे सदस्य म्हणून हजर राहणार नाहीत, असे बकिंगहॅम राजप्रासादाने जाहीर केले. राजे फिलिप सुमारे 780 विविध संस्थांशी आश्रयदाते तसेच अध्यक्ष वा पदाधिकारी नात्याने संबंधित असून, ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचे पती आहेत. ड्यूक ऑफ एडिन्बर्ग यांनी यावर्षी सप्टेंबर महिन्यापासून सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला असून, त्यांच्या या निर्णयाला महाराणी एलिझाबेथ यांचा पाठिंबा आहे.

         ड्यूक राणीसोबत किंवा स्वतंत्रपणे ऑगस्टपर्यंत पूर्वनियोजित कार्यक्रमांत सहभागी होत राहतील. त्यानंतर ते दौरे आणि भेटीगाठींचे कोणतेही नवे निमंत्रण स्वीकारणार नाहीत.  तथापि, ते वेळोवेळी काही खास कार्यक्रमांत सहभागी होण्याचा निर्णय घेऊ शकतात. प्रिन्स फिलिप यांनी महाराणींसोबत सर्व महत्त्वपूर्ण परदेश दौरे केले आहेत. यात भारताच्या तीन दौर्‍यांचाही समावेश आहे. त्यांनी 1961 मध्ये भारताचा पहिला दौरा केला होता. त्यानंतर 1983 आणि 1997 मध्ये त्यांनी भारताचे आणखी दोन राजकीय दौरे केले होते.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹बँकिंग नियमन ( दुरूस्ती) अध्यादेश , 2017 संमत

केंद्र सरकारकडून बॅंकिंग नियमन (दुरूस्ती) अध्यादेश संमत करण्यात आला आहे. या संदर्भात अधिसूचनेनुसार, भारतीय बँकिंग प्रणालीला कमकुवत करणार्या 31 डिसेंबर 2016 पर्यंत 9.64 लाख कोटी रुपयांच्या अकार्यक्षम मालमत्ता (NPA) किंवा थकीत कर्ज या संदर्भात असलेल्या समस्येला निकालात काढण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

अध्यादेशात तीन महत्त्वाच्या उपाययोजना प्रस्तावित केल्या आहेत; ते म्हणजे -

दिवाळखोरी नियमांतर्गत कर्जबुडव्यांच्या विरोधात कारवाई सुरू करण्यासाठी बँकांना निर्देश देण्यासाठी भारत सरकार भारतीय रिझर्व्ह बँकेला अधिकृत करू शकते.

RBI स्वतःच्या तत्वावर थकीत मालमत्तेचे निवारण करण्यासाठी बँकांना दिशानिर्देश देऊ शकतात.

थकीत मालमत्तेचे निराकरण करण्याबाबत बँकांना सल्ला देण्यास RBI त्यांनी निवड केलेल्या सदस्यांची समिती तयार करू शकतात.

▪️अध्यादेशात नवीन काय आहे?

नव्या अध्यादेशामधून, बँकिंग नियमन अधिनियम, 1949 मध्ये कलम 35AA आणि 35B जोडले गेले आहेत.

कलम 35AA हे RBI ला कर्ज बुडव्यांच्या प्रकरणात कारवाई करण्याच्या प्रक्रियेला सुरू करण्याबाबत बँकांना निर्देश देण्याचे अधिकार देते.

कलम 35B हे थकीत मालमत्तेच्या बाबतीत प्रकरणे कशी हाताळावीत याविषयी बँकांना सल्ला देण्यासाठी समिती तयार करण्याचा RBI ला अधिकार प्रदान करते.

या उपाययोजनांमुळे, RBI आणि केंद्र सरकार या दोघांनाही कोणत्याही कर्ज बुडव्या कंपनीच्या विरोधात थेट कारवाई करण्याची परवानगी देते. मालमत्ता वाढविण्यासाठी इच्छुक सार्वजनिक क्षेत्रातील बँकांसाठी सामंजस्य करण्यासंदर्भात तरतूद आणण्यास RBI ला सक्षम करते. तसेच, आर्थिक नुकसान करणार्या शाखांना बंद करून कर्जबुडव्यांची संपत्ती विकून तात्काळ रोख रक्कम उभी करून बँकांचा नफा वाढवण्याकरता बँकांना RBI कडून निर्देश दिले जाऊ शकते.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹HIV+ बालकांना 'वंचित गट' यामध्ये समाविष्ट करणार

सर्वोच्च न्यायालयाने बालकांचा मोफत व अनिवार्य शिक्षणाचा अधिकार कायदा, 2009 अंतर्गत वंचित गटात HIV+ बालकांचा समावेश करण्याबाबत राज्य सरकारांना अधिसूचित केले आहे.
'नाझ फाऊंडेशन' ने दाखल केलेल्या जनहित याचिकेवर ही सुनावणी आहे.

🔹हरयाणा मजूरांना अनुदानित भोजनाची सोय देणार

हरयाणा सरकारने राज्यातील 23 ठिकाणी अंत्योदय अन्न योजनेंतर्गत नोंदणीकृत बांधकाम मजूरांना अनुदानित दराने भोजन देणारी भोजनालये उघडण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय, 23 सोयीस्कर ठिकाणी अन्न वितरित करणार्या वाहनांना सुरूवात केली जाणार आहे.

🔹आरोग्य मंत्रालया चा स्वदेशी नावीन्यपूर्ण eVIN प्रकल्प स्पष्ट

भारत दौर्यावर असलेल्या फिलिपिन्स, इंडोनेशिया, बांग्लादेश, नेपाळ आणि थायलंडचे प्रतिनिधीमंडळ आरोग्य मंत्रालयाच्या eVIN (इलेक्ट्रॉनिक वॅक्सीन इंटेलिजन्स नेटवर्क) प्रकल्पाचा अभ्यास करण्याकरिता भारत दौर्यावर आले आहे.

सर्व लहान मुलांसाठी सहजतेने आणि वेळेवर लसीची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी, eVIN ही भारतामधील एक देशातच विकसित तंत्रज्ञान व्यवस्था आहे, जे लसीच्या साठ्याला डिजिटल स्वरुपात दर्शवते आणि स्मार्टफोन अप्लिकेशनद्वारे शीतसाखळीच्या तापमानावर देखरेख ठेवते.

ही नावीन्यपूर्ण व्यवस्था अलीकडेच भारतातील बारा राज्यांमध्ये कार्यान्वित केली जात आहे. संयुक्त राष्ट्रसंघ विकास कार्यक्रम (UNDP) द्वारे eVIN प्रकल्प राबवविला जात आहे.

प्रकल्पाचे उद्दिष्ट व ठळक मुद्दे
लसीचा साठा आणि त्याचा वाहतुकीतून प्रवाह तसेच राज्यांमधील सर्व शीतसाखळीच्या केंद्रावरचे तापमान याविषयी वास्तविक वेळेत माहिती पुरवून भारत सरकारच्या सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रमाला पाठबळ देण्याच्या उद्देशाने eVIN प्रकल्प सुरू करण्यात आला आहे.

भारतातील लसीचे वितरण, खरेदी आणि नवीन प्रतिजनुकांसाठी नियोजन अश्या संबंधात सुधारित धोरण तयार करण्यासाठी पुरावा म्हणून आधार प्रदान करतो.

शिवाय, यामधून प्रशासित व्यवस्था राखण्यासाठी लसीसंबंधित शीतसाखळीच्या जाळ्यामधील तफावत ओळखणे आणि त्यामध्ये अधिक स्पष्टता आणणे; पायाभूत सुविधांच्या विस्ताराकडे लक्ष वेधणे; मानक कार्यप्रणाली विकसित करणे; आणि चांगल्या सराव पद्धतींना प्रोत्साहन देणे; अश्याप्रमाणे मदत होते.

शासकीय शीतसाखळी हाताळणार्यांची क्षमता वृद्धी करून राज्य शीतसाखळी जाळ्याला सक्षम बनवते आणि प्रत्येक जिल्ह्यात लसीच्या साठ्याबाबत व वाहतुकीबाबत माहितीचा अंदाज घेण्यासाठी लस व शीत साखळी व्यवस्थापकांना तैनात करते.

तांत्रिक क्षमता निर्माण करून शीतसाखळी हाताळणार्यांना सक्षम करते.

🔹महात्मा गांधींची शाळा बंद झाली

अल्फ्रेड हायस्कूल” ही 164 वर्ष जुनी शाळा जेथे महात्मा गांधींनी आपले शिक्षण पूर्ण केले अखेरीस बंद करण्यात आली आहे. “अल्फ्रेड हायस्कूल” ची इमारत 1875 साली जुनागडच्या नवाबाने बांधली होती आणि त्याला एडिनबर्गच्या प्रिन्स अल्फ्रेडच्या नाव देण्यात आले होते. 1947 साली स्वातंत्र्यानंतर, याला मोहनदास गांधी हायस्कूल असे नाव देण्यात आले.

🔹स्वच्छ सर्वेक्षण 2017 क्रमवारी प्रसिद्ध

स्वच्छ भारत अभियानाच्या प्रगतीचे विश्लेषण करण्यासाठी, केंद्रीय शहरी विकास मंत्रालयाने ऑगस्ट 2016 मध्ये "स्वच्छ सर्वेक्षण" 2017 या उपक्रमाला सुरुवात केली होती, ज्यामध्ये स्वच्छता आणि शहरी आरोग्य यांच्या दृष्टीने देशातील 500 शहरांचे मूल्यांकन केले गेले. यासंबंधी "स्वच्छ सर्वेक्षण" 2017 क्रमवारी 4 मे 2017 रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

स्वच्छतेचे मूल्यांकन भारतीय गुणवत्ता परिषद (QCI) द्वारे केले गेले आहे.

▪️अहवालाचे ठळक मुद्दे

वर्ष 2017 मध्ये प्रथम 10 शहरांमध्ये अनुक्रमे इंदोर, भोपा, विशाखापट्टणम, सूरत, म्हैसूर, तिरुचिरापल्ली, नवी दिल्ली महानगर परिषद (NDMC), नवी मुंबई, तिरुपती आणि वडोदरा यांचा क्रम लागतो आहे.

क्रमवारीत सर्वात शेवटी असलेल्या तीन शहरांमध्ये गोंडा (उत्तर प्रदेश) (434 वे), भुसावळ (महाराष्ट्र) (433), बागाहा (बिहार) (432) हे आहेत.

गुजरात (12), मध्यप्रदेश (11) आणि आंध्रप्रदेश (8) या राज्यांतील 31 शहरांनी प्रथम 50 स्वच्छ शहरांमध्ये स्थान मिळवले आहे.

चंदीगढ, छत्तीसगढ, दिल्ली, हिमाचल प्रदेश, झारखंड, कर्नाटक, सिक्कीम आणि उत्तरप्रदेश यांच्यातील प्रत्येकी एका शहराचे नाव प्रथम 50 स्वच्छ शहरांमध्ये आले आहे.

या क्रमवारीत महाराष्ट्राच्या 44 शहरांचा समावेश करण्यात आला आहे. क्रमवारीत प्रथम दहा शहरांमध्ये नवी मुंबई (8) चा क्रम लागला आहे. प्रथम 50 स्वच्छ शहरांमध्ये महाराष्ट्राच्या पुणे (13), ग्रेटर मुंबई (29) यांच्या समावेशासह तीन शहरांचा समावेश आहे.

शहरांच्या मूल्यांकनासाठी स्वच्छता आणि आरोग्य संबंधी गृहीत धरलेले पैलू

हागणदारी मुक्त शहर आणि एकात्मिक घनकचरा व्यवस्थापन यांसाठी धोरण

माहिती, शिक्षण आणि वर्तणूक बदल संवाद (IEBC) कार्यक्रम

घनकचरा दारोदार गोळा करणे आणि वाहतूक करणे

घनकचर्यावरील प्रक्रिया आणि विल्हेवाट
सार्वजनिक स्वच्छतागृहे व शौचालये यांची उपलब्धता

घरगुती वैयक्तिक शौचालय बांधणी

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹अजलन शाह हॉकी स्पर्धेत भारताला कांस्य पदक

अजलन शाह हॉकी स्पर्धेत भारतीय संघाने कांस्य पदकावर आपले नाव कोरले. स्पर्धेच्या अंतिम फेरीत खेळण्याचे स्वप्न भंगल्यानंतर कांस्य पदकाच्या लढतीत न्यूझीलंडच्या संघाचा ४-० असा धुव्वा उडवला.

सामन्याच्या पहिल्या सत्रात दोन्ही संघाचे सामन्यावर नियंत्रण होते. मात्र, दुसऱ्या सत्रापासून भारतीय संघाने सामन्यावर पकड मिळवण्यास सुरूवात केली. दुसऱ्या सत्रातील पहिल्या मिनिटात पेनल्टी कॉर्नरवर रुपिंदर पाल सिंहने पहिला गोल केला. त्यानंतर रूपिंदर १० मिनिटांतच दुसरा गोल केला. तिसऱ्या सत्रात कोणताही गोल झाला नाही. चौथ्या सत्रात, सामन्याच्या ४८ व्या मिनिटाला एस.व्ही. सुनिल आणि तलविंदर सिंग याने ६० व्या मिनिटाला गोल करत सामन्यातील गोल आघाडी ४-० शून्य अशी वाढवली.

🔹बीड जिल्ह्यात मुलींचा जन्मदर वाढला

बीड जिल्ह्यात स्त्री जन्माविषयी झालेली जनजागृती, बेटी बचाओ बेटी पढाओ अभियान, माझी कन्या भाग्यश्री योजनेची अंमलबजावणी, गरोदर मातांना झालेले समुपदेशन आदी विविध कारणांमुळे जिल्हयात मुलींच्या जन्मदराचे प्रमाण वाढले आहे. यावर्षी एक हजार मुलांमागे ९२७ एवढे प्रमाण मुलींचे झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. स्त्री भ्रूणहत्येचा कलंक लागलेल्या बीड जिल्ह्यासाठी ही निश्चितच भूषणावह बाब म्हणावी लागेल.

बीड जिल्हा हा गेल्या काही वर्षांपूर्वी शून्य ते सहा वर्षे वयोगटांतील मुलींच्या प्रमाणात मागे पडला होता. जिल्ह्यातील शिरूर-कासार तालुका तर देशभरात रेडझोन घोषित झाला होता. त्यातच बीड जिल्ह्यात स्त्रीभ्रूण हत्या उघड झाल्या. मात्र त्यानंतर जिल्ह्यात स्त्री जन्मदर वाढावा यासाठी विभागीय स्तरावर लेक वाचवा, राष्ट्र वाचवा अभियान राबवून मोठी जनजागृती केली होती. या विषयावर अधिक लक्ष केंद्रित करून विविध योजनांच्या माध्यमातून अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले. ज्याचा परिणाम मुलींचा जन्मदर वाढण्यावर झाला. सन २०१०-११ मध्ये हजार मुलांमागे जिल्ह्यात ८१० मुली होत्या. हे प्रमाण २०११-१२ मध्ये ७९७, २०१२-१३ मध्ये ८९३, २०१३-१४ मध्ये ९१६, तर २०१४-१५ मध्ये ९१३ इतके होते. २०१५-१६ मध्ये हे प्रमाणात ८९८ इतके घटले, तर आता त्यात वाढ होऊन २०१६-१७ मध्ये ९२७ इतके झाले आहे. यावर्षी जिल्ह्यात झालेल्या नोंदणीनुसार २३,३८७ मुलांचा, तर २१,६८१ मुलींचा जन्म झाला आहे.

मुलींचा जन्मदर वाढावा यासाठी जिल्हयात शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी आरोग्य विभाग आणि महिला बालविकास विभागाने प्रभावीपणे केली. रूग्णालयात प्रसुतीसाठी येणाऱ्या गरोदर मातांच्या नोंदणीमध्येही मागील वर्षभरात दहा टक्क्यांची वाढ झाली.

 मुलींना जन्म देण्याविषयी गरोदर मातांना समुपदेशन, गावा गावात लिंग-प्रमाण दर्शविणारे फलक, प्रसुतीपूर्व गर्भलिंग निदान कायद्याची कडक अंमलबजावणी आदी उपाययोजनांबरोबरच आरसीएच या शासकीय पोर्टलवर गरोदर मातांची नोंदणी बंधनकारक करण्यात आली आहे. महिला बचतगटांच्या माध्यमातून स्त्री जन्माविषयी जनजागृती, प्राथमिक आरोग्य केंद्रात मुलीच्या जन्माचे स्वागत, बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानाचे महत्त्व ग्रामसभेत सांगणे, सर्व शाळांमध्ये मुलींसाठी शौचालये, सावित्रीबाई फुले कन्या पारितोषिक योजना, माझी कन्या भाग्यश्री योजनेची यशस्वी अंमलबजावणी याबरोबरच सोशल मीडियाच्या माध्यमातून करण्यात आलेला प्रभावी प्रचार आदी कारणांमुळे जिल्हयात मुलींची संख्या वाढण्यास मोठी मदत झाल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे यांनी सांगितले. जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनीही महिला विषयक योजनांची अंमलबजावणी संदर्भात जिल्ह्यातील यंत्रणाना निर्देश दिले. या साऱ्याचा परिपाक म्हणून जिल्ह्यात स्त्री जन्मदारात लक्षणीय वाढ झाली आहे.

🔹ज्येष्ठ साहित्यिक भीमसेन देठे यांचे निधन

गावकुसाबाहेरील उपेक्षित समाजाचे आयुष्य जगासमोर आणणारे ज्येष्ठ साहित्यिक भीमसेन देठे (वय ७०) यांचे दीर्घ आजाराने 6 मे 2017 रोजी निधन झाले.

'चक्री' या अभिजात कादंबरीमुळे त्यांची साहित्य विश्वास नवी ओळख निर्माण झाली. डबुलं, घुसमट, तुफानातील दिवे, इस्कोट आदी साहित्य संपदा गाजली.

 मागास, उपेक्षित समाजातील व्यक्ती या त्यांच्या साहित्यातील नायक असत. व्यक्ती त्यांच्या साहित्यात नायकाच्या भूमिकेतून साकार झाल्या. मराठी साहित्यासाठीतील अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले. शासकीय सेवेत असताना त्यांनी साहित्य क्षेत्रातील आपली आवड जोपासली. शासकीय अधिकारी म्हणून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी साहित्य, समाजकार्यात झोकून दिले. मागील दोन वर्षांपासून ते कर्करोगाच्या आजाराने त्रस्त होते.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹डॉ. जगन्नाथ वाणी यांचे कॅनडात निधन

ज्येष्ठ संख्याशास्त्रज्ञ व राज्यभरातील सामाजिक संस्था व कार्यकर्त्यांचे आधारवड डॉ. जगन्नाथ वाणी (वय ८३) यांचे 6 मे 2017 रोजी कॅनडा येथे दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांना कॅनडाच्या 'ऑर्डर ऑफ कॅनडा' या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. पुण्यातील स्किझोफ्रेनिया अवेअरनेस असोसिएशनसह (सा) अनेक सामाजिक संस्थांशी ते निगडित होते.

धुळ्यात शालेय व पुण्यात महाविद्यालयीन शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी उच्चशिक्षणासाठी कॅनडा गाठले. कॅनडामध्ये स्थायिक झाल्यानंतरही ते महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांशी सातत्याने संपर्कात होते. पत्नीला झालेल्या स्किझोफ्रेनिया आजारामुळे त्यांनी या आजाराचा अभ्यास सुरू केला. गेली ४० वर्षे दरवर्षी मायदेशी येऊन विविध संस्थांचे कामकाज ते पाहत असत.

 मनोरूग्णांसाठी व उपेक्षितांसाठी त्यांनी कॅनडात व भारतातही अनेक उपक्रम राबवले. धुळे येथील का.स.वाणी राठी प्रगत अध्ययन संस्था, पुण्यातील स्किझोफ्रेनिया अवेअरनेस असोसिएशनची (सा), शारदा नेत्रालय, बधीर पुनर्वसन संस्था आदी संस्थांच्या उभारणीत त्यांचा मोलाचा वाटा होता. कॅनडात वेदान्त सोसायटी ऑफ कॅलगरी तसेच रागमाला या संस्थांची स्थापनाही त्यांनी केली.

 जागतिक संगीत अभ्यासक्रमही त्यांनी सुरू केला. महाराष्ट्रात काम करणाऱ्या विविध सामाजिक संस्था, संघटना व कार्यकर्त्यांनी आर्थिक बळ मिळावे यासाठी त्यांनी अविरत मेहनत घेतली. कॅनडामध्ये महाराष्ट्र सेवा समितीची स्थापना करत त्यांनी कॅनडासह अमेरिका व इतर देशातून त्यांनी प्रचंड आर्थिक मदत मिळवून दिली. आपण आर्थिक मदत केलेल्या संस्थांचा कारभार कसा चालू आहे, याकडे त्यांचे बारीक लक्ष असे. मानसिक आजाराविषयी जनजागृतीसाठी ‘देवराई, माहिती अधिकाराशी संबंधित ‘एक कप च्या' अशा काही चित्रपटांची व लघुपटांची निर्मिती त्यांनी केली. २०१२ मध्ये त्यांना ‘ऑर्डर ऑफ कॅनडा हा कॅनडाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्राप्त झाला होता. तसेच भारतात राष्ट्रपतींच्या हस्तेही त्यांचा गौरव झाला होता.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹माजी न्यायाधीश लैला सेठ यांचे निधन

दिल्ली हायकोर्टाच्या पहिल्या महिला न्यायाधीश लैला सेठ (८६ वर्ष) यांचे नोएडातील राहत्या घरी दीर्घ आजाराने 6 मे 2017 रोजी निधन झाले. सुप्रसिद्ध लेखक विक्रम सेठ यांच्या त्या मातोश्री होत्या.

लैला सेठ यांनी १९५८ साली लंडनमध्ये विधी परिक्षेत त्यांनी अव्वल क्रमांक पटकावला होता. या परिक्षेत अव्वल क्रमांकाने पास होणाऱ्या त्या पहिल्या महिला ठरल्या. त्यानंतर पटना हायकोर्टात वकिली व्यवसायाला सुरूवात केली. लैला सेठ यांची १९७८ साली दिल्ली हायकोर्टाच्या न्यायाधीशपदी नेमणूक करण्यात आली. त्यानंतर १९९१ साली हिमाचल प्रदेश हायकोर्टाच्या मुख्य न्यायाधीशपदी त्यांची नेमणूक करण्यात आली. हायकोर्टाच्या मुख्य न्यायाधीशपदी नेमणूक होणाऱ्या त्या महिला न्यायाधीश ठरल्या. लैला सेठ यांची विधी आयोगात २००० साली नेमणूक करण्यात आली होती. हिंदू वारसा हक्क कायद्यात महत्त्वाचे बदल करण्यात त्यांची मोठी भूमिका होती. या बदलामुळे एकत्रित कुटुंबात मुलींनाही संपत्तीचा अधिकार मिळाला.

🔹शहरांतील ९९ टक्के मुले वापरतात इंटरनेट

देशाच्या शहरी भागांतील ९८.८ टक्के मुले इंटरनेटचा सर्रास वापर करीत असल्याचे एका अभ्यासात समोर आले आहे. त्यातील ५४.६ टक्के मुलांचे पासवर्ड अतिशय धोकादायक असून, त्यामुळे सायबर गुन्ह्यांना निमंत्रण मिळू शकते असेही अभ्यासात नमूद करण्यात आले आहे. टेलिनॉर इंडियातर्फे करण्यात आलेल्या अभ्यासात तेरा शहरांमधील २,७०० मुलांचा समावेश करण्यात आला होता. ५४.६ टक्के मुलांकडून वापरण्यात येणारे पासवर्ड धोकादायक असून, त्यामध्ये केवळ शब्दांचा अथवा अंकांचा समावेश करण्यात येतो. हे पासवर्ड आठ अक्षरांपेक्षाही कमी असल्याचे आढळून आले आहे. या शिवाय ५४.८२ टक्के मुले आपला पासवर्ड मित्र आणि नातेवाइकांशी शेअर करीत असल्याचेही समोर आले आहे. अहवालानुसार वय वर्षे ६ ते १८ दरम्यानची ८३.५ टक्के मुले सोशल मीडियावर सक्रिय आहेत.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा